सामाजिक

मॉडर्निटी आणि कचरा

सध्या फ्रान्समध्ये चाललेल्या गडबडीच्या निमित्ताने काहीबाही वाचनात आले. वाचता वाचता सगळ्याच प्रकाराची जरा गंमत वाटू लागली. त्याबद्दल एक टिपण.

पत्नीवर बळजबरी हाही ठरू शकतो बलात्कार

पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी संभोग करणे हासुद्धा न्यायालयांकडून नजिकच्या भविष्यकाळात ‘बलात्कारा’चा गुन्हा ठरविला जाण्याच्या शक्यतेवर सध्या कायद्याच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. गर्भपात कायद्याच्या संदर्भात तरी पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला संभोग ‘बलात्कार’ मानला जावा, हा सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेला निकाल त्यादृष्टीने पडलेले आशादायक पाऊल ठरू शकेल, असे कायदेतज्ज्ञांना वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

विचार कोणता असावा

आतापर्यंत या स्थळावर तसेच इतर अनेक स्थळांवर इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम हा विषय चघळून चघळून बाद झाला असावा. माझा प्रश्न इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम नाही. प्रश्न असा -
ज्यांनी ज्यांनी गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या, त्यातील काही जण मराठी माध्यमात शिकलेले होते. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो तिलाच मदत देऊन मोठी करण्याचा विचार केला असता तर सुयोग्य झाले असते. त्या ऐवजी इंग्रजी माध्यमातील शाळ सुरु करावी, असा विचार का आला असावा ?
खाली काही पर्याय देतो. त्यातील तुमच्या दृष्टीने योग्य पर्याय कोणते वाटतात ?
1. काहीतरी नवे करण्याची इच्छा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अफवा आवडे सर्वांना!

जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या कोरोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक सर्व राष्ट्रे भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी सर्व पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

दानिश सिद्दिकी

दानिश सिद्दिकी हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. तो जे काम करत होता ते अतिशय आव्हानात्मक होतं. छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांची आदरांजली.

स्पिन डॉक्टर्सची चलती!

(Spin doctor या इंग्रजी शब्दातील नेमका आशय ध्वनित करणारा मराठीत समानार्थी शब्द न सापडल्यामुळे संपूर्ण लेखात इंग्रजी शब्दच वापरला आहे.)
p1

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

लस दिल्यानंतर शरीरात काय व्हायला हवं? लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का? हर्ड इम्युनिटी कधी येईल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर

लसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच लसींची उद्दिष्टे आहेत. लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य कोव्हिड-१९ होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने

महाराष्ट्रात कोरोना महासाथीचा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कहर चालू होता. ऑक्टोबरपासून हळू हळू सगळं ओसरत चाललं होतं . डिसेंबर अखेरीला दररोज नवीन बाधित रोग्यांची संख्या आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत होतं.

जानेवारीत सार्वत्रिक लसीकरणाची सुरुवात झाली आणि महासाथीच्यासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता महासाथ पुन्हा जोराने उसळून आलेली दिसते.

पुण्यात तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात फक्त दीडशे-दोनशे नवीन बाधित असत. आज चार पाच आठवड्यांच्या नंतर हाच आकडा हळू हळू वाढून दीडशेवरून ४५००च्या घरात गेला आहे.

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा

लसविषयक माहितीचा महापूर जरी सध्या आला असला तरी समाजात / लोकांच्या मनात अजूनही अनेक किंतु-परंतु आहेत. त्यांपैकी काहींचा परामर्ष घेत आहेत अवधूत बापट आणि मिलिंद पदकी.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक