संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन

डोंबिवली - नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, सर्व मराठी संकेतस्थळांवरील सर्व लेख, कविता, पाककृती, कौले यांच्या मथळ्यांचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक नव्याजुन्या लेखातील प्रत्येक वाक्याचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठी संकेतस्थळांवर इंग्रजी शब्द, म्हणी, इत्यादिंच्या वाढत्या वापराबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इंग्रजीऐवजी शक्यतो मराठी शब्द वापरावा, मग तो मूळ भावनेपासून कितीही दूर जावो, ते न जमल्यास त्या शब्दाचे देवनागरीकरण करण्यात यावे, तेही न जमल्यास मनसेच्या कार्यालयात अर्ज करून सदर शब्द वापरण्याची लेखी परवानगी घ्यावी, तसेच मूळ शब्दच का वापरला याचे किमान २० ओळी स्पष्टीकरण लिहून धाग्यावर डकवावे असा आदेश त्यांनी दिला आहे.

पाककृती लिहिताना चिकन, मटन, ग्रेव्ही असे शब्द वापरू नये, तसेच पदार्थांचे प्रमाण टीस्पून, मिली असे न लिहीता शेर, रत्तल, तोळा, मासा असेच लिहावे. 'कॅरॅमलाईज्ड चिकन' या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पाकक्रुतीकडे निर्देश करून ते म्हणाले, याऐवजी 'गूळकोंबडी' असे नाव जास्त शोभले नसते का? बर्गर, पिझ्झा या ऐवजी विलायती वडापाव, भरली भाकर असे म्हणण्यात यावे. एखाद्या घटकाचे मराठीत नाव उपलब्ध नसेल, तर तो घटक गाळण्यात यावा. म्हणजे तो पाककृतीतून गाळावा, गाळून वापरू नये. मायक्रोवेव्ह अवनला मराठी प्रतिशब्द निर्माण होईपर्यंत मायक्रोवेव्हमध्ये बनणारी कोणतीही पाककृती देण्यात येऊ नये, असे त्यांनी सांगितले.

माऊसक्लिकऐवजी उंदिरटिचकी, सायबरकॅफे ऐवजी जालटपरी असे शब्द रूढ करण्यात यावेत. लिंक, आपलं दुवे देताना http अशासारख्या ईंग्रजी अक्षरांचा वापर करू नये. त्याऐवजी हततपः असे लिहिण्यात यावे. मग वाचणार्‍याची ततप झाली तरी हरकत नाही. (इतकेच नाही तर मराठी संकेतस्थळाचे कोडींग देखील मराठीतच झाले पाहिजे, असे म्हणताना त्यांना एका मनसैनिकाने मागे ओढले)

दरम्यान, या फतव्यानंतर रंगार्‍यांची चंगळ झाली असल्याचे रंगारीपुरा या भागात गेल्यावर दिसून आले. शब्दाला तीन पैसे, लेखाला सहा रुपये अशा दरात मराठीकरण करून देण्याचे बोर्ड शब्दरंगार्‍यानी दुकानादुकानासमोर लावले आहेत. आपापल्या लेखाकवितापाककृतीची बाडे घेऊन त्यांच्या दुकानांसमोर सायबर आयडींच्या रांगा लागलेल्या दिसल्या.

या सर्व गोष्टींचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी सर्व स्थळांवर '४२०_प्रक्षुब्ध_दधिचि' या आयडीचे नवनिर्माण करण्यात आले आहे. सदासर्वत्र आंतरजालावर फिरून हा आयडी चुकार धाग्यांना जाळून दुग्ध, आपलं दग्ध करील, असे त्यांनी जाहीर केले.

field_vote: 
3.416665
Your rating: None Average: 3.4 (12 votes)

प्रतिक्रिया

पाय कुठे आहेत हो तुमचे? ओढायचे नाहीत, धरायचे आहेत.

शुद्धलेखनाबद्दल मनसेचे काय धोरण आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खुसखुशीत!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूक्ष्मलहरभट्टीमध्ये तापवून केल्या जाणार्‍या पाककृतींपासून मराठी जनमानसाला वंचित ठेवण्याची ही क्लृप्ती पचनी पडली नाही.

बाकी, लेख मस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिशब्द उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.

'सूक्ष्मलहरभट्टीमध्ये झटपट कविता' ही पाककृती लवकरच पोस्ट करीन, चुकलो टपालीन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लॄप्ती चा लॄ दुसरा हवा. पहिला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आणि क्लॄप्तीचा हा एकच शब्द आहे मध्ये मोकळी जागा नको. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लॄप्तीचा च्या क्लॄप्ती चा क्लॄ. तो पहिला नाही. दूसरा.
प्रकाश पडला का?
'धप्'कन आवाज आला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जरा चष्मा लावून बघा. मी दुसर्‍यांदा क्लॄ दुसराच लिहिला आहे. आणि दूसरा नाही दुसरा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यायला! काकूंनी त्यांच्या 'दूसरा' वापरून विकेटच काढली की डागदरांची. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

विकेटच काढली की डागदरांची.

यात दोन इंग्रजी शब्द...?

विकेट घेण्याला बळी घेणे म्हणतात मराठीत... अगागा.. पळा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात दोन इंग्रजी शब्द...?
विकेट घेण्याला बळी घेणे म्हणतात मराठीत

क्रिकेट हा आमचा धर्म आहे. क्रिकेटचा उगम पाश्चात्य आहे वगैरे भडकाऊ विचारांना गविंनी आळा घालावा अथवा जनक्षोभास सज्ज व्हावे. गविंसारख्या उच्चभ्रू (म्हणजे मुंबैसाईडच्या) लोकांनी पिढ्यान पिढ्या क्रिकेटला उच्च वर्गातच सामावून ठेवण्याचे प्रयत्न केले आणि खालच्या वर्गाला (म्हणजे आम्ही खेड्यापाड्याचे) क्रिकेटमध्ये वर येण्याची संधी येऊ दिली नाही. मात्र इथून पूढे आम्ही असे होऊ देणार नाही हे निक्षून सांगतो!

आघाडीचा फलंदाज,
ढोणी ब्रिगेड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

आधी क्रिकेट शब्द खोडून चेंडूफळी वापरा अन देन ओन्ली टॉक..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन तो दूसरा आहे ह्याचा धपकन आवाज यावा, म्हणून दूSSSSसरा लिहिलाय Blum 3
अन मला फार कुतुहल आहे, की हा क्लॄप्ती शब्द उच्चारतात तरी कसा? Wink कुणी रेकॉर्ड करून पोस्टेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जीभेला घड्या पडल्याशिवाय तो उच्चारता येणार नाही. नंतर जीभ सरळ करायला परत डॉक्टरांकडेच जावे लागेल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्‍ऌप्ती मधील ऌ र्‍हस्व आहे ना? (म्हणजे मराठी शब्दकोशातही तसाच दिलेला आहे, आणि संस्कृतातील* साधुरूपही तसेच आहे.)
"क्‍ॡप्ती" असे दीर्घ लिहिलेले मी यापूर्वी अधिकृत ठिकाणी बघितलेले नाही.
त्यामुळे दीर्घ लिहिण्याबद्दलची सूचना विनोदीच असावी. पण विनोद समजला नाही.

*(पाणिनीय) संस्कृतात दीर्घ "ॡ" ध्वनी असलेला कुठलाही साधुशब्द नाही. संस्कृतातला ऌ हा ध्वनीच प्रमाण मराठी उच्चारांत उपलब्ध नाही. "क्‍ऌप्ती"चा मराठीतील प्रमाण उच्चार बहुधा "क्लुप्ती" असा असावा.
(मी असा उच्चार घरगुती वापराच्या सवयीने करतो. माझ्या कुटुंबातील उच्चार बहुतेक प्रमाण उच्चारांच्या जवळचे आहेत.)

- - -

अवांतर : क्‍ऌप्ती असे लिहिणे मराठी संस्केतस्थळांच्या एडिटरांवरती जमत नाही. गमभन मध्ये "ऌ"साठी टंकन कसे करावे? ऌ म्हणजे लृ (ल्+ऋ) नव्हे. तरी मी आळसाने "ल्+ऋ" lRu = लृ असेच टंकतो. म्हणजे "क्लृप्ती" असे. प्रियाली यांनीदेखील प्रथम "क्लृप्ती" असे टंकले आहे, आणि धप्पकन विनोदात आडकित्ता यांनीदेखील क्+ल्+ॠ = क्लॄ असेच टंकलेले दिसते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इनोद इस्कटून सांगाया लाग्ला तर मज्जा जातिया त्यात्ली.
-(सर्दार) आडकित्ता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बहुतेक मनसैनिकांची शैक्षणिक पात्रता पाहता, शुद्धलेखनाच्या मुद्द्यावरून बोंब लागण्याचीच शक्यता अधिक असल्याने, सध्या हा मुद्दा धसास न लावण्याचे ठरले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुसंख्य मनसैनिक करतात ते शुद्धलेखन असा काही विचार असण्याची आतल्या गोटातली बातमी तुम्हाला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बहुसंख्य मनसैनिक लेखन करू शकतात, असे मी कुठेही म्हटलेले नाही. तेव्हा अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्याचे बंद करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी लेखन करतात असं म्हटलेलं नाही याची नोंद कृपया ख्ख्ख्ख खान यांनी नोंद घ्यावी! Wink

(खुस्पटप्रेमी) अदिती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बहुतेक मनसैनिकांची शैक्षणिक पात्रता पाहता, शुद्धलेखनाच्या मुद्द्यावरून बोंब लागण्याचीच शक्यता अधिक असल्याने
सदर वाक्यामुळे बहुसंख्य मनासैनिकांचा आणि पर्यायाने मराठी जनतेचा अपमान झाला आहे. तरी तुम्ही तत्काळ माफी मागावी नाहीतर मग साहेबांना सांगितलं म्हणून तक्रार करु नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदर वाक्यामुळे बहुसंख्य मनासैनिकांचा ...

नासैनिकांचा ?

तुम्ही कोणाचा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोंबला तिच्यायला! (हे अस्सल मराठी आहे) म्हणजे आता आम्हाला मराठी संकेतस्थळांवर डु. खाती काढावी लागणार का? Wink

आमच्या नावाचे प्रायश्चित्त म्हणून मराठीला काही शब्द अनुवादीत करून बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे!

http अशासारख्या ईंग्रजी अक्षरांचा वापर करू नये

इथे ततपप वापरता येईल! Wink

मायक्रोवेव्ह अवनला मराठी प्रतिशब्द निर्माण होईपर्यंत

अतिसूक्ष्मलहरीबंब! कसा वाटतोय?

_ या चिन्हाला अंडरस्कोअर च्या ऐवजी खालीमार असे संबोधावे.

/ आणि \ यांना पुढची आणि मागची काडी असे संबोधावे.

@ ला 'बिळात नागोबा' चिन्ह. तूर्तास इतकेच.

नंतर योग्य ती भर घातली जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

मेले, मेले, मेले!

बरं मग | या पायपाला नळी म्हणणार का? आल्ट, कंट्रोल, डिलीट, शिफ्ट, एंटर याला काय म्हणणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

| याला उभी(/ताठ)काडी हा शब्द आहे ना? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

आल्ट, कंट्रोल, डिलीट, शिफ्ट, एंटर याला काय म्हणणार?

अनुक्रमे बद्ल, पकड, वरकर, आत्शीर असे शब्द वापरता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंडरस्कोअर ला अधोरेखीत म्हणतात हो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, अधोरेखित म्हणजे हे असं. इथे इंग्रजी शब्द वापरायचा नाही म्हणून सोदाहरण स्पष्ट केलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही चिन्हाबद्दल बोलत होतो शब्दार्थाबद्दल नव्हे. समृद्ध मराठीत एकाच शब्दाचे दोन अर्थ होता कामा नये. अधोरेखित म्हणजे अधोरेखीत. खालीमार म्हणजे _, खाली मार म्हणजे... असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

अरे खरच की . माझी चुकून मिष्टीक झाली बगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओ खख्ख्ख खान, मिष्टीक हा शब्द शुद्ध बेळगावी लोण्यासारखा शुद्ध मराठी आहे, तो चालेल ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथे एका खाली एक झाडासारखे प्रतिसाद दिल्यानंतर तिसरा प्रतिसाद झाड यंत्रणे प्रमाणे न उमटता सपाट होतो आहे. माहितीतळातल्या गिचमिडात बिघाड झाला आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

असेच मलाही दिसते आहे, त्याबद्दल 'व्यवस्थापन' क्षेत्रात जाऊन काही बदल करून पहाते आहे. तोपर्यंत प्रतिसाद दिसतात हेच गोड मानून घेणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वतःचे जालीय नावच इंग्रजी लिपीमधे लिहणार्‍या सदस्याचे स्पष्टीकरण ग्राह्य धरण्यात येऊ नये असे मत व्यक्त करू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

जन्माला गुजरात्याच्या पोटी आला पण मर्‍हाटी म्हणून वाढला तर त्याला आपण मराठी म्हणतोच ना? तसंच हे आमचं! मला आपलं म्हणा! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

मला आपलं म्हणा

हे काय नवीन?
तुला Nile म्हणायचं का 'आपलं' म्हणायचे ते एकदा नक्की काय ते सांग Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घ्या! नावावरून अनामिक भांडतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मगं, आम्हाला नाव नसलं म्हणून काय झालं, ज्यांना आहे त्यांनी तरी ते मर्‍हाटीतच लिहावं, नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

नाइल (निळे?) यांना अधिकृत भाषांतरकार नेमलेच पाहिजे. खालीमार आणि बिळात नागोबा वाचून हहपुवा.....

अजून बरेच शब्द तुमची वाट पाहत आहेत! हे पहा:

http://translate.wordpress.com/projects/wpcom/mr/default
(इथे खरोखर शब्दांची गरज आहे, तरी....)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्डप्रेसवर माझी भाषांतरं करायला गेलो तर तिथेही बॅन करतील मला, तसंही आता फार थोड्या जागा उरल्यात जिथे मी बॅन नाहीए! Wink

नाइल, निळे, निळ्या काहीही चालेल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

येक्दा पानट परी असं म्हटलो तवा पानट मास्तरांनी कानाखाली जाळ काढ्लेला. ग#%$#च्या, पानटपरी म्हन की नीट आसं म्हटले व्हते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ह्या डागदरांची (हा मराठी शब्द आहे) सही उडवा रे. इंग्रजीत लिहलीए!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

डागदरांचं नाव सुद्धा मराठी नसून मोठ्या साहेबांचे आद्य शत्रू कानडी लोक यांच्या भाषेत आहे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आजकाल आडकित्ता अशी आय्डी घेऊन जर याहू वर मराठी चॅटरूम मधे गेलात. तर मराठी पोरा बाळांचे 'पीएम' येतात, तुम्हाला मुलगी समजून. ही आजच्या आमच्या मराठीची दशा. तो शब्द कन्नडोद्भव आहे की अपभ्रंशातून आलाय, काय फरक पडतो?
सुपारी कातरण्यासाठी आडकित्ता वापरतात हे आजच्या गु(टखे) खाणार्‍या पोट्ट्यांना समजवून कोण सांगेल?
वरतून 'नेट'वर 'नट्स' भरपूर असतात. अन आडकित्त्याचं विंग्रजी भाषांतर नट्क्रॅकर असं होतं. म्हणून ती 'सिग्नेचर' माझी. सिग्नेचरचं एक भाषांतर स्वाक्षरी हे असलं, तरी ते चपखल नाही. अनेक अर्थछटा आहेत. ७ वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जखमेचा व्रण पाहून मी ओळखू शकतो की हे मी केलंय की नाही. ती सिग्नेचर आहे. स्वाक्षरी इतकं मर्यादित नाही.
राहिला प्रश्न भाषा शुद्धीचा.
म्हंजे इंग्रजी/मराठी खिचडीचा.
माझ्या मते भाषा प्रवाही असावी. मराठीत प्रचलित इंग्रजी शब्दांना ओढून ताणून मराठी आणू नये, या मताचा मी आहे..

(सिग्नेचर (कोळून) पिणारा)
आडकित्ता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

७ वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जखमेचा व्रण पाहून मी ओळखू शकतो की हे मी केलंय की नाही.

तुम्ही काय एक टाका उलट - एक टाका सुलट अशी काहीतरी डिझाईन स्टाईल वापरता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

७ वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जखमेचा व्रण पाहून मी ओळखू शकतो की हे मी केलंय की नाही.

सातसात वर्षे खुणा टिकवणार्‍या सर्जनकडे जायचं म्हणजे वांदाच आहे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

पानट मास्तर खरोखरच परी असते तर जाळ निघण्याऐवजी एक गोडगोड, अंमळ दीर्घ गालगुच्चा घेतला असता का??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो ते स्वतः 'मास्तर' होते ना? पानटांची परी तशी अंमळ ओढून ताणून परि बनवावी लागली असती.. म्हणजे पंख लावले तरी वजनामुळे धप्कन खाली पडली असती. पण म्हणून तिला पानटपरी? त्यामुळे जाळ वॉज आवश्यकच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मायक्रोवेव्ह म्हणजे अतिसुक्ष्मलहरी नाही काही, सरळ शुद्ध मराठीत मायक्रोवेव्ह म्हणजे माझ्या-काव़ळ्याची-लाट!
आपल्याला तर ते उंदीरटिचकी फार्फार आवडलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

माझ्या-काव़ळ्याची-लाट आवडल्या गेले आहे! फणी अशी श्रेणी दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

हहपुवा _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

ठ्ठो!
ROFL लय भारी रे खखाना!
ह ह पु वा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिंक, आपलं दुवे देताना http अशासारख्या ईंग्रजी अक्षरांचा वापर करू नये. त्याऐवजी हततपः असे लिहिण्यात यावे.

हे वाचून अगदी ततपप झाले आमचे Wink

लेखन एकदम आवडेश.

बहुतेक मनसैनिकांची शैक्षणिक पात्रता पाहता, शुद्धलेखनाच्या मुद्द्यावरून बोंब लागण्याचीच शक्यता अधिक असल्याने, सध्या हा मुद्दा धसास न लावण्याचे ठरले आहे.

मी मनसैनिक नाही, तरी देखील वरचे वाक्य खटकले. ह्या विषयी आपल्याकडे काही विदा असल्यास तो जाणून घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

...आणि दुवा जर एसेसेल सिक्युअर्ड असेल तर हततपस्स: म्हणावे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. हा लेख 'त्या' मनसैनिकांविषयी नैच्चे कै, इथल्याच सैनिकांविषयी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव सैनिका
पुढेच जायचे
नमागुती तुवा
कधी फिरायचे...
सैनिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला वाटलं शुद्धलेखन आणि नमोगताबद्दल डॉक्टरसाहेब बोलत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढे इकडे आहे हो, डावीकडे! तिकडं कूठं चाल्लां मागं! ह्या झंटलमन लोकांल्ला काय कळन तर शप्पत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

माघारीनै. घरी चाल्लंय त्ये सैनिकसायेब. यास्टेरिक्ष अन ओबेलिक्षने बुक्लून काढ्लंया त्या रोमन सैनिकांस Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फुटलो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखन लई मंजे लई भारी हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अच्रत बल्वत

हे मराठी चाल्णार कं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

आपले लेखन आवडायला लागले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मजा आली धागा व प्रतिसाद वाचुन!!

अवांतर- (नवीन भर मराठी शब्द - टेनीस- हरितपटलावर घे टकाट्क दे टकाट्क)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0