मानसिक

मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - १

मानसोपचाराबद्दल बरेच प्रमाणात गैरसमज आहेत असं सर्वसामान्य चित्र दिसतं. मानसोपचार कधी, का घ्यावेत, त्यातून अपेक्षा कसली ठेवावी अशा प्रकारचा संवाद मानसोपचार-समुपदेशक सुलभा सुब्रह्मणम यांच्याशी केला. हा लेख म्हणजे त्याचं संकलन आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

एकच कप

शंभर वर्षांपूर्वी गडकऱ्यांच्या 'एकच प्याला'ने महाराष्ट्रात खळबळ माजवली होती. आता वेळ आली आहे एका आगळ्याच 'कपा'तल्या वादळाची! हा काही चहाचा कप नव्हे. मला सांगायचं आहे 'मेन्स्ट्रुअल कप' म्हणजे ऋतुस्रावाच्या कपाबद्दल. आपल्याकडे मुळातच हा विषय चारचौघातच काय - अगदी चार बायकांतही काढला जात नाही. म्हणूनच गेल्या सहा खेपांच्या वेळी यशस्वीरित्या कप वापरल्यावर मला हा लेख लिहायचे बळ आलं. ह्या विषयाबद्द्ल मी आता 'व्हीस्पर' न करता उघडपणे सांगायला लागले आहे. माझ्या एका मैत्रिणीने दोन वर्षापूर्वी मला "मेन्स्ट्रुअल कप" बद्दल सांगितलं होतं. ही मैत्रीण पर्यावरणासाठी काहीही करायला तयार असते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आपण स्वत:ला फसवणे टाळू शकतो का?

आत्मवंचना ही एक सर्व सामान्य, (सर्वमान्य?) व पटदिशी कळणारी गोष्ट आहे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी. परंतु तुम्ही स्वत:लाच कसे काय फसवू शकता असे विचारल्यास इतरांना फसविण्यापेक्षा ही गोष्ट फार सोपी आहे हे लक्षात येईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फसवा फसवी

आपल्यासारख्यांचा जीवनाचा प्रवास हा नेहमीच भरपूर खाच – खळगे - खड्डे असलेल्या रस्त्यावरून होत असतो. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे त्यातील प्रत्येक टप्प्याला शेवट असतो व आपण हुश्श्श.... म्हणून तो संपवतो. टप्पा पार केल्याचा (क्षणिक) आनंद घेत असतो. त्यामुळे त्या टप्प्यापुरता केलेल्या प्रवासाचे ओझे वाटत नाही. आपले शिक्षण, आपल्याला मिळालेली नोकरी वा पत्करलेला व्यवसाय, घर-दार, प्रेम – लग्न यातील रुसवे – फुगवे, कधीतरी संपणार व सारे कसे शांत शांत होईल या आशेवर आपण जगत असतो व एकंदर जीवन आपल्याला निराश करत नाही असा सामान्यपणे सर्वांचा अनुभव असतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया (उत्तरार्ध)

पूर्वार्ध

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया असलेली ही मानसिकता कशा कशामुळे घडत असावी याचा थोडासा जास्त खोलात जाऊन विचार करू लागल्यास आणखी काही गोष्टी लक्षात येतील.

आपण आपल्या श्रद्धा-विचारांशी पूरक असलेल्या गोष्टीच फक्त लक्षात ठेवतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया (पूर्वार्ध)

माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हतोटी आहे. त्यानी केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ

आज काय लिहू कळत नाही. बराच वेळ ऑटीझम अवेअरनेस डे व मंथबाबत काहीतरी लिहीलेच पाहीजे ह्या विचाराने बसले आहे. पण काहीच सुचत नाही. मुलाचा स्प्रिंग ब्रेक चालू असल्याने मागे त्याचा दंगा, कर्कश आवाज काढणे इत्यादी चालू असल्याने ह्या परिस्थितीत काही विचार करून लिहीणे जरा अवघडच.! Smile

गेल्या फेब्रुवारीपासून मी ऑटीझमवर लिहीत आहे. अजुनही पुष्कळ लिहीण्यासारखे आहे. मात्र सध्या डोक्यात सैतानाने घर करू नये म्हणून बिझी राहण्याच्या दृष्टीने हजारो व्याप मागे लावून घेतले आहेत. स्वस्थ बसून वाचन/लिखाण होणे सध्या दुर्मिळ बाब बनत चालली आहे. Anyhoo, I am loving' it ! Smile

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स

मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

Bio-Medical उपचारपद्धती व Autism

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

माझ्या नवीन वर्षाच्या संकल्पानुसार मी माझा आउटलुक बदलण्यावर गेला महिनाभर काम करत आहे. मैत्रिणींशी/काही जवळच्या नातेवाईकांशी खुल्या मनाने चर्चा केली. आता मला पुन्हा नव्याने पॉझिटीव्ह दृष्टीकोनाने कामाला लागायची प्रेरणा मिळाली.  :)

एक मुख्य संवादाचे, प्रेरणेचे साधन आहे ते हे लेख लिहीणे. फार स्ट्रेंजली मला ही लेखमालिका लिहून बरं वाटतं! कदाचित माझ्याच डोक्यातील विचारांचा नीट निचरा होत असावा? किंवा सगळे विचार डोक्यात गरगर फिरण्याऐवजी कागदावर ऑर्गनाईझ्ड पद्धतीने उमटले की बरं वाटत असावे. त्यामुळेच या वर्षीचा पहिला लेख लिहीत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

@AutismMarathi followed by @DrTempleGrandin! :)

(लेखमालिकेतील उरलेले लेख पोस्ट करायचे आहेत, मात्र आजची ही घटना मला शेअर करायलाच हवी, त्यामुळे लेखमालिकेला ब्रेक जरा.. ! Lol

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - मानसिक