कथा

सुरवंट‌

मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

काही रोचक अनुभव - ३

साधारण ७५-७६ च्या सुमारास पुण्यात शिकायला होतो, तेंव्हाचीच गोष्ट. वेळ मिळेल तेंव्हा मुंबईला जाणे-येणे व्हायचेच. अशाच एका रविवारी संध्याकाळी, व्ही.टी. ला जाऊन, डेक्कन क्वीन मधे बसलो होतो. गाडी सुटायला साधारण पंधरा मिनिटे तरी अवकाश असेल. एक, माझ्यासारखाच मध्यमवर्गीय दिसणारा, गोरटेला तरुण माझ्यासमोर येऊन उभा राहिला.

"तुम्ही पुण्याला कुठे रहाता ? सदाशिव पेठेच्या जवळ आहे का ?" मी होकारार्थी मान हलवली. (आयला, म्हणजे आपणही सदाशिवपेठी दिसायला लागलो की काय?)

ललित लेखनाचा प्रकार: 

खाली कर

सआदत हसन मंटोंच्या “खोल दो” कथेचा अनुवाद


खोल दो


अमृतसरहून स्पेशल ट्रेन दुपारी दोन वाजता निघाली आणि आठ तासांनी मुगलपुर्‌याला पोहोचली. वाटेत त्यातील काही माणसे मारली गेली. अनेक जखमी झाली. काही जण बेपत्ता झाले.

ललित लेखनाचा प्रकार: 

मराठी भाषा २०१७ लेखमाला ( अहिराणी )

मना मामाना गावमा एक डाव असं घडनं. मी तवयं धाकला व्हतू.पन मना मामा , मना दोस्त व्हता. रातले, मी मामाना जोडे जपाले जाये. तवय मना मामा माले रोज गावमा काय काय घडनं, ते सम्दं सांगे. मामाले चावयानी भलती गोडी व्हती. मामीले आयकाना भलता कटाया व्हता. म्हनिसन माले गावमा काय काय भानगडी चालु शेतस त्या बठ्ठा समजे.

ललित लेखनाचा प्रकार: 

आईसक्रीम

‘टबुडी टबुडी’ चाच (http://aisiakshare.com/node/2239) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

मालकीण

म

तोंडावरचा पदर हलला तसे सोनीचे डोळे उघडले. अंगावर आवघा जयवंत्या ओणवलेला. दोन केसाळ मजबूत हातं सोनीच्या खांद्यावर रोवलेले. जेसीबीने आर्म रोवून स्वतःला उचलावे तसा झुकलेला जयवंत जरा वर उठला.
"फुकने, दोन दिवसात पैशाची सोय बघाया सांग हांडग्याला. डीलर मागं लागलाय. डिलीव्हरी देतो म्हंतय लगीच"
"आरं करनार तरी कसं, तुझी भूक मोठी, येवढं न्हाय झेपाया त्यांस्नी."

ललित लेखनाचा प्रकार: 

इक बंगला मेरा न्यारा ....२

भाग १ : http://aisiakshare.com/node/5808

पूर्वसूत्रः-
त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली.
मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!!

दोन दिवस नुसतेच गेले. तिसर्‍या दिवशी सकाळी मुंबईहून मुलगा आला. काम सोडून यावे लागल्यामुळे थोडासा त्रासलेला वाटला. कोचावर स्थानापन्न झाल्यावर घरातल्या कुटुंबप्रमुखाने विषयाला हात घातला.

"तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी, पण इथे हिला आणि माझ्या मुलाला जरा वेगळे अनुभव येत आहेत."

"काय झालं ?" मुलाने विचारलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

इक बंगला मेरा न्यारा

तसे आम्ही या बंगल्यात अनेक वर्षं राहिलो आहोत. माझ्या वडिलांनी हौसेने चांगला प्रशस्त बंगला बांधला. तेंव्हापासून इथे रहाण्याची इतकी संवय लागली होती की चार दिवस कुठे गांवाला गेलो तरी आईला मी, परत कधी जायचं, असं सारखं विचारुन भंडावून सोडत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरगांवच्या कित्येक चांगल्या ऑफर्स मी नाकारल्या आणि आमच्या गांवातच नोकरी पत्करली. पगार थोडा कमी मिळायचा, पण मला ही जागा सोडायची नव्हती. आयुष्य तसं संथगतीने पण खाऊन्-पिऊन सुखी गेले. मुलं मोठी झाली, थोरला अमेरिकेला गेला आणि धाकटा मुंबईला गेला. थोड्याच दिवसांत त्याने मुंबईतल्या धंद्यात जम बसवला. मोठा फ्लॅट घेतला.

ललित लेखनाचा प्रकार: 

गिफ्ट ऑफ व्हॅलेंटाईन

“गेस व्हाट, मी तुझ्याकरता काय गिफ्ट आणलं असेल?” त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात टेकवत विचारलं.

“अम्…टेडी बीअर?”

“नोप. गिफ्ट तुझ्या कामात पडेल असं आहे”

”Management Ethics चं textbook?”

“असं abstract गिफ्ट देतं का कुणी बावळट.
Think something romatic .”

“चंद्र तारे तर नाही आणले न तोडून?” ती खांदे उडवत हसली. ती अशी हसली की जाम सेक्सी दिसायची.

“असं म्हटलं तरी चालेल. कारण हे गिफ्ट तुला चंद्र तारकांची सफर घडवणार आज..”

“मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं…सरळ सांग बरं काय आणलस.”

त्याने हळूच उजव्या खिशात हात घातला आणि अलगद बाहेर काढला. त्याची मूठ बंद होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

द मॉडेल मिलियनर -ऑस्कर वाईल्ड (भावानुवाद)

श्रीमंतीशिवाय सौंदर्याला किंमत नाही. प्रेम करणं हा श्रीमंतांचा प्रांत आहे, ते बेकारांचं कुरण नव्हे. गरिबाने नेहमी वास्तववादी आणि निर्मोही असावं. कमाई गलेलठ्ठ असण्याऐवजी आधी नियमित असणं आवश्यक. आधुनिक आयुष्यातली ही महान सत्ये ह्युई अर्स्किनला कधीही कळली नाहीत; बिच्चारा ह्युई! तात्विक पातळीवर विचार केला तर ह्युई हा काही फारसा महत्वाचा माणूस होता असं प्रामाणिकपणे आपल्याला म्हणता येणार नाही. तो कधीही काही ‘उच्च’ सोडा पण वाह्यात असंही काही बोलला नसावा. पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा