आजचे दिनवैशिष्ट्य
१६ जुलै
जन्मदिवस : चित्रकार कामिय कोरो (१७९६), तुकारामाच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करणारे काशिनाथ बाळकृष्ण मराठे (१८४४), अमेरिकन स्त्रीवादी, सामाजिक कार्यकर्ती आयडा वेल्स (१८६२), दक्षिण ध्रुवावर प्रथम पाऊल ठेवणारे नॉर्वेजियन संशोधक रोआल्ड आमुंडसन (१८७२), पेशी न मारता त्यांचा अभ्यास करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता फ्रीट्झ झर्निकी (१८८८), स्वातंत्र्यसेनानी, समाजसेविका अरुणा असफ अली (१९०९), अभिनेत्री, गायिका व नर्तकी जिंजर रॉजर्स (१९११), मराठी कथाकार, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक वामन चोरघडे (१९१४), 'आकाशवाणी' आणि 'दूरदर्शन' ही नावे सुचवणारे लेखक जगदीश चंद्र माथुर (१९१७), राष्ट्रपती पुरस्कार विजेता निर्माता श्रीनगर नागराज (१९३९), लेखक प्र. ई. सोनकांबळे (१९४३), 'विकीपीडीया'चा प्रवर्तक लॅरी सँगर (१९६८), हॉकीपटू धनराज पिल्ले (१९६८), अभिनेत्री कतरीना कैफ (१९८४)
मृत्युदिवस : लेखक नारायण दाजी लाड (१८७५), लेखक गी द मोपासाँ (१८९३), रोगप्रतिकारकशक्तीबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता एली मेचनिकॉब (१९१६), अश्लीलताविरोधी विचारांना तर्कशुद्ध विचार देणारे लेखक दत्तात्रेय गोडबोले (१९७४), नोबेलविजेता लेखक हाइनरिश ब्यॉल (१९८५), इतिहासकार वा. सी. बेंद्रे (१९९३), ख्यालगायक उस्ताद निसार हुसेन खाँ (१९९३), अभिनेत्री सुरेखा सिक्री (२०२१)
---
६२२ : प्रेषित महंम्मद पैगंबर यांचे मदिनेहून प्रयाण; हिजरी सनाची सुरुवात.
१६६१ : युरोपमधल्या पहिल्या बँकेकडून आलेल्या नोटा स्वीडिश बँकेने चलनात आणल्या.
१८५६ : हिंदू विधवांना पुनर्विवाहाचा हक्क देणारा कायदा जाहीर.
१८५७ : कानपूरच्या लढाईत ब्रिटिश सैन्याने नानासाहेब पेशव्यांचा पराभव केला. नानासाहेब पेशवे परागंदा.
१९१८ : रशियन झार दुसरा निकोलस आणि त्याच्या पत्नी-मुलांची बोल्शेविकांनी हत्या केली.
१९३५ : जगातले पहिले पार्किंग मीटर अमेरिकेत ओक्लाहोमा सिटी या शहरात बसवले गेले.
१९४५ : अमेरिकेने तयार केलेल्या अणुबॉम्बचा न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात पहिला प्रायोगिक स्फोट.
१९४८ : चाच्यांनी प्रवासी विमान ताब्यात घेण्याची पहिली घटना.
१९५१ : जे. डी. सॅलिंजरची 'कॅचर इन द राय' प्रकाशित.
१९६४ : चीनच्या पहिल्या अणुबॉम्बची लॉपनोर येथे यशस्वी चाचणी.
१९६९ : अपोलो ११चे चंद्राच्या दिशेने उड्डाण.
१९९० : यूक्रेन सोव्हिएत संघातून स्वतंत्र १९९४ : शूमेकर लेव्ही-९ हा उपग्रह गुरूवर आदळायला सुरुवात झाली. २२ जुलैपर्यंत धूमकेतूचे तुकडे गुरूवर आपटत होते.
१९९१ : जगातला पहिला धावता दवाखाना म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या 'जीवनरेखा' या गाडीचा मुंबईहून प्रथम प्रवास.
२०१३ : बिहारमध्ये माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे २३ विद्यार्थी दगावले.
- 1 view