इतिहास

अयशस्वी ठरलेले काही तंत्रज्ञान सुविधा (पूर्वार्ध)

एखादे तंत्रज्ञान योग्य त्या चाचण्या केल्यानंतर व त्याची आर्थिक बाजू तपासून यशाच्या पायरीवर चढण्यापूर्वी अनेक प्रकारचे, चित्र विचित्र कल्पना त्या तंत्रज्ञानाच्या संबंधात लढवल्या जात असतात. काही कल्पना कचर्‍याच्या डब्यात फेकल्या जातात व काही मोजक्या कल्पना तगून राहतात व त्यांचा पाठपुरावा केला जातो. अनेक डिझाइन कल्पनामधून एखादी कल्पना यशस्वी ठरते व त्या कल्पनेच्या जोरावर डिझाइनर वा डिझाइन टीम/कंपनी भरपूर पैसे कमावू लागते. हे यशस्वी तंत्रज्ञान बघता बघता गरजेची होऊन जाते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

इंग्लंड आणि स्कॉटलंड

सध्या स्कॉटलंडने ग्रेट ब्रिटनपासून फारकत घ्यावी काय ह्या विषयाने वृत्तपत्रांचे रकाने भरून वाहत आहेत. त्या अनुषंगाने मुळात हे दोन एकेकाळचे प्रतिस्पर्धी देश एकत्र झालेच कसे ह्याविषयीची इंग्लंड आणि स्कॉटलंड ह्यांच्या राजघराण्यांतील गुंतागुंतीची नाती आणि संबधित व्यक्तींचा मनोरंजक इतिहास ह्याबाबतची डोक्यात असलेली बरीचशी अडगळ साफ करण्याचा हा प्रयत्न आहे.

आठव्या हेन्री टयूडरच्या (१४९१-१५४७) सहा बायका. पहिली कॅथेरिन ऑफ आरागॉन. हिला एक मुलगी - मेरी, जिला नंतर ब्लडी मेरी असे उपपद मिळाले. लग्नानंतर चौदा वर्षांमध्ये कॅथेरिन हेन्रीला राजपुत्र आणि राज्याचा वारस देऊ शकली नाही ह्या खर्‍या कारणासाठी तिला १५३३ मध्ये घटस्फोट देण्यात आला आणि हेन्रीचे मन जडलेली अ‍ॅन बुलीन लगेचच राणी झाली. तिची मुलगी म्हणजे एलिझाबेथ (१५३३-१६०३), जी एलिझाबेथ पहिली म्हणून नंतर राज्यावर आली. लग्नानंतर तीन वर्षांत व्यभिचाराच्या कारणासाठी अ‍ॅन बुलीनचा शिरच्छेद झाला. तिच्या लवाजम्यामधील जेन सीमोर हिच्यावर हेन्रीचे मन एव्हांना बसले होते आणि अ‍ॅन बुलीनच्या शिरच्छेदानंतर लवकरच हेन्रीने जेन सीमोरशी विवाह केला. हेन्रीला हवा असलेला राजपुत्र, जो हेन्रीनंतर सहावा एडवर्ड (१५३७-५३) म्ह्णून राज्यावर आला, तो सीमोरपासून हेन्रीला मिळाला पण लग्नानंतर सव्वा वर्षात त्या बाळंतपणामध्ये जेन परलोकी गेली. तीन वर्षानंतर गुंतागुंतीच्या राजकारणाचा परिणाम म्हणून हेन्रीने अ‍ॅन ऑफ क्लीव्ज ह्या युरोपातून आयात केलेल्या राजकन्येशी १५४० मध्ये विवाह केला पण पहिल्यापासून हेन्रीचे तिच्यावर कधीच मन बसले नाही. तिलाहि हेन्रीमध्ये काहीच स्वारस्य नव्हते म्हणून परस्परसहकार्याने हे लग्न घटस्फोटात मोडले. एव्हांना हेन्रीचे लक्ष अ‍ॅन ऑफ क्लीव्जच्या लवाजम्यातील कॅथेरिन हॉवर्डवर बसले होते आणि जुलै १५४० मध्ये हेन्री आणि कॅथेरिन हॉवर्ड विवाहबद्ध झाले. विवाहानंतर लवकरच कॅथेरिन हॉवर्डच्या विवाहबाह्य संबंधांवर कुजबूज ऐकू येऊ लागली होती, परिणामत: व्यभिचाराच्या आरोपाखाली १५४२ मध्ये तिचा शिरच्छेद करण्यात आला. १५४३ मध्ये हेन्रीने कॅथेरिन पार हिच्याशी विवाह केला पण तदनंतर हेन्री स्वत:च १५४७ मध्ये मृत्यु पावला.

त्याच्यानंतर १० वर्षे वयाचा राजपुत्र सहावा एडवर्ड राज्यावर आला पण १५५३ साली त्याचा वयाच्या १६व्या वर्षी मृत्यु झाला.

कॅथेरिन ऑफ आरागॉन हिला घटस्फोट देऊन अ‍ॅन बुलीनशी लग्न करण्याला पोपची संमति नव्हती ह्या कारणाने हेन्रीने इंग्लंडमध्ये पोपचा अंतिम अधिकार मानण्यास नकार देऊन प्रॉटेस्टंट विचाराला चालना दिली होती आणि सर्व युरोपभर प्रॉटेस्टंट विरुद्ध कॅथलिक अशी रस्सीखेच सुरू झाली होती. कॅथेरिन ऑफ आरागॉनची मुलगी मेरी ही सहाव्या एडवर्डनंतर वारसाहक्काने राज्यावर आली. ती कट्टर कॅथलिक होती आणि तिच्या पाच वर्षांच्या राजवटीत तिने प्रॉटेस्टंटांचा जो छळ केला आणि कित्येकास यमसदनास पाठविले त्यामुळे तिला ’ब्लडी मेरी’ असे नाव मिळाले. तिच्यानंतर १५५८ मध्ये पहिली एलिझाबेथ राज्यावर आली. तिच्या यशस्वी आयुष्यामध्ये बिटनवर येऊ घातलेले स्पेनचे परचक्र उलटविणे, स्पॅनिश आर्माडा (नौदल) नष्ट करणे अशा कार्यामधून ब्रिटनमध्ये राष्ट्रीय भावना रुजविणे ह्या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. शेक्स्पीअर, फ्रान्सिस बेकन, वॉल्टर रॉलि, फ़्रन्सिस ड्रेक हे हिचे समकालीन. १६०३ मध्ये तिचा मृत्यु झाला. अखेरपर्यंत ती अविवाहितच राहिली. (ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तिच्याच कालखंडामध्ये पडते.)

ब्रिटनकडून आपली नजर आता स्कॉटलंडकडे आणि स्कॉटलंडची tragic heroine मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स हिच्याकडे वळवू. इंग्लंड आणि स्कॉटलंड ह्या दोन शेजार्‍यांमधील परस्परद्वेषाला आणि चुरशीला २००० वर्षांचा इतिहास आहे. ’Braveheart’ ह्या अलीकडे बर्‍याच गाजलेल्या चित्रपटात त्याची चुणूक आपल्याला दिसते. १४व्या-१५व्या शतकांपर्यंत युरोपात फ्रेंच आणि स्पॅनिश राष्ट्रांचा वरचष्मा अधिक असे आणि इंग्लंड हे त्यांच्या समोर दुय्यम महत्त्वाचा देश होता. विशेषेकरून फ्रेंच लोक इंग्लंड आणि स्कॉटलंडमधल्या वादात स्कॉटलंडची बाजू उचलून धरून इंग्लंडची कोंडी करण्याचा प्रयत्न सतत करीत असत. फ्रेंच आणि स्कॉट्स ह्यांच्यामधील ह्या जुन्या मैत्रीच्या संबंधांना Auld Alliance (Auld - Old चे स्कॉटिश रूप) असे म्हणतात.

इंग्लंडचा आठवा हेन्री आणि फ्रान्सचा बारावा लुई ह्यांच्यामधील झगडयात फ्रान्सला मदत म्हणून उत्तरेकडून स्कॉटलंडचा राजा चौथा जेम्स ह्याने इंग्लंडवर आक्रमण केले. परिणामत: १५१३ साली फ्लॉडेन फील्डच्या लढाईत स्कॉटिश बाजूचा पराभव होऊन चौथा जेम्स स्वत: लढाईत मारला गेला.

आठव्या हेन्रीची थोरली बहीण मार्गारेट टयूडर हिचे लग्न स्कॉटलंडच्या चौथ्या जेम्सबरोबर झाले होते. त्यांचा मुलगा पाचवा जेम्स (जन्म १५१२) हा एक वर्षाचा असतांना बापानंतर राज्यावर आला. Auld Alliance खाली त्याचे पहिले लग्न फ्रेंच राजा फ़्रान्सिस पहिला ह्याची मुलगी मॅडेलीन हिच्याबरोबर १५३६ मध्ये झाले. लग्नानंतर सहा महिन्यात ती क्षयरोगामुळे वारली आणि जेम्सने मेरी ऑफ गीज (Mary of Guise) ह्या फ्रेंच उमराव घराण्यातील मुलीशी दुसरे लग्न केले. त्यांचे जगलेले एकुलते एक अपत्य म्हणजे मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स् (जन्म १८४२.) तिच्या जन्मानंतर आठवडयामध्येच तिचा बाप जेम्स पाचवा ह्याचा मृत्यु झाला आणि मेरी स्कॉटलंडची राणी बनली.

तिच्या अल्पवयामध्ये स्कॉटलंडचे राज्य तिच्या नावाने तिची आई अणि अन्य राज्यपालक चालवॊत होते आणि मेरीचे बहुतेक बालपण फ्रान्समध्येच गेले. वयाच्या पाचव्या वर्षी तिचा विवाह फ्रेंच राजा हेन्री दुसरा ह्याचा मुलगा राजपुत्र (Dauphin - दोफॅं) फ्रान्सिस ह्याच्याबरोबर ठरविण्यात आला. ह्यापूर्वी आठव्या हेन्रीने तिचा विवाह त्याचा मुलगा एडवर्ड ह्याच्या करण्याचा घाट घातला होता आणि मेरीच्या वयाच्या दहाव्या वर्षी हा विवाह होईल असा करारहि करण्यात आला होता पण एव्हांना प्रॉटेस्टंट विरुद्ध कॅथलिक हा झगडा स्कॉटलंडमध्येहि पोहोचला होता आणि स्कॉटलंडमध्ये कॅथलिक पक्षाची सरशी होऊन मेरीचे प्यादे फ्रेंच बाजूकडे गेले. वयाचे सहावे वर्ष चालू असतांना १५४८ सालात मेरीची रवानगी फ्रन्समध्ये झाली. पुढची १३ वर्षे ती फ्रान्समध्येच राहिली आणि एप्रिल १५५८ मध्ये राजपुत्र फ्रान्सिसबरोबर तिचा विवाह झाला.

त्यानंतर काही महिन्यांतच जुलै १५५९ मध्ये जाउस्टिंगच्या खेळात डोळ्यामध्ये भाला शिरून हेन्री दुसरा ह्याचा मृत्यु झाला आणि फ्रान्सिस हा फ्रान्सिस दुसरा म्हणून फ़्रान्सचा राजा होऊन मेरी राणी बनली.

