आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे.
=====================================================================
मागच्या धाग्यावर वैचित्र्यपूर्ण पदार्थांबद्दल चर्चा झाली. त्यासाठी हा नवीन धागा. तुम्ही स्वतः बनवून खाल्लेले किंवा कुठेही मिळणारे पदार्थ इथे नमूद करुया.
=====================================================================
श्रीजी स्टॉल, चामुंन्डा सर्कल, बोरीवली वेस्ट ला
१. पिझ्झा पाणीपुरी
२. मेक्सिकन फुस्की, इतालियन फुस्की
३. शेवपुरी पनिनी
४. जंगल चिझ भेळ
५. दिलखुश प्लाटर (नाचोस)
इत्यादी पदार्थ मिळतात. ऐकायला विचित्र वाटले तरी चव चांगली असते.
इथे विडीयो पाहु शकता (अकांउट माझे नाही)