आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
फोर्टात बर्मा-बर्मा येथे या शनिवारी खाण्याचा योग आला. अँबियन्स छान आहे. अन्नाची चवही उत्तम. आम्ही स्टार्टर्स साठी गाजर-आल्याच्या सुपातला समोसा तर मेघना-ऋ ने मुळ्याचं सूप घेतलं होतं. ड्राय खौसी, एक कसलातरी पिवळ्या रंगाचा मसाले भात(त्यात काळे तीळही होते), न्यूडल्स आणि मंडाली मीशे (ब्रॉथ विथ व्हेजिटेबल्स) असं सगळं ऑर्डर केलं होतं. मंडाली मीशे थोडंसं चवीला सपक होतं, बाकी सर्व चवीला सर्वच उत्तम होतं. आम्ही खूप उशीरा गेल्यामुळे सगळी ऑर्डर एकदाच द्यावी लागली आणि नंतर डेझर्ट वगैरे मागवण्याच्या आधीच हाती बिल मिळालं. असो. पण त्यामुळं आता दुसर्यांदा तिथे नक्कीच जाणं होईल.
तिथली छोटीशी चहाची किटली आणि बर्मी छत्र्या खूप आवडल्या.
सगळ्यात वेगळं म्हणजे तिथलं टॉयलेट खूप स्वच्छ होतं, बर्माच्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि फोटोज तिथे लावले होते.