दुसरा फ्रान्सिस अल्पायुषी ठरला. त्याच्या कानामध्ये त्याला काही विकार होऊन तो विकार मेंदूपर्यंत पसरला आणि डिसेंबर १५६० मध्ये त्याचे आयुष्य संपुष्टात येऊन Queen Mary ही Dowager Queen Mary झाली. तदनंतर नऊ महिन्यांनी ती स्कॉटलंडला परतली. जॉन नॉक्सच्या नेतृत्वाखाली प्रोटेस्टंट पंथाने तेथे चांगलाच जम बसविला होता आणि मेरी कॅथलिक असल्यामुळे तिला विरोध सुरू झाला. दरम्यान आपली आजी मेरी टयूडर हिच्या संबंधातून आपण पहिल्या एलिझाबेथनंतर इंग्लंडच्या राज्याचे वारस आहोत असे जाहीर करून घेण्याचा अयशस्वी प्रयत्नहि तिने केला.

१५६५ मध्ये मेरी टयूडर संबंधातून तिच्या नात्यात असलेल्या हेन्री स्टयुअर्ट, लॉर्ड डार्न्ली ह्याच्याशी तिचा विवाह झाला. दोघेहि कॅथलिक असल्यामुळे ह्या लग्नाकडे स्कॉटिश जनता संशयानेच पाहात होती. प्रेमविवाह म्हणून सुरू झालेला हा संबंध लवकरच तणावाखाली आला कारण मेरीचे आपला इटालियन सेक्रेटरी रिझिओ ह्याच्याशी अनैतिक संबंध असावेत अशी शंका लॉर्ड डार्न्लीच्या मनामध्ये होती आणि त्यातून मेरीच्या समोरच रिझिओचा खून करणात आला. ह्यावेळी लॉर्ड डार्न्लीचे मूल - भावी जेम्स सहावा - मेरीच्या पोटात होते.

सहाव्या जेम्सचा जन्म जून १५६६ मध्ये झाला. मेरी आणि लॉर्ड डार्न्ली ह्यांच्यामधील ताणतणावाची वार्ता सार्वत्रिक झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून की काय लॉर्ड डार्न्लीचा निवास असलेल्या राजवाडयात मोठा स्फोट होऊन फेब्रुवारी १५६७ मध्ये त्याचे आयुष्य संपले.

एव्हांना मेरी कॅथलिक स्कॉटिश लॉर्ड बॉथवेल ह्याच्या प्रभावाखाली आली होती आणि लॉर्ड डार्न्लीच्या खुनामध्ये त्या दोघांचाहि हात आहे अशी शंका बर्‍याच जणांना येऊ लागली होती. मे १५६७ मध्ये आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन बॉथवेलने मेरीशी लग्न केले. त्याचा पहिल्या बायकोशी घटस्फोट मान्य नाही म्हणून कॅथलिक आणि ते कॅथलिक आहेत म्हणून प्रॉटेस्टंट अशा दोन्ही गटांचा त्यांना विरोध होता. पाठलाग करणार्‍यांपासून स्वत:चा बचाव करीत दोघे इतस्तत: पळत असतांना बॉथवेल डेन्मार्कला निघून गेला आणि मेरी बंदी झाली. स्कॉटलंडच्या राज्यावरील आपला हक्क सोडण्यास तिला भाग पाडण्यात आले आणि तिच्या जागी तिचा अज्ञान मुलगा जेम्स सहावा १ वर्ष आणि १ महिना इतक्या वयाचा असतांना राज्यावर आरूढ झाला. पुढची काही वर्षे त्याच्या राजपालकांनी त्याचे राज्य चालविले.

१५६८ मध्ये बंधनामधून पळून जाण्यात मेरी यशस्वी झाली आणि सीमेपलीकडे इंग्लंडत तिने आश्रय घेतला. ह्यानंतर २० वर्षांचे उरलेले आयुष्य मेरीने इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नजरकैदेतच काढली.

मेरीचे इंग्लंडात असणे हे बर्‍याच जणांना मान्य नव्हते. ती कॅथलिक असून पहिल्या एलिझाबेथनंतर इंग्लंडच्या राज्यावर ती हक्क सांगत आहे म्हणजे इंग्लंडमध्ये पुन: कॅथलिक सत्ता बसविण्याचा हा प्रयत्न आहे अशी शंका ह्याच्या मुळाशी होती.

१५८६ साली ’बॅबिंग्टन कट’ उघडकीस आला. ह्यामध्ये सांकेतिक भाषेमधला मेरी आणि तिच्या कॅथलिक पाठीराख्यांची पत्रे सापडली. एलिझाबेथ राणीला नष्ट करून मेरीची सुटका करायची आणि त्ला इंग्लंडचे राज्य मिळवून द्यायचे असा तो कट होता. ह्या कटामागे स्पेनचाहि हात होता. ह्या तथाकथित कटाबद्दल बर्‍याच शंका आहेत पण त्याचा परिणाम असा झाला की ऑक्टोबर १५८६ मध्ये मेरीची ३६ उमरावांच्या कोर्टापुढे चौकशी होऊन तिला मृत्युदंड सुनावण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्याचा हुकूम देण्यास एलिझाबेथने काही काळ खळखळ केली पण १ फेब्रुवारी १५८७ ह्या दिवशी हुकूम निघाला आणि ७ फेब्रुवारीला संध्याकाळी मेरीचे शीर धडापासून वेगळे करून शिक्षेची अंमलबजावणी झाली. तिचा मुलगा स्कॉटलंडचा राजा जेम्स सहावा ह्याने आपल्या आईचे प्राण वाचविण्यासाठी करंगळीहि उचलली नाही.

अनेक वळणे घेतलेल्या ह्या गोष्टीची अखेर आता जवळ आली आहे. १६०३ मध्ये पहिली एलिझाबेथ जग सोडून गेली. तिच्यानंतर उर्वरित वारस म्हणून जेम्सने ’इंग्लंडचा पहिला जेम्स आणि स्कॉटलंडचा सहावा जेम्स’ अशा बिरुदाने १६२५ पर्यंत राज्य केले. ह्या काळात राजा जरी एक असला तरी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही अलग राज्येच होती. १७०७ मध्ये Act of Union दोन्ही पार्लमेंटांनी मंजूर करेपर्यंत ही स्थिति टिकून राहिली. १७०७ पासून चालत आलेली ही स्थिति अशीच राहते किंवा कसे हे लवकरच कळेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

लेफ्टी की रायटी?

काही माणसं डावखुरे का असतात? हा एक अती पुरातन काळापासून विचारत आलेला प्रश्न आहे. प्लॅटो, चार्ल्स डार्विन, कार्ल सॅगन, डेब्बी मिलमन, स्टीफन जे गूल्ड, नोअम चॉम्स्की, अल्बर्ट आइन्स्टाइन (आइन्स्टाइनला डावखुर्‍यांच्या कळपात ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कोंडापूरची दैवते

आंध्र प्रदेश राज्यामधील मेडक जिल्ह्यामध्ये कोंडापूर या नावाचे एक गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला साधारण 1 किमी अंतरावर 35 ते 40 फूट (11 मीटर) उंचीचे एक टेकाड आहे. भारतीय पुरातत्त्व विभागात कार्य करणारे एक ब्रिटिश पुरातत्त्व शास्त्रज्ञ हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांनी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात येथे उत्खनन केले होते. या नंतर 1941-42 मध्ये हैद्राबाद संस्थानाचे निझाम यांच्या संस्थाना मध्ये हा भाग मोडत असल्याने या संस्थानाच्या पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, जी. याझदानी या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्‍या एका पथकाने या जागेवर उत्खनन कार्य केले होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

धेनुकाकटचे गौडबंगाल – भाग 5

(मागील भागांचे दुवे)
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

धेनुकाकटचे गौडबंगाल भाग 4

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

धेनुकाकटचे गौडबंगाल- भाग 3

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास