गुड मॉर्निंग

गुड मॉर्निंग म्हणतील तुझे त्रास तेव्हा बोलू
सोप्पी म्हणून कुशीवरती लागता येईल वळू.
जोवर जगता येईल तोवर सिंपल हार्टेड जगू
तूही हस
उठून बस
तुझ्या बाऊंड्रीवरच्या जगात आहे स्ट्राईक
तरी यॉन कर अन् म्हण दॅट्स ऑल राईट !

तळव्यावरच्या भेगांमधले देश उकरुन काढ
किती म्हणून कळणार नाही आहे किती गाढ
जाळ आहे धुळी खाली त्याला फुंकर घाल
तूही हस
उठून बस
तुझ्या बाऊंड्रीवरच्या जगात आहे स्ट्राईक
तरी यॉन कर अन् म्हण दॅट्स ऑल राईट !

शक्य नसतानाही जे घडलं ते घडलं, ब्राव्हो !
प्रेम झालं, आता युनिफॉर्म घाल, रेडी हो.
बाऊंड्रीवरती ये अन् सभोवार फोड टाहो.
तू आवर
अर्जंट निघ
तुझ्या बाऊंड्रीवरच्या जगात आहे स्ट्राईक
तरी यॉन कर अन् म्हण दॅट्स ऑल राईट !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कुशीवर वळता न येणे, तळव्यावरच्या भेगांमधले देश काढणे, तिच्या 'बाऊंड्रीवरच्या जगात' स्ट्राईक असणं..
एका गरोदरपणाला कंटाळलेल्या स्त्रीच्या पतीने केलेली कविता वाटली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही एका वळूवर केलेली कविता आहे ना?
यॉन कर, तळव्यावरच्या भेगांमधले देश उकरुन काढ (पक्षी खुरांना नाल ठोकणे), जाळ आहे धुळी खाली वगैरेवरुन तसे वाटते.फक्त वळूला युनिफॉर्म कसा घालायचा हे ठाऊक नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेचा अर्थ लावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. काहीसं सापडतं आणि चटकन निसटून जातं.

बॉर्डर हा शब्द देशाच्या सीमेसाठी आणि लहान बालकाच्या गर्भावस्था व जन्म यांच्या सीमेसाठीही वापरला गेलेला असावा. 'बाऊंड्रीवरती ये अन् सभोवार फोड टाहो.' यातून ते अधोरेखित होतात. उपडी वळणं आणि मॉर्निंग सिकनेसचे उल्लेखही तिथेच बोट दाखवतात. गर्भावस्थेत झोपल्याप्रमाणे सुखात असलेल्या जनतेला मणिपूरसारख्या प्रदेशात असलेल्या संपाबद्दल जे अज्ञान आहे त्याविषयी कविता काही बोलते. पण यापलिकडेही काही असावं अशी हुरहूर लागून राहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0