ही बातमी समजली का? - ३

भाग |

"उत्तराखंडमधल्या दुर्घटनेबद्दल अभिजीत घोरपडेंनी चांगला अनालिसिस लिहीला आहे ही बातमी समजली का?"
हा दुवा.

या दुसर्‍या प्रकारच्या बातम्यांबद्दल अनेकदा आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरंतर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असे तिथे स्पष्ट म्हटलेलेली आहे. पण, त्याबद्दल विस्ताराने लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारेच / यापैकी अनेक गोष्टिंमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बर्‍याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचेही जीवावर येते.

तेव्हा अश्या बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अश्या बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्य बातमीवर विस्ताराने चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या बातमी या धाग्यात रुपांतर केले जाईल.

दुसर्‍या भागात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

माध्यमांमधे स्त्रियांच्या आकारांची दिसणारी अवास्तव चित्रं पाहून वैतागलेल्या जेड बीलच्या प्रकल्पासंदर्भातली ही बातमी.

तिच्याच शब्दातः
टीनेजमधे मला स्वतःची किंमत काहीच नाही असं वाटत असे. मला एक्नेचा त्रास होता आणि जवळजवळ तीन वर्ष, मिणमिणता प्रकाश नसेल तर, आरशात बघू शकत नसे. गरोदरपणात माझं वजन ५० पाउंडांनी (~२३ किलो) वाढलं. यामुळे, फोटोशॉप केलेल्या स्त्रियांच्या प्रतिमांचं पूजन करणार्‍या संस्कृतीत, स्वतःचा तिरस्कार करण्याच्या भावनेत भरच पडली.

स्वतःसकट ५० स्वयंसेविकांचं फोटोशूट करून, त्यांच्या कहाण्या छापण्याचा तिचा इरादा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जेडला सपोर्ट करायला हरकत नाही, हल्ली भारतातही पोटाच्या जागी बिस्कीटे आणि दंडांच्या जागी सोटे लावणारी जमात वाढत चालली आहे, त्यात भर म्हणून काही अब्रहमी नितंबाचा उपरार्ध भाग दाखवत हिंडतात, हे पाहून बावचाळल्यासारखे/पिसाटासारखे व्यायामशाळेत जाणारे अनेक तरुण पाहिले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी वाचली. तिच्या शब्दांतलं तुम्ही भाषांतरीत केलेलं मनोगत वाचलं...
पण त्यातून बोध काय घ्यायचा ते स्पष्ट झालं नाही!!
एकदा एखादी प्रतिमा फोटोशॉप केलेली आहे हे माहिती झाल्यानंतर मग स्वतःचा तिरस्कार करण्यामागली मानसिकता कोणती?
आणि एखादी जर फोटोशॉप न केलेली खरोखरीची सुंदर (मग भले प्रतिमांचं पूजन करणार्‍या संस्कृतीच्या दृष्टीने ती सुंदर असेल) प्रतिमा दिसली तरी तिच्याबद्दल कौतुक न वाटता तिचा द्वेष किंवा स्वतःबद्द्ल तिरस्कार वाटणं यामागची मानसिकता कोणती?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा एखादी प्रतिमा फोटोशॉप केलेली आहे हे माहिती झाल्यानंतर मग स्वतःचा तिरस्कार करण्यामागली मानसिकता कोणती?

एकदा सांगून बहुदा विश्वास बसत नसावा, पण सतत भडीमार होत राहिला तर गोबेल्सनीती सफल होऊ शकते. एखादी गोष्ट नैसर्गिक नाही तरीही ती सुंदर समजली जाते म्हणून तिचा हव्यास लोक धरतात हे दिसत रहातं. जाहिराती कमी पडल्या तर कुटुंबीयही त्यात भर टाकतात. रंगरूपावरून विशेषतः मुली-स्त्रियांना जास्त टार्गेट केलं जातं. जाडगेल्या लोकांसाठी गुबगुबीत असणंच नैसर्गिक असतं, पण ते सुंदर नाही असं ठसवलं जातं. गोरी/गोरा म्हणजे सुंदर हे भारतीय समाजातलं असंच एक सरसकटीकरण. चष्मा वापरणं नैसर्गिक नाही, पण उपयुक्त, फायदेशीर आहे. चष्मा वापरणार्‍यांना, विशेषतः शाळकरी वयात, चिडवलं जातं.

प्रत्येकाची/प्रत्येकाची आपण आहोत तसे व्यवस्थित आहोत हे मान्य करण्याची तयारी नसते. प्रत्येक व्यक्तीच्या 'चामडीची जाडी' समान नसते. ही जाडी कमी असली की शरीराची नसलेली जाडीही स्वतःच्या नजरेत खटकते. त्यात भर पडते ते लेझर वापरून मेद वितळवण्याच्या किंवा चष्मा घालवण्याचा दावा करणार्‍या जाहिरातींची.

व्यक्तिशः माझ्यावर अशा गोष्टींचा फार परिणाम होत नाही. पण काही जवळच्या व्यक्तींना शरीरावर किंवा डोळ्यात लेझर मारण्यासाठी (माझ्या दृष्टीने उगाचच) उतावीळ झालेलं पाहिलं आहे.

---

या विशिष्ट गोष्टीत दुसरा भाग असा आहे की प्रसूतीआधी आणि प्रसूतीनंतर या स्त्रियांच्या शरीरात बरेच बाह्य बदलही होतात; पैकी काही फोटोंमधे दिसतही आहेत. या नव्या प्रकारच्या शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स (मराठी?) मान्य करण्याची स्वतःची तयारी होण्यासाठी वेळ लागू शकतो. गर्भारपणात स्त्रीचं फार कोडकौतुक होतं, ज्याची तिला सवय होते. पण प्रसूतीनंतर बहुतेक लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात, शरीरातली हॉर्मोनपातळी बदललेली असते. अशा स्थितीत बदल सहन करण्याची मेंदूची तयारीच कमी झालेली असू शकते.

गर्भारपणात आई-वडलांची तयारी करून घेताना कोणीही अशा प्रकारच्या बदलांबद्दल नवपालकांशी बोलत नाही. अशा प्रकारे आपलं (किंवा पार्टनरचं) शरीर पहाणं हा प्रकारही धक्कादायक असू शकतो.

---

जेडसारख्या व्यक्तींना यातली व्यर्थता (बहुदा आपण होऊनच) काही काळानंतर लक्षात येते. आपण निष्कारण ज्या गोष्टीचा त्रास करून घेतला तसा त्रास इतरांना होऊ नये किंवा तो कमी व्हावा यासाठी ती करत असणारे प्रयत्न आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>एकदा सांगून बहुदा विश्वास बसत नसावा, पण सतत भडीमार होत राहिला तर गोबेल्सनीती सफल होऊ शकते.
बुल*ट!!!!! ज्यांची मनं अपरिपक्व/ कमजोर असतांत तेच या विकृतीला बळी पडतात.....
त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे पण ती एक मानसिक विकृती आहे. त्यासाठी सगळ्या समाजाचीच सौंदर्यानुभूती का बदलायची?

>>दुसरा भाग असा आहे की प्रसूतीआधी आणि प्रसूतीनंतर या स्त्रियांच्या शरीरात बरेच बाह्य बदलही होतात;
मान्य! पण ते बदल सुंदर नसतात असं कुठंय? डेमी मूरचा ती गर्भवती असतानांचा फोटो फेमस आहे. त्यात ती गर्भवती असतांनाही सुंदरच दिसते.
सारांश जे सुंदर असतात ते सुंदर दिसतातच. त्यांना पर्वा नसते जग त्यांना सुंदर म्हणतंय की नाही त्याची! प्रश्न इतर(!) लोकांचा असतो...

तुम्ही काहीही म्हंटलंत तरी 'फोटोशॉप' केलेली प्रतिमा, मग ती स्त्रीची असो वा पुरुषाची, ती बघून स्वतःचा तिरस्कार करणं ही मानसिक विकृती नव्हे काय?
सगळ्या गोष्टींबद्दल समाजाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण (इतका अवघड स्वाध्याय कठीण असेल कदाचित अशा व्यक्तिंसाठी!) करणं जास्त श्रेयस्कर नाही काय?
बो डेरेक आता पन्नाशीत आली तरी विलक्षण सुंदर दिसते. (माझ्या गावात रहाते, तिला जॉगिंग करतांना पहातो त्यावरून हे विधान करतो!!) स्त्रीच्या सुंदरतेचा वयाशी, गर्भवती असण्या-नसण्याशी, मेनॉपॉझ आला असण्या-नसण्याशी संबंध नसतो. सुंदरता (जर श्रम करून राखली तर) ही सुंदरताच असते....

आणि मुख्य मुद्दा म्हणजे जर कोणी अशी स्त्री स्वतःचा तिरस्कार करत असेल तर बाकीच्या "जुन्या अणे जाणित्या" स्त्रियांनी त्यातलं फोल लॉजिक तिला समजावून सांगणं हे त्यांचं कर्तव्य नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांची मनं अपरिपक्व/ कमजोर असतांत तेच या विकृतीला बळी पडतात.....
त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे पण ती एक मानसिक विकृती आहे. त्यासाठी सगळ्या समाजाचीच सौंदर्यानुभूती का बदलायची?

विकृती हा शब्द तीव्र वाटतो; विकार असू शकेल. पण विकार आहे हे मान्य केल्यावर त्यासाठी उपाय करायला हवा. शरीराकडे, स्वतःच्या रंगरूपाकडे पाहून (किंवा इतरही काही कारणांमुळे) नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास अशा प्रकारची छायाचित्र पाहून वाढू शकतो. निदान आपल्यासारखे चार लोक आहेत याचा बराच सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

रहाता राहिली बो डेरेक. माझ्या आजूबाजूच्या कोणत्याही आया हिच्यासारख्या दिसत नाहीत. त्यामुळे मला बो डेरेक इत्यादी स्त्रिया कधीमधी कृत्रिमच वाटतात. किंचित स्थूल दिसणार्‍या, ओटीपोटाचा भाग थोडा मोठा असणार्‍या स्त्रियाच लहानपणापासून आजूबाजूला दिसत आल्या आहेत. आजही आजूबाजूला पाहिल्यावर बहुतांश स्त्रिया अशाच दिसतात. मुलं असोत वा नसोत, व्यवस्थित पोषण मिळणार्‍या बहुतांश स्त्रिया गुबगुबीत दिसतात. (उत्क्रांतीचा परिणाम.)

त्यातून जेडच्या पुस्तकामुळे बो डेरेकवर काही परिणाम होईलसं वाटत नाही.

बाकीच्या "जुन्या अणे जाणित्या" स्त्रियांनी त्यातलं फोल लॉजिक तिला समजावून सांगणं हे त्यांचं कर्तव्य नाही काय?

जेड हेच तर काम करते आहे. शब्दांच्या जागी तिचे फोटो बोलतात एवढंच.

या फोटोंपैकी १५ नंबरचा फोटो मला फार आवडला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>रहाता राहिली बो डेरेक. माझ्या आजूबाजूच्या कोणत्याही आया हिच्यासारख्या दिसत नाहीत. त्यामुळे मला बो डेरेक इत्यादी स्त्रिया कधीमधी कृत्रिमच वाटतात. किंचित स्थूल दिसणार्‍या, ओटीपोटाचा भाग थोडा मोठा असणार्‍या स्त्रियाच लहानपणापासून आजूबाजूला दिसत आल्या आहेत.
तुम्हाला म्हणून सांगतो....
बो डेरेकच्याही ओटीपोटाचा भाग थोडासा दिसतो. पण तोही सुंदरच दिसतो!!!!
पण ती तुम्हाला कृत्रिम का वाटते? तिने तिचं सौंदर्य टिकवलंय जे तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांनी टिकवायचे श्रम घेतलेले नाहियेत म्हणून? (हे स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे तर पुरूषांच्या बाबतीतही तितकंच सत्य आहे)
तिने जे श्रमपूर्वक टिकवलंय त्याचं कौतुक करण्यापेक्षा तिला "कृत्रिम" म्हणणं हे आजूबाजूच्या बायकांना जास्त सोईस्कर आहे म्हणून?
माझी हरकत इथेच तर आहे. जे सुंदर म्हणा, किंवा इतर कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ म्हणा, आहे ते तसं आहे म्हणून कबूल करण्यापेक्षा त्याला 'कृत्रिम' किंवा अन्य काही नांव देऊन मोडीत काढणं जास्त सोपं असतं का?
जेंव्हा एखादी व्यक्ती सौंदर्याच्या,किंवा आणखी कुठल्याही संदर्भात, श्रेष्ठ दिसली की तिचं कौतुक करून ती तिथे कशी पोहोचली, आणि मी काय केलं की मला तिथे पोहोचता येईल याचा विचार न करता त्या व्यक्तिला काही तरी दूषणात्मक नांव देऊन तिची संभावना करणं हे कितपत योग्य आहे?

>>स्त्रियाच लहानपणापासून आजूबाजूला दिसत आल्या आहेत.
जरूर! पण त्या सगळ्या सुंदर आहेतच हे गृहीतक जरासं धाडसी होईल नाही का?
म्हणजे सुंदर असणारी स्त्री ही थोडंसं ओटीपोट असलं तरी सुंदरच दिसते. हे मान्य! पॅरीसच्या म्यूझियममधल्या अनेक चित्र-शिल्पांमधून हे सहजच उमजतं!!!
पण जस्ट बिकॉज ओटीपोट आहे म्हणून ती स्त्री सुंदर मानावी हे पटायला कठींण!!! काय म्हणता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, या स्त्रिया त्यांच्या फिगरमुळे सुंदर किंवा असुंदर वाटत नाहीतच. सपाट पोटं आणि स्ट्रेचमार्क्सरहित त्वचा हे सुंदर असण्याचं एकमेव (किंवा दोनमेव) परिमाण नाही.

---

सगळ्यांची शरीरं सारखी असतात असंही नाही. एकाच वयाच्या, एकाच प्रकारची जीवनपद्धती असलेल्या दोन स्त्रियांची (किंवा पुरुषांचीही) शरीरं सारख्या प्रकारची नसतात, नसणार. मग एका ठराविक साच्यात दिसतं तेच सुंदर आणि पर्यायाने बाकीचं कुरुप अशा प्रकारचा प्रकार पद्धतशीरपणे जाहिराती, मॅगझिन्समधून चालताना दिसतो. आणि हा जो साचा आहे त्यात फिट होणं अनेकांना शक्य नसतं.
साच्यात बसणार्‍या लोकांना कुरुप म्हणा असं जेड सुचवते आहे असं या बातमीवरून मला वाटलं नाही. पण साच्याबाहेरही सौंदर्य आहे. चकचकीत मॅगझिन्समधे ते दिसत नाही म्हणून प्रथमदर्शनी ओबडधोबड वाटू शकतं, पण तरीही ते सुंदरच आहे. या सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवण्यात हे पुस्तक मदत करेल अशी अपेक्षा आहे.

---

चिंतातुर जंतूने लिहीलेली लेखमाला - मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>मग एका ठराविक साच्यात दिसतं तेच सुंदर आणि पर्यायाने बाकीचं कुरुप अशा प्रकारचा प्रकार पद्धतशीरपणे जाहिराती, मॅगझिन्समधून चालताना दिसतो. आणि हा जो साचा आहे त्यात फिट होणं अनेकांना शक्य नसतं.
साच्यात बसणार्‍या लोकांना कुरुप म्हणा असं जेड सुचवते आहे असं या बातमीवरून मला वाटलं नाही. पण साच्याबाहेरही सौंदर्य आहे.

इथे परत माझं नेहमीचं मत मांडतो.

अमूक एक प्रकारचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य याप्रकारच्या कल्पनांचा भडिमार उदारीकरण/जागतिकीकरण याच्या सुरुवातीनंतर [टीव्ही आणि त्यावरील जाहिराती] आले आहे असे काहीतरी सुचवले जात आहे असे वाटले. परंतु तसे काहीही नाही. सौदर्याची स्पेसिफिकेशन्स कालिदासाच्या काळीही होती आणि नंतरही होती आजही आहेत. पुष्ट स्तन/केळीच्या खोडासारख्या मांड्या/केतकीसारखी कांती वगैरे स्पेसिफिकेशन्स खूपच जुनी आहेत.

पूर्वीच्या काळी ही स्पेसिफिकेशन होती पण त्यासाठी आटापिटा केला जात नव्हता का? केला जात होताच. केस लांब असणे हे सौंदर्याचे लक्षण आणि त्यासाठी शकुंतला हेअर ऑइले बाजारात होतीच, त्यांच्या जाहिराती होत्याच. आणि तसे लांब केस नसतील तर लग्नाच्या बाजारात भाव कमी हेही वास्तव होते.

तसे केस व्हावेत म्हणून केलेल्या खटाटोपांच्या नातेवाइकांमधल्या कहाण्या ऐकल्या आहेत आणि कुणाचे केस लांब/रेशमी असल्याने तिने तोरा मिरवणेसुद्धा पाहिले आहे. त्यावेळी त्या इतरांना न्यूनगंड येत असेलच.

---------

या प्रकारच्या विशिष्ट कल्पनांचा पुरुषांवरही पगडा असतो हे मुक्तसुनित यांनी सांगितले आहेच.
---------

अशा कल्पनांच्या प्रचाराच्या भडिमाराने व्यक्तीने न्यूनगंड बाळगावा का? बिलकुल बाळगू नये असे म्हणणे सोपे आहे. पण त्यासाठी शारीरवैशिष्ट्यांच्या पलिकडचं काही वैशिष्ट्य/कर्तृत्व मिळवणं आवश्यक आहे. मी बुटका आहे पण माझ्याकडे शैक्षणिक डिग्री आहे. म्हणून मला बुटके असण्याचा न्यूनगंड न बाळगणे परवडते. (आणि तसा अंदाज आला असल्यामुळे माझी उंची वाढावी म्हणून मला दिल्या जाणार्‍या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू शकलो). त्याचप्रमाणे मला कुठल्याही खेळात प्राविण्य (प्राविण्य सोडा सामान्य गती) नसणेही खपून गेले. ज्यांना अशा प्रकारच्या इतर गुणवैशिष्ट्यांची खात्री नाही किंवा संधी नाही अशांना कदाचित शारीरसौंदर्य हेच थोड्याफार यशाचे साधन वाटू शकते आणि त्यांच्यात तसे शारीरसौंदर्य नसल्यास न्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत.

न्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे तरिही(तरिहि) अशा सौंदर्य कल्पनांना 'हाड' म्हणायला शिकवणे गरजेचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे तरिही(तरिहि) अशा सौंदर्य कल्पनांना 'हाड' म्हणायला शिकवणे गरजेचे आहे.

अगदी अगदी.. हॉलिवुडमधून आयात झालेली फिगर बेस्ड सौंदर्यकल्पना "हाड" या शब्दानेच सर्वोत्तमरित्या वर्णिली जाऊ शकते.. हाडं असं अनेकवचन केल्यास अधिकच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमूक एक प्रकारचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य याप्रकारच्या कल्पनांचा भडिमार उदारीकरण/जागतिकीकरण याच्या सुरुवातीनंतर [टीव्ही आणि त्यावरील जाहिराती] आले आहे असे काहीतरी सुचवले जात आहे असे वाटले. परंतु तसे काहीही नाही. सौदर्याची स्पेसिफिकेशन्स कालिदासाच्या काळीही होती आणि नंतरही होती आजही आहेत. पुष्ट स्तन/केळीच्या खोडासारख्या मांड्या/केतकीसारखी कांती वगैरे स्पेसिफिकेशन्स खूपच जुनी आहेत.

जागतिकीकरणाआधी प्रतिमांचा भडीमार फार प्रमाणात होत नसावा; अर्थात घरी-दारी मिळणारे टोमणे, कॉमेंट्स याची उणीव भरून काढत असतील.
निदान भारताचा विचार करता, अशा प्रकारे लोकांना त्यांच्या रंग-रूप, उंची, कौशल्य इ. संदर्भात कमी लेखू नये याची जाणीव जागतिकीकरणानंतर अधिक प्रबळ झाली का? 'फेअर अँड लव्हली' वापरल्यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढला आणि ती एअर होस्टेस होण्याऐवजी पायलट झाली, अशा अर्थाच्या जाहिराती दिसतात तशीच त्यावर टीका झालेलीही दिसते. एकेकाळी जेडसारख्या लोकांना टीका करण्यासाठी, वेगळं काही सांगण्यासाठी माध्यमच उपलब्ध नव्हतं.

हवी-हवीशी जीन्स
घालू न देणारा कॉम्प्लेक्स.

मी, आता समजलं ना भारतीय कपड्यांचं महत्त्व! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या प्रतिसादाशी अंशतः सहमत आहे पण,

पण ती तुम्हाला कृत्रिम का वाटते? तिने तिचं सौंदर्य टिकवलंय जे तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांनी टिकवायचे श्रम घेतलेले नाहियेत म्हणून? तिने जे श्रमपूर्वक टिकवलंय त्याचं कौतुक करण्यापेक्षा तिला "कृत्रिम" म्हणणं हे आजूबाजूच्या बायकांना जास्त सोईस्कर आहे म्हणून?

