आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे.
=====================================================================
मागच्या धाग्यावर वैचित्र्यपूर्ण पदार्थांबद्दल चर्चा झाली. त्यासाठी हा नवीन धागा. तुम्ही स्वतः बनवून खाल्लेले किंवा कुठेही मिळणारे पदार्थ इथे नमूद करुया.
=====================================================================
श्रीजी स्टॉल, चामुंन्डा सर्कल, बोरीवली वेस्ट ला
१. पिझ्झा पाणीपुरी
२. मेक्सिकन फुस्की, इतालियन फुस्की
३. शेवपुरी पनिनी
४. जंगल चिझ भेळ
५. दिलखुश प्लाटर (नाचोस)
इत्यादी पदार्थ मिळतात. ऐकायला विचित्र वाटले तरी चव चांगली असते.
इथे विडीयो पाहु शकता (अकांउट माझे नाही)
पुण्यात डंपलिंग्ज किंवा मोमो
पुण्यात डंपलिंग्ज किंवा मोमो कुठे मिळतात?
फर्ग्युसन रोडावर.
फर्ग्युसन रोडावर.
तिथे कुठे? (मला जायचं
तिथे कुठे? (मला जायचं नाहीये, कोणालातरी सांगायचंय. त्यामुळे तपशिलात पत्ता विचारतोय.)
एक मॉडेल कॉलनीतलंही सापडलं पण फारसे उत्साहवर्धक reviews नाहीत.
https://www.zomato.com/pune/the-momos-model-colony
अॅक्चुअल रोडवर्. वैशाली आणि
अॅक्चुअल रोडवर्. वैशाली आणि रुपालीमध्ये फुट्पाथवर एक गाडी असते. बरे असतात मोमो.
(अवांतर)
'डंपलिंग' हा शब्द साधारणत: 'लिंगडोह'च्या पठडीत बसतो, नाही?
लिंबलोण
लिंबलोण उतरता अशी का झालीस गं बावरी, या गाण्यातही आम्ही लिंगडोह, हाच शब्द वापरायचो. ते नांव माहित झाल्यापासून!
मोमो अलीकडे लै ठिकाणी मिळ
मोमो अलीकडे लै ठिकाणी मिळतात. मगरपट्ट्यात मिळतात, एफसी रोडवर मिळतात, एकूणच बहुतेक मॉल इ. मध्ये मिळतात.
मोमोज
तुम्हाला उत्तम मोमोज खायचे असतील तर, बावधन मध्ये संध्याकाळी जा. जिथे गर्दी दिसेल आणि जी गर्दी कशासाठी आहे हे कळत नाही, तिथेच! (कोटक बॅंकेच्या समोर)
फोटोतले नाचोज पेटतात ना?
फोटोतले नाचोज पेटतात ना?
( जे काही त्रिकोणी खोचलय ते प्लास्टिकचे असतात अस कळलं life hackerवर. चूल पेटवण्यासाठी उपयुक्त). करून पाहिलय.
कुरकुरे
कुरकुरे ही पेटतात म्हणे...
आज दुपारी झामु'ज ला लंच. अजून
आज दुपारी झामु'ज ला लंच. अजून तोच डीकॉर ब्रँडो ते बॉब मार्ले व्हाया रोमन हॉलिडे पोस्टर्स , सर्व स्युडो नाविन्याचा अभाव ( पारशी असले तरी शेवटी ....४११ वालेच), मेन्यू अजूनही छोटा झालाय पण मुख्य म्हणजे अजूनही सिझलर्स उत्तम दर्जा टिकवून आहेत. मजा आली ... ता क . ५०० मीटर च्या बाहेर असावे त्यामुळे सिझलर्स बरोबर ताक प्यावे लागत नाही .
?
अॅज़ इन, "कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार?" (श्रेय: पु.ल.)?
?
कळले नाही.
ता क . ५०० मीटर च्या बाहेर
भारतात सद्ध्या सुप्रीम कोडताचे फर्मान लागु आहे की हायवेच्या ५००मी अंतरात मदिरा विकायची नाही. हा निर्णय आल्यावर अनेक हाटेलांमध्ये दारु मिळणं बंद झालय्. भर शहरातले अनेक रस्ते हायवे या सदरात मोडतात हा शोध नव्यानेच लागला. उदा. कर्वे रोड हा देखील हायवे आहे म्हणे.
!
अग आई गं!
.
हायवेच्या ५००मी अंतरात म
विकायची नाही ना? प्यायला हरकत नाही. स्वत:ची घेऊन जायची. किंवा फारच सृजनशील हॉटेलमालक असेल, तर चखणा पाचशे रुपयाला विकायचा, आणि त्यावर दारू फ्री द्यायची.
हा हा हा. मस्तं उपाय आहे. प
हा हा हा. मस्तं उपाय आहे. पण सद्ध्या सरकारच एकेक रस्ता हायवे नाही(म्हणजे जो खरच हायवे नाही) असं नोटिफाय करत आहे म्हणे.
रेव्हेन्यू?
होय होय , तेच ते शेवटी आम्ही
होय होय , तेच ते शेवटी आम्ही ... तेच ते ...आणि 500 मीटर चे स्पष्टीकरण ढेरे सरकारांनी दिले तेच. सिझलर्स बरोबर बिअर पिता येते इथे .
(अवांतर)
हम्म्म्म् ठीक.
बादवे सिझलर्स ताकाबरोबर वाईट नाही लागत. कधी दूघ/आयरानबरोबर कुबिदे किंवा तत्सम काही खाऊन बघितलेत काय कधी?
सिझलर्स ताकाबरोबर म्हणजे एक
सिझलर्स ताकाबरोबर म्हणजे एक घास सिझलरचा, एक घोट ताकाचा असं ना. मग नाही वाईट लागणार.
ताकातल्या भेंडीसारखे ताकातले सिझलर्स केले तर मात्र....
?
सिझलर्स बियरबरोबर म्हणजे सिझलर्स बियरमध्ये बुचकळून (पारले-जी चहात बुडविल्यासारखे) किंवा शिजवून (ताकातल्या साबूदाण्या(च्या लापशी)सारखे) अशी निदान माझी तरी कल्पना नव्हती. त्यामुळे...
कम टू थिंक ऑफ इट...
....आपल्याकडे मिटास मॅरिनेट करण्यासाठी अनेकदा दही वापरतात. (मला स्वत:ला मिटाचे दह्यात मॅरिनेशन हा प्रकार फॉर सम स्ट्रेंज रीझन फारसा आवडत अँड/ऑर झेपत नाही इज़ अनदर ष्टोरी. आय रादर प्रेफर व्हिनेगर किंवा कांदेमिरच्याटोमॅटोचामिक्सरमधूनकाढलेलालगदा किंवा लिंबाचारस किंवा आलेलसणाचीपेस्ट किंवा समकॉंबिनेशनऑफदिअबव, पण एनीथिंगरादरनॉटलॅक्टिकअॅसिडबेस्ड. पण माझे एक सोडा.) इन विच केस, सिझलर्स ताकात शिजवल्याने नक्की काय बिघडेल, हे समजत नाही. ('क्यों कि छास भी कभी दही थी' - श्रेय: अदिती. ३_१४ विक्षिप्त फेम.)
तुर्कांच्यात चिकनबरोबर
तुर्कांच्यात चिकनबरोबर ताक पितात, सबब सिझलर किंवा अजून कशासोबत ताक पिण्यास अडचण नसावी. आयमीन ते कॉम्बिनेशन धरित्रीवर कुणीतरी अगोदरच ट्राय केलेले आहे (मीही केलेय) अन ते भारी आहे.
तेच सांगतोय
इराण्यांच्यातसुद्धा खातात. मीही खाल्लंय.
(अवांतर: पुदिन्याचे ताक - मठ्ठा? - ही कॉन्सेप्ट भारी आहे.)
मठ्ठा नाय. दाट ताक ऊर्फ आय
मठ्ठा नाय. दाट ताक ऊर्फ आयरान. पण मठ्ठा प्यावयास कैच हरकत नसावी. इनफॅक्ट मौजे फ्रॅङकफर्ट ऑम मेन इथल्या हौप्टबाह्नॉफजवळ एका तुर्की हाटेलात जे ताक मिळाले ते बादशाहीतल्या ताकापेक्षा फार कै वेगळे नव्हते, फार दाट नव्हते. लय मज्जा.
इनफॅक्ट मौजे फ्रॅङकफर्ट ऑम
ब्याटराव, ताक तर ठीकच, पण बादशाहीतली आमटी मिळाली का कुठे तिकडे?
बादशाहीतली आमटी नाय पण स
बादशाहीतली आमटी नाय पण सरवणाभवनातले सांबार मात्र मिळाले. पण अंमळ भ्रमनिरास झाला, हेच का ते सरवणाभवन असे वाटले.
अजूनेक मजा:
तेव्हा आम्ही श्री श्री श्री अमुकचन्द्ररावजीसो यांचेसोबत होतो. हाटेलात स्थानापन्न जाहल्याबरोब्बर एका दिशेने मराठी बोलल्याचा आवाज आला. परदेशात फेलो भारतीय आणि त्यातही फेलो मराठी दिसल्यावर आजिबात बोलायला जायचे नसते या नियमाला अनुसरून आम्ही तेव्हा दुर्लक्ष केले पण नंतर कळाले की ते जोडपे म्ह. प्राचीन जालकरीणबाई स्वाती दिनेश आणि मिस्टर स्वाती दिनेश हे होते. नियम मोडला तरी चालले असते पण तेव्हा लक्षात आले नाही खरे. नंतरच ट्यूब पेटली.
परदेशात फेलो भारतीय आणि
हायला हा नियम कधी झाला? असा काही नियम नै. त्यामुळे काही विनोदी प्रसंग घडले आहेत.
नियम नाही हे खरे पण क्व
नियम नाही हे खरे पण क्वचित महाराष्ट्राबाहेरही असे अनुभव आलेत की त्यामुळे भारतात किंवा भारताबाहेरही आपण होऊन आजिबातच कुठेही बोलायला जात नाही.
बॅट्या तू हिंदुत्ववादी पेक्षा
बॅट्या तू हिंदुत्ववादी पेक्षा जास्त ताक वादी आहेस बहुधा
ताकवादी तर आहेच.
ताकवादी तर आहेच. इंद्रालाही दुर्लभ असलेलं ताक मृत्युलोकी सहजी मिळतं, मग का सोडावं? राज लॉज, जंम रोड पुणे याच्या ग्रौण्ड फ्लोअरवर जे कै हाटेलवजा प्रकरण आहे, ते म्हणजे जरा कमी गुत्ताच आहे. त्या गुत्त्यातही रात्री उशिरा फक्त ताक प्यायला म्हणून गेलेलो आहे कोणे एके काळी.
जय ताक, जय डेअरी.
बॅटर्ड विषय
सिझलर्ससोबत बीअर की ताक ह्यावरून आठवलं. इथे कुणी Beer-battered fishचे चाहते आहेत का?
सिझलर्स बरोबर बिअर च बरी
सिझलर्स बरोबर बिअर च बरी लागते आणि इथे ते खान पान शक्य आहे एवढाच मुद्दा आहे .. ( ताकातली भेंडी !!! आबा , हाणायला पाहिजे तुम्हाला ) भारतीय राज्यघटनेने सर्वाना कशाबरोबर काहीही खाण्याचा हक्क जरी दिला असला तरीहि
सिझलर्सबरोबर बिअर
बापट माझ्या मते सिझलर्स पावसाळी कुंद किंवा थंड हवेत खायचा पदार्थ आहे. ह्या हवेत बीअरपेक्षा मला काही तरी आणखी स्ट्राॅंग प्यायला आवडेल.
बाकी ताकातल्या भेंडीबाबत -
पुण्यात राहून भटांची बदनामी थांबवा!
( To each , his own ) तिथे
( To each , his own ) तिथे फक्त बिअर व वाईन उपलब्ध आहे .
..
वाइनसुद्धा चालेल की.
माझ्या एंडला
(माझ्या एंडला) वाईन चालेल. कधी बसूया? ;-)
तुम्ही सांगाल तेव्हा !!!
तुम्ही सांगाल तेव्हा !!!
?/!/...
च्यालेंज! भारतीय राज्यघटनेच्या नेमक्या कोणत्या कलमाच्या तरतुदींखाली असा काही हक्क अंतर्भूत होतो, ते दाखवून द्या!
(अन्यथा, बीफ ब्यान भारतीय राज्यघटनेखाली कसा काय टिकू शकतो? जोपर्यंत ते बीफ कशाबरोबर तरी खाल्ले जात आहे तोपर्यंत?)
सिझलर्सबरोबर बियर बरी लागावयास प्रत्यवाय नाही. आणि भारतीय राज्यघटनेने प्रदान केला असो वा नसो, कशाबरोबरही काहीही खाण्याचा वा पिण्याचा हक्क मला व्यक्तिश: मान्य आहे. (फार कशाला, मीही पिईन सिझलर्सबरोबर बियर एखादे वेळेस.) पण हा संयुक्त महाराष्ट्रातला (/'चव्हाणा'तला) 'च' कशापायी?
article 21: Right to life. म
article 21: Right to life. मनेका गांधी वि. भारत सरकार केसमध्ये ज्याप्रमाणे जिविताच्या अधिकाराचा सुप्रिम कोर्टाने अर्थविस्तार केला(expanding its jurisdiction in terms of its power to Judicial review) अगदी तसेच बीफ बॅनच्या बाबतीत करणे शक्य आहे.
Though beef ban doesn't is not null and void because it is not following procedure established by law, it certainly fails to comply with Due process of law.
ताक?
अगदी ताक नको हो. बिअर मिळत नसल्यास आईस्ड टी हा दुधाची तहान ताकावर टाईप पर्याय होऊ शकतो.
वाघाटे
काल एकादशी सोडायला कुणीकुणी वाघाटे खाल्ले? आमच्या बीडात वाघाटेच म्हणत्यात, दुसरी कडचं वेगळं असेल कदाचित. ह्याचा वेल सहसा कडूलिंबावर आढळतात.त्याची चव...कारलं तरी बरं असं वाटत. पण ते आवर्जुन खावंच लागत म्हणतात (ते वर्षभर पोटात रामराम म्हणतं म्हणे). जेंव्हा पहिल्यांदा खाल्लं होतं ते अजून आठवतं.
वाघाटे हे माझ्या अत्यंत
वाघाटे हे माझ्या अत्यंत आवडीचं फळ आहे.
अपार पसरलेल्या माळाच्या बाजूला एखाद्या बांधावर पन्नाशीत असलेल्या कडुनिंबावर पसरलेली वाघाट्याची भरगच्च वेल. कलत्या उन्हात वाघाटे मिळवण्यासाठी केलेला आटापिटा. आणि त्यांची आजीने केलेली भाजी.
काल पुण्यात वाघाटी ६०० रुपये
काल पुण्यात वाघाटी ६०० रुपये किलो होती असे लोकसत्ता म्हणे
कमालय हं
वाघाटे आवडिने खाणारे तसे कमीच जण पाहिलेत मी. दुर्मीळच म्हणा
पण ते आवर्जुन खावंच लागत
>>> नवीन माहिती कळली. *smile*
फ्रेंच विंडो (ला फेनेत्र
फ्रेंच विंडो (ला फेनेत्र फ्रॉंसे) पातिसरी, कोरेगाव पार्क, पाचवी गल्ली.
पेअर केक खाल्ला. अतिशय जबरदस्त चव. तोंडात ठेवताक्षणी विरघळणारा प्रकार. काय रसायन होते काय की. दिल खूष हो गया.
हे फ्रेंच विन्डो .... जायचंच
हे फ्रेंच विन्डो .... जायचंच आहे एकदा.
फ्रेश हाईम
आष्टिनात 'फ्रेश हाईम' नावाचं कोरियन दुकान आहे. शेजारची मैत्रीण तिथे एकदा ओढून घेऊन गेली. कोरियन अन्न म्हटल्यावर माझं तोंड वाकडं झालं होतं, पण तिला नाही म्हणता आलं नाही. त्यातून दुकानाचं वर्णन 'सॅलड स्टेकहाऊस' असं ऐकून तर आणखीनच. काय करणार, मी पडले घासफूस! तिथे दारूही मिळत नाही. "तिथे चांगल्या भाज्या मिळतात," मैत्रिणीनं जाहिरातीचा क्षीण प्रयत्न केला. माझ्या तोंडावर आलं होतं, "मी रोज भाज्याच खाते!"
पण काय मस्त जेवण होतं. ताट बघूनच जेवणाची इच्छा झाली. ताजा आव्होकाडो, किंचित कमी शिजवलेल्या भाज्या, मोजकाच चिकटपणा असणारा भात - लाल आणि पांढऱ्या भाताचं मिश्रण, लुसलुशीत टोफू, आणि जेमतेम जाणवेल इतपत सॉसची चव. मग तिथे पुन्हा पुन्हा जाणं आलंच. तर काल 'वाफवलेल्या भाज्या, टोफू आणि भात' खाल्लं. तेरियाकी सॉसबरोबर.
मस्त
एक नंबर दिसतंय.
मस्त!!
मस्त!!! तों पा सू
रेसिपी - भांडारकर रस्ता
कोकणी मराठा चवीच्या शाकाहारी-मांसाहारी पदार्थांसाठी भांडारकर रस्त्यावरचं रेसिपी चांगलं आहे. मासे आणि सोलकढी तर चांगलेच होते, पण मटण थाळीतलं मटणही चांगलं आणि चविष्ट होतं. शिवाय मटणाचा मसाला घातलेला आख्खा मसूर, आळणी सूप (चिकन), आळणी खिचडी (शाकाहारी) आणि गरमगरम ज्वारीची भाकरी. सोबत दही-कांदा. तृप्ती आणि सुस्तीचा मार्ग.
ऋण गुण - ठिकाण अंमळ वर्दळीचं आहे, चकचकीत स्वच्छ नाही (हात धुवायचा साबण शांपूच्या बाटलीत!), दारू नाही आणि टाॅयलेट नसावं (हा माझा अंदाज).
आळणी म्हंजे?
बिना मिठाचं?
आळणी
ते अळणी. आळलेलं म्हणजे सुकं.
आळणी सुप बोले तो चिकनचा स्टॉक
आळणी सुप बोले तो चिकनचा स्टॉक असतो त्याचं सुप. छान असतं. मटणाचंपण असतं.
तसलं मटनाचं सूप एकनंबर
तसलं मटनाचं सूप एकनंबर लागतंय, नगर रोड, खराडी बायपासकडनं वाघोलीला जाताना दोनतीन किमी गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूस कावेरी नामक हाटेल आहे. तिथं चाखलं. जबरदस्त चव.
हायला त्या कावेरी हॉटेलात
हायला त्या कावेरी हॉटेलात काही बऱ्या चवीचं मिळत असेल यावर विश्वासच नाही माझा. (नगर रोड स्कूल क्युझिनचा मुख्य रंग लाल आहे.)
मान्य पण ते हाटेल अपवाद आहे
मान्य पण ते हाटेल अपवाद आहे. मटन ताट चिकन ताट मस्त चवीचं मिळतं. पोळ्या एकदम ताटभरून मोठ्या आणि घरच्या पोळ्यांइतक्या जाड असतात- अनदर मार्कर ऑफ ऑथेंटिसिटी. भाकऱ्याही तशाच. रश्शाची चव उत्तमच.
अरे बस करा रे आता वर्णन...
अरे बस करा रे आता वर्णन... यांचे खाते गोठवा रे जरा.
त्यापेक्षा तुम्हीच जर वाट
त्यापेक्षा तुम्हीच जर वाट वाकडी केलीत तर आपल्या संगतीचा आनंदु वगैरे.....
आळणी सूप
स्टाॅकपेक्षा ब्राॅथ म्हणणं योग्य होईल.
मॅगी
मला मॅगी आवडते. मी त्यात प्रयोग करायचे टोमॅटो केचप आणि बटर वाली मॅगी, चाईनिज सॉस घालून केलेली, भाज्या घालून केलेली, पाणि काढून टाकून वरून मसाला घातलेली इत्यादी. माझ्या ऑफिस जवळ एक हंग्री हेड म्हणून जागा आहे तिथे मॅगीचे २६ प्रकार मिळतात. एवढंच नाही तर मॅगसब, मॅगी बर्गर, मॅगीचा पिझ्झा पण मिळतो.
त्यातले मॅगसब, आणि टोमॅटीनो मॅगी मस्त आहेत. बाकी पण चवी चांगल्या आहेत.
घरीच
ज्वारीचे बारीक भरड आणि भर्पूर कोवळे शेंगदाणे घातलेली अंबाड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ली. सोबत शेंगाच्याच चटणीची पावडर. बेळगावहून आणलेल्या वैष्णवी रसम मसाल्याचे तिखट रसम आणि भरपूर जिरगा भात. दुपारी बालेवाडी हाय स्ट्रीट मधल्या अर्बन फाउंड्रीत फ्युजन चिकन + कॅप्टन मॉर्गन इत्यादी झाल्यावर रात्री असलं साधंच अन्न खाऊन जीव थंड झाला.
अॅबसिन्थ - जहाल आणि मादक
एक श्वान आणि एक कच्छप वगळता सांप्रत काहीही पाळत नाही, श्रावण तर दूरची गोष्ट. सबब, "गटारी" साजरी करण्याचे काहीही कारण असण्याची आवश्यकता नाही, नसावी.
तरीही "गटारी" साजरी होतेच!
म्हणजे कसं आहे की, आपण चवथीला मोदक किंवा होळीला पुरणपोळी खातो ती काय त्या दिवसांनतंर बराच काळ मोदक वा पुरणपोळी खायला मिळणार नाही म्हणून नव्हे, तर एक रिवाज म्हणून. तसेच माझ्या "गटारी"चेही!
एक रिवाज म्हणून साजरी करायची.
खेरीज, यंदा खास आकर्षण होते ते म्हणजे - अॅबसिन्थ.
चेक रिपब्लिकमध्ये बनलेले हॅप्सबर्ग अॅबसिन्थ. तब्बल ७२.५% ABV असलेले हे हिरवट द्रव्य भलतेच जहाल आणि मादक! किंचित साखर आणि थंड पाणी मिसळून घेतलेत की सातवा स्वर्ग काही दूर नाही!
अवांतर - एखादी गोष्ट आरोग्यास हितकारक किंवा अहितकारक आहे, हे सिद्ध करणारी वैद्यकीय संशोधने ही काही नवलाईची गोष्ट नव्हे! किंबहुना, एक गोष्ट एकाच वेळेस योग्य आणि अयोग्य आहे असे सिद्ध करणारी परस्परविरोधी संशोधनेदेखिल पहायला मिळतात. अॅबसिन्थही त्यास अपवाद नाही.
असे सांगतात की फ्रान्समध्ये अॅबसिन्थ सेवनाचे फॅड इतके वाढले होते की वाईन उत्पादकांच्या पोटात गोळा आला. अखेरीस त्यांनी काही "संशोधकांना" हाताशी धरून अॅबसिन्थची यथेस्त नालस्ती आरंभली. परिणाम त्यांना हवा तोच झाला. फ्रान्ससहीत अनेक देशांनी यावर बंदी घातली. फ्रान्सचा वाईन उद्योग पुन्हा बहरला. २१ व्या शतकात पुन्हा एकवार "संशोधन" होऊन अॅबसिन्थ तितकीशी घातक नाही असे सिद्ध झाले!
आज लंच ला ओरिएंटल कनेक्शन्स
आज लंच ला ओरिएंटल कनेक्शन्स ला गेलो . इ स्क्वेअर च्या वर पाचव्या मजल्यावर .
अतिशय प्लेझंट अँबियांस . बेसिल व्हेज , फड थाई , चिकन इन ब्लॅक पेपर आणि अर्थातच राईस घेतला . सर्व पदार्थ उत्तम . संतुष्ट .
इथे बिग बोल/वोक अर्थात हवे ते घटक पदार्थ ( !) स्वतः निवडून हव्या त्या सॉस मध्ये करवून घ्यायची पण सोय आहे . मंगळवार दुपार असूनही बऱ्यापैकी गर्दी होती . बरीच मंडळी ( म्हणजे आम्ही सोडून सगळेच ) तेच करत होती त्या अर्थी लोकप्रिय असावे .
( इ स्क्वेअर ची शिनेमा टिकते काढल्यावर २०टक्के डिस्काउंट आहे . हेही कारण असावे ). पण आमच्यासारखे म्हणजे नुसतेच उदरभरण करायलाही जायला नक्कीच चांगली जागा
अत्यंत आभारी आहे. थाई, चिनी
अत्यंत आभारी आहे. थाई, चिनी आणि जनरलच आशियाई जेवण खूप आवडतं.
इथे बामी गोरेंग आणि नासी गोरेंग मिळतं का?
नासी गोरेंग किंवा बामी गोरेंग
नासी गोरेंग किंवा बामी गोरेंग नव्हतं पण seyur गोरेंग होतं ( व्हॉटेव्हर दॅट मीन्स ). ट्राय केलं नाही .
अवांतर : बर्मीज खाण्याकरता भर कर्वे रस्त्यावर ( कायम पनौती लागलेल्या ) वरुणराज नावाच्या रेस्टो -गुत्यात वरती XIU वगैरे अशा काहीतरी भीषण नावाचं एक उत्तम रेस्टो ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत होतं . गर्दी हि भरपूर असायची . का बंद केलं काय माहित ( अर्थात वरुणराज पनौती या सदरात मोडणारं असणार काहीतरी )
सायूर गोरेंग म्हणजे बर्मी
सायूर गोरेंग म्हणजे बर्मी/इंडोनेशियन मसालेभात. आपल्याकडे व्हेज बिर्याणीचं जे ष्टेटस असतं तेच तिकडे सायूर गोरेंगचं.
ईईई पण चव बरी असती का?
ईईई
पण चव बरी असती का?
चांगली असते रे. पण त्यात
चांगली असते रे. पण त्यात सामिष काही नसतं म्हणून कमी लेखतात.
तसेच कोरेगाव पार्कात गल्ली
तसेच कोरेगाव पार्कात गल्ली ६ मध्ये आर्थर्'स थीमच्या पुढे 'एशियन बॉक्स' नावाचे हॉटेल आहे. थाई, बर्मीज, इंडोनेशियन वगैरे मिश्र जेवण चांगले मिळते.
मोलाची माहिती, धन्यवाद.
मोलाची माहिती, धन्यवाद. आर्थर्स थीम, मलाका स्पाईस, वगैरे ट्राय केलेय पण एशियन बॉक्सात नाय गेलो कधी. आता जाईन. रच्याकने फ्रेंच विंडोचे एक्स्पान्शन आता मस्त झालेय. बसायलाही मोठी जागा वगैरे आहे, मलाका स्पाईसला लागूनच आहे.
नोटेड, नक्की जाणार.
नोटेड, नक्की जाणार.
काल-परवाच एका कलिगीने त्या
काल-परवाच एका कलिगीने त्या बिगबोल बद्दल सांगितलं. अता नक्की जायलाच हवं.
सोडा बॉटल ओपनरवाला ला आज
सोडा बॉटल ओपनरवाला ला आज गेल्ते मयत्रिणींसोबत. चिकन बैदा रोटी, आलू आन्टीनी कटलेट्स, मटण / वेज बेरी पुलाव खाल्ला. पारसी लोकांचं पात्रानु मच्छि असतं तसं पात्रानु पनीर मिळतं तिथे. केळीच्या पानात शिजवलेला लुसलुशित पनीर आणि त्यावरचा हिरवा मसाला.... आहाहाहा... निव्वळ अप्रतिम चव.
अर्थात बावाजी च्या हॉटेलात रासबेरी ड्रिंक पण ओघाने आलंच. लै झ्याक..
जुनी पारसी रेस्टॉरंट असायची त्या लुकला थोडासा नवीन टच दिलाय. लाकडी टेबलं आणि ऐसपैस खुर्च्या, लाकडी सजावट यकदम मस्तय..
मस्त आहे हो जागा ती गौराक्का
मस्त आहे हो जागा ती गौराक्का !!
कुठं हे विवियानाच्या ग्रौण्ड
कुठं हे विवियानाच्या ग्रौण्ड फ्लोअरला काय?
मी गेल्ते ते पवई ला
मी गेल्ते ते पवई ला आहे, पवई प्लाझाच्या बाजूला, तिथे आधी पिझ्झा हट होतं. आय आय गेट कडून पवई ला आत जायला वळण आहे, त्या कोपऱ्यावर.
आवडलं आपल्याला :) :)
धन्यवाद!
धन्यवाद! :)
हे ठिकाण मुंबईमधे आहे का?
हे ठिकाण मुंबईमधे आहे का?उत्तर मिळालं वरच्या प्रतिसादातून.होय! बंगळूरू आणि दिल्ली ला
होय! बंगळूरू आणि दिल्ली ला दिखील आहे.
मुंबई मध्ये दोन ठिकाणी, पवई आणि बि के सी, आणि ठाण्यात विवियाना ला आहे.
मी bkc ला गेलो होतो पूर्वी
मी bkc ला गेलो होतो पूर्वी
फर्गसन रोडवर जिथे अगोदर
फर्गसन रोडवर जिथे अगोदर चैतन्य पराठाज होते तिथेच "शुद्ध मांसाहारी" अशा लेबलासकट सुर्वे म्हणून एक अस्सल सातारी चवीचे हाटेल आहे. तिकडे मटन खिमा थाळी खाल्ली. खूप दिवसांपासून ऐकत होतो पण नंबर आज लागला. अप्रतिम चव, झणझणीत मसालेदार. सोबतचा रस्साही तसाच. कांदालिंबूची प्लेट सोबत होती, लिंबू जरा पिळला आणि मिक्स करून ब्रह्मानंदी टाळीच लागली. शिवाय सोबत गरमागरम प्लस ताटभरून आकाराच्या पोळ्या. एक नंबर मजा आली. मालक-नोकर सगळेच सातारकडचे दिसतात. फोटोही सगळे तिकडचे लावलेले, अजिंक्यतारा, प्रतापगड वगैरे. दिल खुष झाला. मटन खिमा थाळी ३००/- फक्त. एक्स्ट्रा पोळीबिळीचा वेगळा चार्ज नाही लावला. एकच तक्रार म्ह. हे सगळे खाल्ल्यावर जरा थंड कायतरी पाहिजे तेव्हा सोलकढी नव्हती. :( अशा मटन खिम्यानंतर कोल्ड्रिंक पिणे जिवावर येते. तेवढा एक पॉईंट सोडल्यास कसलीच तक्रार इल्ले. दणदणीत रेकमेण्डेशन.
तिथला क्राऊडही असा अस्सल खवय्यांचा आहे. माझ्यासमोर एकजण बसला होता, सहज गप्पांमधून विषय निघाला तेव्हा तोही कोल्हापूरचा असल्याचे कळले. अजून काही हॉटेलांची देवाणघेवाण झाली आणि सुर्वेजचा दर्जा एक नंबर आहे यावर एकमत झाले.
काल पापु केलेली घरी. कुणास
काल पापु केलेली घरी. कुणास ठाऊक कशी पण तुमची आठवण आली बॅटमॅन ...
अॅपलची पुरी दिसतेय.
अॅपलची पुरी दिसतेय.
फक्त पाणी केलेत की पुऱ्या पण.
फक्त पाणी केलेत की पुऱ्या पण..
कारण पुरी जाम कातिल दिसतेय.. घरी केल्यासारखी नै वाटत..(म्हणजे चपटी)
अहो नाही हो.
अहो नाही हो.
पाणीपुरीचे पाणी विकत मिळते भैय्याकडे... ते आणले होते. पुऱ्या देखिल विकतच्या...
आम्ही काही अन्नपुर्णेचे अवतार नाही हे आधीच जाहीर केल्याने भावाच्या बायकोच्या सासुबाई फार कटकट नाही करत... :)
तुम्ही भारी आहात. घरी केली
तुम्ही भारी आहात. घरी केली म्हणून नंतर पाणी आणि पुरी दोन्ही विकत आणलं असं सांगायचं!
हा हा हा... खरंच की..
हा हा हा... खरंच की..
पण पुरी मध्ये रगडा, आणि पाणी भरायचे कष्ट केले की...
अरे वा, अति उत्तम.
अरे वा, अति उत्तम.
सुर्वे बेष्टच आहे.
सुर्वे बेष्टच आहे.
खाण्याच्या धाग्यावर
खाण्याच्या धाग्यावर न चुकता वाचतो. खऱ्या खवय्यांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. कधीकधी असं वाटतं की , बॅटमनला अशी ऑफर द्यावी की,
बाबा रे, तुला माहित असलेल्या पुण्यातल्या खास जागांवर मला घेऊन जा, नेण्याची जबाबदारी तुझी आणि दोघांचे बिल भरण्याची माझी!
तिर्शिंग्राव साहेब, अनेक
तिर्शिंग्राव साहेब, अनेक धन्यवाद. _/\_
ओले शिंगाडे
गेले दोन तीन पंधरवडे बाजारात ओले शिंगाडे दिसू लागलेत. आमच्याकडे सर्वांनाच आवडतात. कच्चेही आणि उकडूनही.
आणले.
खाल्ले.
हे घरीच.
हे घरीच.
