Skip to main content

मेघ ..असाही ( अष्टाक्षरी )

मेघ कैवल्याचे देणे
मुक्त-सावळा-सुंदर
जणू चालता चालतो
माझ्यासवे मुरलीधर

मेघ वारीत चालतो
वारकर्‍यासवे दंग
जलधारांच्या अंगांनी
नाचतसे पांडुरंग

मेघ क्षणात लिलया
काढी मांगल्याची नक्षी
लख्ख केशरी पंखाचे
किती आभाळात पक्षी

मेघ वात्सल्याची भाषा
येई उरात दाटून
तृष्णावल्या धरेसाठी
जाई फुटून फुटून

गुड मॉर्निंग

गुड मॉर्निंग म्हणतील तुझे त्रास तेव्हा बोलू
सोप्पी म्हणून कुशीवरती लागता येईल वळू.
जोवर जगता येईल तोवर सिंपल हार्टेड जगू
तूही हस
उठून बस
तुझ्या बाऊंड्रीवरच्या जगात आहे स्ट्राईक
तरी यॉन कर अन् म्हण दॅट्स ऑल राईट !

तळव्यावरच्या भेगांमधले देश उकरुन काढ
किती म्हणून कळणार नाही आहे किती गाढ
जाळ आहे धुळी खाली त्याला फुंकर घाल
तूही हस
उठून बस
तुझ्या बाऊंड्रीवरच्या जगात आहे स्ट्राईक
तरी यॉन कर अन् म्हण दॅट्स ऑल राईट !

शक्य नसतानाही जे घडलं ते घडलं, ब्राव्हो !
प्रेम झालं, आता युनिफॉर्म घाल, रेडी हो.
बाऊंड्रीवरती ये अन् सभोवार फोड टाहो.
तू आवर
अर्जंट निघ

प्रथमोपचार पेटी - First Aid Box

प्रथमोपचार पेटी - First Aid Box
प्रथमोपचार पेटीत काय काय असावे असा शोध आंतरजालावर घेतला. मराठीमध्ये असले काही आढळून आले नाही. मी काही औषधांची यादी केली आहे. यातील काही औषधे भारतात ओव्हर द काउंटर OTC मिळतात. (तसी सगळीच औषधे येथे मिळतात. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे नाही. गुण येण्याशी मतलब.)
जाणकारांनी त्यात भर घालावी हि विनंती.
१. Combiflam - ताप, अंगदुखी
२. Crocin - ताप, डोकेदुखी
३. Disprin - डोकेदुखी
४. Alerid - D - सर्दीसाठी
५. Coldact - सर्दीसाठी
६. Cetrizane - सर्दीसाठी
७. Strepsil - घशात जळजळ
८. Pudin Hara - अ‍ॅसिडीटी
९. Eno - अ‍ॅसिडीटी
१०. Gelusil - अ‍ॅसिडीटी

कामवाल्या पोरीचा वाढलाय तोरा

कामवाल्या पोरीचा वाढलाय तोरा
बायको म्हणाली चढवित पारा

मी म्हटले की काय झाले आता
दांड्या मारते न सांगता सवरता

पुढे म्हणे उद्या मी फ़ैसलाच करते
कालपर्यंतचा पगार हातावर ठेवते

म्हणालो बिनधास्त काढूनच टाक
गेली तर अजूनही मिळतील लाख

दुस-या दिवशी ती आली कामवाली
बायकोच्या अंगाची लाही लाही झाली

आधी मला सांग कुठे होतिस काल?
कशाने इतकी झालीयेस मस्तवाल?

ती म्हणे थोडंसं काम होतं बाई
आवाजात कमालीची होती नरमाई

काम बिम काही नाही खूप झाले तुझे
हिशेब घे सगळा नि घर सोड माझे

असे नका करू माई ऐकुन तर घ्या
कारण पटले नाही तर हाकलून द्या

काय झाले, काल भाऊ दारू पिऊन आला

प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स...

अमेरिकेत अनेक ठिकाणी मी पाट्या बघितल्या आहेत. विशेषतः प्राणीसंग्रहालयात आणि नॅशनल पार्क्समध्ये. 'प्लीज डू नॉट फीड द ऍनिमल्स'. येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये अनेक अस्वलं असतात. तिथे 'प्लीज डू नॉट फीड द बेअर्स' अशा पाट्यादेखील दिसतात. हा संदेश का दिलेला असतो असा मला नेहमी प्रश्न पडत असे. प्राण्यांपासून माणसाला धोका असतो म्हणून की माणसापासून प्राण्यांना धोका असतो म्हणून? त्याचं थोडक्यात उत्तर असं की दोन्ही बरोबर आहे. माणसांनी प्राण्यांना खायला घातलं तर त्यांना माणसांकडून खायला मिळेलच अशी अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे जे लोक त्यांना खायला घालत नाहीत त्यांच्याबाबतीत ते आक्रमक होऊ शकतात.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

परकीय शक्तींचा मोठ्या प्रमाणात शिरकाव?

Taxonomy upgrade extras

चर्चाविषय सुरू करण्यापूर्वी एक घटनाक्रम समोर मांडतो:
-- २० जुलै २०१०: हिलरी बाईंचे वक्तव्य "न्युक्लियर लायाबिलीटी शिल्लक असली तरी भारताशी संबंध हितकारकच"
-- २० ऑगस्ट २०१०: भारताच्या कॅबिनेटने न्युक्लियर लायाबिलिटी बिलला मंजुरी दिली. विरोधकांना आक्षेप
-- २५ ऑगस्ट २०१०: विरोधकांच्या प्रचंड रेट्यामुळे मूळ प्रस्तावात बदल. दंड कित्येक पटिने वाढला (५०० कोटीवरून १५०० कोटी). याशिवाय Operator of Atomic plan will be Only the government of India असा स्पष्ट उल्लेख. बिल लोकसभेत संमत
-- ३१ ऑगस्ट २०१०: बिल राज्यसभेत संमत

मिठीत कळी उमलली

मिठीत कळी उमलली
राया तुम्ही प्रेमाची फुलबाग केली
तुमच्या मिठीत कळी उमलली

वाट कितीक पाहीली थकलं डोळं
आज उशीरा का येनं केलं?
रुजूवात कराया मोहोर उठवा गाली
तुमच्या मिठीत कळी उमलली

सजवून माझी काया नखरा केला
जवळ घेता तुम्ही गोड गुन्हा झाला
नजरेचा तिर मारता अंगी वीज चमकली
तुमच्या मिठीत कळी उमलली

कमरपट्टा उगा मला का रुतू लागला?
शालू अवजड झाला आज का अंगाला?
चोळी ऐन्याची नको तिथं उसवली
तुमच्या मिठीत कळी उमलली

- पाषाणभेद
१६/११/२०११

नव्या राज्यांची निर्मिती: राजकीय की देशाच्या हिताची!

Taxonomy upgrade extras

राहूलबाबा काँग्रेसचं उत्तरप्रदेशमध्ये आणि आपलं काँग्रेसमध्ये बस्तान बसविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असताना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी प्रदेशचं विभाजन करण्याचा निर्णय जाहीर करून केंद्र सरकारकडे गुगली टाकली आहे. शिवाय ही गुगली मुथ्थय्या मुरलीधरन किंवा आपला हरभजनसिंग यांच्या गुगलीसारखी साधीसुधी नाही. तर एका चेंडूत दोघांच्या दांड्या उडवणारी आहे. भाजपासारखा सत्तेला आसुसलेल्या पक्षाचीही दांडी गुल करण्याची किमया त्या चेंडूत आहे. एका दगडात दोन नव्हे एका चेंडूत दोन फलंदाजांना घरचा रस्ता दाखवणारा चेंडू तुम्ही पाहिला नसाल.

बारसे

खवचटखानांच्या सदस्यभरती योजना धाग्यावरील पहिल्याच प्रतिसादावरून हा धागा काढायची कल्पना आली आहे.

इथे वावरणार्‍यांनी स्वतःस काय म्हणवावे?
हा चर्चेचा प्रस्ताव आहे.

तिथे गविंनी अय्याकर सुचविले आहे.
मी 'अक्षराईट्स' सुचवितो आहे.

तुमच्या सूचना काय?