समाज

आत्माराम, राधाबाई आणि रखमाबाई सगुण.

गूगलच्या मदतीने मी दुसरेच काही शोधत असता Radhabai Atmaram Sagun/Sagoon, Book publisher अशा एका नावावर माझी दृष्टि पडली. ह्यापूर्वी १८६०च्या दशकात स्थापन झालेल्या निर्णयसागर ह्या प्रकाशनव्यवसायाचे मूळ संस्थापक जावजी दादाजी आणि तदनंतर त्यांचे चिरंजीव तुकाराम आणि पांडुरंग ह्यांनी हा व्यवसाय सांभाळला होता. पांडुरंग जावजी ह्यांचा १९४० साली मृत्यु झाल्यानंतर जिजाबाई, सत्यभामाबाई आणि लक्ष्मीबाई ह्या चौधरी कुटुंबातील तीन विधवांनी आपल्या परीने काही वर्षे त्या व्यवसायाची ढासळती इमारत सावरून धरली होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स‌त्तेत‌ली मिश्किली आणि विवेक

काल‌ माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस‌ क्ल‌बात‌. त्यांनी "एक असाधारण वाचक" साद‌र‌ केलं. हा "अॅल‌न‌ बेनेट‌" लिखित‌ ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उप‌स्थित राह‌णं हा नित‌ळ सुंद‌र‌, निव्व‌ळ अप्र‌तिम‌ अनुभ‌व होता. विविध‌ भाषांव‌र‌ची पुरंदरेंची हुकुम‌त‌ , व त्या- त्या भाषेत‌लं स‌हित्य‌ स‌म‌जून घेणं हे स‌ग‌ळं त‌र‌ त्यांच्याठायी आहेच‌ प‌ण एका भाषेत‌ला म‌ज्कूर‌ दुस‌ऱ्या भाषेत‌ नेम‌क्या आश‌यास‌ह‌ पोच‌व‌णं हे काम‌ लै अव‌घ‌ड‌. प‌ण ह्या त्यात‌ही वाक‌ब‌गार आहेत‌.
असो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे

'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्त्रीवाद -- फेमिनिझ‌म‌ एकाच‌ लिंगाचा, एकाच‌ लिंगासाठी का ?

ख‌फ‌व‌र‌ चालेल्या च‌र्चेत‌ले मुद्दे इथे टंक‌त आहे. ज‌र इथं टाक‌णं ठीक‌ न‌सेल‌; त‌र‌ धागा उड‌व‌लात‌ त‌री चालेल‌.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आमचा छापखाना - भाग २.

आमचा छापखाना - भाग २.

कंपोझिंगनंतरचे काम म्हणजे केलेल्या कामाची छपाई. येथे आम्हा पोरासोरांचे विशेष काही काम नसायचे. आमच्याकडे छपाईची तीन यन्त्रे होती - एक मोठे सिलिंडर मशीन, एक मोठे ट्रेडल आणि एक छोटे ट्रेडल. नवे मोठे ट्रेडल माझ्या डोळ्यासमोर ५०-५१ साली आले. सिलिंडरहि ५४-५५ साली आले. तत्पूर्वी एक जुने सिलिंडर होते. नंतरचे मुंबईच्या एका छापखान्याकडून सेकंड हॆंड घेतले होते. ह्या सिलिंडरवर एका वेळी पुस्तकाची आठ पाने छापली जात. म्हणजे पाठपोट १६-पानी फॉर्म ह्यावर निघत असे. भगवानरावच हे मशीन चालवत असत. ट्रेडल मशीन्स त्याहून लहान कामांना वापरली जात. हाताने कागद घालायचे ट्रेडल मशीन कसे काम करायचे ते ह्या विडीओमध्ये पहा.
सिलिंडर मशीनचे काम येथे पहा.

मला आठवणार्‍या अगदी जुन्या काळात म्हणजे ४६-४७ सालापर्यंत सातार्‍यात वीज पुरवठा अगदी मर्यादित असे. सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी नावाच्या खाजगी कंपनीची वीजनिर्मिति सातार्‍याच्या वायव्य बाजूस असलेल्या बोगद्यावरच्या टेकडीवर जनरेटर बसवून केली जाई. सातार्‍याच्या पश्चिमेस गावापासून १५०० फूट उंचीवर यवतेश्वरचे पठार आहे. ह्या पठारावर कासचा तलाव आहे आणि ह्या तलावाचे पाणी खापरी नळाने सातार्‍यात उतरवून पिण्याचे पाणी म्हणून नळाने त्याचे वाटप होई. ह्याच पाण्याचा वापर करून बोगद्यावरच्या टेकडीवर वीजनिर्मिति कधी एकेकाळी केली जाई हे वीजनिर्मितिकेंद्र तेथे असण्याचे मूळ कारण. पण मला आठवते तसे पाण्यावर वीज निर्माण करणे केव्हातरी पूर्वीच थांबले होते आणि नंतर वीज डीझेल जनरेटर वापरून होई आणि त्या विजेवर गावात मिणमिणते दिवे कसेबसे लागत असत. आमच्याकडे मशीन्स चालविण्यासाठी ऑइल एंजिन बसविले होते आणि त्याची शक्ति Shaft-pulley-belt मार्गाने मशीनपर्यंत पोहोचविली जाई. ’मराविमं’ची स्थापना होऊन पुरेशी वाढ होईपर्यंत असेच चालू होते. नंतर ऑइल इंजिनाची जागा इलेक्ट्रिक मोटरने घेतली. तीन मशिनांपैकी एखादे तरी चालू असे. बोटीवर असतांना इंजिनाची सूक्ष्म थरथर सर्व वेळ जाणवत राहाते तसा मशीनचा लयबद्ध आवाज सर्व घरभर पोहोचत असे पण आम्हाला त्याचा कधी त्रास झाला नाही.

आमची इथली करमणूक म्हणजे मशीनची लयबद्ध हालचाल पाहण्यात आम्ही गुंगून जात असू. चटक-फटक आवाज करत वेगाने फिरणारे मशीनचे पट्टे, वर आलेला कागद उचलून तो इकडून तिकडे नेऊन पोहोचविणारा सिलिंडरचा लाकडी फणा, रुळावरून फिरणार्‍या आगगाडीच्या चाकासारखी सिलिंडरच्या पाट्याखालची चाके, एकमेकांना उलटसुलट फिरविणारी ट्रे्डलची दातेरी चाके अशा गोष्टी बघत बसायला आम्हाला मोठी मजा येई. ह्याच दातेरी चाकांमध्ये माझ्या काकांनी त्यांच्या लहानपणी आपले बोट घातले होते. त्या अव्यापारेषु व्यापाराचा परिणाम म्हणजे त्यांचे तर्जनीचे शेवटचे पेर पार चिरडलेले आणि असे तर्जनीचे बोट त्यांनी जन्मभर बाळगले.

छपाईनंतरच्या प्रक्रियांमध्ये आणि बाइंडिंगच्या पूर्वतयारीमध्ये मात्र आम्ही शाळेपासून मोकळा वेळ असेल तशी यथाशक्ति मदत करत असू. ह्या गोष्टी म्हणजे कागदांना घड्या घालणे आणि जुंपणी, नंबरिंग, परफोरटिंग आणि स्टिचिंग. १६ पानांचा फॉर्म घेऊन त्याला उजवीकडून डावीकडे तीन घड्या घातल्या की पुस्तकाच्या फॉर्मची १ ते १६, १७ ते ३२ अशी पाने एकमेकासमोर येत. त्यासाठी पानांची छपाई तशी आधीच केलेली असे. जमिनीवर मांडा मारून बसायचे, कागद समोर घ्यायचे आणि घड्या करायच्या. मी आणि माझा धाकटा भाऊ, कधीकधी आजोबाहि आम्हाला जमेल तितके हे काम उरकायचो. (बहिणींना ह्या कामात, किंबहुना छापखान्याच्या कसल्याहि कामात, exemption होते.) अशा शंभराच्या कट्ट्या करून एकेक फॉर्म हातावेगळा करायचा. सगळे फॉर्म घड्या घालून झाले की ते सभोवती आपापल्या गठ्ठ्यांमध्ये अर्धवर्तुळात मांडायचे आणि नंबरवारीने एकेक पुढे ओढून घेऊन पूर्ण पुस्तक जुळवायचे. एखाद्या व्यवसायाच्या बिलबुकासारखे काम असले तर तीनचार रंगांचे कागद जुंपणीत असायचे. बिल फाडता यावे यासाठी पर्फोरेटिंग मशीनने त्यांना भोके पाडायची आणि त्यांच्यावर हातात धरायच्या नंबरिंग मशीनने नंबर घालायचे. येथवरची काहीशी कंटाळवाणी पण सहज करता येण्याजोगी कामे करून आम्हीहि व्यवसायाला हातभार लावत असू. परफोरेटिंग मशीन असे दिसे:

आणि नंबरिंग मशीन असे:

इतके झाले बाइंडिंगचे काम सुरू होई. त्यासाठी पुस्तक लहान असेल तर सरळ स्टिचिंग मशीनकडे जायचे. ह्या मशीनमध्ये लोखंडाच्या वायरस्पूलमधून लोखंडी तुकडे पुस्तकातून घालून पुस्तकाची पाने स्टेपल केली जायची. अशा मशीनचे चित्र येथे पहा.

अधिक मोठे पुस्तक आमच्या बाइंडरकडे बाइंडिंगला दिले जाई, पुस्तकांचा एक गठ्ठा हॆंडप्रेसमध्ये दाबून धरून त्याच्या कडेला करवतीने कापून फॉर्ममध्ये दोरा ओवण्यासाठी भोके पाडली जात. नंतर एकेक पुस्तक समोर घेऊन बाइंडर त्यामध्ये दोरा ओवून बाइंडिंग करीत असे. हॆंडप्रेसचे चित्र येथे पहा.

स्टिचिंग/बाइंडिंग झाले की पुस्तकाची पाने सुटी करण्याचे काम होई. पुस्तकांचा एकेक गठ्ठा गिलोटिन कटिंग मशीनमध्ये दाबून धरून ब्लेड पाळीपाळीने त्याच्या तिन्ही कडांतून नेले की पाने सुटी होत. ह्यानंतर अखेरचे काम म्हणजे पुस्तकाचे कव्हर त्याला वरून चिकटवणे की झाले पुस्तक तयार. गिलोटिन कटिंग मशीनचे चित्र येथे पहा.

पुस्तकाचे कवर चिकटवण्यावरून आठवले. ह्यासाठी खास चिकट सरस आमचे बाइंडर स्टोववर तयार करीत असत आणि त्याचे साहित्य नैसर्गिक हाडामधून मिळवलेले असे. त्यामुळे ते स्टोववर पातळ करतांना त्याचा स्मशानात असतो तसा वास घरभर पोहोचत असे! पण त्याला काही इलाज नव्हता.

येथे ब्रॅंटफर्ड नावाच्या गावी उत्साही लोक एक Heritage Village चालवतात. १८५०च्या पुढेमागे कॅनडा कसा दिसत असे ते दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे एक प्रिंटरी - म्हणजे आपल्याकडचा छापखाना - आहे. तो पाहायला मी गेलो आणि मला सातार्‍यातील आमच्या छापखान्यात गेल्यासारखेच वाटले. त्याच केसेस आणि तीच मशिनरी. तेथील स्वयंसेवकाशी छापखाना ह्या विषयावर माझ्या खूप गप्पा झाल्या. आता भारतातील आमचा छापखाना पाहिलेले कोणी नातेवाईक कॅनडाभेटीवर आले की नायागरा धबधब्यासारखेच हे एक अवश्य भेट देण्याचे स्थळ झाले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

टेस्ला वि. कार डीलर्स: एक डिस्रप्शन व त्याला होत असलेला विरोध

टेस्ला च्या कार विकण्यासंबंधी एक लेख नुकताच वाचला. मी पूर्वी टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") मधे काही वर्षे काम केलेले असल्याने एकूणच ऑटो इण्डस्ट्री तील बातम्यांबद्दल अजूनही कायम कुतूहल असते. तेव्हा मी टेल्को च्या सॉफ्टवेअर डिव्हिजन मधे सप्लाय चेन एरिया मधे - वाहने बनवायला लागणारा माल सप्लायर्स कडून कंपनीत येण्याबद्दलची प्रक्रिया- काम करत होतो. पुण्यातील प्लॅण्ट्स मधे उत्पादनावर जास्त फोकस होता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २

१०० जोर्दार‌ लेख‌क‌.

ऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌?
हे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.
(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी!)
राकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.
ग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ "ही बात‌मी स‌म‌ज‌ली का" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.
मिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.

माहितीमधल्या टर्म्स: 

आम‌चा छाप‌खाना - भाग‌ १

आम‌चे घ‌र‌. उज‌व्या बाजूस‌ राह‌ते घ‌र‌, डाव्या बाजूस‌ छाप‌खाना

माझे पणजोबा गणेश नारायण कोल्हटकर ह्यांनी १८६७ च्या सुमारास सातारा गावात येऊन सातार्‍याच्या अगदी उत्तर सीमेवर असलेला एक गोसाव्यांचा मठ विकत घेतला आणि तेथे आपले राहते घर आणि निम्म्या भागात छापखान्याचा व्यवसाय सुरू केला. ह्या छापखान्यात ते प्रामुख्याने ’महाराष्ट्रमित्र’ नावाचे साप्ताहिक काढत असत. अन्यहि किरकोळ कामे घेत असावेत पण त्याचे काही तपशील शिल्लक नाहीत. ’महाराष्ट्रमित्र’चे अतिजीर्ण अवस्थेतील जुने काही अंक मात्र आमच्या घरात शिल्लक उरले होते जे मी लहानपणी पाहिले होते.

सुमारे ३० वर्षे हा व्यवसाय केल्यानंतर पणजोबा १८९७मध्ये अचानक एका दिवसाच्या आजाराने वारले. ते वर्ष प्लेगाचे होते पण पणजोबा मात्र रक्तदाब आणि अचानक हृदयविकार ह्याने गेले असावेत. त्याच्या शेवटच्या दिवसाचे जे वर्णन माझ्यापर्यंत पोहोचले आहे त्यावरून हा तर्क मी करतो.

माझे आजोबा हरि गणेश आणि त्यांचे धाकटे बंधु चिंतामणि गणेश हे तेव्हा शाळेत जायच्या वयात होते. कालान्तराने आजोबांनी मॅट्रिकची परीक्षा पास करून उपजीविकेसाठी मुंबईत एका ब्रिटिश बांधकाम कंपनीमध्ये नोकरी मिळवली. लोणाव‌ळ्याज‌व‌ळ‌चे वलवण धरण बांधण्याचे कन्त्राट त्या कंपनीला मिळाले होते आणि त्या निमित्ताने आजोबांचा मुक्काम आलटून पालटून लोणावळा आणि मुंबई असा असे. माझे वडील नारायण हरि ह्यांचा जन्म १९१४ साली लोणावळ्याला झाला. एव्हांना चिंतामणि गणेश घरच्या विरोधाला न जुमानता त्यांच्या आवडीच्या नाट्यव्यवसायात शिरले होते आणि सुस्थिर झाले होते.

वलवणचे काम संपले आणि न‌वे काम‌ न‌ मिळाल्याने ब्रिटिश कंपनीने हिंदुस्थानातील आपला गाशा गुंडाळला. मुंबईत नवी नोकरी शोधण्याऐवजी माझ्या आजोबांनी फोर्ट भागात ’मून प्रेस’ नावाचा छापखाना सुरू केला. (ह्याच्याशी संबंधित काही काम मुंबईतील सॉलिसिटर बाळ गंगाधर खेर, जे न‌ंत‌र‌ मुंबई प्रान्ताचे पहिले मुख्यमन्त्री झाले, ह्यांनी करून दिले होते अशी आठवण माझ्या कानावर आली आहे.) ३-४ वर्षे छापखाना मुंबईतच चालविल्यावर आजोबांना पोटदुखीचा विकार जडला, जो त्यांना आयुष्यभर मागे लागला होता आणि अखेर‌प‌र्य‌ंत‌ त्याचे निदान‌ होऊ श‌क‌ले नाही. (त्यांचा हा निदान न झालेला विकार Helicobacter Pylori असावा असे माझ्या Microbiologist सौभाग्यवती म्हणतात. १९८२ साली हा रोग ओळखण्यात आला आणि आता श्वासाची एक छोटी टेस्ट करून त्याचे निदान होऊ शकते आणि एक आठवड्याच्या उपायांनी तो बरा होऊ शकतो. आजोबांच्या काळात हे माहीतच नसल्याने सर्व जन्म ते पोटदुखी, गॅसेस् इत्यादींशी झगडतच राहिले.) नंतरच्या काळात माझे वडील त्यांना व्यवसायात हातभार लावू लागले आणि नंतर पुढे जवळजवळ सर्व व्यवहार वडीलच बघत असत. आजोबांचा मृत्यु १९६२ साली झाल्यानंतर वडिलांनी तोच व्यवसाय त्यांचा स्वत:चा मृत्यु १९९५ साली होईपर्यंत चाल‌व‌ला. मी १९५८ साली शिक्षणासाठी सातारा सोडून पुण्यात आलो. जन्मापासून आयुष्याची पहिली १५-१६ वर्षे आमचा उत्तम चाललेला छापखाना घराच्या अर्ध्या भागात माझ्या डोळ्यासमोरच चालू होता. त्या आठवणींवर पुढील लेख आधारलेला आहे.

क‌ंपॉझिटर‌ आणि क‌ंपोझिंग‌
छापखान्याचे माझ्या डोळ्यासमोरचे चित्र असे आहे. सुरुवातील कंपोझिंग. छापखान्याच्या एका लांब बाजूस कंपोझिंगचे काम चाले आणि त्याच्या वेगवेगळ्या वळणांच्या आणि फॉंटस् च्या केसेस चळतींमध्ये लाकडी घोड्यावर ठेवलेल्या असत. हव्या त्या केसेस काढून कंपॉझिटर आपल्या पुढे घेत असे आणि हस्तलिखित किंवा क्वचित् टाइप केलेला मजकूर डोळ्यासमोर ठेवून केसेसमधील एकेक टाइप उचलून तो हातात तिरप्या धरलेल्या ’स्टिक’ मध्ये ठेवून कंपोझिंग करत असे. दोन ओळींच्या मध्ये एक ’लेड’ (लांब पट्टी) ठेवली जाई. कोर्‍या जागांसाठी नाना रुंदीच्या स्पेसेस् - पाव एम, अर्धा एम, एक एम, आणि ह्याहूनहि जास्ती लांबीची ’कोटेशन्स’ भरली जात. (ही कोटेशन्स आम्हा मुलांसाठी मेकॅनोचे कामहि सुट्टीच्या दिवशी करत असत. रविवारी छापखान्यात जाऊन कोटेशन्सच्या खोक्यातील कोटेशन्स काढून त्यांनी घरे, बंगले, मनोरे, बनविण्याच्या उद्योगात आम्ही तासन् तास घालविलेले आहेत.) केस भरली की तेवढा मजकूर अलगद उचलून गॅलीमध्ये ठेवला जात असे. गॅलीमध्ये एक पानभर मजकूर साठला की तो मजकूर एका लोखंडी फ्रेममध्ये ’मेकअप’ केला जाई, म्हणजे तयार झालेला मजकूर हलणार नाही अशा पद्धतीने ’लॉक’ केला जाई. ह्यासाठी एकमेकांविरुद्ध हलणार्‍या लांब त्रिकोणी आकाराच्या पट्ट्या वापरल्या जात. त्यांना एका बाजूस दाते असत आणि त्या दात्यांमध्ये खास बनविलेला स्क्रूड्रायवर घालून तो फिरविला की पट्ट्यांमधील अंतर वाढून फ्रेममध्ये मजकूर घट्ट् पकडला जाई. टाइप आणि हे सर्व अन्य सामान पुण्यामुंबईहून टाइप-फाउंड्रीमधून ऑर्डर देऊन मागविले जात असे. प्रायमस स्टोववर धातु वितळवून लेडा पाडून देणारा एक माणूसहि मधूनमधून आम्हाला भेट देत असे आणि आमच्या अंगणात बसून लेडा पाडून देत असे.

मजकुरात चित्रे, आकृत्या वा काही डिझाइन असल्यास पुण्याहून ब्लॉकमेकरकडून ब्लॉक करवून आणला जाई आणि तो योग्य जागी फ्रेममध्ये बसवला जाई. ह्याखेरीज गणपति, रामसीता, शंकर इत्यादि देवादिकांच्या चित्रांचे ब्लॉक्स, फुलाफळांच्या वित्रांचे ब्लॉक्स, वेगवेगळ्या नक्ष्यांचे ब्लॉक्स आमच्याकडे तयारहि होते आणि लग्नपत्रिकांसारख्या कामामध्ये त्यांचा उपयोग होई.

प‌ण‌जोबांचे म‌शीन‌
पुरेसा कंपोझ ’मेक अप’ झाला म्हणजे त्याचे पहिले प्रूफ काढले जाई. पणजोबांचे जुने गुटेनबर्ग टाइपचे मशीन आमच्याकडे होते. त्यावर प्रूफ काढले जाई. ह्यासाठी प्रथम फ्रेम मशीनवर ठेवायची, तिच्यावरून काळ्या रंगाचा रूळ हलकेच फिरवायचा, त्यावर कोरा कागद किंचित ओलसर करून ठेवायचा, बाजूचे चाक फिरवून फ्रेम पाट्याखाली आणायची आणि लिव्हर ओढून पाट्याचा दाब कागदावर टाकायचा, फ्रेम बाहेर आणायची आणि कागद उचलून घ्यायचा की प्रूफ तयार. पणजोबा ह्या संपूर्ण हाताच्या प्रोसेसने तासाला श‌ंभ‌र‍स‌वाशे प्रती काढत असणार. त्यांच्याकडे एवढे एकच छपाईचे मशीन होते.

त्यानंतर पहिले प्रूफ-करेक्शन. हे काम वडील अथवा आजोबा करीत असत. बराच रनिंग मजकूर असला तर आम्ही पोरे त्यांच्या समोर बसून एकेक ओळ वाचून दाखवत असू आणि प्रूफ-करेक्शन ते करत असत. लहानसहान बिले, हॅंडबिले, लग्नपत्रिका असले प्रूफरीडिंग मीहि करीत असे. प्रूफरीडिंगची सांकेतिक चिह्ने त्यासाठी मी शिकलो होतो.

दुरुस्त केलेले प्रूफ समोर धरून कंपॉझिटर चुकीचे टाइप चिमट्याने बाहेर काढून तेथे नवे टाइप बसवत असे. त्यावरून दुसरे प्रूफ तयार होई. तेहि दुरुस्त करून झाले म्हणजे शेवटचे फायनल प्रूफ गिर्‍हाइकाकडे जाई. त्याने ते अखेरचे तपासून सही करून पाठविले की त्या दुरुस्त्या करून मजकूर छपाईयन्त्राकडे जायला मोकळा होई.

गिर्‍हाइकाकडे प्रूफ पोहोचविणे हे काम मी सातारा सोडण्याच्या पूर्वीच्या शेवटच्या ३-४ वर्षात बहुधा माझ्याकडे असे. अशी प्रुफे पोहचविण्याच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. सातार्‍याच्या छत्रपति शिवाजी कॉलेजचे काही काम आमच्याकडे केले जात होते तेव्हा प्रुफे घेऊन मी सायकलने कॉलेजचे प्रिन्सिपॉल बॅ. पी.जी.पाटील ह्यांच्याकडे गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि हवेत बराच उकाडा होता. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील हे बाहेरच्या व्हरांड्यामध्ये घोंगडी घालून पडले होते असे आठवते. प्रुफे घेऊन मी सायकलने जवळच्या कोरेगाव, रहिमतपूर अशा गावीहि जात असे. फर्ग्युसन कॉलेजातील एक निवृत्त प्राध्यापक डॉ जी.वी.परांजपे ह्यांनी रहिमतपूरमध्ये रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळ नावाची शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. (आता ती संस्था चांगलीच नावारूपाला आली असून अनेक शाळा/कॉलेजे चालवते.) त्या संस्थेचे बरेचसे काम आमच्याकडे येत असे. त्यांची प्रुफे घेऊन मी चारपाच वेळा रहिमतपूरला गेलो होतो. (पुलंच्या ’पूर्वरंग’मधील चिनी भाषेचे तज्ज्ञ वसंतराव परांजपे हे जीवींचे चिरंजीव हे मला माहीत आहे.) अशाच प्रूफ न्यायच्या एका वेळी मी मोठीच मजा केली त्याची आठवण अजून माझ्या मनात ताजी आहे.

त्याचे असे झाले: शिवाजी कॉलेज सातार्‍यात १९५६ च्या सुमारास सुरू झाले तेव्हा रयत शिक्षण संस्थेकडे पुरेसे उच्चशिक्षित मनुष्यबळ नसावे म्हणून की काय, कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल डॉ. ए.वी.मॅथ्यू नावाचे केरळी ख्रिश्चन होते. हे फार धार्मिक असावेत कारण त्यांच्या सातारा मुक्कामात त्यांचे स्वत:चेच Jesus Christ - Leader and Lord नावाचे एक पुस्तक त्यांनी आमच्याकडे छापण्यास दिले होते आणि त्या संदर्भात ते आमच्या घरीहि अनेकदा येत असत. वडील-आजोबा आणि त्यांचे संभाषण इंग्लिशमध्ये होई आणि आम्ही तेथे श्रवणभक्ति करीत असू. आपला नातू फार हुशार आहे अशी आजोबांची खात्री असल्याने माझ्याशी मॅथ्यूसाहेबांनी इंग्रजीत बोलत जावे असे आजोबांनी त्यांना सुचविले. तदनंतर एका पावसाळ्याच्या दिवशी प्रुफे घेऊन त्यांच्या हजेरीमाळापलीकडच्या जुन्या प्रकारच्या बंगल्यात जाण्याची माझ्यावर वेळ आली. बंगल्याला मोठे आवार होते आणि त्यापलीकडे व्हरांड्यामध्ये मॅथ्यूसाहेब खुर्चीवर बसलेले होते. मला लांबूनच पाहून त्यांनी विचारले, 'How are you?' मला हा प्रश्न ऐकू आला, ’Who are you?' मी लांबूनच आजोबांनी शिक‌विलेल्या त‌र्ख‌ड‌क‌री इंग्र‌जीम‌ध्ये दणकून उत्तर दिले, ’I am a boy'. ते ऐकून मॅथ्यूसाहेबांची बोलतीच बंद झाली. आपलेच इंग्रजी खराब होईल अशी साधार भीति त्यांना वाटली असावी! नंतर तेथेच व्हरांड्यात बसून सौ.मॅथ्यूंनी दिलेला फराळ खाऊन आणि चहा पिऊन मी घरी परतलो.

आमच्या घराजवळील आयुर्वेदीय अर्कशाळेचे सर्व काम, सातार्‍यातीलच युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे काही काम, आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूलचे काही काम अशी आमची नेहमीची गिर्‍हाइके होतीच पण सर्व प्रेसवाल्यांवर गंगा वळत असे इलेक्शनच्या वेळी. इलेक्शनसाठी प्रत्येक गावाच्या मतदारांच्या याद्या छापायचे टेंडर कलेक्टर ऑफिसकडून निघत असे. प्रत्येक गावासाठी print order १००-१२५ पर्यंतचीच असावी पण अशा शेकडो गावांचे मिळून कंपोझिंगचे प्रचंड काम असे. असे काम आले की महिना-दोन महिने रात्रपाळीने प्रेस चालत असे. हे कंपोझिंगचे प्रचंड खेचकाम आमच्या तीनचार कंपॉझिटरांच्या ताकदीबाहेरचे असे. कोल्हापूरचे काही लोक हे काम आमच्याकडून कन्त्राटावर घेत. त्यांची चारपाच जणांची टीम येई आणि १५-२० दिवस रात्रंदिवस कंपोझिंगचे काम करून त्याचा ते फडशा पाडत. शेवटच्या दिवशी त्यांना त्यांचे पैसे चुकते करायचे आणि त्यांना आमच्या घरीच एक जेवण द्यायचे असा रिवाज होता.

कंपोझिटर्सचे काम कंटाळवाणे होतेच पण त्याहूनहि अधिक कंटाळवाणे काम म्हणजे छपाई पूर्ण झाली की तोच मजकूर पुन: सोडवून सर्व टाइप आपापल्या जागी पुन: टाकणे आणि कंपोझिटर्सनाच ते करायला लागायचे.

आमच्याकडे जे तीनचार कंपोझिटर्स होते त्यामध्ये एक, भगवानराव जोशी, आमच्याकडेच हे काम शिकले आणि नंतर चाळीसएक वर्षे आमच्याकडेच कामाला राहिले. आम्हाला ते घरच्यासारखेच वाटत. दुसरे देशमुखहि २५-३० वर्षे होते.

१९४८च्या ज‌ळिताम‌ध्ये आम‌चे घ‌र‌ आणि छाप‌खाना जाळ‌ण्यासाठी काही गुंड‌ आम‌च्याव‌र‌ चालून‌ आले होते. त्या दिव‌साचे व‌र्ण‌न‌ मी अन्य‌त्र‌ 'उप‌क्र‌म‌'व‌र‌ लिहिले होते. त्यावेळी सुदैवाने गुंड‌ ल‌व‌क‌र‌च‌ प‌ळून‌ गेल्यामुळे हानि म‌र्यादित‌ झाली प‌ण‌ त‌रीहि त्यांनी ज‌व‌ळ‌ज‌व‌ळ‌ स‌र्व‌ टाइप‌ ज‌मिनीव‌र‌ ओतून‌ टाक‌ला आणि असे नुक‌सान‌ केले. ही पै सोड‌व‌त‌ ब‌स‌णे श‌क्य‌ न‌व्ह‌ते म्ह‌णून‌ स‌र्व‌ मेट‌ल‌ गोळा क‌रून‌ पुण्याला फाउंड्रीक‌डे पाठ‌वावे लाग‌ले आणि न‌वा टाइप‌ भ‌रावा लाग‌ला. हे होईप‌र्य‌ंत‌ एखादा म‌हिना गेला आणि त्या काळात‌ छाप‌खाना ब‌ंद‌च‌ अस‌ल्यात‌च‌ ज‌मा होता.

चला. कंपोझिंगचा हा भाग बराच लांबला. आता येथे जनगणमन म्हणून हा भाग संपवितो. पुढच्या भागात छपाई, बाइंडिंग‌ अशा कामांकडे वळेन.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

NRI PIO आणि इतरांनो , एक शंकाय .....

भारतातल्या किंवा महाराष्ट्रिय घरांबद्दल थोडाबहुत तरी अंदाज करता येतो. पण बाहेरच्या देशात राहणार्‍या आणि इथली मुळं असलेल्या मंडळींचा नाष्टा काय असतो ? म्हंजे.... जे काही महिन्यांपुरतेच ऑनसाइट गेलेले आहेत, त्यांनी सोबत थोडाबहुत कच्चा शिधा नेलेला पाहण्यात आहे. ( म्हंजे जाड पोहे, पातळ पोहे , चिवडा वगैरे) पण जे त्याहून अधिक काळासाठी गेलेत, किंवा ऑल्मोस्ट स्थायिकच झालेत, त्यांची आहारपद्धती काय आहे ? तुम्ही त्या देशात अगदि नवीन असतानाच्या काळात आहार काय असे ? विद्यार्थी म्हणून गेले असतील तर टिपिकल हॉस्टेल लाइफ असावी , असा अंदाज, तिथे उपलब्ध पर्याय मुदलातच कमी.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - समाज