ही बातमी समजली का? - ७८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=====
China confirms test of supersonic nuclear delivery vehicle

The Wu-14 was assessed as travelling up to 10 times the speed of sound, or around 7,680 miles per hour, it said.

-------------------

असं पायजे. - सरकारी कराचा फ्री सेक्सने विरोध

field_vote: 
0
No votes yet

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सत्तेवर आल्यावर "अ" ने भ्रष्ट अधिकारी "ब" ला शिक्षा केली. त्यानंतर "क" ला शिक्षा केली. "ब" हा भावी प्रतिस्पर्धी होता. "क" हा तर भावी प्रतिस्पर्धीही नव्हता, पण त्याला सर्वांची अंडीपिल्ली माहीत होती (!) .

खालच्या कोर्टाने निर्णय दिला. मृत्यूऐवजी कैद देण्याच्या समझोत्याच्या बदल्यात गप्प राहण्याची तडजोड केली वगैरे विधानं केली आहेत..

विशिष्ट मुद्द्यांवरुन मोट बांधून त्यावर "वदंता आहे" वगैरे शब्द वापरुन उगीच फार इनसायडर तपशील माहीत असल्याचा टोन अग्रलेखात आहे.

"क"ने भ्रष्टाचार खरंच केला आहे आणि तसं मान्यही केलं आहे, हेही लेखातच आहे. मग एकेक करुन प्रतिस्पर्ध्यांना संपवणे आणि सत्ता एकहाती घेणे हे कन्क्लुजन कसं ?

उद्या भारतातही उदा. मोदी किंवा एखाद्या "क्ष" पक्षाची सत्ता असताना त्यांनी एकेका माजी भ्रष्ट नेत्याला आत टाकले तर तेही केवळ प्रतिस्पर्ध्यांचे काटे काढताहेत असंच म्हणायचं का? क्रिटिसिजमच का सदैव ? एकूण इथे आणि अन्यत्रही संपादक लोक कधी कोणाबद्दल एक शब्द कौतुकाचा काढतात तेव्हाही लगेच त्याच्याचबद्दल "पण" असं म्हणून पुढे दहा वाक्यं मापं अन वीस वाक्यं सावधपणा असंच दिसतं.

कधीतरी निखळ प्रशंसा आणि त्यातच शेवट असा अग्रलेख वाचण्याची इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विशिष्ट मुद्द्यांवरुन मोट बांधून त्यावर "वदंता आहे" वगैरे शब्द वापरुन उगीच फार इनसायडर तपशील माहीत असल्याचा टोन अग्रलेखात आहे.

कुबेर साहेबांना करमणुक म्हणुन वाचायचे असते. बाकी लोक तर अगदीच सपक लिहतात, ह्यांच्या लेखात मसाला तरी असतो.
दोनच दिवसात त्यांनी सौदी अरेबियातील एकमुखी सरकारची स्तुती केली तर आश्चर्य वाटुन घेऊ नका.

एकूण इथे आणि अन्यत्रही संपादक लोक कधी कोणाबद्दल एक शब्द कौतुकाचा काढतात तेव्हाही लगेच त्याच्याचबद्दल "पण" असं म्हणून पुढे दहा वाक्यं मापं अन वीस वाक्यं सावधपणा असंच दिसतं.

कधीतरी निखळ प्रशंसा आणि त्यातच शेवट असा अग्रलेख वाचण्याची इच्छा आहे.

संतुलनाच्या अट्टाहासाचे इन्फेक्शन फक्त ऐसीवरच नाही तर सर्व दूर पसरलेले दिसतय गवि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादात इथे = लोकसत्ता

इथे म्हणजे ऐसी नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गविंनी तातडीने खुलासा केलेला आहे.
Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग.. ब्यालन्स करायला नको ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्या भारतातही उदा. मोदी किंवा एखाद्या "क्ष" पक्षाची सत्ता असताना त्यांनी एकेका माजी भ्रष्ट नेत्याला आत टाकले तर तेही केवळ प्रतिस्पर्ध्यांचे काटे काढताहेत असंच म्हणायचं का? क्रिटिसिजमच का सदैव ? एकूण इथे आणि अन्यत्रही संपादक लोक कधी कोणाबद्दल एक शब्द कौतुकाचा काढतात तेव्हाही लगेच त्याच्याचबद्दल "पण" असं म्हणून पुढे दहा वाक्यं मापं अन वीस वाक्यं सावधपणा असंच दिसतं.
<<
गोपीनाथ गेले,
पंकजाही अडकल्या बहुतेक.

पाशवी बहुमत मिळाल्यानंतर 'आतला' विरोध मोडायचा असतो.

'बाईं'नी सिंडिकेटची वाट लावली होती, अन नंतर इंदिरा इज इंडिया अशी दर्पोक्तीही केली होती.

***

टेकड्यांचा प्रदेश

या आदिदेशाला उत्तुंग करणारा हिमालय
आता आहेच कुठे?
स्वातंत्र्योत्तर महानेत्यांनी त्याचे मस्तक छाटून
याला टेकडीचे सुंदर रूप दिलेय.
आपल्या अत्ताच्या जागतिक प्रतिमेसारखे....

राम-कृष्ण केव्हाच परतले युगांपलिकडे
बुद्धाने देशत्याग करून उभारले मंदिर
शेजार्‍यांच्या दारी
गांधीही गाडले गेले हळू हळू
अहिंसक पद्धतीने
आणि नेहरूंनाही हरवून चालू झाली
विजयदौड नियोजनाची
आश्वासनांच्या वारेमाप उधळणार्‍या अश्वांवरून

विश्वाने आणि भविष्यकाळाने लक्षात घ्यावे
की आता कोणीही उंच असणार नाहीत
आमच्या मधून,
जे नेत्यांना मानवत नाही ते रुजणार नाही
इथल्या मानव-मातीतून
हा आद्यदेश आता उत्तुंग शिखरांचा देश म्हणून मिरवणार नाही.
"टेकड्यांचा प्रदेश" म्हणूनच याची नोंद होईल
जागतिक नकाशावर, भविष्यकाळाच्या....

(१० फेब्रुअरी १९८७ साली दैनंदिनीत नोंदवून ठेवलेली प्रा. रमेश पानसे यांची ही कविता आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

कविता म्हणून आवडली. पण ...

स्वातंत्र्यपूर्व काळातले नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते, आपसांत चिखलफेकीचं राजकारण करत नव्हते असं वाटत नाही. तेव्हा सगळ्यांचा 'शत्रू' एकच होता, ब्रिटीश, त्यामुळे एकमेकांची उंची कमी करण्यासोबत 'शत्रू'चा विरोध हाही राजकारणाचा भाग असे. आता तो भाग उरलाच नाही, म्हणून गळेकापूपणा जास्त दिसतो असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गोपीनाथ गेले,
पंकजाही अडकल्या बहुतेक. पाशवी बहुमत मिळाल्यानंतर 'आतला' विरोध मोडायचा असतो.>>>>

ह्या वाक्यांवरुन असा मेसेज मिळतो आहे की पंकजा ह्यांना मुद्दाम अडकवले कोणी. असे कसे होइल हो, असतील सर्व व्यवहार स्वच्छ तर कसे कोण अडकवणार? आणि नसतील व्यवहार स्वच्छ तर अडकल्या तर चांगलेच आहे ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भ्रष्टाचार बरेचजण करतात पण सूडबुद्धीने, बदला म्हणून, स्कोअर सेटलिंगसाठी आपल्या प्रतिस्पर्ध्याची लफडी बाहेर काढली जातात हे जरी खरं असलं तरी त्या निमित्ताने का होईना, पण एक चेक बसतो ना अशा भ्रष्टाचाराला? कसे का होईना, पण प्रकरण बाहेर तर पडते. शत्रूंच्या पुढे कधीतरी सत्तेत येण्याच्या काल्पनिक भीतीने का होईना पण कदाचित भ्रष्टाचाराच्या स्केलला आळा बसू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Competition itself can regulate behavior.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय, पण कधीतरी कॉम्पिटिशनऐवजी नेक्सस होण्याचा धोकाही असू शकतो ना? त्याविषयी काय म्हणता येईल? विशेषतः दुरित काम करणार्‍यांच्यात आणि सत्तेची अस्थिरता जाणून असणार्‍यांत अशी परस्परसमजुतीची भावना असतेच.

यातून "भ्रष्टाचार कमी करावा" यापेक्षा, "शत्रू बनवू नयेत" ही भावनाही वाढीस लागू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय, पण कधीतरी कॉम्पिटिशनऐवजी नेक्सस होण्याचा धोकाही असू शकतो ना? त्याविषयी काय म्हणता येईल?

वाह.

tyranny of Status quo - गुगलून पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परंतु संतुलन व्यवस्थांच्या अभावी एकमुखी नेतृत्व किती धोकादायक ठरते हे आता चीन दाखवून देत आहे.

काय धोकादायक ठरले हे सो कॉल्ड एकमुखी नेतृत्व? जुन्या सत्तेवरच्या माणसाला शिक्षा झाली तर कोणाचे काय गेले?
चीन मधे गेल्या ६० वर्षात कधी बहुमुखी नेतृत्व होते?

त्या देशात जिनिपग यांच्याखेरीज अन्य कोणालाही कसलेही अधिकार नसणे हे अधिक धोकादायक मानले जात आहे.

हे जागतीक शांतते साठी चांगलेच आहे. जेंव्हा जेंव्हा सत्तेला धोका वाटतो तेंव्हा सत्तेवरची लोक दुसर्‍या देशांशी वाद्/युद्ध ओढवून आणतात. आपली सत्ता बिनधोक आहे असे पटले की शांतता असते.

अवांतर : हे भारतात कधी होणार ह्याची मी कीती वर्ष वाट बघते आहे. इथे निवडणुकीत आरोप करणारे मोदी नंतर बारामतीत जाऊन मिठ्या मारतायत. खरे तर जितकी वर्ष सत्ता तितके वर्ष सक्तमजुरी असा काहीतरी कायदा केला पाहीजे भारतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>इथे निवडणुकीत आरोप करणारे मोदी नंतर बारामतीत जाऊन मिठ्या मारतायत. खरे तर जितकी वर्ष सत्ता तितके वर्ष सक्तमजुरी असा काहीतरी कायदा केला पाहीजे भारतात.

निवडणुकीत जे बोललेलं असतं तो "चुनावी जुमला" असतो असं पक्षाध्यक्षांनी सांगितलं ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यावरून 'जमीन-जुमला' या शब्दाची अल्टरनेटिव्ह व्युत्पत्ती ध्यानात आली. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बीफनंतर आता मद्याकडे सरकारी बंदूक.

http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/After-beef-centre-guns-fo...

अर्थात मुंबई, पुणे, अहमदाबाद मिरर सोडून अन्यत्र कुठे दिसत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबई, पुणे, अहमदाबाद

खिक्!
इथेच याची चर्चा होऊ शकते असे त्यांना वाटले असावे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सोमनाथ ते मानोबी - प. बंगालमधल्या महाविद्यालयात प्राचार्य बनलेल्या ट्रान्सजेण्डर मानोबी बंडोपाध्याय यांची मुलाखत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फारच रोचक आहे. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी असणाऱ्या संस्थेत महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या रेचल डोलेजाल हिच्या 'ट्रान्सरेशल' असण्यावरून सध्या चर्चा घडत आहे. कॉकेशन (गोऱ्या) आईवडलांची मुलगी असणारी रेचल गेली काही वर्षं, आपण कृष्णवर्णीय असल्याचं सांगत होती, किंवा हे नाकारत नव्हती. त्यासंदर्भात न्यू यॉर्करमधला लेख -
Black Like Her

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी जुनी आहे पण फारशी दखल घेतली गेली नाही. गूगलने आपला RE<C प्रोजेक्ट बंद केला. आनंदाची बातमी म्हणजे They are working on something truly disruptive.

बातमी

At the start of RE<C, we had shared the attitude of many stalwart environmentalists: We felt that with steady improvements to today’s renewable energy technologies, our society could stave off catastrophic climate change. We now know that to be a false hope ...

Renewable energy technologies simply won’t work; we need a fundamentally different approach.

What’s needed are zero-carbon energy sources so cheap that the operators of power plants and industrial facilities alike have an economic rationale for switching over within the next 40 years ...

Incremental improvements to existing technologies aren’t enough; we need something truly disruptive.

Unfortunately the two men don't know what that is, or if they do they aren't saying.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख काहीसा उथळ वाटला.

These aren't guys who fiddle about with websites or data analytics or "technology" of that sort: they are real engineers who understand difficult maths and physics, and top-bracket even among that distinguished company.

आत्तापर्यंत अनेकांना 'साला उत्क्रांती नाही चालणार, काहीतरी क्रांतीच व्हायला हवी!' या विचाराची भुरळ पडलेली आहे. गूगलने हा प्रोजेक्ट का सुरू केला याचं कारण उघड आहे. वैज्ञानिक 'चमत्कार' करून जगाचं भलं करून दाखवू शकू अशी टेक-विझ प्रतिमा त्यांना हवी होती. कधी ना कधी ते गळून पडणार होतंच. आणि त्यांनी यात किती पैसे खर्च केले? काही मिलियन डॉलर्स! आणि तो प्रोजेक्ट बंद झाल्यावर त्यातले दोन गणितं वगैरे येणारे वैज्ञानिक/इंजिनियर म्हणतात की बाकीचं जग जे करतंय ते साफ चुकीचं आहे... मला खात्री आहे की ते आत्ता व्हीसी मंडळींकडे जाऊन हेच गाणं गात असतील. सांगायचा मुद्दा असा, की त्यांना 'मलाच सगळं कळलं आहे, बाकीचं जग मूर्ख आहे' असं म्हणण्यात व्हेस्टेड इंटरेस्ट आहे.

दहा वर्षांनी मला या दोघांकडून काय डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी आली आणि सध्याच्या रिन्युएबल्सच्या कल्पना कशा कचऱ्यात फेकल्या गेल्या याची कथा वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अणुऊर्जेची अवाजवी* भलामण करणारा वाटला.

*अणुऊर्जेतील धोके अतिरंजित आहेत (९९.७% अणुकचरा मुळीच धोकादायक नाही) असा सूर आळवायचा असेल तर ग्लोबल वॉर्मिंगही अतिरंजित आहे असा सूर आळवणे व्हॅलिड समजावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत!
अणुऊर्जेत तात्काळ प्रदूषण कमी होत असले तरी दूरगामी परिणाम खूप जास्त आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे. रिन्युएबल्सच्या बरोबरीने लाईफ स्टाईलमध्ये बदल करावे लागतील याबद्दल कोणीच बोलत नाही ह्याचा प्रत्यय आला.
ह्या टेकी लोकांना असं काहीतरी हवंय की सगळ्या लोकांची जी मौजमजा चालू आहे ती चालूच राहिल आणि शून्य प्रदूषण होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी लोकसंख्या कमी केली पाहीजे ( साऊथ आशीया आणि नोर्थ आफ्रीका मधे तर थेट निम्मीच ) ह्या बद्दल तर कोणीच काही बोलत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसंख्या ही समस्या आहे हेच मिथक असेल तर ??

(लोकसंख्येबद्दल पॉल एहर्लिच यांचे सगळे अंदाज/भाकिते खोटी ठरली होती. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ख्येबद्दल पॉल एहर्लिच यांचे सगळे अंदाज/भाकिते खोटी ठरली होती.

खोटी नाहीत डीफर्ड.

लोकसंख्या ही समस्या आहे हेच मिथक असेल तर ??

हे प्रत्येकाचे मत आहे. माझ्या मते पर्यावरणाच्या समस्येवर किंवा सस्टेनॅबिलिटीवर एकमेव कायमचा उपाय आहे जो की जगाची लोकसंख्या जास्तीत जास्त २०० कोटीवर ठेवणे. बाकी सर्व उपाय हे मलमपट्टी सारखे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>एकमेव कायमचा उपाय आहे जो की जगाची लोकसंख्या जास्तीत जास्त २०० कोटीवर ठेवणे. बाकी सर्व उपाय हे मलमपट्टी सारखे आहेत.

हा कायमचा उपाय आहे का? म्हणजे जगातल्या सध्याच्या लोकांपैकी २/३ लोकांना ठार मारल्यास उरलेले १/३ "कायमचे सुखाने" राहू शकतील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्हाला सारखे मारणे, जेनिसाईड वगैरेच का दिसते? २-३ पिढ्यांमधे लोकसंख्या कमी करणे शक्य नाही का शांततेत आणि आनंदाने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> २-३ पिढ्यांमधे लोकसंख्या कमी करणे शक्य नाही का शांततेत आणि आनंदाने.

दोन तीन पिढ्यांमध्ये आणखी वाट लागेल ना? लवकरात लवकर नियंत्रित करायला हवी ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२०० कोटी म्हणजे २ बिल्यन ना?
मग फक्त भारत आणि चीन या दोघांची मिळून लोकसंख्याच या पेक्षा जास्त आहे ना?
मग बाकीच्यांनी कुठं जायचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०० कोटी म्हणजे २ बिल्यन ना?
मग फक्त भारत आणि चीन या दोघांची मिळून लोकसंख्याच या पेक्षा जास्त आहे ना?
मग बाकीच्यांनी कुठं जायचं?

अमेरिका, युरोप आणी ऑस्ट्रेलिया ह्यांनी जर बाहेरच्या लोकांना आत येउन दिले नाही ( कमीत कमी ह्या पुढे तरी ), तर त्यांच्या आहे त्या लोकसंख्येला व्यवस्थित जगता येइल.

खरा सस्टेनन्स चा प्रॉब्लेम साउथ आशिया, साउथ इस्ट आशिया आणि इजिप्त वगैरे देशांनाच आहे. ह्या देशांमधे एकदमच वाईट परीस्थिती होइल. ( आणि त्यामुळे लोकसंख्या तशीच २५% पर्यंत खाली येइल ).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीही हां अनु!

युरोपच्या लोकसंख्येच्या एजिंग इ.इ. मुळे लेबर धड मिळेना म्हणून बाहेरून आयात चाललीये लोकांची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

युरोपात एचआयव्ही पॉझिटिव्ह पेशंटची सुश्रुषा करायला तिथल्या नर्सेस / वार्डबॉईज तयार नसतात म्हणून भारतातून भरभरुन भरती केली जाते असें जें आम्हीं ऐंकतों तें खरें असतें की गंगाधर पाष्ट्याच्यां दुकांनातल्या अस्सल बेळगांवी लोण्यासारखें पींठ मिसळलेलें?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माहिती नाही पण लेबर मिळत नसल्याने तुर्की व अन्य लगतच्या मुसलमानबहुल देशांतून दाबून लोकांची आयात केली जाते हे बाकी आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेबर = (तथाकथित) "खालच्या" दर्जाची श्रमप्रधान कामे का?

पाश्चात्य देशांत श्रमप्रतिष्ठा आहे असं ऐकलं होतं. ते युरोपपेक्षा अमेरिकेबाबत खरं आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस तीच कामे.

बाकी श्रमप्रतिष्ठा जरी असली तरी त्याचे पैशे किती पायजेत याबद्दलच्या आयड्या जर हायफायीकृत होत असतील तर प्राब्ळम येणारच ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उमेरिकेत शारिरीक श्रमाच्या/स्वच्छतेच्या कामांमध्ये काळे आणि मेक्सिकन प्रचंड प्रमाणात असतात असं काही उमेरिकन मित्रांकडून ऐकलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पुन्हा तेच बॅट्या. काहीतरीच फाटे फोडणे.

आत्ता ऑईल आहे म्हणुन वापरतायत भरपूर. तसेच स्वस्तात लेबर मिळतय म्हणुन वापरतायत. परीस्थिती बदलली की हे पण बदलेल.
१००-२०० वर्षापूर्वी युरोप मधे काय काळे/तपकीरी लेबर होते काय?
दिडशेवर्षापूर्वीची लंडन मेट्रोची भुयारे तिथल्या लोकांनीच खणुन काढली फारशी यंत्र सामुग्री नसताना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजिबात फाटे फोडत नाय. तुमचे म्हणणे बरोबरच आहे, मी त्याला दुजोराच देतोय. घरची महागाई + टंचाई अशा दोन गोष्टी आहेत, तुम्ही फक्त महागाईकडे लक्ष वेधलेत, मी टंचाईकडेही वेधले इतकेच काय ते. खुद्द इंग्लंडातही पूर्व युरोपियन्स अनेक येताहेत असे वाचले होते. (बिहारी ROFL )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अमेरिका, युरोप आणी ऑस्ट्रेलिया ह्यांनी जर बाहेरच्या लोकांना आत येउन दिले नाही ( कमीत कमी ह्या पुढे तरी ), तर त्यांच्या आहे त्या लोकसंख्येला व्यवस्थित जगता येइल.

पण मी काय म्हणतो, त्यातल्या हुशार आणि कर्तबगार माणसांना येऊ देण्यात काय हरकत आहे? त्यातून विकसित देशांचा फायदाच होईल ना?
सर्वसामान्य बॉटमलाईन इमिग्रेशनची गोष्ट वेगळी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मी काय म्हणतो, त्यातल्या हुशार आणि कर्तबगार माणसांना येऊ देण्यात काय हरकत आहे? त्यातून विकसित देशांचा फायदाच होईल ना?
सर्वसामान्य बॉटमलाईन इमिग्रेशनची गोष्ट वेगळी...

पिडा - पण प्रत्येक्षात काय होते आहे ते तुम्ही बघता आहातच ना. गेल्या ३० वर्षात युके मुसलमानांची लोकसंख्या ०.५% वरुन ५% झाली. वेम्ब्ली, साउथ हॉल, हॅरो वरुन नेटीव्ह गोरे आपली घरे विकुन पळुन गेले.
आणि सध्या आयटीच्या नावाखाली आमच्या सारखी लोकं येउन जाउन असतात ती काय हुशार आणि कर्तबगार आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मला आपलं वाटतं की त्या परिस्थीतीला युके आणि ईयु देशांचं गेल्या कित्येक दशकांचं नॉन-कॉकेशियन विरोधी इमिग्रेशन धोरण जबाबदार आहे.
अमेरिकेतही २०व्या शतकाच्या सुरवातीला असंच धोरण होतं पण १९५०च्या दशकापासून त्यांनी ते धोरण बदलून इतर देशातल्या हुशार आणि गुणी लोकांना (सफेद वा असफेद) कायमस्वरूपी इमिग्रेशन द्यायला सुरवात केली. आणि अमेरिकेला त्याचा अतोनात फायदा झाला आहे!
हां, आता अनस्किल्ड इमिग्रेशनबद्दल म्हणाल तर अमेरिकेला मी पूर्वी म्हंटल्याप्रमाणे तिचा मेक्सिकन प्रॉब्लेम आहे. आणि तो कॉम्प्लेक्स आहे. पण तो समाधानकारकरित्या सुटेपर्यंत अमेरिकेत इतर देशांतल्या तरी अनस्किल्ड आणि फॅमिली बेसड् इमिग्रेशनवर बंदी घालावी या विचाराला माझा पाठिंबा आहे!!
पण स्किल्ड इमिग्रेशन नेहमी चालूच ठेवावं, देशाला त्याचा फायदाच होतो.
तुम्ही युकेतल्या मुस्लिम इमिग्रंट्सचं उदाहरण दिलं आहे. पण यातलं स्किल्ड इमिग्रेशन फारसं नसावं. फॅमिली किंवा अन्य बेसड्च (सरसकट असायलम वगैरे) जास्त असावं. अन्यथा सरसकट घेटोज निर्माण झाले नसते...
तुम्हाला काय वाटतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत इतर देशांतल्या तरी अनस्किल्ड आणि फॅमिली बेसड् इमिग्रेशनवर बंदी घालावी या विचाराला माझा पाठिंबा आहे!!

एकदम सहमत. स्कील्ड ची व्याख्या पुन्हा तपासुन पहायची गरज आहे.

इतर देशातल्या हुशार आणि गुणी लोकांना (सफेद वा असफेद) कायमस्वरूपी इमिग्रेशन द्यायला सुरवात केली. आणि अमेरिकेला त्याचा अतोनात फायदा झाला आहे!

गुणी लोकांची व्याख्या पुन्हा करणे गरजेचे आहे. कमीत कमी आयटी मधुन जाणार्‍यांना स्कील्ड म्हणणे एकदा चेक केले पाहीजे.

तुम्ही युकेतल्या मुस्लिम इमिग्रंट्सचं उदाहरण दिलं आहे. पण यातलं स्किल्ड इमिग्रेशन फारसं नसावं. फॅमिली किंवा अन्य बेसड्च (सरसकट असायलम वगैरे) जास्त असावं. अन्यथा सरसकट घेटोज निर्माण झाले नसते...

फारच कमी स्किल्ड इम्मिग्रेशन. काही प्रमाणात बेकायदेशीर पण आहे.

तिचा मेक्सिकन प्रॉब्लेम आहे. आणि तो कॉम्प्लेक्स आहे.

हा प्रॉब्लेम त्या मेक्सीकन लोकांना मतदानाचा हक्क मिळाल्या मुळे कॉम्प्लेक्स झाला आहे. जसा भारतातल्या बांग्लादेशींचा.

अजुन एक उपाय म्हणजे सौदी सारखे, फक्त कामाला या आणि पैसे घेउन परत जा. नागरीकत्व वगैरे मिळणार नाही. असे काहीतरी केले तर दोन्ही बाजुने फायदेशीर राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विपुल नाईक सायबांचा हा blog-cum-informational resource - http://openborders.info/

इमिग्रंट्स च्या बाजूने युक्तिवाद करणारा. अर्थात विरोधकांचे म्हणणे न दुर्लक्षिता.

या ब्लॉग ला उद्देशून - प्रचंड, exhaustive, अभ्यासपूर्ण, दणकट, संशोधन-आधारित - अशी विशेषणे लावता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉलिड वाटलं खालचं आर्टिकल.
http://openborders.info/blog/tag/india/

.

विशेषतः-
When my peers express fears that their children may not return to India, I tell them that our children’s generation does not view moving between countries and settling in one country as against another as a major emotional decision. They choose their location based on multiple factors that include quality of life, type of jobs, convenience, and so on.

आणि

I had changed in small ways. For example, while watching a match of cricket, a sport passionately followed both in India and Pakistan, I cheered more often based on the quality of the game rather than the country playing. India’s performance in a match did not seem tied to my core identity. I no longer felt either “proud” or “ashamed” of being an Indian. My being Indian was just a fact of my life. There seemed no logical reason to believe that my country was better than others merely because I was born here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

( गब्बर, ही सगळी थियरी आहे. तुला तुझ्या आयव्होरी टॉवर मधून उतरून प्रॅक्टिकल, ग्रासरूट लेव्हल चे मुद्दे मांडावे लागतील. )

.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोक संख्या हा प्रॉब्लेम नसून कंझम्प्शन हा प्रॉब्लेम आहे. अमेरिकेची लोकसंख्या जगाच्या ५% आहे पण ते २५% रिसोर्सेस वापरतात. अमेरिकेचे (व इतर विकसित देशांचे) कन्झम्प्शन १/५ करण्याची गरज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण ते २५% रिसोर्सेस वापरतात. अमेरिकेचे (व इतर विकसित देशांचे) कन्झम्प्शन १/५ करण्याची गरज आहे.

अमेरिका व विकसित देश हे २५% रिसोर्सेस मोफत वापरतात का ? बळजबरीने वापरतात का ?

अमेरिका जगाच्या किती टक्के रिसोर्सेस प्रोड्युस करते ? ( की तुमच्या मते हा प्रश्न निरर्थक आहे ? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रोड्यूस? चुकून प्लन्डरच्या जागी प्रोड्यूस हा शब्द वापरलात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाऊ दे. सोडा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बळजबरीने नाही पण भरमसाठ वर्थलेस होऊ घातलेले डेट विकून आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर अनड्यू फेवरेबल ट्रेड डील्स करुन. लोकांना वेड्यात काढून ग्लोबल साऊथचे शोषण केलं जातंय वर्षानुवर्षे. अर्थातच तुम्हाला ते मान्य होणार नाही. संभाव्य आक्षेप: मग लोकांनी वेड्यात निघावं कशाला. Smile

सोडा याच्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलीकडे संभाव्य आक्षेपांची रेलचेल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी. प्रत्येक जण समोरच्याच्या मनातील ओळखूच लागलाय. म-न-क-व-डे झालेयत सर्वजण Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर.. सोडा कधीपासून रे? त्या दिवशी तर एक थेंब पाणीही ओतू देत नव्हतास की पेल्यात.

सौम्य झालास की काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ता समोर टेकिला आहे.

एक थेंब ही पाणी वा सोडा नाही घातला त्यात.

१००% ब्लू अगावे.

हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन
दिल के बहलाने के लिये "गालिब" ये खयाल अच्छा है

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मज्जा आहे राव.

आता पुढील ड्यूटीफ्रीची वाट पाहणे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक थेंब ही पाणी वा सोडा नाही घातला त्यात.

टेकिलात सोडा???

टेकिलात सोडा (किंवा फॉर्द्याट्म्याटर पाणी) तसेही कोण घालते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्गरिटा बनवायची नसल्यास प्रश्न रास्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी. तो प्रतिसाद लिहिताना मला चांगलीच चढलेली होती असे दिसतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ननिंशी सहमत आहे. जरी भले लोकसंख्या कमी झाली तरी मूठभर लोकांनी अचाट कन्झम्प्शन चालू ठेवलं तर काय कल्याण साधणार आहे? अमेरीकेत, युरोपात पर डोई उर्जेचे अचाट कन्झम्प्शन होते हे खरे आहे. (असे वाटते :D, विदा शोधते.) त्या मानाने आशिआई देशात पर डोई कन्झम्प्शन केमी असेलही पण लोकसंख्याच अचाट आहे.
.
अमेरीकेने/युरोपने उर्जाव्यय कमी केला पाहीजे अन आशिआई देशांनी पहीला लोखसंख्येवर ताबा आणला पाहीजे. एकमेकांकडे बोट दाखवून काय होणार? सगळेच खड्ड्यात जाणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अमेरिका व विकसित देश हे २५% रिसोर्सेस मोफत वापरतात का ? बळजबरीने वापरतात का ?

आत्ता आहेत म्हणुन ते वापरतायत. जेंव्हा संपतील किंवा खूप कमी होतील तेंव्हा अमेरीकेतील प्रजा अमेरिकेच्या नैसर्गीक स्त्रोतांच्या बळावर १९०० सालातले जीवन तरी जगु शकतील.

पण भारतात तेंव्हा काय होईल? १२० ( किंवा तेंव्हाचे १५० कोटी ) कोटी लोक कशी जगू शकतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच लाँगटर्ममधे बघायचं झालं तर भारत इज अ बेटर बेट.
=====================================================
शिवाय लोकसंख्येची फार चिंता करत सुटायची गरज नाही. अचानक करोडॉ लोक मरतील इ इ कधी होणार नाही. अशा राजकीय व्यवस्था आणि शिक्षित प्रजा आहे असं आरामात गृहित धरता येईल.
लोकसंख्या पिढींनुसार ट्रेंड दाखवेल. उत्पादने नि प्रजननाचा मेळ चुकला कि कोण्या पिढीला खडतर दिवस काढावे लागतील, इतकेच.
हेच पहा ना, पारतंत्र्यात आजीच्या पिढीला ७-८-१० लेकरे असत. आईच्या पिढीला ३-४-५. आमच्या १-२. समाज सहसा (wealth carried forward + NNP)/population हा रेशो सेम ठेवायचा प्रयत्न करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आजीच्या पिढीला ७-८-१० लेकरे असत. आईच्या पिढीला ३-४-५. आमच्या १-२.

पुन्हा तेच. आजची एक दोन तेव्हाच्या सात-आठ एवढं कंझम्प्शन करतात त्यामुळे संख्येने काहीही फरक पडत नाही.
लोकसंख्येचं पुढचं डबलिंग होणार नाही म्हणतात; म्हणजे आजच्या दीडपटच होईल तीस-पस्तीस वर्षात पण तेवढ्या लोकसंख्येच्या कंझम्प्शनसाठी (आता जितकं आहे सर्वसाधारण तितकंच धरल्यास) १२ मिलियन एकर जमीन दरवर्षी जास्तीची लागेल.
खाली तुम्ही फक्त कर्बऊर्जेचा प्रश्न आहे म्हणालात. प्रत्यक्षात जमीनच काय साध्या बांधकामासाठी लागणार्‍या वाळूचा प्रश्न आहे. नायट्रोजन व फॉस्फरस दोन्हीचे नैसर्गिक चक्र मोडून नायट्रोजन व फॉस्फरस रिसायकल न केल्याने त्याचीही टंचाई आहेत. बहुतेक फिशरीजचं "उत्पादन" कमी होतंय. दरवर्षी काही मिलियन एकर जमिनीचे वाळवंट होते.
एन्ट्रॉपी नावाची साधी कल्पना न कळल्याने मेंदू भलभलत्या गोष्टींवर विश्वास ठेवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोक संख्या हा प्रॉब्लेम नसून

ROFL

६/२२/२०१५ ता. क.: श्रेणीदात्या/ती ने आमची सही वाचूनदेखील धाडस करावं हे आश्चर्यास्पद! की काही लोकांना गर्दभश्रोणीतच आयुष्य व्यतीत करायची ओढ असते देव जाणे! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ननि लोकसंख्या अन कन्झम्प्शन दोन्ही १००% दोन्ही समस्या आहेत. एकीला वगळून चालणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचे, शुचे, बायो बालिस्टर का नाही झालीस? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचा संतुलितपणा झाला. दहा बिलीयन झाडे असूनही काही प्रॉब्लेम येत नाही मग दहा बिलीयन माणसांमुळे का यावा? कारण कंझम्प्शन.
कंझम्प्शन ॲडजस्टेड लोकसंख्या मोजल्यास अमेरिकेची लोकसंख्या दोन अब्ज आहे. म्हणूनच विकसित देशातले लोक फक्त ॲबसोल्यूट लोकसंख्येच्या नावाने गळे काढतात; पण कंझम्प्शनबद्दल चकार शब्दही काढत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय, पण लोकसंख्या वाढल्याने सोयीसुविधांवर ताण यायचा तो येतोच ना? आय मीन हरितक्रांती इ. क्रांत्यांची गरज भासलीच ना वाढत्या लोकसंख्येकरिता? त्यामुळे वाढती लोकसंख्या हाही प्रॉब्लेम आहेच - बाकी कंझम्प्शन वगैरेबद्दल अर्थातच सहमती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुड पॉईंट.
पण आपण ज्याला हरितक्रांती म्हणतो त्या एनपीके क्रांतीची "गरज" विकसित देशांना आधी का वाटली? त्यांची लोकसंख्या तेव्हाही आपल्यापेक्षा कमीच होती.
हरितक्रांतीमुळे अन्नाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात आपण सहभागी होऊ शकलो, नगदी पिके घेऊ शकलो.
कमी लोकसंख्येमुळे कंझम्प्शनचा प्रॉब्लेम लवकर होत नाही असे म्हणता येईल.
अजूनही अन्नाची २०-३०% नासाडी रोखली आणि लोकलाईज्ड अर्थव्यवस्था निर्माण करता आल्या तर यापेक्षाही जास्त लोकसंख्या आताइतक्याच (किंवा जास्त) आनंदात जगू शकते. कन्झम्प्शन शून्य करणे शक्य नाही हे खरे असल्याने प्रॉब्लेम कधी ना कधी होणारच पण लांबवता येईल.
सध्या फक्त प्रॉब्लेम "कुर्बानी देगा कौन" इतकाच आहे. त्यापायी युद्ध करायला तयार होतील कारण नॉन-निगोशिएबल वे ऑफ लाईफ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण आपण ज्याला हरितक्रांती म्हणतो त्या एनपीके क्रांतीची "गरज" विकसित देशांना आधी का वाटली? त्यांची लोकसंख्या तेव्हाही आपल्यापेक्षा कमीच होती.

वेल, आयॅम जस्ट थिंकिंग अलाऊड, पण सेरेंडिपिटी हे हाय यिल्ड बियाण्यांच्या शोधामागचे कारण बाजूल ठेवूनही लोकसंख्या लै वाढणार वगैरे बोंबाबोंब बहुधा झाली असावी असे वाटते.

अजूनही अन्नाची २०-३०% नासाडी रोखली आणि लोकलाईज्ड अर्थव्यवस्था निर्माण करता आल्या तर यापेक्षाही जास्त लोकसंख्या आताइतक्याच (किंवा जास्त) आनंदात जगू शकते. कन्झम्प्शन शून्य करणे शक्य नाही हे खरे असल्याने प्रॉब्लेम कधी ना कधी होणारच पण लांबवता येईल.
सध्या फक्त प्रॉब्लेम "कुर्बानी देगा कौन" इतकाच आहे. त्यापायी युद्ध करायला तयार होतील कारण नॉन-निगोशिएबल वे ऑफ लाईफ.

येस- अजूनही जास्त लोकसंख्येला पोसणे शक्य आहे खरे. पण निव्वळ जिवंत राहून चालत नाय ना. अजून घरे बांधा, सोयी पुरवा, लाईट, पाणी, घरे, सगळंच आलं त्यात. मग अजून ३ बीएचके, टेकडीफोड, झाडतोड, अजून गाड्या, मग रस्त्यांची तुंबण, पोल्यूशन, डिस्ट्रक्शन, एक ना दोन...शिवाय इतक्या तोंडांना नक्की कामे काय देणार हाही प्रश्न आहेच.

हे प्रश्न अगोदरच्यांनी कसे सोडवले इ. चा माझा अभ्यास नाही. मी हे ओव्हरलि बेसिक बोलत असेनही कदाचित. पण आत्ता आहे त्या परिस्थितीत अजून लोकसंख्या नक्को रे बाबा असेच वाटते.

(मला वाटून काय होणारे घंटा? तरी वाढीचा दर घटतो आहे ही एक चांगली गोष्ट आहे. तो दर हळूहळू शून्याकडे जाईल असे वाटते, लौकर गेला तर अजून बरे वाटेल इतकेच काय ते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकसंख्या नि अभिभोग या दोन्ही समस्या नाहीत. या दोन्ही संज्यांत स्वतःसाधी स्पर्धा पाहण्याची प्रवृत्ती आहे म्हणून दोन्ही संज्ञा प्रत्येकाला ऋणानुनिर्देशी वाटतात. पण तसं नसावं. एकतर लोकसंख्या हाच खुद्द प्रश्न नव्हे. लोकसंख्या समस्या आहे म्हणणं गर्दी आवडत नाही म्हणण्यापलिकडे महत्त्वाचं नाही. अभिभोग ही तर समस्या असूच शकत नाही. ते तर प्रत्येक मानवाचे, नि म्हणून एकत्रितरित्या मानवतेचे उद्दिष्टच आहे. तो जितका जास्त तितकं बरं.
मग समस्या काय आहे (मानवता अखंड राहिली पाहिजे नि बव्हंशी मानवाचे जीवन सुसह्य, सुखी असले पाहिजे असे मानून)?
१. स्रोत - लोक- उत्पादन - अभिभोग यांचं प्रमाण नियमित नसणे.
२. स्रोत - लोक- उत्पादन - अभिभोग यांचं वितरण नियमित नसणे.
३. स्रोतांच्या उपयोजनात, इ इ मानवी कृतींमुळे, काही पिढ्यांनी अखंडतेवर बेतेल असं काही होणे.
४. स्रोताच्या, अभिभोगाच्या नियोजनात कंजर्वेटीव अप्रोच नसणे.

स्रोत सिमित आणि अंत्य आहेत अशी धारणा असल्याने लोक, उत्पादन नि अभिभोग यांचेबद्दल आपण ॠण मते बनवतो. कर्बोदकोर्जा (उर्जा नव्हे) हा एक फ्रंट सोडला तर व्हिजीबल होरायझॉनवर लोकसंख्या आणि अभिभोग यांची चिंता करायची गरज नाही. म्हणजे व्यवस्थापनाची गरज आहे पण ते कमीच आहे किंवा जास्तच आहे म्हणून दुसरीकडे हाकत सुटण्याची गरज नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

So what if Greece leaves the European Union?

It cannot be said too often: There cannot be too many socialist smashups. The best of these punish reckless creditors whose lending enables socialists to live, for a while, off of other people’s money. The world, which owes much to ancient Athens’ legacy, including the idea of democracy, is indebted to today’s Athens for the reminder that reality does not respect a democracy’s delusions.

--------------

recycling च्या नावानं चांगभलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

recycling लेख आवडला. त्यांचं म्हणणं असं दिसतय की - रिसायकलिंग दिवसेंदिवस महाग होत चाललले आहे अन त्यामुळे तोट्यात जाणारे प्लांट्स शट डाऊन व्हायची शक्यता वाढली आहे. प्लस्टिक बाटल्या अधिकाधिक पातळ होत चालल्यात अन त्या रिसायकलिंग,मध्ये उडून वर येतात व अडथळा निर्माण करतात. (बहुतेक असच म्हणतायत Sad )
.
काच ही सर्वाधिक अवघड असते रिसायकल करायला. हे माहीत नव्हते. (मला वाटायचे प्लास्टिक सर्वात अवघड असेल). मुख्य म्हणजे ऑनलाइन शॉपिंगमुळे कार्ड्बोर्ड्स चा उपयोग प्रचंड वाढला आहे. अन लोक प्लास्टिक टेप काढत नाहीत की फोमचे साबुदाणे काढून कचर्‍यात फेकत नाहीत. हे सगळं च्या सगळं रिसायकल करतात अन त्यामुळे काही अडचणी येतात.
.
लेख पुनर्वाचनिय व शैक्षणिक (त्यातून काहीतरी शिकण्याजोगा) आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुनर्वापर करण्यासाठी फेकलेल्या गोष्टींच्या बाबतीत आता पुरेशी जागृती झालेली आहे त्यामुळे त्यात आता वस्तूंचं वर्गीकरण करण्याची सक्ती करावी, लोक ते ही करतील असं वाटतं. (या एकाच निळ्या डब्यामुळे काचा फोडण्याचा पुरेसा आनंद मिळत नाही.)

चार वर्षांपूर्वी नेदरलंड्समध्ये अपार्टमेंट, फ्लॅट्समध्ये राहणाऱ्यांसाठी बघितलेली पद्धत अशी की प्रत्येक रहिवाशाला एक (किंवा अधिक) कार्ड दिलेली होती. कचराकुंडीत कचरा टाकण्याआधी ते कार्ड वापरायचं, म्हणजे कचरापेटीचं दार उघडतं, आपला कचरा फेकायचं. तीच गोष्ट पुनर्वापरासाठी फेकण्याच्या गोष्टींची. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी निराळ्या पेट्या. कोण किती कचरा बाहेरच्या पेटीत टाकू शकतात यावर मर्यादा. त्यामुळे आपसूक फार जास्त पॅकेजिंग असणाऱ्या गोष्टी लोक विकत घेत नाहीत, त्यामुळे त्या कोणी विकत नाहीत. तिथे ज्या मित्रांकडे गेले होते त्यांच्या मते लोक या व्यवस्थेबद्दल फार तक्रार करत नाहीत.

अॅमेझॉनवरून जी काही मर्यादित खरेदी केली आहे त्यात अॅमेझॉन स्वतः विकतं त्या उत्पादनांच्या पॅकिंगमध्ये स्टायरोफोम किंवा त्याचेस साबुदाण्यांच्या जागी फुगवलेलं प्लास्टिक वापरलेलं होतं. ते फोडायचा आनंदही मिळतो आणि पुनर्वापरासाठी वाण्याच्या दुकानाबाहेरच्या डब्यांमध्ये ते फेकता येतं.

(अवांतर माहिती - आमच्या शहरात, ऑस्टिनमध्ये कंपोस्टर विकत घेण्यासाठी ७५ डॉलरांपर्यंत मदत मिळते. तो अर्ज ऑनलाईन पाठवायची सोय आहे, पण त्यासाठी एक कागद प्रिंट करावाच लागला. पैसे अजून मिळालेले नाहीत, पण अर्ज मिळाल्याचं इमेल चार दिवसांत आलं. महानगरपालिकेकडून इतपत सेवा म्हणजे फारच झालं म्हणायचं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद मस्त आहे. होय अ‍ॅमेझॉन प्लास्टिकचे फुगीर ट्रान्स्परन्ट पाऊचेस चे पॅडींग वापरते.
नेदरलँडची व्यवस्था छानच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युरोपच्या कर्जबाजारीपणावर ब्लुमबर्गने ही ग्राफिकल फिल्म (१२ मिनिटाची) बनवली होती. ज्यांना हा प्रश्न नेमका काय आहे हे माहीत नाही. त्यांना ही छोटेखानी फिल्म आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी च्या आवडीचा विषय

http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.thehindubusinessline.com/multimedia/dynamic/02449/bl25_well_b...

भारत आणि चीनच्या वेल बिईंगमधला फरक खूपच मोठा वाटतोय. हा रिपोर्ट 2014चा आहे. मात्र सर्वे 'अच्छे दिन' येण्यापूर्वीचा आहे की नाही याविषयी कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टीआयएफआरमधले खगोलशास्त्रज्ञ मयंक वाहीया यांनी पुराणातली वांगी पुराणातच ठेवणं फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे.
Top TIFR Scientist Warns: ‘In extreme claims of fringe elements, Indians stand to lose the most’

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वक्ता बघता, ब्राह्मणाने मिडिओकर धंदा कसा करावा आणि राजकारण कसे करु नये हा सल्ला उचित ठरला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयला भारीये! Smile
पण ठाकरे सीकेपी ना? की ब्राह्मण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजोबा* ठाकरे तरी सीकेपी होते

*केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Smile धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण अमेरिकेत समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. या पूर्वी ३६ राज्यांतच कायदेशीर मान्यता होती.
'दि गार्डियन' मधली बातमी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोझेसच्या "दहा आज्ञांपैकी "सहावी -मनुष्याने मनुष्याशी अथवा प्राण्याशी----करू नये. याचा अर्थ दोन हजार वर्षांपासून ही प्रथा चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी. सनातन्यांचे प्रथा प्रेम संपेल तर शपथ.

अवांतर - आमच्या एका मित्राने खालील लिस्ट आम्हाला दिली आणि त्यातून "तुला हवा तो अर्थ काढ" असे सांगितले -

याकूब - जेकब
इब्राहीम - अ‍ॅब्राहम
दाऊद - डेव्हिड
युसुफ - जोसेफ
इसाक - आयझॅक
युनूस - जोनाह
मूसा - मोझेस
युनूस - यानीस / युनीस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण यात पुनाओकीय डोके लावायची वट्ट गरज नाही गब्बरशेट. ज्यू-ख्रिश्चन-मुसलमान या तिघांचाही 'प्राचीन' सांस्कॄतिक ठेवा एकच आहे हे तर अतिशय वेल नोन सत्य आहे.

सुलेमान-सॉलोमन, मेरी-मरियम, डॅनियल-दानियाल, ईसा-येसुस-जीजस, शालोम-सलाम, अशा अनेकानेक जोड्या सांगता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह येस.

म्हणून तर जेरुसलेम साठी दोन्ही बाजू भांडतात ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंडीड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तर एका मुसलमानाने.....

मोझेस (मूसा) आणि येशू(ईसा) यांनीसुद्धा कुराणातलाच संदेश सांगितला होता. पणा लोकांना तो समजला नाही म्हणून महंम्मदाने येऊन ते नीटपणे आणि फायनल सांगितले

असं सांगितलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुसलमान या दोघांनाही प्रॉफेट म्हणून मानतात- फक्त महंमदानंतर कुणी प्रॉफेट होऊ शकत नाही असे मानतात. हे स्वतः महंमदाचे वक्तव्य म्हणून ग्रथित आहे की अजून कुणी लिहिलेय ते तपासायला हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नमाजात जे म्हटल जातं 'ला इलाही इल्ललाह महंमद उल रसूल...' त्याचा अर्थ हा आहे की एकच अल्लाह आहे आणि महंमद हा त्याच्या शेवटचा मेसेंजर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणि
आदम-अ‍ॅडाम
अह्वा (हव्वा)-ईव
मारिया-मरियम-मेरी
आणि युसुफ्=ईसॉप सुद्धा (इसापाच्या गोष्टी)

(येशु म्हणजे मात्र ईशच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(येशु म्हणजे मात्र ईशच.)

राही ओक? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ट्युनिशिया हल्ल्यात सदतीस ठारः http://www.bbc.com/news/world-africa-33287978
फ्रान्स मध्ये एकाची मस्तक धडावेगळे करून हत्या: http://www.bbc.com/news/world-europe-33284937
शिया मशीदीत बॉम्बस्फोटात सत्तावीस ठारः http://www.bbc.com/news/world-middle-east-33287136

पुढचा नंबर भारताचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला असं म्हणायचं होतं की हे युअरोपिअन आणि भुमध्य समुद्राच्या आजुबाजुच्या देशांत थोडेअधिक वंशपरंपरेने (genetics) अथवा त्यांच्या वाइन ,सुका मेवा वगैरे खाण्याच्या पद्धतीमुळे असेल समलिंगी/परलिंगी कामेच्छा असण्याचं प्रमाण अधिक असावे.ते असल्याने अथवा अतिरेक होत असल्याने अशी एक आज्ञा अंतर्भूत करावी लागली असेल. एक हजार एक सुरस गोष्टींत लौंडा चे वर्णन आहे.खुश वंत सिंगच्या Delhi मध्येही हिजडा कथा आहे.या काही लैंगिक आकर्षणाच्या विकृती आणि विविधता आहेत त्या तिकडे पुर्वीपासूनच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुका मेवा? लोल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अनेक कोटिशक्यता आहेत त्यात ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0