उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १४
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
मुंबईत मालाडला एव्हरशाईन नगर मध्ये 'जिमीस बर्गर' म्हणून दुकान आहे. पिटुकलं. ३ फूट उन्चीची उन्च स्टूल्स. कोपर्यात ठेवलेली गिटार, भिंतीवर गाजलेल्या इन्ग्लिश कार्टून्स (केव्हिन अॅण्ड हॉब्स, गार्फिल्ड इत्यादी) मधून कल्पकतेने पोर्कची जाहिरात. कॅशिअर च्या मागे फळा, त्यावर खडूने लिहीलेला मेन्यू. चारहून जास्त लोक बसू शकत नाहीत. एक्झॉस्ट छानपैकी बसण्याच्याच जागेवरून जात असल्याने एसी असून नसल्यासारखा. तिथे जॉब्रेकर (जबडातोड!) नामक बर्गर मिळतो. त्याचे फोटो खालील दुव्यावर मिळतील. मी पहिल्यांदा पोर्क (बर्गरमधून) इथे खाल्लं. भन्नाट. पैसा वसूल. मॅक्-डी किंवा बर्गरकिंग मध्ये कुठलाही बर्गर पदार्थ ओव्हरप्राईस्ड वाटतो. इथे प्रत्येक पैश्याचा हिशोब लागला.
कॉर्न चाट
राजेश कॉर्न कॉर्नर नावाने हा स्टॉल प्रसिद्ध आहे.
जवाहर नगर मध्ये , अमित डेअरी च्या बाजूच्या गल्लीत चालत पुढे गेलात कि एक टपरी वजा स्टॉल दिसेल . सहसा गर्दी असतेच , वीकएंड ला जास्तच .
तुमच्या आवडीनुसार उकडलेलं कणीस , भाजलेलं कणीस किंवा बेबी कॉर्न निखाऱ्यांवर भाजून त्यात वेगवेगळे sauce , बटर , cheese वगैरे घालून हातात ठेवल जातं .
अधिक माहिती साठी खालील लिंक पहा
https://www.facebook.com/pages/Rajesh-Corn-Corner/532569376839701
पत्या नाही
मुंबईत ली दुकानं खालच्या लिंक वर आहेत
काल fragrant hotpot with
काल fragrant hotpot with rice and clear soup खाल्ले.
एका मोठ्या बाऊल मधे आपल्याला हव्या त्या भाज्या, फिश, मीट (सारे कच्चे) इ. घेऊन स्टॉलवाल्याला द्यायचे. मग तो ते सगळे नीट चिरून शिजवतो/ मोट्ठ्या लोखंडी कढईत परततो. त्यात भरपूर दाणे, लाल मिरच्या आणि कसले तरी सॉस घालून देतो. सोबत एक छोटा बाऊल गरम भात आणि सुप . अप्रतिम चव लागते. आणि परत सगळं हेल्दी हेल्दी *biggrin*
प्लेस उत्तमच आहे, झामू मी
प्लेस उत्तमच आहे, झामू मी अजून ट्राय केलं नाहीये. पण माझं वैयक्तीक मत असं आहे की 'याना' आधी " द बाऊंटी" आहे, कल्याणी नगर्. अर्थात् बाऊंटीजला अनेक वर्षात भेटलो नसल्याने अजूनही ते याना पेक्षा सरस आहे का ते माहित नाही.
सगळ्यात टुकार 'कोबेज्' (पुन्हा, माझं वैयक्तिक मत्).
नाही , यात राईस फ्राईड न
नाही , यात राईस फ्राईड नस्तो .. प्लेन राईस
आणि नूडल्स घेतल्या, तर चिकन किंवा व्हेजी स्टॉक मधे शिजवून नुसत्याच मिसळतात, तेलावर परतत नाहीत .
त्यात फ्लॅट नूड्ल्स, ग्लास नूडल्स असे काही प्रकार असतात.
.... ललीत महल फर्ग्युसन रस्त्यावर आहे? ..मी समजत होते, मित्रमंडळ सर्कल जवळ आहे ते.
पण पुण्यात, एफ. सी. रोड वर असही मिळायला लागलय हे वाचून धन्य वाटले.
आमच्यावेळी नव्हत असलं काही :(
प्राचीन काळी ( म्हणजे १९९० ते
प्राचीन काळी ( म्हणजे १९९० ते २००० मध्ये असावे ) औंधात ' कुब्लाई ' नावाची इटरी होती . तिथे हीच पद्धत होती . हेच खरे मंगोलियन फूड असा मालकांचा दावा होता . आपल्यासमोर आपण दिलेल्या इन्ग्रेडिअनट्स आणि ( तथाकथित मंगोलियन ) सॉस मध्ये नूडल्स आणि राईस बनवून दिला जायचा . ऑथेंटिक मंगोलियन होतं का नाही हे माहित नाही . पण चांगलं होत जे काही ते . काळाच्या ओघात बंद पडली असावी ती इटरी .
हे आमच्या एका मित्राच्या बाय
हे आमच्या एका मित्राच्या बायकोचे रेकमेंडेशन. मगरपट्टा, पुणे येथील सीझन्स मॉलमध्ये फाईव्ह फॅट मंक्स नामक नवे चिनी म्हणा साउथ ईस्ट एशियन म्हणा हाटेल सुरू झालेय, चव वगैरे उत्तम आहे. तिथे दोन पदार्थ खाल्ले: चिकन डिमसम आणि काओ बाओ (बहुधा स्पेलिंग चुकलेय तरी जाणकारांनी सुधारून घ्यावे) विथ कुंग/किंग काफ्राओ. उत्तम प्रकार होता एकूण. डिमसम म्ह. बेसिकली खिमा, मसाला यांना पारदर्शक मैदा रॅपिंगमध्ये ठेवून ते वाफवले. त्यापेक्षा मला ते काओ बाओ जास्त आवडले. चिकनचे छोटे तुकडे विथ मिरची तुकडे आणि आल्याचे तुकडे हे सर्व स्टर फ्राय केले आणि ते सर्व एका टॅकोसदृश प्याकिंगात कोंबले. आल्ले आणि मिरचीचे तुकडे प्लस चिकनचे बारीक तुकडे हा प्रकार भन्नाट वाटला, तो नक्की पुन्हा ट्राय करेन. तिथे माशाचे ऑप्शन्सही होते पण ते लगेच खराब होत असल्याने वीकेंडलाच ठेवतो सो दॅट त्याचा खप तेव्हा भरभर होतो असे हाटेलवाला म्हटला. एकुणात माझ्याकडून दणदणीत शिफारस. ऑथेंटिक आग्नेय एशियन जेवण.
le 15 patisserie, Ambedkar
le 15 patisserie, Ambedkar road, Bandra.
आजवर खाल्लेल्या फ्रेंच मॅकारोन्सपैकी सर्वांत भन्नाट मॅकारोन्स इथेच बघायला मिळाले. ती बेकरी स्पेशली मॅकारोन्सच जास्तकरून विकते. काय व्हरायटी अन काय चव, अहाहाहाहा. पुण्यातल्या सर्व फ्रेंच बेकऱ्या मॅकारोन्समध्ये हिजपुढे काजवे वांग आहेत.
नाशिकला फार पुर्वी वाफव
नाशिकला फार पुर्वी वाफवलेले हरभरे टाकून पाणिपुरी मिळायची, तो ही एक चांगला प्रकार होता. अता जशी शेवटची मसाला-पुरी देतो 'भैय्या' तसंच हे नाशिकचे पाणिपुरीवाले (निदान आमच्या भागातले, भाजी-बाजाराच्या आजुबाजूचे) शेवटच्या पुरीत कांदा, हरभरे, तिखट्-मिठ घालून द्यायचे - चविष्ट होतं ते प्रकरणही.
एवढ्यात पुण्यात वेगवेगळ्या पाण्याच्या पाणिपुऱ्या मिळू लागल्या आहेत्. म्हणजे एका प्लेटमधे जर ६-७ पुऱ्या असतिल तर प्रत्येक पुरीत वेगळं पाणी. जल्जिरा, लसुण, पुदिना, बेसिक, खट्टा-मिठा, गोड, हिंगाचं वगैरे असे पाण्याचे प्रकार. हे पाणी लोणच्याच्या बरण्यांमधे ठेवलेलं असतं आणि पाणी द्यायच्या पळीला खालून भोक असतं. हा प्रकार मी दोन्-एक वर्षापुर्वी बडोद्यात खाल्ला होता तिथे हे पाण्याचे प्रकार अजून् जास्त होते आणि चव सरस. उ.भारतात हा वेगवेगळ्या पाण्याचा अगदी कॉमन प्रकार आहे म्हणे.
वेगवेगळ्या पाण्याची पुरी?
वेगवेगळ्या पाण्याची पुरी? पुण्यात कुठे मिळते ते कळवावे.
तदुपरि उत्तरेत एक सूजीपासून बनवलेली पाणीपुरीही मिळते, ज्याम बकवास लागते.
चुरमूर नामक अजूनेक प्रकार बंगालात खाल्लेला आहे. पाणीपुरीचे तुकडे आणि बटाट्याचा लगदा एकत्र मिसळून खायचे मसाला मारके. अफाट जबरदस्त लागतो तो प्रकार. मराठ्यांनी इतकं मैदान मारलं तरी ठीकठिकाणचे खाद्यपदार्थ कै आणले नैत आपल्याकडे.
वेगवेगळ्या पाण्याची पुरी?
वेगवेगळ्या पाण्याची पुरी? पुण्यात कुठे मिळते ते कळवावे
बावधनला आयसिआयसिआय बॅंकजवळ् 'दिक्षित फुडस्' म्हणून एक दुकान आहे, त्याच्या आवारातच (खरंतर त्याच्या बाजूच्या दुकानाच्या आवारात पण त्या दुकानाचं नाव आठवेना) एक पाणिपुरीवाला आहे त्याच्याकडे हमखास मिळते.
तदुपरि उत्तरेत एक सूजीपासून बनवलेली पाणीपुरीही मिळते
ही सुजीपासून बनवलेली पुरी कल्याणीनगरातही मिळते. 'अॅडलॅब्स (अताचं बिग सिनेमा)चौकातून जो रस्ता रामवाडी कडे जातो म्हणजे विमान -नगरला त्या रस्त्याच्या सुरवातिलाच एक पाणिपुरीवाला आहे त्याच्याकडे मिळते. (मर्सिडिज शोरुम समोरच बहुतेक्). मगरपट्ट्यातही मिळायचीकी ही सुजी पुरी (२०१३ पर्यंत तरी मिळत असल्याचं आठवतंय मला). विमान नगरात हॉटेल श्रिकृष्ण जवळपास नटराज भेळवाल्याकडेही मिळते ही पुरी. पण मलाही हा सुजी-अंडाकृती-पुरी प्रकार अवडला नाही कधी.
बंगालात
कलकत्त्यात 'झाल्-मुरी' नामक प्रकार फारंच वर्ल्ड फेमस आहे म्हणे. तु केला आहेस का ट्राय?
फॉक्स ट्रॅवल चॅनल्च्या 'इट्-स्ट्रीट' प्रोग्रॅममधे एक ब्रिटिश्/इंग्रज माणूस हा प्रकार सायकलवर फिरून लंडनच्या रस्त्यांवर विकतो असं दाखवलेलं. तो कलकत्त्याला आलेला असताना त्याने हा प्रकार खाल्लेला आणि वेडाच झाला तो. हे असं आपल्या इंग्रजांनाही खायला मिळावं म्हणून विकतो वगैरे दाखवलेलं. ते कसं बनवतात पाहिल्यावर ' हि तर आपल्या सारसबागेत मिळाणारी सुकी भेळ्' असं झालं. तसंच काहिसं का हे?
अनेक धन्यवाद, नक्की ट्राय
अनेक धन्यवाद, नक्की ट्राय करतो कधी बावधनास गेलो तर.
बाकी झालमुडी = सुकी भेळ हे तत्त्वत:च बरोबर आहे. त्यात कच्ची हिरवी मिरची, कच्चे तेल असे काही घटक असतात. प्लस अजून काही. रेगुलर सुकी भेळ झक मारते झालमुडीपुढे.
ओल्या भेळीबद्दल बोलायचे तर वैयक्तिक माझी पसंती आमच्याकडच्या भेळेला आहे. जंम रस्त्यावर झेड ब्रिजला जायचा टर्न लागतो तिथे एक सांगली भेळ म्हणून गाडा आहे तिथली भेळ मला आवडते कारण टेस्ट इज क्लोजर टु होम. सीझनला कैरीची फोडही देतो बरोबर. एरवी मग ती मिरची असते, एकूणच टेस्ट भारी असते.
सांगली भेळ
सांगली भेळ
भारीच्. नक्की ट्राय करेन्. अरे बॅटोबा तू चिंचवडात असलेल्या 'होटेल अरिहंत' मधे गेला आहेस का? तिथेही 'सांगली भेळी' मिळतात. त्याच्या हॉटेलच्या बोर्डवरच त्यांनी लिहिलंय 'अस्सल सांगली,कोल्हापुरी भेळ, भडंग, मिसळ्'.
मी तिथे भेळ नाहि पण मिसळ खाल्ली आहे आणि मला लै आवडली मिसळ - नादच खुळा. एक मित्र म्हणाला भेळ ट्राय करणे मश्ट आहे तिथे पण भेळ संध्याकाळीच मिळत असल्याने त्या दिवशी योग आला नाही आणि मिसळीवर समाधान मानले.
व्होडका पुरी नाय खाल्ली प
व्होडका पुरी नाय खाल्ली परंतु साऊथ इंडीज, पुणे इथे स्टार्टर्समध्ये रसम पुरी मिळते. मस्त लागतो प्रकार. दोनपाच प्रकारचे रसम पुरीत घालून प्यायचे. तो प्रकारही खरेतर मस्त पापिलवार होऊ शकेल.
बाकी "जॅन थाली" खावी लागल्याचे वाचून करुणा दाटून आली. "गॉरीजी सिंड्रोम" (क्रेडिट थत्तेचाचा फॉर दि फ्रेज) वाले लोक असले लय वाईट्ट उच्चार करतात.
उगीच आपलं. (चुरचुरीत चर्चेवर ओलं कांबळं)
मला वाटते दिल्ली आणि आसपासच्या खड्या बोलीत आणि पंजाबी झाकाच्या हिंदीत आपल्याकडच्या 'ऐ' या चिह्नाचा उच्चार आपण करतो तसा 'अई' असा न होता तो 'अॅ' असा होतो. तीच गत 'औ' ची. त्याचाही खड्या बोलीतला प्रमाण उच्चार 'ऑ' असा आहे. यामुळेच बँक, कॉलेज हे शब्द देवनागरीत लिहिताना ते लोक बैंक, कोलेज किवा कौलेज असे लिहितात. अलीकडे एकाच कान्यानिशी बिंदुरहित अर्धचंद्र हे चिह्न त्यांनी 'ऑ' या उच्चारासाठी वापरायला सुरुवात केली आहे. म्हणजे कॅलेंडरसाठी कैलेंडर लिहितात आणि कॉल सेंटरसाठी कॅल सेंटर. मात्र पूर्वेकडे 'ऐ' या चिह्नाचा उच्चार आपल्यासारखाच 'अई' असा आहे. त्यामुळे पुरवय्ये लोक 'बैंक' असे लिहिलेल्या शब्दाचा उच्चार बईन्क असा करतात. अईसन गोष्ट आहे.
पिझ्झा पाणीपुरी
दादर (वाचावे : अर्ध पुणं - पार्ले (ईस्ट ) हे पूर्ण पुणं आहे. ) ला दुर्गा परमेश्वरी (अर्धे पुणेकर उन्मादात त्याला डिपि म्हणतात )मध्ये पाणीपुरी शॉट्स मिळतात. बरे असतात. (शेवपुरी दहीपुरी ला यस्पि डीपी म्हणतात ऐकून घेरी आल्ती वैशाली मध्ये . )
बोरिवली ला (वेस्ट) पिझ्झा पाणीपुरी मिळते. श्रीजी सेंटर वर.
चहाभात
चहाभात
जपानात खातात, असे आमच्या जपानी शिकवणाऱ्या (मराठी) बाईंनी (सुमारे १९८१-८२च्या इसवीत) सांगितल्याचे (आता वयोमानपरत्वे अंमळ अधू होत चाललेल्या स्मरणशक्तीच्या बावजूद) अंधुकसे आठवते. (जपानी मात्र बहुतांशी पार विसरलो.)
.........
या जपानी शिकत असतानाच्या दिवसांतलीच गोष्ट आहे. आम्हां जपानी शिकू पाहणाऱ्या मूठभरच (आणि त्यातही दिवसेंदिवस गळत जाणाऱ्या) पोरापोरींचे एक टोळके होते. त्यात एक (जपानी शिकणे सोडून इतर अनेक बाबतीत) उत्साही वीर होता. अधूनमधून भटकंती योजायचा. तर असेच एकदा सिंहगड चढून जायचे ठरले. त्यात तेव्हा पुण्यात शिकायला की भेट द्यायला १५-१६ जपानी पोरींचे एक टोळके आलेले आहे, असा सुगावा कोणासतरी लागला. आणि 'एवीतेवी आपण जपानी भाषेचे विद्यार्थी म्हणवतो, तर आपल्या भटकंतीला त्या जपानी पोरींनाही बोलवावे,' अशी सुपीक कल्पना कोणाच्यातरी टाळक्यातून निघाली.
तर ठरल्या दिवशी सर्वजण सिंहगड चढून गेलो. वर गेल्यावर जेवायची वेळ झाली तसे जेवावयास बसलो. कोणीतरी सर्वांसाठी श्रीखंडपुरी आणली होती. झालेच तर पाव(स्लाइस)सुद्धा होता. नक्की आठवत नाही, पण बहुधा वरतीच कोण्या स्थानिकाकडून कोंबडी बनवून पावाबरोबर खावी, असा काहीसा इरादा होता. तो मला वाटते अमलातसुद्धा आणला, परंतु मला वाटते त्या जपानी पोरींना ती कोंबडी झेपली नसावी. टू मेक अॅन अननेसेसरिली लाँग ष्टोरी शॉर्ट, फॉलबॅक ऑप्शन म्हणून त्यांतली एक पोरगी श्रीखंडावर उतरली, आणि (अत्यंत क्लूलेसली) सुरीने स्लाइसला (लोण्यासारखे) श्रीखंड लावून खाऊ लागली. म्हटल्यावर कुतूहल म्हणून आम्हीही तसे करून पाहिले. (हे 'नावीन्याची आवड' या सदरात मोडते. बादवे, 'नावीन्य' की 'नाविन्य'? आम्हांस 'नावीन्य' हेच इंट्यूटिवली बरोबर वाटते. तर ते एक असो.)
तर सांगण्याचा मतलब, श्रीखंडपाव या काँबिनेशनइतके भिकार आलम त्रिभुवनात बहुधा दुसरे काहीही लागत नसावे. (चूभूद्याघ्या.) सबब, उपरोल्लेखितासारखे काही सीर्यलवीर्यल जर काढायचे ठरलेच, तर प्रथम एपिसोडाचा मान प्रस्तुत काँबिनेशनास द्यावा, एवढीच नम्र विनंती आहे. इत्यलम्|
करेक्शनची दुरुस्ती
>>करेक्शन: एसडीबीपी (पाठभेद: एसबीडीपी) उर्फ शेवदहीबटाटापुरी (किंवा शेवबटाटादहीपुरी).<<
नाही. शेव पोटॅटो दही पुरी. पुरावा. बाकी चालू द्या.
(स्वगत : शनिवारी रात्री २२:४४पासूनची चूक कुणीही दुरुस्त केलेली नाही. कुठे नेऊन ठेवले जातिवंत पुणेकर? बापट, Et tu?)
ह्या क्लबाचे सदस्यत्व
>>याच्यात आमाला इनवायटेशन आहे का नाहि?<<
ह्या क्लबाचे सदस्यत्व मागून मिळत नसते. ते तुमच्या नसानसांत भिनलेले असायला लागते. 'आपण मुठेच्या कुशीत वाढलेलो आहोत' किंवा 'आम्ही भटेंच' वगैरे दावे करणारे भलेभलेही त्यासाठी क्वालिफाय होत नाहीत. किंबहुना, जातिवंत पुणेकर कधीच आपणहून हा दावा करत नसतो :-)
जाज्वल्य अभिमान कमी पडतोय
याबाबत आमची कारणमीमांसा अशी की जेव्हा पुण्यात उत्तर भारतीयांचा सुळसुळाट नव्ह्ता तेव्हा याला शे.ब.द.पु म्हटलं जायचं. नंतर उ.भा लोक आल्यावर त्यांनी हा धेडगुजरी शार्टफार्म काढला. त्यांच्या भाषेत बटाटा शब्द नाही.
शेव पोटॅटो दही पुरी असलं भिकार नाव पुणेकर नाय ठेवणार.
आम्ही प्राचीन काळी रुईयाला
आम्ही प्राचीन काळी रुईयाला असतानाही डी पीच म्हणत होतो. या प्राणिमात्रांमधल्या कुणाचाही पुण्याशी (खऱ्या किंवा डोपलगॅंगर) संबंध नव्हता. सबब- डीपीची फ्रुट बिअर आणि मसाला पावच! ये दुर्गा परमेश्वरी कौन हैं?
संपादन: डीपी समोरचा चाटवाला आहे का अजून? त्याने पाणीपुरी विकून मारुती आणि मुंबईत दोन फ्लॅट घेतले असल्या चर्चा चालायच्या
अनवट मत्स्याहार
गेल्या विकांतात मडगावी होतो. मुक्कामात किमान एकदातरी ऑथेन्टिक स्थानिक खाद्यपदार्थ घेण्याचा प्रयत्न असतोच.मडगाव ज्या साष्टी (Salcete) तालुक्यात येते, तो भाग बव्हंशी ख्रिस्तीबहुल. गोमंतकीय हिंदू खाद्य-संस्कृतीशी चांगलीच "तोंड"ओळख असली तरी, किरिस्तावी पद्धतीची माझी मजल विंदालू आणि सोर्पोतेलच्या पलीकडे गेली नव्हती.
तशी कोळवा बीचवरील काही ठिकाणे ठाउक होती परंतु, गोव्याच्या अनेक भेटीत, अनेक बीचेस, अनेक वेळा पाहिले असल्यामुळे, ह्या खेपेस मला समुद्रकिनार्यावर जायचे नव्हते.
चौकशीअंती, चिंचोणे (Chinchinim) गावानजीक असलेल्या असोळणे गावात Seman's Nest नामक एक खानावळ ऑथेन्टिक ख्रिस्ती गोमंतकीय खाद्यपदार्थ देते, असे कळले. तिकडेच मोर्चा वळवला.
ठाण्याच्या मामलेदारची आठवण यावी असे कळकट्ट बाह्यरूप! दुपारचे सव्वा-तीन वाजून गेले असल्यामुळे, आता जेवण मिळणार नाही, असे सांगितले गेले. तेव्हा खास तुमचे नाव ऐकून मडगाहून आले असे सांगून, पहिली ऑर्डर हीच शेवटची ऑर्डर, अशी मांडवली करून आत गेलो..
मत्स्याहारी खाणावळीत मेन्यू कार्ड बाजूला ठेऊन वेटरचा सल्ला घेणे इष्ट, कारण आजचा "फ्रेश कॅच" कोणता हे त्यालाच ठाऊक असते! तसे त्यालाच विचारले. त्याने मोडशो (Lemon fish) आणि चोणक (Giant sea perch) ची शिफारीश केली. ही नावे तशी कधीतरी कानावरून गेली होती तरी ते मासे प्रत्यक्ष कसे लागतात, हे काही ठाऊक नव्हते. अखेर, मोडशो आणि चोणक फ्राय, कलामारी (Squid) चे कालवण आणि भात, अशी पहिली आणि शेवटची ऑर्डर दिली.
तोवर किंचित पावसला सुरुवात झाली होती. आभाळ भरून आले होते. शेजारूनच साळ नदी संथपणे वाहात होती आणि समोर थाळी आली!
मोडशो आणि चोणकचा एक-एक तुकडा चाखला आणि मला मत्स्याहारातले फार कळते, हा अहंकार साळ नदीत बुडून गेला! निव्वळ अप्रतिम चव. कलामारीचे कालवण आणि भात हे काही मी पहिल्यांदा खात नव्हतो, पण ही चवदेखिल वेगळी आणि छानच होती.
खरा धक्का बसला तो बिल आल्यावर! ठाण्या-मुंबईतील कुठल्याही ठिकाणी किमान तिप्पटतरी बिल आले असते!
भरघोस टिप आणि दिलखुलास दाद देऊन बाहेर आलो.
ओ गवि.... पुणे तिथे काय उणे
ओ गवि.... पुणे तिथे काय उणे ;)
पुण्यात फार पुर्वी टिळक-रस्त्याला म्हणजे नेमका पत्ता सांगायचा तर टिळक रोडचं जे गिरिजा आहे, यामाहा शोरूमच्या गल्लीत त्याच्या बाजुलाच म्हणजे मासेमारी कडे जाणाऱ्या वळणावर तिथे एक आजींचं भेळ्-पाणीपुरीचं दुकान होतं, ह्या आजी स्वत्:च्या हाताने पाणीपुरी द्यायच्या. तिथे बऱ्यापैकी गर्दी असायची. पेठेतल्या आजी असूनही 'आग्रह' वगैरे करायच्या, फार गप्पिष्ट होत्या. मी २००२-२००५ च्या दरम्यान अनेकदा तिथे पाणीपुरी खल्ली आहे. आजी तेव्हाच ७५ च्या घरात होत्या...त्यामुळे आता.....
(अर्थात तुमच्या 'स्त्री' च्या वर दर्शवलेल्या अपेक्षेत 'आजी' येत असतिल तरच वरंच मी लिहिलेलं सगळं मेक्स सेन्स ;) )
आहो पाणीपुऱीचं काय घेऊन बसलात
आहो पाणीपुऱीचं काय घेऊन बसलात - आता पुणंच पुर्वीसारखं राहिलं कुठे :D (Its a sign माझं वय झालं आता ;) ) बादवे पुण्यात तश्याही कितीतरी ओव्हररेटेड गोष्टी आहेत ;) चितळे, आप्पाची खिचडी, वैशाली+रुपाली+वाडेश्वर, सुजाता मस्तानी, बेडेकर मिसळ.................:)
त्या आजी अजून आहेत आणि आजूनही काम करतात हे ऐकून मात्र आश्चर्य + कौतुक वाटलं आणि त्या आजींचा उल्लेख यासाठी कारण गवी म्हणाले की पाणीपुऱी वाढणारी कधीच स्त्री का नसते.
षंकापवाद
कध्धी कध्धीसुद्धा पाणीपुरी बनवून भरुन देणारी व्यक्ती स्त्री का नसते?
........षंकानिरसन नाही, पण नियम सिद्ध करायला अपवाद हवा असेल तर - दादरला रानडे रोडवर संध्याकाळी दोन बायका पाणीपुरी बनवून भरून देताना दिसतील. (त्यातल्या एक बाई त्यांच्या त्याच ठेल्यावर दुपारी जेवणही देतात. थाळी, वा बांधून. स्वहस्ते.)
दादानु त्या फोटुतलं बर्गर
दादानु त्या फोटुतलं बर्गर नक्की कुणाचं जॉब्रेकर आहे? माणसाचं की हिप्पोचं (पाणघोडा)? =))