मुद्दा असा आहे की 'टिकवणे' म्हणजे नक्की काय? आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे अथवा आपल्याला झेपेल तसा व्यायाम करणे, चांगली जीवनशैली स्विकारणे वगैरे मुद्दे मान्य आहेत आणि अलिकडच्या काळातल्या, माझ्या आजुबाजूच्या बहुतांश स्त्रिया हे करतातच असा अनुभव आहे पण असे करूनही त्यांची शरीरे नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवरील स्त्रियांसारखी दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा (फोटोशॉप करून अथवा शस्त्रक्रियेसारखे मार्ग वापरून बनविलेल्या शरीरांच्या) प्रतिमांचा भडिमार करून सामान्य स्त्रीच्या मनात कमीपणाची भावना तयार करण्याचा उपद्दव्याप चालला असताना, खरया स्त्रीयांची शरीरे कशी दिसतात हे दाखविण्याचा प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. अदितीने दिलेल्या बातमीत हेच केले गेले आहे, त्यातील स्त्रीचे शरीर न टिकविल्यामुळे किंवा आळशीपणाने बेडौल झालेले नाहीय तर ते मातृत्वाच्या आणि काळाच्या खुणा उघडपणे स्विकारल्याने वास्तववादी (तरीही सुंदर) झालेले आहे. ही नवीन सौंदर्यदृष्टी इतरांनाही मिळावी हा त्याचा उद्देश्य दिसतो, जो नक्कीच स्तुत्य आहे.

प्रसुतीनंतर लगेचच खूप व्यायाम करून वजन घटविणे स्त्रीच्या आरोग्यासाठी हितावह नसल्याचे वैद्यकीय मत असतानाही, अनेक प्रसिद्ध व्यक्ती, आपण प्रसूतीपश्चात किती वेगाने किती वजन घटविले याची जाहिरात करून इतर नुकतेच मूल झालेल्या स्त्रीयांवर दडपण आणतात आणि त्याला प्रसारमाध्यमे साथ देतात ही वस्तुस्थिती आहे.
विचार करणार्या किंवा विनोदबुद्धी असणार्या स्त्रीयांना असे काही वाटत नाहीत उलट त्या अशीकविता लिहितात.
मेहेनत करणारया आणि आपले सौंदर्य नैसर्गिक मार्गांनी टिकविण्याचा प्रयत्न करणारया Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मातृत्वाच्या आणि काळाच्या खुणा उघडपणे स्विकारल्याने वास्तववादी (तरीही सुंदर) झालेले आहे. ही नवीन सौंदर्यदृष्टी इतरांनाही मिळावी हा त्याचा उद्देश्य दिसतो, जो नक्कीच स्तुत्य आहे.

सहमत आहे.
माझा रोख एखादी सुंदर व्यक्ति पाहिल्यानंतर स्वतःला हेट करण्याच्या मानसिकतेविरूद्ध होता. आणि तो अदितीला समजलाय तेंव्हा, "सीताकान्तस्मरण जयजयराम".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्तुत गमतीची कविता रा. रा. पिवळा डांबिस यांना समर्पित करतो आहे. मात्र कवितेतील पुरुषपात्रवजा व्यक्तीची वर्णने त्यांना उद्देशून/समोर ठेवून/निर्देशून/उद्मेखून केलेली नाहीत याची नोंद घ्यावी हेवि.

शीर्षक : "कॉम्प्लेक्स"

पडलेलं टक्कल सुटलेलं पोट
आणि ज्याचं यमक जुळवलं
तर भावना दुखावतील
त्याच्याबद्दलही वाटणारी खोट.

या सार्‍या खोटींच्या
सायकोसोमॅटीक ज्यूसेसच्या
गंगाजमनी मीलनाचा
काशीप्रयाग कॉम्प्लेक्स.

डोक्यावर नाहीत म्हणून
कानात आहेत म्हणून
केसांबद्दलचा कॉम्प्लेक्स.

(तरी बरं पुरंध्रींच्या
ट्रिमिंगच्या नियमित त्रासाचा
छळत नाही कॉम्प्लेक्स.)

पोटावरच्या वळ्यांचा कॉम्प्लेक्स
मॅनबूब्जचा कॉम्प्लेक्स
नसलेल्या एट-पॅक्सचा
"अंकल टाईप" कॉम्प्लेक्स.

बीचबॉडी नसल्याचा कॉम्प्लेक्स
पूलवर पापडासारखं कधी
पडू न शकल्याचा कॉम्प्लेक्स.

वन एट हंड्रेड नंबर मधून
विकला जाणारा कॉम्प्लेक्स
पलाटे आणि योगामधून
घाम ढाळतो कॉम्प्लेक्स.

झुंबा डान्स च्या अ‍ॅडमधून
थिरकतो कॉम्प्लेक्स
टायबोच्या सीडीज् मधून
गरजतो हा कॉम्प्लेक्स

डझनावारी बिलियन्सचा
धंदा देतो कॉम्प्लेक्स.
अनेक कॉर्पोरेशन्सचा
अ‍ॅन्युअल रिपोर्ट सुधारतो कॉम्प्लेक्स.

