गुन्हे/रहस्य/थरारकथा या साहित्यप्रकाराचे चाहते बऱ्यापैकी निर्ढावलेले असतात. इतर 'अभिजात' साहित्यप्रकाराकडे बहुतांश वेळेस निर्विकारपणे दुर्लक्ष करून ते आपली साधना चालू ठेवतात. आपला साहित्यप्रकार 'अभिजात' या सदरात मोडत नाही याचा खेद बाळगण्याची त्यांना गरज वाटत नाही.
'इतर साहित्यप्रकारांकडे दुर्लक्ष' एवढा भाग सोडला तर मीही या चाहत्यांमध्ये मोडतो.
अलीकडे चाललेल्या स्त्रीवाद, भांडवलवाद वगैरे चर्चांना अनुसरून त्याविषयांवर रंजक भाष्य करणार्या "पहाव्यातच" अशा एका मालिकेबद्दल माहिती देण्याचा हा प्रपंच.
(लिहताना वाचकाला कोणतेही विशेष स्पॉईलर्स दिले जाणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे, पण तरी सुद्धा एखाद्याचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. तस्मात, आपापल्या जबाबदारीवर वाचणे.)
नमस्कार, ह्या विषयी आधीच्या धाग्यातून माहिती आली असल्यास कल्पना नाही. उस्मानीया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्यांच्या वाचनालयातील स्कॅन पिडीएफ फॉर्मॅटातली १४०० मराठी पुस्तके आहेत असे लक्षात आले. त्यातील बरीच पुस्तके जुनी आणि दुर्मीळ असण्याची शक्यता आहे असे वाटते. बहुधा जीर्ण होऊ घातलेल्या प्रतींचे स्कॅनींग केले गेले असावे असे काही नोंदींवरून वाटले.
आपल्याकडच्या उच्चभ्रूंमध्ये हिंदी चित्रपट आणि त्यातल्या सगळ्याच गोष्टींना नावं ठेवण्याची एक फॅशन आहे. या पी-क्रिटकांना ('पी-सेक'च्या चालीवरच लिहीताना, क्रिटीक या शब्दाचं मराठीकरण करताना त्याचा कीटक या शब्दाशी असणारं शब्दसाधर्म्य विसरू नये.) बाकी काही नावं ठेवण्यासारखं मिळालं नाही की चित्रपटातल्या जुनाट, सनातनी मूल्यांवर हाणण्यात मजा येते. एकीकडे "घाऊक तिरस्कार करू नये" वगैरे उपदेशामृत पाजायचं आणि वर पुन्हा हिंदी चित्रपटांचा एकेक करून घाऊक तिरस्कार करायचा, ही या उच्चभ्रूंची पारंपरिक रीत.
तीनेक वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचल्यानंतर जे टिपून ठेवलं होतं ते आज अचानक पुढ्यात आलं. जाणवलं, ‘आपण काहीही करू शकत नाही’ असा टोचर्या-बोचर्या खेदासह काही पुस्तकं मनात उरलेली असतातच.
(तिथली सध्याची परिस्थिती कशी असेल?)
द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स - सोमाली माम.....
(अनुवाद: भारती पांडे - मेहता प्रकाशन)
उंच, देखणा, स्वयंपाक येणारा पुरुष. नुसताच स्वयंपाक येणारा नव्हे, तर एखादं रेस्तराँ चालवणारा, शेफ असलेला पुरुष हे एक सुंदरसं, अद्भुत स्वप्न असतं. मास्टरशेफ कार्यक्रमामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांकडे लक्ष जाऊ लागलं. पण अँथेनी बोर्डेन या माझ्या देखणेपणाच्या व्याख्येत बसणाऱ्या आणि स्वयंपाक येणाऱ्या पुरुषाची 'नो रिझर्व्हेशन्स' ही मालिका वेगळी आहे.