जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण

नमस्कार!

आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते. जागतिक तापमानवाढीच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची आम्हांला विशेष काळजी वाटते.

एक देश म्हणून भारताची या हवामानविषयक बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. एकीकडे आपण जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या हवामानबदलाच्या गंभीर परिणामांना तोंड देतोय आणि त्याचवेळी दुसरीकडे आपण लोकसंख्येमुळे प्रदूषण करणाऱ्या सर्वांत मोठ्या देशांपैकी एक आहोत. जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि या समस्येला सामोरे जाण्याच्या विविध मार्गांबद्दल आपण काय विचार करतो याबद्दल आम्हांला उत्सुकता आहे. म्हणून हे सर्वेक्षण. तसेच आम्हाला किंवा भारतातील हवामान बदल क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही लोकांना प्रभावी धोरण ठरवण्यात याचा उपयोग होईल. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) इथेच जाहीर केले जातील.

हे सर्वेक्षण पूर्ण भरण्यासाठी अंदाजे ५-१० मिनिटे लागतील. हे पूर्णपणे निनावी सर्वेक्षण आहे. ह्या सर्वेक्षणातल्या माहितीचा कुठल्याही प्रकारे व्यावसायिक वापर होणार नाही. तुम्हाला पुढील तपशीलवार सर्वेक्षणात भाग घ्यायचा असेल किंवा आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही तुमचा ईमेल शेवटच्या पर्यायी प्रश्नात देऊ शकता.

या दुव्याचा वापर करून तुम्ही सर्वेक्षणात भाग घेवू शकता. आपल्या ओळखीच्या भारतीयांना याचा दुवा पाठवा अशी विनंती. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल.

धन्यवाद.
दिप्ती आणि संहिता

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्वेक्षणासाठी शुभेच्छा. पण भारतीय नसल्यामुळे पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

हेच लिहायला आलो होतो.

बाकी, सर्वेक्षणाचे उद्दिष्ट्य स्तुत्य आहे, तथा, सर्वेक्षणाचे एकंदर स्वरूप आणि त्यामागील कारणमीमांसा लक्षात घेता, सर्वेक्षणातील सहभागाकरिता याच एका विशिष्ट डेमोग्राफिकास का लक्ष्य करण्यात आलेले आहे, हेही समजण्यासारखे आहे. परंतु, याच नेमक्या कारणास्तव, हा विशिष्ट मंच या सर्वेक्षणाच्या वितरणाकरिता कितपत उपयुक्त आहे, याबद्दल शंका वाटते.

कसे आहे, की, या मंचावरील सक्रिय सदस्यांत अनिवासी भारतीय/भारतात निवासी नसलेले भारतवंशीय परंतु भारतीयेतर नागरिक/भारताशी अथवा (निवासी) भारतीयांशी रोजच्या पातळीवर ज्यांचा (आलाच, तर) आत्यंतिक मिनिमल संबंध आणि/किंवा संपर्क येतो, अशी मंडळी, अशा लोकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. त्यामुळे, या मंडळींकडून तुम्हाला सर्वेक्षणाकरिता सहानुभूती तथा शुभेच्छा मिळू शकतीलही, परंतु, सर्वेक्षणातील प्रत्यक्ष सहभागाच्या दृष्टीने त्यांचा उपयोग हा साधारणतः प्रस्तुत निवेदन हे त्रिनिदाद सनातनधर्म महासभा अथवा मॉरिशस (किंवा कराची) महाराष्ट्र मंडळ यांच्या संकेतस्थळावर डकविण्याइतकाच मर्यादित आहे, असा माझा अंदाज आहे. (चूभूद्याघ्या.)

अर्थात, याचा अर्थ असा निश्चितच नव्हे, की प्रस्तुत मंचावरून प्रस्तुत सर्वेक्षण वितरित करू नये. अवश्य करावे. प्रस्तुत मंचावर जे निवासी भारतीय सदस्य आहेत, त्यांच्याकडून (अथवा त्यांच्या निवासी भारतीय परिचितांकडून) सर्वेक्षणास प्रतिसाद अर्थात येऊ शकतोच. सांगण्याचे उद्दिष्ट एवढेच, की सर्वेक्षणाच्या वितरणाकरिता केवळ प्रस्तुत मंचावर अवलंबून राहू नये; इतरही मंचांवरून प्रस्तुत सर्वेक्षण वितरित करण्याचा विचार अवश्य करावा. (त्याव्यतिरिक्त, सांगोवांगीच्या (वर्ड ऑफ माउथ) प्रसारास मर्यादा आहेत, असेही सुचवू इच्छितो.)

सरतेशेवटी, भारतीय नसल्याकारणाने प्रस्तुत सर्वेक्षणात सहभागी होण्यास असमर्थ आहे (किंवा, तरीही दडपून सहभागी झाल्यास, सर्वेक्षणाच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने ते उपयुक्त तर ठरणार नाहीच; किंबहुना, counterproductive ठरेल), याबद्दल दिलगिरी व्यक्त करू इच्छितो, तथा, सर्वेक्षणाकरिता पुनरेकवार शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो.

—————————

अवांतर: होय, ‘कराची महाराष्ट्र मंडळ’ असेही एक जनावर१अ आजमितीस कराचीत अस्तित्वात आहे, नि त्याद्वारे कराचीतील अल्पसंख्याक मराठीभाषक हिंदू पाकिस्तानी नागरिक आजही गणेशोत्सव साजरा करतात, असे वाचनात आहे. (त्यांचे फेसबुकपानही असावे बहुधा. (चूभूद्याघ्या.))

१अ अमेरिकन बोलीतील ‘there is, indeed, such an animal’च्या स्वैर मराठी अनुवादाचा प्रयत्न. ‘Secretary of State’चा अनुवाद ‘राज्यसचिव’ असा करणाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन.१अ१

१अ१ अतिअवांतर: पुढेमागे कधीतरी, संधी मिळाल्यास, ‘fast food’चा स्वैर मराठी अनुवाद ‘उपासाचे खाणे’ असा जाहीररीत्या करण्याचा मानसही या निमित्ताने आजच नोंदवून ठेवतो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वेक्षणाच्या वितरणाकरिता केवळ प्रस्तुत मंचावर अवलंबून राहू नये हा मुद्दा आम्ही(संहिताने खर तर) विचारात घेतला आहे . मायबोली ह्या संकेतस्थळावर पण सर्वेक्षण वितरित केले आहे. मिसळपाव वरही वितरीत करण्याचा विचार होता पण त्या संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे करता आले नाही, कुणी तिकडे active असेल तर जरूर पोस्ट करा. शुभेच्छांसाठी जयदीप आणि नबा दोघानाही धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणी तिकडे active असेल तर जरूर पोस्ट करा.

केला - https://misalpav.com/node/52006
तुम्हाला काय समस्या आली? असो. होपफुली तिथल्या मंडळींच्या प्रश्णाना / चौकशाना उत्तरं देऊ शकाल. त्याच्यासाठीसुद्धा मी पोष्टमनगिरी करणं अपेक्षित असेल तर थिस इस मात्र टू मच हां !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मिसळपाववर पोस्ट टाकल्याबद्दल आभार. माझे खाते तिकडे register होत नाहीय. तुम्ही पोष्टमनगिरी करणं अपेक्षित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईथे - १ सर्व्हे भरला, २०+ अवांतर टिप्पण्ण्या
मिसळपाव - १ सर्व्हे भरला, ८+ अवांतर (बऱ्याचशा झणझणीत) टिप्पण्ण्या
मायबोली - १३ सर्व्हे भरला, ४ शुभेच्छा.

तस्मात, सर्व्हे घ्यावा तर मायबोलीवरच !!

सर्व्हे पाठवणाऱ्या मंडळीना कुठे त्याबद्दल माहीती मिळाली हे जाणण्याची उत्सुकता आहे. हू नोज, ईथल्या / मिसळपाववरच्या मंडळीनी न बोलता सर्व्हे भरलाही असेल. या सर्व्हेबद्दल सर्व्हे रंजक ठरेल! असो. अवांतर आवरतं घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मार्मिक, आणि नेमके!

या सर्व्हेबद्दल सर्व्हे रंजक ठरेल!

अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आता मागे फिरायचे सर्व रस्ते बंद झाले आहेत.
एकमेव मार्ग आहे तापमानवाढ कमी करण्याचा.
पृथ्वी वर इंधन ज्वलन झीरो..
कोणतेच खनिज पृथ्वी वरून वापरणे पूर्ण बंद.

ऊर्जा निर्मिती पृथ्वी वर करायचीच नाही.

पृथ्वी च्या कक्षे बाहेर आसमंतात ऊर्जा निर्मिती करायची.
आणि त्या ऊर्जा निर्मिती साठी पृथ्वी वरील कोणतेच खनिज वापरायचे नाही.
बाकी ग्रह,उपग्रह ह्या वरील वापरायचे.

खनिज तेल,कोळसा, अशा प्रकारची इंधन पूर्ण बंद.

ह्या व्यतिरिक्त कोणताच उपाय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालक,

नाही म्हणजे, प्रस्तुत संकेतस्थळावरून आपण मनाला येतील तसे प्रतिसाद देण्यास माझा आक्षेप अर्थातच नाही. (हा गुन्हा – म्हणजे, हा जर गुन्हा असेल, तर – मीही करीत आलेलो आहेच, आणि जगाच्या अंतापर्यंत अथवा माझ्या अंतापर्यंत (whichever comes first) अर्थात करीतच राहीन. त्यामुळे, तुमच्याबद्दल हा आक्षेप मी घेऊ शकतही नाही, घेऊ इच्छीतही नाही, आणि घेतही नाही.)

मात्र, एक विनंती आहे. या एका वेळेपुरते (just for this once), मनाला येईल तसा प्रतिसाद देण्याबरोबरच, कृपया प्रस्तुत सर्वेक्षणात सहभाग घेऊ शकाल काय? तसे केल्यास कदाचित ते प्रस्तुत सर्वेक्षकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल.

(दुर्दैवाने, प्रस्तुत सर्वेक्षणात मी स्वत: सहभागी होऊ शकत नाही. त्यामागील कारणमीमांसा मी अन्यत्र व्यक्त केलेली आहेच. मात्र, आपण निवासी भारतीय असल्याकारणाने, आपल्याला अशी अडचण (बहुधा) नसावी. (चूभूद्याघ्या.))

(आपण या सर्वेक्षणात याअगोदरच सहभागी झालेले असल्यास प्रस्तुत विनंती कृपया रद्द समजावी.)

आगाऊ आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@राजेश हे तुमचे प्रामाणिक मत असेल तर सर्वेक्षणात जरूर मांडा. वर लिहिले आहेच परत एकदा - जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम. आणि तुमच्या मताबद्दल आणि उपायाबद्दल (व्यवहार्यता, शक्यता इ.) चर्चा झाली पाहिजे पण ती सर्वेक्षणा नंतर करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठवलं.

सर्वेक्षण पाठवलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही पण लवकर डेटा सायन्स शिकून घ्या. नाहीतर काही दिवसांनी बाटल्या प्लास्टिक कचरा वगैरे गोळा करावे लागेल. (अर्थात ते पर्यावरणाला मदतच करणार आहे म्हणा). या संहिता जोशी अमेरिकेत बसून योग्य वेळेस त्यांचे क्षेत्र सोडून डेटा सायन्स वगैरे करतील, काही दिवसांनी AI मध्येपण काम करतील. आणि फावल्या वेळात जगाच्या कल्याणाच्या चर्चा करत बसतात. तुम्ही सुद्धा त्याच माळेतले आहात. तुम्ही लोक एग्जॉटिक गोष्ट म्हणून ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती खाता. बहुतांश भारतीय मात्र नाक, कान, दाबून, चेहरा झाकून गटार, नाले, खड्डे, चुकवत भाजी आणायला जातात. त्यांना रोजचे पाच हजार प्रश्न सतावत असतात, तुमची पर्यावरणाची किरकिर ठेवा बाजूला. काहीतरी लुटूपुटूची सर्वेक्षणे करुन तुम्ही परदेशी विद्यापीठांमध्ये पेपरे लिहिणार आणि तुमचा खुट्टा बळकट करणार. पर्यावरणाची चिंता वगैरे असतील, पण आधी आम्ही टायमपास करत आहोत हे प्रांजळपणे कबुल करा. सीरियस करणार असाल त्याचे कुठे कूल पॉइंट्स मिळणार आहेत हेही आधी सांगून टाका. (नागरिकत्व वगैरे मिळवण्यासाठी).

आले सर्वेक्षण करायला.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

बहुतांश भारतीय मात्र नाक, कान, दाबून, चेहरा झाकून गटार, नाले, खड्डे, चुकवत भाजी आणायला जातात. त्यांना रोजचे पाच हजार प्रश्न सतावत असतात, तुमची पर्यावरणाची किरकिर ठेवा बाजूला. - हे तुमचे मत असेल आणि तुम्ही भारतात रहात असाल तर नक्की सर्वेक्षणात भाग घ्या. हा महत्वाचा मुद्दा आहे.

बाकी सगळे जे तर्क तुम्ही आमच्या बद्दल आणि आमच्या सर्वेक्षणाबद्दल मांडलेत ते कशाच्या आधारावर ते काही समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत!
तुम्ही किती वर्षे भारतात राहिलात?
तेव्हाचं आता काही आठवतं का? तुमच्या स्वतःच्या अनुभवात भारतात कोणत्या पर्यावरणीय समस्या भोगाव्या लागल्या होत्या?
आता कोणते बदल झाले असतील असे वाटते?
गरीब, भटके- विमुक्त, ग्रामीण शेतकरी- शेतमजूर, मच्छिमार, आदीवासी हे हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटांचे थेट बळी असतात त्यांच्यातले कोणी ओळखीचे आहे का तुमच्या? त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

(तुमचे) प्रश्न प्रामाणिक आहेत, असे गृहीत धरून, उत्तरादाखल माझे दोन तांबडे सेंट. सर्वेक्षकांच्या वतीने नव्हे, तर पूर्णपणे माझ्या खाजगी वतीतून. (या लढतीत माझा कोठलाही कुत्रा नाही, हे आगाऊ जाहीर करून.)

तुम्ही किती वर्षे भारतात राहिलात?

आयुष्याच्या पहिल्या सलग सव्वीस वर्षांहून अधिक. किंबहुना, सत्तावीस वर्षांहून जेमतेम दीडदोन महिने कमी. (मध्य-जानेवारी १९६६ ते नोव्हेंबर १९९२अखेरपर्यंत.)

तेव्हाचं आता काही आठवतं का?

दुर्दैवाने, या (बॉर्डरलाइन थेरडेशाही) वयातसुद्धा माझी स्मरणशक्ती तितकीही वाईट नाही.

तुमच्या स्वतःच्या अनुभवात भारतात कोणत्या पर्यावरणीय समस्या भोगाव्या लागल्या होत्या?

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, मी भारतात राहात असताना मला पर्यावरणीय समस्या फारश्या भोगाव्या लागल्या नव्हत्या, असे आठवते.

- मी लहान होतो, तेव्हा पुण्यातले भर उन्हाळ्यातले तापमानसुद्धा अगदी थंडगार वगैरे जरी नाही, तरी बऱ्यापैकी सुसह्य असे, असे आठवते. (त्यापूर्वी म्हणजे माझ्या वेळेच्या फार पूर्वी ब्रिटिश अमदानीत वगैरे मुंबईच्या गौरनराचे उन्हाळी निवासस्थान पुण्यात (आज जेथे पुणे विद्यापीठ आहे, त्या भागात) असे, असेदेखील ऐकून आहे. याचा अर्थ, ज्या अर्थी गौरनरसुद्धा मुंबईच्या उष्णते(!)पासून पळून जाण्यासाठी जेथे पुण्यास येत असे, त्या अर्थी त्या काळात पुण्याचे हवामान भर उन्हाळ्यातसुद्धा बऱ्यापैकी थंड राहात असले पाहिजे. परंतु, हे माझ्या काळाच्या पुष्कळच अगोदर असल्याकारणाने, मी स्वत: अनुभवलेले नाही; सबब, सोडून देऊ.) उकडत अवश्य असे, घरात पंखा लावावा अवश्य लागत असे, परंतु, बाहेर गेल्यावर भाजून काढणारी भट्टी जी आजकाल जाणवते, ती त्या काळात तितकीशी नसे.

ही परिस्थिती साधारणत: १९७०च्या दशकाच्या अखेरीकडे (१९७८-७९) हळूहळू बदलू लागली, असे अंधुकसे आठवते.

- प्रदूषण फारसे नसे. हवा बऱ्यापैकी स्वच्छ होती. (मला आठवते, त्याप्रमाणे, माझ्या अगदी लहानपणी माझे मुंबईत राहणारे आजोबा प्रकृतिअस्वास्थ्याकारणाने डॉक्टरी सल्ल्याने 'हवापालट' म्हणून काही महिने पुण्यात आमच्या घरी राहून गेले होते.)

- पुण्यात झाडीचे प्रमाण पुष्कळ होते. किंबहुना, त्या काळी मी ज्या नारायण पेठेत राहात असे, त्या भरवस्तीतल्या 'अगदी गावातल्या' म्हणवणाऱ्या भागातसुद्धा (असंख्य वाड्यांबरोबरच) पुष्कळ झाडी होती. रस्त्यातून चालत शाळेत जाताना, त्या झाडीतून कोठूनतरी बाहेर पडलेली एखादी वानरांची टोळी भर रस्त्यातून संचार करीत आहे, हे दृश्यदेखील (भर नारायण पेठेत) अनेकदा पाहिलेले आहे. (आजमितीस हे निव्वळ अशक्य आहे.)

(किंबहुना, आमच्या शेजारच्या वाड्यात राहाणारे जोशी वकील, संध्याकाळी कोर्टातून घरी परतल्यावर दुधाचा धंदासुद्धा करीत. त्यांच्या वाड्यात त्यांच्या स्वत:च्या असंख्य म्हशींचा तांडासुद्धा होता, नि त्या म्हशींची देखभाल करण्यासाठी रीतसर एक मनुष्यसुद्धा नेमला होता. सकाळच्या वेळेस तो म्हशींचा तांडा भर नारायण पेठेतील रस्त्यांतून शनवाराच्या दिशेने नदीकडे 'धुण्याकरिता' म्हणून संथपणे डुलतडुलत चाललेला आहे, हे नयनमनोहर दृश्य याचि डोळां अनेकदा पाहिलेले आहे.)

- लोकवस्ती (अगदी भर पुण्यातसुद्धा) तुलनेने पुष्कळच विरळ होती. एरंडवणे, प्रभात रोड वगैरे, किंवा फार फार तर नळ स्टॉप, ही पुण्यातील नागरी संस्कृतीची बहुधा परमसीमा असावी. एरंडवणे/प्रभात रोड वगैरे भागांत लोक 'शहराच्या गजबजलेल्या वस्तीपासून दूर, शांत भागांत' वगैरे म्हणून राहायला जात. कोथरूड नावाचे दूरवर कोठेतरी काहीतरी आहे, अशी धूसरशी कल्पना लोकांना असे, परंतु, तेथे कोणी चिटपाखरू तर सोडाच, परंतु कुत्रेसुद्धा मरायला जात नसे. ताथवडे, बाणेर वगैरे ही पुण्याबाहेरची खेडेगावे होती, आणि 'हिंजवडी' नावाचे काही पुण्याच्या हद्दीत असू शकते, याची लोकांना ऐकीव कल्पनासुद्धा नसे.

(मला आठवते, त्याप्रमाणे, १९७०च्या दशकाच्या सुरुवातीस कधीतरी माझ्या आईवडिलांनी केवळ स्वस्त (आजच्या तुलनेत जवळजवळ मातीमोलाने) मिळाला, म्हणून, 'पुढेमागे कधीतरी बांधू!' या विचाराने, कोथरुडात एक प्लॉट घेऊन ठेवला होता. पुढे १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस कधीतरी मी भारत सोडण्याच्या सुमारास तेथे प्रत्यक्ष घर बांधून ते तेथे राहावयास गेले, तोवर कोथरुडाची नोंद गिनीज़बुकात 'सर्वाधिक वेगाने वाढणारी लोकवस्ती' म्हणून झालेली होती, असे ऐकिवात आहे.)

(पुण्यात हिंजवडी हे नक्की कोठे आहे, याची आजमितीससुद्धा मला कल्पना नाही.)

(पुण्याचे सोडा. मुंबईत त्या वेळेससुद्धा लोकवस्ती विरळ वगैरे नसावी. परंतु, माझे आजोबा तेव्हा गिरगावातील ज्या चाळीत राहात होते, तेथून ते त्या वाडीच्या नाक्यापर्यंत रस्त्याने कोणाचेही धक्के न खाता चालत जाणे हे निदान १९७०च्या दशकाच्या मध्यापर्यंत तरी सहज शक्य असे.)

