उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ९
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
फोर्टात बर्मा-बर्मा येथे या शनिवारी खाण्याचा योग आला. अँबियन्स छान आहे. अन्नाची चवही उत्तम. आम्ही स्टार्टर्स साठी गाजर-आल्याच्या सुपातला समोसा तर मेघना-ऋ ने मुळ्याचं सूप घेतलं होतं. ड्राय खौसी, एक कसलातरी पिवळ्या रंगाचा मसाले भात(त्यात काळे तीळही होते), न्यूडल्स आणि मंडाली मीशे (ब्रॉथ विथ व्हेजिटेबल्स) असं सगळं ऑर्डर केलं होतं. मंडाली मीशे थोडंसं चवीला सपक होतं, बाकी सर्व चवीला सर्वच उत्तम होतं. आम्ही खूप उशीरा गेल्यामुळे सगळी ऑर्डर एकदाच द्यावी लागली आणि नंतर डेझर्ट वगैरे मागवण्याच्या आधीच हाती बिल मिळालं. असो. पण त्यामुळं आता दुसर्यांदा तिथे नक्कीच जाणं होईल.
तिथली छोटीशी चहाची किटली आणि बर्मी छत्र्या खूप आवडल्या.
सगळ्यात वेगळं म्हणजे तिथलं टॉयलेट खूप स्वच्छ होतं, बर्माच्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि फोटोज तिथे लावले होते.
+१पुन्हा नक्की जावं असं
+१
पुन्हा नक्की जावं असं हॉटेल आहे.
मला तर प्र त्ये क पदार्थाची चव आवडली. सर्विग कटलरीही वेगळी आणि छान आहे.
एकुणच रोमँटिक डेटवर जायलाही उत्तम ठिकाण आहे
आणि हो या छान सुचवणीबद्दल नामजोशी दांपत्याचे आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कर्वे रोड ला कोथरूड च्या
कर्वे रोड ला कोथरूड च्या दिशेने नळस्टोप च्या अगदी थोड पुढ आल की कर्वे रोडवरच (लागू बंधू च्या बाजूला ) हॉटेल खानदेश आहे . एकदम टिपिकल खानदेशी चवीच जेवण मिळत . थोड तिखट अमळ मसालेदार . झणझणीत चव असते . तिथली खानदेशी पद्धतीची शेव भाजी , वांग्याच भरीत आणि मटन फ्राय थाळी आवर्जून चाख्न्यासारखी आहे . तिथे पुण्यातल खानदेशी पब्लिक पडीक असते . अख्ख्या हाटेलात अहिराणी भाषा ऐकू येते . गल्ल्यावर एक मोठ्या पोटाचा मालक बसलेला असतो . त्याला हसताना कधीच पाहिलं नाही इतक्या वर्षात . हॉटेल चा ambiance , वैगेरे निकष असणारया लोकांनी या हॉटेल च्या वाटी न गेलेलंच बर . कधी कधी family दिसतात पण family ला घेऊन जाण्या अगोदर एकट्याने जाऊन रेकी केलेली बरी . चव मात्र झक्कास . तोंडात लिटरभर पाणी जमल राव आठवणीने .
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
हो मस्तय हे हॉटेल. खूप पुर्वी
हो मस्तय हे हॉटेल. खूप पुर्वी हे हॉटेल कचरा डेपो जवळ (कोथरुड डेपो जवळ, त्या चढावर) होतं, ते दिवस आठवले
खानदेशी जेवण कमालीचं चवदार असतं. त्यांचे मसाले तर लाजवाब.
शेवभाजी
पुरणाबरोबर करतात ती काळी आमटी
मेथीचे (ओल्या उपरण्यावर/पंच्यावर थापलेलं) - थालीपीठ
तांदळाची खिचडी
वांग्याचं भरीत
कळण्याच्या भाकरी
मेथी ची भाजी (मेथीची पानासकट लांब देठं आणि त्याला फक्त 'हिरवी मिरची+लसणाचं' वाटण आणि अंगापुरतं पाणी नी मीठ बस)
- ह्या पदार्थांच्या खानदेशी व्हर्जनस ला तोडचं नाही.... व्वा व्वा, पाणी सुटलं तोंडाला.
गोडाच्या बाबतीत 'मांडे' ह्याशिवाय फार खासियत नसावी.
नाशिक ते धुळे ह्या महामार्गांवर असलेल्या ढाब्यांवर अप्रतिम शेवभाजी मिळते (आणि इतरही खानदेशी मसालातल्या भाज्या).
अवांतर -
माझ्या ओळखीत बरेच खानदेशी परिवार आहेत आणि त्या परिवारातले बहुत करून मोठे लोक (४५-५०+ वयाचे) असेच आहेत. कितीही विनोद केला आणि हसवण्याचा प्रयत्न केला तरी ते जास्तित जास्त एवढंच स्माईल देतात जेवढं आपण कडाक्याच्या थंडीत गाल उलल्यामुळे विथाउट कोल्ड-क्रिम देऊ शकतो (नोंद - हे खानदेशी लोकांबद्दलचे सरसकटीकरण नाहीये, केवळ माझ्या संपर्कात आलेल्या लोकांचे निरीक्षण आहे).
...यावरून आठवले (कुतूहल/अवांतर)
सामोशाचे मूळ कुठले असावे? कारण इथियोपियापासून ते म्यानमारपर्यंतच्या याच्या विविध आवृत्त्यांबद्दल ऐकलेले/क्वचित खाल्लेले आहे.
इराणी/मध्य-पूर्व
विकीव्यतिरिक्त 'अन्नं वै प्राणा:' ह्या लेखमालिकेतूनः
धन्यवाद/आणखी प्रश्न
धन्यवाद.
यावरून आणखी एक अवांतर शंका:
कोलंबियन एक्स्चेंजपूर्वी चिनी लोक मिरच्या आणि कॉर्नफ्लोअरऐवजी नेमके काय वापरत असावेत? (मराठी लोक उपासाला काय खात असावेत, हा प्रश्न तूर्तास म्यान.)
मराठी लोक उपासाला काय खात
तेंव्हा कदाचित खराखुरा उपास करण्याची पद्धत असावी.
३८ बँग्कॉक स्ट्रीट
नुकतेच ३८ बँग्कॉक स्ट्रीट ह्या ठाण्यातील घोडबंदर रोड येथिल रेस्टॉरन्टला भेट दिली.
सुरुवातीस टॉम यम सूप मागवले. अत्यंत तिखट आणि रुचकर (केवळ तिखट म्हणून रुचकर नव्हे!)
नंतर, हुळहुळणार्या जिभेला आराम मिळावा म्हणून मवाळ मोमो मागवले गेले. ठीक ठाक होते. पण फार मजा नाही आली.
शेवटी मुख्य जेवण म्हणून 'वोक मील' ह्या सदराखालील 'बोल ऑफ कोरियन रामेन' घेतले. तिघांत पुरून उरेल एवढी क्वांटिटी आणि झकास चव!
मॉकटेलमध्ये ब्लडी मेरीचा डू आयडी मागवला तर तो ठार आंबटढाण निघाला (टोमेटो ज्यूस्+तुळस्+लिंबूपाणी). त्यापेक्षा दुसरे, अननसाचा रस अधिक नारळ घातलेले निळेशार मोरचूदसदृश मिश्रण, अधिक चवदार होते.
थोडक्यात, चायनिज व्यतिरिक्त अन्य दक्षिण अशियायी शाकाहारी पदार्थांसाठी, वाजवी किमतीतील (माणशी सुमारे रुपये ३००-३५०) एक झकास ठिकाण!
कुठेशी आहे हो हे? क्रेझी
कुठेशी आहे हो हे? क्रेझी टर्टलच्या बाजूला नवीन काहीतरी निघालंय ते का?
वैसे तो ब्लडी मेरीचा अपमान करनेवाले की गली में हमें पांव रखना नाही.. पण तरीही बाकी पदार्थांची चव चांगली म्हणताय म्हणून एकदा संधी द्यावी म्हणतो त्यांना.
त्याच जागी
क्रेझी टर्टल बंद झालेय. बहुधा त्याच जागी आलय हे. एकदा जाऊन येण्यालायक तर नक्कीच आहे.
बर्मा हॉटेलचा ambience
बर्मा हॉटेलचा ambience "टेम्पल रन" वरुन प्रेरित आहे का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
डेक्कनला असलेल्या (कै) पूना
डेक्कनला असलेल्या (कै) पूना कॉफी हाऊसमधे कोणी पूर्वी जात होते का? चांगले असल्याचे आठवते. सहज आठवण झाली. परत चालू होण्याची शक्यता बहुधा नसावी.
मी गेलेलो काही वेळा. पण लहान
मी गेलेलो काही वेळा. पण लहान होतो तेव्हा. लक्षात राहण्यासारखं काही वाटलं नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
'पीसीएच'...
पूना कॉफी हाउसच्या नक्की कोणत्या आवृत्तीत गेलेलात?
खूप जुनी (१९७०च्या दशकातली, साधारणतः आणीबाणीच्या काळाच्या आसपासची, जेव्हा मालक श्री. सुरेश कलमाडी हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि संजय गांधीभक्त होते), झटॅकीकरण होण्यापूर्वीची आवृत्ती पाहिली/अनुभवली आहेत काय?
तेव्हा 'पीसीएच' हे एक छान, त्यातल्या त्यात क्लासी पण तरीही मध्यमवर्गीय असे रेष्टारण्ट होते. समोरच्या दर्शनी भागात कॉलेजतरुणांना उघड्या हवेत गप्पा मारत नि सिगारेटी फुकत तासन् तास स्याण्डविचे खात नि कॉफी / खिशात जास्त पैसे असतील तर ज्यूस पीत बसण्याची सोय करून देणारा 'चिटचॅट' नावाचा विभाग होता. (त्यात पुन्हा मालक स्वतः संजयभक्त नि (चूभूद्याघ्या, नक्की आठवत नाही, पण बहुधा) युवक काँग्रेसचे पुण्यातील तत्कालीन बिगशॉट असल्याकारणाने, संजय गांधींचे 'वर्क मोअर, टॉक लेस' हे आणीबाणीकालीन बोधवचन तेथेच लावलेले असे, हा दैवदुर्विलास होता, पण त्याकडे बहुधा मालकांसह सर्व दुर्लक्ष करीत असावेत.) आतमधे (नाव आता नक्की आठवत नाही, पण बहुधा स्पायडर्स वेब) एक बंदिस्त विभाग होता - बहुधा 'फ्यामिलीरूम' कन्सेप्ट असावी, पण नक्की खात्री नाही. मागच्या बाजूस पुन्हा एक उघडा भाग होता, तेथे रात्रीच्या वेळेस लाइव ब्याण्ड जुनीनवी हिंदी चित्रपटगीते वाजवीत असे, ती ऐकत जेवण्याची उत्तम सोय होती. (आम्ही त्या वेळेस शाळकरी वयाचे होतो; आईबापांचे बोट धरून आमचा वावर बहुतकरून याच विभागात असे.)
उत्तम डोसे, पंजाबी जेवण आणि कॉफी (गरम आणि थंड) मिळत असे. मात्र, पूर्ण शाकाहारी होते. (मांसाहारी खायचे झाले, तर आईबाप इतर अड्ड्यांवर घेऊन जात.) बियर/मद्य मिळत नसे. (इन एनी केस, (१) त्या वयात, आणि (२) आईबाप सोबत असताना, तो प्रश्नही उद्भवत नव्हता.)
पुढे मग मालकांना काय उपरती झाली, कोण जाणे, पण झटॅकीकरण सुरू झाले. मध्यंतरी काही काळ डोसे/पंजाबी वगैरे सर्व बंद करून फक्त चायनीज (गेलो नाही त्या काळात कधी, पण बहुधा व्हेज नॉनव्हेज दोन्ही) सुरू केले होते. (नावाची नक्की खात्री नाही, पण बहुधा 'शाओ लिन'? चूभूद्याघ्या.) ते बहुधा फार काळ चालले नसावे, म्हणून मग पुन्हा पंजाबीटैप्स (पण व्हेज नॉनव्हेज दोन्ही) सुरू केले. बाहेरच्या बाजूस स्याण्डविच/फास्टफूडखाना. (नक्की आठवत नाही, परंतु डोशांचे बहुधा उच्चाटन झाले होते. बहुधा डौनमार्केट वाटत असावे.) दारूचीही सुविधा बहुधा आली असावी; नक्की आठवत नाही, आणि नंतर फारसा गेलोही नाही. पण मग बाय द्याट टैम पीसीएचचा मध्यमवर्गीयपणा/फ्यामिली रेष्टारण्टपणा पार लयास जाऊन 'खिशात पैसे आहेत' हे दाखवण्याचे ते ठिकाण होऊन बसले होते. (खाण्याचा दर्जा बरा होता, नाही असे नाही; पण आमच्या लेखी त्याचे 'अपील' गेले होते.)
पुढे मग ते रेष्टारण्टही गेले नि कलमाडीही (राजकारणातून) लयाला गेले. कालाय तस्मै नमः|
नाय नाय.. गाणी गिणी ऐकली
नाय नाय.. गाणी गिणी ऐकली नाहीत तिथे कधी. तिथे पंजाबी खाल्याचं स्मरतय. डोसा नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ब्रेड
वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ब्रेड (फोकाचिया, बागेत इ इ) मुंबई, पुण्यात कुठे ताजे तयार मिळतात?
मुंबई/ठाण्यात आर मॉलमधल्या बेकरीत बागेत घेतला असता तो करवतीपेक्षाही हातोड्याने फोडण्यासारखा निघाला. उत्तम बागेत फ्रान्समधे खाल्ला असल्याने इथे त्याची उणीव जाणवतेय. त्या नावाने पाव मिळतो काही ठिकाणी, पण अत्यंत चिवट किंवा तत्सम दोष असलेला. मूळ बागेत बाहेरुन कुरकुरीत क्रस्ट आणि आतून मऊ चविष्ट असा होता.
फोकाचिया तर दिसतच नाही.
हाच प्रश्न मलाही आहे.
हाच प्रश्न मलाही आहे. धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बागेत
हिरानंदानी इस्टेटमधील गोदरेजच्या (नेचर्स बास्केट) दुकानात (कधीकधी) मिळतो.
केलाय ट्राय. तो बागेत
केलाय नेचर बास्केटचाही ट्राय. तो बागेत थिओब्रोमाचा असतो. पण तोही दात पाडेल इतका चिवट आणि कठीण असतो. थिओब्रोमाच्या इतर उत्कृष्ट उत्पादनांमधे हे एक गल्ली चुकलेलं आहे.
आता नेबाच्या शाखांमधे अमेरिकन बेगेल (की बागेल) अशा नावाचे पाव आले आहेत, रिंगसारखे. (बहुधा) कोणी घेत नाहीत म्हणून एक दिवस त्याचेच गार्लिक टोस्ट करुन ठेवलेले अर्धे कापून. एकदा घेऊन पाहणार आहे. रिस्कशिवाय चव नाही.
पण फोकाचिया मात्र कधीच दिसत नाही.
बेगल्स घरी बनवता येतात. विविध
बेगल्स घरी बनवता येतात.
विविध प्रकारचे बेगल्स हे आम्रिकेत माझा आअवडता ब्रेकफास्ट असे.
बेगल्स विथ एग हे मिर्याच्या तिखटपणाचे चवीष्ट ऑमलेट, तीळ/जवस/कांदे/गार्लिक (जो प्रिय असेल तो) लावलेला बेगल आणि कॉफी.. अहाहा! काय नाष्टा व्हायचा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गेल्या शुक्रवारी सिझन्स
गेल्या शुक्रवारी सिझन्स मॉलातल्या "वाह मराठी!" ह्या फाईन डाईन रेस्टॉरंट मधे खाल्लं. ठिकंच आहे,
मेनू : मेनूत फार काही पर्याय नाहीत विशेष. आम्ही "पाटवड्याची आमटी", "मालवणी चिकन करी" मागवलं होतं, दोन्हींची चव चांगली होती पण विशेष असं काही वाटलं नाही, चिकन व्यवस्थित शिजलेलं होतं बाकी. ज्वारी ची भाकरी कच्ची होती, तक्रारी नंतर नीट भाजून दिली. भात घरच्या सारखा होता, थोडासा गुरगुट्या आणि तूप मीठ टाकून शिजवलेला (ते एक चागंलं वाटलं, नाहीतर स्टीम/साधा/प्लेन राईस म्हंटलं की फडफडीत बास्मती भात देतात).
किंमत (व्हॅल्यू फॉर मनी) : महाग वाटलं, फक्त मेन कोर्स चं बील ७५०/- आलं (ज्यात दोन भाज्या, ५ भाकरी, एक पोळी, एक भात)
वातावरण (अँबीयन्स): थोडा उदास वाटला, विशेष गर्दी नव्हती त्यामुळे भकास वाटलं.
सेवा (सर्व्हीस) : फार हळू. 'वाह मराठी' असून विशेष मराठी बोलणारे वेटर्स नव्हते किंवा येत असून बोलत नव्हते (मी ही सवयी प्रमाणे हिंदीत सुरुवात केली हा भाग वेगळा). फारेनर कस्टंबरांना जास्त प्रेफरन्स देत होते, त्यामुळे "मातृ-भुमी ही ज्याची त्याला होत बंदीशाला" किंवा "असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला" वगैरे वाटून उचंबळून येऊ शकतं (पेपर नॅपकीन्स भरपूर आणि फ्री असतात तिथे - ते एक बरंय)
थोडक्यात, जे घरी खातो तेच मिळतं मग कशाला जा आणि एवढे पैसे घालवा (आता आम्ही भुकेने कासावीस झालो होतो आणि जे समोर दिसलं त्याला आपलं म्हंटलं) अगदी घरच्या सारखं खावं वाटलं तर पेठेतल्या छोटेखानी खानावळीत जावं आणि अगदीच लग्नात मिळतं तसं जेवण जेवावं वाटलं तर श्रेयस सारख्या ठिकाणी जावं ... पण "वाह मराठी" नकोच!
किंमत जास्त आणि सर्व्हिस स्लो
किंमत जास्त आणि सर्व्हिस स्लो याबद्दल सहमती. पण मराठी बोलणारेच वेटर्स होते मी जितक्यांदा गेलो तितक्यांदा.
तदुपरि क्वालिटी छान आहे-यद्यपि क्वांटिटी अजून जास्त आवडली असती. मला विशेषतः फिश करी आवडली तिथली. बोंबील करी खाल्लेली.
तदुपरि- पेपर नॅपकीनसाठी चार्ज करणारे हाटेल कुठले म्हणे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण मराठी बोलणारेच वेटर्स होते
असेलही त्यामूळेच मी हे लिहीले "(मी ही सवयी प्रमाणे हिंदीत सुरुवात केली हा भाग वेगळा)" आणि हा आमच्या चेहर्याचाही दोष असावा. मी मराठी बोलायला लागलो की लोक म्हणतात "अरे वा, तुम्हाला मराठी पण छान बोलता येतं की" ....बाजरातल्या आज्या सुद्धा खूप कष्ट घेऊन हिंदीत बोलतात आणि जेव्हा मी सांगतो की मी 'मराठीच आहे आजी' तेव्हा सुटकेचा श्वास सोडतात. त्यामुळे हा वेटर्स चा दोष नाही आणि आमच्या दिसण्याचाच हे मान्य करतो.
घेणार होतो हो, फिश ही घेणार होतो, पण काही दुष्ट* लोकांनी खाऊ दिलं नाही
नाही, विकत कुठेच मिळत नाहीत. माझं म्हणणं होतं की कितीही रडू आलं देशप्रेमाने किंवा "कुठे नेऊन ठेवला" भावनेने तरी चिंता इल्ले... वापरा हवे तेवढे नॅपकीन्स त्याअर्थी "ते एक बरंय" म्हणालो.
.
.
.
.
.
.
दुष्ट* - केतकी नामक पाशवी ऐसीकर !
हाहा, ओक्के. बाकी एकुणात
हाहा, ओक्के.
बाकी एकुणात चांगले हाटेल, पण अगदी जगातभारी वगैरे काही नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण अगदी जगातभारी वगैरे काही
+१
लॉ कॉलेजरोडवरच्या "कोलाज" ला
लॉ कॉलेजरोडवरच्या "कोलाज" ला मंगलोरी प्रॉन्स करी आणि केरळी अप्पम खाल्ले.
अहाहा! करीची चव फारच छान पण त्यात प्रॉन्स अगदी मोजून घातले असावेत.
मात्र केवळ करीच्या चवीसाठी तिथे गेलात की एक मंगलोरी करी मागवाच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वाह मराठी मध्येही करीची चव लय
वाह मराठी मध्येही करीची चव लय भारी.
कलिंगा मध्ये घस्सी इ. ची चव विशेषतः नीर डोशाबरोबर अप्रतिम.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कलिंगा मधे रवा फ्राय फिश....
कलिंगा मधे रवा फ्राय फिश.... आई गं.... अ-फ-ला-तू-न .... पण फार पुर्वी खाल्ले आहेत, त्यामुळे आताही तीच चव असेल का ह्या बद्दल शंका (देजा-वू का होतंय मला .. मी आधीही टाकली आहे का अशी कमेंट कलिंगा बद्दल?)
रवा फ्राय फिष हा फार कै आवडता
रवा फ्राय फिष हा फार कै आवडता पदार्थ नाही. कलिंगात आम्ही जातो ते कर्यांसाठी. तथापि म्हणताहात तर येकदा तेही ट्राय औट केले पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रचंड खाणे झाले
काही दिवसांपूर्वी एका घरगुती लग्नसमारंभासाठी धावतपळत भारतभेट झाली त्यात बरेवाईट असे प्रचंड खाणे झाले. केवळ दोन आठवड्यात इतकं खाणं झालंय की लिहिताना अपराध्यासारखंच वाटतंय.
लग्नाच्या आदल्या दिवशी व्याहीभोजन वगैरे अनुषंगाने छोटासा कार्यक्रम होता. तिथे अगदी जोरदार जेवलो. शाही पुलाव, पंचरंगी दाल, दम आलू, आणि विशेषतः रबडी+जिलेबी आणि गुलाबजाम खाऊन तृप्त झालो. (बाजूला ठेवलेल्या तिरामिसुकडे चक्क दुर्लक्ष केले)
लग्न महालक्ष्मी सभागृह येथे होते. माझेही लग्न तिथेच झाले होते. माझ्या लग्नाच्या दिवशी पुरी, बटाट्याची भाजी, बहुदा कडधान्याची रस्सा भाजी, मसालेभात, वरणभात (तूप), मठ्ठा, जिलेबी, बर्फी, भजी, अळूची भाजी, गुलाबजाम व व्हॅनिला आईस्क्रीम असा मराठी मेनू होता. पंजाबी पदार्थ अजिबात ठेवू नका असा मुलीकडच्यांना (!) सज्जड दमच दिला होता. त्या मेन्यूची आठवण येऊन पुन्हा एकदा डिंगणकर केटरर्सचा आस्वाद घ्यावा या आशेने लग्नाला हजर राहिलो. व्हेज जालफ्रेजी(!) हा प्रकार पुण्यातील लग्नाच्या मेन्यूत कसा काय ठेवू शकतात? बायकोच्या माहेरचे लग्न असल्याने तिथे जाहीर मतप्रदर्शन करता आले नाही. मात्र काही जणांचे मत तो प्रकार व्हेज जालफ्रेजी नसून व्हेज जयपुरी हा असावा असे पडले. एकंदरीत जेवणाचा दर्जा किंवा मेन्यूतील पदार्थांची निवड यात काहीतरी निश्चितच गंडले होते असे वाटले. सुरळीच्या वड्या बाकी मस्त होत्या.
रिसेप्शनचे जेवण चितळे केटरर्सचे होते तिथे नेहमीच्या मेनकोर्ससोबत अत्यंत स्वादिष्ट असे उकडीचे मोदक (भलेमोठे टेनिसचेंडूच्या आकाराचे ) खाण्यात आले. मोदकाच्या बाजूला तुपाची एक वाटीही होती. प्रत्येक मोदकास १ वाटी अशा दराने वाढपी मंडळी देत असल्याने स्निग्ध मनाने बरेच मोदक हाणले.
