व्यक्ती, इझम आणि मैत्री

साहिर या धाग्यावर 'साहिर कम्युनिस्ट असूनही तो एका कॅपिटालिस्टला का आवडावा?' अशा प्रश्नावर काही मार्मिक चर्चा झाली. त्यातून एकंदरीतच विचारसरणी - मतांतरं - व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंध यावर टिप्पणी करणारा एक प्रतिसाद रमताराम यांनी दिला. तो मूळ विषयाशी अवांतर असला तरी विचारांना चालना देणारा, स्वतःचा जीव असलेला असल्यामुळे तो स्वतंत्र धागा म्हणून वेगळा काढत आहोत. ज्या प्रतिसादाला उत्तर म्हणून तो दिला होता तो प्रतिसाद इथे सापडेल. - ऐसी अक्षरे

<<सांगण्याचा मुद्दा हा की मी स्वतःला कॅपिटलिस्ट म्हणवत होतो (किंवा कम्युनिस्ट विरोधक मानतो) हे कितपत खरे आहे ? की हा निव्वळ अभिनिवेश आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे. कारण कॅपिटलिझम वर टीका झाली की मी लगेच हिरीरीने प्रतिवाद करायला सगळी आयुधं शमी च्या वृक्षावरून काढून घेऊन येतो पण कॅपिटलिझम बद्दल अनेक साहित्य असे आहे की जे मी वाचलेले नाही.>> असं स्वतःच्या आत डोकावून पाहू लागलं की काही गुंते सरसर सुटत जातात मित्रा, पण तरीही आणखी काही शिल्लक राहणारच आहेत याचं भानही येतं.

अनेकदा मला एका मित्राकडून दुसर्‍या मित्राबद्दल 'तू त्याच्याशी मैत्री कसा करू शकतोस?' अशी पृच्छा होते. माझ्या मित्रांमधे कट्टर संघवादी, संघविरोधक पण सावरकरवादी, भान असलेले आंबेडकरवादी, आंबेडकरवादाला निव्वळ ब्राह्मणेतरवादाच्या पातळीवर आणून ठेवणारे, पुरोगामित्व म्हणजे विद्रोह आणि विद्रोह म्हणजे जे जे प्रस्थापित त्याचा विध्वंस असा समज असणारे, मोदीप्रेमी, मोदीविरोधक, केजरीवाल समर्थक असे अठरापगड प्रकारचे मित्र आहेत. (आणि मी जेव्हा मित्र म्हणतो तेव्हा वास्तविक अर्थाने मित्र म्हणतो, फेसबुक-मित्र नव्हे!) त्यांच्या त्या त्या मला न पटणार्‍या इजमच्या वा त्याच्या एखाद्या अंगाच्या किंवा नावडत्या रंगांच्या झेंड्यांपलिकडे त्यांचे अस्सल असे काही वैशिष्ट्य असते ते मी शिकून घेऊ शकतो.

'हा ना कम्युनिस्ट आहे, मग असंच बोलणार' असा दावा करून आपली सुटका करून घेता येते, पण याचाच अर्थ आपण समोरच्याने निर्माण केलेल्या प्रश्नाला बगल दिली आहे असाच असतो. बहुमताच्या जोरावर तरीही 'जितं मया' चा डान्स करता येईल, समोरच्याला 'नामोहरम केल्याचा' आनंद साजरा करता आला तरी आपले म्हणणे त्याच्यापर्यंत पोचवल्याचे वा निरूत्तर केल्याचे(?) समाधान हाती लागत नाहीच. तेव्हा मी त्याचा अंगीकृत इजम वा विचार गृहित धरून त्याच्या मुद्द्यांकडे पाहू लागलो तर अनेकदा त्या इजमला विसंगत पण त्याला मान्य असलेले मुद्देही आपण त्याच्या इजमच्या समर्थनार्थ आहेत या घट्ट गृहितकामुळे सोडून देतो.

