उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १३
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
आर्थर्स थीमच्या पुढे थोड्या अंतरावर 'द एशियन बॉक्स' नावाचं एक मुख्यतः थाई पदार्थ मिळणारं एक हॉटेल आहे. ते सुद्धा चांगलं वाटलं.
Taxonomy upgrade extras
अ-प्रातिनिधिक अनुभव
मी ऑक्टोबरमध्येच तिथे गेलो होतो. माझा अनुभव उत्तमच होता. त्यांच्या वाईनविषयी खात्री नव्हती म्हणून मी बिअर घेतली. ज्यांनी वाईन घेतली त्यांनी सांगितलं की ती वाईट होती. मात्र, माझा अनुभव प्रातिनिधिक नाही, कारण मी ज्यांच्यासोबत गेलो होतो त्या बाई तिथल्या मालकांपासून वेटरपर्यंत सगळ्यांच्या ओळखीच्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला व्हीआयपी वर्तणूक मिळाली.
तुम क्या जानो...
>>जंतू ...बिअर ? ऑल वेल ?
मला बिअरविषयी फार प्रेम नाही१, पण दुसरा बरा पर्याय उपलब्ध नसेल तर, किंवा यजमानांचं मन राखण्यासाठी किंवा उन्हाळ्यातल्या भर दुपारी वगैरे पिऊ शकतो.
तात्पर्य : उदारमतवादी असणं फार त्रासाचं काम असतं बापट.
१. ह्याला अपवाद म्हणजे जर्मनीत आणि बेल्जियममध्ये प्यालेल्या काही बिअर. पण ते एक असोच.
संतोष बेकरी च्या मागचं !!! (
संतोष बेकरी च्या मागचं !!! ( सालं त्या पराठा वाल्याचा जागचं पण बरं होतं ) जुन्या बऱ्या जागा बंद झाल्या कि दुःख होतं . गेल्या शतकातील सगळ्यात दुःखद घटना म्हणजे ईस्ट स्ट्रीट वरचं आद्य चायनीज 'कामलिंग' बंद पडलं ती !!!( आणि सूड म्हणून त्या जागी मयूर थाळी चालू झालं , अररारा )
आज गावातल्याच अन्नपूर्णा
आज गावातल्याच अन्नपूर्णा डायनिंग हॉल नामक एका लिंगायत जेवणासाठी प्रसिध्द ठिकाणी दुपारचे जेवण झाले (गेल्या आठवड्यात बॅटोबा सोलापूर मुक्कामी आले असता त्यांना येथेच नेले होते पण आडनिड टायमामुळे जेवणाला न्याय देता आला न्हवता) मस्त शेंगाभाजी (शेंगादाण्याच्या कूटाची भाजी) पेंडपाला (दाळीची उसळ्/भाजी) शेंगाचटणी, दही, कोशिंबीर आणी पातळ, नरम, पांढर्याशुभ्र ज्वारीच्या भाकर्यांनी अगदी तृप्त जाहलो. वर लिटरभर ताक दोघात संपवण्यात आले. खिशाला जास्त ताण न देता अप्रतिम बेत जमला.
मायला ,हे विंट्रेस्टिंग
मायला ,हे विंट्रेस्टिंग वाटतंय ..सोलापूरला व्यावसायिक किंवा वैयक्तिक काही कॉन्टॅक्ट नसल्याने येणे जाणे नाही . त्यामुळे हे नशिबात नाही ( हां , म्हणजे तुम्हीच काही कट्टा वगैरे ठरवलात , आणि आग्रहाने वगैरे .. तरच ) तर असं जेवण इतर कुठे भेटतं ? कोल्लापूर , सातारा , पुणे , रत्नांग्री , मुंबय वगैरे
बापटाण्णा तुम्ही ऑल्वेज वेलकम
बापटाण्णा तुम्ही ऑल्वेज वेलकम हो. याल तवा कट्टा करु. त्यात काय एवढं.
बाकी असं जेवण मला तरी दुसरीकडे कुठे मिळालं नाही. काही ठिकाणी भाकर्या बर्या असतात तर काही ठिकाणी तर्री जहाल. काही ठिकाणी चव आवडते पण भाव परवडत नाही. सगळ्याच बाजूने खुष व्हायचा हा मामला आहे. पंजाबी डिशेस म्हणून त्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आणि चित्रविचित्र नावाचे परदेशी डिशा खाववत नाहीत. कोल्लापूर सातारा म्हणले तरी आख्खा मसूर, मिसळ, तांबडा पांढरा आणि मटण हे ओव्हरहाइप्ड आयटेम आहेत. तुळजापूरी मटण कोल्हापूरला कधीच ऐकणार नाही चवीत आणि जहालपणात.
आज दुपारी हिंजवडी - भूमकर चौक
आज दुपारी हिंजवडी - भूमकर चौक रस्त्यावरील 'मल्हार' मध्ये मटन थाळी चापली.
इथल्या प्रथेप्रमाणे बोकडाचे मटन मिळण्याचा प्रश्नचं नव्हता त्यामुळे बोल्हाईचेचं खाल्ले.
अफलातून चवीचा रस्सा, तितकचं उत्तम सुकं मटन आणि अळणी सूप होतं. एकंदरीत चवीसाठी पाचपैकी चार गुण.
अँबियन्स आणि सर्व्हिस साठी शून्य गुण.
गेल्या आठवड्यात इटालियन खायची
गेल्या आठवड्यात इटालियन खायची इच्छा झाली. स्क्वीसितो आणि रोयाल इटली चा थोडा कंटाळाच आला होता.
म्हणून सेनापती बापट रस्त्यावर पॅन्टालून्सच्या पाठीमागील गल्लीत असलेल्या 'टेल्स अँड स्पिरिट' मध्ये इटालियन खाल्ले.
मोझरेला सिगार्स, फार्मर्स पिझ्झा आणि बक्लावा विथ बटरस्कॉच आइसक्रीम मागवले. सगळे पदार्थ चवीला अफलातून होते.
इतके खाल्ल्यावर पास्ता साठी पोटात जागा शिल्लक राहिली नाही म्हणून नाइलाजाने बिल मागवले.
पुढच्या वेळी पास्ता ट्राय करण्यात येईल. इटालियन फूड प्रेमींसाठी हायली रेकमेन्डेड.
धॉन्नोबाद! अवश्य ट्राय
धॉन्नोबाद! अवश्य ट्राय करण्यात येईल हो मास्तरजी.
बाकी से.बा.रोडपासून पुढे जरा औंधात वाट वाकडी करून गेल्यास 'ला बुशी ड'ऑर' नामक फ्रेंच बेकरीही अवश्य भेट द्यावी अशी आहे. आल्मंड क्रोसाँ एक नंबर.
चर्चातली बिस्किटं
नाताळबाबाच्या आगमनाच्या संध्याकाळी, २४ डिसेंबरला, 'ग्रेस' नावाच्या स्थानिक आणि स्वतंत्र चर्चमध्ये बिस्किटं खाल्ली. इतर कोणत्याही दुकानात किंवा स्थानिक, हिप्पी बेकऱ्यांमध्ये किंवा फार्मर्स मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा फार निराळी लागली नाहीत. बिस्किटं फार गोड होती, त्यामुळे ती प्रतिगामी असल्याचं दुबार सिद्ध झालं. बिस्किटं बेक केलेली असली तरीही अमेरिकेत बिस्किटांना कुकी म्हणायची पद्धत आहे!
'काय ऐकलंत' या धाग्यात निराळा प्रतिसाद देत नाही. मला 'ग्रेस' चर्चात घेऊन जाणारी मैत्रीण, व्हॅलरी, चांगली गायिका आहे. चर्चात ख्रिश्चन रॉक म्हणता येतील अशी ख्रिसमस कॅरल्स ऐकली. व्हॅलरी शेजारीच उभी राहून, चांगल्या मोठ्या आवाजात गात असल्यामुळे तिचा आवाज स्वतंत्र ऐकता आला. स्टेजवरचे गायक-गायिका सपाट गात होते आणि व्हॅलरीच्या गाण्यातला भरजरी पोत सहज कानावर येत होता.
शावर्मा!
