कथा

कळ

तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी आणून डिलीटचा ऑप्शन वापरला. मोबाईल बंद केला. एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दाराशी ठेवला आणि कौशिकदा उठले.

ललित लेखनाचा प्रकार: 

समांतर

४ वाजून ५७ मिनीटं.
कंपनीचं आऊटपंच मशीन वेळ दाखवत होतं. काम संपवून लवकर खाली यावं तरी असं ५ वाजेपर्यंत ताटकळत थांबावं लागतं. एरवी मी नेहेमीसारखा त्या मशीनकडे पाहून हळूच एक शिवी पुटपुटलो असतो, पण आज नाही.
कारण आज तिथे ती होती. पहिल्यांदाच पाहत होतो तिला कंपनीत. कदाचित न्यू जॉईन केलं असावं किंवा कदाचित लांब कुठेतरी बसत असावी आणि आज पंचिंगला या गेटजवळ आली असावी. काही का असेना. मला घंटा फरक पडत होता. मला काळजी वेगळीच होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

वलय (कादंबरी) - प्रकरण ३

प्रकरण २ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6442
---

प्रकरण 3

ललित लेखनाचा प्रकार: 

पारुबायची खाज

पारुबायची खाज
पारुबायला एक झ्यांगडी सवय होती!

खाजकुयलीची पावडर स्वतः अंगाला लावायची, आणि 'क्काय खाजवतंय, क्काय खाजवतंय' अशा बोंबा ठोकत, अंगावरचे कपडे काढत, गावभर सुसाट धावायचे!

पारुबाय बोल्ड! तिला मानणारे चिक्कार घोळके होते.

मग काही घोळके, 'बाई इथ्थं खाजवतंय का, तिथ्थं खाजवतंय का?'असं विचारून विचारून तिला विविधांगी खाजवायचे!पारुबायला इतकं बरं वाटायचं! काय विचारू नका.

पण नंतरनंतर घोळक्यांच्या लक्षात यायला लागलं,मायला, हिला खाजवता खाजवता आपल्या हाताबोटांची आग व्हाय लागलीय.मग हळूहळू घोळक्यांनी खाजवायचे थांबवले.तशी पारुबाय जास्त आक्रस्ताळेपणा करू लागली!

ललित लेखनाचा प्रकार: 

वलय (कादंबरी) - प्रकरण २

प्रकरण 2

आता संध्याकाळ झाली होती. स्टुडीओतील सर्वांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि जायला निघाले. सीरियल मधील सून म्हणजे सुप्रिया सोंगाटे आणि त्या सीरियलचा लेखक तसेच टीव्ही आणि फिल्म्स पत्रकार राजेश पारंबे हे दोघेसुद्धा घरी जायला निघाले.

ललित लेखनाचा प्रकार: 

वलय (कादंबरी) - प्रकरण १

(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)

कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –

ललित लेखनाचा प्रकार: 

बग

फोन वाजला. उचलला. पलीकडे बॉस होता.
"अरे अमुक अमुक जरा अर्जंट सुट्टीवर गेलाय. तमुक तमुक ठिकाणी जाऊन त्याचं अर्धं राहिलेलं असं असं काम कर ना जरा"

ललित लेखनाचा प्रकार: 

कालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या.-२

सुशोभना - 2
संकेतस्थळी पुनवेची पूर्वसंध्या सुशोभनेचे संगीत नृत्य शास्त्र हास्य त्यात अनोखे रंग भरीत होते. हळुहळु पूर्वाकाशात पूर्णचंद्र मोहरू लागला. आणि थोडयाच वेळात धुंद चांदण्याची बरसात सुरू झाली. परिक्षिताला वेगळेच काही जाणवू लागले. आजवरून चंचल हसरी कामिनी, गहनगूढ स्त्रीत्व धारण करून त्याच्या सा-या अस्तित्वाला जणू आश्वासन देत आहे असे त्याला वाटू लागले सुशोभनेचा चेहेरा ओंजळीत घेऊन परिक्षिताने गंभीर आवाजात म्हटले , प्रिये आज तुझे नवेच रूप मला जाणवतेय. तू माझी प्रणयिनी नाहीस, तू माझी अंतरतमा. तुझ्याशिवाय मला अस्तित्व नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

कालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या.

सुशोभना - १
जेहेत्तेकाळाच्या ठायी, बृहदाकार वनखंडाच्या गर्भागारात एक जनपद. नांव मंडुक जनपद. नाना आकारांच्या नाना रूपांच्या जलाशयानी चितारलेल्या वनस्थलीत ते वसले आहे. मंडुक हे त्यांचे दैवत. एक महाकाय मंडुक, मानवसदृश व्यवहार, मंडुकरूप असे या दैवताचे ध्यान आहे. कधीकाळी अशाच महाकाय मंडुकापासून आपली उत्पत्ती झाली असे जनपदवासी मानतात. जळी स्थळी सारख्याच चपळतेने वावरणा-या या मानवांचा मुळपुरूष एक मंडुक असेल यावर कोणाचाही विश्वास बसतो. कारण यांचा जनवेश मंडुकासारखा, आणि गणवेशही मंडुकाचा आहे. अनायास प्राप्त झालेल्या विस्तीर्ण जलशेतीवर ते आपली उपजीविका करतात. मंडुकासारखे विहरतात.

ललित लेखनाचा प्रकार: 

रूम नंबर- 9 (गूढकथा)

आसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या “लाईफ वेलनेस सेमिनार” चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता – “तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून! “

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा