कथा

दुर्दैवी अंत

ही म्हटली तर लहान मुलांकरता असलेली कथा आहे, It makes a perfect sense to me.
__________________________________________________________________________________________________________________

ललित लेखनाचा प्रकार: 

गंनच भुत

मध्ये कामाची धांदल आणि कामवाली राहु गायब, एक दोन दिवस मी वाट पाहुन तिला फोन लावला तर पलीकडुन माणसाचा आवाज... मी बंद करुन पुन्हा लावला... परत तेच... मग विचारले... राहु..... राहुचाच नंबर ना?
हो
अहो राहु कामाला का येत नाही?
आम्ही गावाकडे आलोय... राहुचा मावसा रचना वरुन पडुन मेला...
काय, गंगामावशीचा नवरा ?
..............
काय काय...नीट ऐकु येईना...
अहो राहुबाई चा मावसा.... परत तेच..

ललित लेखनाचा प्रकार: 

एका चिमण्याची गोष्ट.

(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य ....)

ललित लेखनाचा प्रकार: 

आवारा कृष्णमेघ आणि दिल्लींचे रस्ते

(मराठी सृष्टीत पूर्वप्रकाशित हि कथा कॉमनवेल्थ खेळांच्या आधी लिहिली होती - या पावसाळ्यात दिल्लीच्या रस्त्यांची दशा आणि देश्यात इतरत्र घडलेल्या घटना पाहून या लेखाची आठवण झाली. कथा काल्पनिक आहे, वास्तवाची काही एक संबंध नाही).

दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरतीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्णमेघाने धरतीला तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे. असा हा मायावी कृष्णमेघ.

ललित लेखनाचा प्रकार: 

एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत

दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे.

ललित लेखनाचा प्रकार: 

बेरंग - भाग ३

फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार.

ललित लेखनाचा प्रकार: 

बेरंग - भाग २

यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक दिसतो आहे. संध्याकाळ तशी आल्हाददायक असते. दिवसभर पण नुसती काहिली. करोडोंची कंत्राटं पास करत असलो तरी आपण काम करतो ते या जुनाट सरकारी ऑफिसात. इथे एअर कंडीशनिंग नाही. डेझर्ट कूलर दिवसभर आवाज करत सुरू असतात पण जीवाची काहिली काही कमी होत नाही. झक मारली न सरकारी नौकरी धरली. नाहीतर सदाकाकाचा मोठा मुलगा. कुठल्याशा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. सांगतो की दिवसरात्र भन्नाट एसी सुरू असतात. स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करतो निवांत. बरेचदा तर घरूनच काम करतो. शिवाय अधून मधून परदेशातही जातो. जिथे जाईल तिथले फोटो आपल्याला आवर्जून पाठवतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

बेरंग - भाग १

एक कथा लिहितो आहे, कशी वाटते सांगा :
--

बेरंग

( भाग १)
--

ललित लेखनाचा प्रकार: 

.

.

ललित लेखनाचा प्रकार: 

.

.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा