Skip to main content

इथे फोटो कसे चढवावेत?

नवीन सदस्यांना मदत असा ह्या धाग्याचा हेतू आहे.
फोटो चढवणं जरा कठीण वाटू शकतं. खाली दिलेली पद्धत वापरल्यास फोटो चढवणं सोपं वाटू शकेल.
इथे फोटो चिकटवण्यासाठी आधी तो फोटो जालावर असणं आवश्यक आहे. ह्याचाच अर्थ असा की तुमच्या लॅपटॉप किंवा
वैयक्तिक संगणकावरून थेट इथे फोटो टाकणं शक्य होणार नाही. जालावर म्हणजे पिकासा, फ्लिकर किंवा तत्सम
कुठल्याही साईटवर असलेला फोटो इथे चिकटवता येईल. इथे मी पिकासाचं उदाहरण घेतलं आहे.

पायरी १

पिकासा अकाउंट मध्ये लॉगिन करून अपलोड वर टिचकी मारा

पायरी १

पायरी २

हे अपलोड पेज आहे. इथे तुम्हाला तुमच्या संगणकावरून हवा तो फोटो ओढून (drag) आणता येईल.
एकदा ते केलंत की खालील प्रमाणे दिसेल

Upload 2

पायरी ३

उजव्या कोपर्‍यात खाली "OK" असं लिहिलेलं बटण आहे, त्याच्यावर टिचकी मारलीत का फोटो तुमच्या
अ‍ॅल्बम मध्ये सेव्ह होईल.
आता "Home" वर क्लिक करा. तुमचा नवीन अल्बम दिसायला लागेल. खालीलप्रमाणे:

Album

पायरी ४

हव्या त्या अ‍ॅल्बमवर टिचकी मारा, आणि अ‍ॅल्बममध्ये शिरल्यावर तुम्ही नुकत्याच टाकलेल्या फोटोवर क्लिक करा.
आता पूर्ण फोटो दिसेल. त्या फोटोवर राईट क्लिक केल्यास बरेच पर्याय दिसतील. त्यापैकी खाली दाखवल्याप्रमाणे
"Copy Image Location" असा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यावर तुमच्या फोटोचा जालावरचा पूर्ण पत्ता तुम्हाला कॉपी करता येईल.

Copy URL

पायरी ६
ह्यानंतर तुम्ही ऐसीअ़क्षरे वर लिखाण करता तिथे या आणि डाव्या कोपर्‍यात छोट्या फोटोवर क्लिक करा. खालच्या चित्रात दाखवलं आहेचः

Click Image

पायरी ७
तिथे क्लिक केल्यावर एक छोटी खिडकी उघडेल. पायरी ४ मध्ये कॉपी केलेला पूर्ण पत्ता पहिल्या चौकटीत टाका.
दुसर्‍या चौकटीत चित्राचं मोजमाप म्हणजेच लांबी आणि रूंदी नमूद करा आणि तिसर्‍या चौकटीत तुम्ही त्या चित्राला काय नाव द्यायचं आहे,
ते लिहा आणि "OK" चं बटण दाबा.

टीप: लांबी किंवा रूंदी पैकी एकच मोजमाप दिलंत तर फोटो skew होत नाही.
Step 7

तुमच्या लिखाणात आता खालीलप्रमाणे दिसेलः

img src="https://lh5.googleusercontent.com/-FazH2-fYOnc/TqNcdPldChI/AAAAAAAACCw/…" width="600" alt="Step 7" / >"

ह्याचा अर्थ असा की तुम्हाला हवा असलेला फोटो आता लि़खाणात समाविष्ट झाला आहे :)

पायरी ८

आता पूर्वदृष्य करण्याआढी "Input Format" खालीलप्रमाणे निवाडा.

Step 8

पायरी 9

आता पूर्वदृष्य करा. तुम्हाला फोटो दिसायला लागेल :)

Step ९

अशोक पाटील Sun, 23/10/2011 - 10:02

थॅन्क्स. चांगले आणि हवेसे वाटणारे मार्गदर्शन. कालपरवा ग्रीक शिल्पकलेचे एकदोन फोटो इथे चढविताना गोंधळलो होतोच, शेवटी अदिती यानी आवश्यक ते मार्ग सांगितले पण तोवर बाण निसटला होता आणि प्रतिसाद फोटोशिवायच त्या धाग्यावर अवतरला. असो.

वरील विवेचनावरून पुढील वेळी प्रयोग करून पाहतोच. मी 'फोटोबकेट' वर फोटो साठवितो. त्याचा (फो.ब.चा) वरील मार्गदर्शनात उल्लेख नाही, पण मला वाटते त्याची काही अडचण येणार नाही. फक्त फोटोच्या साईझबद्दल थोडे जादाचे मार्गदर्शन करावे. म्हणजे मला वरील प्रतिमेत ६०० x ४०० असे काहीसे दिसते, तीच साईझ 'बाय डिफॉल्ट' धरावी का ? Alternative Text असा एक विकल्प तिसर्‍या बॉक्समध्ये असतो, त्याचा नेमका काय अर्थ ? किंवा असे विचारतो की, तिथे काही टंकणे गरजेचे आहे का ?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/10/2011 - 11:35

In reply to by अशोक पाटील

फोटोबकेटमधून फोटो टाकण्यास हरकत नाही. एकदा फोटो चढवले, पिकासा, फेसबुक, फोटोबकेट, किंवा इतर वेबसाईटवरचेही, की पुढची प्रोसिजर तीच आहे.

मी नेहेमी साधारण: ४०० रूंदी देते आणि उंची टाकत नाही. फोटोच्या आकाराप्रमाणे उंची आपोआप सेट होते. 'अल्टरनेटीव्ह टेक्स्ट'चा उपयोग तेव्हा होतो जेव्हा इमेज उघडत नाही. सामान्यतः तिथे काही(बाही) लिहीलेलं चालून जातं.

क्षिप्रा, धाग्याबद्दल धन्यवाद.

क्षिप्रा Sun, 23/10/2011 - 21:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जसं अदिती म्हणते तसं, की फोटो कुठूनही टाकता येतील , म्हणजे फेसबूक , ऑरकूट वरून सुद्धा.
मेख अशी की ज्या फोटोची लिंक तुम्ही देताय तो पब्लिक असायला हवा. ह्याचाच अर्थ असा की पिकासा वगैरे वरचे प्रायवेट अल्बममधले फोटो पूर्ण लिंक देऊन सुद्धा दिसू शकणार नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/10/2011 - 03:17

In reply to by क्षिप्रा

ज्या फोटोची लिंक तुम्ही देताय तो पब्लिक असायला हवा.

मला असं वाटत नाही. प्रायव्हेट अल्बममधलीही फक्त फोटोची लिंक असेल तर फोटो मिळतात.

प्रियाली Sun, 23/10/2011 - 17:12

वाचनखुणा साठवायची सुविधा मिळाल्यास असे लेख हातासरशी मिळतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/10/2011 - 03:16

In reply to by प्रियाली

प्रियाली, हा लेख faq मधे सापडेल. सर्व प्रकारच्या लेखनाचं वर्गीकरण वर संस्थळाच्या नावाच्या खालीच, असलेल्या आडव्या मेन्यूत आहे. लवकरच वाचनखुणांची सोय करते.

प्रियाली Mon, 24/10/2011 - 03:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वर्गीकरण आहे पण पोटवर्गीकरणाची गरज वाटते (अर्थातच मस्ट नाही पण नाइस टू हॅव) जसे अनुभव, कथा, मुलाखत, स्फुट, विडंबन, रसग्रहण वगैरे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/10/2011 - 07:39

In reply to by प्रियाली

मला व्यक्तीशः त्यात एक अडचण वाटते आहे. वेगवेगळ्या लेखनप्रकारांचं वर्गीकरण वरच्या आडव्या मेन्यूमधे आहे. एवढे जास्त प्रकार असतील तर ते सर्व वर्गीकरण करून मेन्यूत टाकता येणार नाही. रसग्रहणासाठी 'समीक्षा' हा लेखनप्रकार निवडता येईल.

आता बुकमार्कची सोय आलेली आहे.

सुनील Thu, 05/07/2012 - 23:59

ह्या धाग्यावर चढवलेले काही फोटो मला दिसत नव्हते. त्यावरून राजे यांच्याशी काही खरडींचे आदान-प्रदान झाले (कारण मला दिसत नसलेले काही फोटो त्यांच्या मिमच्या सर्वरवर होते). प्रश्न सर्वरचा नाही हे सिद्ध झाले पण मला काही फोटो काही दिसत नव्हते.

थोडे R&D केल्यावर कळले की, फोटो अप्लोड करताना, अपलोड करणारांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर मला ते फोटो दिसत नाहीत. दोन्ही दिले तरच दिसतात.

हे फक्त माझ्याच बाबतीत का व्हावे? ह्याला काही तांत्रीक उपाय आहे काय?

चिंतातुर जंतू Fri, 06/07/2012 - 10:51

In reply to by सुनील

>>थोडे R&D केल्यावर कळले की, फोटो अप्लोड करताना, अपलोड करणारांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर मला ते फोटो दिसत नाहीत. दोन्ही दिले तरच दिसतात.

इंटरनेट एक्स्प्लोरर वापरणार्‍या काहींनी पूर्वी अशा तक्रारी केल्या आहेत. उदाहरणार्थ : ही प्रतिमा इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये दिसत नाही -

पण ही दिसते :

दोन्हींमधला फरक एवढाच आहे की height="" हा भाग पहिल्या प्रतिमेला चढवताना आपोआप आला होता तो मी दुसर्‍या प्रतिमेत काढून टाकला. याचा थोडक्यात अर्थ असा की इंटरनेट एक्स्प्लोररला हे असे रिकामे रकाने त्रास देतात. आता हा रिकामा रकाना आला कुठून? तर मी प्रतिमा चढवताना फक्त ४००ची रुंदी दिली होती, पण उंची दिली नव्हती. असं करण्याचं कारण म्हणजे मला धाग्यात चित्र केवढ्या आकाराचं दिसावं ते स्पष्ट करायचं होतं, पण चित्राचा अ‍ॅस्पेक्ट रेशो (म्हणजे लांबी-रुंदीचं गुणोत्तर) मूळ प्रतिमेइतकंच ठेवायचं होतं. ते तसं ठेवलं नाही तर प्रतिमेचं विरुपीकरण (डिस्टॉर्शन) होतं. उदाहरणार्थ हे पाहा :

त्यामुळे चित्र चढवणार्‍यांना ही विनंती की त्यांनी चित्र चढवताना आपोआप निर्माण झालेल्या अशा रिकाम्या रकान्यांना काढून टाकावं. आणि चित्र पाहाणार्‍यांना काही चित्रं दिसली नाहीत तर फायरफॉक्स किंवा इतर ब्राउझर वापरून पाहावेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 22/02/2015 - 08:39

In reply to by छिद्रान्वेषी

फ्लिकरच्या अल्बमची लिंक दिलीत तर प्रयत्न करून पाहता येईल. मी फ्लिकर वापरत नाही त्यामुळे अंदाज करता येत नाही.

चिमणराव Sat, 21/02/2015 - 15:23

आस्पेक्ट रेशिओ आणि संस्थळाची फोटो दाखवण्याची क्षमता याबद्दल कोणी सांगेल का ? हा प्रश्न छोटेमोठे प्रश्न इथेही देत आहे ?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/02/2015 - 21:31

In reply to by चिमणराव

सध्या फोटो इथे डकवण्याची बटणं फार यूजर फ्रेंडली नाहीत याची कल्पना आहे. आणि लवकर त्यावर उपाय करण्यात येईल.

तोपर्यंत, फोटोचा आस्पेक्ट रेशो बिघडू नये म्हणून हाईट आणि विड्थपैकी फक्त एकच पॅरामीटर देऊन, रिकामा पॅरामीटर काढून टाकला की फोटो व्यवस्थित दिसतील.

चिमणराव Sun, 22/02/2015 - 02:46

मी आयती बटणं आणि रकाने वापरतच नाही. सरळ एचटीएम एल ४ कोड वापरतो. बऱ्याच संस्थळांची लिखाणाची रुंदी ६५० पिक्सेल उणे १० समासाकरता सोडून ६४० एवढी असते उभ्या बैठकीच्या चित्राला किती रुंदी ठेवावी हा विचार येतो ?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 22/02/2015 - 08:38

In reply to by चिमणराव

माझ्या लॅपटॉपची पिक्सलमधली उंची ८०० आहे. त्याचा विचार करून मी उभ्या चित्राची उंची ७०० पेक्षा जास्त ठेवत नाही. यापेक्षा कमी उंचीची उपकरणं वापरत असतील तर त्या फोटोंचा त्रास होईल.

Nile Wed, 04/03/2015 - 22:02

In reply to by चिमणराव

एक सोपा उपायः चित्राचे मुळ पिक्सल्स पहावेत आणि नविन उंची/रुंदी देताना अ‍ॅस्पेक्ट रेशो तोच ठेवावा. अन्यथा फोटो स्ट्रेच होईल.

अजो१२३ Mon, 23/02/2015 - 10:56

इथे फोटो कसे चढवावेत?

मॉनिटरला कोणाला तरी घट्ट पकडायला सांगावे. एक स्टेनलेस स्टीलचा लांबलचक खिळा घ्यावा. एक मजबूत हातोडा घ्यावा. हाथोड्याने खिळ्यावर दणादण प्रहार करून मॉनिटरमधे (लॅपटॉप असेल तर सुलभ पडेल) भोक पाडावे. फोटोला देखिल एक वरच्या बाजूला भोक पाडावे. मग खिळ्यावर फोटो चढवावेत.

वृन्दा Mon, 02/03/2015 - 19:57

इमेजेस ची हाइट अन विड्थ देण्याची क्षमता काढून टाकली आहे का? खवत मी ज्या इमेजेस डकवतेय त्या फार मोठ्या असल्याने अंगावर येताहेत.
क्षमता पूर्ववत देता येईल का?

चिंतातुर जंतू Tue, 03/03/2015 - 14:44

In reply to by वृन्दा

>> इमेजेस ची हाइट अन विड्थ देण्याची क्षमता काढून टाकली आहे का?

त्यात थोडा बदल केला आहे. img src="****.jpg" सारखा जो एचटीएमेल कोड मिळतो त्यात अवतरण चिन्हाबाहेर आणि > च्या आतमध्ये width=रोमन अंक height=रोमन अंक देऊन उंची आणि रुंदी देता येईल.

अजो१२३ Thu, 05/03/2015 - 13:11

पिकासा ऑफिसात बॅन असेल तर दुसरी कोणती सर्वसुलभ साईट आहे जी उघडतेच. शिवाय तिथे एखादा फोटो डकवता येतो. जास्त प्रसिद्धी असली कि बॅन असते. हे सगळं किंवा अर्धं मोबाईलवर करणं किंवा तितक्यापुरता ऑफिसचा लॅपटॉप मोबाइलच्या हॉटस्पॉटला जोडणं किटकिट आहे.

चिमणराव Thu, 05/03/2015 - 17:30

Postimg dot org चांगली चालते. फक्त width द्यावी height देऊ नये म्हणजे खेचाखेच होत नाही असा अनुभव आहे. त्या साइटवर दोन अडीच एमबीचा फोटो असला तर मूळ डाइरेक्ट लिंकही द्यावी.

मुक्ता_आत्ता Mon, 28/10/2019 - 12:39

''ऐसी अक्षरे''वर व्यक्तिगत संगणकावरून थेट फोटो टाकण्याचा पर्याय न द्ण्यामागची कारणे कोणती? वेबसाईटवरून फोटो काढून टाकला गेला तर लेखातही तो दिसेनासा होतो. कधी मूळ फोटोवर काम करून (आकार बदलणे, रंग व प्रकाश सुधारणे) तो टाकावासा वाटला तर तेसुद्धा शक्य होत नाही.

ऐसीअक्षरे Mon, 28/10/2019 - 15:39

In reply to by मुक्ता_आत्ता

ऐसीच्या सर्व्हरवरची जागा वाचवणे हा एक हेतू; शिवाय, कुणाही सदस्याची फाईल सर्व्हरवर टाकणे सुरक्षेच्या दृष्टीने हितावह नाही. आजकाल गूगल, मायक्रोसाॅफ्ट ते फेसबुक, इन्स्टाग्रॅम असे पुष्कळ पर्याय सदस्यांना उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केला तर तुम्हाला हवी तेव्हा हवी तशी प्रतिमा बदलण्याचे स्वातंत्र्य तुमच्यापाशी राहते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/10/2019 - 22:55

In reply to by ऐसीअक्षरे

शिवाय बॅकप घेण्याची जबाबदारी ऐसीची राहत नाही; ऐसीच्या विदागारात फोटो नसूनही बॅकप बऱ्यापैकी मोठा होतो.

लेखात तुम्हाला नवा फोटो डकवायचा असेल तर लेखन संपादित करण्याची सोय आहे; नव्या फोटोचा दुवा दिला की झालं.

'न'वी बाजू Sat, 19/11/2022 - 06:49

In reply to by मुक्ता_आत्ता

वेबसाईटवरून फोटो काढून टाकला गेला तर लेखातही तो दिसेनासा होतो.

त्याला पर्याय आहे. फोटो ‘ऐसी’च्याच साइटवर (परंतु, स्वतंत्र इमेज फाइल म्हणून नव्हे, तर प्रतिसादाचाच भाग म्हणून; पर्यायाने, फोटोचे सगळे बाइट्स बेस-६४मध्ये एन्कोडलेल्या लांबलचक स्ट्रिंगेद्वारा प्रतिसादातच डंपून) चोरमार्गाने चढविणे. (आम्ही हा मार्ग राजरोसपणे वापरतो. मात्र, त्याला काही मर्यादा आहेत.)

‘जब तक तुम्हारा प्रतिसाद रहेगा, तुम्हारा फोटो उसीमेंच रहेगा!’

(तपशील इथे पाहा.)

चिमणराव Mon, 28/10/2019 - 14:21

थेट फोटो टाकण्याचा पर्याय न द्ण्यामागची कारणे कोणती?

- सर्वर मेमरी घेतलेली नाही.
_______________________________

- बाकी गूगल प्रत्येक जीमेल अकाउंटला १५ जीबी फ्री मेमरी देते त्याचा उपयोग करता येईल.
- तिकडे फोटो बदलून नवीन लिंक काढून इकडे संपादनाचा पर्याय आहे.
-आणि महत्त्वाचे - जे जीमेल अकाउंट गूगल प्रॉडक्टसाठी ( जीमेल, प्ले स्टोरसाठी )सेटप केलंय त्यात फोटो चढवायचे नाहीत म्हणजे डिलिट होत नाहीत चुकुन. वेबसाईटवर लॉगिन करून गूगल फोटोज मध्ये ऐसीसाठी_१, / _२/_३ वगैरे आल्बम ठेवल्यास सोपे होईल.
(( माझा अनुभव आहे, मंडळाचे उत्तर नाही. पटलं तर घ्या.))

छिद्रान्वेषी Mon, 18/11/2019 - 14:50

९ वर्षानंतर हि हे असलं सगळ कराव लागत?

चिमणराव Mon, 18/11/2019 - 20:23

गूगलच्या पोत्याला छिद्रं पाडून किंवा पडलेल्या छिद्रांतून मिळालेला रवा का वापरायचा नाही?
((२००४ मध्ये बहुतेक जीमेलला २ जीबी मेमरी दिली. आता १५ जीबी. जितक्या मेलस तेवढी मेमरी मिळतेय. कुठे का ठेवेनात - क्यारोलिना /कोकण))

स्वयंभू Tue, 10/11/2020 - 03:05

मी गेले तासभर प्रयत्न करतोय. मोबाइल आणि लॅपटॉप वरुन फोटो अपलोड करण्यासाठी पण प्रकाशित केल्यावर दिसत नाहीत रिफ्रेश करुन देखिल.
मी अपलोड करण्यासाठीचे फोटो गूगल ड्राइव्ह वर सेव्ह केले आहेत. त्याच्या लिंक कॉपी करुन, साइझ देउन, टायटल देउन काही केल्या इमेजेस दिसत नाहीत.

लिंक शेअरिंग ऑप्शन चालू आहे का बघा. नसेल तर जुन्या लिंक काढून टाका आणि लिंक शेअरिंग चालू करून परत द्या.

२)<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxxxxxx&quot; width="80%" /><br /><br />

हि रेडी टेम्प्लेट वापरा. त्यातल्या xxxx च्या जागी लिंक मधला file/d/ आणि /view मधला सगळं भाग कॉपी पेस्ट करा.

चिमणराव यांनी दिलेली शिकवण.

चिंतातुर जंतू Tue, 10/11/2020 - 15:52

In reply to by स्वयंभू

माझ्या अंदाजानुसार अद्याप फोटो खाजगी असावेत त्यामुळे दिसत नाहीएत.

चिमणराव Tue, 10/11/2020 - 16:15

शेअरिंग बरोबर झाले आहे का नाही हे तपासण्यासाठी काही साइट्स आहेत. त्या वापरून खात्री करावी.
उदा https://app.bytenbit.com/

तिथे गूगलची शेअर लिंक टाकून 'जेनरेट इमेज लिंक' काढावी. जर पब्लिक शेअरिंग झाले असेल तरच लिंक जेनरेट होते. अन्यथा चक्र फिरत राहते.

जिन्क्स Thu, 03/11/2022 - 10:48

खूप प्रयत्न करून पण हे काही जमले नाही. Piccasa बंद झाले आहे तर गूगल ड्राईव्ह वरून फोटो कसा अपलोड करावा हे चित्रांसहित दाखवून धागा अद्यावत केला तर बरे होईल

photo

ऐसीअक्षरे Thu, 03/11/2022 - 12:16

In reply to by जिन्क्स

खूप प्रयत्न करून पण हे काही जमले नाही.

आता धागा अपडेट केला आहे. प्रक्रिया थोडक्यात अशी :
हा तुमच्या फोटोचा दुवा. ही लिंक ब्राउजरमध्ये उघडली.
त्यावर क्लिक केले असता केवळ फोटो उघडला.
आता त्यावर राईट-क्लिक केले असता 'ओपन इमेज इन न्यू टॅब' किंवा 'कॉपी इमेज लिंक' असे पर्याय मिळतात. ते वापरून ती लिंक कॉपी केली. तो हा दुवा.
आता धागा अपडेट करताना त्यातला इन्सर्ट/एडिट इमेज'चा पर्याय वापरून हा दुवा तिथे दिला.

चिमणराव Sun, 06/11/2022 - 18:08

In reply to by जिन्क्स

या दोन्हिंवरून फोटो शेअरिंग करायची पद्धत वेगळी आहे.
गूगलवाले सतत बदल करत असतात.
सध्या गूगल ड्राईववरून शेअरिंग सांगायचे झाले तर लिंक कोणत्या प्रकारची येते त्यावर अवलंबून आहे.
drive dot google dot com/file/d/16acU81OsFTSwFc0gBPrBsuwH2d--Jkj . . . .
अशी ड्राईवची लिंक आली तर ती रिपेर करूनच वापरावी लागते. मागच्या सहा महिन्यांत गूगल फोटो फोल्डर हा ड्राइवचाच भाग धरला असल्याने
lh3 google user content . . . .अशीही लिंक येते ती मात्र इथे थेट वापरता येते. ( अगोदर share with anyone . . . केले असल्यास)

'न'वी बाजू Sat, 19/11/2022 - 05:32

फोटो त्रयस्थ संस्थळावर (जसे: पिकासा/फ्लिकर) न चढवता थेट प्रतिसादाचा भाग म्हणून येथे चढवायचा असेल, तरीसुद्धा एक मार्ग आहे, परंतु त्याला मर्यादा आहेत.

मर्यादा:

१. फोटो JPG, PNG, BMP, GIF यांपैकी एखाद्या प्रणालीत असावा. (ॲपल आयफोनच्या HEIC प्रणालीत असल्यास थेट चढविता येणार नाही. अगोदर JPGमध्ये बदलून घ्यावा लागेल.)
२. फोटोफायलीचा साइझ १एमबीहून अधिक नसावा.

पायऱ्या:

१. या साइटीवर जाऊन तेथे फोटोफाइल चढवावी.
२. "</show code>" बटन दाबावे. वर येणाऱ्या खिडकीत 'For use in elements:' या रकान्याखाली 'data:'ने सुरू होणारा जो मजकूर असेल (याला data url म्हणतात), तो copy to clipboard करून घ्यावा.
३. 'ऐसी'वरील मजकुरात चित्राकरिता जे Image URL ऑप्शन असते, त्या जागी हे डेटा यूआरएल चिकटवावे. (पूर्वसूचना: या डेटायूआरएलचा आकार प्रचंड असतो.)

(वरील साइटीवर फोटोफाइल साठवली जात नाही. फक्त डेटायूआरएलमध्ये कन्व्हर्ट करण्यापुरती वाचली जाते. किंवा, C# कोडिंगचे ज्ञान असल्यास आणि तितकीच खाज असल्यास असे कन्व्हर्शन स्वत: करणेसुद्धा अशक्य नाही.)

उदाहरण:
सुंदरा मनामध्ये भरली

'न'वी बाजू Mon, 06/01/2025 - 07:40

.