गद्य

दुपारच्या हळव्या आठवणी ....

दुपारच्या हळव्या आठवणी ....

ललित लेखनाचा प्रकार: 

क्षणकथा: 1

Removed

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी वाटचाल - भाग ६: आय.आय.टी. धारवाडचे आमंत्रण

मी धारवाडला पोचलो त्याच आठवड्यात तेथील आय.आय.टी.तील नवे सत्र सुरू झाले. सत्राच्या पहिल्याच दिवशी माझी गणित शिकवायची पाळी होती. मुलांच्या मनातील गणिताबद्दलची भीती तर मला कमी करायची होतीच, पण त्याबरोबरच आतापर्यंत पाठांतर करून मिळवलेले प्रावीण्य पुरेसे नसणार, स्वतः तर्कशुद्ध विचार करून व शिकवलेली प्रमेये वापरून गणिताचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत हे त्यांच्या मनात बिंबवायचे होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी वाटचाल - भाग ५ : ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठाला भेट

माझ्या पहिल्यावहिल्या भेटीत माझे ऑस्ट्रेलियन लोकांबद्दल खूप अनुकूल मत बनले. एकीकडे काही प्रमाणात परंपरेला महत्त्व देणारे तर दुसरीकडे खुल्या दिलाचे. युरोप आणि आशिया या खंडांतील वेगवेगळ्या देशांच्या लोकांनी ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात वसती केली असल्याने येथील समाजाचे स्वरूप काहीसे सर्वदेशीय (cosmopolitan) आहे, व म्हणून ते स्वागतशील (welcoming) झाले असावे.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी वाटचाल - भाग ४ : पवईच्या आय.आय.टी.त प्रवेश

आय. आय. टी.च्या माझ्या पहिल्या सत्रात मला एम. एस्सी.च्या विद्यार्थ्यांना वास्तव विश्लेषण (Real Analysis) शिकवायचे होते. हाच कोर्स मी बरोबर अकरा वर्षांपूर्वी रॉचेस्टर विद्यापीठात वास्तव चल (Real Variables) या नावाने शिकलो होतो. गंमत अशी की दोन्हींचे पाठ्यपुस्तकही तेच होते, वॉल्टर रुडिन (Walter Rudin) यांनी लिहिलेले Principles of Mathematical Analysis. फक्त माझ्या भूमिकेत बदल झाला होता. माझ्या आय. आय. टी.मधील दीर्घकालीन पेशात हा कोर्स मी अनेकदा शिकवला. एकदा कोणीतरी सांगत होते की लिमये सरांना रुडिनचे पुस्तक उलटीकडूनही पाठ आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी वाटचाल - भाग ३ : गोव्यात फेरफटका

पुण्या-मुंबईचा परिसर सोडून लांब गोव्याला जायचे होते, वेगळ्या चालीरीतींच्या व भिन्न मानसिकतेच्या लोकांबरोबर राहायचे होते. निर्मलाची पीएच.डी. संपायची होती. आमची मुलगी कल्याणी सव्वादोन वर्षांची होती. पण मनाचा हिय्या करून एका नव्या आयुष्यात शिरायचे ठरवले.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी वाटचाल - भाग २ : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये

अमेरिकेतील वास्तव्य संपवून भारतात यायचे ठरवले, तेव्हा मी काही शिक्षण-संशोधनसंस्थांकडे काम करण्याबाबत विचारणा केली होती. माझे सुदैव असे की मला तीन ठिकाणांहून नेमणुकीची पत्रे आली. मी 1969 सालच्या ऑगस्ट महिन्यात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचे पत्करले. याचे मुख्य कारण म्हणजे संशोधनास तेथे दिलेले प्राधान्य आणि त्यासाठी अनुरूप असे तेथील वातावरण.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी वाटचाल - भाग १ : अर्व्हाइन रँचवरील कॅलिफोर्निया विद्यापीठात

'गणिताच्या निमित्ताने' या लेखमालेत प्रा. बालमोहन लिमये यांनी आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात अवतरलेल्या गणिताशी संबंधित अनेकविध व्यक्तींची आणि इतर गोष्टींची ओळख करून दिली होती. या नव्या लेखमालेत गणिताच्या निमित्ताने प्रा. लिमये ज्या निरनिराळ्या ठिकाणी गेले होते अशा काही स्थळांचे दर्शन त्यांच्या नजरेतून वाचकांना घडवतील. हे काही रुढ प्रवासवर्णन नव्हे, तर सामान्य माणसाला एरवी फारशा न दिसणाऱ्या काही अनोख्या अकादमिक विश्वांची ही सफर आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

माय बॉडी, माय चॉईस

ललित लेखनाचा प्रकार: 

चांदणचुरा

आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य