ललित लेखन

तत्वमसि

सृष्टी से पहले सत्य नहीं था,

असत्य भी नहीं

अंतरिक्ष भी नहीं,

आकाश भीं नहीं था

छिपा था क्या कहाँ,

किसने देखा था

उस पल तो अगम,

अटल जल भी कहाँ था

सृष्टी का कौन हैं कर्ता

कर्ता हैं यह वा अकर्ता

ऊंचे आसमान में रहता

सदा अध्यक्ष बना रहता

वोहीं सच मुच में जानता.

या नहीं भी जानता

हैं किसी को नहीं पता

नहीं पता

कधीतरी लहानपणी ऐकलेले हे शब्द लक्षात राहिले कारण they talked about something deeper. या शब्दांचा अर्थ कळायच ते वय नव्हत पण हे नक्की होत कि कधीतरी कुठे तरी अर्थ उमजेल.

समीक्षेचा विषय निवडा: 

मोनेकृत थिसॉरसातले कुरूप जिप्सी फुलपाखरू

लहानपणी मी ऐकल्याचं आठवतंय की फुलपाखरू, पाली, झुरळं इत्यादी 'निरुपद्रवी जीव' आहेत. फुलपाखरं तशी दिसायला बरी असतात. मस्त रंगीत पंख फडफडवत ती निवांत नेत्रसुख देतात. पण कुरूप फुलपाखरू एखादं असेल, तर ते सर्वथा (माणसासाठी) निरुपयोगी आहे. त्याच्या फडफडीकडे लक्षही जात नाही. गेलंच तर काय च्यायची कटकट... वगैरे मनात येऊन जातं. डिक्षनरीचा उलटा प्रकार थिसॉरस असतो. अर्थावरून शब्द शोधणे असा काहीसा. एखादं चुकार कुरूप फुलपाखरू अशा थिसॉरसावर जाऊन बसलं, की त्याच्या डोक्यात
थिसॉरस-सॉरस-डायनोसॉर-मी डायनोसॉरचा वंशज-वंशज-बघतोस काय रागानं, झेप घेतलीय टी-रेक्सनं

समीक्षेचा विषय निवडा: 

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

"सशाची शिंगे" : पुस्त‌क‌ प‌रिच‌य‌

खरं म्हणजे हे "स.शा.ची शिंगे" असं लिहायला हवं. "स.शा." हे समाजशास्त्र या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

गंगाधर गाडगीळांचा चीनचा प्रवास

काही महिन्यापूर्वी वर्तमानपत्रातील बातमी आली होती. चीनच्या Zhejiang प्रांतातील जीनहुआ(Jinhua) गावी आणि आसपासच्या भागाला भेट देऊन, त्यांच्या सांस्कृतिक पर्यटन विषयाशी निगडीत प्रकल्पाचा एक भाग होण्याची संधी त्यांनी इच्छुकांना देवू केली होती. चीनबद्दल कोणाला कुतूहल नसते. त्यांची भाषा, लिपी, खाद्य-संस्कृती अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण. भरताइतकीच प्राचीन संस्कृती, तेथील बौद्ध धर्माचा प्रसार, पोलादी पडद्याआजची कम्युनिस्ट राजवट, अवाढव्य पसरेलेली चीनची भिंत. एक ना अनेक. आपल्या दिवसाची सुरवातच मुळी चहाने होते, जो चीनमधूनच आपल्याकडे ब्रिटीशांनी आणला.

समीक्षेचा विषय निवडा: 

धुक्यातून लाल ताऱ्याकडे

ललितच्या जुलै २०१६ अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला आहे. तो मी येथे देत आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

मुक्काम: आर्मी पोस्ट ऑफिस - एक ललित लेखसंग्रह

युद्धस्य कथा रम्यः अशी एक सर्वमान्य समजूत असल्याने असेल, लष्करी आयुष्याबद्दल आतापर्यंत बरेच काही लिहिले गेले आहे.
खुद्द लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेली आत्मचरित्रे हा एक मुख्य प्रकार. अर्थात मराठीत आतापर्यंत असले लिखाण कमीच. १९६२ च्या चीन युद्धात बंदी होण्याचे भोग भोगलेल्या ले. कर्नल चव्हाण यांचे आत्मचरित्र हा एक अपवाद. जनरल एस एस पी थोरात यांचे आत्मचरित्र वाचल्याचे पुसटसे आठवते, पण खात्री देता येत नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी

इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी.

गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर

Gurudutt Cover Page

अरुण खोपकरांचं गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका हे पुस्तक अनेक वर्षं अनुपलब्ध होतं. अखेर त्याची नवी आणि देखणी आवृत्ती उपलब्ध झाली आहे. त्या निमित्तानं जुन्या आवृत्तीचा मी दिलेला परिचय पुन्हा प्रकाशित करतो आहे -

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - ललित लेखन