माहितीपर लेखन

पूर्वज-वि. ग. कानेटकर

आज सकाळी वर्तमानपत्रात प्रसिद्ध साहित्यिक वि. ग. कानेटकर यांचे निधन झाल्याचे वाचले. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पूर्वज हे पुस्तक वाचून ही समीक्षा लिहिली होती. ती येथे देत आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

श्रीविठ्ठलः एक महासमन्वय

रा. चिं. ढेरे गेले. त्यांना मी कधी पाहिले नव्हते, भेटले नव्हते किंवा भेट घ्यायचा कधी प्रयत्नही केला नव्हता. पण त्यांच्या लिखाणातून मी त्यांना इतकी उराउरी भेटले होते, की त्यांना मी फार जवळून ओळखत होते असे वाटते. संशोधन कसे करावे आणि ते कसे सादर करावे याचे धडे त्यांच्या लिखाणातून मिळत राहतात. अतिशय काटेकोर संशोधनपद्धती वापरून संशोधन करणारा, शोधाच्या नव्या वाटा, नवी साधने शोधणारा आणि ते संशोधन ललित भाषेत मांडणारा एक प्रकांड विद्वान म्हणून त्यांच्याविषयी आदर वाटतो, तशी आपुलकीही. कारण त्यांचे संशोधनपर लिखाण पोटार्थी नाही, रुक्ष नाही, बढतीच्या मिषाने केलेले नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

इथे फोटो कसे चढवावेत?

नवीन सदस्यांना मदत असा ह्या धाग्याचा हेतू आहे.
फोटो चढवणं जरा कठीण वाटू शकतं. खाली दिलेली पद्धत वापरल्यास फोटो चढवणं सोपं वाटू शकेल.
इथे फोटो चिकटवण्यासाठी आधी तो फोटो जालावर असणं आवश्यक आहे. ह्याचाच अर्थ असा की तुमच्या लॅपटॉप किंवा
वैयक्तिक संगणकावरून थेट इथे फोटो टाकणं शक्य होणार नाही. जालावर म्हणजे पिकासा, फ्लिकर किंवा तत्सम
कुठल्याही साईटवर असलेला फोटो इथे चिकटवता येईल. इथे मी पिकासाचं उदाहरण घेतलं आहे.

पायरी १

पिकासा अकाउंट मध्ये लॉगिन करून अपलोड वर टिचकी मारा

गणितस्य कथा: रम्या: |

एकंदरीत मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये गणित या विषयाचा सिंहाचा वाटा असूनही गणित, गणितज्ञ, आणि गणिताचा इतिहास या बाबतीत समाजात सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आढळते. अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई या लेखकद्वयीनं मात्र या परिस्थितीला छेद देऊन अगदी अनादी काळापासून ते आजच्या आधुनिक उच्चस्तरीय गणितापर्यंतच्या या विषयाच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे, ते गाठण्यात महत्वाचा वाटा असणारे गणितज्ञ आणि एकूणच गणिती प्रक्रियेचा गुंतागुंतीचा इतिहास वाचकांपुढे रंजकपणे मांडला आहे – त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडके!

- डॉ. श्रीकृष्ण दाणी
समीक्षेचा विषय निवडा: 

भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळ

एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता यांना पायदळी तुडवलेली उदाहरणं मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु डॉ. जॉन (जोहान्नेस) क्वॅक या एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापकाला मात्र आपल्या देशातील हा वेगळेपणा चटकन लक्षात येतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

दि अल्टिमेट गिफ्ट

Self help या आजकालच्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांच्या ढिगार्‍यातून खरोखरच एखादे तरी वाचनीय पुस्तक मिळू शकेल याबद्दल शंका असतानाच जिम स्टोव्हाल या लेखकाचे दि अल्टिमेट गिफ्ट हे पुस्तक हाती लागले. सोप्या व मोजक्या शब्दात आपली जडण घडण कशी असावी, आपली जीवनशैली कशी असावी, कुठल्या जीवनमूल्यांना अग्रक्रम द्यावीत, इत्यादी अनेक पैलूवर या पुस्तकात फार सुंदर मांडणी केलेली आहे. कुठलेही शब्दालंकार नाहीत, साहित्यिक टीका टिप्पणी नाही, संदर्भबंबाळपणा नाही, वस्तुपाठ म्हणून इतरांचा उल्लेख नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)

भाग १ | भाग २
ह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)

भाग १

सॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात.

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध

'नरहर कुरुंदकर' ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती - त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व - अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.

पाने

Subscribe to RSS - माहितीपर लेखन