कान्दिवली (पश्चिम)मध्ये अल-शावरमा म्हणून कोंकणी ख्रिश्चन बुवाचा, पोईसर जिमखान्याच्या समोर एक जॉइंट आहे. साधारण दीडशेच्या रेंज मध्ये जाडजूड अप्रतिम शावर्मा मिळतो. हुनानी सॉस आणि हुम्मूसने भरलेला. ह्यात तंदूर वर 'लाईव्ह' भाजलेलं चिकनही मिळतं. इथे आसपासच्या परिसरात ८०-१०० च्या रेंज मध्ये छोट्या स्टॉल्सवरही शावरमा मिळतो, पण 'अल' इज द बेष्ट. तोच आद्य शावर्मा वाला असावा ह्या परिसरातला.
शावर्मा न खालेल्या अभागी जनांनी इथून सुरुवात करावी.
लोकसत्ता मध्ये ह्याच्याबद्दल एकदा जे छापून आलेलं ते त्याने उत्साहाने एन्लार्ज करून तिथे डकवलेलं आहे.
तर पुण्यपत्तनातील तीनचार
तर पुण्यपत्तनातील तीनचार फ्रेंच बेकर्यांचा सर्व्हे केल्यानंतर अदालत इस नतीजे पे पहुंचती है के ल प्लेझिर, प्रभात रोड येथील मॅकारोन्स सर्वोत्कृष्ट आहेत. जबरदस्त व्हरायटी & क्वालिटी, शिवाय दाम भी सस्ता. सर्वांत स्वस्त (५०/- पर पीस. बाकी ठिकाणी ६०/-, ८०/-, इ. रेट्स आहेत.) तरी मॅकारोन प्रेमींनी मॅकारोन्स तिथेच खाणेचे करावे. ला बुशी ड्'ऑर इथे क्वालिटी चांगली परंतु बिनकामी ८० रुपये पर पीस. फ्रेंच विंडो इथे फक्त चॉकलेट फिलिंगवाले मॅकारोन्स मिळतात मोस्टली. प्लस ६०/- पर पीस. तस्मात बनाना इक्लेअर्स इ. पेस्ट्री आयटम्स उत्तम खायचे तर फ्रेंच विंडो, आल्मंड क्रोसाँ उत्तम खायचे तर ला बुशी ड्'ऑर आणि मॅकारोन्स उत्तम खायचे तर ल प्लेझिर.
एंजॉय.
https://www.google.co.in/search?q=french+macarons&biw=1366&bih=658&sour…
बाणेरातल्या 'मायनस एट्टीन
बाणेरातल्या 'मायनस एट्टीन डिग्रीज' मधे देखील येण्याचे करावे 'मॅकरोन्स' खाण्यासाठी. इथे साठ रुपयास मिळते. मला आवडले पण मी मुळात फार ठिकाणचे खाल्ले नाहीत त्यामुळे तिथले उत्कृष्ट आहेत का हे सांगता येणार नाही (पण त्यानिमीत्ताने एक चांगलं रेस्तरां ट्राय केल्याचा आनंद जरुर मिळेल ही खात्री). .
हे घ्या , हेच्च मिळतंय पाश्चर
हे घ्या , हेच्च मिळतंय पाश्चर बेकरीत मेन स्ट्रीट वर ... प्राचीन काळापासून ... आणि हे macaron पेक्षा भारी वाटतंय मला ...
https://en.wikipedia.org/wiki/Macaroon
macaroon आणि macaron
>> हे घ्या , हेच्च मिळतंय पाश्चर बेकरीत मेन स्ट्रीट वर ... प्राचीन काळापासून ... आणि हे macaron पेक्षा भारी वाटतंय मला ...
macaron हा फ्रेंच शब्द आणि macaroon हे त्याचं इंग्रजी रूप. ह्या पदार्थाचं (पारंपरिक पाककृतीनुसार) वैशिष्ट्य म्हणजे त्यात मैदा किंवा कोणतंही पीठ न वापरता केवळ बदामाची पूड वापरलेली असते. गोडीसाठी साखर घालतात. पदार्थ हलका होण्यासाठी आणि सगळं मिश्रण एकत्र बांधण्यासाठी अंड्यातला पांढरा भाग वापरतात. पुण्यात हा पदार्थ महाग असण्याचं कारण म्हणजे त्यात बदामाची पूड वापरलेली असणं अभिप्रेत आहे. मात्र, त्यात मैदा वापरत असणार असा मला दाट संशय आहे.
पोत
>> चवीत समजत नाही का हा फरक? का अतिसाखर घालून चव मारून टाकतात?
मी खाल्लेले नाहीत, पण चव आणि पोत दोन्हींत मैद्यामुळे फरक पडत असणार. मैद्यात ग्लुटेन असतं आणि बदामात ते नसावं. (बदाम कमी वापरले तरीही बदामाचा इसेन्स वापरून चव बदामासरखी करता येत असणार. काजू कतली जशी काजू अल्प प्रमाणात आणि भरपूर मैदा घालून करतात तत्सम हे तंत्र आहे.)
पॅटिसेरीचं नाव काय? आम्ही
पॅटिसेरीचं नाव काय? आम्ही थेवेनिन पॅटिसेरीमध्ये खाल्ले.
https://www.facebook.com/theveninpatisserie/
अगोदर ला डुरी इथे गेलो होतो पण तिकडे २ की २.५ युरो प्रति नग असा भाव ऐकून मागे फिरलो, पारिसात गेली ३० वर्षे राहणार्या परिचिताने मग ही पॅटिसेरी सुचवली. तिथे स्वस्तात मस्त काम झाले, चांगले चारपाच मॅकारोन्स हादडले.
शीग मटणाचा बेत झाला. पेंटल
शीग मटणाचा बेत झाला.
पेंटल चौकातून स्पेशल शीगचे मटण घेतले (बोकडाचे बोनलेस करुन देतात, ५३० रेट) रहीमचचाच्या स्वाद हॉटेलाला बसलो तिघे जण. सव्वा किलो ड्राय शीग अन लोणी दिले. अर्धा किलो रश्श्यासाठी. शीग तयार होईपर्यंत आधी शिस्तीत दारुकाम झाले. शीगची जब्बरदस्त टेस्ट बनलेली. रश्श्यात कडक भाकर्या कुस्करल्या न निबार हाणल्या. एकूणच गावठी पार्टीचा बेत जमून गेला.
(बॅटूची ही पार्टी पेंडिंग आहे)
बिबिबॉप
बिबिबॉप नावाच्या एका कोरियन फास्टफूड /टेकौटमध्ये काल खाल्ले. चिपोटलेसारखी अरेंजमेंट आहे. भात (जांभळा वाईल्ड राईस किंवा पांढरा), स्प्राऊट्स, बीन्स, उकडलेल्या बटाट्याचे क्युब्स, (स्पाईसी किंवा मॅरिनेटेड चिकन)- टोफू - स्टेकपैकी एक प्रोटीन, आणि वर किसलेला गाजर, मुळा, केल अशा भाज्या, उकडून किसलेले अंडे आणि चीज. किमची सॅलड किंवा अननसही टाकून घेऊ शकता. त्यांचे सॉसेस जबरा टेस्टी होते. यम यम सॉस एकदम यम्मी. कोरियन रेड सॉसही छान. हॉट सॉस आणि टेरियाकी वगैरे ओळखीचे वाटल्याने ट्राय केले नाहीत.
दुपारच्या जेवणाला पोटभर होऊन नंतर संध्याकाळच्या स्नॅक्सलाही पुरले. :)
मी सॉसच्या दोन छोट्या डब्या (रेस्टारंटात विचारुन) घरी आणल्या. घरची भाजी गंडली तर तोंडी लावायला छान.
रेस्टॉरंटात प्रचंड गर्दी असूनही तिथे बसून खाता आले. भगवी-पांढरी अशी सुंदर रंगसंगती, स्वच्छ टेबल्स, आणि तिथले अतिनम्र सेवक लक्षात राहतात.
चिपोटले आवडणाऱ्यांना एक चांगला पर्याय आहे. अर्थात ही चैन (!) केवळ सिनसिनाटी-कोलंबस वगैरे गरीब शहरांमध्येच दिसत असल्याने ऐसीकरांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही. पण माहितीपूर्ण श्रेणी मिळाल्यास उत्तम.
जालावरचे एक चित्र. मोबाईलवर मी घेतलेला फोटो इतका चांगला आला नाही.
@अतिशहाणा - बीबिम्बॅप
>>केवळ सिनसिनाटी-कोलंबस वगैरे गरीब शहरांमध्येच दिसत असल्याने ऐसीकरांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही.
कोरियात Bibimbap म्हणजे तुम्ही वर्णन केलेला पण 'एकत्र कालवलेला भात'. त्याचाच 'बिबिबॉप' हा अपभ्रंश असावा. bibimbap असा गूगलशोध घेतलात तर गरीब शहरांबरोबरच इतर अनेक ठिकाणी हा पदार्थ मिळतो असे दिसेल. सामान्यतः या भातमिश्रणावर सर्वात वर अंड्याचा बलकही सोडतात.
बरोबर
कोरियात Bibimbap म्हणजे तुम्ही वर्णन केलेला पण 'एकत्र कालवलेला भात'. त्याचाच 'बिबिबॉप' हा अपभ्रंश असावा
+१ रेष्टॉरंटाच्या मेन्यूकार्ड कम माहितीपत्रकावर एक वर्णनात्मक परिच्छेद आहे त्यात हे वाचलं. भात मिश्रणावर उकडलेली अंडी किसून घातली होती. कच्चा बलक नव्हता. इतरत्र निश्चितच मिळत असेल. ही रेस्टॉरंट चेन या दोन तीन शहरांतच आहे असं मला म्हणायचं होतं.
विकांताला औरंगाबाद वारी झाली.
विकांताला औरंगाबाद वारी झाली. निराला बाजार मधल्या 'करीम' आणि शाहगंज मधल्या 'सागर' मध्ये खादाडी केली.
करीम मध्ये रेशमी कबाब, मुर्ग अकबरी,रोगनी नान आणि मलाई फिरनी चापले. कबाब अत्युत्कृष्ट म्हणावे असे होते, तोंडात अक्षरशः विरघळणारे.मुर्ग अकबरी लेग पीस विथ ग्रेव्ही अशी डिश होती. एकदम निगुतीने शिजवलेले लेग पीस आणि अफलातून मुघलाई ग्रेव्ही.
रोगनी नान ठीकठाक पण वेगळा प्रकार म्हणून बरा वाटला, नुसते खाल्ले तरी चांगले लागतील असे. किंचित तिखट आणि गोडसर अशी मिक्स चव होती नान ला.
'सागर' मध्ये बिर्याणी, खिमा आणि शाही रोटी मागवले. खिमा अगदी उच्च होता आणि शाही रोटी केवळ अप्रतिम.
शाही रोटी नक्की कशाची बनवलेली कळाले नाही परंतु जरा ब्रेड च्या जवळपास जाणारा आणि जबरदस्त चवदार प्रकार होता.
घनु च्या रेकमेंडेशन नुसार (
घनु च्या रेकमेंडेशन नुसार ( उदरभरण नोहे -१२ ) काल लंच ला रास्ता कॅफे , बाणेर रोड गेलो. रणरणते ऊन असल्याने घनु ने वर्णन केलेल्या ओपन एअर मध्ये बसण्याचे धैर्य झाले नाही. आतमध्ये डेकॉर अत्यंत मिनिमलिस्टिक ( थोडक्यात काही विशेष नाही ) . falafel इन पिटा पॉकेट्स , सदर्न फ्राईड चिकन बर्गर आणि herb अँड बटर मॅरिनेटेड चिकन असे ऑर्डर केले . अतिशय उत्तम प्लेटिंग . सर्व अत्यंत चविष्ट , विशेषतः herb अँड बटर मॅरिनेटेड चिकन अतिशय उच्चं ... मॉकटेल्स सुमार , पण वाईट नाहीत.. ( falafel चा आकार मात्र पार डाळवड्याचा . तरी चव मात्र सुयोग्य ) ..... तक्रार एकच .. फारशी गर्दी नसतानाही अत्यंत स्लो सर्विस . परत संध्याकाळी जमल्यास जाणार . अजून आवडेल असा संशय ...
तुम्हाला रास्ता कॅफे आवडले हे
तुम्हाला रास्ता कॅफे आवडले हे ऐकून आनंद वाटला :) स्लो सर्विस चा इशू विशेष जाणवला नाही मला माझ्या दोन भेटीत (मित्रांबरोबर टवळक्याकरण्यात ते लक्षात आलं नसावं). हर्ब-एन्-बटर मॅरिनेटेड चिकन ट्राय करायला हवे पुढच्या वेळी. कोथरूडातल्या 'मेट्रोमिक्स' मधे असंच हर्ब+बटर मॅरिनेटेड बासा फिश मिळतं- अतिउच्च असतं ते, नक्की ट्राय करा.
संध्याकाळी अँबियन्स साठी नक्की पुन्हा एकदा रास्ता कॅफे ला भेट द्या. तिथे काहीवेळेस लाइव मुझिक पण असतं, तुमचा विशेष अभ्यास आहे त्यात, तुम्हास आवडेल :)
ठिकाणः जयपूर. काय खाल्ले:
ठिकाणः जयपूर.
काय खाल्ले: फक्त मटन आणि चिकन. मारवाडी तुपकट गोड व्हेज पदार्थ आवडतात पण ते लै खाल्ले असल्याने आता राजस्थान पेश्शल नॉनव्हेज खावे असा बेत होता. मित्रवर्यांसकट मग एम आय रोडवरील हंडी रूफटॉप हाटेलात गेलो, राजस्थान स्पेशल लाल मास ऊर्फ मटन करी विथ बाजरा रोटी खाल्ली. नंतरच्या दिवशी बड़ी चौपड़ इथे एम.एम.खान नामक हाटेलात गेलो. त्याची एक मजा आहे. जुन्या हाटेलाशेजारी त्याच नावाचे हाटेल सुरू झाले आहे. नव्या हाटेलातले लोक लै आग्रह करीत होते पण एम एम खान (ओल्ड) हे लेबल पाहून ओल्डमध्ये गेलो. तिथे चिकन चंगेजी, मटन निहारी व सीख कबाब आणि रोटी हे पदार्थ खाल्ले.
लाल मास- स्पायसेस जरा वेगळे होते आणि मटन मस्त शिजलेले होते, मजा आली.
चिकन चंगेजी- चिकन करी विथ सम स्पायसेस. उत्तम.
मटन निहारी- हा प्रकार पहिल्यांदाच खाल्ला आणि प्रेमात पडलो. ग्रेव्ही तर जान कुर्बान करावी अशी. त्यात तूप असावेसे जाणवत होते. किंचित आंबट, स्पायसी, आणि तुपाळ अशी ती ग्रेव्ही निव्वळ अफलातून होती. हा पदार्थ भूकमार्क (सौजन्यः आदूबाळ) करून ठेवलेला आहे.
तिथली तंदूर रोटी हा स्वतंत्र विषय आहे. अशी गुबगुबीत मस्त तंदूर रोटी अगोदर कधी खाल्ल्याचे आठवत नाही. नुसता रोटीचा घास घेतला तरी त्याला एक वेगळी चव होती.
एकुणात उत्तरेतील मांसाहारी पदार्थांच्या महासागरात पाय ओले केल्याची जाणीव झाली. अतिशय सुखद.
मटण निहारी?
खरी निहारी ही हम्माचीच!
(आणि, हा सकाळीसकाळी ब्रेकफास्टला खाण्याचा प्रकार असण्याबद्दल ऐकून आहे. बोले तो, रात्रभर हळूहळू शिजवत ठेवायची, नि सकाळी विष्णुदासांहुनी मऊ झाली, की चेपायची.
बाकी, याची ग्रेव्ही हा बहात्तर (आकड्याची चूभूद्याघ्या.) रोगांवरचा अक्सीर इलाज असल्याबद्दल किंवदन्ता आहे, असे ऐकून आहे. असो.)
हळू घ्या : "
हळू घ्या :
" हिंदुत्ववादी"आणि "हम्मा निहारी कुठे मिळेल हे पाह्यला पाहिजे ? "
तुम्हीही कट्टर पुरोगामीच निघालात कि हो !!!
भारतात सर्वच राज्यात हम्मावंशहत्याबंदी अजून नाहीये . ती राज्ये बघा ... अर्थात केरळ किंवा नॉर्थ इस्ट मध्ये निहारी मिळणे जरा अवघड वाटते
अवांतर : नाहीतर पुरेसे पुरोगामीत्व दाखवा , भारताच्या वायव्येला जाण्याचा आदेश मिळेल ती पडत्या फळाची आज्ञा मानून न्याहारी करून या
ठिकाण: कल्याणीनगर, पुणे.
ठिकाण: कल्याणीनगर, पुणे.
काय खाल्ले: पेस्ट्र्या आणि पिझ्झा.
पर्शियन बेकरी नामक एकदम छोटीशी बेकरी आहे. तिथे नट इक्लेअर, चॉकलेट इक्लेअर, लेमन टार्ट हे पदार्थ खाल्ले, मस्त चव होती. नट इक्लेअर आणि लेमन टार्ट हे विशेष आवडले. टार्ट अगदी आंबटढाण नव्हते. आंबटगोड मिक्स उत्तम चव.
तिथेच ऑलमोस्ट लागून ग्रीडी मॅन्स पिझ्झेरिया नामक छोटेसे हॉटेल आहे. युरोपियन पद्धतीची आठवण झाली त्याचा पिझ्झा खाऊन. स्क्विसितोतला पिझ्झा निव्वळ चवीवरून पाहता सुपीरियर वाटतो, परंतु यात समहाऊ युरोपची आठवण आली. पुन्हा जाणे रेकमेंडेड नक्कीच.
पुन्हा एकदा डेक्कन रोंदेवू ( नीट टायपत का नाहीये ?)
काल बऱ्याच काळानंतर डेक्कन रोंदेवू ला गेलो . दारातच सुर्या 'ज डेक्कन... अशी पाटी बघितली आणि एकंदरीत प्रकार लक्षात आला ( फार फार वर्षांपूर्वी डेक्कन रोंदेवू व्हायच्या आधी याच जागी हॉटेल सूर्या होत. अतिशय साधारण, सुमार , कुठलेही वैशिष्ट्य नसलेला बार /रेस्टो )
आत मध्ये गेल्यावर AC चालू नाही हे लगेच जाणवलं . रेस्टॉरंट मध्ये फकस्त १ टेबल ऑक्युपाइड . बाकी शुकशुकाट .स्टाफ बदललेला दिसला. आणि होता तो सुध्दा पूर्णपणे म्हराटि स्टाफ म्हणजे आता ब्लू डायमंडी झूल पूर्णपणे उतरलेली दिसली . येऊन चूक केली का काय अशी शंका आली .
परंतु पहिला सुखद धक्का म्हणजे मूळ मेन्यू परत आलेला . शंका आली म्हणून शेफ कोण विचारले . आश्वस्त करण्यात आले कि ( मध्ये सोडून गेलेले ) मूळ शेफ परत रुजू झाले आहेत , म्हणूनच ओरिजिनल मेन्यू परत आलेला .
जेवणाबद्दल विशेष काही नाही हेच विशेष . सर्व प्रेपशन्स अत्यंत व्यवस्थित . ( इथे अत्यंत लिमिटेड असा कॉंटिनेंटल , ओरिएंटल , देशी आणि इटालियन असा मेन्यू होता/आहे . अत्यंत चविष्ट , हि ह्याची ख्याती होती/आहे ) आणखीन धक्का म्हणजे ५ वर्षापूर्वीच्याच प्रायसेस . !!!
तात्पर्य : जायला हरकत नाही . पूर्वीची श्टाईल वगैरे नाहीये , थोडी जुनी , दुर्लक्षित छटा आलेली आहे ..... पण खाद्य पदार्थ आम्हाला तरी ओरिजिनल प्रमाणेच उत्तम मिळाले !!
( डेक्कन रोंदेवू चालू झाले तेव्हा डेक्कन वर असा पर्याय नव्हता . पूर्णपणे अपमार्केट असे वातावरण , उत्तम फूड व ड्रिंक्स . चालवणारी मंडळी तेव्हा पूर्व ब्लु डायमंडी ( आणि पश्चिम बेकर्स बास्केट आणि पोलका डॉट्स ) होती . परदेशी कलिग्जना सुध्दा डोळे झाकून रेकमेंड करावे अशी जागा होती . प्रॉब्लेम एकच होता , कि लय फिरंगीपणा चालायचा . वेटर्स ना मराठी बोलण्यावर जवळ जवळ बंदी होती. हे एका वेटर कडून कळल्यावर तेथील वरिष्ठांना '' घेण्यात " आले होते आणि लय मजा आली होती. मुद्दा मराठी बोलायलाच पाहिजे हा नव्हता , पण भर पुण्यात , भर डेक्कन वर मराठी बद्दल जवळ जवळ बंदी या माजाचा होता आणि हे अयोग्य असा होता ) हि मंडळी जाऊन सुद्धा काही वर्षे झाली मध्ये मेन्यू बदलण्याच्या कसरती झाल्या पण आता पूर्वपदावर आले आहेत तेव्हा नक्की जावे अशी जागा