युधिष्ठिराची भूमिका केलेल्या गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. गजेंद्र चौहान यांची वेगळी ओळख दाखवणारं हे पोस्ट आज फेसबुकवर दिसलं. त्यातला वेधक भाग -
वासना, जंगल लव, खुली खिड़की, आवारा ज़िंदगी, जवानी जानेमन, हम सब चोर हैं, आज का रावण, जंगल हीरो, सामरी जैसी..... बेहतरीन महान पारिवारिक मनोरंजनप्रधान, सार्थक सामाजिक फ़िल्मों में अपनी अभिनय प्रतिभा का लोहा मनवाने वाले महान फ़िल्मकार और आसाराम बापू जी के चेले श्री गजेंद्र चौहान साहब उर्फ़ युधिष्ठिर जी को फ़िल्म एंड टेलिविज़न इंस्टीट्यूट ऑफ़ इंडिया FTII का मुखिया बनाए जाने पर कोटिशः बधाई।
त्यांच्या कारकीर्दीचा हा एक व्हिडिओ आढावा -
कार्यकारी समितीचे एक सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे त्या शैलेश गुप्तांविषयीची ही बातमी. बातमीत उल्लेख केलेला लघुचित्रपट खूपच मस्त आहे. त्यामुळे ऐसीकरांसाठी खास एम्बेड -
चला किमान काही लोकांसाठी अच्छे दिन आलेले आहेत, हेही नसे थोडके.
गुगली
> बातमीत उल्लेख केलेला लघुचित्रपट खूपच मस्त आहे.
I was completely fooled. हे शैलेश गुप्ता कोण ते मला मुळीच माहित नव्हतं. या धाग्यात एंबेड केलेला त्यांचा लघुचित्रपट मी आधी पाहिला आणि मला तो sustained irony चं उदाहरण वाटला. वरचा संदर्भ वाचल्यावर तो तसा नाही हे उघड झालं.
साहित्यसमीक्षेमध्ये unstable irony नावाचा एक प्रकार असतो. याचा अर्थ असा की 'अ' ने व्याजोक्तीने लिहिलेल्या लिखाणाचा 'ब' ने सरळसोट अर्थ लावणं. हा बरोबर उलटा प्रकार झाला…
डोले मिचकवणारं मोदींचं
डोले मिचकवणारं मोदींचं अॅनिमेशन लय भारी आहे. ऑस्टिन पॉवर्स चित्रपटांची आठवण झाली. एकच नंबर.
गजेंद्र चौहान चा व्हिडिओ
गजेंद्र चौहान चा व्हिडिओ मस्तच आहे. झक्कास.
वासना, जंगल लव, खुली खिड़की,
अभिजात सिनेमांमधे काम केलं नाही हा आधार ...? अशा हिशेबाने मिस्टर १००% इरफान खान यांना राष्ट्रीय परितोषकांपासून १०० कि मी दूर ठेवला पाहिजे.
आणि आसाराम बापूचा चेला असण्यात काय चूक आहे? बापूचे गुन्हे उघडे पडायच्या आधी गुन्ह्यात सामिल असणं वेगळं आणि केवळ चेला असणं वेगळं.
ही पोस्ट करणारे आणि आवडणारे बर्याच अर्थांनी सिडो दिसतात.
बरोबर आहे, आमच्या शाळेचा
बरोबर आहे, आमच्या शाळेचा आमच्या वेळचा एका शिपाई आज प्राचार्य होऊ घातलाय, मी म्हणतो काय चूक त्यात, तोही संस्थेचा एक भागच आहे.
वेल, चायवाला जर पंप्र होऊ
वेल, चायवाला जर पंप्र होऊ शकतो तर....
तुमचा मुद्दा कळाला, पण त्याकरिता हे उदाहरण चूक आहे इतकंच सांगायचंय.
नाही, उदाहरण बरोबर आहे,
नाही, उदाहरण बरोबर आहे, चायवाल्याला निवडून दिलं आहे, हि नियुक्ती आहे.
एकदा पहिली नियुक्ति फळफळली
एकदा पहिली नियुक्ति फळफळली होती चायवाल्याची. म्हणून नंतर निवडून येण्याचं भाग्य मिळालं. असो.
मिस्टर १००% मधे इरफान साहेब
मिस्टर १००% मधे इरफान साहेब स्त्रीयांना १००% समाधान देण्याचा व्यवसाय करतात. तो सिनेमा पाहताना, त्यातलं एकूणच सगळं वातावरण आणि इरफान साहेबांचा त्यातला सहभाग यासाठी "किळसवाणा" शिवाय दुसरा शब्द नसेल. आज त्यांना इतकं मोठं अवार्ड मिळालं. त्यांचे पान सिंग तोमर, लाइफ ऑफ पाय, पिकू, लंचबॉक्स, इ इ खूप छान सिनेमे आहेत. पण त्यांचा इतिहास अवार्डाच्या वेळी कोणी काढला नाही.
भाजपशी संबंध ठेवला कि निर्बुद्ध, विपर्यास्त अर्थ काढून तो संबंध तुम्हाला निगेटिव प्रसिद्धी देऊन महागातच पाडू अशी एक लॉबी दिसते. तिचे ग्राहकही बरेच दिसतात.
निकष
म्हणजे त्यांचा अभिनय उत्तम होता का नव्हता?
तरीही उदाहरण मी शाळेचं दिलं, शिक्षणाशी संबंधीत नियुक्त्या करण्याचे निकष काय असावेत?
१. अभिनय किळसवाणा होता. २.
१. अभिनय किळसवाणा होता.
२. गजेंद्रची नियुक्ति योग्य वा अयोग्य असेल. ते निकष ज्याला माहित आहेत आणि गजेंद्रची अर्हता दोन्ही माहित आहे त्यांनी सांगावं. मला फक्त ही पोस्ट लिहिणारे नि आवडणारे यांची अक्कल किती आहे इतका सिमित मुद्दा मांडायचा आहे.
सहमत
ह्यांचे विचार वाचून निदान एक मत बनवण्यास आक्षेप नसावा.
'एबीपी माझा' वर चर्चा
काल एबीपी माझा नावाच्या च्यानलवर याच विषयावर अत्यंत रोचक(!) चर्चा ऐकायला मिळाली. गिरीश कुलकर्णी छान बोलले. अँकरची (प्रसन्न जोशी) मस्त गोड बोलून अक्कल काढली. बाय द वे, निखिल वागळ्यांचा चर्चांमधल्या आक्रस्ताळेपणाचा आणि दुसर्याला बोलू न देण्याचा वारसा सध्या प्रसन्न जोशी चालवतायत असे वाटते. त्यांनी राहुल सोलापुरकरांना 'तुमचं अभिनयातील कर्तृत्व काय? असे प्रश्न विचारले आणि '(सोलापुरकरांना उद्देशून, तुम्ही उजव्या विचारांशी संलग्न आहात) म्हणजे जब्बार पटेल आणि आळेकरांनी तुमच्यावर घेतलेली मेहेनत वाया गेली', 'डावे विचारच भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायला मदत करतील' वगैरे अतिशय विद्वत्तापूर्ण विधानं त्यांनी केली. त्यामुळे एकुणात चर्चा पहायला मज्जा आली.
"ह्यांचे" विचार निव्वळ एक राळ
"ह्यांचे" विचार निव्वळ एक राळ आहे. सगळ्या भारतीय संस्थांचं कसं व्हर्च्यूअली सिडोसिक्यूलरीकरण केलं होतं. आता यांचे इतके लागेबांधे खोल खोल आहेत कि आगाग होणारच.
वाचून खेद वाटला. बाकी काही
वाचून खेद वाटला. बाकी काही मतभेद असले, तरी सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ दिसणार्या बाबींमध्ये अजो पक्षपाती मत देत नाहीत, असा ग्रह झाला होता. त्याला सुरुंग लागला. राजकीय समर्थकांनी आणि त्यांच्या पित्त्यांनी असल्या नेमणुकांचं समर्थन करणं निराळं आणि कोणत्याही प्रकारचे राजकीय लागेबांधे नसलेल्या, केवळ क्षमतेचा आणि गुणवत्तेचा विचार करतो, असा दावा करणार्यांनी समर्थन करणं निराळं. वाईट वाटलं. ती प्रसिद्ध भीतीही वाटली, हे वेगळं सांगायला नकोच.
सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ
मेघना तै, ही गोष्ट सुद्धा रीलेटीव्ह आहे.
तुमच्याबद्दल काही ग्रह
तुमच्याबद्दल काही ग्रह नव्हतेच. त्यामुळे अपेक्षाभंग नव्हे. :ड
वाईट वाटलं. ती प्रसिद्ध
वाईट वाटलं वगैरे ठीकच, पण ती प्रसिद्ध भीती कुठली म्हणे?
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/india-others/left-regional-parti…
आतापर्यंत ज्यांना पदे दिली आहेत त्यांची राजकीय लागेबांधे अजूनच घाणेरडे होते.
वरच्या लिंकेत श्याम बेनेगल, यू आर अनंतमूर्ती यांचे कर्तृत्व वाचा. त्यांच्या या कामांसाठी त्यांच्यावर काय मेहेरबानी झाली ते वाचा.
शाहरूख खान "सामान्य स्थितीतून" वर आलेला. पण गांधी घराण्याच्या फार जवळचा. त्याला कोणी लाँच केला? कोणी गांधीच्या पायी वाहिला? तर आत्ता निवृत्त होणार्या सईद मिर्झांनी.
या सगळ्यांनी आपले भाऊबंधू तिथे भरले आहेत नि थेट बीजेपीचा माणूस आला कि नक्कीच बर्याच जणांची हकालपट्टी होणार आहे.
सबब वरच्या लिंकेत गजेंद्रबद्दल हजार गृहितके करून (उदा. तुम्हाला दादासाहेब फालके पुरस्कार माहित असेलच वाटते. ही शुद्ध राळ आहे.) जे प्रताडन केले आहे ते चूक आहे. महान कलाकार असणे वेगळे आणि एखाद्या क्षेत्राची जाण असणे, तीत सुधारण घडवणे वेगळे. आमची संस्था लै भारी, फार महान कलाकार तिचे प्रमुख होते, तुम्ही काही तितके महान नाही (वाटत) इतकं ठिक आहे. पण उगाच काँग्रेसवाल्यांनी ती जागा सडवली असताना बीजेपीवाल्याचा चंचूप्रवेश इतका वाईट वाटू नये.
===============================================================================
तरीही पदाची अर्हता नाही या निकषावर गजेंद्रचा विरोध झाला तर तज्ञांनी करावा. ते माझं क्षेत्र नाही. विशुद्ध तांत्रिक विरोधाला माझा पाठिंबा आहेच.
फार प्रभावी प्रतिवाद.
फार प्रभावी प्रतिवाद. धन्यवाद.
पात्रता
अजो,
गजेंद्र कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता 'वासना, जंगल लव, खुली खिड़की, आवारा ज़िंदगी, जवानी जानेमन' आदि चित्रपटांतील कामगिरीच्या निकषावर त्यांना हे पद दिले जावे असे तुम्हाला वाटते का ते सांगा? जर ह्या प्रतिष्ठेच्या पदासाठी वरील चित्रपटातील कामगिरी पुरेशी नाही असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना हे पद कोणत्या निकषावर दिले असावे असे तुम्हाला वाटते तेही सांगा.
कदाचित गजेंद्र ह्यांना
कदाचित गजेंद्र ह्यांना चित्रपट कसे असु नयेत हे तरी शिकायला मिळाले असेल.
तसे ही ही पोस्ट काही सिलॅबस ठरवाणारी नाही, ना शिकवणारी. मॅनेजमेंट ची पोस्ट आहे. ती करायला चांगला कलाकार कशाला पाहीजे. कालच काका म्हणले की एमसीए वर राजकारणीच पाहीजेत, खेळाडुंनी मैदानावर खेळावे. त्याला कोणाचा काही आक्षेप दिसला नाही.
तसेही बेनेगल टाईप मंडळींनी जी भिकार चित्रपट निर्मीती केली आहे ती बघुन एडीसनच्या आत्म्याला ला आपण कॅमेरा का निर्माण केला असे वाटत असेल.
गिरीश कुबेर
माफ करा पण तुमचे प्रतिसाद वाचून अनु राव हा गिरीश कुबेरांचा डु-आयडी असल्याची शंका येते
>>कालच काका म्हणले की एमसीए
>>कालच काका म्हणले की एमसीए वर राजकारणीच पाहीजेत, खेळाडुंनी मैदानावर खेळावे.
बरोबर आहे. पॉलिस्या ठरवणार्या सर्व पोस्टवर राजकीय व्यक्ती* असाव्यात. टेक्नोक्रॅट असू नयेत. राजकीय व्यक्तींनी टेक्नोक्रॅट्सकडून कामे करून घ्यावीत. (टेक्नोक्रॅट लोकांना पॉलिसी ठरवण्याचे अधिकार देऊ नयेत. ते त्यांचे काम नाही).
*लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना 'राजकारणी' असे संबोधून त्यांचा तिरस्कार करण्याची पद्धत रुजली आहे ती अयोग्य आहे.
कालच काका म्हणले की एमसीए वर
याच्याशी मीही सहमत आहे. खेळाचं अॅड्मिनिस्ट्रेशन हे चांगलं खेळणार्याला येइलच असं नाही. मध्ये दुसरीकडे देखील यावर चर्चा झालेली की क्रिकेट खेळलेलेच (किती, कुठल्या स्तराच अशा सबजेक्टिव गोष्टी ठरणार कशा हे मुद्दे बाजूला ठेवू) क्रिकेटचे चालक असले पाहिजेत जी हास्यास्पद मागणी आहे.
इथे अध्यक्ष हे प्रथितयश सिनेकलाकार/किंवा दिग्दर्शकच का असले पाहिजेत याचा उहापोह धागाकर्त्याने किंवा इतरांनी केलेला नाही. (धागा बातमीचा आहे सो हे असावच असं नाही खर तर)
गजेंद्र कुठल्या पक्षाचे आहेत
नाही. ( हे मला काय वाटते चे उत्तर आहे. मी त्या माणसाशी नियुक्तिकर्ता म्हणून संवाद केलेला नाही.)
===================================================================
हे पद राजकीय निकषावरच दिले आहे. नि "राजकीय दृष्ट्या" फार उत्तम आहे.
संस्थेकरिता ते वाईट आहे असे तज्ञांचे मत असेल (राळकरांचे नव्हे, सिक्यूलरांचे नव्हे, मोदींचे सरकार येऊ नये असे जनतेला जाहीर आव्हान करण्यारा माजी अध्यक्षांचे नव्हे, तर बर्यापैकी निष्पक्ष लोकांचे मत) तर ते वाईट आहेच.
का उत्तम आहे
हे का उत्तम आहे यावर एकदोन ओळी लिहा की.
आमचा मुद्दा पोचायलाच १०
आमचा मुद्दा पोचायलाच १० प्रतिसाद खपतात.
अॅनि वे, विद्यमान सरकारने पक्षाचे सदस्य (सदस्य मंजे फार कै नसतं, पण ते पत्र लिहिणाराला कमी अक्कल असल्याचं कोणी मान्य करणार नाही.) असणार्या उच्च अभिरुचिच्या माणसाला प्रोपोज केलं असतं नि त्याला पर्याय म्हणून सिक्यूलरांच्या बाजूने गजेंद्र टाइप चीप पिक्चर काढणारा असता तर पुन्हा गदारोळ झाला असता. यावेळेस सरकार हे "मुक्त मूल्यांचा" आदराने विचार करत नाही अशी आवई ऊठवली असती.
आमचा मुद्दा पोचायलाच १०
आमचा मुद्दा पोचायलाच १० प्रतिसाद खपतात.
अॅनि वे, विद्यमान सरकारने पक्षाचे सदस्य (सदस्य मंजे फार कै नसतं, पण ते पत्र लिहिणाराला कमी अक्कल असल्याचं कोणी मान्य करणार नाही.) असणार्या उच्च अभिरुचिच्या माणसाला प्रोपोज केलं असतं नि त्याला पर्याय म्हणून सिक्यूलरांच्या बाजूने गजेंद्र टाइप चीप पिक्चर काढणारा असता तर पुन्हा गदारोळ झाला असता. यावेळेस सरकार हे "मुक्त मूल्यांचा" आदराने विचार करत नाही अशी आवई ऊठवली असती.
बाकी काही असो, पण कुठे तो
बाकी काही असो, पण कुठे तो भारत एक खोज सारखी अप्रतिम मालिका आणि अजूनही बरेच कायकाय बनवणारा श्याम बेनेगल अन कुठे हा गजा सिंग...उगा तुलना करायची म्हणून काहीही का?
बॅट्या - तेंव्हा ते जरा नविन
बॅट्या - तेंव्हा ते जरा नविन होते म्हणुन बरे वाटले, आपण तेंव्हा लहान होतो. जग बघितल्यावर भारत एक खोज ची लायकी काय आहे ते पण कळले.
कोण नवीन होते? बेनेगल की
कोण नवीन होते?
बेनेगल की नेहरू?
एकुणच टीव्ही हे माध्यम आणि
एकुणच टीव्ही हे माध्यम आणि त्या वर असणारे प्रोग्रॅम. ज्ञानदीप, सुंदर माझे घर आणि रामायणाच्या पार्श्वभुमी वर ही सिरीयल उठुन दिसली इतकेच.
त्या कालखंडातले
त्या कालखंडातल्या इतर कुठल्या मालिकांच्या तुलनेत तुम्हाला 'भारत एक खोज'ची 'लायकी' कमी वाटली ते सांगितले तर चर्चेला जरा एक संदर्भाचा मुद्दा मिळेल असे वाटते.
भारत एक खोज
हे मत वाचून वाईट वाटलं. मी ती अलिकडेच पुन्हा नव्याने पाहिली, तेव्हा कळलं यातले बरेच भाग इतिहास-तज्ञांकडून तपासून घेतले गेलेत. काही भागांचे डायरेक्टर वेगळे आहेत. त्यातले सगळेच कलाकार उत्तम आहेत. संगीतातही भारताच्या वेगवेगळ्या भागाच्या संगीत-संस्कृतीची छाप आहे. या मालिकेने मला पुन्हा एकदा भारावलं, त्यावर मी इथे लिहिले होते.
राजकारणी आपल्या सोयीच्या-जवळच्या व्यक्ती अशा पदांवर ठेवणार यात काही नवीन नाही. फक्त गजेंद्र यांचं नाव पचायला जड जातं इतकचं. त्यांच्याकडे (वा इतरांकडे) अॅडमिनिस्ट्रेटीव्ह स्किल्स असतील नसतील हे कोणास ठाउक.
अगदी असेच म्हणतो. अशा मालिका
अगदी असेच म्हणतो. अशा मालिका फार फार विरळा.
वाईट वाटण्यासारखं काही नाही
अनु राव यांनी उगीच अत्यंत चोखंदळ असल्याच्या अविर्भावात केवळ एक पिचकारी मारली आहे. त्यावरुन वाईट वाटण्यासारखं काही नाही. 'भारत एक खोज' बकवास वाटते तर त्यावेळची दुसरी कुठली मालिका तुम्हाला चांगली वाटते याचं काहीही उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आधी एडिसनच्या थडग्यावरुन केलेल्या टिप्पणीपासून ते निदान भारतात #१ इथपर्यंत त्यांची प्रगती झाली आहे. आता भारतातल्या चित्रपटविषयक संस्थेचा अध्यक्ष निवडताना भारतातल्या #१ मालिकेच्या कर्त्याला निवडायचे की बाहेरच्या देशातून आयात करायचे याचा निर्णय घेताना त्यावेळच्या सरकारने योग्य निकष लावला होता असे मला वाटते.
या मालिकेविषयी जनतेचा साधारण कल काय आहे हे आयएमडीबी या संकेतस्थळावर कळेल. ९/१० रेटिंग आहे. आता अनु राव यांच्या मतावरुन वाईट वाटून घ्यायचं की नाही ते तुम्हीच ठरवा.
भारत एक खोज
'भारत एक खोज' नवीन होते असे असावे. पण मुळात २० वर्षापूर्वी पाहिलेले भारत एक खोज आणि त्यानंतर १०-१५ वर्षांनी देशाबाहेर स्थित्यंतर करुन नव्या वातावरणातील नव्या जगाचे, नव्या तंत्रज्ञानाचे निकष वापरुन भारतातल्या जुन्या मालिकेचा दर्जा जोखणे तितकेसे योग्य नाही.
नविन तंत्रज्ञान नाही हो, त्या
नविन तंत्रज्ञान नाही हो, त्या काळातले तंत्रज्ञानच वापरा तुलने साठी.
आणि तंत्रज्ञान पण महत्वाचे नाही, एकुणच दुसर्या दर्जाची होती ( सर्वच बाबतीत ). हे कबुल की भारतीय टीव्हीच्या दृष्टीने पहील्या दर्जाची होती. पण हे म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असे झाले.
तरीही पूर्ण उत्तर नाही
लायकी काढण्यापासून निदान भारतीय टीवीच्या दृष्टीने पहिल्या दर्जाची होती इथवर तुम्हाला मान्य झाले हे चांगलेच आहे. शिवाय भारतात #१ हा तर खूपच चांगला निकष आहे. निव्वळ या निकषावर एडिसनचा आत्मा रिसरेक्ट होऊन बेनेगलांना मिठी मारायला येऊ शकतो.
पण एकूणच पहिल्या दर्जाच्या मालिकांसाठी तुम्ही कुठला संदर्भ वापरताय हे मला अजूनही कळलेले नाही.
बरं, श्याम बेनेगलने बाकीही
बरं, श्याम बेनेगलने बाकीही काहीच केले नाही का?
शिवाय- समजा की बेनेगल म्हणजे वासरांत लंगडी गाय आहे. पण त्या तुलनेने गजेंद्र सिंग म्हणजे आंधळे आणि लंगडे वासरू आहे. तस्मात लंगड्या व आंधळ्या वासरापेक्षा लंगडी गाय कधीही बरीच.
बॅट्या - मुद्दा वेगळाच आहे.
बॅट्या - मुद्दा वेगळाच आहे. तो हुद्दा काय आहे? त्या हुद्यावर चांगले काम करण्यासाठी चांगला कलाकार असणे गरजेचे आहे का?
हा मुद्दा मान्य, पण गुलजार,
हा मुद्दा मान्य, पण गुलजार, बेनेगल, इ. लोकांना ओव्हर ऑल फिल्म इंडस्ट्रीतला अनुभव जास्त असल्याने ते गजेंद्रपेक्षा जास्त लायक आहेतच. निव्वळ अनुभव या निकषावर पाहिले तरी हे लोक जर श्रेष्ठ असतील तर गजेंद्राचे प्लस पॉइंट तरी काय आहेत? हे म्हणजे अमुक करायची गरज नाही अन तमुक करायची गरज नाही म्हणून कुणीही शेणामेणाचा पुतळा आणून बसवण्यापैकीच झालं. जो पुतळा बसवताहात त्याची काय पात्रता आहे हे बघणे महापापच आहे.
कलाकारांची तुलना नाही चालली
कलाकारांची तुलना नाही चालली इथे.
लताचा आवाज सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून ती "भारतीय गायन विकास मंडळाची" सर्वात जास्त उचित (इफेक्टीव) अध्यक्षा होऊ शकत नाही. वा शाळा काढायला गणित शिकवता यायची गरज नाही.
हो, पण म्हणून कुणालाही आणून
हो, पण म्हणून कुणालाही आणून बसवणार का? गुलजार, बेनेगल, इ. लोक अॅडमिनिस्ट्रेटिव्हली नालायकच ठरले असते हे कशावरून?
काहीही हं अजो!
@बॅट्या - हे एक तर फायदा करुन
@बॅट्या - हे एक तर फायदा करुन देणारे पद ( Office of Profit ) आहे, ते सत्ताधार्यांनी त्यांनाच शिव्या घालणार्या लोकांना का म्हणुन द्यावे?
गुलजार / बेनेगल नी चाटायची होती भाजपीयांची, त्यांना मिळाले असते.
होय, अगदी बरोबर. फक्त
होय, अगदी बरोबर. फक्त प्रत्येक गोष्टीत असे पहायची गरज नसते असे आपले आम्हांला वाटते....असो.
पण पण पण.....
भाजपायींपैकी कुणाला पद द्यायला हरकत नाही हो.....
पण मग हेमा मालिनी, परेश रावळ गेला बाजार इतकी वर्षे निष्ठेने भाजपबरोबर असलेले शत्रुघ्न सिन्हा हे गजेन्द्र चौहान यांच्यापेक्षा अधिक लायक होते असे वाटते.
विनोद खन्ना अध्यक्ष झाले तेवा कोणी विरोध केला नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पक्षी- राजकीय व्यक्ती चालेल पण अगदीच गजेंद्र नको बुवा असं म्हणणं आहे.
अगदी
हे अगदी उत्तम उदाहरण आहे. हेमामालिनी, परेश रावल किंवा शत्रुघ्न सिन्हा यांच्या नेमणुकीवर इतका धुरळा नक्कीच उडाला नसता.
हेमा मालिनी आणि शत्रुघ्न
हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा ह्यांना सिनेमा ह्या कले बद्दल कळते असे वाचुन डोळे पाणावले.
मोठी गंमतच आहे अनुताई
'हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा गजेंद्रापेक्षा बरे' अशा धर्तीचाच हा प्रतिवाद आपणच वर केला होता ते तुम्ही एवढ्यातच विसरला असाल म्हणून आम्हीही विसरावा का? -
'हेमा मालिनी आणि शत्रुघ्न
चिंज - मी स्वप्नात सुद्धा हेमामालिनी आणि सिन्हा साहेबांबद्दल एक शब्द सुद्धा चांगला उच्चारणार नाही ( कलाकार म्हणुन ). तुम्हाला हे माझ्या कुठल्या प्रतिसादात दिसले.
माझे म्हणणे थोडक्यात - तसेही जनतेच्या पैश्यावर ही शाळा आणि तिथले शिक्षक पोसले जात आहेत. अश्या फुकट्या लोकांमधे गजेंद्र असले काय किंवा गुलजार असले काय, पैसे तर आमचेच जाणार आहेत.
अश्या सरकारी अनुदानावर शिकणार्या लोकांना तर तोंड उघडायचा हक्कच असू नये. नसेल पटत तर अमेरिकेत जाऊन शिका ना. नाहीतर ग्रेट घई अशीच कुठलीतरी शाळा काढणार होता, तिथे प्रवेश घ्या.
दुर्दैवाने इथे कोणी ती इंस्टीट्युट सरकारनी चालवायची गरज काय हा मुलभुत प्रश्न विचारत नाही. जनतेचे पैसे उडवणार्या संस्थेवर "ग" आला काय किंवा "गु" आला काय, जनतेचे काय भले होणार आहे?
दुर्दैवाने इथे कोणी ती
असं कसं म्हणता अनुताई..? भारी भारी पिच्चर निघाले की जनतेला मज्जाच नाय का?
ह्या शाळेतुन शिकुन बाहेर
ह्या शाळेतुन शिकुन बाहेर पडलेल्या लोकांनी पिक्चर काढले तर ते जनतेला फुकट बघायला मिळतात हे माहीती नव्हते गवि.
साम्यस्थळ
ज्ञानदीप, सुंदर माझे घर प्रभृती कार्यक्रमांच्या मांदियाळीत जसे बेनेगल तुमच्या मते उठून दिसतात, तसंच गजेंद्राच्या कारकीर्दीसमोर भाजपाई हेमाताईंचं आणि शत्रुदांचं कर्तृत्व उठून दिसतं - तुमच्या प्रतिवादातलं आणि तुम्हाला मान्य नसलेल्या ह्या प्रतिवादातलं साम्यस्थळ दाखवून दिलं इतकंच. असो.
सहमत
सरकारी अनुदानावर शिकणार्या लोकांनी प्राचार्य कोण आहे/कोण पाहिजे/कोण नको या मुद्द्यावरून संप करायला माझा विरोध आहे. बाकी गुर्हाळ चालू द्या.
या हिशेबाने सरकारी आर्मीच्या
या हिशेबाने सरकारी आर्मीच्या प्रोटेक्शनमुळे निवांत जगणार्यांनीही सरकारविरुद्ध काही बोलायला नको असेही म्हणता येईल, नै?
या हिशेबाने सरकारी आर्मीच्या
आर्मी देशाची असते सरकारी नाही ना. आर्मी व्रर टीका करूच नये.
मी ऐकलं की सचिन जगातला बेस्ट
मी ऐकलं की सचिन जगातला बेस्ट बॅट्मॅन आहे. पण म्हणे तो कप्तान म्हणून एक फेल्यूअर होता.
तर अशे काही नियम नसतात. नसावेत. गजेंद्रला आपले "अकर्तृत्व" सिद्ध करू द्या. मग त्याला काढा म्हणणे योग्य ठरेल.
अॅबसेन्स ऑफ प्रूफ ऑफ
अॅबसेन्स ऑफ प्रूफ ऑफ अकर्तृत्व = प्रूफ ऑफ अॅबसेन्स ऑफ अकर्तृत्व?
या हिशेबाने मीही पंप्र होतो, मी मूर्ख आहे असे सिद्ध झाले की मग करा मला पदच्युत. काय फालतूपणा आहे राव.
अजो
निदान गजेंद्रशेठ हे अॅडमिनिस्ट्रेटिव स्किल्समध्ये खूपच पारंगत आहेत असंतरी कुठं सिद्ध झालंय का? राजकीय सोय म्हणून बसवलेला गणपती असेल तर केवळ भाजपाने केले म्हणून त्याचे समर्थन केलेच पाहिजे हा अट्टाहास अयोग्य वाटतो.
अहो, माझे म्हणणे तर मुळात असे
अहो, माझे म्हणणे तर मुळात असे आहे की सरकारने असल्या संस्था चालवण्याच्या व्यापातुन बाहेरच पडावे.
पण जर सरकार चालवणारच असेल अश्या संस्था तर ते असे गणपती बसवणारच ना.
ज्यांना कलेचे प्रेम आहे त्यांनी काढाव्यात स्वताच्या खाजगी संस्था.
की सरकारने असल्या संस्था
की सरकारने असल्या संस्था चालवण्याच्या व्यापातुन बाहेरच पडावे
फिल्म इन्स्टिट्युट मधून सरकारने डिस-इन्व्हेस्ट करावे - याला फुल्ल पाठिंबा.
हा ना राव....अॅक्टिंग येत नै
हा ना राव....अॅक्टिंग येत नै तर अॅडमिनगिरी तरी धड येते असं कुठं सिद्ध झालंय?
किमान सरळ अनु राव यांनी म्हटल्याप्रमाणे सरकार आपल्या मर्जीतल्यांची भरती करतेय आणि ते बरोबरच आहे असा तरि स्टँड घ्या. काही झाले तरी तो स्टँड अधिक प्रामाणिक आहे. उगीच ताकाला जाऊन भांडे का लपविता???????
हा ना राव....अॅक्टिंग येत नै
हेच तत्व तुमच्या आवडत्या राहूल गांधींना लावा बघू.
पळा पळा.....
राहुल गांधी 'आमचा' आणि
राहुल गांधी 'आमचा' आणि 'आवडता' वगैरे म्हटल्यामुळे गब्बरवरती दफा कुठली लावावी याचा इच्यार करतो आहे....
ताजीराते हिंदची
ताजीराते हिंदची दफा.
(शोलेमधून हा ज्ञानकण गोळा केल्याचा मला लै अभिमान आहे)
हा हा हा, अगदी अगदी
हा हा हा, अगदी अगदी ;)
प्रियांका तैंना नाच
प्रियांका तैंना नाच शिकवणार्या सॅमसन बाईंना संसाँर बोर्डाचे अध्यक्ष केल्यावर इथे काही चर्चा झाली होती का?
निदान गजेंद्रशेठ हे
ह्म्म्म. ९७ सालच्या सोनियाजींची आणि आजच्या राहुलजींची आठवण आली.
रोचक मुद्दा
मात्र सरकारी संस्था (डायरेक्टली अकाऊंटेबल टू पब्लिक) आणि पक्ष (कार्यकर्त्यांची इच्छा) यांच्या नेमणुकींच्या निकषांमध्ये फरक असावा.
मात्र सरकारी संस्था
आधी पब्लिक ला विचारातरी की अश्या संस्था चालवण्यावर सरकारनी खर्च करायला पाहीजे का ते.
पुन्हा एकदा अवांतर करणे भाग
पुन्हा एकदा अवांतर करणे भाग आहे.
पब्लिकला विचारणे म्हणजे काय हे स्पष्ट झाले तर बरे.
सहमत
+१
===================================================================
वर विचारलेत "उत्तम का?"
या संस्थांत सगळा एकाच पक्षाला (काँग्रेसला) सहानुभूती असणारांचा उच्च पदांवर भरणा आहे. मागच्या प्रत्येक अध्यक्षाचे, इ इ उद्योग वाचा.
तर,
१. भ्रश्ट नेमणूकांना आळा बसेल.
२. विचारसरणी लादली जाण्याचा प्रकार होणार नाही. संतुलन असेल.
१. भ्रश्ट नेमणूकांना आळा बसेल.
तुम्हाला भ्रष्ट म्हणजे केवळ पैश्याची अफरातफर इतकंच अभिप्रेत नसेल तर ही नेमणूकच भ्रष्ट आहे असे दिसते आहे.
ते गुलजारच्या बाबतीत सिद्ध
ते गुलजारच्या बाबतीत सिद्ध झालं आहे का?
ताकाला जाऊन भांडे का लपविता?
ताकाला जाऊन भांडे का लपविता?
हा दांभिकपणा भारतीयांच्या जीन
हा दांभिकपणा भारतीयांच्या जीन मधेच आहे, कसे बदलणार?
ती बातमी २०१४ ची आहे! त्यांना
ती बातमी २०१४ ची आहे! त्यांना त्याचा फायदा आधी कसा होणार..
मला वाटतं कि या सर्व प्रकरणात विद्यार्थ्याना काय वाटतं हेच सर्वात महत्त्वाच आहे. त्यांनाच जर कोणी आपले अध्यक्ष नको असतील तर सरकारने मधे लुडबूड करु नये.
बाकी प्रकाश अजूनही नीट पडत
बाकी प्रकाश अजूनही नीट पडत नाहीये. ते दिवस पुढे आहेत.
या बातमीवरून एफटीआयआय ही
या बातमीवरून एफटीआयआय ही संस्था नक्की काय करते, गेल्या काही दशकांत या संस्थेमधून बाहेर पडलेले नामवंत विद्यार्थी कोण, त्यांनी भारतीय सिनेमाला काय योगदान दिलं, आणि या आधीच्या अध्यक्षांनी वेळोवेळी संस्थेला कशी सकारात्मक दिशा दिली याबद्दल काही ना काही चर्चा होऊन काहीतरी पदरी पडेल असं वाटलं होतं. दुर्दैवाने 'भाजपाचा आला म्हणून जळतेय होय तुमची!', 'एफटीआयआयच्या अध्यक्षाला सिनेमाचं ज्ञान असण्याची गरजच काय?' वगैरे कर्कश कंटाळवाणे वाद प्रतिवाद दिसले.
रोचक मुद्दा. मगाशी इथे तेच
रोचक मुद्दा.
मगाशी इथे तेच बघत होतो.
https://en.wikipedia.org/wiki/Category:Film_and_Television_Institute_of…
पण धागाप्रवर्तकाने काही विशिष्ट अजेंड्याने धागा टाकला होता. धाग्यात एफ्टीआयायची नक्की उद्दीष्ट काय आहेत आणि त्यांना हा नवा माणूस कसा मारक आहे याचा काही उल्लेख नाही. सो चर्चा टूक इट्स ओन कोर्स.
आभार
तुम्हाला अजेंडा काहीही वाटत असला, तरीही तुमच्या मताचा आदरच आहे, त्यामुळे मताला विरोध करण्याची किंवा त्याच्याशी सहमती दर्शवण्याची गरज भासत नाही. एका पॉर्न स्टारचं पोस्ट-फॅक्टो (म्हणजे एका राष्ट्रीय संस्थेवरच्या पदनियुक्तीनंतर) कोण कसं समर्थन करतं आणि कोण त्याला कसा विरोध करतं हे पाहणं समाजशास्त्रीय अंगानं रोचक वाटतं आहे. त्यामु़ळे प्रतिसादाबद्दल सर्वांचेच आभार. काही आयडींनी पुनरुक्ती टाळली तर धागा आणखी रोचक होऊ शकेल हे मात्र खरं.
+१
कुठे, काही गंभीर आणि मुद्देसूद चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली की तिथे कर्कश, जालीय धुळवडी खेळून, न-मुद्द्यांवरून मारामाऱ्या किंवा न-विनोद करण्यात एवढा रस का वाटतो, तेच-ते बोलून कोणाला काय आनंद होतो हा एक अभ्यासाचा विषय ठरावा. दुर्दैवाने हा प्रकार अनेक सुज्ञ लोकांना संन्यासाकडे लोटतो.
प्रतिसादांच्या लांबडीवरून स्क्रोल करूनच कंटाळा आला. (होय, कंटाळाच.) नीधपने व्यक्त केलेला आहे तस्सा.
दुर्दैवाने हा प्रकार अनेक
Classic case of "adverse selection".
अदिती, तू क्वचित हा मुद्दा
अदिती, तू क्वचित हा मुद्दा मांडताना मी पाहीले आहे. तुला खरच असं वाटतं का के अशा ह-पा कारणांनी सो कॉल्ड सूज्ञ लोक सन्यासाकडे लोटली वगैरे जातात? अन असे लोक निष्ठेन येथे राहीले तरी काय मारे टिकून राहतील? एवढ्या लहान सहान मुद्द्यांवरुन त्यांचे निर्णय बदलत असतील तर त्यांना येथे येण्याची मूळात गरजच वाटत नाही असे होत नाही का? टॉलरन्स थ्रेशोल्ड इतका कमी? अन काय उपकार करतील काय इथे येऊन? प्रत्येकजण आपल्या गरजेपोटी येथे येतो. ज्यांना गरजच नाही ते कशाला येतील? ते फक्त खापर फोडत राहतील.
..क्या बात कही है..जियो..
..क्या बात कही है..जियो..
स्पीकरच्या भिंती आणि आपण
ह-पा कारणांनी सोडून देणं सोडून द्या. शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस मला लिहायला फार वेळ झाला नाही, पण काल मी या धाग्यावर गब्बरचे मुद्दे वाचून प्रतिसाद लिहिणार होते. तिथल्या अवांतरामुळे मला तिथे लिहायचा कंटाळा आला. हे झालं ताजं उदाहरण. ज्या गप्पा वाचल्यामुळे ना करमणूक झाली ना ज्ञान/माहितीवर्धन, त्या खाजगीत झाल्या तर बऱ्या, आणि अशा गप्पा बऱ्याच धाग्यांवर होताना दिसतात, म्हणून मी अनेकदा लिहिणं टाळते. (असा कंटाळा येतो तरीही आंजावर मी किती वर्षं लिहीत आहे आणि 'ऐसी'शी माझा संबंध काय, तत्सम सीव्ही इथे लिहिण्याची गरज नसावी.)
प्रत्येकजण आपल्या गरजेपोटी 'ऐसी'वर येतो ही गोष्ट खरीच आहे. पण प्रत्येकाच्या गरजा निरनिराळ्या असतात. त्याची जाणीव असणं आणि बूज राखणं हा उदारमतवाद आहे. तो 'ऐसी'वर, सार्वजनिक जागेत लिहिताना अपेक्षित आहे.
स्त्रीवाद म्हणजे पुरुषांवर अन्याय, किंवा स्त्रीवाद म्हणजे हुंडा, बलात्कार कसे वाईट याबद्दल तेच-ते बटबटीत गुऱ्हाळ वाचण्यापेक्षा त्यातल्या बारीक पापुद्र्यांमध्ये मला रस असतो. पण "बायकांवर अन्याय होतच नाही" किंवा "थोर भारतीय संस्कृती"छाप आरडाओरडा सुरू झाल्यावर या बारीक पापुद्र्यांपर्यंत पोहोचणं शक्यच नसतं. बारीक आवाजात बोलणाऱ्या लोकांच्याही गरजा असतात, पण इतरांनी कर्कश आवाज सुरू केला की त्यांच्या गरजा भागतच नाहीत; एवढंच नाहीत तर त्या गरजा आहेत हे लक्षातच येत नाही.
कोणाला, कोणता मुद्दा लहान-सहान वाटतो हे कोण ठरवणार? सणासुदीच्या नावाखाली स्पीकरच्या भिंती लावून नाचणाऱ्यांनी, "तुम्हाला काहीही लहान सहान आवाजाचा त्रास होतो" हे म्हणावं का? व्यनी, इमेल, फोनवरून "या कर्कशपणामुळे मला लिहिण्याचा कंटाळा येतो", असं म्हणणारे लोक मला माहीत आहेत. आणि हे लोक कर्कशपणा करणाऱ्यांपेक्षा संख्येने अधिक आहेत. स्पीकरच्या भिंती लावून नाचाचा मला व्यक्तिशः कंटाळा असला तरीही काही लोकांची ती गरज असू शकते, आणि ती गरज 'ऐसी'वरच भागावी अशीही इच्छा असू शकते याची दखल घेऊन 'ऐसी'वर खरडफळा सुरू केला आहे. उजव्या बाजूच्या रकान्यात, 'महत्त्वाचे दुवे'मध्ये पहिलाच दुवा 'खरडफळा' असा आहे. त्याचा लाभ उठवावा.
वॉव ... खफ आला .... खफ
वॉव ... खफ आला .... खफ आला.... :)
खूप शेर अन quotes टाकणार :)
स्पीकरच्या भिंती लावून नाचाचा
स्पीकर लावण्याचा उद्देशच आजुबाजुच्या सर्व लोकांच्या कानात दडे बसावेत असा असतो. तसा नसता तर लोकांनी घरात गाणी लाऊन नाच नसता का केला.
त्यामुळे ज्यांना "स्पीकरच्या भिंती लावून नाचायला" आवडते, त्यांच्या साठी खरडफळा हा ऑप्शन असु शकत नाही.
अदितीने उत्तर दिलेलं आहेच, पण
अदितीने उत्तर दिलेलं आहेच, पण हा विषय निघालेलाच आहे म्हणून मीही काही लिहू इच्छितो.
ऐसी अक्षरेचे संस्थापक आणि व्यवस्थापक म्हणून आम्हाला ध्येयधोरणांचा विचार करावा लागतो.
मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे.
जेव्हा चर्चांमधून एकमेकांवर दोषारोप, चिखलफेक यापलिकडे काहीही होताना दिसत नाही, तेव्हा त्यातून वाचकांचं जीवन समृद्ध होतं आहे का असा प्रश्न विचारावा लागतो.
- सकस चर्चांतून विचारांना चालना मिळावी
पुन्हा, जिथे विचारांना चालना मिळण्याऐवजी नुसत्याच निरर्थक मतांच्या पिंका टाकलेल्या दिसतात, तेव्हा व्यवस्थापकांना किमान नोंद घ्यावी लागते.
- प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.
- चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.
ज्या कर्कश चर्चांचा कंटाळा येतो असं म्हटलेलं आहे त्यात संतुलित प्रतिसादांतून खेळीमेळीच्या चर्चा होताना दिसत नाहीत. बऱ्याच वेळा विचार मांडणाऱ्या सदस्यांवर आरोप होताना दिसतात. तेव्हा व्यवस्थापकांना काळजी वाटणं स्वाभाविकच आहे.
आम्हाला अनेक 'सूज्ञ' लोकांनी फोन, प्रत्यक्ष चर्चा, व्यनि आणि इमेलमधून याबद्दल तक्रार केलेली आहे. आणि 'अशा प्रकारांमुळे ऐसीवर यायची इच्छा होत नाही' असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता यांना सूज्ञ म्हणावं का याचं उत्तर देण्यासाठी त्यांची नावं सांगितली तर पुरेसं होईल. पण दुर्दैवाने ते आम्हाला करता येत नाही. पण ऐसीवर उत्तम लिखाण करणारे, उच्चशिक्षित, ज्यांचे प्रतिसाद वाचूनही आपल्याला काहीतरी गवसल्याचं समाधान देणारे - अशा अनेकांची नावं त्यांत आहेत. त्यामुळे अर्थातच ते लोक ऐसीवर टिकून राहातात की नाही हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे लहानसहान मुद्दे, टॉलरन्स थ्रेशोल्ड कमी वगैरे आम्हला बिलकुल वाटत नाही. किंबहुना सर्वच व्यवस्थापकांना या प्रकाराला आळा कसा घालावा याची काळजी वाटून राहिली आहे. (बघा, साताठ 'सूज्ञ' लोकांची यादी इथेच झाली!) खरडफळा करण्याची कल्पना त्यातूनच आलेली आहे.
ओके.
खरडफळा आला ते बरं झालं. मज्जा मज्जा!
____
ऐसीवरती चांगले लोक आले तर हवे आहेतच. द मोअर द मेरीअर.
चपला आठवल्या. असो!
चपला आठवल्या. असो!
निरर्थक श्रेणी दिली आहे.
निरर्थक श्रेणी दिली आहे.
+१ मलाही हेच प्रश्न पडतात.१.
+१ मलाही हेच प्रश्न पडतात.
१. कोर्सनुसार प्रत्येकी १२-१३ इन्टेक आहे. हे प्रमाण कमी वाटत नाही का?
२. जेव्हा अरुण खोपकर-भास्कर चंदावरकर अशी मंडळी शिकत/ शिकवत होती तेव्हा त्या संस्थेची पत होती, आता तिथे काय हाल आहेत?
३. तिथले विद्यार्थी विज्डम ट्री खाली गांजा फुंकण्याखेरीज अजून दुसरं काही करतात का?
४. मला उमेश कुलकर्णी सोडल्यास कुणीही त्या संस्थेचं बेस्ट पोर आठवत नाही. सुभाष घई-शबाना आझमी-राजकुमार हिरानी आणि गेलाबाजार रसूल पोकट्टी यांच्या नाश्त्यावर किती दिवस बढाया मारणार आहे ही संस्था?
जाता जाता : अनुराग कश्यप फटीआयाय बद्दल
>>३. तिथले विद्यार्थी विज्डम
>>३. तिथले विद्यार्थी विज्डम ट्री खाली गांजा फुंकण्याखेरीज अजून दुसरं काही करतात का?
सहमत. माझे १-२ मित्र तिथे आहेत. त्यातला एक गेली ६ वर्षं तिथेच आहे, डायरेक्शनचा कोर्स अजून पूर्ण होत नाही. ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. परवाच्या 'एबीपी माझा'वरच्या चर्चेत गिरीश कुलकर्णी हेच म्हणाले की 'तिथे अशी मुलं आहेत की चार चार वर्षांत त्यांना साधा एक डायलॉग लिहायला सुचत नाही, अख्खी संहिता तर लांबची गोष्ट आहे'. मी म्हणतो भले तुम्ही संस्था चालवायला दगड आणून बसवा. पण आधी संस्था अॅडमिनिस्ट्रटिव्हली आणि फंक्शनली सुधारा तर.
घई आणि हिरानी जर तिथे शिकले
घई आणि हिरानी जर तिथे शिकले असतील ( म्हणजे आधी सिलेक्ट झाले ) तर ती संस्था तातडीने बंद करायचे हे एक मोठ्ठे कारण होऊ शकते.
.डुप्रकाटाआ
.
या लॉजिकने तर सीओईपी सुद्धा
या लॉजिकने तर सीओईपी सुद्धा तातडीने बंद करायला हवी. :P
काहीही हं थत्ते(चाचा)!
काहीही हं थत्ते(चाचा)!
तथ्य
खरं सांगायचं झालं तर आज तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये जवळपास कोणताही हिंदी सिनेमा पाहायला गेलात, तर तुम्हाला श्रेयनामावलीत फिल्म इन्स्टिट्यूटच्या मुलांची काही नावं सापडतील. ह्याच धाग्यावर 'मी' यांनी एक दुवा दिलेला आहे त्यातले उल्लेख -
२०१४ साली बर्लिनमध्ये पारितोषिक मिळवणारा आणि आता लवकरच इथे प्रदर्शित होणारा 'किल्ला' चित्रपट - ह्याचा दिग्दर्शक फिल्म इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे. ह्या वर्षी कान आणि बर्लिन महोत्सवात निवड झालेल्या काही चित्रपटांमागे फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत. 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'सारख्या चित्रपटामागेही फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत.
Adverse selection is a
Adverse selection is a phenomenon wherein the insurer(पोटेन्शिअल सदस्य) is confronted with the probability of loss(अनावश्यक चर्चांवरती वेळ घालविणे) due to risk not factored in at the time of sale (मेम्बर्शिप घेताना/सदस्य होताना).
किंवा
Adverse selection is a phenomenon wherein the insurer(संस्थळ) is confronted with the probability of loss(सूज्ञ वाचक परत जाणे) due to risk not factored in at the time of sale (मेम्बर्शिप घेताना/सदस्य होताना).
.
वरच्या दोन इन्टरप्रिटेशनमधील काय खरं हे गब्बर यांना माहीत :)
या धाग्यावरच्या असंबंधीत
या धाग्यावरच्या असंबंधीत बातम्या वेगळ्या भाग ७८ मधे हलवाव्यात आणि याला गजेंद्र चौहान-एफटीआय करावे असे सुचवते.
आभार
सूचनेबद्दल आभार. अंमलात आणली आहे.
China confirms test of
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
चीनच्या अंतर्गत राजकारणातील
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
बीफनंतर आता मद्याकडे सरकारी
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
।। आई ॲंटीप्रोपागांडाभवानी
।। आई ॲंटीप्रोपागांडाभवानी प्रसन्न ।।
मा. श्री. गजेंद्र चौहान (ऊर्फ युधिष्ठिर (बीआर चोप्रांचे टिनपाट महाभारत फेम)) यांना FTII च्या अध्यक्षपदी (गुळाचा) गणपती बसवावा तसे बसवल्याने वशिल्याअभावी पुरस्कार चुकलेल्यांचा, सरकारी कोट्यातल्या फ्लॅटला मुकलेल्यांचा, चुकीच्या बाजूला झुकलेल्यांचा आणि मेरिटोक्रसीच्या पाश्चात्त्य उथळ कल्पनांनी हुकलेल्यांचा चांगलाच पापड मोडला आहे. नियतीच्या कृतीमागे जसा एक दैवी उदात्त हेतू असतो तसा नमोजीआप्पांच्या कृतीमागे पुरातन अस्सल देशी संस्कृतीच्या उत्थानाचा महादैवी महाउदात्त महाहेतू असतो ह्याचा मुळात ह्या लोकांना विसर पडला आहे. अन्यथा वशिलेबाजीच्या आपल्या पूर्वापार चालत आलेल्या देशी परंपरेला राजरोस उजाळा देण्याचा त्यांचा हेतू ह्यांच्या नजरेतून सुटता ना. युधिष्ठिरांच्या ह्या क्षेत्रातल्या कार्याला कमी लेखण्यापूर्वी त्याचे मूल्यमापन संस्कृतीउत्थापनाच्या पवित्र दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. खुली खिडकी, वासना, जंगल लव्ह इत्यादी अजरामर कलाकृतींतून त्यांनी स्त्रियांना भोगवस्तूसारखे वागवण्याच्या आपल्या सांस्कृतिक गुणधर्माला मोठ्या प्रमाणावर उत्तेजन दिले आहे. 'इंडियाज डॉटर्स'सारख्या (किंवा वॉटर, फायरादिंसारख्या) आपल्या महान संस्कृतीवर चिखलफेक करणाऱ्या कुकलाकृतींवर उतारा म्हणून या नियुक्तीकडे पाहिले पाहिजे.
किंवा एशियन स्काय शॉप वा टीएलसी नामक दूरदर्शनीय बनियागिरीत सक्रिय सहभाग घेऊन नवग्रहांच्या नवरत्नांचे हारांगठ्यादि कचरालंकार विकण्यात हातभार लावून आपल्या ज्योतिषशास्त्र नामक सर्वोच्च आणि एकमेव विज्ञानाच्या प्रसाराच्या कामात सिंहाचा वाटा उचलला आहे. तसंही FTIIमध्ये शिकलेल्यांच्या फालतू आर्टफिल्म पाहण्यापेक्षा भारतीय सुजन सलमान खानचा न-अभिनय किंवा सनी लिओनीचा नाभीनय पाहणे जास्त पसंत करतात. मार्केटला जे पाहिजे ते पुरवल्या शिवाय FTIIला तरी अच्छे दिन कसे येणार?
शिवाय इतर भाविकांपेक्षा जास्त भक्ती करून परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचे अस्सल भारतीय पौराणिक कौशल्यही युधिष्ठिरांनी दाखवले आहेच.
नमोचिया पायी लोळे क्षणभरी
त्यां नियुक्तीसाठी ठेवियला।
नमो मुखे म्हणा नमो मुखे म्हणा
वशिल्याची तुलना कोण करी।।
सोडा पुंडलिऽक वरदे हाऽऽरी विठ्ठल
श्री ज्ञानदेऽऽव तुकाऽऽऽराम.
बोला नरेंद्रमोदी महाराज की जय!
आधीचे एक चेअरमन
महेश भट्ट यांचे कर्तृत्व फारच थोर होते? त्यांची काँग्रेसशी असलेली जवळिक??
इति विकिपिडीया https://en.wikipedia.org/wiki/Mahesh_Bhatt
एका माळेचे मणी
महेश भट्ट यांनी एके काळी 'सारांश' आणि 'अर्थ'सारखे पारितोषिकविजेते आणि रसिकप्रिय सिनेमे बनवले होते. गजेंद्र चौहान ह्यांनी तुलनीय काही केलं आहे का?
सत्ताधारी राजकीय पक्ष आपल्या लोकांना नियुक्त करणार हे विद्यार्थी जाणतातच. म्हणून तर शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना प्रभृतींची नावं वर आली आहेत.
महेश भट्ट यांनी एके काळी
यात जख्म चं नाव अॅडवतो. महेश भट मला देखील आवडतात.
पण जंतूजी, संस्थाचालक हा उत्तम/पॉप्युलर सिनेकलाकार असलाच पाहिजे ही मागणी सयुक्तिक आहे का?
मी खेळाचं उदाहरण देतो. कपिल देव हे भारताचे कोच होते. कोच म्हणून अगदीच सामान्य कारकिर्द होती. पण तुलनेने टुकार प्लेअर असलेले बॉब वुल्मर, जॉन बुकानन, वेंकटेश प्रसाद+रॉबिन सिंग्+लालचंद राजपूत यांची कारकिर्द बरीच सरस होती देव यांच्यापेक्षा. फूटबॉलमध्येदेखील जे खेळाडू म्हणून अगदीच सामान्य होते ते उत्तमरित्या क्लब चालवतात, टीम्स म्यानेज करतात.
काही समांतर अनुभवांतून -
चांगला शिक्षक हा चांगला विद्यार्थी असावाच लागतो. विद्यार्थ्यांचं भलं कशामुळे होईल हे समजण्यासाठी आधी चांगला विद्यार्थी असणं आणि त्या-त्या विषयाबद्दल समज असणं आवश्यक असतं. विद्यार्थ्यांना स्वतःचा विचार करता यावा, तशी दिशा शिक्षकाला दाखवता यावी यासाठी आधी शिक्षकाने स्वतःला दिशा असल्याचं दाखवून द्यावं ही त्या विद्यार्थ्यांची अपेक्षा रास्त वाटते.
असा चांगला शिक्षक चांगला मॅनेजर/अॅडमिनिस्ट्रेटर असेल का? कदाचित असेल, कदाचित नसेल. फिल्म इन्स्टिट्यूटचा चांगला अध्यक्ष बनण्यासाठी चांगला अॅडमिन असणंही गरजेचं आहे. ही अपेक्षा पूर्ण होते का नाही हे दाखवण्याची संधी कदाचित या लोकांना मिळालेली नसेल. कदाचित चुका करत हे लोक शिकत असतील आणि अशी व्यक्ती कर्तबगार असेल तर सुरुवातीला काही किंचित गोंधळ झाला तरी त्या गोंधळांचा दूरगामी परिणाम दिसणारही नाही.
खेळाचं उदाहरण इथे थेट लागू पडेल असं वाटत नाही; खेळ आणि अभिनय याची तुलना करता येईल. अभिनय निराळा आणि (चित्रपटाचं किंवा संस्थेसाठी) दिग्दर्शन निराळं. खेळाडू म्हणून यशस्वी होण्यासाठी कौशल्याची बरीच गरज असते, पण खेळाबद्दल जाण, समज असण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी कौशल्य थोडं कमी पडलं तरी चालतं. विचारवंत आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे कार्यकर्ते यांच्यात फरक असतो, तसंच हेपण. विचारवंताने हस्तिदंती मनोऱ्यातून सल्लावाटप केंद्र उघडू नये, प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याची जाणीव ठेवावी अशी अपेक्षा असते; अशीच अपेक्षा फिल्म संस्थेचे विद्यार्थी ठेवत आहेत. (गजेंद्र चौहान ज्या मनोऱ्यातून आल्येत तो मनोरा हस्तिदंती आहे का कसं, हा वेगळा प्रश्न. यू. आर. अनंतमूर्तींच्या बाबतीत तो मनोरा हस्तिदंती होता असं वरच्या एका दुव्यातून समजलंच.)
फिल्म इन्स्टिट्यूटचा चांगला
मान्य. पण चांगला दिग्दर्शक/लेखक/अभिनेता चांगला अॅड्मिन असेलच असं नाही. पॉर्न स्टार चांगला अॅडमिन असूही शकतो. (गजेंद्र तसा असेलच असही नाही. इन्फॅक्ट तो चुत्या निघणार असं गट फीलिंग आहे.) सो नवा माणूस यायच्या आधीच संप करणं हे अजिबात पटत नाही. अगदी गजेंद्र चौहान असला तरी. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रती किंवा "बेनेगल-घटक-कर्नाडांच्या जागी कोण आला!! आता काय होणार!!" असे गळे काढणार्यांबाबत अजिबात सहानुभूती वाटत नाही.
राजकीय अपॉंईटमेण्ट्स नको म्हणून आंदोलन केलं असतं तर समजू शकलो असतो. पण विद्यांर्थ्यांनाच ते चालतय. त्यांना फक्त वेल-नोन कोणीतरी हवय जे अनाकलनीय आहे.
पॉर्न स्टार चांगला अॅडमिन
माझ्या अपेक्षा अगदी उलट आहेत; चांगला अॅडमिन असो वा नको, मुळात चित्रपट, अभिनय, नाटकशास्त्र, सामाजिक परिस्थिती इत्यादी चित्रपट संबंधित विषयांबद्दल चांगली जाण, आकलन असणारा माणूस हवा. भले त्या व्यक्तीची मतं पटतील न पटतील, ती व्यक्ती चांगली अॅडमिन असेल-नसेल. पण संस्थेला दिशा देण्यासाठी जी जाण असणं अपेक्षित आहे ती गजेंद्र चौहानकडे असल्याचं आत्तापर्यंत कुठेच दिसलेलं नाही. बेनेगल-घटक-कार्नाडांनी ही जाण वेळोवेळी दाखवून दिलेली आहे; अशा शहाण्या, सुज्ञ लोकांच्या जागी हा मामा आणून का बसवताय ही तक्रार मला पटते.
(माझ्या मते, तिथे स्मृती इराणी आली असती तरीही झालाच असता. तिला मानव संसाधन मंत्री केलं तेव्हा आरडाओरडा झालाच होता. अर्थात माझ्या या भाकीताला फार अर्थ नाही. पण लिहिण्याचं कारण - पॉर्नस्टार असण्याचा फार संबंध नाहीये. तो पॉर्नस्टार असल्यामुळे आणखी विनोद करता येतील हे मान्य.)
माझं कंफ्युजन
वरच्या एका प्रतिसादात
आणि या प्रतिसादात
घोडा-चतुर?
सोयीसवडीने सिलेक्टीव्ह रीडींग
सोयीसवडीने सिलेक्टीव्ह रीडींग करण्याला उत्तर द्यावं का? जाऊ दे, देऊन टाकते. आज मूड बरा आहे.
चांगला शिक्षक हा चांगला
मान्य… पण गजेंद्र चौहानांची पोस्ट शिक्षकाची आहे की संस्थचालकाची?
अमान्य… फुटबॉलमध्ये जे क्लब आहेत त्यांत मॅनेजर वेगळा, कोच वेगळा, खेळाडू वेगळा… खेळ आणि अभिनय यांची तुलना जशी योग्य तशीच त्यांच्या संस्थांची तुलना… चेल्सी या क्लबने जोसे मौरीन्हो नामक माणसाला आणले तेव्हा त्याचे खेळाचे कर्तृत्व शून्य होते, पण त्याने त्याचे व्यवस्थापकीय कौशल्य इतर ठिकाणी थोडेफार दाखवले होते… त्याच माणसाने चेल्सी ला योग्य दिशा दाखवत भरपूर स्पर्धा जिंकवून दिल्या…
या न्यायाने बोलायचे तर गजेंद्र चौहान यांना त्यांच्या अभिनयाच्या मापात न मोजता व्यवस्थापकीय कौशल्याच्या मापात मोजायला हवे. तुम्ही म्हणता तसं अभिनय निराळा आणि दिग्दर्शन निराळं हे मान्य, पण चित्रपट दिग्दर्शन निराळं आणि संस्थेचं व्यवस्थापन निराळं हे मान्य कराल का (संस्था चित्रपटांशी संबंधित असली तरीही)?
एक तर नको त्या गोष्टींवरून तुलना करायची, आणि निव्वळ वाऱ्याने फांदी तुटली तरी हा माणूस सर्व झाड तोडून आग लावणार आहे असं म्हणत ओरडत फिरायचं याला काय अर्थ आहे? जर नियुक्ती मान्य नसेल तर नियुक्तीचे निकष मागा, निकष न पाहता पूर्वग्रह कशाला?
मान्य… पण गजेंद्र चौहानांची
संस्थेत काय शिकवतात याबद्दल चौहान यांनी काही जाण, समज दाखवल्याचा पुरावा आत्तापर्यंत सापडलेला नाही (असं संस्थेचे विद्यार्थी सुचवत आहेत आणि माझा अभ्यास कमी असल्यामुळे मी त्यांचं म्हणणं मान्य करते). संस्था चालवण्यासाठी अगदी प्राथमिक तयारीही नसणाऱ्या मनुष्याला आमचं नेतृत्त्व/शिक्षकपद/वरचं स्थान देऊ नका असा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे; जो समजण्यासारखा आहे.
शांत गदाधारी भीम, शांत. थंड घ्या.
तसा पुरावा आहे की नाही हे मला
तसा पुरावा आहे की नाही हे मला पण माहित नाही. पण मुळातच प्रश्न माणूस कोण आहे याच्यापेक्षा त्याची नियुक्ती कशी झाली हा असला पाहिजे असं मला वाटतं. हे पद इतकंच महत्त्वाचं असेल तर त्यावर होणारी नियुक्ती पारदर्शक प्रक्रियेतून व्हायला हवी. तुमचा आक्षेप माणसाला आहे, आणि माझा आक्षेप प्रक्रियेला….
वेगळ्या मताचा आदर
महेश भट्ट विषयी तुमचे मत माझ्यापेक्षा वेगळे असू शकते हे मान्य.
तपशील आणि मत
समजुतीचा अंमळ घोटाळा होतो आहे का? मी वर दिलेलं वाक्य हा तपशील किंवा माहिती आहे; त्यात महेश भट्टविषयी माझं मत दिलेलं नाही.
१) महेश भट्ट यांनी सांरांश,
१) महेश भट्ट यांनी सांरांश, अर्थ इ. नंतर पुढे चित्रपट क्षेत्रात फार चांगले काम केले नाही. (असे माझे मत आहे. इतरांचे यापेक्षा निराळे असू शकते).
२) त्यानंतर ते कोन्ट्रावर्शियल व्यक्तीमत्वच राहीले.
३) गजेन्द्र चौहानला पोर्न स्टार म्हटले गेले आहे. महेश भट्टचे (पहिल्या कांही कलात्मक चित्रपटांनंतर) गल्लाभरू सिनेमे नाहीत काय?
४) गजेंद्र्चे काय व्हायचे ते होवो पण 'एकाला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा' हे बरोबर नाही.
५) हे आंदोलन 'लेफ्ट-अनार्किस्ट' चा त्यांना न पटणार्या (पण लोकांनी निवडून दिलेल्या) राजकीय पक्षाविरोधातील आक्रस्ताळेपणा तर नव्हे?
अर्हता
मी महेश भट्टचा प्रवक्ता नाही. किंबहुना, त्याची नियुक्ती राजकीय होती असंच दिसतं आणि नियुक्त्या एकंदरीत राजकीय असतात हेही दिसतंच आहे. आणि तरीही, कागदोपत्री गजेंद्र चौहानची अर्हता महेश भट्टइतकीही आहे असं काही म्हणता येत नाही.
मुळात जेंव्हा भीक दिली जाते
मुळात जेंव्हा भीक दिली जाते तेंव्हा अर्हता विचारात घ्यावी ही अपेक्षाच का?
कोण भिकारी?
तुमच्या मते भीक कुणाला मिळाली आहे? चौहानला? तसं तुमचं म्हणणं असेल तर चौहानला आपल्या अर्हतेविषयी काही अडचण नाहीच आहे. अडचण विद्यार्थ्यांना आहे, ह्या धाग्यावरच्या अनेकांना आहे, आणि वर्तमानपत्रांतले किंवा सोशल मीडिआवरचे प्रतिसाद पाहता अनेक भाजप समर्थकांनाही आहे.
अडचण विद्यार्थ्यांना आहे,
विद्यार्थ्यांना आधीच कमी पैशात शिकण्याची भीक मिळत आहे सरकार दयेने.
बाकीच्यांना काय दुसरे कोणीही असते तरी अडचण असतीच. आणि जर नसेल पटले सरकारचे वागणे तर पुढच्या निवडणुकीत पाडुन टाका.
चिंज - तुम्ही नोकरी करता असे समजुन लिहीते. तुमच्या कंपनीतल्या सर्व नेमणुका अर्हता वगैरेच बघुन होतात असे तुम्हाला वाटते का? एकदा दाता आणि घेणारा असे रिलेशन आले की आपला-परका असा भेदभाव होणारच.
भारतात हॉटेल मधे कोणी वेटर आपल्याशी उर्मट पणे वागला तर आपण टीप तरी देऊ का?
अशी गोष्ट होणे जर पसंत नसेल तर सरकारनी ह्या धंद्यातुन बाहेर पडणे हाच एक उपाय आहे.
कारण आधीचे सरकार पण हेच करत होते आणि येणारे सरकार पण हेच करणार आहे.
( माझे खाजगी मत सोगांनी मौनीबाबाला तर पंप्र केले, त्या मानानी हे तर काहीच नाही. )
गंमत
इथे गंमत अशी आहे की खुद्द चौहान व्हिडिओत असं पुन्हा पुन्हा म्हणत आहेत की माझा भूतकाळ पाहू नका. माझ्यापुरतं सांगायचं तर, 'माझा रेझ्यूमे न पाहताच मला नोकरीवर ठेवा; मला एक चानस हवा' असं कुणी म्हणू लागलं तर जिथे त्याची प्रच्छन्न चेष्टा केली जाईल अशा ठिकाणी मी थोरामोठ्यांची चेष्टा करत दिवस घालवतो आहे. त्यामुळे अंमळ दिशा चुकली. बाकी चालू द्या.
अहो कोणीतरी मैत्री निभावली
अहो कोणीतरी मैत्री निभावली किंवा जुन्या मदतीची परतफेड केली अश्या दृष्टीने बघा ना ह्या कडे.
माझ्या हपिसाततरी प्रत्येक
माझ्या हपिसाततरी प्रत्येक कामाला अर्हता बघून नेमणुका होतात. पण इथे या पदासाठी नक्की अर्हता ( पूर्ण नाही पण काहितरी वस्तूनिष्ठ) काय आहे हे सांगत नाहीये कोणीच.
द्या टाळी!
आणि मी गजेन्द्र चौहानचा प्रवक्ता/ समर्थक देखील नाही. इतर चेअरमन्स लोकांच्या तुलनेत महेश भट्ट डावाच (तुलना- विचारसरणी ह्या अर्थाने नव्हे!) होता- नियुक्ती राजकीय लाग्याबांध्यांमुळेच झालेली होती. त्यामुळे 'आता' आंदोलन वगैरेची गरज आहे असे कांही नाही, एव्हढेच!
धन्यवाद
ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय का? की व्हिडिओत चौहान म्हणतायत तसं त्यांच्या भूतकाळाकडे दुर्लक्ष करावं असं तुम्हीही म्हणताय? धन्यवाद.
काही मुद्दे.. इथल्या
काही मुद्दे.. इथल्या अनेकांसारखी मी अजिबात जाणकार नाही तेव्हा पटले नाहीत तर हिला काय कळतंय म्हणून सोडून द्या कारण बाकी कुस्त्या खेळायची माझ्यात ताकद तर नाहीच पण इच्छाही नाही.
१. एफटीआयआय किंवा रानावि सारख्या संस्थ्या आणि इतर महाविद्यालये यांच्यात फरक आहे. या संस्था युजीसीच्या अधिपत्याखाली येत नाहीत. त्या संस्था डिरेक्टली केंद्राशी संलग्न आहेत. इथल्या शिक्षणाचे स्ट्रक्चर ठरवणे, अभ्यासक्रमात काही परिणामकारक बदल करणे, त्या अनुषंगाने धोरण ठरवणे वगैरे अनेक गोष्टी संस्थाप्रमुख व इतर कौन्सिल यांच्या हातात असतात. त्यामुळे प्रमुख कोण होतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा फिल्म्समधे हाताळले जाणारे विषय वगैरेंवर 'ठराविक विचारसरणी' बंधने आणू शकते. हे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे.
२. एफटीआयआयचे चित्रपट सृष्टीत योगदान काय असा प्रश्न विचारताना आपल्याला केवळ हिंदी सिनेमा विचारात घेऊन चालणार नाही. संपूर्ण भारतीय सिनेमा विचारात घ्यावा लागेल. चित्रपटाच्या महत्वाच्या तांत्रिक बाजू म्हणजे कॅमेरा, एडिटिंग, साऊंड डिझायनिंग. भारतभरातल्या चित्रपटसृष्टीमधे या बाजूंमधे उत्तम तंत्रज्ञ म्हणून जे गणले जातात त्यांपैकी खूप मोठ्या प्रमाणावर लोक एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. ही अनेक नावे सामान्य माणसांपर्यंत पोचत नाहीत. म्हणजे ते अस्तित्वात नाहीत असे नाही. दिग्दर्शकांचेही तेच आहे.
३. पटकथालेखन व आर्ट डिरेक्शन हे तुलनेने नवीन कोर्सेस इथले जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बॅचेस झाल्या असतील पण बाहेर पडलेले बहुतेकजण उत्तम काम करतायत. किल्लाचा लेखक तुषार परांजपे हे एक पटकन आठवलेले नाव.
४. अभिनयाचा अभ्यासक्रम ७८ च्या आसपास बंद करण्यात आला. तो परत सुरू करून दहा वर्षे जेमतेम झाली असावीत. तिथून बाहेर पडलेले बरेचसे विद्यार्थी भारतीय (फक्त हिंदी नव्हे) चित्रपटांमधे कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी शाहिद चित्रपटासाठी अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारा राजकुमार राव हा नवीन अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.
