मृत्यू – भाग ४

भाग ४ – मृत्यूची घटना

Death is not the greatest tragedy. Greatest loss is what dies inside us while we live – feelings, response, and awareness
- Unknown

विषयाची मांडणी
जगण्याची इच्छा संपली
मृत्यूजवळचे अनुभव
मृत्यूसमयी आपण एकाकी असतो
शेवटची स्पष्ट वाचा
प्रसंग

प्रसंगानंतर
अवयवदान / देहदान
कवींच्या दृष्टीतून
– – –

जगण्याची इच्छा संपली
डेथ झोनमध्ये गेलेल्या व्यक्तीची मृत्यूची पहिली चाहूल जगण्याची इच्छा संपणे ही आहे. इंग्रजीत बोलीभाषेत याला "give-up-itis" म्हणतात. ही मानसिक अवस्था आहे. ही स्थिती डिप्रेशनसारखी नाही. आहे त्या स्थितीतून सुटण्याचा मृत्यू हाच एक मार्ग आहे असे त्या व्यक्तीस वाटू लागते. आजूबाजूच्या जगापासून व्यक्ती दूर जाऊ लागते. जवळच्या व्यक्तींबरोबर संवाद संपतो . मानेने हो नाही एवढीच प्रतिक्रिया उरते . अशी मानसिक स्थिती निरनिराळे शारीरिक बदल सुरुवात करते. वेदनेची भावना जाते. या स्थितीतून व्यक्ती मृत्यूकडे जाते.

मृत्यूजवळचे अनुभव
भोज्ज्याला हात लावून जे थोडे लोक आश्चर्यकारकरित्या परत आले अशा व्यक्ती त्यांचे अनुभव सांगतात. ते अनुभव पृथ्वीवरील हालचालीच्या नियमांच्या पलीकडे जातात. आपण आपले शरीर सोडत असल्याचा अनुभव बहुतेक वर्णन करतात. एका बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसणे हा अनुभव बरेच जण सांगतात. प्रत्येक मरणारी व्यक्ती मृत्यूपूर्वी असे अनुभव घेते का ? या अनुभवांची सत्यता पडताळणे अशक्यच आहे.

मनोविकार तज्ज्ञ याचा अर्थ असा लावतात : आपण शरीर सोडत असल्याचा अनुभव आयुष्यभर आपण आत्मा आणि शरीर निराळे असते असे ऐकत आलो असतो त्याचा परिणाम असतो. बोगद्याबाहेर पडून प्रकाश दिसणे हा अनुभव आपल्याला जन्मावेळच्या अनुभवाची आठवण करून देतो. आईच्या पोटातून आपण एकदम उजेडात येतो.

मृत्यूसमयी आपण एकाकी असतो
वयाच्या ७५ वर्षांनंतर आपली शारीरिक क्षमता भराभर कमी होत जाते. वाहन चालविणे अवघड होते. त्याच बरोबर आपले सामाजिक बंध कमी होत जातात. आपल्या पेक्षा ज्येष्ठ व्यक्ती आणि आपले मित्र एकेक करून जग सोडून जातात. वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली तर सामाजिक बंध अजून तुटतात. इथूनच एकाकीपणा चालू होतो. इंग्रजीत याला सोशल डेथ म्हणतात. व्यक्तीने डेथ झोनमध्ये प्रवेश केल्यावर हा एकाकीपणा वाढतच जातो. नातेवाईक भेटायला आले तरी काय बोलायचे ते समजत नाही. या नंतरचा रस्ता पूर्णपणे एकट्याने चालायचा असतो . डॉक्टर बापट अतिदक्षता विभागातील एकाकीपणाचे वर्णन करतात –

प्रत्येक जण आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतो. माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूच्या प्रसंगाला मी सामोरे गेलो. कारण मृत्यूचे सत्य मी जाणत होतो. जर आपण हे सत्य मान्य केले तर आपले जिवलग लोक शांतीने देह सोडून जावेत असे आपल्याला वाटते.

इस्पितळात कृत्रिम श्वासोच्छ्‌वासाचे यंत्र लावणे ही एक चाल झाली आहे. यामध्ये अचाट खर्च तर होतोच आणि आजार बरा होत नाही. एकदा का श्वासोच्छ्‌वासाचे यंत्र लावले की प्रश्न उत्पन्न होतो की मशीन केव्हा बंद करायचे. अति दक्षता विभाग ही मरण्यासाठी भयंकर जागा आहे. जे डॉक्टर्स आणि परिचारिका अतिदक्षता विभागात काम करतात ते स्वत:साठी घरी मरण्याची इच्छा ठेवतात. इस्पितळात जेव्हा रोग्याचे मरण दिसू लागते तेव्हा रोग्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येते. अति दक्षता विभागाचे काम मृत्यू टाळणे हे असते. या विभागात इलाजांचा मारा केला जातो. कृश शरीरांत निरनिराळ्या नळ्या खुपसल्या जातात. शरीराचा एक एक अवयव जसा काम करेनासा होतो तसे एक एक मशीन शरीराचा ताबा घेऊ लागते. खरे पाहता नैसर्गिक मृत्यू आधीच आला असता. पण कृत्रिम रितीने शरीर जिवंत ठेवले जाते. जेव्हा नातलगांना आर्थिक ताण वाटू लागतो तेव्हा मशीन बंद करण्याचा विनंत्या चालू होतात.

Death in ICU is lonely, Quoted from the book KEM, ward no 5, Dr Bapat


Deathbed

शेवटची स्पष्ट वाचा
अशा घटनेला टर्मिनल लुसिडिटी (Terminal Lucidity)असे म्हटले जाते. मृत्यूच्या काही वेळ आधी व्यक्ती एकदम शुद्धीवर आल्याप्रमाणे इकडे तिकडे नजर टाकते, काही उद्गार काढते. आणि थोड्याच वेळात परत ग्लानीत जाते. अशी घटना मृत्यूपूर्वी एक दोन दिवसात घडते. याचे कारण समजलेले नाही. इंग्लंड मधील हॉस्पिसमध्ये काम करणाऱ्या ७०% परिचारिका असा प्रसंग पाहिल्याचे सांगतात. मराठीत आपण याला विझण्यापूर्वी ज्योत मोठी होते असे म्हणतो.

प्रसंग

एखाद्या व्याधीमुळे ग्रस्त झालेल्या व्यक्तीचा मृत्यू त्या व्याधी मुळेच होईल असे सांगता येत नाही. पार्किन्सनग्रस्त व्यक्तीचा लिव्हरच्या आजाराने किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होऊ शकतो. कारण आजारीपणात शरीरात निरनिराळे बिघाड होत असतात. हिंसात्मक कारण सोडल्यास कोणतीही व्यक्ती आकस्मिकपणे मृत्यू पावत नाही.

मृत्यू जवळ आल्याची काय लक्षणे असतात?

अतिशय थकवा येणे , कायम झोपावेसे वाटणे, श्वास घ्यायला त्रास होणे , उन्मादात बरळणे, घशात द्रव साचणे ज्यामुळे श्वास आत बाहेर करताना आवाज येणे, स्नायू लुळे पडणे, भूक कमी होणे, अन्न घशाखाली न उतरणे, लघवी न होणे, रक्तदाब कमी होणे, ऑक्सिजन सॅचुरेशन कमी होणे (जे कोव्हिडमध्ये वारंवार चेक केले जायचे), शरीराचा रंग बदलणे.

वरील बारा लक्षणांपैकी पैकी सहा सात लक्षणे दिसू लागली की समजावे प्रसंग जवळ आला. श्वास घ्यायला त्रास होणे, उन्मादात बरळणे, घशात द्रव साचणे ज्यामुळे श्वास आत बाहेर करताना आवाज येणे, ही लक्षणे जवळच्या नातेवाइकांना पाहणे फार त्रासदायक होते. अशा स्थितीत व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे हा वेडेपणा ठरतो. नातेवाइकांना हवा असतो व्यक्तीचा शांत मृत्यू. परंतु रुग्णालय सर्व शक्तीनिशी कामाला लागते जीव वाचविण्यासाठी. कारण त्यांना असेच शिक्षण दिलेले असते.

डॉक्टर मृत्यू झाला हे कसे समजतात?

माणूस मृत्यू पावतो म्हणजे काय होते याचा शोध वैद्यकीय शास्त्र सातत्याने घेत आहे . मृत्यूची एक व्याख्या अशी आहे – Permanent cessation of all vital functions
पूर्वी श्वासोच्छ्‌वास बंद पडला म्हणजे माणूस मेला असे समजत.आता श्वासोच्छ्‌वास बंद होणे हे निर्णायक लक्षण समजले जात नाही. नाडी बंद पडणे हा अजून एक निकष आहे. स्टेथॉस्कोपवर हृदयाचे ठोके ऐकायला येत नाहीत. इ सी जी सपाट होतो. Insensibility हा एक निकष लावला जातो. ऐकू येत नाही, डोळ्याची बाहुली बॅटरीच्या प्रकाशाला कमी न होता विस्तारलेलीच राहते. दृष्टी स्थिर होते . सुईने टोचले तरी काही प्रतिक्रिया दिसत नाही. खालचा जबडा लोंबू लागतो.

प्राण जातो ?
भारतीय संस्कृतीत मरणाच्या वेळेला प्राण जातो अशी समज आहे. पहिल्या भागाच्या शेवटी आपण नारायण स्वामींचे भजन पाहिले, त्यात एक पंक्ती आहे – इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले. बहुतेकांची खात्री असते कि मरताना प्राण नावाची गोष्ट निसटून बाहेर पडते. शरीर शास्रानुसार अशी कोणती गोष्ट निघून जात नाही. शरीराच्या विविध क्रिया बंद पडतात – यालाच मृत्यू म्हणतात.

आपले शरीर हे एक जटिल, गुंतागुंतीची व्यवस्था असणारे एक यंत्र आहे. यात अनेक प्रणाली – सिस्टिम्स – एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांवर प्रभाव पाडणाऱ्या असतात. वार्धक्यात या प्रणालींची क्षमता कमी कमी होत जाते. मृत्यू जवळ येतो तेव्हा एक एक प्रणाली क्षीण होत जाते आणि शेवटी बंद होत जाते. सर्वात शेवटची बंद होणारी प्रणाली श्वासोश्वास असते. यामुळे श्वास बंद झाला की आपण समजतो व्यक्ती मरण पावली.

मृत्यूनंतर शरीरातील बदल
मृत्यूनंतर शरीरावर काळेनिळे डाग पडतात. शवाचे तापमान कमी होत जाते. प्रथम हातपाय गार पडतात. साधारण तासाला एक अंशाने तापमान कमी होते. स्नायू कडक होण्यास सुरुवात होते. याला रिगर मॉर्टीस असे म्हणतात.

मेंदू मृत्यू

मेंदूचे cerebral cortex आणि brain stem असे दोन महत्त्वाचे भाग असतात. ज्या वेळी cerebral cortex काम करनासे होते त्या वेळी शुद्ध जाते. परंतु brain stem कार्यरत असेल तर श्वसन आणि रक्त दाब नियंत्रण चालू राहते. अशा अवस्थेत व्यक्ती काही वर्षेदेखील जगू शकते. शानबाग नावाची एक नर्स मुंबईत के इ एम हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे अशा स्थितीत जगली. मेंदूचा मृत्यू ई ई जी काढून अशी अवस्था ठरविली जाते.

मेंदूचा मृत्यू झालेल्या व्यक्तीचे ऑर्गन डोनेशन – अवयवदान – करणे सर्वात योग्य राहते.

प्रसंगानंतर

व्यक्तीच्या मृत्यूनंतर जी कामे करावी लागतात ती व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांनी करायची असतात. घरी मृत्यू झाला असेल तर मृतदेहाची स्वच्छता, हात छातीवर बांधून ठेवणे, पायाचे अंगठे जवळ करून बांधून ठेवणे, नाकपुड्यांत कापसाचे बोळे ठेवणे, मृताचा खालचा जबडा पडला असेल तर त्वरित तोंड बंद करणे, मृताजवळ ऊदबत्ती लावणे हे योग्य ठरते.

पहिले काम मृत्यूचे प्रमाणपत्र घेणे हे असते. त्यासाठी डॉक्टरांकडून व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे प्रथम लिहून घ्यावे लागते. डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन नगरपालिकेच्या कार्यालयातून स्मशानाचा पास घ्यावा लागतो. अंत्यविधी झाल्यानंतर साधारण आठवड्याने मृत्यूचे प्रमाणपत्र प्रत्येक गावातील नगरपालिका अथवा महानगरपालिका यांच्या कार्यालयातून मिळते. जर व्यक्ती शेवटच्या आजारापर्यंत एखाद्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली नसेल तर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मृत्यूनंतर आयत्या वेळी बोलावून डॉक्टर सर्टिफिकेट देत नाहीत. व्यक्तीची तब्येत खालावू लागली की एखाद्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू करणे योग्य राहते. मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या दोन चार कॉपीज घेणे ठीक राहाते. हेच डॉक्युमेंट पुढे बँका आणि इतर सरकारी कार्यालयात द्यावे लागते.

मृतदेह काही तास घरी ठेवण्याची गरज असल्यास डॉक्टरांकडून काय करण्याची गरज आहे ते समजावून घ्यावे. आठ तासांहून जास्त वेळ देह ठेवावा लागणार असला तर शीतपेटी म्हणजे मॉर्चुरीमध्ये देह ठेवणे आवश्यक असते.

अवयवदान / देहदान
जर व्यक्तीने अवयवदान केले असेल तर शरीर अर्ध्या तासाच्या आत संबंधित हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक असते. जर व्यक्तीने देहदान केले असेल तरीही तासाच्या आत शरीर संबंधित हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे असते.

कवींच्या दृष्टीतून

भा रा तांब्यांची उत्कृष्ट कविता ! जीव सासरी ( मृत्युच्या घरी ) जायला घाबरतो आहे.
नववधू प्रिया मी बावरते, लाजते, पुढे सरते, फिरते.
कळे मला तू प्राण सखा जरि, कळे तूच आधार सुखा जरी
तुजवाचुनि संसार फुका जरी, मन जवळ यावया गांगरते II
नववधू प्रिया मी बावरते II

मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा
बागबगीचा येथला मळा, सोडिता कसे मन चरचरते II

जीव मनीचा मनी तळमळे, वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे, परी काय करू उरी धडधडते II

आता तूच भय लाज हरी रे, धीर देऊनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे, कळो पळभर मात्र खरे घर ते II

भा रा तांबे

As a fond mother, when the day is o’er
Leads by the hand her little child to bed
Half willing, half reluctant to be led
And leave his broken playthings on the floor
Still gazing through open door

So nature deals with us and takes away
Our play things one by one and by hand
Leads us to rest, so gently that we go
Scarce knowing if we wish to go or stay
Being too full of sleep and understand
How far the unknown transcends
What we know

Longfellow

सुखी रहा सारे बाकी काही नाही, ग्लानीमध्ये देई आशीर्वाद आई
थकलेला देह क्षीण शय्येवर, दाटता उमाळा थरथरे स्वर
नजरेत उभी अनोळखी भीती, असहाय्य आम्ही नुसते सभोती
कापणारा हात होती उंचावत , कुणाही कळेना काय ते सांगत
देऊ का गं खीर होय म्हणे आई , ओठातून पोटी उतरेना काही
बरी लागली ना? हालविते मान, होय-नाहीचेही वेडे समाधान
बसत घेऊन डोके मांडीवर, उगा वाटे झाली कमी घरघर
बंधनी रमली परी जपे छंद , शोधण्या निघाली मुक्तीचा आनंद
श्वास मंदावला शांत होई धग, डोळ्यात बिंबले वेगळेच जग
विझली वेदना नुरले कण्हणे, आयुष्यभराचे संपले म्हणणे
पुन्हा एक वार खरी तुटे नाळ, आकांताने पुन्हा कळवळे बाळ
आजही दुरून हेच सांगे आई, सुखी रहा सारे बाकी काही नाही.

मीरा सहस्रबुद्धे

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय?

सूर्य उगवतिल चंद्र झळकतिल, तारे आपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी कि न उमटतिल पुन्हा तयावर हेच पाय

सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा अपुल्या कामी लागतिल
उठतिल बसतिल हसुनी खिदळतिल, मी जाता त्यांचे काय जाय?

रामकृष्णहि आले गेले, त्यांविण का जग ओसची पडले ?
कुणी सदोदित सुतका धरिले? काय अडे माझ्याशिवाय?

अशा जगास्तव काय कुढावे? मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे? का जिरवू नये शांतीत काय?

भा रा तांबे

ICU Number 23

I lie in bed so comatose,
Tubes coming out of me,
Machines can only help me breathe,
As I barely hear or see.

Now I’m just a case here,
ICU number 23;
The human being that I was
Is out there, somewhere free?

You’ll find me in the sunshine,
You’ll find me in the trees;
You’ll find me in the chatter,
Of the waves of the seas;

I know you find it really hard,
To accept that I am gone.
I’m no longer truly in this bed,
And that makes you forlorn.

I will be there in every thought,
Through happiness and sorrow;
I will be the memory you hold close
Every day from tomorrow.

I seek your kindness this last time,
I ask your love to flow,
I seek your strength and generosity
To please, just let me go.

Dr. Aparna Santhanam
Mumbai

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

लेखकाचे लेखन अतिशय बिंदुगामी व शिस्तबद्ध असते. परंतु लेखक प्रतिसादात सहभागी होत नाही त्यामुळे संवादी चर्चा होत नाही असे निरिक्षण आहे

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

व्यक्तीचे ऱ्हदय बंद होते मात्र मेंदू बंद होत नाही असे होऊ शकते का? निदान काहीकाळासाठी तरी? अशा वेळेस मृत्यू झाला की नाही काय म्हणावे लागेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण ज्या व्यक्ती घरात मरण पावल्या त्यांचा विचार करत आहोत. आज मोठ्या प्रमाणावर व्यक्ती घरी मरणे पसंत करतात.

जर व्यक्ती घरात एकाएकी मरण पावली आणि घरातील लोकांना असे वाटले की व्यक्ती मरण पावली आहे, तरीही इमर्जन्सी रुग्णवाहिकेला बोलवावे. रुग्णवाहिकेबरोबर डॉक्टर आले असतील तर डॉक्टर तिथेच सांगतात की व्यक्ती मरण पावली आहे. तरीही डॉक्टर मृत शरीरास हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि तिथे शेवटचे निदान करून मग मृत्यू प्रमाणपत्र मिळते.

मला अशी एक घटना माहीत आहे की व्यक्ती घरात एकटी होती, घर आतून बंद होते. व्यक्ती हार्ट अटॅकने गेली . लोकांच्या लक्षात आल्यावर दार फोडून आत जावे लागले. कोणाही डॉक्टरने मृत्यू प्रमाणपत्र दिले नाही. शरीर ससूनला न्यावे लागले. दुसऱ्या दिवशी लाच दिल्यावर मृत्यू प्रमाणपत्र मिळाले.

जर व्यक्तीचे वय ऐंशीच्या पुढे गेले असेल, तर एखाद्या डॉक्टर कडून दोन तीन महिन्यांनी तपासणी करून घेणे चांगले. बरेच वरिष्ठ डॉक्टर्स सहाय्यक ठेवतात जो घरी येतो. काही हॉस्पिटले पण घरी डॉक्टर पाठविण्याची व्यवस्था करतात.

जर नगरसेवक आपल्या माहितीचा असेल तर काम सोपे होते. नगरसेवक मृत्यूचे प्रमाणपत्र देऊ शकतो.

माझ्या वडिलांच्या केसमध्ये आम्हाला लक्षात आले की त्यांची तब्बेत रोज खालावत जात होती. त्याची लक्षणे मुख्य लेखात लिहिली आहेतच. वडिलांनी निक्षून सांगितले होते की ते घरातच मरू इच्छितात. आम्ही एका डॉक्टरला केस सांगितली. त्यांनी सहाय्यक घरी पाठविला. त्यानंतर पंधरा दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत्यू प्रमाणपत्र दिले.

वरील सर्व केसेसमध्ये लिव्हिंग विल असणे काम सोपे करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे स्मशान भूमीत doctor चे certificate लागते अंतिम संस्कार साठी तिथे ही अडचण येते.
महानगरपालिका क्षेत्रात हा नियम कडक पने राबविला जातो.
किंवा बॉडी शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी अंत संस्कार साठी घेवून जावे लागते.
तिथे doctor चे certificate लागते.
पण ग्रामपंचायत क्षेत्रात ते लागत नाही.
सरळ ग्रामपंचायत office माध्ये जावून ग्रामसेवक कडे मृत्यू ची नोंद करता येते.
अपघाती मृत्यू,खून हे प्रकार अपवाद.
हा प्रकार जन्माची नोंद करताना पण करावा लागतो.
पहिले घरीच बाळंतपण होत असे .ते पण नैसर्गिक .
तेव्हा तोंडी च जन्म नोंद केली जायची

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमालेचा विषय रोचक आहे. यात मृत्यूच्या स्टेजेस अगदी सविस्तर दिलेल्या आहेत.

याही पुढची एक काहीशी तांत्रिक स्टेज मानली जाते. त्यात शरीराच्या /मेंदूच्या पेशींचे स्ट्रक्चर देखील पुन्हा न जुळू शकेल अशा रीतीने नष्ट होणे असा निकष असतो. अधिक माहिती आत्ता सापडेना. पूर्वी कुठेतरी वाचण्यात आले होते. अर्थात हा फारच तांत्रिक भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका वाचकाने असा प्रश्न उपस्थित केला आहे की हृदय बंद झाले पण मेंदू काम करीत आहे अशी अवस्था असते का? हा प्रश्न मेडिकल शास्त्राजवळ जातो. मी काही ते शिक्षण घेतलेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे लिहितो. चूक झाली असेल तर मेडिकलमधील तज्ज्ञाने दाखवून द्यावी.

हृदयाची क्रिया ब्रेन स्टेम या मेंदूतील भागातून नियंत्रित होत असते. ब्रेन स्टेम काम करीनासे झाले की हृदय बंद होते. हृदयाच्या तीव्र झटक्यात हृदय मेंदूच्या आज्ञेची वाट पहात नाही. स्वत: निर्णय घेऊन बंद होते. हे सर्व काही सेकंदांत घडते आणि वाचकाने प्रश्न केलेली स्थिती निर्माण होते. त्यानंतर व्यक्ती लगेच मरते.

हृदयाच्या हलक्या झटक्यात असे होत नाही. एखाद सेकंद चलबिचल होऊन हृदय परत ब्रेन स्टेमच्या आज्ञेनुसार काम करू लागते.

असे म्हणतात की बऱ्याच व्यक्तींना न जाणवणारे, न समजलेले हृदयाचे बरेच झटके येऊन गेलेले असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैसर्गिक रीती नी निरोगी माणसाला येणारा मृत्यू हा बिलकुल त्रास दायक नसतो.
शेवटचे फक्त १० ते १५ दिवस तो बेड वर असतो.
वेदना समजण्याची ,जगण्याची ओढ काही नसते.
त्या संवेदना च नसतात..
शेवटच्या क्षण पर्यंत शरीर उत्तम रित्या काम करत असते.

सुखात मरण येते.
अकस्मात मृत्यू.
हार्ट अटॅक ,अपघाती मृत्यू तो कधी आला हे माहीत पण पडत नाही.
वेदनादायी मृत्यू.
शरीर जेव्हा रोग ग्रस्त होते तेव्हा वेदनादायी मृत्यू येतो आणि बाकी लोकांची मदत लागते.
परावलंबी तो व्यक्ती होतो.
डार्विन सांगून गेला आणि आम्ही जय जयकार पण केला त्याचा.
सर्वोत्तम च टिकते.
जगातील सर्वोत्तम बीजांड,आणि स्पर्म ह्याचा वापर करून निरोगी पिढी निर्माण करणे.
हा विचार मात्र निती मत्ता म्हणजे मागास विचार .
ह्या मध्ये अडकते.
मुल जन्माला येते तेव्हाच त्याचे आरोग्य ठरवले जाते.
हे विज्ञान पण मान्य करते.
आई वडील जे देतात तेच मुलाकडे येते.
आजार ,शरीर स्वस्थ ''''''''''''''''
सहित.
पण फक्त भेद होवू नये म्हणून..सर्व एक च ही विज्ञान पण मान्य करत नाही तो विचार पुरोगामी समजला जात नाही.
मुल जन्माला आल्या नंतर आई चे दूध किती महिने घेत आहे..
आहार काय घेत आहे.
त्याचे मानसिक स्वस्थ ठीक राहण्यासारख घरात वातावरण आहे का?
शारीरिक व्यायाम काय आहे.
व्यसन काय आहे.
हे घटक आणि असे अनेक घटक जे आपल्या हातात असतात ते पहिल्या दिवसापासून कार्य करतात ..
कॅन्सर,मधुमेह.
किंवा बाकी आजार असेच अचानक येत नाहीत.
रोग ग्रस्त ज्याचे शरीर त्याचा मृत्यू वेदनादायक.
आणि भिडे ह्यांचं लेख त्याच लोकांसाठी परफेक्ट आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0