माहितीपर लेखन

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)

भाग १

सॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात.

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध

'नरहर कुरुंदकर' ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती - त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व - अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.

मेंदूचे अंतरंग

मेंदू हे माणसाला पडलेले सगळ्यात अवघड कोडे आहे. या कोड्याचे उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेले आहे !
आपल्याला स्वप्न का पडतात? हरवून जातो? स्मरणरंजनात आपण इतके का हरवतो? सूड घ्यायची इच्छा मनात का निर्माण होते? आपण प्रेमात का पडतो? सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं? या प्रश्नाची उत्तर शोधायला जितकं खोल जावं तितकं गुंत्यात अधिकच अडकायला होतं!

समीक्षेचा विषय निवडा: 

दोन रंगकर्मी दोन आत्मचरित्रे: १ (आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड)

आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्‍याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या welcome - आनंदाने स्वीकाराव्यात अशा - ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्‍याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो. गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - माहितीपर लेखन