५. नाटक व चित्रपट अश्या कलांचे डिसिप्लिन्ड शिक्षण न घेताही या माध्यमात उतरलेले, उत्तम काम करणारे, यशस्वी असलेले अनेक कलाकार व तंत्रज्ञ आहेत हे नक्की. त्यांची शिकण्याची पद्धत इन्फॉर्मल म्हणून ते कमी नाहीतच आणि असे शिक्षण घेणे/ घेता येणे हे अयोग्यही नाही. भक्ती बर्वे इनामदार ललितमधे आम्हाला शिकवायला यायच्या तेव्हा त्यांनी या संदर्भात एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. "आम्ही सुरूवातीचा काळ ट्रायल एरर करून शिकण्यात, चाचपडण्यात घालवला. तेच ट्रायल एरर, करून बघणे, चाचपडणे, पडणे आणि त्यातून शिकणे हे तुमच्या ट्रेनिंगमधे तुमचे होते त्यामुळे तुमची सुरूवात लवकर होऊ शकते." मला हा मुद्दा तेव्हा नुसताच पटला होता. आता अनुभवातूनही पटलेला आहे.
६. आजवरच्या संस्थाप्रमुखांचे काम आणि गजेंद्र चौहान यांचे काम याची तुलना करताना वैयक्तिक आवडनिवड बाजूला ठेवून बघितले गेले पाहिजे. म्हणजे भारत एक खोज अगदीच डबडी होती पण खुली खिडकी काय भारी फिल्म आहे असे तुमचे मत असू शकते पण ते बाजूला ठेवावे लागेल आणि भारत एक खोज व खुली खिडकी याची तुलना करताना विविध ठिकाणचे चित्रपटाचे अभ्यासक, महत्वाचे फिल्ममेकर्स, समीक्षक यांचे अभ्यासपूर्ण विवेचन हे ग्राह्य धरावे लागेल. का? तर काहीएक अभ्यासानंतरच एखाद्या व्यक्तीच्या त्या त्या विषयातल्या विवेचनपूर्ण विधानाला अर्थ प्राप्त होतो अशी विधाने 'हॅ फालतू!' एवढी अभ्यासपूर्ण नसली तरी.
७. संस्थेमधे बरेच गोंधळ असतील. अभ्यासक्रमामधे, व्यवस्थेमधे आणि इतरही अनेक ठिकाणी असतील. काही विद्यार्थी अतिशय चुकीचे वागत असतील. काही विद्यार्थी असलेल्या फॅसिलिटीचा काहीच उपयोग करून घेत नसतील. पण हे कुठे नसते? आयआयटीसारख्या ठिकाणी अॅडमिशन मिळाली म्हणजे प्रत्येक जण प्रचंड हुशारच असतो असे नाही किंवा प्रत्येकजण ब्रेकथ्रू कामे करतो असे नाही. उत्तम, मध्यम, अधम असे विद्यार्थ्यांच्यातले स्तर हे सर्वच ठिकाणी असतात. त्याला पर्याय नाही. याचा अर्थ संस्था अजून गर्तेत ढकलली जावी असा होत नाही.
८. चित्रपट बनवण्याची कला शिकवणारी संस्था ही सब्सिडाइज्ड असताच कामा नये हा आग्रह अनाठायी आहे. चित्रपट ही भारतातल्या विविध इंडस्ट्रीजपैकी एक महत्वाची इंडस्ट्री आहे आणि जसे विविध इंडस्ट्रीत काम करण्यासाठी लागणारे शिक्षण देणार्या संस्था या सबसिडाइज्ड आहेत तसेच या संस्थेचेही आहे. खाजगी संस्थांमधले शिक्षण या कलेसाठी लागणार्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जनसामान्यांना न परवडणारे असते. तसेच हे शिक्षण पूर्णवेळाचे आहे. ५ तास कॉलेज, ३ तास प्रॅक्टिकल्स की संपले असे होत नाही त्यामुळे होस्टेल वगैरेही खर्च येतात. हे सगळे गणित धरून नॉनसब्सिडाइज्ड खाजगी संस्थेमधले शिक्षण अव्वाच्यासव्वा महाग होऊन जाते. सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांनी या कलेत उतरूच नये हे म्हणणे म्हणजे एका नव्या आर्थिक वर्गवर्चस्ववादाला जन्म देणारे वाटते.
असो
तर (कुणी विचारलं नसलं तरी सांगते) माझा या संपाला पाठिंबा आहे.
टाळ्या.
टाळ्या.
अजून एक महत्वाचा मुद्दा
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एफटीआयआय या सबसिडाइज्ड संस्थेतून बाहेर पडलेले बहुतेक सर्व विद्यार्थी हे भारतीय चित्रपटसृष्टीतच काम करत आहेत. म्हणजे त्यांच्या सबसिडाइज्ड शिक्षणाचा उपयोग हा भारतीय चित्रपटसृष्टीलाच होतो आहे. त्यामुळे हे शिक्षण सबसिडाइज्ड असू नये हा मुद्दा या स्तरावरही बाद होतो.
(हे संपादन करून मूळ प्रतिसादातच लिहायचे होते पण संपादनाचा पर्याय दिसत नाहीये म्हणून नवीन प्रतिसाद.)
उत्तम प्रतिसाद
चित्रपटसृष्टीमुळे जसा अनेकांना नोकऱ्या मिळतात, तसंच चांगले चित्रपट बघून समाजाचं बौद्धिक पोषण होतं. ते चित्रपट कुठे का बनलेले असेनात. हे बौद्धिक पोषण होताना परपोषी असण्यापेक्षा आपली मुळं जिथली आहेत तिथल्या कल्पना, विचारांमुळे होणं समाजाच्या फायद्याचं असतं. सभ्य, सुशिक्षित, विचारी समाजाच्या गरजांमध्ये चांगली करमणूक आणि/किंवा कला ही एक बाबसुद्धा असतेच. त्यामुळे हे शिक्षण अनुदानित असण्याबद्दल ओरड अनाठायी आहे. (आणि या अनुदानाचे पैसे मुळात असणार किती! ते इतरत्र वापरले तर नक्की किती मोठा फरक समाजावर पडेल?)
>> (हे संपादन करून मूळ प्रतिसादातच लिहायचे होते पण संपादनाचा पर्याय दिसत नाहीये म्हणून नवीन प्रतिसाद.)
प्रतिसादाला प्रतिसाद आला की संपादन करता येत नाही.
या अनुदानाचे पैसे मुळात असणार
या अनुदानाचे पैसे मुळात असणार किती! ते इतरत्र वापरले तर नक्की किती मोठा फरक समाजावर पडेल?
अगदी बरोबर. एफ टी आय आय मधे प्रत्येक दिग्दर्शन व सर्व तांत्रिक विषयाच्या १० आणि अभिनयाच्या २० च सीटस आहेत. दिग्दर्शन व इतर तांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम तीन वर्षांचा, आर्ट डिरेक्शन व अभिनय दोन वर्षांचे आणि पटकथालेखन बहुतेक एकच वर्षाचा आहे.
मार्मिक
अतिशय मार्मिक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद इथे आवर्जून लिहिल्याबद्दल आभार.
+१
असेच
+२
+२
(माझ्या या प्रतिसादाला मार्मिक श्रेणी कशाबद्दल मिळाली असावी)?
चित्रपट बनवण्याची कला
@नीधप - भारतात कुठलीच शिक्षण संस्था सरकारी सबसीडीवर असू नये असे माझे ठाम म्ह्णणे आहे, अगदी आयआयटी सुद्धा. जर विद्यार्थी पैसे भरू शकत नसला तर कर्ज देण्याची व्यवस्था असावी पण शिक्षणाला लागणारे सर्व पैसे त्याच्या कडुनच वसुल करावेत ( आत्ता किंवा भविष्यात व्याजासकट ). नाहीतर त्या विद्यार्थ्यांनी पेटंट, संशोधन किंवा ह्या केस मधे सिनेमा काढुन तो खर्च सरकारला परत करण्याची सोय असावी ( शिक्षण चालू असतानाच ).
जसा शेतकर्यांना वीजबीलात सबसिडी देण्याला विरोध आहे तसाच ह्या फुकट शिक्षण देण्याला पण.
हा विषयच वेगळा आहे मग.
हा विषयच वेगळा आहे मग. त्यामुळे सध्या अॅग्री टू डिसअॅग्री इतकेच.
+१ आवडला
केवळ हाच प्रतिसाद नव्हे, तर या धाग्यावरचे बाकीचे प्रतिसादही आवडले.
मार्मिक
मार्मिक
महापालिकेतली कारकूनाची जागा
महापालिकेतली कारकूनाची जागा भरायची असते तेव्हा त्यासाठी जी पात्रता असते (बहुतेक पदवी) ती पात्रता नसताना एखादी व्यक्ती अपॉइंट केली जाणे चूक आहे हे लॉजिकली मान्य असेल तर गजेंद्र चौहान मुळातच या पोस्टसाठी अपात्र आहे हे लक्षात यावे.
एफ टी आय आय व रानावि या अश्या संस्था आहेत जिथल्या प्रमुखांच्या करीअरमधून विद्यार्थ्यांना शिकता येणे हे ही अपेक्षित आहे.
गजेंद्र चौहान यांच्या करीअरमधून पोर्न सिनेमातही ठोकळा अभिनयाची मशाल कशी तेवती ठेवावी एवढेच शिकता येऊ शकते. विद्यार्थ्यांना ते शिकायचे नाहीये.
फिल्ममेकिंग शिकवणार्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना असे शिकायला लागूही नये.
कमाल स्वरूप यांची यासंदर्भाने मुलाखत येथे वाचता येईल.
तसेच कालच्या लोकसत्तामधे योगेंद्र यादवांचा यासंदर्भाने लेख आलेला आहे. तो ही वाचण्यासारखा आहे.
माझा अडाणीपणा थोडा कमी कर,
माझा अडाणीपणा थोडा कमी कर, नीधप (किंवा इतर कोणीही). 'रानावि'चं पूर्ण नाव काय?
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. (राष्ट्रीय नाट्य विद्यालय)?
http://nsd.gov.in/
http://nsd.gov.in/
हो रानावि = राष्ट्रीय नाट्य
हो रानावि = राष्ट्रीय नाट्य विद्यालय.
या धाग्यावर 'इंटरनेट हिंदू'
या धाग्यावर 'इंटरनेट हिंदू' या फिनॉमेनाचा डेमो दिसला.
जरा माझ्यासारख्या अडाणी
जरा माझ्यासारख्या अडाणी व्यक्तीसाठी याचे थोडेसे संस्प देऊ शकाल का? समजण्यास सोपे जाईल.