सूचना

अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल. तसदीबद्दल क्षमस्व.

समाज

पत्नीवर बळजबरी हाही ठरू शकतो बलात्कार

पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी संभोग करणे हासुद्धा न्यायालयांकडून नजिकच्या भविष्यकाळात ‘बलात्कारा’चा गुन्हा ठरविला जाण्याच्या शक्यतेवर सध्या कायद्याच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. गर्भपात कायद्याच्या संदर्भात तरी पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला संभोग ‘बलात्कार’ मानला जावा, हा सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेला निकाल त्यादृष्टीने पडलेले आशादायक पाऊल ठरू शकेल, असे कायदेतज्ज्ञांना वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

हायकोर्टानेच बुडविला १४ कोटींचा कर!

देशातील सर्वात जुन्या तीन हायकोटा्रंपैकी एक असलेल्या मद्रास हायकोर्टाच्या प्रशासनाने न्यायालयातील न्यायाधीश, अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पगारातून व्यवसाय कराची रक्कम कापून न घेऊन गेल्या २४ वर्षांत तमिळनाडू सरकारचा १४ कोटी ३५ लाख ८० हजार रुपयांचा महसूल बुडविला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सुपीम कोर्टाचा सूर्य अखेर उगवणार!

ज्यात राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे किंवा संविधानाच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे आहेत अशा प्रकरणांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठांपुढे (Constitution Bench) होणार्‍या सुनावणीचे `लाईव्ह स्ट्रीमिंग` येत्या मंगळवारपासून (२७ सप्टेंबर) `यूट्यूब`वर केले जाणार आहे. त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचा सूर्य चार वर्षांच्या विलंबाने व मिणमिणत्या स्वरूपात का होईना उगवणार आहे, असेच म्हणावे लागेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

नव्या शंकराचार्यांच्या नियुक्तीने वाद

उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील ज्योतिर्मठ आणि गुजरातमधील व्दारका येथील शारदापीठ या सनातन हिंदू धर्माच्या दोन धर्मपीठांचे पीठाधीश्वर म्हणून जाहीर करण्यात आलेल्या नव्या शंकराचार्यांच्या नियुक्त्यांवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

होऊनही न झालेल्या लग्नाचे गूढ!

पुण्यातील एका इसमाने २७ वर्षांपूर्वी केलेल्या परंतू कायद्याच्या दृष्टीने सिद्ध होवू न शकलेल्या पहिल्या लग्नाचे गूढ कथानक आज मी सांगणार आहे. पहिल्या लग्नाची पत्नी हयात असूनही आणि तिला रीतसर घटस्फोट न देता आणखी एका स्त्रीशी फसवणुकीने विवाह करणे हे भारतीय दंड विधांनाच्या (Indian Penal Code) ४९४ व ४९५ या कलमान्वये गुन्हे आहेत. त्यासाठी अनुक्रमे सात आणि १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. या गुन्ह्यांसाठी या इसमाविरुद्ध दाखल केल्या गेलेल्या खटल्याने या कथानकाची सुरुवात होते आणि अपिलात हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडण्यात सांगता होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

रेल्वे: सरकारमान्य मृत्यूचा सापळा!

भारतात प्रवासी आणि मालाची रेल्वेने वाहतूक करण्याचे मक्तेदारी अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. सरकारनेच १९८९ मध्ये केलेल्या रेल्वे कायद्यात प्रवासी आणि मालाची सुरक्षित वाहतूक कशी केली जाईल याची कायदेशीर चौकट ठरवून सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी स्वत: स्वीकारली आहे. मात्र भारतात धावणारी प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडी या चौकटीचे उल्लंघन करून चालविली जात असल्याने भारतीय रेल्वे हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा आहे, असेच म्हणावे लागेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पासधारकांचे हजारो कोटी रेल्वेने ‘लाटले’

कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्र्णपणे बंद केल्याने देशभरातील लाखो पासधारकांना त्यांच्या पासाच्या शिल्लक असलेल्या कालावधीत त्या पासावर प्रवास करता आला नाही. पासाच्या या उवर्रित कालावधीसाठी आगाऊ घेतलेली रक्कम परत न करून भारतीय रेल्वेने या पासधारकांचे काही हजार कोटी रुपये अप्रमाणिकपणे लाटले आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

न्यायाल़यीन निकालांच्या वैधतेचे निकष

दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालय जो निकाल देते त्यास निकालपत्र (Judgement) असे म्हटले जाते. न्यायालयाने निकाल देणे हा न्यायालयीन निर्णयप्रक्रियेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा असतो. निकालपत्र हे संबंधित प्रकरणाविषयी न्यायालयाने व्यक्त केलेले निश्चित आणि अपरिवर्तनीय असे मत असते.
- निकालपत्राने पक्षकारांचे हक्क आणि अधिकार ठरतात. खास करून फौजदारी प्रकरणातील निकाल आरोपीच्या स्वातंत्र्याचा फैसला करणारा असतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कायद्याचा असाही गोरखधंदा!

एका जनहित याचिकेच्या रूपाने एक महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे आला होता. संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांच्या मूळ व असली संहिता (original Bare Acts) नागरिकांना अल्पदराने पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाव्यात, असा तो विषय होता. न्यायालयाने यावर सरकारला नोटीस काढली. पण अजून निर्णय झालेला नाही. हा विषय जेवढा सरकारला तेवढाच न्यायालयांनाही लागू होतो, हे येथे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या याचिकेवर खर तर सरकारला आदेश देताना न्यायालयास स्वतःलाही त्याचे पालन करावे लागेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भारतीय शिक्षा बोर्ड

1835 पूर्वी देशात 6 लाख गुरुकुल होते. विद्यार्थी गुरुकुलांत सुरवातीच्या पाच-सहा वर्ष स्थानिक भाषा, गणित इत्यादीचे जीवनावश्यक ज्ञान अर्जित करायचे। सामान्य शिक्षण पूर्ण झाल्यावर अधिकान्श विद्यार्थी गुरूंकडून पारंपरिक पेशेवर ज्ञान प्राप्तकरून आत्मनिर्भर होत असे. उरलेले हुशार विद्यार्थी गणित, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, तलाव निर्मितीचे शास्त्र, वैद्यक शास्त्र, विज्ञान, संस्कृत भाषा, व्याकरण, दर्शन, वेद उपनिषद इत्यादि विषय शिकायचे. परिणामी शिक्षित बेरोजगारी हा शब्द अस्तित्वात नव्हता. या शिवाय 1850च्या पूर्वी जगात सर्वात जास्त साक्षर लोक आपल्या देशात होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - समाज