कथा

खेळसारीचा खेळिया

खेळसारीचा खेळिया

ललित लेखनाचा प्रकार: 

Thought Experiment No 2

सकाळची वेळ.
साहेब आणि बाईसाहेब नाष्टा करत होते. रोबोटिक वॅक्युम क्लीनर बेडरूम झाडत होता. रात्रीची उष्टी भांडी डिशवॉशरने रात्रीच स्वच्छ करून ठेवली होती. टोस्टरने ब्रेड भाजून ठेवले होते. कॉफी मेकरने कॉफी तयार केली होती. बाईसाहेबांनी नाश्ता मांडला होता.
पण मला वाटतं दोघांचेही खाण्यात लक्ष नव्हते. एक अनामिक ताण होता दोघांच्या मनावर.
शेवटी साहेबांनी शांततेचा भंग करत म्हटलं, “अनु, आता तू काय करणार?”
“काय करू? तूच सांग. आज पहिलाच दिवस होता. आणि हे असं.”

ललित लेखनाचा प्रकार: 

स्टीमपंक चॅटबॉक्स

स्टीमपंक चॅटबॉक्स
डॉक्टर ननवरे बंगल्याच्या बागेत काहीतरी अचाट प्रयोग करत होते. त्यांनी जुन्या बाजारातून बरच काही लोखंडी सामान विकत आणले होते. त्यात काय नव्हते? त्यांत निरनिराळ्या गेजचे लोखंडी पत्रे होते, एम-५ पासून एम-३० पर्यंतचे बोल्ट होते, ओपन एंड, रिंग, सॉकेट, बॉक्स,आणि शेवटी अॅड्जस्टीबल असे स्पॅनरचे अनेक प्रकार. स्टील वायर्स. चेन्स, कप्प्या. बेअरीन्ग्स, पिस्टन आणि मॅचिंग सिलींडर, क्रॅंकशाफ्ट, क्रॅंकेस. आता मी कशाकशाची नावे लिहू डॉक्टरांनी मला ह्या सगळ्या स्टोरचा इन्चार्ज केलं. आणि हुद्दा दिला: भांडारगृह प्रमुख!

ललित लेखनाचा प्रकार: 

म्हणींच्या गोष्टी ...(८)

म्हणींच्या गोष्टी : (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

ललित लेखनाचा प्रकार: 

उतरणीच्या भेटी

दुपारचं जेवण झालं. बाईंनी मागचं टेबल आवरलं, भांडी विसळून ती जागेवर लावून ठेवली. आणि त्या, “पुढचं दार लावून घ्या. मी येते संध्याकाळी येते” म्हणून गेल्या. रामरावांनी अंगणातली खुर्ची थोडसंच उन्ह अंगावर येईल अशा बेतानं ठेवली आणि सकाळच्या पेपरमधलं शब्दकोडं सोडवायला घेतलं. मन तसं निवांत होतं, कुठे जायचं नव्हतं आणि कुणी येणारही नव्हतं. मुलं परदेशात आपापल्या ठिकाणी, त्यांचे फोन आले तरी रात्री नाहीतर सकाळीच. त्यांची बायको निर्मलाला जाऊनही आता पाच वर्ष होत होती. ती गेल्यापासून त्यांचा दिनक्रम असाच असायचा. नशिबानं बाई चांगली मिळाली होती, म्हातारपणाच्या काळ्या छायेचं अस्तित्व त्यांना जाणवतं तर होतंच.

ललित लेखनाचा प्रकार: 

ती व तो आवृत्ति २०२३

तो बहुराष्ट्रीय कंपनीत मनेजर होता तर ती एका राष्ट्रीय कंपनीत संगणकाशी छेडछाड करणारी होती.
त्याचे लठ्ठ पॅकेज होते. फ्लॅट होता. लांबलचक गाडी होती. हुशार शोफर होता.
अजून काय पाहिजे? तर सांगायचा मुद्दा असा की उणीव होती फक्त

ललित लेखनाचा प्रकार: 

ती व तो आवृत्ति१९६०

ती नेहमी येते. आजही आली होती.

संध्याकाळचे सहा वाजले. भेळवाल्याने मनातल्या मनात नोंद केली.

ती हळूहळू चालत नेहमीच्या बाकड्याकडे जाते.

तिच्या चालीत काहीही विशेष नाही. आठ महिन्यापूर्वी जशी आली होती तशी ती दररोज येते.

आठ महिन्यापूर्वी उत्साह होता. चालण्यात डौलदार संथपणा होता. उत्सुकता होती. हुरहूर होती.

आशा आणि भीति यांचा पाठशिवणीचा खेळ.

आता त्या भावना विरून गेल्या होत्या.

जिथे सागरा धरणी मिळते

तिथे तुझी मी वाट पहाते.

अस केव्हातरी अल्लड बोलणे झाले होते. तेच निभावते आहे.

वूडस आर लवली डार्क अॅंड ग्रीन

ललित लेखनाचा प्रकार: 

अवंतिकाबाईंची समाजसेवा

आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . स्वतःचा अवजड देह ( शक्यं तितक्या) चपळाईने हालवत त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच. म्हणून त्यांनी निर्मला बाईंना आले घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायऱ्या उतरून बागेत आल्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

थॉट एक्सपेरीमेंट

खयालोमे

ललित लेखनाचा प्रकार: 

उरले उरात काही..

"तुला माहित नसलेली एक गोष्ट तुला सांगतो, प्लीज ऐकून घेशील.."
"तुझ्या कपाळावरच्या बारीक आठ्या, हनुवटीवरचा आत जाऊन बसलेला सुंदर खोलगट भाग, मानेचा जरासा झोक, ओठांची ताणाने होणारी थरथर आणि संपूर्ण चेहऱ्यावर धुंदी अशीच राहणार असेल तर मी तुझ्या कितीही गोष्टी ऐकायला तयार आहे.."
"गंमत करू नकोस..ऐक, ऐक ना, माझं लग्न ठरलं आहे!"
"ओह! ही मला माहीती नसलेली गोष्ट आहे का, असंय का?"
"होय‌‌..हीच गोष्ट सांगायला मी भेटलो आहे आज.."
"तू पहिल्यांदा मला भेटलास, त्याच दिवशी ही गोष्ट मला समजली होती, फक्त ती गोष्ट कधी ऐकायला मिळणार याचीच मी वाट पाहत होतो!"

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा