अॅड. गिरीश राऊत यांचा एक लेख 'महाराष्ट्र टाइम्स' रविवार जानेवारी २३, २०२२ रोजी प्रकाशित झाला. डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांनी त्याचा केलेला प्रतिवाद.
लस घेतली तरी काही प्रमाणामध्ये संसर्गाचा धोका रहातो. त्यामुळे लस घेतली तरीदेखील मास्क लावा आणि नियम पाळा असे सांगितले आहे. लस घेऊन सुरक्षा वाढवायची आणि नियम पाळून संसर्ग टाळायचा हे साधे सोपे गणित आहे. मग कोविडच्या लसीमुळे संसर्ग होणारच नाही खात्री द्या असे म्हणणेच चुकीचे नाही का?
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) मिरजच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधे असोसिएट प्रोफेसर आहेत. समाजात कोरोनाविषयी पसरलेले गैरसमज दूर करण्याच्या हेतूने, शास्त्रीय माहिती देणारे लेखन त्या सातत्याने करत आहेत. त्यांचे हे प्रबोधनाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने त्यांचे काही लेख आम्ही ऐसीच्या वाचकांसाठी शेअर करणार आहोत. त्यातील पहिला लेख :
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम'मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
कोरोनाविरुद्ध अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त किती टक्के असेल याचे एक अनुमान आणि त्याआधारे वर्तवलेले भविष्य...
म्युकरमायकोसिसनं (Mucormycosis), उर्फ काळी बुरशी (Black fungus) सध्या मीडियामध्ये हाहाःकार माजवला आहे. लोक खूप घाबरले आहेत याला. तर त्याबद्दलच चर्चेसाठी हा धागाप्रपंच. म्युकरबद्दल पदव्युत्तर शिक्षणात शिकताना आम्हांला पहिलं वाक्य हे असायचं की हे एक अत्यंत दुर्मीळ फंगल इन्फेक्शन आहे. तर पहिली गोष्ट ही समजून घ्या, की हा काही नवीन रोग नाही.