आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम'मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.