आपल्या धार्मिक ग्रंंथात नदीची पुजा, तेथे स्नान, फुले अर्पण करणे इत्यादी फार डिटेल लिहीले आहे. तसे केल्याने पुण्य मिळतेच, पण वाचकांसाठी सगळ्यात आकर्षणाचा भाग असला लिहीलेला असतो की तुमचे सारे कष्ट संपतील, संपत्ती मिळेल, रोग नष्ट होतील इत्यादी. अनेक ग्रंथात तर अनेक नद्यांचे स्नान, परिक्रमा सांगितलेली आहे.
पुण्य, पाप कोणी पाहीले आहे? अन ते नदीत स्नान केल्याने लगेच मिळेल असे नाही.
पण वर जे कष्ट, रोग, इत्यादी आहे ते लगेच दिसणारे आहे.
अन आपल्या धार्मिक ग्रंथांना पठण, पारायण करणार्यांना हा आकर्षणाचा बिंदू आहे.
तर आपली जनता तेथे जाऊन स्नान करतात बरोबरच पाने फुले अर्पण करतात. स्नान करतांना कपडे धुणे वगैरे आलेच.
हा भाग देखील नदीच्या प्रदूषणात भर घालतो.
धार्मिक ग्रंथ जर पुन्हा नव्याने लिहीले व त्यात नदीतले स्नान, पुजा यांना महत्व दिले नाही तर खरी मदत होणार आहे.
असे कसे बोलता
नदीचे पाणी सर्वात जास्त रासायनिक द्रव्य नदीत सोडल्या मुळे होते..
रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या रसायन युक्त पाण्या मुळे होते.
नदीच्या मार्गात असणाऱ्या प्रत्येक गाव,शहर ह्यांचे सांडपाणी सोडल्या मुळे होते.
पूजेसाठी वापरणाऱ्या फुलांमुळे होत नाही.
फुल ही नैसर्गिक आहेत् आणि त्याचे विघटन करण्याची यंत्रणा निसर्गात आहे.