दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१७ सप्टेंबर
जन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री ॲन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)
मृत्युदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)
---
राष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती
१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.
१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.
१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.
१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.
१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.
१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.
१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.
२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- गवि
- चिंतातुर जंतू
द क्राउन
नेफि वर 'द क्राउन' चा पहिला एपिसोड पाहिला. चांगली वाट्ते. चर्चिल ची एण्ट्री बघा. एकदम हीरो स्टाइलने. डाउनट्न अॅबी व मि. सेल्फरिज पाहिल्यावर ब्रिटिश कालाचे कॅलिब्रेशन ४० वर्षे पुढे आणावे लागेल तुम्हाला ही सिरीयल बघताना
पण डाउन्टन अॅबी मधली मिशेल डॉकरी घ्यायला हवी होती एलिझाबेथ म्हणून. ती सुरूवातीला अगदी मिळमिळीत ब्रिटिश लेडी वाटली होती पण नंतर आवडू लागली. अगदी बदाम शेप्ड गॉगल घालून बघतो त्या कॅटेगरीत (उदा: आण्टुराज मधली स्लोन, बिग बँग थिअरी मधल्या पहिल्या सीझन मधली पेनी, फ्रेण्ड्सच्या सुरूवातीच्या सीझन्स मधली रेचेल) नाही, पण किंचित बदामी शेड वाले वापरेन. तिची एक दुसरी सिरीयल येत आहे. टीएनटी वर आहे - गुड बिहेवियर. इंटरेस्टिंग वाटते.
१००० रीझन्स आय हेट यु
झकास चिक फ्लिक.
ए दिल है मुश्किल
ए दिल है मुश्किल पाहिला...ऋषिकेश यांच्याशी सहमत. खूप विचार करूनही पडद्यावरची पात्रं अशी का वागतायत याचं कुठलंही लॉजिकल कारण समजलं नाही. कदाचित हे माझ्या मध्यमवर्गीय बुद्धीच्या मर्यादेमुळे (किंवा बुद्धीच्या मध्यमवर्गीय मर्यादेमुळे) असावं. असो.
(No subject)
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
हाहाहा
टू गुड!!!
.
कर्नाटकी स्टाईलने गायलेला हा
कर्नाटकी स्टाईलने गायलेला हा अभंग ऐकला. पहिल्यांदाच ऐकल अससं काही. छान आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कर्नाटकी स्टाईलने गायलेला हा अभंग
ऐकायला आणि पहायलाही छानच वाटला. खरंय, पुर्वी असं कधी ऐकले नव्हते. मनापासून आवडले.
ढेरेशास्त्री आवडले हो हे
ढेरेशास्त्री आवडले हो हे गायन.
अप्रतिम
(No subject)
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
कौल
कुणी कौल पाहिला का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मी काही दिवसांपूर्वी चव्हाण
मी काही दिवसांपूर्वी चव्हाण सेंटरला जाऊन पाहिला होता. पण काही दृष्यात दचकायला होणं, पुढे काहितरी विचित्र घडणार असं सतत वाटत रहाणं आणि लहानपणी अनुभवलेलं कोकणातलं पावसाळी गूढ वातावरण यापलीकडे काहिही हाती लागलं नाही. फारसा नाही आवडला, पण बरेच रिव्ह्यु चांगले आहेत.(आजचा लोकसत्तातलं परिक्षण थोंडफार मी म्हणू पहातेय तसं आहे) कदाचित मला कळला नसावा. मी त्यावर लिहीलेलं हे काही इथं.
अर्थात आदिशचा कॅमेरा जादू करतो. (काल फॅन्टास्टिक बीस्ट पाहिल्यावर त्या ४डी पेक्षा दचकवण्याचं काम आदिशचा कॅमेरा फारच चांगलं करू शकतो हे प्रकर्षानं जाणवलं. ;)) खास करून सुरूवातीला नायकाचे हरवलेले काही तास.
तुम्ही पाहिला असेल पिफला. तुम्हाला कसा वाट्ला, ते लिहा म्हणजे माझ्या समजात/बघण्यात काय त्रुटी आहेत ते कळेल.
आणि लहानपणी अनुभवलेलं
याबद्दल आणखी लिहा ना.
कौलबद्दल आदीश केळुस्करचं हे
कौलबद्दल आदीश केळुस्करचं हे म्हणणं भलतंच रोचक आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फंटास्टिक बिस्ट अन हाव टु फाइंड देम पाहिला..
जेकेआर आर चा पंखा असल्यामुळेच.. अन्यथा.. असो... रंगमंचावर पोकेमॉन गो खेळ चालु आहे की काय वाटुन गेले... मला आवडला नाही पण इतरांना बहुदा रुचावा...
तसेच फोर्स दोन बघीतला... देमार चित्रपटांच्या पंख्यांना मस्तच वाटेल... फोर्स वन इतका सेडीस्टीक नसल्याने एकुणच चित्रपट ठिक.
actions not reactions..!...!
फँटास्टिक बीस्ट्सचे सगळे
फँटास्टिक बीस्ट्सचे सगळे रिव्हू असेच आहेत...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मला आवडला फंटास्टिक बीस्टस.
मला आवडला फंटास्टिक बीस्टस.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नक्कि काय आवडले ?
कोलिन फॅरल ? जॉनी डॅप्प ?
कोणतेही वाक्य बोलण्यापुर्वी थोडं हसुन नाक जमिनीकडे करुन मगच संवाद म्हणणारा नायक ?
फंटास्टीक पोकेमॉन्स जे त्याला गोळा करायचे आहेत ?( तसा प्रकार वाइट नाही पण कथानक म्हणून पुरेसाही नाही)
अजुन काही ?
असो दुस्रा भाग रोच्क असावा अशी अपेक्षा आहे लेटस सी.... जेकेआर ची जादु अजुनही मनावर आहे. सिरीज संपली तेंव्हा एक वॅक्युम जाणवत होताच... तो असा सहजतेने भरुन येणार नाहीच म्हणा
actions not reactions..!...!
असं एक कारण नाही. पण सिनेमा
असं एक कारण नाही. पण सिनेमा आवडला. बहुधा परत हॅ.पॉ जगात जाणं आवडलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
. बर्याच दिवसांनी मधुबालेचा
.
बर्याच दिवसांनी मधुबालेचा एक (पूर्वी न पाहिलेला) फोटो पाहीला. असूयाग्रस्त स्त्रियांना आदळआपट करण्यासाठी निमित्त (संधीची समानता) असावे म्हणून इथे डकवत आहे.
.
.
.
बर्याच दिवसांनी मधुबालेचा
" ती पाहताच बाला , कलिजा खलास झाला " याच्या पलीकडे काय म्हणणार ? चेहर्यावरील भाव,
नजरेतील खट्याळपणा बरेच काही सांगून जातो.
अतीसुंदर! (मधुबालेबद्दल
अतीसुंदर!
(मधुबालेबद्दल बोलताना ति चा ती होतो. ग्रामर रोमानेस एयुंट डोमुस.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मधुबाला तिरळी आहे.
मधुबाला तिरळी आहे१.
एवढेच नव्हे, तर ती धिप्पाडसुद्धा आहे.
बाकी चालू द्या.
-----------------------------
१ हे 'राजा नागडा आहे'१अच्या चालीवर वाचावे.
१अ बोले तो, 'राजाचे नवे कपडे' नामक त्या कोणत्याशा सुप्रसिद्ध कथेतील राजा. मधुबाला नव्हे. (थ्यांक गॉड!)
फेलो मधुब्रिगेडियर्स - हा बघा
फेलो मधुब्रिगेडियर्स - हा बघा अजूनेक ब्लास्फीमर! घ्या राउंडात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाउस ऑफ स्मॉल क्यूब्स
आत्ताच नेटफ्लिक्सवर एक बारा मिनिटांची छोटीशी फिल्म बघितली. हाउस ऑफ स्मॉल क्यूब्स. नेटफ्लिक्स असेल तर जरूर पाहा. नसेल तर खाली व्हिडियो एंबेड केलेला आहे. मानवी आयुष्यावर इतकं सुंदर भाष्य, केवळ चित्रबोलीतून, फार वेळा पाहायला मिळत नाही. किंचित गोग्गोड, पण दवणीय बिलकुल नाही.
ओके
फिल्म यथातथाच वाटली, पण त्या निमित्ताने आज खूप दिवसांनी पुढील व्हिडियोची आठवण झाली.
Force 2 नावाचा एक "महान"
Force 2 नावाचा एक "महान" चित्रपट पाहिला. आजपर्यंत च्या इतिहासात यापेक्षा "महान" चित्रपट कोणीही बनवला नसेल. व ना भविष्यात कोणी बनवू शकेल.
फुतुरे इज फुल्ल ओफ पोस्सिबिलितिएस
actions not reactions..!...!
"महान" नावाचा सिनेमा पण महान
"महान" नावाचा सिनेमा पण महान होता.
फॅण्टास्टिक बीस्ट्स अँड
फॅण्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टु फाईंड देम
रेडिट आणि इतर माध्यमांतला [स्पॉयलर्स] असा बिल्ला लावलेल्या पोस्टसचा मारा असह्य होऊन शेवटी काल पाहिला.
थोडक्यात सांगायचं तर - आवडला.
कथानक या अंगाने विचार करायचा तर कितीतरी गोष्टींची संगती लागत नाही. पण फॅबी सीरीजमधल्या पाच भागांपैकी हा एक असल्याने याबाबत बेनिफिट ऑफ डौट द्यायला मी तयार आहे.
सिनेमातली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे १९२६ सालचं न्यूयॉर्क. नंबरी काम जमलंय. दुसरं म्हणजे न्यूट स्कॅमॅण्डर हा विक्षिप्त एककल्ली नायक.
पॉटरपेक्षा खूपच मोठा कॅन्व्हास घेऊन आलेली ही सीरीज आहे.
पटकथेचं पुस्तक मागवलेलं आहे. अधिक लिहिणे ते वाचल्यानंतर.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मोटर सायकल डायरीज बघितला...
फिडेल कॅस्ट्रोचा जिगरी मित्र चे गुवेरा जेंव्हा बाइक रोडट्रिप्वर होता त्याच्या अनुभवावर हे पुस्तक आनी त्यावर हा सिनेमा आहे. जब तक है जान ची गिटार थिम रेहमानने या चित्रपटातुन जशीच्या तशी ढापली यापलिकडे कधी याकडे लक्ष दिले न्हवते आता अचानक कॅस्ट्रोबाबत बरीच उचक्पाचक सुरु असल्याने हा चित्रपट परत नजरेत आला. बघितला.. छान, ठिक आहे.
actions not reactions..!...!
सुरखाब -
सुरखाब - https://www.youtube.com/watch?v=DNaM3ihIllY
रहस्यपट.
(No subject)
ऐसीकर अनुप ढेरे यांनी
ऐसीकर अनुप ढेरे यांनी लिहिलेला फँटास्टिक बीस्ट्सचा रीव्ह्यू
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ढेरेशास्त्री - रिव्ह्यु उत्तम
ढेरेशास्त्री - रिव्ह्यु उत्तम
__/\__ धन्यवाद!
__/\__
धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
काल पुण्यात ऐसी तैसी
काल पुण्यात ऐसी तैसी डेमोक्रेसी नामक स्टँडप कार्यक्रम बघितला. राहुल राम, वरुण ग्रोव्हर आणि संजय राजौरा असे तीन लोक हा कार्यक्रम करतात. राहुल राम हा इंडिअन ओशनमधला एक असा माहिती होता. वरुण ग्रोव्हर अनेक उत्तम बॉलिवुडी गाण्यांचा लेखक आणि मसानचा लेखक देखील म्हणून माहिती होता. राजौरा हा गडी या गृपच्याचा पार्श्वभूमीवरच माहिती होता.
राजकीय्॑ घडामोडी ही सेंट्रल थीम कॉमेडीची आणि त्या अनुषंगाने काही गाणी असा कार्यक्रमाचा बाज. गाणी ही पॉप्युलर गाण्यांचं एखाद्या सद्द्य घटनेच्या अनुषंगाने स्पूफ केलेली. तिघही 'लिब्रल' क्याटेगरीतले असल्यामुळे मोदीजींवर यथेच्छ विनोद. त्यांचा आधी एक पर्फॉर्मंस यु-त्युबवर पाहिला होता. या कार्यक्रमाला नवीन मटीरिअयल/गाणी आहेत अस म्हणाले होते. पण नव्यात डिमनिटायझेशनवरचे एक दोन जोक सोडले तर बाकी ठीक असेच होते. जुनी एकदोन रुटीन्स, उ.प्र. मधल्या रेल्वेतल्या संडासातलं टमरेल, पाकिस्तानवरच मेरे सामनेवाली सरहद पे गाणं परत ऐकताना पण धमाल आली.
राजौरा हा कायम अँग्री यंग मॅन असतो. त्याचे बिट्स थोडे तापदायक असतात. ग्रोव्हर अधून मधून रटाळ वाटतो पण एकंदर छान. राहुल राम सगळ्यात जास्तं धमाल आणतो गाण्यांनी/गिटारनी.
===
हार्ड रॉक क्याफेमध्ये कार्यक्रम होता. खाणं अतिसामान्य आणि अतिमहाग. बेचव बीफबर्गर खाल्ला. (म्हशीचा होता बहुधा.)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ढेरे शास्त्री , अहो काही
ढेरे शास्त्री , अहो काही गान्या गिन्याचे कार्यक्रम असल्यास कळवत चला हो ! ट्राफिक मुळे हल्ली पूर्व भागात उगाचच हिंडणे होत नाही . निमित्त मिळेल या मुळे . अवांतर : तुम्ही बीफ खाता ?
कार्यक्रम केवळ गाण्याचा
कार्यक्रम केवळ गाण्याचा नव्हता. ष्टांड्यप कॉमेडी + गाणी असा होता. पण सांगीन नक्की फुडल्या वेळेला.
आणि बीफ वर्ज्य नाही. पण अगदी दिसलं की खा देखील नाही. कधी वाटलच तर खातो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
Grym
जे लोक टोरंट वरून उतरून उत्तमोत्तम सिनेमे पाहतात आणि सुदैवाने ज्यांच्याकडे अमर्याद आणि/किंवा जोरदार इंटरनेट आहे त्यांच्या करिता.
१) यिफी हा कमीत कमी जागेत जास्त्तीत जास्त चांगली प्रिंट असणारे चित्रपट देणारा अपलोडर आहे. हा साधारणतः मध्यमवर्गियांचा अपलोडर म्हणता येईल.
फायदे : कमी साईज, ७२० आणि १०८० दोन्ही फॉरमॅट मध्ये उपलब्ध, सहज शोधता येतो, सीडर्स जास्त असतात, शॉर्ट बट स्वीट. (सरासरी साईज : ७२०पी : ७००/८०० एमबी; १०८०पी : १.२ ते २ जीबी)
तोटे: तुलनेने पॉप्युलर सिनेमे, ध्वनी कमी, वरती खाली काळ्या पट्ट्या(क्रॉप्ड) असलेला विडिओ, सबटायटल्स पाकीटात नसतात(इतरत्र स्वतंत्र शोधावे लागतात.)
२) जेवाके : उच्चमध्यमवर्गीयांचा अपलोडर
फायदे : ध्वनी उत्तम, ७२० आणि १०८० दोन्ही फॉरमॅट मध्ये उपलब्ध, सहज शोधता येतो, सीडर्स जास्त असतात, शॉर्ट बट स्वीट. (सरासरी साईज : ७२०पी : १ ते २ जी.बी ; १०८०पी : २.५ ते ४ जीबी), बहुतेक चित्रपट गाजलेले, आणि चर्चिले गेलेले असतात. चिनी आणि जपानी लोकप्रिय चित्रपट मिळतात, इंग्रजी सबटायटल्स आवर्जून अंतर्भूत केलेले असतात.
तोटे: तुलनेने पॉप्युलर सिनेमे, ध्वनी कमी, वरती खाली काळ्या पट्ट्या(क्रॉप्ड) असलेला विडिओ, तुलनेने सीडर्स कमी
३) ग्रिम : गर्भश्रीमंतांचा अपलोडर
फायदे : कुठेही काटछाट नसलेला विडिओ, ध्वनी सर्वोच्च दर्जाचा, जवळपास सर्व उत्तम नावाजलेले सिनेमे (आरटी किंवा मेटाक्रिटीक येथील), एक्स्ट्रा उपलब्ध, सबटायटल्स जे जे उपलब्ध आहेत ते सर्व, आवश्यक माहिती, कलेक्टर्स चॉईस
तोटे: (सरासरी साईज : १०८०पी : १० ते ४० जीबी प्रतिचित्रपट), सीडर्स कमी असतात, संयम ठेवावा लागतो,
४) शायनाग : हिंदी डब उपलब्ध करणारा माझ्या माहितीतला एकमेव अपलोडर
५) सुजॅद्र आणि अनॉक्समस : जागतिक सिनेमे अपलोड करणारे मध्यमवर्गीय अपलोडर.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
भारतात टोरेंटवर बंदी आली आहे
भारतात टोरेंटवर बंदी आली आहे असे वाचल्याने अनेक महिन्यात सिनेमा डाउनलोडवलेला नाही.
त्या बंदीचा काय स्टेटस? उठली का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चालू आहे. मी केलेत सिरीअल्स
चालू आहे. मी केलेत सिरीअल्स आणि सिनेमा डाऊनलोड. युटोरंट,कीकअॅस बंद पडलय, पण हे बंद पडलेत कारण युरोप्/अमेरीकेनी त्यांच्या मालकांवर कारवाई केलीय. पायरट्बे चालू आहे .बिड च्या नावाखाली.
माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर कुठल्यातरी उच्च न्यायालयानी पायरेटेड सिनेमा बघणे गुन्हा नसल्याचे म्हणले होते. ( वितरीत करणे गुन्हा असु शकतो )
पण टॉरंट सीड केला की आपोआप
पण टॉरंट सीड केला की आपोआप वितरण केल्यासारखंच झालं ना?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मुद्दा आहे आबा
मुद्दा आहे आबा
तुम्ही सीडींग डिसेबल करु शकता
तशी सोय असते. बहुतेक सर्व एप्लिकेशन्समधे.
actions not reactions..!...!
जरा गुगल केले तर जुन्या
जरा गुगल केले तर जुन्या बातम्या मिळतील
हे वाचा:
http://indiatoday.intoday.in/technology/story/are-you-a-criminal-now-use...
याचा सद्य स्टेटस माहित नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ओके, धन्यवाद. आता टोरंट
ओके, धन्यवाद. आता टोरंट वापरणे बंद करीन. तसेही फार काही डाउनलोड करण्यासारखे राहिले नाहिये.
शिप ऑफ थिसिअस, टॉरंट वगैरे
भारतात काही टॉरंट साईट्सवर बंदी आहे, म्हणजे आपले काही चतुर आयएसपी किकॅस.सीडी, पायरेटबे.सीई या साइट्स दाखवत नाहीत. टोरेंटिंगवर बंदी नाही. फायरफॉक्स साठी मी एक हॉक्स नावाची वीपीन सर्वीस वापरतो. आपल्याकडे बंदी असलेल्या सर्व साईट्स उघडतात.
ही बंदी किती सिरीयसली घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवावे. भारतात समलैंगिक संबंध असणे गुन्हा आहे तरीही आपल्या इथे तसे गुन्हे किती दाखल झाले आहेत? पायरसी वरची बंदी तर सर्रास फाट्यावर मारावी, असे माझे मत आहे. टोरंट होस्टींग साईटस ब्लॉक करणे सोपे आहे, पण भारतीय आयसपींना पीटूपी ट्रॅफिक ब्लॉक/कंट्रोल करत बसणे महागाचे आणि क्लिष्ट वाटत असावे. शिवाय तुम्ही आयसपींच्या अगदीच मुळावर उठला नसाल तर त्या कंपन्या लक्षही देत नाहीत. त्यांना भारतात किती हजार गुन्हे दाखल करावे लागतील आणि ते सिद्ध करावे बसावे लागेल.
मला जर कुणी धरलेच तर मी शिप ऑफ थिसीयसचा पॅराडॉक्स वापरेन : मुळातला सिनेमा क्रॉप होऊन मॉडिफाय होऊन माझ्यापर्यंत आला असेल तर मूळचा सिनेमा तरी म्हणावा का? मग मी पायरसी कशी केली?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
क्वालिटीचं काय?
मी चिकार गोष्टी डाउनलोड करून बघितल्या आहेत. माझा प्रश्न नैतिकता किंवा कायदेशीरपणाबद्दल नाही. स्वस्त क्वालिटीचा त्रास होत नाही का? नेटफ्लिक्स किंवा तत्सम सुविधा पुरेशा प्रमाणात आणि/किंवा स्वस्तात उपलब्ध नाहीत का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्वस्त क्वालिटी
तुम्ही ग्रिम सारख्या लोकांची टोरंट अपलोड्स पाहिली की क्वालिटी बद्दल प्रश्नच नाही. उदा. माझ्याकडे असलेला मेरू नावाची डॉक्युमेंट्री. एकाच टोरंट मध्ये काय काय मिळालं :
.
├── Meru.2015.Bluray.1080p.DTS-HD.x264-Grym.mkv (१० जीबी)
├── Meru.Extras-Grym
│ ├── At.Sundance-Grym.mkv
│ ├── Deleted.Scenes.with.Commentary-Grym
│ │ ├── Deleted.Scene1-Grym.mkv
│ │ ├── Deleted.Scene2-Grym.mkv
│ │ ├── Deleted.Scene3-Grym.mkv
│ │ ├── Deleted.Scene4-Grym.mkv
│ │ └── Deleted.Scene5-Grym.mkv
│ ├── Q.and.A.Session1-Grym.mkv (७०० एम्बी)
│ └── Q.and.A.Session2-Grym.mkv (७०० एम्बी)
नेटफ्लिक्सवर ट्रिविया मिळेलच असे नाही. शिवाय नेटफ्लिक्स चालवायचे म्हंटले की चांगल्या इंटर्नेट स्पीड साठी पहाटेची वेळ राखून ठेवावी लागेल!
जोवर ते अजून सहज उपलब्ध होत नाही तोवर मला तरी काही उपाय दिसत नाही! उपासमार तर शक्यच नाही!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
मान्य
मला ग्रंथालयातून डीव्हीड्याही फुकटात मिळतात. त्यात ट्रिविया, मुलाखतीचे कागद अशा बऱ्याच गोष्टी मिळतात.
अमेरिकेत बेरोजगार असण्यातला आनंद लुटायला शिकवला तो श्रीमंत आणि सार्वजनिक ग्रंथालयांनी. पत्त्याचा पुरावा सादर केला की सिनेमे, पुस्तकं अशा गोष्टी फुकटात घरी आणून उपभोगता येतात. दोन माणसांचं सँडविच खाण्याचा खर्च होईल तेवढ्यात एका महिन्याचं नेटफ्लिक्स मिळतं. ऑस्टिनात गूगल फायबर येण्याची घोषणा झाल्यापासून इंटरनेटही स्वस्त आणि मस्त झालंय. हे सगळं स्वस्तात उपभोगताना मला प्रश्न पडतो तो एकच - मला किंवा माझ्यासारख्यांना हाच उपभोग भारतात का मिळत नाही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
राग येणार नसेल तर सांगतो
कारण इथे तुमच्यासारखे फुकटे थोडेच. त्यांची कॉस्ट इतर नॉन-फुकटे भरून काढतात.
भारतात तुमच्यासारख्यांचं प्रमाण बख्खळ आणि पैसे भरणारे थोडे, कसं जमायचं?
मी नाय बा फुकटी!
मी घरपट्टी भरते१, नेटफ्लिक्सचे पैसे भरते, आणि इंटरनेटचं भाडंसुद्धा नियमितपणे भरते. भारतात माझ्यासारख्यांचं प्रमाण बख्खळ असेल तर मग सुविधा का मिळत नाहीत, असा प्रश्न आहे.२
१. घरपट्टीतून ग्रंथालयात पुस्तकं आणि डीव्हीड्या येतात; अशी पत्रं आमची मनपाच आम्हाला पाठवते.
२. भारतात घरपट्टी अगदी क्षुद्र असते, त्यामुळे ग्रंथालयाबद्दल फार प्रश्न नाही. पण इंटरनेटचा नळ ठिबकसिंचनासारखा चालणं, हा प्रश्न उरतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी घरपट्टी भरते१,
जी व्यक्ती दीर्घकाळ बेरोजगार आहे तिला हे कसं शक्य आहे?
फुकट पाहिजे म्हणून
याचे कारण शक्यतो फुकट पाहिजे म्हणून. फुकट मिळाले नाही तरच पैसे खर्च करायचे म्हणून. भारतात सेल्युलर फोन इतके स्वस्त असूनही मिस्ड कॉल्स वापरतातच ना लोक? कारण इनकमिंग कॉल फुकट आहे. भारतातले किती जण व्हॉइस मेल वापरतात? फारसे नाहीत कारण त्याला पैसे पडतात. मी जितक्यांना विचारलं त्यांनी प्रत्येकाने सांगितले की मला गरज पडत नाही, फोन करणार्याला गरज असेल तर परत फोन करेल. व्हॉइस मेल ही फोन करणार्याच्या सोयीसाठीपण आहे, हे कसे पटवणार त्यांना? मग टेक्ट करा. तो चालतोच कारण फुकट आहे. मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन.
उदयभाऊंचा विजय असो !!! पुढे :
उदयभाऊंचा विजय असो !!!
पुढे : फेसबुक, गूगल, ट्विटर, व्हॉट्सॅप्प हे भारतात का इन्व्हेंट झाले नाहीत ? वापरणार्यासाठी जवळपास फुकटच आहेत की ते ? डेटा प्लॅन घ्यावा लागतो पण ... भारतात किमान आयटी सॅव्ही वर्गात तरी त्यांचा प्रसार पटकनच झाला की ? मोदींनी किंवा सोगांनी कोणतीही स्कीम आणली नाही त्यांच्या प्रसारासाठी. तळागाळात पोहोचलं नाही हे माहीती आहेच. पण तळागाळातल्या लोकांना त्याची गरज वाटत नसेल. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाणी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं का ? पाणी जीवनासाठी अत्यावश्यक आहे, भारतात डझनभर मोठ्या नद्या आहेत. म्हंजे पाणी अमर्याद नसलं तरी चिकार उपलब्ध आहे, सिव्हिल इंजिनियर्स आणि गवंडी भरपूर आहेत. पण तरीही का नाही पोहोचलं ??
पुढचा प्रश्न हा की - फेसबुक, गूगल, ट्विटर, व्हॉट्सॅप्प मंडळी पैसा कसा कमवतात ?
इतकं फडतूस समजू नकोस.
इतकं फडतूस समजू नकोस. एकदशांश किमतीत मंगळयान पाठवणारा भारतच होता. भारतातसुद्धा आता बर्याच स्टार्टअप्स सुरू होत आहेत. यशस्वी व्हायला कदाचित वेळ लागेल त्यांना. थोडा धीर धर. पैसे खर्च करायला भारतीय ग्राहक तयार झाला पाहिजे, इतकाच माझा मुद्दा होता. व्यक्तिशः मी भारताला किंवा चीनला अंडरएस्टिमेट करत नाही, चीनला तर नक्कीच नाही.
इतकं फडतूस समजू नकोस. एकदशांश
नाय नाय.
मी अंडरएस्टिमेट अजिबात करत नैय्ये. सव्वालच नाही.
पण समाजवादी विचारसरणीमुळं आपलं मानसिक दृष्ट्या कंबरडं मोडलं.
माहितीपूर्ण आणि निरुपयोगी उत्तर
माझा प्रश्न असा आहे की साधारण मी जेवढे पैसे खर्च करते आणि वैध-कायदेशीर सुविधा मिळवते, त्या मी अमेरिकेत राहते म्हणून मला मिळणं ग्राह्य आणि भारतात राहणाऱ्या आणि तेवढे पैसे खर्चू पाहणाऱ्या किंवा खर्चणाऱ्या मला किंवा लोकांना मिळणं अग्राह्य हे कसं ठरवता? मला हे ठरवता येत नाही. म्हणून डाउनलोड करून सिनेमे, मालिका बघणं याबद्दल मी ननैतिक भूमिका घेते.
बाकी व्यक्तिगत पातळीवरच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज वाटत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भारतात राहणाऱ्या आणि तेवढे
भारतात राहणाऱ्या आणि तेवढे पैसे खर्चू पाहणाऱ्या किंवा खर्चणाऱ्या मला किंवा लोकांना मिळणं अग्राह्य >> भारतातले लोक जर तेव्हडे पैसे खर्च करायला तयार असतील तर उत्तम.
नक्की आक्षेप काय आहे?
१. मला सोयी मिळतात आणि भारतात त्याच सोयी का मिळत नाहीत (पैसे किती याच्याकडे दुर्लक्ष करून)?
२. मला स्वस्तात सोयी मिळतात पण भारतात महागात का मिळतात?
दुहेरी आक्षेप
अनेक सोयी भारतात मिळतच नाहीत; उदाहरणार्थ नेटफ्लिक्स गेल्या वर्षातच भारतात आलं, नील लोमस यांनी नेटफ्लिक्ससाठी पुरेसा नेट स्पीड न मिळण्याबद्दल लिहिलेलं आहे. काही सोयी मिळाल्या तरीही माझ्या वर्गातल्या लोकांना परवडण्यासारख्या नसतात; पुस्तकं विकत घेणं परवडत असलं तरीही ती घरात साठवणं परवडतं असं नाही, इबुकं उपलब्ध असली तरीही रास्त किंमतीला मिळत नाहीत आणि सार्वजनिक ग्रंथालयं सोयीच्या ठिकाणी आणि पुरेशी असतील याची खात्री नसते.
भारतीय किंवा अमेरिकी लोकांची वृत्ती कशी आहे, या चर्चेतून भारतातल्या तयार गिऱ्हाईकांना काहीही फायदा होत नाही. भारतात राहणाऱ्या माझ्या सुहृद, नातेवाईकांना 'अगं, नेटफ्लिक्सवर हा 'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक'चा नवा सीझन आलाय, तो जरूर पाहा' असं मला म्हणता येत नव्हतं. किंवा त्यांना बेकायदेशीर मार्गाने या गोष्टी मिळवाव्या लागतात. बेकायदेशीर प्रती मिळवण्याबद्दल या लोकांचं मूल्यमापन करण्याचा हक्क मी (हिसकवून म्हणा किंवा आणखी काही पद्धतीने म्हणा) स्वतःकडे घेत नाही. मला नैतिक पोलिस बनण्यात फार रस नाही. किंवा भारतातल्या लोकांचं हेच भागध्येय आहे, वगैरे ब्रह्मदेवगिरीही मला जमत नाही.
अतिशय निराळी गोष्ट म्हणजे, लोकांनी सिनेमांच्या प्रती कशा मिळवल्या यापेक्षा तो सिनेमा किंवा मालिका बघितल्या का, त्याबद्दल त्यांची काय मतं आहेत, यात मला थोडा अधिक रस आहे.
दळणवळणाच्या निरनिराळ्या साधनांमुळे आणि त्यांतल्या प्रगतीमुळे, एकूणच जागतिकीकरणामुळे, लोक वेगवेगळ्या देशांमध्ये राहणार, वेगवेगळ्या देशांंमधले लोक एकत्र गप्पा मारणार. त्यात पुस्तकं, चित्रपट, मालिका, लेख अशा गोष्टींची चर्चा होणार. एकाच आर्थिक आणि सामाजिक गटातले लोक निरनिराळ्या देशांमध्ये असणं आणि त्यांचं जोडलं जाणं या गोष्टी घडणार. कोणी अमेरिकेत आहेत म्हणून त्यांना सगळ्या सोयीसुविधा सहजरीत्या मिळणार आणि कोणी भारतात आहेत म्हणून त्यांना सोयीसुविधा मिळणार नाहीत, आणि त्यांनी त्या आपापल्या सोयीसवडीनुसार मिळवल्या तर ते चोर, ह्या विधानात मला फार काही दम दिसत नाही. किंबहुना, लोक असेच वागणार; त्यांना रास्त भावात सोयीसुविधा मिळाल्या नाहीत तर फायदा कमी होणार याची तयारी, विशेषतः डिजिटल तंत्रज्ञान वापरणाऱ्या, व्यावसायिकांना ठेवावी लागेल. (उदाहरणार्थ, मॉन्सान्टोला अशी भीती फार बाळगावी लागणार नाही, पण मोन्सान्टो हा निराळाच विषय आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किंबहुना, लोक असेच वागणार;
जोरदार सहमत.
इतकेच नव्हे तर पायरसी च्या बावजूद नफा कमावण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व स्ट्रॅटेजी हवी.
बोलणेचि खुंटले
अगदी माझ्या मनातलं बोललात! याउप्पर माझ्याकडून काही मांडता येणार नाही, माल़कीणजींनी व्यथा सुस्पष्ट मांडली आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो. मी जी काही गाणी ऐकतो ती मी सारेगामाच्या साईट वरून विकत घेतो. जुनी हिंदी गाणी परवा दहा रुपयांना चार अशा भावाने मिळत होती. शिवाय एकदा खरेदी केली की दहा स्वतंत्र वेळा डाऊनलोड करून आपल्याकडे कायमची ठेवता येतात. हे म्हणजे एकदा गंगेत बुडी घेऊन पापनाशन करण्याचा प्रयत्न नव्हे. गाण्यांची साईज खूप कमी असते त्यामुळे उत्तम इंटरनेट लागत नाही. सारेगामाने उतरवण्याची खूप चांगली सोय करून ठेवली आहे. किमतीही अत्यंत वाजवी आहेत.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
निरर्थक आक्षेप
ज्या गोष्टी अमेरिकेत मिळतात त्या भारतात पण मिळाव्यात ही अपेक्षा करणेच मुळात चुकीचे आहे. अमेरिकेत नेटफ्लिक्स आहे म्हणून भारतात पण असावेच हे म्हणणे निरर्थक आहे. गरज ही शोधाची जननी, या नात्याने भारतात नवे शोध लावायला ना नाही. जर पुरेसे पोटेन्शियल दिसले तर परदेशी कंपन्या भारतात येतीलच, तेव्हा उपभोग घ्यावा. अश्या बर्याच गोष्टी आहेत, ज्या मलापण अमेरिकेत इच्छा असूनही मिळत नाहीत. नाइलाज असेल अश्यावेळी fait accompli म्हणून आहे ते, आहे तसे घेण्याशिवाय पर्याय नसतो. माझे म्हणणे इतकेच होते की फुकट पाहिजे या वृत्तीने, पर्याय असूनही त्याचा उपभोग न घेणे. उदा: सुलभ शौचालयात १ रुपया द्यावा लागेल म्हणून मी रस्त्याचा वापर शौचालय म्हणून करायचा का?
आहे हे असं आहे.
भारतातले लोक फुकटेच असतात, आणि पाश्चात्य देशात राहणारे (भारतीय) फार नीतीमान असतात, असे सरसकट आरोप मला करता येत नाहीत. हा माझ्यातला मोठा दोषच; पण आहे हे असं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
१०८०पी ची क्वालीटी पण मिळते.
१०८०पी ची क्वालीटी पण मिळते. सबटायटल्स पण असतात बर्याच वेळेला.
पायरसी वरची बंदी तर सर्रास
सदर कलाकृती (इथे सिनेमा) सहज व वाजवी किंमतीत उपलब्ध नसेल तर याच्याशी तत्वतः पूर्ण सहमत आहेच.
पण सध्या रात्र (आणि दिवसही) वैर्याचे आहेत..
सध्या ज्या वेगात शिक्के लागताहेत त्यावेगात तुम्ही पायरसी केलीत म्हणजे तुम्ही देशद्रोही असा वणवा पेटला, की तर्क कितीही नेमका असला तरी राष्ट्रवादाच्या धुंदीपुढे त्याचा काय पाडाव!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
राष्ट्रद्रोह
त्यावर एक उपाय आहे : पहलाज निहलानींची "मोदी काका" ही फिल्म १:२ या रेशोने सीड करायची. म्हणजे आपला देशभक्तीचा शिक्का पक्का. मग होऊ द्या खर्च!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
अगदी अगदी. तीर्थात मुंडण,
अगदी अगदी. तीर्थात मुंडण, कोर्टात भांडण आणि टॉरेंटात सीडन करावयास लाजायचे नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शिप ऑफ थिसीयसचा पॅराडॉक्स.
मला जर कुणी धरलेच तर मी शिप ऑफ थिसीयसचा पॅराडॉक्स वापरेन : मुळातला सिनेमा क्रॉप होऊन मॉडिफाय होऊन माझ्यापर्यंत आला असेल तर मूळचा सिनेमा तरी म्हणावा का? मग मी पायरसी कशी केली?
तरीही ती पायरसीच कारण सदरील कंटेंट अथवा त्याचा एखादा भाग आपणास डिजीटल अथवा इतर कोणत्याही स्वरुपात/माध्यमात विनापरवानगी प्रकाशित/वितरीत करणे १००% गुन्हा आहे.
actions not reactions..!...!
मि बहुतेकवेळा टोरंट वापरतच नाही
डायरेक्ट ऑनलाइन चित्रपट बघायची सोय असणार्या अनेक सायटीच बघितल्या होत्या (अर्थात विडीओ ग्रबर डाउनलोडर वगैरे एक्सटेंशन असेल तर हे विडीओ ऑफलाइनही उपलब्ध्द होतात).. टोरंट नो नो.
सर्वात उत्तम म्हणजे IDM software. हे अप्रतिम डाउनलोडर आहेच पन हे इन्स्टाल असेल तर वेबपेज वरील प्रत्येक विडइओखाली याचा डाउनलोड धिस विडिओ अमुक तमुक एम बी साइज असा पॉपिन बोक्स येतो क्लिक केले कि डाउनलोड सुरु अन वेब पेज क्लोज करायचे. सर्व विडीओ फोर्म्यट स्पोर्ट हाहे यास्नी. तसेच याचा टेंपररी डाउनलोड फोल्डरही सेट करता येतो त्यामुळे स्लो कनेक्शनवरही हे विडीओ डाउन लोड सुरु असतानाही त्या फोल्डरमधुन हे विडीओ विएल्सी मधुन प्ले करता येतात व आपला वेळ वाचतो.
रच्याकने ऐसीवर अशा कोणत्याही बंदीची दखल घेत्ली गेली नाही हे अतिशय निराशाजनक आहे... छि:... अर्थात ही दखल बहुदा कुठेच घेतली नसावी अथवा मी गुहेत रहात असताना हि बंदी आली असावी
actions not reactions..!...!
धाक्क्ड
दंगलमधलं हे रॅप गाणं मस्तय
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कहर!
पायरेटेड किंवा अनधिकृतपणे डाउनलोडवलेल्या गोष्टी ज्यांना समर्थनिय वाटतात ते (बहुतांशी तेच), छापील साहित्याच्या चोरीबद्दल अगदी उलट भूमिका घेतात.
-अनामिक
हा हा हा! कविता महाजन यांनी
हा हा हा! कविता महाजन यांनी इथे एक त्रागा काढलेला ज्यात संदीप खरेला लै श्या घातलेल्या कॉपिराईट भंगासाठी. त्यात लोकांनी त्याला शिव्या देताना टॉरेंट्सचं समर्थन केलेल ते आठवलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कविता महाजन यांनी इथे एक
हांए? ये कब हुवा?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
http://www.aisiakshare.com/no
http://www.aisiakshare.com/node/2142
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दोन्हीमध्ये एक महत्त्वाचा फरक
दोन्हीमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे.
मी क्रिस्तोफर नोलानचा सिनेमा अनधिकृतपणे डाऊनलोडवला तरी तो मी क्रिस्तोफर नोलानचाच म्हणून पाहतो आणि इतरांना दाखवतो. त्यातली एक फ्रेम बदलून "डायरेक्टेड बाय आदूबाळ" असं टाकत नाही.
पण लेखनढापक ते त्यांचं स्वतःचं म्हणून छापतात / प्रकाशित करतात. ते जास्त डोक्यात जातं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
+1 शिवाय इथे उपलब्ध नसलेलं
+1
शिवाय इथे उपलब्ध नसलेलं किंवा कैच्याकै महाग पुस्तक टोरेंटवरूनच सॉफ्ट कॉपी घेतली आहे. पुन्हा वर म्हटलं तर श्रेयअव्हेर न करता वाजवी किंमत आणि/किंवा सहज उपलब्धता नसेल तर पायरसीशिवाय पर्याय राहात नाही.
आम्ही कॉलेजात कितीतरी पुस्तकांच्या झेरॉक्स काढल्यात त्यात मला काहीही गैर वाटत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बोगस आर्ग्युमेंट. श्रेय एवढीच
बोगस आर्ग्युमेंट. श्रेय एवढीच अपेक्षा नसते कलाकारांची. पैसेदेखील असते. वरील अर्ग्युमेंत उगाच स्व:च समाधान म्हणून केलेली आहे. पण यावर बर्याचदा वाद झालेला आहे सो थांबतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
विस्कटून लिहितो (खूप लिहून
विस्कटून लिहितो (खूप लिहून झालंय हे मान्य, तेव्हा माझ्याकडूनही अंतिम)
१. मी त्या कृत्याला पायरसीच म्हणतोय.तसेच ते नैतिकदृष्ट्या योग्य असण्याचा दावा केलेला नाही.
२. मात्र मला मुळ कलाकाराला पैसे देण्यापैकी कोणतेही मार्ग मला सहज उपलब्ध नसतील (जसे पुस्तक आउट ऑ प्रिंट आहे, भारतात उपलब्ध नाहि, किंवा एखादा परदेशी सिनेमा भारतात रिलीज होणारच नाही किंवा त्याची सिडीही इथे मिळणं अशक्य) मात्र पायरसीच्या मार्गाचा मला सहज उपलब्ध पर्याय आहे तरीही बघेन/वाचेन तर अधिकृतच असा बाणा बोगस नसेल कदाचित; पण माझ्यायासाठी तो बाणवणं सर्वथा अशक्य आहे. व माझ्या पुरता त्यात मला मोठा नैतिक पेच दिसत नाही.