वैयक्तिक रित्या कोणत्याही इजमला, झेंड्याला वा कोणत्याही अदृष्य खुंटीला टांगून घेऊन जगणे मला पसंत नाही. माणूस सतत बदलत असतो, नवनवे विचार, मुद्दे पुरावे यांच्या माध्यमातून जुने टाकून देतो नवे स्वीकारतो. अंधभक्ती बुवा-बाबाची असो की इजमची, सारखीच धोकादायक. आणि निव्वळ ढीगभर वाचून, माहिती घेणेही पुरेसे नसते, त्यातून आपल्यापुरते काही सिद्ध करणे, आत्मसात करणे महत्त्वाचे; मग भले ते मूळ विचाराशी तंतोतंत जुळत नसेल. हे बहुधा केले जात नाही कारण अमुक नेता, अमुक इजम, अमुक पक्ष याचा स्वीकारच मुळी गर्दीतील सुरक्षिततेची भावना हवी म्हणून केलेला असतो. असा स्वतःचा 'टेलर मेड' इजम तयार झाल्याने आपल्याच गर्दीत काहीवेळा विसंवाद होण्याची भीती निर्माण होते. त्यापेक्षा 'दे हाता शरणागता' म्हणून एक हात पकडणे अधिक सोपे, निर्धास्तपणाचे असते. केल्या कृतीची नि समोर आलेल्या भविष्याची जबाबदारीही आपल्यावर रहात नसल्याने हे अधिकच सोयीचे होते.

मला कुणी कम्युनिस्ट म्हटले की मी त्याच्याशी कम्युनिस्टासारखा बोलेन, कुणी समाजवादी म्हटले तर समाजवाद्यासारखा बोलेन, कुणी 'तू संघवाला आहेस' म्हटले तर त्याच्याशी 'आसिंधुसिंधु हिंदू' वगैरे बद्दल बोलेन. मला कम्युनिस्ट म्हणणार्‍याला 'बूर्ज्वा वर्गाचा प्रभाव असणारी समाजव्यवस्था ही स्थूलमानाने आणि तुलनेने चांगली व्यवस्था मानणारा मी, समाजातील सार्‍या समस्यांचे मूळ हाच समाज असं मानणारा कम्युनिस्ट कसा असेन?' हा प्रश्न विचारणार नाहीच. विचारला तरी तो तटस्थ समतोल बुद्धीने याचे उत्तर शोधेल याची खात्री देता येणार नाही. याचे कारण बहुतेकांना आपला समज बरोबरच आहे असा ठाम विश्वास असतो, तो प्रतिवाद केल्याने दूर होत नसतोच; झालाच तर माणूस दूर होतो. तुमचे उत्तर जर त्यांच्या समजाला अनुकूल असेल तर 'बघ त्यानेही मान्य केले.' हा उत्तरार्ध असेल आणि उत्तर प्रतिकूल असेल तर 'आता तो मान्य करत नाही, पण मनातून त्याला ठाऊक आहे माझे म्हणणे बरोबर आहे.' असा असेल इतकाच काय तो फरक. आणि तसेही मी अमुक रंगाचा, माझ्या खांद्यावर अमुक रंगाचा झेंडा आहे 'म्हणून' मी ग्रेट वगैरे समज नाहीत माझे. तेव्हा कुणी कुठलेही लेबल लावले तरी मी ते आनंदाने स्वीकारतो. कारण त्या लेबलच्या आत मी कसा आहे हे माझे मलाही नक्की सांगता येणार नाही तर इतरांनी त्यांना ठाऊक असल्याचा दावा करणे हे फारतर त्यांच्या आत्मसंतुष्ट वृत्तीचे निदर्शक आहे असे म्हणता येईल. त्याचा प्रतिवाद करण्यात मी वेळ का खर्च करू .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिसाद दिला तेव्हा एकदा याचा स्वतंत्र धागा करावा असा विचार मनात आलाही होता, कारण त्या मूळ धाग्याला हा फाटा फुटलेला होता नि त्याला स्वतंत्र जागा द्यायला हवी होतीच. पण घाईत राहून गेले. शीर्षकही समर्पकच निवडले आहे. संपादकांचे आभार. (मूळ प्रतिसादातील एक वाक्य - जे केवळ वैयक्तिक मैत्रीखातर लिहिले गेले होते ते - अस्थानी म्हणून इथे वगळले आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

माणूस सतत बदलत असतो, नवनवे विचार, मुद्दे पुरावे यांच्या माध्यमातून जुने टाकून देतो नवे स्वीकारतो.

सहमत व्हावसं वाटतय याच्याशी पण ही argument पळवाट म्हणून वापरलेली पण पाहिलेली आहे. आधी विचार न करता ठाम मतं ठोकून द्यायची. आणि नंतर मत बदल्यावर/ नवीन काहितरी वाचल्यावर, 'माणसाचे विचार बदल असतात' किंवा Consistency is the last refuge of the unimaginative असली वाक्य वापरणारे लोक पण पाहिलेत काही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माणूस सतत बदलत असतो, नवनवे विचार, मुद्दे पुरावे यांच्या माध्यमातून जुने टाकून देतो नवे स्वीकारतो.

सहमत व्हावसं वाटतय याच्याशी पण ही argument पळवाट म्हणून वापरलेली पण पाहिलेली आहे. आधी विचार न करता ठाम मतं ठोकून द्यायची. आणि नंतर मत बदल्यावर/ नवीन काहितरी वाचल्यावर, 'माणसाचे विचार बदल असतात' किंवा Consistency is the last refuge of the unimaginative असली वाक्य वापरणारे लोक पण पाहिलेत काही.

अनुपभाऊ, तुम्ही जे म्हणताय ते समजतंय मला.

पण वैचारिक दृष्ट्या भूमिकेत बदल होणे हे टिपिकल आहे. ते एक्सेप्शन नाही. मी स्वतः कॅपिटलिस्ट बनण्यापूर्वी ना कॅपिटलिस्ट होतो ना साम्यवादी ना समाजवादी. सॉवेल साहेब पूर्वी मार्क्सवादी होते आता कॅपिटलिस्ट आहेत. आर्थर कोस्लर यांचे (संपादन केलेले) "द गॉड दॅट फेल्ड" हे पुस्तक अशाच भूमिकेत बदल झालेल्या (फ्रस्ट्रेटेड) साहित्यिकांचा दृष्टिकोन मांडते. फार काय ... कॅपिटलिझम चे स्वतःचे मायने सुद्धा बदलत आहेत. कॅपिटलिझम च्या चार एव्होल्युशनरी स्टेजेस बद्दल विल्यम बॉमॉल यांनी लिखाण केलेले आहे - 1) State guided capitalism, 2) Oligarchic capitalism, 3) Institutional capitalism and 4) Enterpreneurial capitalism. खुद्द संकल्पना व तिचे मायने बदलत असतील तर व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो आहे - यात नवीन्/ऑड काहीच नाही. (हे शेवटचे वाक्य मला जरास्से प्रॉब्लेमेटिक वाटतेय ... पण यु गेट द प्वाईंट.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक एखाद्या इझमच्या नादी त्याचा नीट अभ्यास न केल्याने लागतात. कोणत्याही इझमचा संदर्भ, फ्रेमवर्क, काळ, अप्लीकेशन, मर्यादा, इ इ न पाहता केवळ अस्मिता, इतिहास, फॅशन पाहून इझम निवडला जातो. उदा आर्थिक समता आणि धार्मिक स्वातंत्र्य हे दोन भिन्न विषय आहेत. समता मानणारे, न मानणारे आणि स्वातंत्र्य मानणारे , न मानणारे मिळून चार प्रकारचे लोक बनतात. पण ते भांडवलवादी आणि साम्यवादी या दोनच शब्दांत गुंडाळले आहेत. आर्थिक व्यवस्था कशी असावी आणि समाजात धर्म कसा पाळला जातो यांचे हजारो उपप्रकार, अस्पेक्ट्स आहेत. त्यांना एकच शब्द देऊन गोंधळ उडतो.

आता हा एक नवा इझम आहे का माहीत नाही पण लोकांनी कसं वागावं याबद्दल इझमी लोकांचं इतकं तीव्र मत का असतं मला माहीत नाही आणि मला ते मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीवादी, सेक्यूलर, सर्वाहारी, फिटनेसवादी, स्त्रीपुरुषसर्वतःसमानवादी, सर्वसंस्कृतीसमादरणीयवादी, सर्वक्लाससमानवादी, पर्यावरणवादी, भूतदयावादी, भांडवलशाहीवादी, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी, टेक्नॉलॉजीवादी, एलजीबीटीवादी, मातृभाषावादी, इ इ असावं अशी फार तीव्र अपेक्षा लोकांकडून होते. म्हणजे मी तसा नाही, किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही, हे पाहिलं कि लोकांना धक्काच बसतो. ज्यांना ज्या ज्या इझमवर विश्वास आहे त्यांना त्या त्या इझमवर रॅशनल प्रश्न विचारलेले चालत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्यांना ज्या ज्या इझमवर विश्वास आहे त्यांना त्या त्या इझमवर रॅशनल प्रश्न विचारलेले चालत नाही.

ऐसी-इब्लिस जी ने क्या बात बोली है. बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!

संदर्भ ओळखणारांना माझ्याकडून एक मार्मिक श्रेणी प्रत्येकी भेट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोक एखाद्या इझमच्या नादी त्याचा नीट अभ्यास न केल्याने लागतात.

चिंताजनक वाक्य.

१) मार्क्स हा मार्क्सवादी होता हे बरोबर आहे का? मार्क्स ने मार्क्सवादाचा अभ्यास न केल्याने तो त्याच्या मागे लागला का?
२) तीच गोष्ट एन्गल्स ची. एन्गल्स हा आद्य साम्यवादी. एन्गल्स ने साम्यवादाचा अभ्यास न करता तो त्याच्या मागे लागला का ?
३) हायेक ने भांडवलवादावर मूलगामी संशोधन व भाष्य केले आहे. हायेक ज्युरिस्प्रुडन्स मधे व अर्थशास्त्रात निपुण होता. या दोन्ही विषयात त्याने उच्चशिक्षण घेतलेले होते. व अर्थशास्त्रात तर थेट संशोधन केलेले होते. इतके की त्याला बिझनेस सायकल्स या विषयातील त्याच्या संशोधनासाठी नोबेल मिळाले. त्याने मानसशास्त्रावर ही पुस्तक लिहिलेले होते (सेन्सॉरी ऑर्डर). अभ्यास न करता तो भांडवलवादाच्या मागे लागला असे म्हणता येणे अशक्यप्राय आहे. व्यक्तिस्वातंत्र्यवादावर त्याचे लिखाण सुप्रसिद्ध आहे. पुस्तकाचे नाव - इंडिव्हिज्युअलिझम अँड इकॉनॉमिक ऑर्डर. व्यक्तीस्वातंत्र्यवादाचा अभ्यास न करता तो त्याच्या मागे लागला ? खरंच ?
४) फ्रिडमन साहेब तर सांख्यिकीचे तज्ञ. व तसेच अर्थशास्त्री ही. मॉनेटरी इकॉनॉमिक्स मधे मूलभूत संशोधन करणारे. व कॅपिटलिझम वर भाष्य करणार्यांमधे सर्वात परिचित विचारवंत. कॅपिटलिझम चा अभ्यास न करता ....?

----

आता "नादी लागतात" या संज्ञेचा एखादा उप-अर्थ फोकस करून हे वाक्य लिहिले असेल तर माझा प्रतिवाद मी सपशेल मागे घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कम्प्लीट गल्लत आहे....

लोक 'मागे लागतात' असे म्हणतो तेव्हा ते त्यांनी स्वत: निर्माण न केलेल्या (कुणा दुसर्‍याने मांडलेल्या) गोष्टीच्या मागे लागतात असा अर्थ असतो.

मार्क्स-मार्क्सवाद वगैरे जोड्यांना हे लागू होत नाही. मार्क्स मार्क्सवादाच्या मागे लागला नसून मार्क्सवादाच्या 'पुढे' होता असे म्हणावे लागेल.

असो. मार्क्स आणि गांधी हे अनुक्रमे मार्क्सवादी आणि गांधीवादी नव्हते असा संशय आहे. मार्क्सने तर "थँक गॉड आय अ‍ॅम नॉट मार्क्सिस्ट" असे म्हटले असल्याचे वाचले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

याचे कारण बहुतेकांना आपला समज बरोबरच आहे असा ठाम विश्वास असतो, तो प्रतिवाद केल्याने दूर होत नसतोच; झालाच तर माणूस दूर होतो.

आत्ताच मी एका मित्राशी बोलत होतो, त्यात त्याने एक मुद्दा मांडला तो बऱ्याच अंशी पटलाही. तो म्हणाला की एखाद्याचे विचार माझ्याशी जुळले नाहीत तरी मला हरकत नसते. मला हे शोधून काढायचं असतं की त्याची गृहितकं काय आहेत? आणि त्याने मांडलेले विचार हे त्या गृहितकांनुसार सुसंगत आहेत की नाही? ज्यांच्या बाबतीत गृहितकं ते विचार आणि त्यातून निर्माण होणारी विधानं हे सुसंगत असते त्यांच्याबाबत मला किमान आदर तरी असतो. अशा माणसांशी मग आपली गृहितकं काय आणि त्याची आपल्यापासून कशी वेगळी आहेत याबाबतीत चर्चा तरी होऊ शकते. पण बऱ्याच लोकांकडे हे सगळं मुळापासून आलेलं स्ट्रक्चर नसतं. ज्यांच्याकडे कुठच्यातरी ठाम वैचारिक पायातून वर न आलेले विचार असतात अशांशी संवाद किंवा चर्चा होणं शक्य नसतं. कारण जे काही असतं ते केवळ दुसरीकडून उचललेलं असतं.

हे त्याचे विचार मला शंभर टक्के पटतात. पुढे जाऊन मी असं म्हणालो की ज्यांच्याकडे असा वैचारिक पाया नसतो त्यांचे विचार हे वडिलोपार्जित चालत आलेल्या एखाद्या वारशाप्रमाणे मौल्यवान असतात, त्यात त्यांची भावनिक गुंतवणुक असते. त्यांवर हल्ला झाला असं वाटलं तर भावनिक प्रतिक्रिया होते. याउलट ज्यांना गृहितकं ते विचार हा प्रवास पक्का माहीत असतो, त्यांना आपली गृहितकं किंचित बदलून, त्यानुसार विचार बदलणं सोपं जात असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच काळाने राजेशबरोबर कोणताही किंतु परंतु वगळून, शत प्रतिशत सहमत व्हायचा योग आला आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राजेशिझम??? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच काळानंतर कुणालातरी निव्वळ +१ देऊन पुरेल असं वाटलं. एरवी आमचे चार आणे टाकल्याशिवाय बोलत नाही आपण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हजार चुराशीर मा – महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

ह्या धाग्यावर ह्या संदर्भातली चर्चा आहे.
तीसुद्धा इथे हलवता यावी.
http://www.aisiakshare.com/node/2428
.
.

गब्बर उवाच :-
एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय?
नास्तिक लोक भक्तीसंगीत, अभंग, भजने यांचा आनंद कसा लुटतात हा माझा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरित आहे.
.
.
मनोबा उवाच :-
कम्युनिस्ट व समाजवादाकडे झुकलेल्यांना (किम्वा निदान टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्यवादी नसलेल्यांना) गब्बरच्या प्रतिसादांचा अस्वाद घेता येतो का?
ररा क्वचित अवतरुन झकासपैकी काही लिहितात, तेव्हा गब्बर सारख्या श्रीमंत-धगदांडागे-सावकार धार्जिण्या माणसाला त्याचा आस्वाद घेता येतो का?
गेला बाजार गब्बरला नया दौर, नमक हराम वगैरे चित्रपट पहावेसे वाटतात का?
(कुणाचा अधिक अभ्यास असलयस इतर अधिक समर्पक चित्रपट सुचवावेत.)
टोकाच्या आशावादी घासकडवींना ट्राजेड्या , व इतर माहितीने खच्चून भरलेली पण चिंता व्यक्त करणारी (निराशावाद डोकावणारी) सादरीकरणे आवडत नसतीलच काय?
नगरिनिरंजन सतत "आधी होतो तसेच बरे होते. प्रगती नसून अधोगती सुरु आहे" असे अधून मधून सुचवत असले ("जुलूस") नि आदिम अवस्थेत जमेल तितके जगावेसे
त्यांना वाटत असले तरी डिस्कवरी च्यानेलवरील extreme mechanics व तत्सम कार्यक्रम वगैरे त्यांना आवडूच नये की काय?
.
.
खरेतर आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही, आवडत नाही असे आपण म्हणतो तेव्हा बहुतांश वेळा आपण त्याबद्दलच अधिक विचार, थॉट एक्स्परिमेंट केलेला असतो.
फार अभ्यस्त वगैरे मंडळीच हे करतात असे नाही, पण कुठलीही विचारशील व संवेदनशील व्यक्ती हे करण्याची शक्यता अधिक.
ही विरोधभक्ती असते.
विचार पटत नसला तरी एंजॉय करता येत असावाच (त्याच्या मर्यादा लक्षात आल्या तरी).
फक्त त्याबद्दलची तिडिक असली तर गोष्ट अवघड आहे.
.
.
घाटपांडे व नरेंद्र दाभोलकर ही दोन व्यक्तिमत्वे आस्तिक आहेत की नाहित ठाउक नाही. पण फार काही भाविक वगैरे वातत नाहित.
पण कैकदा ह्यांच्या लिखाणात सहजच एखाद्या अभंगाला quote करणे सुरु असते.
आवडिने वाचून नकळत ते लक्षात ठेवले जात असलयशिवाय असे होने शक्य नाही.
ही माणसे तुकाराम, नामदेव ह्यांना quote करत असली तरी काळ्या चिकट दगडाचा कमरेवर हात ठेवलेला कुणी पंढरीचा राजा ह्यांच्या आयुष्याचे फुक्टात भले करेल असे ह्यांना वाटत नसणार.
.
.
.
गब्बर उवाच द्वितीय :-
वा वा वा. मस्त प्रतिसाद, मनोबा.
पिनो न्युआर प्यायला या !!!

-------

गेला बाजार गब्बरला नया दौर, नमक हराम वगैरे चित्रपट पहावेसे वाटतात का?
(कुणाचा अधिक अभ्यास असलयस इतर अधिक समर्पक चित्रपट सुचवावेत.)
काला पत्थर हा माझा अत्यंत आवडता पिक्चर. माझ्या बायकोने सजेष्ट केला तो म्हंजे "मदर इंडिया".
कुली हा माझा अत्यंत नावडता. काय बकवास पिक्चर आहे !!!
---
ही विरोधभक्ती असते.
हे कधी ऐकलं नव्हतं. विचार करावा लागेल.
.
.
.
अरुण जोशी म्हणतात :-
मूळात एका माणसाचं एक तत्त्वज्ञान असतं हे मानणं चूकीचं आहे. आणि एका वर्तनाला एका विशिष्ट तत्त्वज्ञानाने मोजता येते हे तर अजूनच चूकीचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वा वा वा. मस्त मस्त लिहिलेत मनोबा. बोर्नव्हिटा घातलेले दूध प्यायला या !!!

------

ररा क्वचित अवतरुन झकासपैकी काही लिहितात, तेव्हा गब्बर सारख्या श्रीमंत-धगदांडागे-सावकार धार्जिण्या माणसाला त्याचा आस्वाद घेता येतो का?

अवश्य.

१) रमतारामाकडे मुद्द्यांची कमतरता नसते
२) भविष्यात कशाप्रकारच्या आर्ग्युमेंट्स साठी प्रतिवाद करावा लागेल याचा अंदाज रमतारामाच्या प्रतिसादातून येतो. शस्त्रांची धार तेज करण्यासाठी याचा उपयोग होतो.
३) arbitrage ??? (हे मात्र मी कै च्या कै....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबाला बोर्नविटा नि मला काय देणार बे. मी तुझ्या बुद्धीला धार लावण्याचा दगड म्हणून किती दिवस काम करतोय सांग बघू. (अर्थात मला बोर्नविटाची अ‍ॅलर्जी आहे हे सांगणे न लगे.)
<<रमतारामाकडे मुद्द्यांची कमतरता नसते>> यामुळेच तर काही लोक मला समाजवादी म्हणतात.
<<भविष्यात कशाप्रकारच्या आर्ग्युमेंट्स साठी प्रतिवाद करावा लागेल याचा अंदाज रमतारामाच्या प्रतिसादातून येतो. शस्त्रांची धार तेज करण्यासाठी याचा उपयोग होतो.>> अरे बापरे. मी प्रेडिक्टेबल होत चाललोय की काय. कल्जी घ्यायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

<<रमतारामाकडे मुद्द्यांची कमतरता नसते>> यामुळेच तर काही लोक मला समाजवादी म्हणतात.

पण... पण... पण... समाजवादाचा आणि (इकॉनॉमी ऑफ) शॉर्टेजचा काही अन्योन्यसंबंध असतो, असे कायसेसे म्हणतात ना?

मग, कमतरता नसलेले काहीही 'समाजवादी' कसे काय असू शकेल ब्वॉ?

लॉजिक कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता ते मी कसं सांगू? माझ्यावर समाजवादी असल्याचा ष्टांप उमटवणार्‍यांना विचारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अनेकदा मला एका मित्राकडून दुसर्‍या मित्राबद्दल 'तू त्याच्याशी मैत्री कसा करू शकतोस?' अशी पृच्छा होते

आम्हाला नेहमी 'तु कोणाशीच कशी मैत्री करू शकत नाहीस?' अशी पृच्छा होते. असो, असो. Wink

-सर्वद्वेष्टा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>> त्यांच्या त्या त्या मला न पटणार्‍या इजमच्या वा त्याच्या एखाद्या अंगाच्या किंवा नावडत्या रंगांच्या झेंड्यांपलिकडे त्यांचे अस्सल असे काही वैशिष्ट्य असते ते मी शिकून घेऊ शकतो. <<

>> वैयक्तिक रित्या कोणत्याही इजमला, झेंड्याला वा कोणत्याही अदृष्य खुंटीला टांगून घेऊन जगणे मला पसंत नाही. <<

>> कुणी कुठलेही लेबल लावले तरी मी ते आनंदाने स्वीकारतो. कारण त्या लेबलच्या आत मी कसा आहे हे माझे मलाही नक्की सांगता येणार नाही तर इतरांनी त्यांना ठाऊक असल्याचा दावा करणे हे फारतर त्यांच्या आत्मसंतुष्ट वृत्तीचे निदर्शक आहे असे म्हणता येईल. <<

मला पुष्कळदा असाच अनुभव येतो की एखाद्या विचारसरणीशी निष्ठा आहे असा ज्याच्याविषयी समज असतो अशा व्यक्तीला पुरेशा खोलात जाऊन पाहिलं तर त्यात अनेक अंतर्विरोध असतात. हे अंतर्विरोधच खरं तर ती व्यक्ती मला किती रोचक वाटते ते ठरवत असतात. फक्त राजकारणी आणि माथेफिरू लोकांचा ह्याला अपवाद : राजकारणी लोक आपल्याला पुरेसे खोलात शिरू देत नाहीत आणि माथेफिरूंमध्ये इतके अंतर्विरोध असतात की त्यातले किती कोणत्या विचारसरणीमुळे ह्याचं तर्कशास्त्र उभं करणं कठीण जातं. त्यामुळे अर्थात मैत्री करताना त्या व्यक्तीशी विचारसरणी जुळते का, ह्यापेक्षा त्याच्यापाशी सांगण्यासारखं काही इंटरेस्टिंग आहे का हे अधिक महत्त्वाचं ठरतं असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. अर्थात, ९९% लोक त्या 'इंटरेस्टिंग'च्या चाचणीत नापास होतात हा भाग अलाहिदा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भान असलेले आंबेडकरवादी, आंबेडकरवादाला निव्वळ ब्राह्मणेतरवादाच्या पातळीवर आणून ठेवणारे

रमता राम, तुमची मित्रा ची व्याख्या फार च ढगळ दिसते आहे. भांडवल्वादी आणि साम्यवादी मित्र असु शकतात. पण एकाच वेळेला चांगल्या वृत्तीचे आणि नीच वृत्तीचे लोक कसे तुमचे मित्र होउ शकतात.

जरा मोटे व्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Exhibit # 1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

स्वतःच्या प्रतिमांमधे अडकायचे भय वाटले कि मी ररांचा हा लेख / अशा प्रतिक्रिया वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अनेकदा मला एका मित्राकडून दुसर्‍या मित्राबद्दल 'तू त्याच्याशी मैत्री कसा करू शकतोस?' अशी पृच्छा होते.

मला अशी पृच्छा कधीही होत नाही. माझ्या मित्रांमधेही साम्यवादी, समाजवादी, भाजपावादी, डेमोक्रॅट्स, लिबर्टेरियन्स, राजकारणा/अर्थकारणाबद्दल कमालीचे उदासीन असलेले असे अनेक (पुलंच्या भाषेत विसंवादी ....) आहेत. एक जण तर इतका उदासीन की त्याचे काका राजकीय कार्यकर्ते आहेत (मध्यप्रदेशात) ... पण २००६ पासून आजपर्यंत ह्या पठ्ठ्याचा राजकीय कल काय हे मला माहीती नाही. पण मला आजपर्यंत हा/असा प्रश्न कुणीही विचारलेला नाही. माझ्या मित्रमंडलामधे काँग्रेस आणि भाजपा दोघांवर सायमल्टेनियसली सडकून टीका करणारा फक्त मी च एक. कदाचित हा माझ्या अभिनिवेशाचा (घमेंडखोर पणा म्हणूया) आणखी एक आविष्कार असावा. Robert Green says that only fools rush to take positions on every issue. आणि मला राजकारणा/अर्थकारणाबद्दलच्या कोणत्याही विषयावर भूमिका मांडायचा मोह कधीही आवरता आलेला नाहिये. कदाचित I am not comfortable with silence or vacuum.

(I am so f**in full of myself.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेले काही दिवस पहाटे ५ वाजता रशीद खानांचा ललत ऐकतो आहे, तुम्ही आठवण काढली आणि पहाटे जाग आल्यावर सहज ललत लावला, उन्हाळ्याची पहाट आणि रात्र खलास असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वयाची इतकी वर्षे अक्कलखाती गहाण पडल्यावर असे ठरवले आहे की कुठल्याच 'इझम' मधे अडकून पडायचे नाही, त्यातील चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा.
पूर्णपणे नास्तिक असूनही मी भजन, भक्तिसंगीत याचा आनंदाने आस्वाद घेऊ शकतो. त्यातला भजनी ठेका(नीट लावला असेल तर) मला डोलायला लावतो, त्यातले आर्त सूर माझ्या डोळ्यांत पाणी आणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0