Skip to main content

निखारा

‘माझ्यासाठी काय गंमत आणलीएस?’
तू लहान मुलीसारखी
हात पुढे करत म्हणालीस
तुझे हात-
गुलाबी
पारदर्शक
नितळ!

मी स्तब्ध
सायमलटेनियसली तुझ्याकडे व हातांकडे पाहत
पाठीमागे हातातल्या हातात
निखारा खेळवत राहतो
- प्रणव

शिव्या

Taxonomy upgrade extras

काही कारणा निमीत्ताने एस.टी. महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागला होता, भर दूपारी शिवाजीनगर स्थानकावरच बसमधे चढ्लो, बस तशी रीकामी होती व सूटायला बराच वेळ होता, माझ्या मागे हिरव्या रंगाची सूरेख साडी नेसलेली हसतमूख स्त्रि तीच्या नवर्‍यासोबत प्रसन्न चेहर्‍याने बसली होती. सोबतच मांडीवर काही महीन्याच एक मूलही झोपी गेलं होत. जोडपं एखाद्या तालूक्यात राहणारं वाटत होतं. नवरोबा शांत गंभीर पण चेहर्‍यावर सहजभाव ठेऊन निवांत बसले होते एकूणच जोडपं सूशील वाटत होतं, जोपर्यंत त्या स्त्रिने मोबाइल उचलला न्हवता... जसा फोन तीने तोंडाला लावला, सूरूवातच दरडावणीच्या सूरात केली....

होकायंत्र

तुझ्या सावळया त्वचेच्या
समुद्रावर
मी जहाज घेउन
उतरलो . अनावर
इच्छेला मृदुतेच्या
शिडाचे गाउन ...

इथवर नव्हते
होकायंत्र, त्याच्या
नसल्याच्या जाणीवेसकट.
पण रोमारोमात इच्छा
तुझ्या, दिसते
आकर्षक, उत्कट !

देशी वधूंना चिनी वधूंची टक्कर - बातमी

(वर्जिनल ष्टोरी...)

***********************************
मुंबई - चिनी वस्तूंपाठोपाठ आता चिनी वधूंनीही भारतीय बाजारपेठेवर आक्रमण सुरू केले आहे. लगीनसराईच्या निमित्ताने "चिंक्‍स' म्हणून ओळखल्या जाणार्‍या चिनी वधू लग्नाच्या बाजारात उपलब्ध होत आहेत. शौकीन तरूण जिंदगी कुर्बान करण्यासाठी या वधूंनाच पसंती देत आहेत, असे आमचा शिलॉन्गचा वार्ताहर कळवतो.

Dual SIM मदत/सल्ला हवाय....

Taxonomy upgrade extras

एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल?

१.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.)

२.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्‍या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.)
आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको. आमचा नोकिया ६०३० जसा पाचेक वर्षापासून ठणठणीत आहे, तसे काहितरी हवे.

बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे

Taxonomy upgrade extras

प्रतिसादांना मिळणाऱ्या श्रेणी आणि आता धाग्यांनाही मूल्य देता येणं या सुविधांवर अनेक मतमतांतरं वाचतो आहे. मराठी आंतरजालावर याविषयी अजूनही चर्चा होत राहणार हेही जवळपास निश्चित आहे. कोणतीही गुणवत्तानिर्देशक व्यवस्था ही अधिकाधिक निर्दोष कशी करता येईल हा प्रश्न कठीण आहे. गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यांतलं द्वंद्वात्मक द्वैत फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी दिसतं. बुकर पारितोषिकाच्या निमित्तानं नुकतंच उठलेलं वादळ मला या निमित्तानं आठवलं. त्याचा हा थोडक्यात परिचय. त्या अनुषंगानं साहित्यिक दर्जाविषयी चर्चा होऊ शकते किंवा धागे आणि प्रतिसादांच्या श्रेणी यांवरही काही मुद्दे मांडले जाऊ शकतात.

हिची, तिची अवस्था

'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्‍या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?

शांता गोखले: "त्या वर्षी"

शांता गोखले यांची "त्या वर्षी" कादंबरी अलिकडेच वाचली, आणि खूप आवडली. त्यातील पात्रे, त्यांच्या मधली नाती, आणि त्यांच्या दैनंदिन रुटीन मध्ये कादंबरी वाचकाला आपल्या सरळ, मोकळ्या भाषेने लगेच खेचून घेते. कथानकाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन भयानक, हिंसक घटना असल्या तरी तिचा एकूण वेग संथच राहतो. त्यामुळे पात्रांची छान ओळख पटते. एकूण हलकेच विनोदी टच असलेला संथपणा मला फार रुचकर वाटला. वाचून झाल्यावर बरेच दिवस कादंबरी डोक्यात घर करून बसली. त्या निमित्ताने काही स्फुट विचार.