3. प्रश्न उरतो मला अधिकृत रित्या सहज उपलब्ध गोष्टी आहेत परंतु मला त्याची किंमत परवडत नाही किंवा मला ती किंमत भयंकर गैरवाजवी वाटते अश्या कलाकृती. अर्थात इथे भूक कि चोरी ताईपचा चिरंतन प्रश्न क्वचितच उभा राहतो. मला परवडत नसतील तर।मी त्या गोष्टी बघत/वाचत नाही. अशा कलाकृती चोरणं मी शक्यतो टाळतो. पण अगदी क्वचित प्रसंगी नाईलाजाने -मग तो सिनेमा असो, पुस्तक असो किंवा इतर काही (इथे मला श्रेय अनिवार्य वाटते, पण )- पैशाच्या बाबतीत माझी त्यात्या कलास्वादाची भूक किंवा त्याहून अधिक त्याची गरज (जसे कॉलेजातील रेफरन्स बुक्स) मला चोरी करायला लावते. ती चोरी आहे हे मात्र मान्य आणि त्याची बोचही असते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जेके रोलिंग, स्टीव्हन किंग,
जेके रोलिंग, स्टीव्हन किंग, डॅन ब्रौन वगैरे दिग्गज वगळता कोणत्या लेखकाची चूल पुस्तकं लिहून पेटलीय ढेरेशास्त्री? मराठीत तर बहुदा** कोणाचीच नाही.
**मला वाटतं सुहास शिरवळकर हे एकमेव अपवाद असावेत, पण खात्री नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हल्ली सिनेमा, लेखक वगैरे चे
हल्ली सिनेमा, लेखक वगैरे चे अर्थशास्त्र बदलले आहे आबा.
लेखकाला पुस्तके विकुन पैसे मिळवायची गरज नसते. त्या ऐवजी व्याख्याने देण्यासाठी, सह्या करण्यासाठी, अजुन कुठे कुठे चांगले पैसे देऊन बोलवले जाते. ( हे मराठी लेखकांसाठी नाही ).
अभिनय, संगीत वगैरे फक्त प्रसिद्ध होण्यासाठी वापरायचे. त्यातुन पैसे नाही मिळाले तरी चालतात. नंतर लाइव्ह शो, जहिराती, लग्ना/मुंजीत, दहीहंडी वगैरेत जाण्याचे भरपुर पैसे मिळतात.
सह्या करण्यासाठी पैसे! ऐकावे
सह्या करण्यासाठी पैसे! ऐकावे ते णवलच!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
गो गो गोड
अच्युत गोडबोले (अर्थात, त्यांनी आधी आयटीत बक्कळ कमावले आहेत, पण तरीही बहुखपाऊगिरीमध्ये आज त्यांचा हात कुणी धरणार नाही.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नाव घेऊ नका त्याचे!
त्या मनुष्यास - आणि इथे ही टर्म मी फारच लूज़ली वापरलीय याची जाणीव आहे मला! - खरकट्या हातानेे थोबाडीत मारण्याची इच्छा अनावर होते. प्रचंड डोक्यात जातो तो - इसम!
(सवांतर: मराठी बोलताना वा लिहिताना 'चक्क' आणि 'पठ्ठ्या' या दोन शब्दांचे प्रयोग हे दखलपात्र तथा देहदंडनीय अपराध म्हणून सत्वर घोषित करण्यात आले पाहिजेत.)
आणि बहुपकाऊगिरीमध्येसुद्धा!
असो.
त्या पठ्ठ्याबद्दल चक्क एवढी
त्या पठ्ठ्याबद्दल चक्क एवढी तीव्र प्रतिक्रिया, नबा? व्हाट्स रांग?
----
चिंजंच्या प्रतिसादाच्या शीर्षकावरून
गो गो गोडबोले
महिन्यात एक बुक पाडे
इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन
असं एक गाणं सुचलं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अगदी हेच सांगायला आलो! केवळ
अगदी हेच सांगायला आलो!
केवळ काही लोकांवरच्या लोभापोटी किंवा त्यांच्या कलाकॄतींचा आस्वाद घेण्यासाठीच म्हणून आम्ही चित्रपट उतरवून घेतो. तो इतरांनाही त्यांचीच कलाकृती म्हणून दाखवतो. भारवाह्यांचे आभार मानतो. इतकंच.
तुलना करताना मुलभूत फरक तरी लक्षात घ्या. आस्वादक/रसिक/चाहता म्हणून जी जी सनदशीर/बेकायदेशीर खटपट करता येते ती करून आम्ही कलाकारांच्या कलाकृती त्यांच्याच म्हणून मिळवतो. आमच्या नावावर खपवून दंभ करत नाही!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
तुलना करताना मुलभूत फरक तरी
तुलना करताना मुलभूत फरक तरी लक्षात घ्या.
तुलना स्वतःच्या नावाने साहित्य खपवण्याशी नाहीच करत आहे; ति चोरी आहे आणी असायलाच हवी. वर दिलेल्या कविता महाजणांच्या धाग्यातही त्या म्हणतात की साहित्य वापरायचं तर परवानगी घ्यायला हवी. श्रेयअव्हेर न करता कविता, साहित्य वापरलं, परत छापलं तर मग त्या साहित्यीकाला प्रॉब्लेम असायला नको. पण त्या धाग्यातही कित्येक जणांनी सलील कुलकर्णी आणि त्या वर्तमानपत्राला दोषी ठरवलं, पण चित्रपट डाउनलोडवून बघण्याला समर्थन दिलं. हास्यास्पद नाही का हे?
-अनामिक
द अफेअर
सध्या 'शोटाईम'वर 'द अफेअर'चा तिसरा, नवा सीझन येतोय. त्यामुळे जुने सीझनही मिळत आहेत. चुकूनच एक भाग बघितला आणि ते पुरेसं रोचक वाटलं म्हणून पहिला सीझन बघून संपवला.
'द अफेअर' या नावावरूनच अंदाज येईल, ही मालिका ड्रामा प्रकारची आहे. अॅलिसन नावाची, छोट्या, टूरिस्टी गावात राहणारी स्त्री हे एक मुख्य पात्र. अॅलिसनचा चार वर्षांचा मुलगा काही वर्षांपूर्वी बुडून मेला आहे, ती त्यातून अजूनही सावरलेली नाही. आजूबाजूच्या जगात असूनही तिथे स्वतःची जागा काय, याचा अर्थ तिला लागलेला नाही. हा प्रश्न सोडवण्याची तिची इच्छा नाही; पण हा प्रश्न सोडवल्याशिवाय ती सुखात राहू शकत नाही. तिच्या गावात उन्हाळ्यापुरता आलेला नोआ, हे दुसरं मुख्य पात्र. नोआ शिकलेला, व्यवहारी, समजूतदार आणि स्थिरस्थावर इसम आहे; तो लौकिकार्थाने यशस्वी नाही. अॅलिसन नावाचं वादळ त्याच्या आयुष्यात येतं आणि दोन्ही घरांमध्ये अस्थैर्य येतं.
मुलाच्या मृत्युनंतर सुख मिळवणं, मिळवण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे का नाही या प्रश्नात अडकलेली, खंबीर अॅलिसन आणि सर्वसाधारण सुखात असलेला परंतु दुबळा नोआ यांचं नातं उलगडताना दाखवलेली पद्धतही विलक्षण आहे. 'राशोमान'सारखी. अॅलिसन आणि नोआच्या डायरीतली पानं दाखवल्यासारखी कथा उलगडत जाते. दोघांच्या कथनात काही ठिकाणी बराच फरक आहे. अगदी अॅलिसनच्या कपड्यांमधला तपशीलही बदलतो. त्यातून दोघांचे दृष्टीकोन कसे आणि किती निराळे आहेत हे दिसायला लागतं. रूथ विल्सन आणि डॉमिनिक वेस्ट हे दोघं आणि यांचा अभिनयही बघण्यासारखा!
मालिकेचं शीर्षकगीत -
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जंगल बुक (नेटफ्लिक्सवरती) फार
जंगल बुक (नेटफ्लिक्सवरती) फार आवडला.
साल्वादोर दालीने इलस्ट्रेट
साल्वादोर दालीने इलस्ट्रेट केलेलं अॅलिस इन वंडरलँड
https://www.brainpickings.org/2011/11/15/salvador-dali-alice-in-wonderla...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
रोचक आहे.
रोचक आहे.
ही मीम पाहिली
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
म्हंजे ... याच
म्हंजे ... याच धर्तीवर
Secularism : Equal disrespect for every religion.
Secularism : Equal disrespect
नाही रे गब्बु. हे असे म्हणायचे
Secularism : Equal disrespect for every religion except one.
लेथ जोशी
आत्ता सहज चाळता चाळता हा ट्रेलर पाहिला.
कुणाला अजून माहिती आहे का त्या विषयी?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
लेथ जोशी
सध्या भारताबाहेर विविध महोत्सवांतून फिरतोय. ते आटपलं की होईल प्रदर्शित इकडे.
चौथी कूट
चौथी कूट (२०१५ ,दिग्दर्शक गुरविंदर सिंग )
ऑपरेशन ब्लू स्टार आणि खलिस्तान चळवळीच्या काळात ,दहशतीच्या सावटात जगणारे सामान्य पंजाबी शेतकरी साक्षात दाखवणारा ,'चौथी कूट' (चौथी दिशा ) हा एक अद्वितीय चित्रपट आहे.सामान्य नागरिकासाठी कोण जास्त दहशतवादी आहे पोलीस की खलिस्तानी ? सर्वत्र संशय आणि भीतीच्या वातावरणात, दैनंदिन जीवन जगताना ,स्वतः सोबत इमानी , रक्षणकर्ता कुत्रा टॉमीचे प्राण वाचवणे कसे शक्य होईल अश्या चिंतेत व्याकूळ झालेला शेतकरी जोगिंदर आणि त्याचं कुटुंब येणारा प्रत्येक दिवस ढकलत असतात.दिग्दर्शक गुरविंदर आणि कॅमेरामन सत्य राय नागपाॅल आपल्याला अलगद त्यांच्या घरात नेऊन त्यांच्या जीवनाचा एक घटक बनवून टाकतात.भीतीच्या सावटात कुत्र्याचे भुंकणे हे ही एक संकट बनून जाणे इतके अॅबसर्ड आहे की त्याने विनोद निर्माण होतो.
फिरोजपूर स्टेशन , रिकाम्या ट्रेन,सर्वत्र पोलिसांचे अस्तित्व यांचे इतके तपशीलात चित्रण केले आहे की आपण प्रत्यक्ष तिथे उपस्थित असल्यागत एकरूप होतो.
घनदाट अंधारात वाट चुकलेला जुगल आणि त्याचे कुटुंब पाहून काळजाचा थरकाप होतो.तो जात असताना बाजूला प्रकाशाच्या स्पर्शात दवबिंदू चमकत असलेले शेत इतके तरल आणि स्वप्नील दिसते की बस्स !! दिवसा उजेडी हिरव्या डौलदार शेतामुळे आणि सामान्य गावकऱ्यांच्या दुर्दम्य आशावादामुळे भयाचा पगडा किंचित कमी भासतो.
चौफेर दाटून आलेल्या घनतिमिराचा गंभीर ध्वनी,हिरव्यागार शेतात कोसळणाऱ्या जलधारा आणि त्यात लाटांसारखे नर्तन करणारे गव्हाचे पीक यांचे चित्रण विस्मयचकित करणारे आहे.शांत लयीत चालणारा हा चित्रपट जबरदस्त खिळवून ठेवतो.प्रत्यक्ष हिंसा न दाखवताही दहशत दाखविण्यात दिग्दर्शक गुरविंदर सिंग यांनी कमाल केली आहे.
रोग वन : पर्वणी
रोग वन पाहिला. पारणं फिटलं.
सर्व चाहत्यांनी पाहिलाच पाहिजे. फोर्स अवेकन्स आणि रोग वन हे अतिशय उत्तम चित्रपट आहेत!
फोर्स माझ्यासंगे, मी फोर्ससंगे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
+१
आवडला. जबर्या प्रकार आहे, मारामारी तुफान, ऑन स्क्रीन मरणही आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मोगली - जंगल बुक
नेटफ्लिक्सवर जंगल बुक आलाय. तो पाहिला. लहानपणीच्या आठवणींत वेळ चांगला गेला. मस्त आहे ब्वॉ.
खूप छान आहे. ती "का" कसली
खूप छान आहे. ती "का" कसली डेंजर दाखवलीये ना. कोणी दिलाय तिला आवाज कोणास ठाऊक.
___
अररं प्रियांका चोप्रा ने दिलाय तो आवाज.
मी इंग्लिश पाहिला
मी इंग्लिश पाहिला त्यात स्कार्लेट जोहान्सनने दिलाय वाट्तं आवाज.
मी सुद्धा इंग्रजीच पाहीला.
मी सुद्धा इंग्रजीच पाहीला. अच्छा जॉह्नसनचा आवाज आहे होय. ओके.
+१
मी थेट्रात बघितला तेव्हा अनेक पालक आपल्या ७-८ वर्षाच्या पोरांना घेऊन आले होते. पण अशी ४-५ उदाहरणं आजूबाजूला दिसली जिथे पोरं फोनवर गेमबीम खेळत होती आणि आईबापांनाच सिनेमात जास्तं इट्रेस्ट होता. सगळ्यात बेष्ट पॉइंट म्हणजे सिनेमाच्या शेवटी 'जंगल जंगल बात चली है' चं नवं व्हर्जन त्याच्या रेकॉर्डिंग व्हिडोसकट लावलं होतं. सर्व मोठ्यांच्या एकदम उत्स्फूर्त चिअर्सनी थेटर दणाणलं!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मलाही पाहायचा नव्हता
मलाही संपूर्ण पाहायचा नव्हता. पण सुरुवात कशी आहे ब्वॉ या उत्सुकतेने लावला आणि संपेपर्यंत पाहिला.
. . भारतात खाजगी शहरांचा
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.