लोकवस्ती विरळ होती, म्हटल्यावर रस्त्यात वाहने कमी होती, नि रस्त्यात वाहने कमी होती, म्हटल्यावर प्रदूषण आपोआपच नगण्य होते. आजच्यासारखी प्रदूषणग्रस्तताजन्यबुरखाधारी पुणेरी महिलांची पलटण रस्त्यातून दिसत नसे. कोथरुडाशी त्या काळात प्रत्यक्ष संबंध आला नाही, परंतु, कोथरुडातल्या मुख्य रस्त्यांतून, झालेच तर कर्वे रोडवरून वगैरे जाताना आजकाल अनेकदा जे साधा श्वास घेणे अशक्य होऊन बसते, ते कोथरुडात तरी बहुधा होत नसावे, नि कर्वे रोडच्या डेक्कनकडच्या भागांतसुद्धा जवळजवळ नसावेच.

- तापमानवाढीबद्दलच बोलायचे, तर (अगोदर म्हटल्याप्रमाणे) पोळून काढणारा, रस्त्यातून चालणे किंवा घराबाहेर पडणे अशक्य करणारा उन्हाळा हा प्रकार तेव्हा पुण्यामुंबईत असेपर्यंत तरी अनुभवलेला नव्हता. (पुढे थोड्या मोठेपणी दिल्ली-हरयाणा-राजस्थान वगैरे भागांशी स्वल्पसंबंध आल्यावरच तो अनुभवला, परंतु त्याचा तापमानवाढीशी संबंध नाही. त्या भागांत त्या काळातसुद्धा भर उन्हाळ्यात अशी तापमाने ही गोष्ट सामान्य होती.)

आता कोणते बदल झाले असतील असे वाटते?

एकंदर कायकाय बदल होत आहेत किंवा असतील, हे मी सांगू शकत नाही, परंतु, अधूनमधून कधीतरी पुण्यात जेव्हा टपकतो, तेव्हा मला स्वत:ला जाणवणाऱ्या (पर्यावरणविषयक) ठळक गोष्टी म्हणजे, (१) उन्हाळ्यात दुपारी रस्त्यांतून चालणे (भट्टीमुळे) दिवसेंदिवस अशक्य होत जाणे, आणि (२) वाढती रहदारी, आणि त्यामुळे वाढते प्रदूषण. (अर्थात हे माझे वैयक्तिक इंप्रेशन आहे.)

अर्थात, कसे असते ना, की, (ऐकीव माहितीप्रमाणे; चूभूद्याघ्या.) चिनी लोकांमध्ये खाण्यासाठी म्हणून जी बेडके काढून ठेवलेली असतात, ती पाण्याने भरलेल्या एखाद्या भांड्यात सोडून ठेवलेली असतात. सुरुवातीस पाण्याचे तापमान नॉर्मलच असते. हळूहळू ते वाढवले जाते. इतक्या हळूहळू, की बेडकांना ते हळूहळू वाढत आहे, याचा पत्तासुद्धा लागत नाही. मस्तपैकी मजेत पोहत असतात. आणि मग पुढेपुढे तापमान एवढे वाढते, की पाण्यात उकडली जाऊन मरून जातात, नि मग कोणाच्यातरी प्लेटीत अवतरतात. त्यामुळे, प्रत्यक्ष पुण्यात राहणाऱ्यांना हे कदाचित तितकेसे जाणवतसुद्धा नसेल. (किंवा, कोणी सांगावे, कदाचित जाणवत असेलसुद्धा.) आमच्यासारख्या अधूनमधून टपकणाऱ्यांना जाणवते. चालायचेच.

गरीब, भटके- विमुक्त, ग्रामीण शेतकरी- शेतमजूर, मच्छिमार, आदीवासी हे हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटांचे थेट बळी असतात त्यांच्यातले कोणी ओळखीचे आहे का तुमच्या?

नाही ब्वॉ. थेट शहरी भागांत जे स्वत:ला थोडेफार जाणवते, तेवढ्यापुरतेच बोलू शकतो. मात्र, तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे, हवामानबदल आणि पर्यावरणीय संकटांचे थेट बळी असणारे उपरोक्त प्रकारांत मोडणारे विभिन्न लोक असावेत, नि तुलनेने पुष्कळच असावेत, हे तर्काने पटते. मात्र, वैयक्तिक अनुभव अथवा अशा लोकांशी वैयक्तिक संपर्क नसल्याकारणाने, अधिक माहिती नाही.

त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार?

हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. दुर्दैवाने, या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही. (कदाचित, प्रस्तुत सर्वेक्षण करणाऱ्यांकडेसुद्धा असेलच, असे नाही. किंवा, असेलही; मला ठाऊक नाही.)

यदाकदाचित या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असल्यास तुम्ही ते जाहीर करू शकाल काय? किंवा, किमानपक्षी, प्रस्तुत सर्वेक्षणकर्त्यांस ते कळवू शकाल काय? कोणी सांगावे, कदाचित, अधिकतर लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता त्यांना ते उपयोगी ठरू शकेल.

असो चालायचेच.

——————————

‘I do not have a dog in this fight’च्या स्वैर मराठी अनुवादाचा प्रयत्न. (प्रेरणा: सांगायलाच हवी काय?)

पुण्यातल्या माझ्या स्वत:च्या सध्याच्या राहत्या घरात मी केवळ पाहुणा म्हणूनच अनेकदा गेलेलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते, सर्व्हेचे प्रश्न अपुरे आहेत. आयपिसीसीचे रिपोर्ट्स वाचून हवामान बदलाबद्दल जाणून घेणारे कदाचित युपिएससीची तयारी करणारेच असतील. हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटे यांचा संबंध आहे हे लोकांना आपल्या अनुभवातूनच कळत असेल. परमेश्वराचा अकरावा अवतार म्हटला तसे हम बदल गये है, क्लायमेट नही बदला अशी भावना असणारे भरपूर लोक आहेत हे खरे पण त्यांना हे परिणाम तितक्या तीव्रतेने भोगावे लागत नाहीत म्हणून असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सर्वेक्षणात त्रुटी असू शकतात. त्यांची चिकित्सा अवश्य व्हावी.

बाकी, सर्वेक्षकांपैकी कोणी कोठल्या विषयात पुढील शिक्षण घ्यावे किंवा अन्यथा भविष्यात बाटल्या, प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याचा व्यवसाय पत्करावा, किंवा कसे, हा संबंधित सर्वेक्षकांचा वैयक्तिक (पक्षी: खाजगी) प्रश्न असावा, नव्हे काय?

झालेच, तर अनिवासी मंडळींविषयीची (एक कॅटेगरी म्हणून) टीका, फार कशाला, त्यांची पराकोटीची खिल्ली उडविणे हेसुद्धा beyond the Pale तथा निषिद्ध अर्थातच असू नये. मात्र, त्या टीकेत वा त्या खिल्लीत काही किमान दम असावा, ही अपेक्षा अंमळ अति होते आहे काय?

प्रस्तुत जो काही प्रकार होता, त्यात (विशुद्ध गरळ वगळता) ‘रोचक’ असा कोठलाही अँगल निदान मला तरी दिसला नाही. फार कशाला, नावीन्यपूर्ण असेही मला त्यात काही आढळले नाही की जेणेकरून म्हणता यावे, की बाबा, Yes, I learned something new today, म्हणून. तेचतेच तर सगळे होते, जे पूर्वी अनेकदा ऐकून झालेले आहे! अर्थात, नावीन्यपूर्ण असे दर खेपेस काही असलेच पाहिजे, असेही नाही, परंतु, devoid of that, it was sheer diatribe sans any merit. ‘ऐसी’वर तेही चालते, म्हणा, परंतु यात कोणाला काही ‘मार्मिक’ वगैरे तर सोडाच, परंतु गेला बाजार काही ‘रोचक’ तरी कसे सापडावे, ही माझ्या मर्यादित आकलनशक्तीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. (तितकीही दिव्यदृष्टी दुर्दैवाने मजजवळ नाही.)

Unless, श्रेणिव्यवस्थेचा फोलपणा निदर्शनास आणून देण्याकरिता तथा श्रेणिव्यवस्थेचा (एकमेव) सदुपयोग वैयक्तिक मनोरंजनाकरिता करण्याकरिता (आमची श्रेणिसुविधा आम्हांस जोवर उपलब्ध होती, तोवरच्या काळात) वाटेल त्या प्रतिसादास मनाला येतील त्या श्रेणी देण्याचा जो प्रघात अथवा पायंडा आम्ही स्वतः एके काळी पाडून ठेवलेला होता, त्याचाच हा नवाविष्कार (अथवा continuation) असल्यास गोष्ट वेगळी. परंतु, त्याही परिस्थितीत, प्रस्तुत श्रेणीदात्याच्या ठिकाणी जर आम्ही असतो, तर त्या प्रतिसादास ‘माहितीपूर्ण’ अथवा ‘विनोदी’ अशी श्रेणी दिली असती. (बहुधा ‘माहितीपूर्ण’च!) परंतु, ‘मार्मिक’? ‘मार्मिक’ does not make any sense whatsoever. (But then, the entire श्रेणिव्यवस्था does not make any sense whatsoever, either, त्यामुळे, चालायचेच!)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला माहितीपूर्ण दिली.

मूळ आपत्तीजनक प्रतिसादात जाऊन मार्मिक ऐवजी माहितीपूर्ण करत आहे.

Biggrin

बाकी, सर्वेक्षकांपैकी कोणी कोठल्या विषयात पुढील शिक्षण घ्यावे किंवा अन्यथा भविष्यात बाटल्या, प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याचा व्यवसाय पत्करावा, किंवा कसे, हा संबंधित सर्वेक्षकांचा वैयक्तिक (पक्षी: खाजगी) प्रश्न असावा, नव्हे काय?

बाकी, वाचकांपैकी कोणाला काय "मार्मिक" वाटावे आणि काय "रोचक" वाटावे आणि काय "विनोदी" वाटावे हा वाचकांचा वैयक्तिक (पक्षी खाजगी) प्रश्न असावा, नव्हे काय?

झालेच, तर अनिवासी मंडळींविषयीची (एक कॅटेगरी म्हणून) टीका, फार कशाला, त्यांची पराकोटीची खिल्ली उडविणे हेसुद्धा beyond the Pale तथा निषिद्ध अर्थातच असू नये. मात्र, त्या टीकेत वा त्या खिल्लीत काही किमान दम असावा, ही अपेक्षा अंमळ अति होते आहे काय?

फारच किचकट बुवा तुमच्या अपेक्षा. म्हणजे थप्पड मारा, पण त्यात जरा जोर नको का? आणि ती मारताना जरा तर्कशुद्ध नावीन्यपूर्ण कारण तरी असावे... वगैरे.

.....

आधी एक श्रेणी दिली. ती चुकली हे जाणवले. मान्य केले. मोकळे झाले. आता तुम्ही म्हणता ते (पक्षी मार्मिक ऐवजी माहितीपूर्ण) पटल्याने आणि बदल करण्याची सोय असल्याने तसा करून पाहतो. वैयक्तिक निर्णय म्हणून. Smile

आता बसले का तुमच्या अपेक्षांत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांचे दैनंदिन जीवन संघर्षमय असते त्यांना "हवामान बदल म्हणजे काय" हे कदाचित माहीतही नसेल, तर काही जणांना ते एक फॅड किंवा manufactured consent वाटू शकते.
परंतु आपण प्रत्यक्ष दिसणाऱ्या परिणामांना अप्रत्यक्ष दिसणाऱ्या परिणामांपेक्षा जास्त महत्व देतो.

थोडं विषयांतर वाटेल, पण आपल्या खात्यात १५ लाख जमा होतील, किंवा नोटा बदलल्याकी भ्रष्टाचार दूर होतो हे काही जणांना "माहितीचा अधिकार, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, पंचायत राज" यांच्या पेक्षा जास्त appeal होते.

आपल्याला प्रत्यक्ष भेडसावणाऱ्या अनेक समस्या हवामान बदलामुळे अजून जटील होणार आहेत त्याच काय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही फ़रमाया!

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@बिटकॉइनजी बाळा:

खरे तर उत्तरे देण्याची फारशी गरज नाही, परंतु, कसे आहे, की माझाही वेळ जात नसल्याकारणाने, देतोच.

तुम्ही पण लवकर डेटा सायन्स शिकून घ्या. नाहीतर काही दिवसांनी बाटल्या प्लास्टिक कचरा वगैरे गोळा करावे लागेल.

डेटा सायन्स अवगत नसलेल्या मनुष्यास आजकाल बाटल्या, प्लास्टिक कचरा वगैरे गोळा करणे हेच एकमेव पर्यायी करियर ऑप्शन उरले आहे काय? तसे असल्यास, कठीण आहे.

कसे आहे, की माझी बायको आयटी क्षेत्रातली नसल्याकारणाने (स्थानिक निवडणूक अधिकारी आहे.), डेटा सायन्सशी तिचा शष्प संबंध नाही. (खरे तर, मी स्वत: जरी आयटी क्षेत्रात असलो, तरी माझासुद्धा डेटा सायन्सशी तूर्तास काहीही संबंध नाही. परंतु, माझी गोष्ट किंचित निराळी आहे. बॉर्डरलाइन थेरडेशाही वयात असल्याकारणाने, फारच झाले तर पुढील काही वर्षांत निवृत्त होण्याचा विचार मी करू शकतो.) त्यामुळे, पुढेमागे ट्रम्प जर निवडून आलाच, आणि केल्याच जर त्याने निवडणुका कायमच्या खारिज, तर पोटापाण्याकरिता बाटल्या, प्लॅस्टिक कचरा वगैरे गोळा करण्याच्या प्रशिक्षणार्थ (सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून) बायकोला तुमच्याकडे पाठवीन, म्हणतो. (कृपया तुमचा पत्ता देऊन ठेवाल काय? पुढेमागे उपयोगी पडेल.)

(माझ्या स्वत:करिता, निवृत्त झाल्यानंतर उबर चालविण्याबद्दल विचार मी तूर्तास गंभीरपणे करतो आहे. बघू या कसे जमते ते.)

तुम्ही लोक एग्जॉटिक गोष्ट म्हणून ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती खाता.

नक्की कोठल्या गाढवाने सांगितले तुम्हाला हे?

(अर्थात, हा प्रश्न मी एका ओसीआयधारकाच्या अत्यंत अटलांटा-सेंट्रिक दृष्टिकोनातून विचारत आहे.)

काहीतरी लुटूपुटूची सर्वेक्षणे करुन तुम्ही परदेशी विद्यापीठांमध्ये पेपरे लिहिणार आणि तुमचा खुट्टा बळकट करणार.

पुणे विद्यापीठाने जर या विषयात काही मूलभूत संशोधन वगैरे केले, तर, कोण जाणे, कदाचित लोकांना पेपरे लिहिण्याकरिता परदेशी विद्यापीठांची वाट धरावी लागणार नाही. (कदाचित!)

सीरियस करणार असाल त्याचे कुठे कूल पॉइंट्स मिळणार आहेत हेही आधी सांगून टाका. (नागरिकत्व वगैरे मिळवण्यासाठी).

(अमेरिकेत, किंवा कॅनडातसुद्धा) नागरिकत्व वगैरे मिळवण्यासाठी कूल पॉइंट्स वगैरे लागत नाहीत. पुरेसा कायमस्वरूपी रहिवास असणे (अधिक गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे नसणे) एवढे पुरते.

(हं, त्याअगोदर कायमस्वरूपी रहिवास प्रस्थापित करण्याची परवानगी मिळवायला बऱ्याच खटपटी कराव्या लागतात, ही गोष्ट वेगळी. परंतु, तेथेसुद्धा, कूल पॉइंट्स वगैरे (अगदी आइनस्टाइन-पातळीवरचे वगैरे असल्याखेरीज) आवश्यक असतात आणि/किंवा कामी येतात, अशातली गोष्ट निश्चितच नाही. आणि, निव्वळ विद्यापीठांतून पेपरे वगैरे लिहिणे हे (तितकेच मूलगामी वगैरे असल्याखेरीज) कायमस्वरूपी रहिवासाकरिता कूल पॉइंट्स म्हणून थेट उपयुक्त ठरेल, याबद्दल प्रचंड साशंक आहे. (त्यातून नोकरीकरिता वगैरे कोणी स्पॉन्सर केल्यास वगैरे गोष्ट वेगळी. आणि, तितकेच महत्त्वाचे किंवा उपयुक्त वगैरे असल्याखेरीज (किंवा, तितकेच महत्त्वाचे किंवा उपयुक्त असे काही करण्याच्या तुमच्या क्षमतेबद्दल त्यातून खात्री वाटल्याखेरीज) नोकरीकरिता स्पॉन्सर करण्याइतकी होतकरू एम्प्लॉयरमंडळी (किंवा रिसर्च युनिव्हर्सिट्या) मूर्ख असतात, असे वाटत नाही. (आणि, एम्प्लॉयरमंडळी आणि/किंवा रिसर्च युनिव्हर्सिट्या जरी मूर्ख निघाल्या, तरी इमिग्रेशनखाते तितकेही मूर्ख सहसा असत नाही.)) सांगण्याचा मतलब, निव्वळ Cool points don't count in the grander scheme of things. At least, not for citizenship.)

बाकी तुमचे निवांत चालू द्या. (सर्वेक्षण करणारे आपले सर्वेक्षण निवांतपणे करतीलच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

लेखाचा विषय जागतिक तापमान आहे. पर्यावरण नाही.

भारतात पर्यावरणाची चाड असेल प्रामाणिकपणे तर खूप काही गोष्टी करता येतील. त्या त्या भागातील लोकच प्रयत्न करत नाहीत. स्वार्थ आणि भ्रष्टाचाराने तिकडे दुर्लक्ष करतात. राजकीय आडकाठी आहेच. इथेच थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्यावरणात होणाऱ्या बदल हाच कळीचा मुद्दा आहे tapvan वाढीमध्ये.

हे कसे विसरता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हा विषय खूप मोठा आहे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे.

तापमान वाढीचा हवामान वर होणारा परिणाम.
ह्या वर विचार करावा की.
हवामान बदल झाल्या मुळे तापमान वाढ होत आहे.
ह्या वर विचार करावा.
पहिले तर हेच कळत नाही.
वायू प्रदूषण, हवामान बदल,तापवान वाढ ही योग्य sequence आहे की.
वायू प्रदूषण नाचा ह्या गोष्टी शी काहीच संबंध नाही.
ते एक नैसर्गिक चक्र आहे.

आणि पावसाचे प्रमाण कमी होण्यास नक्की वायू प्रदूषण जबाबदार आहे की तापमान वाढ जबाबदार आहे की त्या मागे नैसर्गिक पने होणारा हवामान मधील बदल जबाबदार आहे.

करणे कोणती ही असू ध्या पृथ्वी चे तापमान,समुद्राचे तापमान ठराविक मर्यादे बाहेर वाढले तर निसर्ग चक्र कोलमडून पडेल.
हे मात्र सत्य आहे.
आणि त्याचा परिणाम संपूर्ण जीव सृष्टीवर होईल माणूस किंवा इतर प्राणी.
माणसात गरीब किंवा श्रीमंत सर्वच घटकांचे अस्तित्व धोक्यात येईल .
हे मात्र त्रिवार सत्य आहे.
पैसे असल्याने ह्या स्थिती वर मात करता येईल हे दिव्य स्वप्न आहे ..

26 जून च्या पावसात जेव्हा मुंबई बुडली होती लोक पाण्यात अडकली होती .
तेव्हा एक वडापाव पण खूप किंमती होता.
लाख काय दहा लाख जरी द्यायची कुवत असती तरी एक वडापाव पण अडकलेल्या व्यक्ती ल पुरवणे अशक्य होते.
.

हा विषय गंभीर आहे आणि जगातील सर्व देशांनी मिळूनच च ह्या वर उपाय केला तर च स्थिती थोडीफार बदलू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना तुम्ही स्पर्श केलेला आहे.

(ट्रोलप्रतिक्रियांपेक्षा हे निश्चितच चांगले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा मी इंग्लंडमध्ये शिकत होते. पण आमचं घर ठाण्यात होतं. तळमजल्यावर. घरी पावसाचं पाणी येणं नेहमीचं होतं. त्यामुळे २६ जुलैच्या त्या पुरापर्यंत घरात मयत आईवडलांचे फोटोही उरले नव्हते. घरात पाणी शिरणार असं दिसायला लागल्यावर शेजारून फोन यायचा, आवराआवरी सुरू केली ना, ते बघायला. आईबाबा दोघंही गेल्यावर ते काकाकाकू आमचीही काळजी करायचे. अपरात्री पाऊस वाढला तर काकू आवराआवरी सुरू करण्याआधी आम्हांला फोन करून खात्री करायची.

२६ जुलैला घरात पाणी शिरलं तेव्हा भावानं आधी आई-वडलांची डेथ सर्टिफिकेटं उचलून वर ठेवली. पाणी खूप वाढल्यावर तो वरच्या मजल्यावरच्या शेजाऱ्यांकडे गेला तेव्हा बरोबर ती कागदपत्रं घेऊन गेला. पुढे किमान पाच दिवस सफाई करावी लागली, असं म्हणाला.

मी डिसेंबरमध्ये घरी आले तेव्हा घराची दुरवस्था बघून दोन दिवस सफाई करत बसले होते. शेजारच्या काकांनी हे बघितल्यावर मला थांबवलं.

नंतर २००९-१०मध्ये कधी तरी इमारत पुन्हा बांधली. तेव्हा मी पुण्यात पोस्टडाॅक करत होते. इमारत बांधून झाल्यावर भावाला मदत करायला ठाण्याला आले होते. रात्री शेजारच्या घरी गेले. तेव्हा काकू म्हणाली, "आता बाहेर कितीही पाऊस पडला तरी झोप उडणार नाही."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेवटचा प्रश्ण आहे - "जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?". त्यानंतर तुम्ही पुढच्या मुद्द्यात ई-मेल विचारला आहे. पण तो "तुम्हाला पुढील तपशीलवार सर्वेक्षणात सहभागी व्हायचे असल्यास किंवा आमच्या संपर्कात राहायचे असल्यास...". म्हणजे आधीच्या प्रश्णात तुम्हाला नुसतं प्रतिसादकर्त्याला परिणाम जाणून घ्यायचे आहेत का एव्हढंच जाणून घ्यायचंय? प्रतिसादकर्त्याची (मी प्रतिसादकर्ता असलो तर माझी नक्कीच) अपेक्षा होईल की कोणी "हो" उत्तर दिलं तर तुम्ही काही माहीती पाठवाल!! ईमेल दिली असल्यास तसं करणार असलात तर तसं सांगा त्या प्रश्णात - "हो उत्तर असलं तर पुढच्या मुद्द्यात ईमेल द्या".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

ते दोन्ही प्रश्न वेगळे आहेत. सध्यातरी माहीती पाठवायचा काही विचार केलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे म्हणजे शाळकरी काळातल्या टवाळकीसारखं झालं - रस्त्यावर थांबलेल्या टॅक्सीवाल्याला विचारायचं, "मलाड जाएगा क्या?", आणि लांबच्या भाड्याच्या आशेने त्याने लगेच हो म्हणून मीटर डाऊन करायला हात लांबवला की सांगायचं "तो जाव ना फिर, यहां क्यू खडा है?" !! त्या प्रश्णानंतर लगेच ईमेल बद्दल पृच्छा असल्यामुळे ईथेहि तोच ईफेक्ट होतोय.

"परिणाम जाणून घ्यायचेत? गुड. आं? छे छे, मी नाही काही देणारे तुम्हाला. आपलं विचारलं ईतकंच" Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"परिणाम जाणून घ्यायचेत? गुड. आं? छे छे, मी नाही काही देणारे तुम्हाला. आपलं विचारलं ईतकंच"

मुळात किती जणांना परिणाम जाणून घेण्यात रस आहे, याचा अंदाज घेण्याकरिता तो प्रश्न असू शकेल, ही शक्यता अगदीच डिस्काउंटेबल आहे काय?

जर पुरेश्या जणांना रस असेल, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवावी (किंवा ती पोहोचविण्याकरिता कष्ट घ्यावे, किंवा कसे), याचा विचार पुढेमागे करता येईलही. (निदान, असा काही विचार असण्याची शक्यता असू शकते.)

तसेही, I did not see any implied promise in that question, one way or the other.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिटकॉइन बाळाजी यांचा प्रतिसाद वाचून "अरे, काय भारी अँगल आहे.." असे वाटले. एक मार्मिक श्रेणी आलेली दिसत होती. मीही उत्स्फूर्तपणे मार्मिक दाबली.

नंतर मिसळपाववरही हा धागा आलेला दिसला. तिथेही प्रतिसाद वाचले.

आता असे वाटतेय की ग्लोबल वॉर्मिंग या विषयाबद्दल माहिती मिळवणाऱ्या फॉर्मसोबत या विषयावर अभ्यास करणाऱ्या लोकांना आणखीन बराच रोचक इनपुट मिळतो आहे, मिळेल.

नीट विचार करता, हा सर्व्हे कोणी प्रकाशित केला आहे हे ज्ञात नसते, तर अशाच प्रतिक्रिया आल्या असत्या का?

परदेशस्थ भारतीयांवर टीका करून मूळ प्रश्नावर काही चर्चा होणार आहे का?

Ad hominem त्रुटी टाळून मूळ विषयाबद्दल जे बरे वाईट मत असेल ते दिलेले बरे असे आता वाटते आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परदेशस्थ भारतीयांवर टीका करून मूळ प्रश्नावर काही चर्चा होणार आहे का?

नाही. (मूळ प्रश्नावर मुळात इथे चर्चा कोणाला करायची आहे, हा प्रश्न अलाहिदा.) आणि, त्याने मूळ प्रश्न सुटणारही नाही.

मात्र, मंदिर बांधल्याने नक्कीच सुटेल. झालेच तर, समान नागरी कायदा, ३७०चे रद्दीकरण, नागरिकीकरण बिल, वगैरे केल्याने नक्की सुटेल.

(वरील गोष्टी आणण्याने तापमानवाढीचा प्रश्न तर सुटेलच, परंतु बहुतांश भारतीयांना जे नाक, कान, दाबून, चेहरा झाकून गटार, नाले, खड्डे, चुकवत भाजी आणायला जाताना जे रोजचे पाच हजार प्रश्न सतावत असतात, तेसुद्धा चुटकीसरशी सुटतील! ‘जय श्रीराम!’ म्हटल्यावर समस्यांची बिशाद काय आहे न सुटण्याची? आणि, तरीही आल्याच समस्या, तर त्या सोडवायला देशाचा एवढा थोर महानेता आहे ना? एवढा तो असताना, मुळात समस्या आहेत हे सुचवण्याचे धाडस तरी कसे करता?)

देश को शौचालय की नहीं, देवालय की ज़रूरत है। ग्लोबल वॉर्मिंगसारख्या भुक्कड फर्स्टवर्ल्ड थेरांचे काय घेऊन बसलात?

बाकी, तुमचेही चालूच द्या. (तुम्हीही त्यातलेच निघालात, म्हटल्यावर…)

(च्या**, सर्व्हे भरण्याची इथे कोणीही सक्ती केल्याचे निदान मला तरी दिसले नाही. भरावासा वाटला, तर भरा, नाहीतर मरा, भो**च्यो! माझे तसेही काय जाते? माझा सर्व्हे थोडाच आहे? त्यापेक्षा, मंदिरे बांधा! त्याने सगळ्या समस्या सुटतील. (म्हणजे, मुळात समस्या असल्याच, तर.) B****y Indians, and their b****y priorities!)

——————————

Ad hominem त्रुटी टाळून मूळ विषयाबद्दल जे बरे वाईट मत असेल ते दिलेले बरे असे आता वाटते आहे.

ही उपकारांची भीक नक्की कशाबद्दल? स्वतःची झाकण्यासाठी? उगाच सभ्यतेचा आव कशापायी? त्यापेक्षा, स्वतःशी प्रामाणिक राहून ज्या काही वाटतील त्या बऱ्यावाईट शिव्या सरळ तोंडावर द्या ना! (भले त्या शिव्यांमध्ये काही मेरिट असेल वा नसेल. त्याचा विचार नंतर नि वेगळा करता येईल.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी, तुमचेही चालूच द्या. (तुम्हीही त्यातलेच निघालात, म्हटल्यावर…)

कशातले निघालो ते कळले नाही. (आमचा सदरा कोणत्या सदरात पडला ते कळले नाही. ;-)) )

आधी उत्साहाच्या भरात वाटले की सर्व्हे करणाऱ्यांवर परदेशस्थ म्हणून टीका रोचक आहे. नंतर जाणवले की ते चुकीचे आहे. अशी उपरती होणे यात काही चुकीचे असल्यास माहीत नाही.

जो सर्व्हे घेतोय त्या व्यक्तीचे नागरिकत्व, देश यांवर न घसरता मूळ विषयावर जे काही मत असेल ते द्यावे हे योग्य, असे वाटल्यावर त्यात उपकारांची भीक,

कोणी कोणास घातली ? (२ गुण)

तर असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंचाच गणपुले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

1) पर्यावरण बदल आणि वाढते तापमान ह्या मर्यादित च प्रदूषण वर अजून तरी डावे,उजवे,मधले कोणाचीच हिम्मत नाही प्रश्न उभा करण्याची.
प्रदूषण घातक च आहे.
सर्व प्रकारचे.
वायू,पाणी,प्रकाश ,ध्वनी.

कोणाचीच हिम्मत नाही हे नाकारण्याची.
२) तापमान वाढ ह्याला प्रदूषण जबाबदार आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे त्या वर सर्व जागतिक माध्यम ,संशोधक,सरकार,संस्था तोंडात.
मिठाची गुळणी घेवून गप्प आहेत
३) तापमान वाढ पृथ्वी च्या इतिहासात अनेक वेळा होवून गेली आहे तेव्हा मानवी हस्तक्षेप पण नव्हता.
४).
मी आज पूर्ण दिवस विविध प्रकारे गूगल वर उलट सुलट प्रश्न विचारले पण गूगल नी उत्तर दिलेच नाही.

माझा प्रश्न .

पृथ्वी वर जमिनी पेक्षा सागराचा पृष्ठ भाग जास्त आहे.
३०% जमीन आणि 70% सागर .
हे जग मान्य आहे.
मग पृथ्वी वर पावसा मुळे भु भागावर जास्त पावूस पडतो की सागर मध्ये.
कारण सागर चे पृष्टफळ च 70% आहे.
मग नदी आटल्या मुळे अमुक तमुक समुद्र सुखला असे विचित्र प्रश्न विज्ञान विषयी जी काही प्रसार मध्यम आहेत ती का उपस्थित करतात.
लोकांना मूर्ख,गाढव, बनवण्यासाठी
उजवे म्हणजे साम्राज्य वादी, हुकूमशाही वृत्तीचे भांडवलदार लोक.
भारतात पण असा एक राजकीय पक्ष आहे ते भारताच्या साधन संपत्ती वर ठराविक च शे दोनशे लोकांचे वर्चस्व असावे ह्याचे प्रतिनिधित्व करतो.
बाकी प्रगत देशात पण काही ठराविक पक्ष च आहेत.
मोजक्याच लोकांच्या हातात दुनियेतील आर्थिक,सामाजिक, आरोग्य व्यवस्था,शिक्षण व्यवस्था,,शेती, एकंदरीत सर्व च उद्योग आणि यंत्रणा असावी असे त्यांचे ध्येय असते.
म्हणून अजून पण कॅन्सर,मधुमेह ह्या वर हे रोग पूर्ण बरे
करण्याचे उपचार नाहीत कारण हे रोग पैसे कमावण्याचे साधन आहे..
रोग वाढू नये म्हणून मात्र उपचार आहेत.
किती विचित्र आहे.
हे असे कथित उजवे.
पर्यावरण विषयी प्रश्न आला की नसलेली बुध्दी पाजळत असतात.
प्रदूषण विषयी एक शब्द हे बोलत नाहीत.फक्त तापमान वाढ ह्या वर च बोलणार .
ह्यांचे नेते थोडे तरी अक्कल असणारे असतात .
पण कार्यकर्ते 108% बेअक्कल.
ही पोस्ट बाकी वेब पेज वर पण प्रसारित झाली आहे त्या वेब पेज वर असे नमुने खूप आहेत.
अक्कल शून्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सर्व क्षणात कसा भाग घ्यावा हे सांगावे मला कळले नाही

जागतिक तपमानवाद व पर्यावरण हे मानवजातीसाठी खुप आवश्यक गोष्टी आहेता

म्हणून आपण महात्मा गांधी यांच्या पावला वर पाऊले टाकून खेड्याकडे चालायला पाहिजे

खादि ग्राम उद्योग या पासून ऊर्जेची मोठ्या प्रमाणात पूरवठा होतो त्याची काळजी घ्या

एक देश म्हणून भारताची या हवामानविषयक बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका आहे हे मला मान्य आहे पण गोर गरीब लोकांची आपुलकी जास्ती मह्त्वाची आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या पोस्ट मधे दुवा दिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो दुवा असा - या दुव्याचा वापर करून तुम्ही सर्वेक्षणात ........ दिसतोय. दुवा त्यात चटकन दिसत नाही. मिसळपाववर टाकताना मी जास्त हायलाईट केले ते शब्द.

ईथेदेखिल ते असे दिसले - या दुव्याचा वापर करून तुम्ही सर्वेक्षणात ........ तर बरं पडेल. B आणि I वापरलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

चर्चा,आक्षेप, फक्त आणि फक्त विविध प्रकारच्या प्रदूषणावर च झाली पाहिजे.
प्रश्न फक्त आणि फक्त प्रदूषण विविध प्रकारचे ह्या वर च उपस्थिती झाले पाहिजेत.
ज्याला तापमान वाढ होईल आणि हाहाकार माजेल ह्याची भीती वाटते त्या प्रतेक व्यक्ती नी फक्त आणि फक्त प्रदूषणावर च प्रश्न उभे केले पाहिजेत.
.
तापमान वाढीचे सर्वात मोठे कारण हे विविध प्रकारे होणारे प्रदूषण हेच आहे.
काही स्व बुध्दी नसणारे मंद बुध्दी लोक अनेक समाज माध्यमावर ह्या विषयात कॉमेंट देताना इतिहासात जी पृथ्वी वर तापमान वाढ झाली होती त्याची उदाहरणे देतात.
पण ह्या मंद बुध्दी लोकांना हे माहीत नसते .
इतिहास काळात सामान्य तापमान ते जास्त तापमान ह्या दोन्ही मधील काळात हजारो वर्षाचे अंतर आहे
ज्या तापमान वाढीला निसर्ग जबाबदार आहे.
पण चारशे वर्षाच्या इंडस्ट्रिअल क्रांती नंतर च पाच दहा वर्षात तापमान वाढले आहे आणि ही वाढ खूप धोकादायक आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@राजेश तुम्ही बर्याच महत्वाच्या मुद्द्यांबद्द्ल बोलत आहात. ह्या सगळ्या मुद्द्यांवर सर्वेक्षणाची मुदत संपल्यावर चर्चा करु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0