संस्कृती

"बेटर कॉल सॉल"ची सांगता

...तर अशा प्रकारे सॉल गुडमनने निरोप दिला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मातीचे घरटे

काळ्या चिमण्यांच्या जोडीनं गॅलरीत लाईटच्या बोर्डावर छानसे मातीचा घरटं बनवले आहे. मी मातीचे घरटे पहिल्यांदाच पाहिलं. आता अंडे पण आहेत बहुतेक कारण गॅलरीत जायची चोरी झालीय कारण डोक्यावर चिवचिव करून घिरट्या घालतात. कोणत्या चिमण्या मातीचे घरटे बनवतात? माहिती असल्यास सांगावे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अजात : अरविंद जोशी

आज अतिशय जबरदस्त अशी डॉक्युमेंटरी पाहिली.

कॉपी पेस्ट ओळख :

१९३० च्या दशकात, वारकरी संप्रदायातील गणपती उर्फ हरी महाराज भभुतकर (जन्म १८८५-मृत्यू १९४४, रा. मंगरूळ दस्तगीर, जिल्हा अमरावती) यांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या जाती सोडायला लावल्या.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे अनुयायी जातीच्या रकान्यात "अजात" लिहू लागले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)

२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.

नपेक्षा

अशोक शहाणे ह्यांचा कुठेतरी उल्लेख वाचून त्यांच्या "आजकालच्या (म्हणजे १९६०सालच्या) मराठी वाड्मयावर क्ष किरण" अशा चमत्कारिक आणि म्हणूनच लक्षात राहिलेल्या लेखाबद्दल कुतूहल निर्माण झालं. "नपेक्षा" ह्या पुस्तकात हा लेख असल्याचे समजल्याने ते पुस्तक मागवलं होतं.

पुस्तकाची पहिली ६ पानं वाचून चूक केली असं वाटून ते पुस्तक पुन्हा उघडलंही नव्हतं.
आज अचानक पुन्हा ते पुस्तक हाती लागलं आणि मागून सुरुवात केली.
संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्यात बरंच काही आहे हे जाणवलं, आणि पुन्हा वाचलं. थोडासा गोंधळलो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ऐसी अक्षरे - २०२० दिवाळी अंकासाठी आवाहन

दोन गुपितं आहेत. पहिलं गुपित आहे, ‘ऐसी’वर ह्या वर्षी दिवाळी अंक निघणार आहे. आणि दुसरं… ओळखा पाहू ह्या वर्षाच्या दिवाळी अंकाची संकल्पना काय असणार आहे?

संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या, जग हादरवून टाकलेल्या करोना विषाणू आणि कोव्हिड-१९चा परिणाम ‘ऐसी’च्या दिवाळी अंकावर न दिसणं शक्य नव्हतं. २०२०च्या दिवाळी अंकाची संकल्पना आहे - संसर्ग किंवा Contagion.

Taxonomy upgrade extras: 

सांस्कृती आणि योगिराज

सांस्कृती - हा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे. त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभिली. श्रीदत्तात्रेयांनी
त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली. शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दर्शन दिले. त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देण्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की अवधूतांची स्थिती, लक्षणे

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कार्तवीर्य सहस्त्रार्जुन

कार्तवीर्य सहस्रार्जुन - कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजाहोता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधून च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शीलधारा ही याज्ञवल्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आयुराजा आणि पुरूरवा

आयुराजा - नहुष हा सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा होता. त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्री दत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्री दत्तात्रेय शीर्षासन अवस्थेत बसलेले दिसले. अशा स्थितीत पाहून आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

यदुराजा

काळाचा प्रवाह अखंड वाहतो. नवनवीन घटना व व्यक्तिमत्त्वे जन्म घेत असतात व भूतकाळात गडप होत असतात. प्रत्येकाचे रूप, रंग, दैव, पराक्रम, कर्म वगैरे वेगवेगळे. पण काळाच्या या ओघात काहींचा ठसा दीर्घकाळ टिकून राहतो तर कित्येक विस्मृतीत जातात. वस्तुतः जगाच्या रंगमंचावरील या नाट्यात भूमिका कितीही छोटी वा मोठी असो पण आपल्या गुणांना कलाटणी देण्याची संधी सर्वांनाच असते. पौराणिक काळापासून अर्वाचीन काळापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घटनांमधे छोटी व्यक्तिमत्वे मोठा प्रभाव टाकून गेली तर मोठी व्यक्तिमत्त्वे झाकोळली गेली. अनेक जण लक्षात राहिले पण अपुरी ओळख ठेवून!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - संस्कृती