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला प्रसादाचा शिरा, पुरणपोळी, कटाची आमटी, कुरडई, भजी वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार.
या व्यतिरिक्त मित्रमंडळींना नॉर्दर्न फ्रंटियर येथे भेटलो तिथे अॅपेटाईझर्स खाल्ले, वल्ली यांनी इतरत्र सुचवलेली जनता मिसळ आणि विजय बेकरीचे पाव, पुणेस्टेशनवरील कैलास डेअरीची बासुंदी आणि निगडीतील प्रदीप बेकरीतील कलाकंद व केशरी पेढे. बायकोच्या माहेरी ताज्या खव्याचे गुलाबजाम व शिरा.
असो. आता पुढील सहा महिन्यात क्यालरीज कमी करायचा निश्चय केला आहे.
हा हलकाटपणा आहे अतिशहाणे!!
हा हलकाटपणा आहे अतिशहाणे!!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अगदी अगदी. तरी जालफ्रेजी
अगदी अगदी. तरी जालफ्रेजी मिळाल्यावर "बरी जिरली!" असं वाटून प्रतिक्रिया टंकली नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अगदी, अतिप्रचंड हलकटपणा
अगदी, अतिप्रचंड हलकटपणा
ठाण्यात 'मेतकूट'मध्ये भटो
ठाण्यात 'मेतकूट'मध्ये भटो (म्हणवणारं) जेवण जेवले. (या चॉईसबद्दल कृपया मला नावं ठेवू नयेत. मला मैत्रिणीला भेटण्यात रस होता, तिला भटो जेवणात. शिवाय मला उन्हात फार चालावं लागू नये, अशीही तिची सदिच्छा होती.)
व्यवस्थित मराठी बोलणाऱ्या आम्हां दोघींना (मैत्रीण तर घारी-गोरी) तो पुरीबरोबर गोळ्यांची कढी चांगली लागत नाही असं सांगत होता ते ऐकून वैताग आला. वरून एसी धापा टाकत होता त्यामुळे पारा चढायला मदतच झाली. गोळ्यांची कढी म्हणजे कढी-गोळे असतात, भिजवलेल्या डाळीचे बनवतात तेच का, अशी चौकशी केली. वेटर हो म्हणाल्यामुळे ते मागवले तर कढीत तरंगणारी भजी दिसली. एसी धापा टाकतच होता. लाल माठाच्या भाजीत कांदा घातला होता का कांद्याच्या भाजीत लाल माठ असाही प्रश्न पडला. पोळ्या मात्र चांगल्या होत्या. पुरीबरोबर गोळ्यांची कढी वाईट लागली नाही. त्यानंतर मागवलेला नारळीभात, मला आवडतो तसा माफक गोड होता. म्हणून त्यात साखर असण्याचा गुन्हा माफ केला. नेट लावून सगळे पदार्थ दीड तासांत संपवले तरी आम्हांला तिथून हाकललं नाही. एसी धापा टाकतच होता.
सुरूवातीला, मैत्रिणीची वाट बघत मी एकटीच तिथे जाऊन बसले तर कोणीही विचित्र नजरांनी बघितलं नाही. त्याबद्दल त्यांना पूर्ण मार्क.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
विचित्र नजरांनी बघितलं नाही
विचित्र नजरांनी बघितलं नाही म्हणून कसले हॉटेलला मार्क?! बाकी सगळ्या कसोट्यांवर भिक्कार आहे.
बीफ फेस्टिव्हल
काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या आयआयटीत बीफ फेस्टिव्हल झाला. नावात 'फेस्टिव्हल' हा शब्द असला तरी कार्यक्रमाला स्वरूप होतं ते पार्टीचं. एका प्राध्यापकांच्या घराच्या हॉलमध्ये काही लोक जमले होते. बरेचसे मल्लू आणि काही उर्वरित भारतातले. यातले फारच थोडे लोक एकमेकांना ओळखत होते. मी लगेच घाबरून माझा आयआयटीशी काही संबंध नाही हे यजमानीणबाईंना सांगून टाकलं, तर त्यांची काहीच हरकत दिसली नाही. उलट आयआयटीच्या आतल्या आणि बाहेरच्या शक्य तितक्या लोकांनी यावं अशी त्यांची इच्छा दिसली.
स्वयंपाकघरातून मस्त मस्त वास आणि ताटल्या भरून बीफचे पदार्थ बाहेर येत होते. आम्ही सगळे काटे चमचे घेऊन दोन-चार ताटल्यांतून वाटून खात होतो. कार्यक्रमाच्या सूत्रधाराने स्वतः ते सारे पदार्थ शिजवले होते.
खरे म्हणजे, 'आम्ही आम्हाला हवं ते खाणार' असं विधान करू पाहणार्या चळवळीचा एक भाग म्हणून हा फेस्टिव्हल दरवर्षी आयोजित केला जातो. पण सगळं शांततेत चाललं होतं. गोहत्याबंदीवाल्यांविरुद्ध चीड नाही, या विषयावर कुणी एक अक्षरही बोललं नाही, हा फेस्टिव्हल का आयोजित केला जातो यावरही चर्चा झाली नाही. नुसतंच एकमेकांशी संबंध असलेल्या-नसलेल्यांचं एकत्र येणं, ओळख असलेल्यांशी गप्पा मारणं, नसलेल्यांशी ओळख करून घेणं आणि बीफ खाणं. मधेच आपापली वेळ झाली की लोक उठून जात होते, अव्याहतपणे नवनवे लोक येत होते आणि ते आल्यावर ओळखीच्यांनी जोरात स्वागत करणं, यजमानीणबाईंपासून त्यांना प्रथमच पाहणार्या नवागतांपर्यंत सर्वांनी मिळून 'घे, खा' असा आग्रह करणं चालू होत.
एकंदरीतच ते वातावरण फारच आवडलं.
कालच महाराष्ट्रातही गोवंशहत्याबंदीचा कायदा लागू झाला. आता पुन्हा या कार्यक्रमाला जाता येणार नाही म्हणून वाईट वाटते आहे.
राधिका
खर्च
खर्च किती येतो हो अशा ठिकाणी साधारणतः ?
शून्य
केवळ आयोजक बीफ विकत घेताना खर्च करतात आणि शिजवून खायला घालतात. बाकीच्यांना मोफत. आपण नुसतं जाऊन खायचं.
राधिका
नारायण पेठेतल्या फिश करी राईस
नारायण पेठेतल्या फिश करी राईस मध्ये जाऊन आलो. सुरमई फ्राय आणि बांगडा करी दोन्ही भारी होतं. दरही वाजवी. दोघांचं बिल ८००. एक कढीही प्यालो. नारळाच्या दुधाला फोडणी घातली होती फक्त. बरा होता तो प्रकार. त्याला काय म्हणतात ते नाय लक्षात. फुटी कढी हीच का अस विचारल्यावर मी ज्याला तिवळ समजत होतो त्याला फुटी कढी म्हणतात असं समजलं. कोणी त्या पांढर्या कढीचं नाव आणि तिवळ/फुटी कढी यातला फरक सांगेल काय?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१ फिश करी राईसचा माझाही
+१ फिश करी राईसचा माझाही अनुभव चविष्ट आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ठाण्यात घोडबंदर रस्त्याला
ठाण्यात घोडबंदर रस्त्याला कॅड-बी मिळणाऱ्या दुकानात अनेकदा जाणं झालं होतं, पण कॅड-बी आणि फ्रेंच फ्राईज व्यतिरिक्त कधी काही घेतलं गेलं नव्हतं. पण काल तिथे पावभाजी मागवली आणि अहो आश्चर्यम्! छानच होती.
मला तिथे तितकी चांगली चव अपेक्षित नसणं प्लस आदल्याच रात्री खाल्लेल्या सरदारच्या काळ्या,बटरातिरेक असलेल्या पावभाजीशी झालेली तुलना प्लस भूक या तिनही गोष्टी बाजूला सारूनही परत कधीतरी जाऊन खावी इतकी आवडली.
मिसळ साठी
पुण्यात मिसळच्या ठराविक चवींचा कंटाळा आला होता म्हणून वेगळा ऑप्शन शोधत होतो.
कोथरूडला कोकण एक्स्प्रेस समोर "मस्ती मिसळ" सापडलं.
मिसळची चव वेगळी आणि उत्तम आहे. मिसळ सोबत ताजी सोलकढी, ताक पण मिळतं. किंमतीच्या तुलनेत क्वांटिटी भरपूर आहे. स्वच्छता आणि सेवा सुद्धा चांगली आहे.
अम्बियन्स (मराठी प्रतिशब्द सुचवावा) ठीक.जागा कमी आहे.
अवांतरः नाशिकच्या मिसळीसारखी चव अजून "तर्री" (नाशिकबाहेर) मिळाली नाहीये.
ओल्या नारळाची,कैरी घालून केलेली अफलात्तून कढी..............
नारळाची सोलकढी हा रुचकर प्रकार अत्यंत आवडतो.नुकतंच मुंबईला गेले असताना माझ्या मामेबहिणीनी केलेली ओल्या नारळाची , कैरी घालून केलेली अफलात्तून कढी खाली.त्याची कृती अशी : अंदाजे दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस, एक किंवा दीड कैरीचा कीस(आंबट{षौकिन}पणावर अवलंबून आहे)थोडी फेसलेली मोहरी,चवीनुसार मिरची,गुळ आणि मीठ घालून मिक्सरमधून वाटुन घ्यायचा. त्याचे दूध गाळून घ्यायचं आणि त्याला जिरं ,हिंग ,कढीपत्त्याची फोडणी घालायची. उकळायची नाही.थंडच प्यायची. नुसती किंवा भातासह अमेझिंग लागते. उकळल्यावर नासण्याची शक्यता असल्याने त्याला कॉर्नफ्लोर किंवा तांदुळाची पिठी लावून उकळता येते असे कळले .
वा वा! आता कैर्याही येऊ
वा वा! आता कैर्याही येऊ घातल्या आहेत. नक्कीच करून बघणार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सोलाशिवाय सोलकढी?
सोलाशिवाय सोलकढी?
नाही म्हणजे पाकृवरूनतरी पदार्थ रुचकर असावा असे वाटतेच आहे, पण ती सोलकढी नक्कीच नाही!
अहो त्यांना सोलकढी आवडते हे
अहो त्यांना सोलकढी आवडते हे एक वेगळे वाक्य आहे, ते तिथेच संपते. काय राव! तुमच्या सारखा झंटलमन...
त्यांच्य भगिनींनी केली ती नुसती वेगळ्या प्रकारची कढी. शीर्षक वाचा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ओह
ओह! स्वारी सखूताई!!
+१
बाकी तमिळ माणसाने सोलकढी हे नाव पाहिले तर त्याच्या लेखी ही बोलकढी असेल. कारण तमिळमध्ये 'सोल'णे = बोलणे.
बोलाचाच भात, बोलाचीच कढी हा वाक्प्रचार या संदर्भात रोचक ठरावा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वट्टास!
वट्टास!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तमिळमध्ये वांग्याच्या भरताचा
तमिळमध्ये वांग्याच्या भरताचा काय अर्थ होईल?
कदाचित 'हे भरत (उच्चारी
कदाचित 'हे भरत (उच्चारी 'बरत'), इकडे ये' असा?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कोरेगाव पार्कात पेस्ट्र्या
कोरेगाव पार्कात पेस्ट्र्या बाकी छान मिळतात असे लक्षात आले. फ्रेंच विंडो नामक खास फ्रेंच पेस्ट्र्या विकणारी छोटीशी पॅटिसेरी की काय म्हणतात तिकडे गेलो अन एकदोन पेस्ट्र्या खाल्ल्या. एकावर दुसरा अन दुसर्यावर तिसरा असे तीनचार थर होते. जे काय काँबो होते ते अतिशय जबराट. किंमत अर्थातच जास्त पण चव जाम आवडली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारतात असताना मुंबईत "मेरवान"
भारतात असताना मुंबईत "मेरवान" चा अननस-केक खाल्ला होता. फार छान होता.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
समोवार - बंद होणार
कित्येक वर्षांपूर्वी मुंबईच्या मोक्षमुल्लर संस्थेत जर्मन शिकण्यासाठी (कंपनीतर्फे) जात असे. तेव्हा कधीमधी समोवारमध्ये जाणे होई. त्यानंतर त्या भागात फारसे जाणेही झाले नाही. आता बंद होण्यापूर्वी एकदा जाऊन यावे म्हणतो!
http://www.mid-day.com/articles/iconic-south-mumbai-hangout-cafe-samovar...
छोटीसी बात मध्ये असलेलं ते
छोटीसी बात मध्ये असलेलं ते हेच का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
होय हेच ते. त्यातही
होय हेच ते. त्यातही जहांगीरमध्ये चित्रप्रदर्शन बघुनच मग मंडळी तिथे जातात असे स्मरते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुंबई - काही सांगीतिक शिफारशी
16 Places In Mumbai You Must Visit For Good Food And Even Better Music
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मॅकडोनाल्डचा शॅमरॉक शेक
मॅकडोनाल्डचा शॅमरॉक शेक आवडला. हा फक्त St Patrick Day (१७ मार्च) च्या सुमारास येतो.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
" साके सुशी " हे जपानी
" साके सुशी "
हे जपानी पद्ध्तीचे भोजनालय आहे. यात मधोमध एक सरकता पट्टा, (ओव्हल शेप चा असतो ) आणि त्याच्या दुतर्फा टेबल्स असतात. या पट्ट्यावर निरनिराळ्या रंगाच्या प्लेटस असतात. त्यात सुशी (चिकटभाताच्या रोल मधे सीफुड, मांसाहारी, आणि काही शाकाहारी पदार्थ घातलेले ) ठेवलेले असतात. प्रत्येक रंगाच्या प्लेट ची वेगळी किंमत असते. त्या किंमतींचा तक्ता टेबलपाशी ठेवलेला असतो.आपल्याला हवी ती प्लेट सरकत्या पट्ट्यावरून उचलून घ्यायची.त्याच बेल्टवर वसाबी ची बरणीही असते. त्यातली अगदी थोडी (कारण खूप तिखट असते )एका छोट्या वाटीत घेऊन त्यात सोया सॉस घ्यायचा. टेबल्च्या कडेला गरमपाण्याचा एक लहानसा नळ असतो. ग्रीन टी साठी. तिथेच एका सुबक लाकडी पेटीत चॉप स्टिकस आणि कागदी रूमाल ठेवलेले असतात.
सुशी खेरीज वेगवेगळे "डॉन", "उडोन" आणि राईस डिशेश मागवता येतात ( जे त्या सरकत्या पट्ट्यावर नसतात ). यात राईस अथवा नूडल्स बरोबर सीफुड, किंवा इतर मांसाहारी, काही थोडे शाकाहारी पदार्थ असतात. एका लाकडी बाउल मधे गरम मिसो सूप देतात.
भोजनासाठी थोडा जास्त वेळ हातात असेल, तर इथे जरूर जावे.
ग्रीन टी
आणि इतक्या चांगल्या जेवणानंतर आईस्क्रीम हवेच.
Strawberry-Banana rendezvous
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
वासाबी
तिखट (बोले तो जिभेला) वगैरे नसते फारसे, पण (सोया सॉस घालून पुरेसे डायल्यूट केले नाही, किंवा - गॉड फॉरबिड - नुसतेच खाल्ले, तर) थेट मेंदूला जाऊन भिडते नि झिणझिण्या आणते. (म्हणजे साधारणतः फेसलेली मोहरी खाल्ल्यावर जो येतो, तोच इफेक्ट, फक्त गुणिले किमान शंभर.)
बोले तो, कोणीतरी तुमच्या जिभेला बायपास करून थेट कवटीत शिरले, आणि तुमच्या मेंदूचा कडकडून चावा घेतला, तर काय होईल, याची कल्पना करा. वासाबी नुसते खाल्ल्यास ते होते.
खाण्याची प्रॉपर पद्धत म्हणजे (खास याच कामासाठी बनवलेल्या) इवल्याश्या बशीत भरपूर सोया सॉस, पातळ स्लाइस करून व्हिनेगरमध्ये मुरविलेले आले (व्हिनेगरमध्येच मुरवितात ना?) आणि हे वासाबी, एकत्र घोटायचे, नि मग त्या रसायनात तुमची ती सुशी किंवा साशिमी जो काही कच्च्या माशाचा प्रकार असेल, तो डिपवून खायचा. मात्र, नवशिके असाल, तर हा प्रकार करण्यापूर्वी हाताशी एक भला मोठा (शक्यतो थंडगार) पाण्याने भरलेला जग आणि एक ग्लास आहे, याची खात्री करून घ्यावी; प्रकार पुरेसा डायल्यूट न झाल्यास ज्या झिणझिण्या येतात, त्यानंतर काहीही सुचत नाही.
'सोडाबॉट्लओपनरवाला
काल रात्री KBC मध्ये 'सोडाबॉट्लओपनरवाला ' मध्ये गेलो.
मस्त इराणी ( पण स्वच्छ ) डेकॉर , अँबियांस . 'द बॉम्बे इराणी दारू मेन्यू ' या हेडिंग खाली असर्वसाधारण कॉकटेल्स ( वोडका विथ कोकम किंवा उसाचा रस वगैरे सारखी 'डेंजर ' कॉकटेल्स ) बावा पेग ९० ml अशी पतियाळा ला लाजवणारी हेडिंग्स . भिंतीवर बावा इसम्स धमाल . फूड टिपिकल इराणी सर्व उपलब्ध . सल्ली बोटी पासून लागन नु कस्टर्ड पर्यंत . टॉयलेट मध्ये ' एम प्रॉपरली डिकरा ' सारखे अपेक्षित पोस्टर्स ( कोणाचेही लक्ष नाही , पण मस्त स्विंग आणि रॉक अँड रोल चालू ,) मस्त जागा !! इराणी खाणे आणि पारशी बावागिरी ज्यांना आवडते त्यांनी नक्की जावे
ई केबीशी का है?
ई केबीशी का है?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे चुकून kbc टंकले , ते bkc
हे चुकून kbc टंकले ,बरोबर पकडलेत हो इतिहास तज्ञ !!:) ते bkc टंकायचे होते .
धन्यवाद, मुंबै खाद्यभ्रमंतीत
धन्यवाद, मुंबै खाद्यभ्रमंतीत अजूनेक ठिकाण अॅडवल्या गेले आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाह! बेरी पुलाव?
वाह!
बेरी पुलाव?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
इराणी की पारशी?
(फरक आहे. दोन्हीं झरथुष्ट्रीच झाले,तरी फरक आहे.)
'द बॉम्बे इराणी दारू मेन्यू' आणि 'एम प्रॉपरली डिकरा'/बावा पेग हे विसंगत वाटते. इराणी मनुष्य 'डिकरा' वगैरे म्हणेल (किंबहुना गुजराती बोलेल), असे वाटत नाही; ती खासियत पारशांची. तसेच, पारशांना जरी 'बावा' म्हणत असले, तरी इराण्यांना म्हणत नसावेत.
शिवाय, करेक्ट मी इफ आय अॅम राँग, पण 'सल्ली बोटी' हा खासा पारशी प्रकार असावा, इराणी नव्हे. (चूभूद्याघ्या.)
तर असे आहे कि, मालक पारशी आहे
तर असे आहे कि, मालक पारशी आहे म्हणतात . मेनू मध्ये सर्व पारशी specialities आहेतच.या शिवाय टिपिकल इराणी , (म्हणजे इराण मधील नाही तर गुडलक छाप इराणी)आहेत.(आणि या दोन्ही दुसरीकडे फारश्या मिळत नाहीत)decor मध्ये टिपिकल इराणी रेस्टो फील देण्याचा प्रयत्न केला आहे . मुख्य म्हणजे येथील (म्हंजीभारतातील) रन ऑ द मिल नॉर्थ, साऊथ,काँटी, ओरिएंटल,इटालियन रेस्टो पासून वेगळे आणि विशेष म्हणून लिहिले. एवढंच.
आणखी एक ,(रेस्टो वाले) इराणी
आणखी एक ,(रेस्टो वाले) इराणी बहुधा झोराष्टीयन नसावेत , बहुधा शिया असतात !!
झरथुष्ट्री...
रेष्टारण्टवाली इराणी मंडळी झरथुष्ट्री असल्याबद्दलची माझी माहिती येथून होती. कदाचित अंशतः चुकीची असू शकेल.
(बोले तो, 'इराणी' नावाची एक धर्माने (पारशांप्रमाणेच) झरथुष्ट्री, वंशाने/भौगोलिक उद्गमाने (पारशांप्रमाणेच) इराणोद्भव, परंतु अन्यथा सांस्कृतिक, भाषिक इ. दृष्ट्या पारशांपेक्षा पूर्णपणे वेगळी, आणि मुख्य म्हणजे पारशांच्या आठशेनऊशे वर्षांनंतर हिंदुस्थानात आलेली एक जमात आहे, याबद्दल संदेह नाही. कौंटरमागचे इराणी ते हेच इराणी काय, याबद्दल थोडा संदेह आहे; हा भाग त्या विकीपानावरून उचललेला आहे, कदाचित चुकीचाही असू शकेल.)
कुणास ठाऊक ,पण निदान पराडाईज
कुणास ठाऊक ,पण निदान पराडाईज , गुडलक , सनराईस , मुंबई चे क्यानी यांचे मालक तरी शिया आहेत.इतरांचे बघायला पाहिजे
पारसी-इराणी
हे बरोबर आहे.
दोन्ही जमाती (पारसी आणि (हॉटेलवाले) इराणी) दोन्ही झरत्रुष्टीच. दोघेही एकाच अग्यारीत जातात आणि गुजरातीतच बोलतात (दोनेक पिढ्यंपूर्वीपर्यंतचे इराणी 'दरी' नावाची भाषा बोलत. पण आता त्यांनीही गुजरातीच स्वीकारली आहे).
फक्त त्यांच्या कॅलेंडरात एक महिन्याचा फरक आहे! इराणी नववर्ष पारशांच्या एक महिना नंतर येते. त्यांचे तारू वादळात महिनाभर भरकटल्यामुळे ते एक महिना मागे पडले, अशी दंतकथा (ब्रून-मस्का) खातखात सांगितली जाते!
नवीन हाटेलांत जाणं थांबवलं का
नवीन हाटेलांत जाणं थांबवलं का लोकांनी? बॅटमॅन, जंतू, घनू. नेहेमीचे यशस्वी हॉटेल शोधक, सांगा पुण्यातली एखादी नवीन छान जागा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
झिंदाबाद, झिंदाबाद
सध्या तंगी आहे त्यामुळे 'घरकी दाल मुर्गी बराबर' नाही तर 'माणुसकीचा परिमळ झिंदाबाद'.
- रशियन मैत्रिणीच्या हंगेरियन मित्रानं दोह्याच्या ड्यूटीफ्रीमधून आणलेल्या फ्रेंच कोन्याकचा आस्वाद घेत घेत दिलेला प्रतिसाद. सोबत अमेरिकन मित्रानं आणलेल्या रायच्या पिठाचा घरी केलेला ब्रेड आणि सोबत ब्रिटनहून आलेलं प्रचंड मॅच्युअर चेडार त्यामुळे जागतिकीकरणसुद्धा झिंदाबादच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शो ऑफ!!
शो ऑफ!!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
न मी
अंहं मी डावा नसून उजवा आहे हे सिद्ध करण्याचा तो क्षीण प्रयत्न होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तंगी
पुढली तंगी आली की लगोलग आम्हांलाही कळवा. आम्ही येऊ तुमच्याकडे खायलाप्यायला.
औंधात मारू (एम ए आर डब्बल ओ)
औंधात मारू (एम ए आर डब्बल ओ) नामक एक कोरिअन फूडवाले हॉटेल आहे म्हणतात. कधी गेलो नाही, ते रडारवर आहे...
कोरेगाव पार्कात बोतेको नामक ब्रझिलियन जेवण सर्व करणारे हॉटेल आहे. उत्तम चव, पण तुटून पडण्याइतकी खास वाटली नाही. हे चिकनबद्दल. भोपळ्याचे सूप बाकी मस्त होते. पण ओव्हरप्राईस्ड वाटले.
https://www.zomato.com/pune/boteco-koregaon-park
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ब्राझिलिअन खायला जायला
ब्राझिलिअन खायला जायला पाहिजे. धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मारू सापडले तरी जाऊ नका.
मारू सापडले तरी जाऊ नका. कोरिअन जेवणाविषयी निष्कारण अढी तयार होईल.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
एवढं वाईट आहे का?
एवढं वाईट आहे का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमती
होय.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
बॅटमॅन, जंतू, घनू. नेहेमीचे
एवढ्यात विशेष असं नविन ठिकाणी जाणं झालं नाही. पण ढेरेशास्त्रींनी आठवण काढलीच आमची तर असं रिकाम्या पोस्टिने कसं जायचं, म्हणून हे थोडंफार :
१. Spice It- Hotel Ibis : दिवाळी दरम्यान ऑफिसच्या सहकार्यांसोबत विमान-नगरच्या 'आयबिस' च्या 'स्पाईस-ईट' ह्या रेस्टॉरंट मधे जाणं झालं. म्हणायला थ्रि-स्टार हॉटेल पण रेस्टॉरंट अतिशय साधारण. आम्ही लंच ला गेलो होतो, बुफे पद्धतिचं जेवण होतं. मेन्यू बद्दल विशेष लिहीण्यासारखं नाही शिवाय पर्याय ही फारच त्रोटक होते. त्या भागात आणि आयबिस सारख्या ठिकाणी प्रत्येकी फक्त ५५०/- होते म्हणुन गेलो पण ते ५५०/- ही वर्थ नव्हते. मी झोमॅटोवर झणझणीत फिडबॅक लिहाला आहे पण त्यांनी त्याला पुसलंही नाही :(, माज्जोर्डे... हा तो फिडबॅक http://www.zoma.to/PneKKK
२. CAFÉ PETERDONUTS Bavdhan : मला हे कॅफे जाम आवडतं. एक तर तिथला 'माहोल', म्युझिक, पदार्थ, इन्टेरिअर - सगळंच मस्तं. कितीही वेळ गप्पा ठोकत बसा, लोळा कोणी घाई करत नाही. पदार्थ ही फर्मास. भरपुर अॅपेटायझर्स किंवा सॅंडवीचेस मागवायचे आणि सिझन/वेळे नुसार सोबतीला कोल्ड किंवा हॉट कॉफी- बस्स -पोटोबा तृप्त होतो. मला त्यांचे 'हॉट गर्लीक फ्राईज' आवडतात. ह्यात फ्राईज हॉट गार्लीक रेड सॉस मधे टॉस करुन सर्व केल्या जातात. थोड्या आंबट, जरा तिखट आणि लसणीचा फ्लेवर - अहाहा! ड्रिंक मधे, हेझलनट फ्रॅपे उत्तम - संपुच नये असं, प्रमाणात गोड आणि थंडावा. ऑम्लेट्स,पास्ता, बर्गर, वॅफल हेही चांगलं असतं. आणि हो, ह्यांचे डोनटस मला मॅड-ओव्हर-डोनट पेक्षा जास्त चांगले वाटले. नक्की जा-च!
CAFÉ PETERDONUTS प्रभात रोडला
प्रभात रोडला हे अनेक दिवसांपासून दिसतय. अजून गेलो नाही. जायला हवं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हो हो, मी ही पहिल्यांदा तिथेच
हो हो, मी ही पहिल्यांदा तिथेच पाहिलेलं. बर्याच ठिकाणी आहे त्यांच्या शाखा. औंधेत पण पाहत आलोय मी. पण जाणं झालं ते केवळ बावधनातल्या कॅफेत. ह्याव्यतिरिक्त पिंपरी आणि विमान-नगर मधे आहे.
कोणीतरी कोरिअन कपल मालक आहे
कोणीतरी कोरिअन कपल मालक आहे चेनचं.
http://www.koreatimes.co.kr/www/news/nation/2015/04/654_177845.html
रोचक...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अरे वा, रोचक आहे ही माहिती.
अरे वा, रोचक आहे ही माहिती. त्यांच्या मेन्यूवर कोरियन पदार्थ दिसले पण घ्यायची हिंमत झाली नाही, अता मालकच कोरियन आहेत तर ट्राय करायला हरकत नाही
स्पेशल वडापाव
खादाडीपायी भटकण्याच्या नादात वडापाव आणि सँडविचचा संगम करून स्पेशल वडापाव नामे प्रकार खाण्यात आला ... गोरेगावात पूर्वेला खोपोलीचा वडापाव कित्येक वर्ष ज्याम फेमस आहे .. त्याच्या बरोब्बर समोर एक वडापावचा बेनामी स्टॉल आहे.. पदार्थांच्या नावावरून त्याचे नाव पांडुरंग आहे हे हे समजले .. अस्मादिकांच्या भाऊसाहेबांनी अगोदरच खोपोलीच्या समोरच्या स्टॉल वर स्पेशल वडापाव ज्याम भारी मिळतो म्हणून माहिती दिली असल्याने दुसरे काही खाण्याची हुशारी करण्याचा प्रश्नच नव्हता ...
स्टॉलवाल्या काकांनी एका डिश मध्ये पाव चिरून त्यात तीन प्रकारच्या चटण्या भरल्या , मग त्यात कांदा ,काकडी आणि कोबी बारीक चिरून, टोमॅटो च्या चकत्या लावून घेतल्या , मग कढईतून गरम गरम काढलेला वडा थोडा चेपून पसरट करून त्या पावात सारला .. त्यावर चीझ किसून ,थोडी हिरवी चटणी कोबी आणि भरपूर बारीक शेव पसरून चार तुकडे करून अक्खा ऐवज आमच्या हातात ठेवला ... इथे आधीच गरमागरम वड्याच्या वासाने तोंडाला पाणी सुटलेलं .. पहिला घास तोंडात कोम्बल्याक्षणी सणकून दाद गेली ...ज्यांना वेगळं कॉम्बिनेशन खायला पंचाईत नसते त्यांनी एकदा चाखून पाहायला हरकत नाही .. हा पूर्ण मामला नक्त पंचवीस रुपयांना मिळतो ...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
कहीं ये वो तो नहीं?
हाच तो स्टॉल का?
https://www.zomato.com/mumbai/pandurang-wada-pav-and-sandwich-centre-gor...
हा तो स्टॉल नाही
आरे रोड च्या प्रीतम फास्ट फूडला लागून आहे... खोपोली वडापाव च्या अगदी समोर
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
पुन्हा एकदा ( दुसरे) आर्थर'स
पुन्हा एकदा ( दुसरे) आर्थर'स थीम : कोरेगाव पार्क मध्ये बऱ्याच वर्षांपासून आर्थर'स थीम आहे . अत्यंत कन्सिस्टंटली चांगले कॉंटिनेंटल मिळण्याची जागा . अतिप्रिय . म्हणून बाणेर रोड च्या शेवटी शेवटी उजवीकडील क्रॉस रस्त्यावर बालेवाडी हाय स्ट्रीट ( सालं काय नाव ए , उद्या दगडेवाडी वॉल स्ट्रीट येईल)नावाच्या भागात आर्थर'स थीम चालू झाले आहे असे समजल्याने ,काल चाकं तिकडे वळवली .अपेक्षा अशी होती कि मूळ रेस्टॉरंट च्याच दर्जाचा नवीन मेन्यू मिळेल. पण जुनाच मेनू निघाला.पण तोच उत्तम दर्जा आणि चवही असल्याने तरीही अत्यंत समाधानानं बाहेर आलो. कॉंटिनेंटल पदार्थांची रुचीअसल्यास जरूर जावं अशी जागा. याच्याच शेजारी बरीच इंटरेस्टींग रेस्टॉरंट्स दिसल्याने आता इकडे वारंवार येणे आले.
आर्थर्स थीम म्हणजे "मार्की दि
आर्थर्स थीम म्हणजे "मार्की दि सेद", "मारी आंत्वानेत" वगैरे ऐतिहासिक डिशेस मिळणारं हाटेल ना?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
होय होय तेच ते .. मी कोणीतरी
होय होय तेच ते .. मी कोणीतरी प्रिन्सेस खाल्ली ..
मी ही पहिल्यांदा अर्थर्स थीम
मी ही पहिल्यांदा अर्थर्स थीम मधे गेलो ते बालेवाडीतल्याच. खाय खाल्लं ते आठवत नाही पण तिथल्या चविपेक्षा त्या रेस्टॉरंटच्या भयाण सॉफेस्टीकेशनची आठवण मात्र अजून आहे. कदाचित म्युझिक वगैरे काही चालू नव्हतं बॅकग्राउंड्ला. हॉटेल बर्यापैकी माणसांनी भरलेलं होतं पण तरिही सगळे शांततेने (फक्त खायलाच आल्यासारखे) खात होते. वेटर्स पण शांत-लयित आणि शर्टाला घड्यापडणार नाही ह्याची काळजी आणि तितपत वाकतच ऑर्डर घेत होते. त्या अति-सोफेस्टीकेशनच्या वातावरणात मला गरगरायला झालं. ह्याअधिही काही फाईन-डाईन अगदी ३-५ स्टार फाईन-डाईन मधे गेलोय पण हे असलं अंगावर येणार सॉफेस्टीकेशन मात्र अर्थरलाच अनुभवायला मिळालं.
काँटीनेंटल खायचं असल्यास त्याच रांगेत 'इनकॉग्नीटो' (मला आर्थरपेक्षा इथले ईटालियन पदार्थ जास्त सरस वाटले, पण इथे जाम वेटींग असतं ब्वा) किंवा 'अर्बन फाऊंड्री' देखिल चांगले पर्याय आहेत. 'कॅफे मेजिस्तो' हे शेफ-दिपूचं चांगलं कॅफे आहे, जरा महागडी च्याव-म्याव करायची असेल तर चांगला पर्याय आहे, शेफ-दिपूपण तिथेच पडीक असतो आणि टीवीवर त्याच्या रेसपिज चे विडिओ चालू असतात.
आता उरलेल्या ठिकाणी जाणार
आता उरलेल्या ठिकाणी जाणार आहेच . Kp मधल्या आर्थर'स थिम मध्ये तुम्ही म्हणता तसे भयाण वातावरण कधीच नसे. कालही तसे वाटले नाही . सर्वसामान्य होते. तुम्ही काही विशेष मुहूर्तावर गेला होतात का ? ( म्हणजे काय माहित नाही पण त्या अमूशेच्या भयाण राती .. वगैरे ) मला हे प्रिय कारण अत्यंत कॉन्सिस्टंटली चांगली चव , वर्षानुवर्षे ...
आर्थर्स थीम उत्तमच, पण
आर्थर्स थीम उत्तमच, पण त्याच्या मागच्या गल्लीत गेल्यास जबरी रत्ने हाती लागतील. फ्रेंच विंडो नामक जबरी बेकरी, स्क्विसितो नामक इटालियन थिन क्रस्ट पिझ्झा व अन्य ऑथेंटिक गोष्टी मिळणारे उत्तम हाटेल व मलाका स्पाईस हे आग्नेय आशियायी जेवणवाले हाटेल ही तीन ठिकाणे आर्थर्स थीमपासून अक्षरशः १००-२०० मीटरवर आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्क्विझिटोला गेलोय. छान आहे.
स्क्विझिटोला गेलोय. छान आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मग लगेहाथ फ्रेंच विंडोला
मग लगेहाथ फ्रेंच विंडोला गेलेलात की नाही? ती फ्रेंच बेकरी एक नंबर जबर्या आहे. मालक उंचापुरा किरिस्ताव आहे पण मराठी अगदी शुद्ध बोलतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाय. फ्रेंच विंदोला नाय गेलो.
नाय. फ्रेंच विंदोला नाय गेलो. पण अलिकडेच लव, शुगर, डो नामक दुकान/बेकरीत गेलो होतो. राहुल टॉकीज शेजारी. चीज केक मस्तं होता.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बघायला पाहिजे ...कुठला चीज
बघायला पाहिजे ...कुठला चीज केक खाल्लात ? (काही काही ठिकाणी लेमन चीज केक नावानी जवळ जवळ श्रीखंड भरवतात .. टिपिकल उडप्याच्या पंजाबी कम काँटी कम इटालियन कम पण भाजी टाईप रेस्टोज मध्ये )
एकच व्हरायटी होती. चीज केक या
एकच व्हरायटी होती. चीज केक या नावाने. तुम्हाला उत्साह असेल तर औंधला ला बूशी दॉर म्हणून पण आहे एक बेकरी/बुलाँजरी ती पण बेश्टे केक्/पेस्ट्री/ब्रेड साठी.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मेर्सी बूकू! पुण्यातील उत्तम
मेर्सी बूकू! पुण्यातील उत्तम युवरूपियन बेकर्यांची संख्या वाढतेय! हिकडे जाऊन अता ट्राय करणे आले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'शुगर डो' आणि 'मायनस एट्टीन डीग्री'
हे शुगर डो, बाणेर-पाषाण लिंक रोड वर देखील एवढ्यातच सुरु झालंय (एवढ्यात म्हणजे तरी अता ६ महिने होऊन गेले असतिल). तिथे गेलो होतो एका रविवारी रात्री. चिझ केक खाल्ला नाही पण इतर जे बाकी पदार्थ खाल्ले ते ठिकठिक होते.
बाणेर रोडला (म्हणजे हॉटेल ग्रिनपार्कच्या जरा पुढे बाणेरकडे जाणार्या रस्त्याला)'मायनस एट्टीन डीग्री' नावाचा एक छोटेखानी रेस्टो-कॅफे आहे. अत्तापर्यंत तिथे खाल्लेले आणि प्यायलेले पदार्थ फार छान आहेत. गोडात म्हणायचं झालं तर तिथले मफिन्स, पेस्ट्रीज, मॅक्रुन्स, ब्राउनिज(+सिझलिंग) हे अत्तापर्यंत चांगलेच होते. चिझकेक इथेही ट्राय केला नाहीये पण आजवरच्या अनुभवावरून तिथला चिझकेकही उत्तम असावा असा विश्वासपुर्ण-अंदाज.
- १८
+ १
अतिशय आवडता कॅफे, खूपदा जाणं होतं!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
आर्थर्स थीमच्या पुढे थोड्या
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
या
या धाग्याचे'खाण्यातजास्तीतजास्तबाहेख्याली हा पुरस्कार श्री घनू यांना देण्यात येत आहे ... ( एवढे सगळे खाऊन जी काय आहे ती 'फिगर' टिकवायला कुठे जिमतात हेही बघायला पाहिजे ) ( खरं तर यहा पुरस्कारा गॉथमवासी पण पटकाऊ शकले असते , पण त्यांनी त्यांचे वलंदेज देशातील कारनामे धाग्याओ आणले नाहीत ). गोग्गोड खाऊ पुरस्कार बॅटमॅन आणि ढेरे शास्रीना विभागून. उरलेल्याना उत्तेजनार्थ 'प्रयत्न वाढवा' पुरस्कार
अण्णा तुमची खंबीर साथ पायजेल,
अण्णा तुमची खंबीर साथ पायजेल, आम्हीही मग पटकावू हा पुरस्कार!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
अहो , आता तुमचे दिवस . तुम्ही
अहो , आता तुमचे दिवस . तुम्ही ,घनू ,ढेरेशास्त्री,बॅटमॅन वगैरे नि नवीन जागा शोधाव्या , इतरां सांगाव्या ,अशी ससे करावी , अशी अपेक्षा ......................... ब्लु डायमंडी झूल आता पूर्णपणे उतरलेल्या डेक्कन रॉंदेवू तुन जस्ट घरी येतोय आत्ता.. अवांतर : आला नाहीस पराडाईज ला बऱ्याच रविवारी ?
पुण्यात जंगली महाराज
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||