संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन
डोंबिवली - नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, सर्व मराठी संकेतस्थळांवरील सर्व लेख, कविता, पाककृती, कौले यांच्या मथळ्यांचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक नव्याजुन्या लेखातील प्रत्येक वाक्याचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हरवलेल्या प्रवासातील भरकटलेली तरुणी
प्रेरणा आणि आभारः http://www.aisiakshare.com/poetry
********
मी डोळे किलकिले करून उघडले तेव्हा डोक्यावरचं विस्तृत निळं आकाश नजरेत भरलं. संध्याकाळ होत आली असावी. माझं डोकं भयंकर ठणकत होतं. थंडगार खार्या वार्याचा वास माझ्या नाकात भिनला तशी मी धडपडून उठले. डोकं भरभरत होतं, शरीर हेलकावे खाल्ल्यागत हलत होतं.
- Read more about हरवलेल्या प्रवासातील भरकटलेली तरुणी
- 28 comments
- Log in or register to post comments
माझे डॉक्टर होणे : ३ (क्रमशः)
माझे बी.जे. मधे "अॅडमिट" होणे.
तर कालांतराने जुलैच्या सुरुवातीला बीजे ची लिस्ट लागली, तोपर्यंत मी सराईत मच्छीमार झालेलो होतो. म्हणजे गळ(फॉर्म) टाकून अगदी कॉन्फिडन्टली आराम करणे अन सुटी एंजॉय करणे हे करत होतो. बाळासाहेबांनी जाऊन यादी पाहीली. यादीत मी ४३व्या नं वर होतो. (बीजे ला २०० जागा आहेत) म्हणजे अॅडमिशन पक्की होती. इंजिनियरिंगचीही लिस्ट त्याच वेळेला लागलेली होती. मला सिव्हिल किंवा मेक ब्रँच मिळत होती. आमच्याच वर्गातले दोन्ही टॉपर्स तिकडे नवीनच सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचच्या लिस्टवर पहिले दुसरे होते. मला सिव्हिल/मेक इंजी. करायचं नसल्याने मी 'बीजे'लाच जाणार हे ठरलेलं होतं.
- Read more about माझे डॉक्टर होणे : ३ (क्रमशः)
- 11 comments
- Log in or register to post comments
तुटलेल्या मैत्रीणीस......
Natalie,
पावसाची हाक कानावर पडतेय.बाहेर अंधारुन आलंय. पण मला या अंधाराची तमा नाही. कारण अंधार हे एक संवेदनशील पण सुसंगत सत्य आहे, हे जाणतो मी. But the darkness could also be a myth! या दुसरया आभासाचे प्रयोजन मला काहि केल्या सापड्त नाहीये. तसेच, जर दंतकथंवरचे प्रारुप आवरण विलग करता आले,तर सत्य सापडेल? आणि अंधाराचे काय? एका मागुन एक प्रश्न ...हिवाळ्यातल्या पानगळीसारखे! पण आता अंधार चाचपण्यापुरतेही बळ शिल्लक नाही माझ्यात, कारण तु इथे नाहीस.
- Read more about तुटलेल्या मैत्रीणीस......
- 8 comments
- Log in or register to post comments
न्याय
येमेल्यान पुगाचेव नावाच्या रशियन बंडखोराने झारिना केथेरिन दुसरी हिच्या काळात त्याच्या शूर सैनिकांच्या साथीने बंड केले होते. या बंडाचा क्रुरपणे बीमोड केला गेला व पुगाचेवला फासावर चढवले. त्या वेळच्या शेतकरयांमध्ये एक गाणे अतिशय लोकप्रिय होते.(अलेक्झांडर पुश्किनने या बंडाचा इतिहास 'THE HISTORY OF PUGACHOV' या ग्रंथात लिहिला आहे. तसेच या बंडातील काही प्रमुख घटनांचा उल्लेख त्याने आपल्या 'THE CAPTAIN'S DAUGHTER' या कादंबरीमध्ये केला आहे.)
अंधारकोठडीत डांबलेला बंडखोर शेतकरी म्हणतो-
उद्या पहाटे माझा न्याय होणार....
त्या भयंकर न्यायाधीशाआधी झार,
- Read more about न्याय
- 4 comments
- Log in or register to post comments
जंबो जेट -जंबोजेट
सत्तर साली भारतात आलेल्या जंबोजेटने जंबो शब्द वापरात आणला. जंबोजेटच्या कहाण्यांनी-फोटोंनी पेपरांची पाने भरून वाहत होती. लांब पल्ल्याच्या ताफ्यातले एअर इंडीयाचे पहीले विमान. एअर पोर्टवर ते बघायला प्रचंड गर्दी व्हायची. सुरुवातीचे काही महीने पार्ला अंधेरी -सांताक्रुझ मध्ये लोकं गच्चीवर उभी राहून जंबो दिसायची वाट बघायची. मग जंबो सगळीकडेच दिसायला लागलं.
अंधेरीला नविन सोसायटी आली तिचं नामकरण जंबोदर्शन -
बाजूलाच दुसरी सोसायटी आली तिचं नाव विमान दर्शन
मोठं मंत्रीमंडळ आलं ते पण जंबो मंत्रीमंडळ -
मोठ्ठ्या थैल्या आल्या त्या जंबो बॅग -
मोठा वडापाव जंबो वडापाव.
सगळीकडे जंबो जंबो.
- Read more about जंबो जेट -जंबोजेट
- 16 comments
- Log in or register to post comments
खिचडी - हिंदी चित्रपटातील आधुनिकोत्तर कलात्मकता
गेली काही वर्ष टीव्ही न पहाण्याच्या आमच्या सवयीवरून काही वर्ष आम्ही नियमितपणे टोमणे ऐकत आहोत. काही महिन्यांपूर्वी, अगदी सात-आठ वर्षांच्या मुलीनेही माझ्याच घरी येऊन, आख्खं घर धुंडाळत "अय्या, तुमच्याकडे टीव्ही नाही", असले डायलॉग ऐकवले. घरी-दारी ऐकू येणार्या "अय्या, तू कधी खिचडी मालिकेचा एकही भाग पाहिलेला नाहीस" असल्या कुजकट बोलण्यांनी वैतागून शेवटी 'खिचडी - द मूव्ही' देखण्याचा मौका आम्ही मिस केला नाही. चित्रपटाची गोष्ट इथे आहेच, ती वेगळी लिहीत नाही.
भिंतीवरचे लेखन
भिंतीला रंग दिला की
अचानक
बांधलेल कुंपण
काढून टाकल्यासारख ,
मोकळ वाटत इतरांना
आता परत तिथे खरडता येईल, या आनंदाने
तस झालय
(तुझ्या फेसबुक वॉलवर लिहिता येत ते पाहून..)
पण काहीच करणार नाही..
खाजगी आणि सावर्जनिक - दोन्हीची किंमत कळते मला
मनातल्या मनात
अनेक स्वप्नात रंग भरते मी
इतरांकरता असते माझी अदृश्य शाई,
मला दिसतो तुझ्या भिंतीवरचा (इनविसिबल) ग्लू
बघ
तुझ्या डोळ्यातली मिश्कील छटा
अजूनही तशीच आहे!
- Read more about भिंतीवरचे लेखन
- 8 comments
- Log in or register to post comments
एक bitchy कविता
log out होताना दिलेली शिवी
पावला पावलांनी आत आलीये
dated and sexist
painful but not yet fatal
भिरभिर सावलीसारखी अडकली
हाडांच्या सापळ्यात उगाचच
angel बनुन,आतले naked आभास:
त्यात त्यांची शाश्वत अडगळ
अडगळीतुन मेंदुच्या उडालेल्या
ठिकरया जमा केल्या तर
हातात काय पडेल? परमार्थ?
हाताला धरुन कामाठीपुरयाच्या
स्ट्रिटलाईटखाली उभं केलस मला...
लिपस्टिक लावुन गातोय
एक ancient ballad
फुलं होऊन माझ्या वर
पडता आहेत भेसुर नजरा
आणि बलात्कार करुन
तु मात्र सोज्वळ हसतेयस
- Read more about एक bitchy कविता
- Log in or register to post comments
काही चित्रपटविषयक नियम - भाग १
आम्ही चित्रपटांच्या बाबतीत गंभीर व्हायचे अधूनमधून ठरवतो. कधीतरी एकदा याबाबतीत पीएचडी करायला उपयोगी पडावे म्हणून असे अभ्यासपूर्ण लेख लिहायचा प्रयत्न करतो. पूर्वी (इतरत्र) लिहीलेल्या "दिल" आणि "इश्क" यावरील लेखांनंतर हे आमचे तिसरे पुष्प. फूल ना फुलाची पाकळी असे लिहीणार होतो, पण येथे पाकळ्या इतक्या झाल्या की फूलच म्हणणे योग्य होईल. पण तरीही तुम्ही दिल व इश्क वाचले नसतील तर ते आधी वाचावे म्हणजे... बरे पडेल(नोट-१).
- Read more about काही चित्रपटविषयक नियम - भाग १
- 40 comments
- Log in or register to post comments