गाकोमाली, पेर वापरून फोटो ३)
तिखट शंकरपाळे संपल्यामुळे गोड वापरून.
- कल्पना अबापट -
तिखट मिठाच्या पुऱ्या, आमसूल चटणी आणि न बिघडलेले रसगुल्ले ..
ऑफिसमध्ये potluck होतं तेव्हा वेगळं काहीतरी म्हणून आमसुलाची चटणी केली .. मस्त लागते आंबट गोड ..
ही चटणी लहानपणी फक्त श्राद्ध
ही चटणी लहानपणी फक्त श्राद्ध किंवा पक्ष याच्या जेवणात असे . मस्त असते . करायला ( सांगायला ) पाहिजे ....
किंग्स , ईस्ट स्ट्रीट .
काल लंच ला परत 'किंग्स' ला गेलो . कौटुंबिक . ईस्ट स्ट्रीट ला बादशाह च्या वर . व्हिक्टरी थिएटर च्या समोर. छोटेसे पारशी चालक मालक वाले रेस्टोरंट आहे. अतिशय जुने . बादशाह च्या बाजूलाच लाकडी जिन्यावरून वर एंट्रन्स .जिन्याच्या पायऱ्यांवर झीन्गझोन्ग लाल , निळे ,हिरवे दिवे सोडलेले दिसले बघून शंका आली कि रिनोवेशन वगैरे केलंय काय. नव्हते तसे काही . तीच ती जुनी वर काच ठेवलेली टेबलं .एकदम मिनिमलिस्टिक डेकोर . मेन्यू थोडा नवीन केलाय .
पारशी फूड फेस्टिवल चालू आहे . पण आम्ही जुनेच फेवरीट फिश अँड चिप्स , चिकन स्ट्रोगेनॉफ , चिकन स्टेक ऑर्डर केले . माझा व्हेज स्टेक मेनू तुन उडालेला होता . पण मागणी केल्यावर जास्त वेळ घेऊन का होईना करून दिला . तेवढाच जरा सो सो होता . अतिरिक्त पनीर घातल्यामुळे . बाकीचे जिन्नस एकदम पाहिल्यासारखे . उत्तम. स्टेक वरील सॉस उत्तम . शेवटी ऑर्डर केलेलं कॅरॅमल कस्टर्ड अति उत्तम . इतके चांगले कॅरॅमल कस्टर्ड फार म्हणजे फार वर्षात खाल्ले नव्हते . ( डेझर्ट्स तीनच उपलब्ध आहेत . कॅरॅमल कस्टर्ड , लगन नु कस्टर्ड आणि कुठलासा मूस. इतर मागितल्यास खालून बादशहा मधून आणून देतात )
सध्या पुण्यात रेलचेल असलेल्या उडुपी/पंजाबी मॅनेजमेंट वाल्या मेक्सिकन ते थाई व्हाया इटालियन "वर्ल्ड कुशन " ऑफर करणाऱ्या सुमार रेस्टोरंटस च्या गलबल्यातुन मुक्त असे निवांत फॅमिली, पूर्वीचे सायबाचे खाद्यपदार्थ असणारे मस्त रेस्टोरंट . जरूर जावे असे . कधीहि फारशी गर्दी नसते .
अवांतर : आता बिअर व वाईन पण चालू झाले आहे इथे.
नोटेड बापटाण्णा. इकडे जाऊन
नोटेड बापटाण्णा. इकडे जाऊन येतो.
जाऊन आल्यावर तुमचा रिपोर्ट
जाऊन आल्यावर तुमचा रिपोर्ट लिहा हो !!
मेथी चिकन बनवण्याचा पिरोग्राम आहे आज्
मेथी चिकन बनवण्याचा पिरोग्राम आहे उद्या. टाईम्स फूड ची वेबसाईट मस्त दिसत्ये.
कुणाची काही सजेशन्स ? मेथी चिकन बद्दल ?
फर्न
हा धागा वर काढण्याचे कारण .... गेल्या बाजारी गोरेगावी फर्नात जाउन बटर चिकन (पक्षी : चावून चोथा झालेली तरी सेफ बेट वाली डीश) आणि दाल बुखारा (पक्षी : दिल्लिवाल्यांनी लई फेमस केल्याली पण मला अज्याबात न आवडणारी) हादडून आले (ज्या स्पिड आणि क्वांटीटी मध्ये मी आणि टॅनुल्याने खाल्लं त्याला "हादडणे" हेच योग्य आहे). आयायायायाया..... दिलावर सुरीच फिरली हो कचकन. करणाऱ्याचे हात मागायची सोय असती तो क्या मझा था..!
चक्क मला न आवडणारी गोष्ट माझी अखंड दाद घेऊन जाते म्हंजे काय सांगावं महाराजा.
हा टॅनुला म्हणजे आमचा चौदावा
हा टॅनुला म्हणजे आमचा चौदावा का ? तो आपला कोण ?