उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ६

आधीचे भाग | २ | | ४ |

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अ‍ॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे

आधीचा भाग बराच लांबल्याने, वाचनाच्या सोयीसाठी तेथील प्रतिसादाचे रुपांतर नव्या भागात करत आहोत.

=======

भेकरापासून डुकरापर्यंत आणि माशांपासून अनेक पक्ष्यांपर्यंत विविध प्रकारच्या जीवसृष्टीत कोणताही जातीभेद न करता, प्रत्येकाला समान 'न्याय' देणार्‍या म्हणून लौकीकास पावलेल्या राधिका यांच्या शिफारसीवरून विकांताला कुलाब्याच्या 'ललित रिफ्रेशमेंट्स' मध्ये गेलो.

तेथील वेटर आमचे आदरातिथ्य करायला मिळतेय या खुशीने माहितीचा भडिमार करू लागल. आम्ही कोणत्याही पदार्थावर बोट ठेवले की त्याच्या उत्पादनापासून उपलब्धतेपर्यंत आमचे बौद्धिक होऊ लागल्यावर मग आमच्या "रात्रीसुद्धा 'लंच' मिळु शकेल का?" पासून ते "गोड्यापाण्यातील मासे चवीला गोड नसतील ना?" इथपर्यंतचा प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर आम्ही त्याची खेचतो आहोत असा संशय त्याला आल्याने त्याने काढता पाय (स्वतःच) घेतला.

तर आम्ही मुळातपच पक्षीप्रेमी आस्ल्याने "बदक, काडा (क्वेल, मराठीत बहुदा 'लावा' पक्षी) आणि चिकन" अश्या तीन पक्षांना आमच्या निवडीत स्थान देण्याचे नक्की केलेच. शिवाय खास केरळी (देवनागरी अंदाजः)'करीमीन पोळ्ळीचट्टु' (रोमनः- Karimeen Pollichattu) नावाच्या गोड्या पाण्यातील माश्याच्या मुक्तीचा मार्गही मोकळा केला. या पदार्थांपैकी बदक बहुतांश लोकांना आवडले. त्यांची अंगभूत चवच छान होती, शिवाय ग्रेवीही उत्तम झाली होती, शिजलेही चांगले होते व चिकनपेक्षा बरेच लुसलुशीत वाटले. चिकनचीही ग्रेवी चांगली होती पण खास केरळी म्हणावं असं त्यात काही नव्हतं. काडा फ्राय पद्धतीने मागवला होता. या चिमुकल्या पक्षांत अपेक्षेप्रमाणे अगदीच कमी मांस निघाले. चव/बनवणेही ठिक-ठाक होते. मात्र सर्वात कळस होता तो 'करीमीन पोळ्ळीचट्टु' हा प्रकार

केरळहून मागवण्यत येणार्‍या एका गोड्या पाण्यातील माशाला, विविध सुग्रास - सुवासिक टिपिकल केरळी मसाल्याच्या मिश्रणाने मॅरीनेट करून, केळीच्या पानात गुंडाळून शिजवले/वाफवले जाते. आपल्यासमोर केळीच्यापानाला उघडून त्याचा वास-गंध आधी तुमचा कब्जा घेतो नी गोड्या पाण्यातील माश्यांचे लक्षण असणार्‍या काट्यांच्या विपुल संख्येकडे तुम्ही साफ दुर्लक्ष करत केवळ त्या चवीत वाहत जाता.

बाकी, सोबतच्या 'व्हेज' मंडळींना फारसे काहीच वेगळे मिळाले नाही. पायसमही बेतास बातच होता. एकुण एक्सीपिरियन्स ठिक ठाक असला तरी बदक नी करीमीन ने संध्याकाळ जिंकलीच!

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

लै लै दिवसांनी ; जवळपास बारा वर्षांनी बोरकूट खाल्ल्ला.
त्यावेळी प्रचंड आवडत असूनही तीर्थरुप नामक एटिएम मशीनची आमच्यावर कृपा नसल्याने; हा पदार्थ फार खाता आला नाही.
दरवेळी खाण्यासाठी लै झोल करावे लागत.
आता खिशात दमड्या आहेत तर पुणयत बोरकूट कुठे सापडतच नाहिये.
मूळ गावी गेलो होतो तेव्हा थेट पंचवीस रुपयांचा बोरकूटच्या डब्ब्यांचा संच आणून ठेवलाय.
आता सवडिने खाइन.
ज्यांनी बोरकूट खाल्लेला नाही त्यांनी बालपण जगलेलच नाही असं मी बोर्कुटपंथी म्हणू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सदाशिवपेठेत भावे हायस्कुल किंवा रेणूकास्वरुपच्या बाहेर बोरकुट आणि तत्सम शाळकरी-मावा मागीलवर्षापर्यंत मिळत असल्याचे आठवते, पण आता खाल्ल्यावर फारच अंबट खाल्ल्याची जाणिव होते, चवीचा तोच आनंद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या शाळेजवळील पुडी घेतल्यावर एक्झॅक्ट हीच प्रतिक्रिया होती माझी दोनेक दिवसापूर्वी.
"बोरकूट फारच आंबट लागतय. शिवाय दर्जाही घसरलेली दिसतो."
मग मी आठाण्याच्या इलुश्या पुडीऐवजी मोठे केळकर ब्रँडचे बॉक्समधील प्याकिंग घेतले.
त्यातली चव आंबट गोड आहेच. पण आवडली. त्या पुडीपेक्षा शतपट आवडली.
हे का झालं असवं?
पंधराएक वर्षापूर्वी पुडी पंचवीस पैशाला, चाराण्याला होती.
पंधरा वर्षान्म्तर तीच क्वालिटी मेंटेन करुन तेवढीच पुडी आता किमान एक दीड रुपयाला तरी हवी.
ती पन्नास पैशात द्यायची म्हटलं तर दर्जात तडजोड करावी लागणार.
अर्थात हा माझा तर्क.
घासकडवींनी इतरत्र दिलेले उदाहरण इथे चपखल बसते.
अमेरिकेतल्या कुथल्या तरी विमानसेवेची किंमत मागील तीनेक दशकात फक्त दुप्पट झाली आहे.
एकूण महागाई पाहिली तर ती न्दिआन दहापट तरी व्हायला हवी होती.
थोडक्यात विमानसेवा प्रचंड स्वस्त झाली; पण दर्जा गंडला.
लक्झरी कमी झाल्या. विमानसेवेचे एस्टीकरण झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नेमका माहीत नाही. आम्ही साधारण करिमीन पोल्लीचेट्टू असा उच्चार ऐकला. चुभुदेघे.

नाव आणि वर्णन ऐकून केरळच्या अप्रतिम सहलीची आठवण झाली.

हा मासा - करिमीन मुख्यतः अलेप्पी आणि त्यातही कुमारकोम भागातला विशेष मानला जातो. आणि पोल्लिचेट्टू हा पदार्थ खास कुमारकोम मधला.
बहुधा वेंबनाड लेक किंवा जवळच्या मोठ्या तळ्यांमध्ये पकडलेले मासे मॅरिनेट करून केळीच्या पानात वाफवले जातात.
मत्स्यावतार आवडत काटे वगळता केवळ स्वर्गीय अनुभव.
एकूण केरळी माशाचे पदार्थ आवडला. हा जरा खास मानला जातो.

आठवण ताजी केल्याबद्दल धन्यवाद!

जाता जाता बहुतेक केरळी मासा पदार्थांना मीन नाव आहे - उदा. थेक्काळी मीन करी, मीन पापस वगैरे. एक्दम संस्कृतोद्भव मीन नाव कसं गेलं तिथे हे माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाता जाता बहुतेक केरळी मासा पदार्थांना मीन नाव आहे - उदा. थेक्काळी मीन करी, मीन पापस वगैरे. एक्दम संस्कृतोद्भव मीन नाव कसं गेलं तिथे हे माहीत नाही.

मलयाळम ही तमिऴपासून वेगळी होण्याअगोदर दोहोंचा मिळून एकच एक कंटिन्युअम होता. मीन हे नाव मुळात त्या प्राचीन द्राविडी भाषेतीलच असावे असे काही तज्ञांचे मत आहे. तिथून मग संस्कृतात गेला इ.इ. तसेच अजून एक उदा. देतात ते म्ह. संस्कृतात पाण्याला नीर म्हंटात त्याचे. तोही द्रविडोद्भव आहे असेच म्हटले जाते. (त्यावर खंग्री चर्चा अन्यत्र केलेली होती तिचा दुवा शोधावा लागेल. असो.)

अन अतिअवांतर: थेक्काळि नसून तक्काळि असा उच्चार असावा भौतेक. अर्थ आहे टमाटू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उच्चाराबद्दल सहमत आहे. इंग्रजी स्पेलिंग thekkali होते. केरळचा विचार करता the म्हणजे ते किंवा त व्हायला हवा.
आणि हो टोमॅटो करीच होती. झकास प्रकार आहे.

बाकी केरळ आणि आंध्र या दोन्ही राज्यांत नीर असंच आजही म्हटलं जातं. बाहेर रेस्टॉरंटमध्ये 'तन्नी' शब्द वापरलेला ऐकलाय पण
नायर घरांमध्ये नीर म्हणत होते आणि आंध्रात बहुतेक सर्वत्र नीळ्ळू हे नीरचे तेलूगू रुप वापरात ऐकलेले आहे.

दोन्ही अवांतर आवडले. येऊ द्या..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केरळास पुन्हा जाईन तेव्हा हे मीनप्रकरण लक्षात ठेवेन. बहुत धन्यवाद!

बाकी केरळ-आंध्रासोबत कर्नाटकातही नीर असेच म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कर्नाटकातही नीर असेच म्हणतात.

नीर की नीरू? मी नीरू असे ऐकलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा बरोबर. फक्त बोलण्याच्या भरात ते नीर होऊन जाते कैकदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किती ही "नीर स" चर्चा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

की तीही नि रसचर्चा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चर्चा अगदि नीर लेप झाली!
बहुत आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्स!

चरणयमक पहिल्यांदाच अन तेही गद्यात रचावयास मिळाल्याने आनंद झाला. Smile

बाकी निर्लेप म्ह. नीर लेपच अष्णार असे वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी सुचवलेले रेस्तराँ तुम्हा सर्वांना आवडले हे वाचून आनंद झाला. आता ते सुचवल्याबद्दलची माझी फी तुम्ही सगळे मिळून मला द्या म्हणजे झाले. माझी फी : माझ्यासोबत त्या रेस्तराँमध्ये जाऊन जेवणे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

ttmm?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ttmm.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

मी अ‍ॅज युज्वल तयार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

२३ मार्चला संध्याकाळी मी आणि माझे दोन मित्रमैत्रिणी मिळून सांताक्रूज पूर्व येथे ईशान्य भारतीय जेवण जेवण्यासाठी जाणार आहोत. ऐसीकरांपैकी कोणाला आमच्यासोबत यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.

जेवणासाठी आमची पहिली पसंती नव्या किंग चिलीला आहे, कारण आम्ही तिथले जेवण आधी चाखून पाहिलेले नाही. तेथे ईशान्य भारतीय पदार्थ मेनूवरती दिले असले, तरी प्रत्यक्षात त्यासाठी तासभर आधी ऑर्डर देऊन ठेवावी लागते. या पदार्थांमध्ये चिकन, पोर्क, बीफ अशा प्रकारचे मांस असेल. साधारण किती खर्च होईल ते आत्ता सांगता येत नाही. झोमॅटोवर कॉस्ट फॉर टू ६०० रु. इतकी दिली आहे. परंतु खास ऑर्डर दिल्याने किंमत जास्त लावली तर सांगता येत नाही.

काही कारणाने तिथे ते पदार्थ उपलब्ध नसतील तर जुन्या किंग चिलीमध्ये जाऊ. मी आधीच्या एका प्रतिसादात या रेस्तरॉविषयी आणि तिथे मिळणार्‍या तांखुल पोर्कविषयी लिहिले होते. दुर्दैवाने तिथे आता पोर्कचे पदार्थ मिळत नाहीत. परंतु ईशान्य भारताकडचेच इतर काही सामिष पदार्थ नक्की मिळतील.

कोणा ऐसीकरांची सोबत मिळाली तर आनंद होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

आताच आलेल्या संदेशानुसार ह्याच दिवशी मित्राचा वधूसंशोधनाचा कार्यक्रम आहे.
त्यात सहभागी होण्यासाठी इथेच थांबणे आवश्यक आहे.
मुंबैस येउ शकत नाही.
Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आळसटलेल्या रविवारच्या सकाळी प्रचंड भूक लागलेली असली तरी कोणाचीच पावले स्वयंपाकघराकडे वळत नाहीत. एकमेकांकडे आशेने पाहून झाल्यावर शेवटी कंटाळून मी फ्रीजकडे वळले. आदल्या दिवशी आणलेला पिकरेल मासा वापरून टाकणे गरजेचे होते, थोडी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी शिल्लक होती, ताजे चेरी टोमेटोज आणि सॅलेडची पाने हाताशी होती, काल बनविलेल्यातले तीन छोटे नान शिल्लक होते, सगळा हिशोब जमला आणि त्यातून नान-पिकरेल ओपन सँडविच बनविले गेले. पिकरेलवर थोडी मीठ आणि मिरपूड टाकून ते तव्यात लोण्यावर भाजले, हा नाजूक मासा भाजायला दोन-तीन मिनिटे पुरतात. नान ओव्हनमधे थोडे गरम केले, त्यावर सॅलेडची पाने ठेऊन त्यावर मासा रचला, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, मेयोनिज शिंपडले. कोथिंबीरीची पाने आणि चेरी टोमेटो घालून सजविल्यावर ब्रंच तय्यार! बनवायला एकूण दहा मिनिटे लागली आणि पदार्थ अतिशय चविष्ट झाला होता.
image

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्रिकेत असताना हा मासा एकदाच बनवायचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय (खास उत्तन-ख्रिश्चनपद्धतीच्या) हिरव्या ग्रेवीत (भरपूर कोथिंबीर - थोडा पुदिना, ठेचलेल्या मिरच्या-आलं-लसूण, रंगापुरता पालक आणि खास 'बाटगा' ट्वीस्ट किंचित - फारतर चमचाभर- आमचूर पावडर / आगळ.)

आधी मासा नेहमीसारखा मॅरीनेट केलेला, तेलावर हलकासा फ्राय करून या ग्रेव्हीत टाकल्यावर मात्र एकदम विरघळल्यासारखा झाला! म्हणून काही पीसेस वेगळे वाढून वरून थेट ताटात ग्रेव्ही ओतली - लाजवाब प्रकार झाला होता!

असो.

तुम्ही दिलेली पाकृ खरतनाक आहे का फोटो जीवघेणा आहे हे ठरवणे बाकी कठीण आहे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही दिलेल्या पाकृती नेहमीच लाजवाब असतात. पण अश्या काही युक्त्या तुमच्या कडून ऐकल्या (वाचल्या) की मग पाक'कृती' आणि पाक'कला' ह्यातला नेमका फरक कळतो Smile उत्तम कलाकार आहात तुम्ही! __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरीच पाव केल्याने मिसळपावाचा बेत झकास जमून आला. राजेश घासकडवी यांची पावाची पाककृती वापरली. पाव अपेक्षेपेक्षा चांगले झाले. लुसलुशीत आणि खरपूस पाव भरपूर खाल्ले. (हायब्रीड मटकीची मिसळ जितपत चांगली होते तितपत झाली होती.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश घासकडवी यांची पावाची पाककृती
............पाव मस्त दिसत आहेत. दुवा मिळेल काय ? या संस्थळावर तरी शोधून सापडली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे पाहाः http://www.misalpav.com/node/11070

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हायब्रीड मटकी आणि हायब्रीड नसलेली (किंवा इतर) मटकी यांच्यातला फरक काय? जालावर काही चित्रं असल्यास दाखवता येतील काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गावरान मटकी काळसर आणि आकाराने बारीक (आणि महाग) असते. मला गावाकडे अनेकदा आठवडी बाजारात विकत मिळाली आहे. ग्रोसरी दुकानात शक्यतो उजळ रंगाची आणि जाड मटकी मिळते. ती गावरान वाणाची नाही.

तुलनेसाठी विकीपीडियावरील जाड आणि बारीक मटकीचे एक चित्र देत आहे. यातील बारीक दिसणाऱ्या मटकीपेक्षाही गावरान मटकी लहान आणि अधिक काळसर व चविष्ट असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रोसरी दुकाने भारतातली की पाश्चात्त्य देशातली ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दोन्हीकडची. (भारतातील शहरातील दुकाने)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जाडी मटकी आमच्या गावातल्या भारतीय वाण्याकडे मिळाली. आत्तापर्यंत गावरान मटकीसारखी दिसणारी, चविष्ट मटकी मिळत होती, पण या वेळेस ही जाडी मिळाली. आणि खाल्ल्यावर चवीतला फरक लगेच समजला. जाड्या कडधान्याच्या पिशवीवर भलतंच नाव होतं; आणि चवही फार सपक असल्यामुळे ही मटकी नसून वेगळ्या उपजातीचं कडधान्य असेल असा संशय आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जाड्या कडधान्याच्या पिशवीवर भलतंच नाव होतं;

कोणते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय ही शिजायला वेळ लागतो. अगदी प्रेशर कुकरमधे शिजवली, तरिही जाड्या मटकीप्रमाणे मऊ मेण होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये असलेल्या पॉश या काश्मिरी रेस्तरांला भेट दिली. मेन्यूमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ आहेत, यादी खूपच लांबलचक नाही तरीही माफक पर्याय आहेत. बर्‍याच गोष्टींमध्ये कमळदेठ दिसल्याने ऑर्डर केलेला पदार्थ न खाता येण्याजोगा असेल तर काय घ्या म्हणून सरळ थाळी मागवली. बरेचसे पदार्थ एकत्र चाखता येतील हा ही एक हेतू होता. बसण्यासाठी शिकाराटाईप भारतीय बैठक्,समोर लाकडी टेबल व समोरून पारदर्शक पडदे सोडले आहेत.

पनीर वातड होते. राजमा आणि दम आलू काश्मिरी केवळ झक्कास. कमळकाकडीचे काप, कमळकाकडी+पालकचे कबाब आणि एक हिरवी भाजी कोणती होती ते आठवत नाही पण तीही स्वादिष्ट होती. सर्वात शेवटी फिरनी आणि कहावा. मंद दालचिनीचा स्वाद असलेले हे सोनेरी द्रव्य भारी आवडले..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

'कहावा' या पेयात पाईनसारख्या शुष्कफळाचाही स्वाद होता का ? ते थंड होते की गरम ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कहावा हलकासा गरम होता. पाईन यापूर्वी खाल्लं नसल्यानं त्याची चव होती का हे सांगता येत नाही. माझ्या काश्मिरी मैत्रिणींच्या मते इथल्या चवी ऑथेंटिक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

ताटात ३ काड्या दिसत आहेत त्या कसल्या आहेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कमळाच्या देठाचे तळलेले काप आहेत ते.. कमळाला पश्तू भाषेत बहुतेक nadier म्हणत असावेत. मेन्यूवरची नांवं वाचून काढलेला निष्कर्ष आहे तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कश्मीरमध्ये??????

आज़ाद कश्मीर ज़िंदाबाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चूक झाली खरी.
त्यांच्या भाषेत इतक्या वेळा शे असायचं की मला विनाकारण मग 'पश्तू' हा शब्द आठवायचा. त्यामुळं मी चेक न करता लिहिलं. Fool

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

कैरीशिवाय बनवलेलं पन्हं एका मैत्रिणीकडे पिण्याचा योग आला. आवडलं, त्याची रेसिपी अशी:
अ‍ॅपलसॉसः २ वाट्या
साखरः १/२ वाटी
चवी/आवडीनुसार मीठ, वेलची, केशर
आवशक्यतेनुसार लिंबू पिळून हवे तेवढे पातळ करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जैशिंगपूरच्या काटाकिर्र मध्ये दुपारी साडेबारा वाजता मिसळ खाल्ली. दोनदा पाव मागून घेतले. एकदा कट. मग एक ग्लास ताक. वट्ट पन्नास रुपै टिकवले आणि कौंटरवरच्या ताईंना 'उदंड औक्षवंत हो बाळ!' असा आशीर्वाद देऊन बाहेर पडलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

जैशिंगपुरातही काटाकिर्र आहे हे ठौक न्हवते. मिरजेला गेलो की जातो तिकडं. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐला, यात कोणत्या महाभागाला काय विनोदी दिसलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संजोपरावांच्या प्रतिसादातही काय विनोदी दिसलं काय की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतीय खाउबाजारातली काही सत्यं आणि काही मिथकं -

१. घाउक/पाकिटात मिळणारी सोलकढी ताक+कोकम इसेन्स+कलर अशी बनवलेली असते.
२. लोणीडोशातले लोणी दुधापासुन बनवलेले नसुन अ‍ॅनिमल फॅट/मार्गारीन असते.
३. हलवायाकडची शिळी मिठाई फार शिळी न होऊ देता नविन मिठाई बनवताना वापरतात.
४. समोसा/कचोरी बरोबर मिळणारी गोड+तिखट चटणी मिठाईच्या उरलेल्या पाकापासून बनवतात.
५. बँगलोर हायवेवरील अनेक वडेवाले(फेमस सुद्धा) बटाटे सोलायचे काम भिकार्‍यांना देतात.
६. हातगाडीवरील तळलेले पदार्थ सरकी/कपशीच्या तेलात तळलेले असतात.
७. जांभळं/अंजीर विकणारे जर कागदी पिशव्या वापरत असतील तर त्या पिशव्यांमधे आधीच सडकी जांभळे किंवा अंजीर घालून ठेवलेली असतात.
८. स्वस्त शेंगादाण्यांमधे किलोमागे काही ग्रॅम बारिक खडे असतात.
९. काही रेस्तरां काल उरलेली भाजी आजच्या अनेक भाज्यांमधे थोडी-थोडी खपवतात.
१०. काजुकतलीत काजुपेक्षा दाण्याचा कुटच अधिक असण्याची शक्यता असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--/\--

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आता यातली सत्ये कोन्ती अन मिथके कोन्ती?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

त्यातले काही माझे अंदाज आहेत त्यामुळे त्यांना मिथके म्हंटले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

३. हलवायाकडची शिळी मिठाई फार शिळी न होऊ देता नविन मिठाई बनवताना वापरतात.
४. समोसा/कचोरी बरोबर मिळणारी गोड+तिखट चटणी मिठाईच्या उरलेल्या पाकापासून बनवतात.
५. बँगलोर हायवेवरील अनेक वडेवाले(फेमस सुद्धा) बटाटे सोलायचे काम भिकार्‍यांना देतात.

यात घातक काही वाटले नाही. विशेषतः ३ बद्दलः मी सुद्धा दुधी हलव्यात खवा/मावा वापरण्याऐवजी सफेद पेढे वापरतो, हलवा अधिक रुचकर होतो (वेलची वगैरेचे प्रमाण निम्मे - वा पेढ्यातील घटकांनुसार कमी - करावे लागते). मसाला चहा करायचा असेल तर स्फटिक साखरेऐवजी साखरफुटाणे वापरा. तिळाचे लाडू मिक्समधून काढून भाज्यांत वापरणे, उरलेल्या भाज्यांची थालीपिठे/पराठे/कटलेट्स वगैरे उदा आठवली. पैकी तुमच्या व्याख्येत फक्त पहिलेच बसते (एका मिठाईपासून दुसरी मिठाई) तरी एक पदार्थ खराब होण्याआधी त्याचा वापर दुसर्‍या पदार्थात करणे आपणही करत असतोच.

हातगाडीवरील तळलेले पदार्थ सरकी/कपशीच्या तेलात तळलेले असतात.

हे तेल कुठे मिळते? जर असे असेल तर मी चवीसाठी हे तेलही काही वेळा वापरायला तयार आहे.

काजुकतलीत काजुपेक्षा दाण्याचा कुटच अधिक असण्याची शक्यता असते._

हे मात्र मिथक वाटतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तरी एक पदार्थ खराब होण्याआधी त्याचा वापर दुसर्‍या पदार्थात करणे आपणही करत असतोच.

घातक ते किती शिळं आहे ह्यावर ठरेल, फायदा-नुकसानाचा तुमचा हिशोब हलवायापेक्षा वेगळा असणार.

हे तेल कुठे मिळते? जर असे असेल तर मी चवीसाठी हे तेलही काही वेळा वापरायला तयार आहे.

नक्की माहिती नाही.

काजुकतलीत काजुपेक्षा दाण्याचा कुटच अधिक असण्याची शक्यता असते._
हे मात्र मिथक वाटतं

हे मात्र सत्य आहे, साधारण हलवायाकडे घेतलेली काजुकतली आणि प्रतिष्ठित दुकानात/घरी बनवलेल्या कतलीमधे चवीत बरेच अंतर असते, बहुदा कोणीतरी(ऐकिव) दाणेकुट वापरुन बघितलाही आहे.

इतर ऐकिव माहिती -

१. बाहेर मिळणार्‍या भातात खाण्याच्या सोड्याचे प्रमाण बरेच असते, भात मोकळा होण्यासाठी.
२. काही दुधात युरिआचे प्रमाण बरेच असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काजु कतलीची माहिती नवी आहे. कधी स्वतः करून न बघितल्याने चवीतील फरकाचा अंदाज नाही. आता करून बघणे आहे.

बाकी नव्या माहितीपैकी:
१. भातात सोडा घालण्यात काही येत असेल तर ते भात मोकळा होण्यापेक्षा, कमी वेळेत शिजण्यासाठी घालण्यात येत असावा (इंधन बचत) असा विचार डोक्यात आला. पाण्याचे प्रमाणे योग्य ते ठेवले की भात मोकळा आपोआप होतो.
२. या बाबतीत बातम्या ऐकल्या होत्या. पण कल्पना नाही.
मात्र सध्या मिळणारे सामान्य "पाश्चराईज" दुध (ज्याला म्हशीचे म्हणायची पद्धत आहे) हे एकाच प्राण्याचे, जसे म्हशीचे, गाईचे, शेळीचे वगैरे - असे ठाम नसून काही महत्त्वाच्या घटकद्रव्यांचे प्रमाण समान /एकसारखे - कॉन्स्टन्ट - व मर्यादेत ठेवत उपलब्धतेनुसार 'तयार' केलेले असते. जर एखाद्या दिवशी जर प्राणीज दुधाचा पुरवठा असा असेल की काहि घटकद्रव्ये कमी असतील तर ती कृत्रिम पद्धतीने मिसळली जाऊ शकतात, असा प्रवाद त्यातील माहितगार (असल्याचा दावा स्वतःच करणार्‍या) सहप्रवासी व्यक्तीकडून ऐकला आहे. हे ही सत्य का मिथक याची खात्री नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मोरया गोसावी मंदिरासमोर एक खानावळ स्टाइल बारके खाद्यालय आहे.
काहिशा अनिच्छेनेच तिथे गेलो.
थाली वगैरे इतर काही मागवण्यासारखे वाटले नाही म्हणून थालीपीथ मागवले.
सुख्द धक्का बसला.
थालीपीठ लै म्हणजे लैच मस्त होते. शिवाय ताजे,गरम बनवून मिळाल्याने आनंद द्विगुणित होता.
किंमतही सोहम्,मथुरा,गिरीजा,बापट उपहार गृह टिपिकल नावाजलेल्या मराथी स्टाइल इटर्‍यांपेक्षा बरीच कमी होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कुठे आलं रे हे मोरया गोसावी मंदिर? पुण्याच्या नेमक्या कोणत्या भागात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे चिंचवडातलं असावं. चिंचवड पुण्याचा भाग नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अरे देवा! अता थालीपीठ खायला एका गावाहुन दुसर्‍या गावाला मी काय जाणार Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही प्राठे,आइस्क्रिम,भेळ, विविध थाली,इतर कैक पदार्थ खायला तुमच्या गावात येतो ना, तसेच या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आता वयोमानाने आमच्याकडून धावपळ नाही होत हो मनोबा... असो, चालायचेच !!! ;););)

बादवे, थालीपीठावरुन आठवलं, शर्वरी (पुन्हा एफ.सी. रोड) मधे पण थालीपीठ छान मिळतं. त्यांच्या कडे तवा-थालीपीठ आणि तळलेले थालीपीठ असे प्रकार आहेत. तवा थालीपीठ ची चव छान होती आणि पुष्कळ मोठ्ठंही होतं शिवाय सोबत लोण्याचा गोळा, दही आणि २-३ प्रकारची लोणची - मज्जा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थालीपिठासोबत खाण्याचा क्रमांक एकचा पदार्थ म्हणजे भाजून कुस्करलेली मिरची, ठेचलेली लसूण आणि वरून घातलेले दही. ते नसलंच तर लोणी, अमूल बटर किंवा तूप. यांतलं काहीच नसेल, तर थालीपीठ खाऊच नये. पण अगदी नाईलाज झाल्यास लिंबाच्या गोड लोणच्यासोबत खावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

यांतलं काहीच नसेल, तर थालीपीठ खाऊच नये

+१
मी लोण्याशिवाय थालीपीठाचा विचारही करू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही सुचवलेल्या पदार्थांसोबत थालीपीठ मस्त लागतेच पण अजून एक म्हणजे
थालीपीटहचा एक तुकडा थालीपीठाच्या द्दुसर्‍अय तुकड्यासोबत खाल्ला तरी मस्त लागतो असा स्वानुभव आहे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुण्यात थीन क्रस्ट किंवा ऑथेंटीक पिझ्झा कुठे मिळतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्याचं ठौक नै पण व्हापियानो नामक इताल्यानो हाटेलचेन भारतात येणारे म्हणे लौकरच. ते ऑथेंटिक पिझ्झा देतात असे ऐकून आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Vapiano

बाकी पर्याय ऐकावयास आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्मोकिंग ज्योज मधे एकदा थीन क्रस्ट पिज्जा खाल्ला होता (बरीच वर्षे झाली). भयानक आवडला होता.

