बखर....कोरोनाची (भाग १०)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम'मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)

Covid-19 Fifth wave in Europe - November 2021

Daily Cases per Million People - 18 Nov 2021

(प्रतिमा आंतरजालावरून साभार)
युरोपात पाचवी लाट चालू झाली आहे असे दिसत आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी अशा काही देशांत प्रामुख्याने लस न घेतलेल्या लोकांत संसर्ग पसरत आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हिवाळा संपेपर्यंत जर्मनीतले जवळपास सगळे लोक मेलेले तरी असतील, किंवा त्यांना करोना होऊन तरी गेलेला असेल किंवा त्यांनी लस तरी घेतलेली असेल. - जर्मन आरोग्यमंत्री

The German health minister, Jens Spahn, warned that by the end of this winter, “just about everyone in Germany will probably be either vaccinated, recovered or dead.”
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ माजली आहे. आधीच्या व्हेरियंट्सपेक्षा त्यात खूप नवी म्यूटेशन्स आहेत आणि त्यातली बरीचशी स्पाईक प्रोटीनवर आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध लशींचा त्यावर कितपत उपयोग होईल याविषयी अभ्यास चालू आहे.
New heavily mutated variant B.1.1.529 in South Africa raises concern

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पूर्वग्रह सोडून आता आयुर्वेदा कडे नव्या दृष्टीकोणातून पाहणे योग्य. नुकतेच जर्मनीच्या एका मेडिकल जर्नल ने या औषधला कवर पानावर स्थान दिले.
कारोनिल
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fanalyticalsciencejournals.o...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

जरा वेळ काढून लेख चाळला. रद्दी आहे अगदी. करोनिल औषधातील घटकपदार्थ मोजण्याच्या पद्धतीबद्दल आहे, आणि ती पद्धतही जुनीच आहे. ती वापरून शेण ही तपासता येईल. लेखाचा करोनाशी किंवा त्यावरील उपाययोजनेशी काहीच संबंध नाही (जसा करोनिलचा नाही, तसाच!).

बाळकृष्णाने लेखक ह्मणून पहिले नाव आपले घातले आहे, पण त्याने तो वाचला तरी असेल की नाही याबद्दल मला गंभीर शंका आहे.

राहिला मुद्दा मुखपृष्ठावरील फोटोचा. जर्नललाही शेवटी आर्थिक बाजू असतेच, त्यामुळे मुखपृष्ठावर फोटो देण्याची सोय पैसे देऊन करून घेता येत असणारच.

असो.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

आणि हो, हे मेडिकल जर्नल नाहीच्चे. ते Physical Chemistry चे जर्नल आहे! रेटून खोटे बोलण्याचा आणखी एक “स्वदेशी” प्रकार!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

नव्या व्हेरियंटविषयी हळू हळू माहिती उपलब्ध होते आहे -
Omicron: everything you need to know about new Covid variant

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडक्यात, काम चालू आहे, घाबरू नये, सावधगिरीने वागावे.
3 Questions We Must Answer About the Omicron Variant

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ह्या बातमीनुसार नव्या ओमिक्रॉन उत्परिवर्तनाने संक्रमित झालेले बहुतांश लोक लस न घेतलेले किंवा एकच डोस घेतलेले आहेत -
Despite reports of milder symptoms Omicron should not be underestimated

Dr Wassila Jassat from the National Institute for Communicable Diseases said that in the South African city of Tshwane, where Omicron was detected, 87% of hospital admissions were among unvaccinated patients.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

इस्राएली डॉक्टरला लंडनमध्येच ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असावा..?
Israeli doctor believes he caught Omicron variant of Covid in London

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा धागा वस्तुत: बखर नांवाने चालू केला असला तरी आत्ताच्या कोविड काळातल्या घटनांची वास्तव नोंद व्हावी हाच धागाकर्त्याचा हेतू असावा. पण आता इथे जे मतप्रदर्शन होत आहे त्यामुळे हा धागा इतिहास न ठरता बखर म्हणूनच गणला जाईल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ॐ नमो छु छां छ

बघा ना. मूळ उद्देश काय आणि चाललंय काय.
नुसते अस्ताव्यस्त अनभ्यस्त मतप्रदर्शन ..हवे होते कालानुरूप निरीक्षण ,नवीन काही माहिती ...वगैरे पण...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोरोनाच्या गावगप्पा ठेवलं तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Corona च्या गाव गप्पा असा धागा काढला तर लिम्का बुकात नोंद होईल सर्वात जास्त प्रतिसाद असलेला विषय म्हणून.
सूचना आमची निर्णय तुमचा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

…आणि तो करणे ‘ऐसी’ व्यवस्थापनास सहज शक्य आहे. (अर्थात, त्यांनी मनावर घेतले तर.)

या धाग्याच्या उद्दिष्टांशी विसंगत असलेले प्रतिसाद (प्रस्तुत प्रतिसाद धरून) एखाद्या वेगळ्या धाग्यात हलविता येतील.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली सूचना आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गप्पांना विराम. नको तर नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिमण काका , गप्पांना विराम नको याच्याशी सहमत. मी फक्त या धाग्याच्या संदर्भात म्हणत होतो .
तुम्ही एक कराल का ? कोरोना गप्पा किंवा वर यात्रीबुआ म्हणत आहेत तसं कॉरोनाच्या गावगप्पा नावाचा एक धागा सुरु करता का ?
न बा शेठनी सुचवलंय तसे आपण हे सगळे तिकडे ट्रान्सफर करू

आणि हानु गप्पा अस्ताव्यस्त च्या xxx , हाय काय आणि नाय काय . पूर्वी आपण रॉकबद्दल मारल्या तशा !!!
राजेश भाऊ आणि पटाईत काकांनाही आमंत्रण देऊ .
मी पण एणार तिकडे .
तज्ज्ञ लोकांना बंदी करू तिकडे लिहायला. तसेही त्यांना रस्त्यावरचे काही कळत नाहीच एनीवे .
कशी वाटते आयड्या ?
लगेच धागा उघडून टाका एक ,
मी आलोच
आता मागे हटू नका चिमण काका
हम तुम्हारे साथ हय !!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटते सामान्यांची अनभ्यस्त मते, पुर्वग्रह, रॅंटींगसुद्धा कुठे तरी दर्ज झाली पाहिजे. तज्ज्ञ मंडळींपुढची आव्हाने किती मोठी आहेत आणि नक्की त्यांना कश्याविरूद्ध लढायचे आहे हे कळू शकेल.
अर्थात, निरर्गल ट्रोलिंग बॅनच असावे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बरोबर आहे पुम्बा !!!
म्हणूनच एक संपूर्ण वेगळा धागा काढावा म्हणतोय.
मीही असणार तिथे.
पण चिमण काका रुसलेत. त्यामुळे मलाच करावे लागेल दिसतंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अबापट,पुंबा,न'बा,सामो, आणि सर्व येणारे.

त्रास देणे किंवा ट्रोल हा हेतू नसतो माझा.
पण धागा आणि आशय,हेतू,लक्ष्य,अपेक्षित नोंदी आणि अफवा यात गोंधळ होतो.
मी लिहून टाकतो ते नंतर कात्रीत येते. पण ते नंतर काढून टाकणे हेसुद्धा ( संपादन आहे म्हणून गैरच) चुकते कारण त्यावरच्या प्रतिक्रिया लटकतात.
शिवाय मंडळाची कुचंबणा होते. वारंवार सूचना द्याव्या लागतात. काम वाढते.
मला कुणाशी कायमचा वैयक्तीक राग किंवा अढी नाही. वाद होत आहेत ते मुद्द्यावरून.
दुसरा एक मुद्दाही काल लिहिलेला काढला. तो म्हणजे "शासनात / मोठ्या संस्थेतले लोक फार बोलू शकत नाहीत, मर्यादा असतात. त्यांचे काम हेच असले तरीही प्रसिद्धी देण्यासाठी त्यांचा प्रवक्ताच देऊ शकतो." म्हणजे की त्यांचेकडून येणारे मत हे पांढऱ्यावर काळे झाले ,लेखी प्रेस नोट व्यवस्थापनाने मांडल्यावरच येते. यावर मुलाखत दिलेले लोक चिडतील असं वाटलं.
मी साधारणपणे राजकीय, करमणूक, आरोग्य, यासाठी aljazeera dot com आणि France24 dot com यावरून आंतरराष्ट्रीय बातम्या पाहतो. त्यावरून लिहितो थोडक्यात. पण प्रत्येक स्फुटाची लिंक देत नाही. (टेकसाठी neowin dot net बघतो.)

एकाच विषयासाठी दोन धागे, एक स्पष्टता आलेली विधाने मांडण्यासाठी व एक गप्पा किंवा भीती मांडण्यासाठी हे बरोबर नाही.

त्यापेक्षा असे काही प्रतिसाद खरडवहीत टाकेन. खरडवहीतले लेखन गुप्त असते आणि मोडतोड करून नंतर ते धाग्यात आणता येईल.

बाकी लस अत्यावश्यक केली तर घेईन असे मी २०२१एप्रिलमध्ये म्हणत होतो. तसं काही होणार नाही, हल्ला आटोक्यात येईल हे खोटे ठरले. आता घराबाहेर पडणे यासाठीसुद्धा आधारकार्ड, ओळखपत्र, लस सर्टिफिकेट लागणार आहे. आता स्थानिक नपा, जिल्हा,राज्य व्यवस्थापन त्यांचेकडून कसोशीने पर्यत्न करत आहे. बैलगाडीवरच्या चाकावर बसलेल्या माशीने बैलगाडीला ब्रेक लावण्याचे स्वप्न पाहण्यात अर्थ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चाकोरी बद्ध,कोणाशी तरी बांधील राहून एकाचं प्रकारची मत मांडणे आणि तेच सत्य आहे अशी समजूत करून घेणे हे तरी पडत नाही.
लोकांना रोजच्या आयुष्यात काय अनुभव आले ते प्रचलित समजुती पेक्षा पण भिन्न असतात पण असतात सत्य.
ते मांडायची जागा असलीच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेशभाऊ
" ते मांडायची जागा असलीच पाहिजे."
हे बरोबर आहे . म्हणूनच मी चिमण काकांना दुसरा धागा काढा अशी विनंती केली आहे .
(त्या धाग्याला कोरोना गप्पा किंवा यात्रीबुआ म्हणाले तसे कोरोना गावगप्पा यातले काहीही नाव दिले तरी हरकत नाही. )
होतंय काय एकाच धाग्यात शास्त्रीय माहिती आणि अशी मते यांच्यामुळे वाचकांची गल्लत होतीय.

आता इथेच बघा ना , तुम्ही कॉव्हॅक्सिन का तुलनेने जास्त चांगले याबद्दल तुमचे मत मांडलेत. (असे मत इतर काही इंजिनियर लोकांनीही मांडले होते आधी माझ्याकडे ) . पण हे मत , मत म्हणून ठीके पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे. कारणे माहित होण्यासाठी अभ्यास पाहिजे . त्यात Immunology , vaccine developement अँड टेस्टिंग ही फार प्रगत आणि वेगळी शास्त्र आहेत.त्यातल्या तंत्रज्ञानातील झपाट्याने होत जाणारी प्रगती अगदी चांगल्या डॉक्टर लोकांनाही सखोल माहिती असतेच असे नाही, ( कारण ही शास्त्रे स्पेशलाइज्ड शास्त्रे असून , त्यांचा विषय वेगळा असतो आणि तो तितक्या खोलात शिकविणे शक्य असतेच असे नाही )
आता वैद्यकीय व्यवसायातील लोकांची ही परिस्थिती तर सामान्य माणसाला कसे माहित होणार ?

पण म्हणून अशी मते मांडूच नयेत का ? तर अजिबात तसे नाही. जरूर मांडा , पण योग्य ठिकाणी मांडा . म्हणून नवीन धागा.
चिमण काकांनी तो वेगळा धागा काढला नाही तर तुम्ही काढा . मीही येईन तिकडे गप्पा मारायला.

तेव्हा , शुभस्य शीघ्रम !! होऊन जाऊ देत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या बातमीनुसार ओमिक्रॉन झपाट्याने पसरतो आहे असे दिसते. नोव्हेंबरच्या मध्यात जिथे दिवसाला दोन-तीनशे नवे रुग्ण सापडत होते त्या ठिकाणी (द. आफ्रिका) काही दिवसांपूर्वी ८००-९०० आणि आता साडेअकरा हजार..
Covid: South Africa new cases surge as Omicron spreads

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||