माहितीपर लेखन

माणूस नावाच्या प्राण्याची आतापर्यंतची वाटचाल

मानव विजय'आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणाऱ्या विचारांकडे आपला नेहमीच कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारा एखादा विचार असल्यास तसले विचार करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, असेच आपल्याला वाटत असते.’ बर्ट्राँड रसेल यांनी 1925 साली हा विचार मांडला होता. गेल्या 90-95 वर्षात अजूनही आपण त्याच अविचारांच्या गर्तेत आहोत.

समीक्षेचा विषय निवडा: 

विवेकनिष्ठतेच्या वाटेवर

श्रद्धा विसर्जन

समीक्षेचा विषय निवडा: 

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक .

समीक्षेचा विषय निवडा: 

कवी पर्सी शेली.... राजकुमारी ऍना.... जलपरी एरीथुसा

१९५३ मध्ये आलेला आणि जो जगभर गाजला व आजही हॉलिवूडच्या इतिहासात सर्वोत्तम १०० चित्रपटामध्ये ज्याची गणना न चुकता केली जाते त्या “रोमन हॉलिडे” वर भारतामधील रसिकांनाही तितकेच प्रेम केले आहे. कथानकात एके ठिकाणी राजकुमारी ऍन झोपेच्या इंजेक्शनच्या अंमलाखाली असून ती राजवाड्यातून देखरेख करणार्‍यांच्या नजरा चुकवून रात्री बाहेर पडली आहे व वाटेत तिची रोम शहरातील अमेरिकन प्रेस रीपोर्टर जोसेफ़ ब्रॅडले याच्याशी भेट होते. त्याला वाटते या पोरगीने काही नशापाणी केले आहे आणि अन्य काही उपाय सापडत नाही म्हणून तो तिला रोममधील आपल्या खोलीवर आणतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

पुस्तक परिचय. The Noticer.

एक पुस्तक परिचय. The Noticer . लेखक . Andy Andrews.
प्रकाशन संस्था .Thomas Nelson .Inc.

मला आवडले तुम्हाला आवडते का बघा ?

समीक्षेचा विषय निवडा: 

हिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण

काही वर्षापूर्वी प्रसिद्ध साहित्यिक व्ही एस नायपॉल यांनी भारताच्या विदारक स्थितीला ‘प्राणांतिक जखम झालेली संस्कृती’ (wounded civilization) असा उल्लेख केला होता. परंतु Culture Can Kill या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, एस सुबोध यांच्या मते या संस्कृतीवरील जखम कधीच बरी न होणारी आणि शेवटपर्यंत क्लेशदायक ठरणारी आहे. या मरणासन्न जखमी अवस्थेवर वेळीच तातडीचे उपाय न केल्यास मृत होण्याची शक्यता जास्त आहे. खरे तर ही स्मशानयात्रा किती खर्चिक असणार आहे, याचाच आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा प्रकारची विधानं अनेकांना दुखी करतील वा वाचताना रागही येईल.

समीक्षेचा विषय निवडा: 

बाजार शरण ‘गुरु’ चरित्र

तथाकथित आध्यात्मिक सुख समाधानासाठी भारतातील अशिक्षित जनसामान्य (आणि शिकले सवरलेलेसुद्धा!) कुठल्याही ‘गुरू’ला डोक्यावर चढवून घेतील याची प्रचिती भावदीप कांग या पत्रकर्तीने लिहिलेल्या Gurus हे इंग्रजी पुस्तक वाचताना नक्कीच येईल. यातील महर्षी महेश योगीपासून भय्यू महाराज पर्यंतच्या गुरुजनांच्या एकेका कारनाम्यावर ओझरती नजर टाकली तरी आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन शास्त्र, मानसशास्त्र यांचा पुरेपूर वापर करत अध्यात्म हे एक प्रॉडक्ट म्हणून विकत आहेत व आपली तुंबडी भरून घेत आहेत, हे लक्षात येईल.

समीक्षेचा विषय निवडा: 

भगवान देता है तो छप्पर फाडके देता है...

अलीकडील वैचारिक पुस्तकं वाचत असताना वाचकांना एका प्रकारच्या नैराश्याने वेढल्यासारखे वाटू लागते. त्यातील घटना, घटनाक्रम, घटनेवरील मल्लीनाथी, विश्लेषण आपल्याला थक्क करून सोडत असले तरी मुळात माहितीचा आघातच फार मोठा असतो. याच मालिकेतील मीरा नंदा यांचे गॉड्स मार्केट (God’s market) हे पुस्तक वाचत असताना आपला समाज कुठल्या दिशेने प्रवास करत आहे, याबद्दल रुखरुख वाटू लागते. पुस्तकाच्या उपशीर्शकात उल्लेख केल्याप्रमाणे How Globalisation is making India more Hindu हे मत आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवत आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

मराठीतील पहिल्या वेब कंटेट चॅनेलची वर्षपूर्ती

भाडिपा : भारतीय डिजिटल पार्टी
उदाहरणार्थ मराठीतील पहिला वेब कंटेट चॅनेल वगैरे वगैरे

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - माहितीपर लेखन