- (पिज्जा अजिबातच न आवडणारा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
जंगली महाराज रस्त्यावरील स्मोकिन जोज् वाल्याचा थिन क्रस्ट पिझ्झा मलाही आवडला होता.
एकूणात पिझ्झा मलाही विशेष प्रिय नाहिच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लिटील इटली मध्ये बरा मिळतो. एकदा मॅरियटच्या बुफेमध्ये लई भारी मिळाला होता. कोरेगाव पार्कातही आहे एक.. नाव नाही आठवत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लिटील इटलीपेक्षा त्यांच्याच कोरेगावपार्कातल्या ल पिझेरिआमधे बरा मिळतो, मॅरियटच्या बुफेपेक्षा त्यांच्याच अल्टो विनोमधे चांगला मिळतो असे ऐकुन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटेड, थँक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके. ब्याट्स, सोत्रि, अनुप आणि मी धन्यवाद :-).
खरंतर मला पिझ्झा हट, डॉमिनोज चा पिझ्झा आवडतो. स्मोकिन जोज आणि ते कर्वेपुतळ्यापाशीचे जे आहे ते तिथला नाही आवडला. पण त्या पिझ्झाच्या धाग्यावर थीन क्रस्ट वगैरे वाचुन म्हणलं एकदा ऑथेंटीक काय आहे ते करी कळुदे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिझ्झा हट, डॉमिनोज हे स्मोकिन जोज् पेक्षा अधिक लोकप्रिय आहेत असेच दिसते.
कारण ठाउक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला तो डाएट पिझ्झा वाटला :-D. चिझ चिझसारखं वाटतच नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोलका डॉट्स मधे ऑथेंटीक पिझ्झा मिळतो.

(एफ.सी. रोड च्या "बाय द वे" मधे देखील ऑथेंटीक मिळत असावा, मी कधी ट्राय केला नाहिये तिथे पण तिथले 'पास्ते' आणि इन-जन्रल बाकी पदार्थ अवडतात मला म्हणून पिझ्झा ही चांगला असावा असा अंदाज)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोलका डॉट्स कुठाय?

बाय द वे मधले बाकीचे पदार्थही मस्त आहेत खरे, उदा. चिकन पॅप्रिका, थाई करीज, इ.इ. तद्वतच पिझ्झा पाहिला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पोलका डॉट्स कल्याणी नगर मधे आहे. बिशप स्कूल च्या पुढे आणि सोहोज च्या शेजारी म्हणता येईल. (कल्याणी नगरहून जो रस्ता रामवाडी ला जातो किंवा रामवाडी ला लागतो त्याच्या थोडं आधी). औंध मधे पण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह अच्छा, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थिनक्रस्ट + ऑथेंटीक पिझ्झा मिळायचं अजून एक ठिकाण ( केव्हाचं आठवत होतो), अ‍ॅमेनोरा मधलं "स्पगेटी किचन" आणि "कॅफे मांजी"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही! तिन्ही जागा सुचवण्यासाठी आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रीन्स अ‍ॅण्ड ऑलिव्ह्स - औंध मध्येही क्रस्ट ऑथेंटिक आहे पण ते 'पुरे वेग' रेस्तराँ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा सहीच. जाऊन पाहतो.

अवांतरः तिथले झांबर नामक हाटेल ट्राय केलेय का कुणी? जरा जादाच महाग आहे पण तिथले ड्राय चिकन जगात भारी आहे. नॉनव्हेज थाळी घ्यावी अन अनलिमिटेड चिकन हादडावे. तोंडात नुस्ते वितळते-स्वर्गच!

बाकी बेसिन इ.इ. नाही, पण फिंगर बौल देतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

झांबर बद्दल बरेच ऐकून आहे मी देखील पण मी शाकाहारी असल्याने आणि तिथे शाकाहारी जेवण फार काही विशेष मिळत नाही असे ऐकल्याने (त्यात किंमतही जास्त) कधी गेलो नाही.

बाकी, कॅफे मांजी मधे गेलासच तर तिथलं 'रीझोटो' देखील ट्राय कर, अवडेल अशी अपेक्षा आहे. फार कमी रेस्टॉरंट मधे चांगलं रीझोटो खाल्लय, त्या यादीत कॅफे मांजी नक्कीच येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्स रे. नक्की ट्राञ करतो. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

झांबर आणि त्याच्या बजुला असलेले मेडिटेरेनियन आणि जापनीज(?) हॉटेलं बंद पडलेत. आम्ही मेडीटेरेनियन ट्राय केलं होतं आणि आवडलं होतं. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही सोडून त्या हॉटेलात कोणीच नव्ह्तं, त्यामुळे उगाच चुकीच्या ठिकाणी आलो की काय असं वाटून गेलं. बहुधा बरंच महागडं असल्याने लोकं येत नसावेत, पण अ‍ॅमेनोरातले बाकी हॉटेलं स्वस्तं नसुनही तिथे गर्दी असतेच की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

झांबरचेही तेच. क्वालिटी व्यवस्थित अन किंमत घसघशीत, पण गंडलं खरं. ते सालं मेडिटेरेनियनसुद्धा बंद पडलं का? च्यायला...असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२-३ वेळा ट्राय करून थोडे थोडे फसल्यावर अखेरीस एकदाचे ठीकठाक सांबार तयार झाले. यावेळेस आंबट-तिखट-खारटाचा मेळ नीट बसला होता तुलनेने. नेहमीचाच प्रकार, फक्त दुधीभोपळा तेवढा घातला होता.

आता पुढील लक्ष्य रसम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपि चः हडपसरमध्ये वैभव थेट्रासमोर हाटेल उत्सव नामक ठिकाणी ड्राय चिकन, नीर डोसा व प्रॉन करी खाल्ले. सर्व ठीकठाक होते पण ड्राय चिकन विशेष आवडले. ते फार ठिकाणी मिळत नै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कॅनडा जवळ (फक्त ३ तासांवर) असल्याने की काय कोण जाणे येथे विपुल प्रमाणात कुमॅटो (http://en.wikipedia.org/wiki/Kumato) मिळतात. काल पहील्यांदा आणले. दुकानात मुलीनेच गोड असतात घेच, असा माहीतीवजा हट्ट केला.
अजून खाल्लेले नाहीत. आज ऑफिसातून गेल्यावर खाईन.
परवा चायनीज बुफेमध्ये ,मस्त सॉसेसमध्ये शिजवलेली, चायनीज ब्रोकोली खाल्ली. मुलीला आवडली. मला ठीक वाटली.
इथला (विस्कॉन्सिन्/मिनेसोटा) सुपिरीअर-लेक व्हाईट फिश फार आवडतो. अप्रतिम लागतो डोक्याची चव अन टेक्श्चर वेगळे, पोटाचे वेगळे अन शेपटीचे वेगळे.खासच लागतो. किसलेल्या आल्याच्या रसात बटर घालून शिजवलेला असतो. अफाटच लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुमॅटो हा टोमॅटोचा गैरमार्गाला लागलेला भाऊ वाटतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाहाहा सुमॅटो म्हणायला हवे होते त्यांनी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कल्याणी नगर (पुणे) मधे 'फिरंगी तडका' नावाच्या शाकाहारी रेस्टॉरंट मधे गेलो होतो मागच्या गुरुवारी टिम सोबत. तिथे 'हैद्राबादी बिर्यानी' खाल्ली. खुपच छान होती चवीला. थोडा हिरवा रंग होता बिर्याणीला आणि टिपीकल बिर्याणीला जसा खड्यामसल्याचा स्वाद असतो तसा (उग्र) स्वाद नसुन चव खुप सटल होती... कांदाही व्यवस्थीत कॅरमलाईजड केला होता, दाताखाली येताच गोड चव लागत होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गार्डिअनचे निवडक १० शाकाहारी-खाद्य-ब्लॉग्स भारी वाटत आहेत, ब्लॉग्सवरचे खाद्य-फोटो तर झकास आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्ली कुठे आणि काय खाल्ले?

रोहतांग पासवर मॅगी आणि ब्रेड ऑम्लेट खाल्ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर पर्यंत जाऊन खाल्ल्यास तिथले मॅगी बकवास असते असा अनुभव आहे, कणीस/चहा वगैरे ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर पर्यंत जाऊन खाल्ल्यास तिथले मॅगी बकवास असते असा अनुभव आहे

अगदी अगदी..

कारण ती मॅगी साध्या भांड्यात / कढईत शिजतच नाही. हाय आल्टिट्यूडमधे कमी हवादाबाने उत्कलनबिंदू खालावल्याने. ती बारीक आणि कच्चीच राहते. त्याशिवाय तिथे हिवाळ्यात भाज्यांच्या दुर्भिक्ष्यामुळे अन्य ताजे अ‍ॅड ऑन्स पण नसतात.

चांगले मॅगीवाले कुकरमधे मॅगी शिजवतात तिथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय राव, किती वाईट दिवस आलेत, अरुणजोशींनी अगदी साधी मॅगी जरी खाल्ली तरी सारे ऐसीकर विरोध करत सुटतात. छ्या ! |(

मला दोन्ही खूप आवडलेले. इतर कोणी गेले तर अवश्य खावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोहतांग पासवर समोर तव्यावर बनवून दिलेले गरमागरम आलू पराठेही उत्कृष्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण उत्तरेकडे चहाबद्दल असणारी अनास्था फारच त्रासदायक आहे, चांगला चहा अभावानेच मिळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
साताठ महिने उत्तरेत असताना ह्या बाबतीत लैच वैतागवाडी अवस्था झाली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !