मृत्यू – भाग ५

भाग ५ – धर्म, समाज आणि मृत्युकल्पना

It matters not how a man dies, but how he lives. The act of dying is not of importance, it lasts so short a time.
- Samuel Johnson

माणसाने मृत्यूच्या भयापोटी धर्म निर्माण केला आणि ईश्वरही निर्माण केला. जगाच्या काना कोपऱ्यात धर्माच्या नावाखाली लाखो निरपराध व्यक्तींची हत्या झाली , आजही होत आहे . याचा अर्थ धर्म केव्हाच संपला आहे. शंभर वर्षापूर्वी ईश्वराचा मृत्यू झाला आहे अशी हाकाटी नीत्शे या तत्त्ववेत्त्याने केली. आजची अवस्था पाहता खरोखरच असे वाटते की ईश्वराची हत्या झाली आहे.

बाळ सामंत, मरणात खरोखर जग जगते.

धर्माचे अस्तित्व केवळ मृत्यूमुळे आहे . जर जगात मरण नसते तर कुणी धर्माची चिंता केली नसती. मृत्यू कल्पने मुळे तुम्ही अशा काल्पनिक गोष्टीच्या मागे जाता जी तुमच्या मृत्यूनंतर शिल्लक राहील.

- रजनीश


Hindu death rituals

हिंदू धर्मात मृत्यूची कल्पना
हिंदू धर्मात मृत्यूची कल्पना निरनिराळ्या प्रकारे प्रतिबिंबित होते. शरीर आणि आत्मा या दोन निराळ्या गोष्टी असणे , आत्मा अमर असणे आणि पुनर्जन्म ह्या कल्पना मानवाचा मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी एक प्रयत्न होता.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान - अन्यानि संयाति नवानि देही ॥

हा गीतेतील श्लोक सांगतो की आपण जीर्ण झालेले कपडे बदलतो त्या प्रमाणे आत्मा नवीन शरीर धारण करतो. अशी हिंदू धर्मात पुनर्जन्माची कल्पना आहे. श्रीकृष्ण गीतेत सांगतात – जो जन्माला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि जो मृत झाला त्याचा जन्म निश्चित आहे. पितरांची पूजा हा पण याच विचाराचा एक भाग होता. या सर्वाचा परिणाम माणसाची मृत्यूची भीती कमी करण्यात झाला.

बौद्ध धर्मात मृत्यूची कल्पना
बौद्ध धर्मात दोन कल्पना मृत्यूशी निगडीत आहेत. पहिली कल्पना 'बदल'. जीवनाच्या मुळाशी बदल आहे. माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सारखा बदलत असतो. आपण जे काल होतो ते आज नसतो.

What is change but death of the present?

याचा अर्थ मृत्यू हा पण एक बदल आहे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढ अवस्था, वृद्धावस्था या नंतर येणारी अवस्था म्हणजे मृत्यू .

मृत्यूनंतर काय? बौद्ध धर्माच्या कल्पनेप्रमाणे पुनर्जन्म. कोणताही जीव निरंतरपणे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जात असतो.

(एका बाजूने बौद्ध धर्म आत्मा कल्पनेला विरोध करतो आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो हा विरोधाभास नाही का?)

इस्लाम धर्मात मृत्यूची कल्पना
कुराणाच्या मताप्रमाणे मनुष्यजन्म हा पहिला आणि शेवटचा जन्म आहे. इस्लाम धर्मात या जीवनानंतर दुसरा जन्म नाही. हे आयुष्य म्हणजे जीवनांनंतर काय होणार याची कसोटी असते. प्रत्येक व्यक्तीस एक संधी असते ज्याचे सोने करणे त्या व्यक्तीच्या हातात असते. मरणांनंतर जीवन निराळ्या प्रकारे चालू राहते.

प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूची वेळ अल्लाहने ठरविलेली असते. चांगल्या आचरणाच्या व्यक्ती अल्लाहने ठरविलेल्या मृत्यूच्या दिवसाची वाट पाहतात. अशा प्रकारे इस्लाममध्ये मृत्युकल्पना एक सहज नैसर्गिक घटना आहे. मृत्यूनंतर आत्मा कयामतच्या दिवसाची वाट पहात राहतो.

जगाच्या अंताच्या वेळेला कयामत असे म्हटले जाते. त्या दिवशी प्रत्येक आत्मा आपल्या कबरीतून उठून ईश्वरापुढे जाऊन उभा राहील . त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या कर्माचे बक्षीस किंवा वाईट कर्माची शिक्षा मिळेल. ज्याचे पुण्य अधिक तो स्वर्गात जाईल आणि ज्याचे पाप अधिक तो नरकात जाईल. सत्कर्म करणाऱ्याला स्वर्गातून देवदूत येऊन बरोबर घेऊन जाईल. पापी माणसाला नरकातील दूत येऊन घेऊन जातील. नरक अतिशय भयंकर आणि विक्राळ आहे.

ख्रिश्चन धर्मात मृत्यूची कल्पना.
इस्लाम धर्मातील कयामत दिवसाप्रमाणे ख्रिश्चन धर्मात judgement day सांगितला आहे. त्या दिवशी मृतांचे आत्मे ईश्वरासमोर नेले जातील. प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे नरकात जावे लागेल किंवा स्वर्गात जाता येईल. judgement day हा काळाचा अंत असेल.

आपण हे पाहू शकतो की हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यात मृत्यूनंतरच्या कल्पनांची समानता आहे. त्याच प्रमाणे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात समानता आहे.

अंत्यसंस्कार
अनादि काळापासून मानव यावर विश्वास ठेवत आला की मृत्यूनंतर अस्तित्व पूर्णपणे संपत नाही. यामुळे एखादवेळेस मृत्यूची भीती कमी होत असावी. अतिप्राचीन काली दफन करताना शवाबरोबर पुढील प्रवासासाठी अन्न ठेवले जायचे . यामुळे मृताचे दफन किंवा दहन हा विधी सर्व धर्मात एक धार्मिकविधी मानला गेला आहे. प्रत्येक धर्माचे याविषयी निराळे तंत्र आहे. स्मशानयात्रा ही सर्वच धर्मात निघते.

समाज आणि मृत्युकल्पना
रिचर्ड डॉकिन्स यांनी उत्क्रांतीचे जीवशास्त्र या विषयावर The Selfish Gene या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात जो सिद्धान्त मांडला आहे त्यानुसार मृत्यू ही कल्पना पूर्णपणे निरर्थक होऊन जाते.

डॉकिन्स यांच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक जीव हा जनुकांचे (Gene ) एक वाहन/ साधन असते. या वाहनाचे काम जनुकांचे रक्षण करणे आणि जनुके प्रसारित करणे हे असते. जिवाच्या जगण्याचे एकच उद्दिष्ट असते – जनुकाचा प्रसार करणे!

एकदा का हे उद्दिष्ट साध्य झाले – जनुकाची प्रत नवीन वाहनात घातली गेली – नवीन जीव निर्माण झाला आणि तो वाढू लागला की वाहनाचे – साधनाचे काम संपते. यामुळेच चाळिसाव्या वर्षापासून एजिंग प्रोसेस – वार्धक्य प्रक्रिया – चालू होते. जुन्या जनुकाच्या प्रतीबरोबर वाहन मोडकळीस जाते. त्यानंतर त्या वाहनाच्या – जिवाच्या जगण्याचा अर्थ संपलेला असतो.

उत्क्रांतीच्या नियमांनुसार अशा जिवाने जगत राहणे निरर्थक झालेले असते. असे वाहन मोडीत काढण्यातच फायदा असतो. अशी मोडकळीत निघालेली वाहने चालू ठेवण्यात समाज फार खर्च करीत असतो.

समाजात वीस ते पासष्ट वयोगटातील व्यक्ती आर्थिक उत्पादन कार्यात क्रियाशील असतात. याउलट वृद्ध नागरिक आणि लहान मुले संसाधनांचा फक्त वापर करीत असतात, उत्पादन करीत नाहीत. यामुळे ज्या समाजात वृद्धांचे प्रमाण वाढत जाते त्या समाजात GDP वाढ दर कमी होत जातो. पश्चिम युरोपीय देशात हे साफ दिसून आले आहे. याशिवाय सर्व पश्चिम युरोपमधील प्रगत देशात सामाजिक कल्याणाच्या (social security) योजना आहेत. याअंतर्गत वृद्धांवर समाज खूप खर्च करीत असतो.

अशा तऱ्हेने मृत्यू केवळ लांबवित जाणे समाजाच्या हिताचे नसते.

करोना काळातील अनुभव
ज्या काळात युरोपमध्ये करोनाचा कहर चालू होता त्या वेळी हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागातील खाटा भरून गेल्या होत्या. तरीही जेव्हा नवीन रोगी येतच राहिले तेव्हा कोणाला वाचवायचे आणि कोणाला मरू द्यायचे हा प्रश्न डॉक्टरांच्या समोर उभा राहिला. त्या वेळी डॉक्टरांनी तरुणांना वाचवून वृद्धांना मरू देण्याचा निर्णय घेतला गेला. समाजाच्या दृष्टीने वृद्धांचा समाजासाठी उपयोग नसतो.

निसर्ग आणि मृत्यू
निसर्गाच्या दृष्टीने मृत्यू ही आवश्यक घटना आहे. अशी कल्पना करा की एखाद्या प्राण्याच्या किंवा कीटकाच्या बाबतीत काही कारणांनी मृत्यू नाहीसा झाला. शास्त्रज्ञ सांगतात की काही महिन्यांत पृथ्वीवरील इतर जीवसृष्टी नष्ट होऊन जाईल . वैविध्य जाणे हे निसर्गनियमाच्या विरुद्ध आहे. यासाठी निसर्गाने मृत्यूची व्यवस्था केली आहे.

मानवी शरीरात लाखो पेशी रोज मरत असतात. महिन्यापूर्वीचे आपण आणि आजचे आपण यात शारीरिकदृष्ट्या फरक झालेला असतो. आपण मरणाचा रोजच अनुभव घेत असतो. ते आपल्याला जाणवत नाही इतकेच.

कवींच्या दृष्टीतून
अवधचे नवाब वाजिद अली यांचे हे दोहे कुंदनलाल सैगल आणि भीमसेन जोशी यांच्या भैरवीने अजरामर झाले आहेत. हे दोहे वाजिद अली यांनी लखनौ सोडताना लिहिले. पण गर्भितार्थ स्पष्ट आहे. त्यांच्या दृष्टीतून लखनौ सोडणे हा मृत्यूच होता.

बाबुल मोरा नैहर छूटो ही जाए |
चार कहार मिल मोरी डोलिया सजावें
मोरा अपना बेगाना छूटो जाए |
अँगना तो पर्बत भया और देहरी भयी बिदेश
ये घर बाबुल आपनो मैं चली पिया के देश |

माझे घर माझ्यापासून सुटत चालले आहे. चार लोक माझी डोली सजवून मला घेऊन चालले आहेत. माझी जवळची माणसे माझ्यापासून दूर जात आहेत. काल ज्या अंगणात मी बागडलो ते पर्वतासारखे झाले आहे. मी आपल्या प्रियकराच्या घरी जात आहे.

वाजिद अली

ठन गई! मौत से ठन गई
जुझने का मेरा इरादा न था
मोड पार मिलेंगे इसका वादा न था
रास्ता रोक कर वह खडी हो गयी
यों लगा जिंदगीसे बडी हो गयी
मौतकी उमर कया है, पल दो पल भी नही
जिंदगी सिलसिला आज कल की नही
मौत से बेखबर जिंदगीका सफर
शाम हर सुरमई, रात बंसीका स्वर
बात ऐसी नही की कोई गम ही नही
दर्द आपने पराये कूछ कम भी नही
नाव भवरोंकी बाहोमे मेहमान है
पार पानेका मगर कायम हौसला है
देख तेवर तुफाँ का तेवेरी तन गयी
मौत से ठन गयी

अटल बिहारी वाजपेयी

परतीच्या प्रवासासाठी

बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे II,
फापटपसारा आवरून सारा आता सुटसुटीत व्हायचं आहे
या साठी, त्या साठी, हे हव ते हव , जाईन तिथे तिथलं काही हे हवं ते हवं
हव्याचा हव्यास प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,
बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे II

अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो,
आयुष्याच्या होल्डऑलमध्ये काय काय कोंबत होतो
त्या वेळी ठीक होतं, आता गरज सरली आहे,
बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे II

आपण कमी पडलो याचं शल्य आता विसरायचं आहे,
मान अपमान, ‘मी’ ‘तू’ यातून बाहेर पडायचं आहे
रिक्त मुक्त होत होत अलगद उठून जायचं आहे,
बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे II

कवि अज्ञात

Because I could not stop for death
He kindly stopped for me
The carriage held but just our selves
And immortality

He slowly drove, he knew no haste
And I had put away
My labour and my leisure too
For his civility

We passed the school where the children strove
At recess- in the ring
We passed the fields of gazing grain
We passed the setting sun

Or rather he passed us
The dews drew quivering chill
For only gossamer my gown
My tippet and my tulle

We passed before a house
That seemed swelling on the ground
The roof was scarcely visible
The cornice in the ground

Since then it is centuries
And yet feels shorter than a day
I first surmised horse’s heads
Were bound towards eternity

१. indication that poet was not prepared for this journey in the cold, she was dressed in only thin gown. We are never prepared for the journey?
२ indication of tomb

Emily Dickinson

उंबरठ्यावर
सखे आता तो क्षण आला,
अखेर या सराइतच थांबायचं आहे तुला
आणि मी पुढे जाणार आहे.
रेखीव रस्ता नसलेल्या त्या संदिग्ध प्रदेशात
प्रदेश तर काळोखाचाच
पण आतापर्यंतच्या प्रवासात
तू दिलेलं चांदणं माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे.
पडत्या पावलाच्या सभोवार
त्याचं शिंपण करीत मी पुढे जाईन
चांदणं संपेल ही चिंता सखे, करू नकोस
कारण एक अत्युच्च आनंदाचा असा
क्षण येईल जिथे चालणेच संपेल
आणि तिन्ही कालांच्या प्रयागावर
लक्ष संबंध असलेले
माझे आहेपण
संबंधहीन अशा नाहीपणात
सागर लाटेसारखं सहजपणे विसर्जित होईल
सखे डोळ्यात आसवं कशाला
तुला ठाऊक आहे ना ?
उंबरठ्यावरील अश्रूंचे थेंब
पांथस्थाच्या मार्गावर...

कुसुमाग्रज

(लेखमाला समाप्त)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अतिशय माहीतीपूर्ण खूप मेहनत घेलतलेली लेख माला. खर तर सर्वच लेख माला. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुनर्जन्म झालेल्या घटना जगात खूप आहेत.
त्या सर्व च खोट्या आहेत है अभ्यास न करता म्हणता येत नाही.

काहिच सिध्द न झालेला हा विषय आहे.
जसा देव आहे की नाही हे अजून सिद्ध झालेले नाही.
त्या मुळे हेच बरोबर आणि हे चूक असे बिलकुल बोलता येणार नाही.
सर्व धर्माच्या कल्पना ईश्वर मान्य करतात.
जे ईश्वर मान्य करत नाहीत ते धर्म निसर्गाचे नियम मान्य करतात
शेवटी अर्थ एक च असतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" ज्या काळात युरोपमध्ये करोनाचा कहर चालू होता त्या वेळी हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागातील खाटा भरून गेल्या होत्या. तरीही जेव्हा नवीन रोगी येतच राहिले तेव्हा कोणाला वाचवायचे आणि कोणाला मरू द्यायचे हा प्रश्न डॉक्टरांच्या समोर उभा राहिला. त्या वेळी डॉक्टरांनी तरुणांना वाचवून वृद्धांना मरू देण्याचा निर्णय घेतला गेला. समाजाच्या दृष्टीने वृद्धांचा समाजासाठी उपयोग नसतो."

हे असं कुठे घडलं ? याचे काही संदर्भ देऊ शकता काय ?
आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असं कुठे घडलं ? याचे काही संदर्भ देऊ शकता काय ?

इटली येथे?

But these high numbers mean doctors must choose more often, and more quickly, who deserves a greater chance of survival - a triage that is particularly wrenching in a Catholic country that does not allow assisted dying, and where the population is, according to statistics agency Eurostat, the oldest in Europe with nearly one person in four aged 65 or older.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Covid ग्रस्त तरुणांना डॉक्टर नी काय जादू करून वाचवले ते वाचायला आवडेल.

आणि असे किती तरुण वाचवले ते आकडे मिळाले तर दुधात साखर.
निसर्ग नियम लावला ते प्रजनन करण्यास जे सक्षम नसतात ते निसर्गाच्या काहीच कामाचे नसतात.
प्रजनन क्षमता ज्या वयात संपते ते वय .
उपयोग संपला ह्या साठी निसर्ग नियमा नुसार समजले जाते.
मानवाचे हे वय स्त्री साठी mc असे पर्यंत ४५ च्या आसपास आणि पुरुषाचे ५०/५५ च्या आसपास आहे.
. मानवाची आज पर्यंत जी प्रगती झाली आहे ती पहिल्या पिढीच्या अनुभव वरून च झाली आहे.
जितके जास्त दिवस कोणत्या ही क्षेत्राचा अनुभव तितका त्या क्षेत्रा मध्ये तो व्यक्ती तरबेज असतो.
समाजाच्या उपयोगी अनुभवी लोक च येतात..
तीसी मध्ये असणाऱ्या पुस्तकी हुशार डॉक्टर पेक्षा ६० मधला compounder अनुभवणे त्या डॉक्टर पेक्षा योग्य निर्णय योग्य वेळी घेवु शकतो
हजारो आजारी लोक त्याने बघितलेली असतात..
प्रतेक व्यक्ती कसा response करतो उपचार ल हे त्याला अनुभव नी माहीत असते
पुस्तकात असले ज्ञान नसते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असं कुठे घडलं ? याचे काही संदर्भ देऊ शकता काय ?

संदर्भ : न्यू यॉर्क टाइम्स, ८ ऑगस्ट २०२०

Belgium’s response offers a gruesome twist: Paramedics and hospitals sometimes flatly denied care to elderly people, even as hospital beds sat unused. “They wouldn’t accept old people,” Ms. Doyen said. “They had space, and they didn’t want them.”

Italian doctors said they were forced to ration care to the elderly because of shortages of space and equipment

In Sweden, overwhelmed emergency doctors have acknowledged turning away elderly patients.

In Britain, the government ordered thousands of older hospital back to nursing homes to make room for an expected crush of virus cases.

मूळ लेख : When Covid-19 Hit, Many Elderly Were Left to Die

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बौद्ध धर्माच्या कल्पनेप्रमाणे पुनर्जन्म. कोणताही जीव निरंतरपणे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जात असतो.

जीवाच संक्रमण ही कल्पना गौतम बुध्दाची नाही. त्याच्या 'अनात्म' बोधानुसार जीव / जीवात्मा / आत्मा असं काही नसतं (ही नुसती थियरी नसून त्याच्या अनूभुतीसाठीचा मार्गही त्याने शोधून जगाला शिकवला).

(एका बाजूने बौद्ध धर्म आत्मा कल्पनेला विरोध करतो आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो हा विरोधाभास नाही का?)

गौतम बुद्धाने पुनर्जन्म ही संकल्पना मांडली नाही. मृत्यु हा बदल आहे हा मुद्दा तुम्ही लेखात मांडला आहे, पण फक्त मृत्युच नाही तर जन्म हाही बदलच आहे. हे 'अनित्य' बोधातून त्याने शिकवलं.

त्यामुळे ना पुनर्जन्म ना आत्मा, त्यामुळे विरोधाभास नाही.

गौतम बुद्धाच्या महासतीपठ्ठाण सुत्तानुसार :

And what, bhikkhus, is jāti? For the various beings in the various classes of beings, jāti, the birth, the descent [into the womb], the arising [in the world], the appearance, the apparition of the khandhas, the acquisition of the āyatanas. This, bhikkhus, is called jāti.

And what, bhikkhus, is maraṇa? For the various beings in the various classes of beings, the decease, the state of shifting [out of existence], the break up, the disappearance, the death, maraṇa, the passing away, the break up of the khandhas, the laying down of the corpse: this, bhikkhus, is called maraṇa.



jāti = जन्म
maraṇa = मृत्यु

- (जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपुर्ण लेखमालेची मांडणी अप्रतिम झाली आहे!

- ('आर्ट ऑफ डाइंग' समजू पाहणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्मा, जन्म-मरणाचा फेरा, मोक्ष या गोष्टीवर आता श्रद्धा राहिली नाही. "आतला आवाज" (फ्री विल वा इनर व्हॉइस) या संकल्पनेलापण आधुनिक विज्ञानाने सुरुंग लावलेत. मेंदूत येणारे विचार, भावना हे सुद्धा बाहेरून यंत्राने कंट्रोल करता येवू शकतात. विज्ञानातल्या या प्रयोगांमुळे "आतला मी" हा कुणी वेगळा, अनादी, अनंत आहे, ती एक "डिव्हाईन पावर" आहे हा माझा विचारच बाद झाला.

दुसरे म्हणजे बिलियन, ट्रिलिअन वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी बनली नव्हती (प्री लाईफ स्टेज), ते एक ठराविक पॅटर्न पुन्ह पुन्हा निर्माण करण्याची (रेप्लिकेशन) स्टेज (विषाणूजन्य सृष्टी), डिएनए फॉर्मेशन स्टेज, एकपेशीय सजीव निर्माण होण्याचा (अर्ली लाईफ स्टेज) काळ. या सर्व काळात "आत्मा" ही गोष्ट नेमकी कधी अस्तित्वात आली समजायची? विषाणूंमध्ये आत्मा असतो का? एकपेशीय सजीवांमध्ये असतो का? बरं हे "आत्मा" जीवसृष्टीबरोबर वाढत गेले असे म्हटले तर, विचार करू शकणार्‍या सजीवांची प्रजाती बनेपर्यंत (म्हणजे अलिकडच्या काही हजार वर्षांपर्यंत) "मोक्ष" या कल्पनेलाच काहीच अर्थ उरत नाही. आणि मधल्या काळात मास एक्स्टींग्शन वगैरे घटनांची नोंद आत्म्यांच्या संदर्भात कशी घ्यायची. असो, असे प्रश्नच मला आता निरर्थक वाटू लागलेत. त्या काळात आजचे विज्ञान माहीत असते तर कदाचित वेगळे तत्त्वज्ञान पुढे आले असते. नो डाउट, "जाणीव - कॉन्शसनेस - निर्माण करणे" खास करून ऑटो रिफ्लेक्सेस बद्धल आणि "एकाग्रता" वाढवणे एवढ्या मर्यादीत संदर्भात (ज्याची आजच्या माहितीच्या विस्फोटानंतर आणि ए.आय. च्या आगमनानंतर अत्यंत गरज आहे) विपश्यना/ध्यानधारणा याचे योगदान महत्त्वाचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही जे काही ज्ञान म्हणून आत्मसात केले आहे ते पण सर्व अंदाज आहेत.

तसे असण्याची शक्यता आहे.
पूर्णतः ना बिग बॅग सिद्ध झाला आहे
ना डार्विन ची therory सिद्ध झाली आहे.
ना प्रकाशाचा वेग सिद्ध झाला आहे.
ना डायनासोर अगोदर पण माणसं होती हे सिद्ध झाले आहे.
.माणसाचे Fossil च 3 लाख वर्षा अगोदरचे मिळाले नाहीत.
निसर्गात इतका बदल होण्यासाठी 3 लाख वर्ष हा आकडाच खूप लहान आहे.

आम्ही जे बोलतो आत्मा,ईश्वर ह्या विषयी हे पण सिद्ध झालेले नाही.
हे सत्य असण्याची शक्यता आहे .
ह्याच प्रकारात आहे.
जेव्हा कधी काही सिद्ध होईल तेव्हा .
ठाम पने बोलू जे काही आहे हे असेच आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यांनी कोणतेही गृहितक मांडले असेल तरी त्या वर अविश्वास दाखवून आपण आपल्या बुद्धीला पटेल तेच सत्य समजणे ..
ह्याला च बुध्दी वादी पना म्हणतात..रोज च्या जीवनात आपण त्या वैनानिक गृहितक च अनुभव घेत नसू तर ते गृहितक साफ चुकीचे आहे .
हेच समजणे ह्याला च विज्ञान वादी म्हणतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0