स्वामी तीन्ही जगाचा
कॉम्प्लेक्समुळे भिकारी.
खातानाच्या घासाची
चव मारणारा कॉम्प्लेक्स.

गप्पांना बसलो तरी
गप्पांमधेही कॉम्प्लेक्स
कोण काय बोलतो त्यापेक्षा
निरखला जातो कॉम्प्लेक्स

म्युझियममधे नि सिनेगृहात
नाटकादरम्यान मैफलीमधे
कुजबुजतो हा कॉम्प्लेक्स
क्लासिक्स असो वा कॉमिक्स
लोळत पडून वाचताना अचानक
आठवलेला कॉम्प्लेक्स.

कॉम्प्लेक्सची जाणीव असेल तर
"शेप"मधे नसण्याचा कॉम्प्लेक्स
कॉम्प्लेक्सची जाणीव नसेल तर
निष्काळजीपणाचा कॉम्प्लेक्स
कॉम्प्लेक्स म्हणजे काय माहीत नसेल तर
"पोपट ठरण्याचा" कॉम्प्लेक्स.
आणि हा कॉम्प्लेक्स नाही म्हणून दाखवताना
सेल्फ डेप्रिकेशन होते म्हणूनचा कॉम्प्लेक्स

जळिस्थळी काष्ठीपाषाणीं,
अगदी हे लिहितानाच्या क्षणीसुद्धा
मिष्किल टप्पल मारून गेलेला
कॉम्प्लेक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तुमची कविता वाचली.
एक कविता म्हणून आवडली असं म्हणवत नाही तरी पण तुमचे स्वतःचे कॉम्प्लेक्सेस समजले....
तुम्हाला ही कविता आम्हाला समर्पित करायची अचानक उर्मी का आली ते मात्र समजत नाही.
खुलासा केलांत तर बरं होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावना पोचल्या.

प्रस्तुत चर्चेत मार्मिक मते मांडल्याबद्दल कविता तुम्हाला समर्पित केली असे समजा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माझी मतं मार्मिक आहेत की सत्य हे तर ऐसी अक्षरेचे सर्व सभासद ठरवतीलच....
तुमच्या प्रतिसादाला त्यांनी 'खवचट' अशी श्रेणी देलेली आहेच!!! Smile
मी फक्त एकच मत मांडलं होतं की जगात एखादी सुंदर (किंवा इतर अन्य कोणत्याही कसोटीवर श्रेष्ठ) गोष्ट दृष्टीपत्तात आली तर त्याची प्रामाणिक कबुली न देता स्वतःलाच हेट करण्याची प्रव्रूत्ती निंदाजनक आहे, इतकंच!!!
आणि ती प्रवृत्ती जर आढळली तर समाजातल्या 'जुन्या आणि जाणित्या' लोकांनी ती त्या व्यक्तिसंदर्भात दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, सारांश त्या सेल्फ हेटिंग व्यक्तिला शहाणं केलं पाहिजे, इतकंच!!
त्यात काही चूक आहे असं अजूनही मला वाटत नाही....
पण तरीही तुम्ही जो कवितात्मक प्रतिसाद मुद्दाम आम्हाला समर्पित करून दिलाय त्याचा संदर्भ लागत नाही...
त्याचा खुलासा कराल तर समर्पक उत्तर द्यायला बरं होईल.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी तुमच्या अभिप्रायाला काहीही रेटिंग न देताच अचानक तुमच्या अभिप्रायाला मी,
"You have already moderated this comment as सर्वसाधारण."
हे जमवणं एखाद्या सिस्टम अ‍ॅडमिनलाच ( मिसळपावच्या भाषेत एखाद्या संपादकालाच) ठाऊक!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जमवणं एखाद्या सिस्टम अ‍ॅडमिनलाच ( मिसळपावच्या भाषेत एखाद्या संपादकालाच) ठाऊक!!!

चोक्कस!! माझे खाते तर २ प्रतिसादात ब्लॉक केले....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त!

२ पैसे माझेही, तुमच्याएवढे एकनंबरी नाहीत, पण ते असो. -

प्यांटमधे कोंबलेला
पण गंजी/टी मधून
डोकावणारा कॉम्प्लेक्स.

हवी-हवीशी जीन्स
घालू न देणारा कॉम्प्लेक्स.

सिनेगृहात, बसमधे, विमानात
आपल्या सीटपर्यंत तोंद नेताना
तोंड खाली घालायला लावणारा कॉम्प्लेक्स.

फोटो एडिट करताना,
टक्कल उडवायला लावून,
कपाळावर हात मारणारा कॉम्प्लेक्स.

नीलकमलच्या खुर्चीवर बसताना ती तुटल्यामुळे एकदा,
पुढच्यावेळेस जमिनीवरच फतकल मारुन बसायला लावणारा कॉम्प्लेक्स,
आणि उठताना टेकवायला एखादा हात जास्त असता तर बरं झालं असतं,
असं वाटायला लावणारा कॉम्प्लेक्स.

लिफ्टच्या सहा लोकांसाठी असलेल्या जागेत,
उरलेल्या तिघांचा तो लूक नकोसा करणारा कॉम्प्लेक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझेही दोन पैसे.

तीर्थ कॉंप्लेक्स, क्षेत्र कॉंप्लेक्स |
देह कॉंप्लेक्स देह पूजा कॉंप्लेक्स ||१ ||
खाता कॉंप्लेक्स, पिता कॉंप्लेक्स |
बंधू कॉंप्लेक्स मित्र कॉंप्लेक्स ||२ ||
टीव्ही कॉंप्लेक्स टीव्हीमॉडेल्स कॉंप्लेक्स |
कायम कॉंप्लेक्स, अविरत कॉंप्लेक्स ||२ ||
राजा म्हणे मज कॉंप्लेक्स पछाडला|
म्हणुनी उद्दिष्टांना वाण नाही ||४ ||

जर कुठलेच कॉंप्लेक्स नसतील तर जगण्यात अर्थ राहील का? उद्दिष्टं इतक्या तीव्रतेने जाणवतील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्तुत गमतीचे चित्र मुक्तसुनित आणि पिवळा डांबिस यांना समर्पित करतो आहे. मात्र चित्रातील बालके त्यांना उद्देशून/समोर ठेवून/निर्देशून/उद्मेखून टिपलेली नाहीत याची नोंद घ्यावी हेवि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखादी गोष्ट नैसर्गिक नाही तरीही ती सुंदर समजली जाते म्हणून तिचा हव्यास लोक धरतात हे दिसत रहातं.

यावरून 'ग्रॉस नॅशनल हॅपीनेस' (GNH) बघणारं भुतान आठवलं. तिथे फॅशन शोज ना बंदी आहे. टिव्हीदेखील सेन्सॉर होतो. त्याचं कारण काय तर "त्या शोज मध्ये दिसणार्‍या कमनीय बांध्यांच्या स्त्रिया बघुन सामान्य पुरूषाला आपली शेतातील राबणारी पत्नी तुलनेने कमी सुंदर भासु शकते आणि मग आपली पत्नी "तशी" किंवा "तितकी" सुंदर नाही म्हणून तो दु:खी होऊ शकतो. जे GNH कमी करते" Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कसलेही फोटो चांगले येऊ शकतात...फोटोग्राफरचं म्हणून जे कसब असत ते त्यालाच म्हणतात. शिवाय ब्यूटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर वगैरे म्हणतातच. मग हे फोटो काही आणखीन वेगळ्या रितीनी खास वाटले नाहीत. बाई आहे म्हटलं की तिचे शारिरीक सौन्दर्य न्याहाळले पाहिजे असं काहीसं वाटलं फोटो बघून. नुसते फोटो म्हणून पाहिले असते इतर प्रस्तावने शिवाय तर कदाचित वेगळं मत झालं असतं.
(असे पुरूषांचेही फोटो काढायला हवेत तिने...पोट सुटण्याआधी आणि नंतर वगैरे. जाहिरातीतले पुरूष रिअ‍ॅलिस्टिक/हेल्दी/नॉर्मल शरीरयष्टीचे असतात का?)

(फोटोग्राफरचा मुद्दा कळला...पण त्यातला स्त्रीवादी (वा तत्सम काहीसा) दृष्टीकोन आवडला/(पूर्णपणे) पटला नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदींनी उत्तराखंडपासून १ की २ दिवसांत १५००० लोकांना रेस्क्यू केल्याची बातमी वाचली असेलच. तिचा पर्दाफाश करणारे विश्लेषण आलेय अखेरीस टेलिग्राफमध्ये. उत्तम विवेचन आहे.

गुजराती कसे ओळखणार? असा प्रश्नही पडणे साहजिक आहे. पण मराठी ओळखता येतात हे या बातमीवरून तर दिसतेच. तस्मात गुजराती कसे ओळखायचे यापेक्षा किती लोक वाचवले हाच मोठा इश्श्यू असावा. या दुसर्‍या लिंकबद्दल येथील सदस्य पिशी अबोली यांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तीन शक्यता आहेत.

१. मोदींना डिसक्रेडिट करण्यासाठी कोणीतरी ही खोटी/अतिशयोक्त बातमी मुद्दाम प्लॅण्ट केली.
२. मोदींच्या पीआर एजन्सीचा सेन्स ऑफ प्रपोर्शन गंडला आहे.
३. १५००० हा आकडा मुद्दाम टाकला असेल. नंतर "१५००० अतिशयोक्ती असेल पण काहीतरी केलेच" असे म्हणता येईल असा विचार असेल. "१५००० नसले तरी एक जरी सोडवला असेल तरी ते ग्रेटच आहे" असे आर्ग्युमेंट काल वाचले.

प्रत्यक्षात मोदी अडकलेल्या लोकांपर्यंत गेलेच नाहीत. त्यांनी डेहराडूनला पोचलेल्या (अगोदरच सुटका झालेल्या) लोकांची काही सोय केली असण्याची शक्यता आहे.

अतिअतिअवांतर : बर्‍याच वेळा भारत सरकार शत्रूला चोख प्रत्युत्तर देत नाही याचे कारण "आपल्या लष्करात आपल्याला वाटतो तेवढा दम नसण्याची शक्यता" असे मी आणि काही समविचारी लोक म्हणतात. मोदींनी दोन दिवसात १५००० लोकांची सुटका करून आमचे म्हणणे प्रूव्ह केले असे म्हणावे काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शक्यता क्र. २ तथ्याला सर्वांत जास्त धरून वाटते आहे. आणि प्रत्यक्षात मोदी स्वत: अडकलेल्या लोकांपर्यंत जाणे शक्यच नाही हे तर सरळच आहे.

बाकी लष्कराबद्दल काय बोलावे? त्याच्या भाकर्‍या आम्ही भाजल्या नाहीत कधी Wink वाटतो तितका दम नसण्याची शक्यता अर्थातच नाकारता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतातलं पहिलं डॉमिनो किडनी ट्रान्सप्लांट काल झालं (२५ जून).

http://www.mumbaimirror.com/mumbai/others/First-domino-kidney-transplant...

कमाल आहे त्या चाळीस डॉक्टरांची, आणि तितकीच कमाल त्या नॉन्-डॉक्टर टीमचीही, ज्यांनी हे तुफान को-ऑर्डिनेशन केलं.

काय टाईम मॅनेजमेंट असेल.

ही डॉमिनो चेन जुळवून आणणं हे एक आव्हान.

नंतर प्रत्यक्ष सर्जरीच्यावेळी एकाच दिवशी समांतर ऑपरेशन्स करणं आणि तीही अगदी परफेक्टली टाईम्ड... कारणः

एकाची किडनी काढून थेट दुसर्‍याला-- त्याच्या नातेवाईकाची किडनी त्याचवेळी तिसर्‍याला-- असं करत करत माळ पूर्ण करत पहिल्या नातेवाईकाच्या रुग्णाकडे यायचं.

परस्पर विश्वास, रिस्कची तयारी, उच्च शल्यक्रिया कौशल्य असे कितीतरी काही काही यात आहे.

एकाने जरी ऐनवेळी बॅकआउट केलं, किंवा अपयश आलं तर सगळा डॉमिनो कोलॅप्स होऊ शकतो. एकाच वेळी सर्जरी करण्याचं हेही एक कारण असणार. आपल्या रुग्णाचा आउटकम पाहून मग आपली किडनी पुढच्याला डोनेट करणं असा चॉईस देऊन उपयोग नाही.

जबरदस्त.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कौतुक आहेच पण
अस एका वेळेस करावच का ???
नेहमीच्या पद्धतीने ऑपरेशन केले असते एकामागे एक तर काय फरक पडला असता का ? चेन रिअरेंज करता आलीच असती की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या अ-तज्ञ विचारांनी मला असं वाटतं की कदाचित खालील दोन कारणं असावीतः

१. एकत्रित / जवळजवळ एकावेळी शस्त्रक्रिया केल्याने एका व्यक्तीमधून काढलेल्या किडनीचा दुसर्‍या व्यक्तीत रोपण करण्याच्या मधला कालावधी कमीतकमी ठेवला जात असावा. कितीही प्रिझर्वेटिव्ह टेक्निक उपलब्ध असलं तरी थेट ताज्या प्रत्यारोपणाचा ऑप्शन नक्कीच जास्त इष्ट असणार.

२. ही एक चेन रिअ‍ॅक्शन आहे. अशा वेळी मधे अनेक दिवस गेले तर शस्त्रक्रियेचा परिणाम स्पष्ट होईल. काहीजणांबाबत अपयशही दिसेल. एखादा मृत्यू / अवयव रिजेक्शन होऊ शकत असावं. अशा वेळी हा परिणाम पाहून झाल्यावर एखाद्या डोनरने पुढच्या व्यक्तीला किडनी देणं नाकारलं तर संपूर्ण साखळी तुटेल. म्हणून एकाचवेळी सर्व ऑपरेशन्स करुन ही शक्यता कमी होत असावी.

३. बार्टर स्वरुपाचा व्यवहार (गिव्ह अँड टेक) असल्याने आपण किडनी देणं आणि (त्याबदल्यात) आपल्या रुग्णाला अन्य दात्याकडून किडनी परत मिळणं यामधे काळाची गॅप पडणं हे कोणालाच आवडणार नाही. इस हाथ ले, उस हाथ दे, अशी इच्छा बर्‍याच प्रमाणात असणारच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे. आधी म्हटल्याप्रमाणे मे महिन्यातील डीएनएमधील बातमी बघा. इथे म्हटल्या प्रमाणे पाचापैकी एक राजस्थानाधील होता आणि त्याला अश्या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये भाग घेणे नाकारले गेले होते (जी विनंती अधिक विदा देऊन पुन्हा अर्ज केल्यावर मंजूर झाल्याने परवाच्या बातमीत म्हटले आहे.)

परवाच्या बातमीत इथे म्हटल्याप्रमाणे:
For an organ transplant, blood and tissue of donor and recipient must match. If they don’t, a domino transplant is necessary. It is a series of surgeries where each donor gives an organ to a recipient not related to him/her, while the donor’s relative needing an organ gets it from a recipient’s relative. A previous attempt to perform a five-pair domino transplant failed when a recipient died while waiting for permission from the state.

ठळक केलेल्या वाक्यांवर येथील डॉक्टर सदस्यांकडून किंवा वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत व्यक्तींकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहिती कर्ता लै लै ढण्स!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय.. संबंधित टिमचे आणि रुग्णांचेही अभिनंदन!
याबद्दल (असे ऑपरेशन होणार आहे का झाल्याची ते नक्की आठवत नाही) एक बातमी डीएनॅमध्ये काहि आठवड्यांपूर्वी वाचली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोकसत्तात ही बातमी आहे. इथल्या अनेक सदस्यांना कदाचित उपयुक्त ठरू शकते. तूर्तास बातमीचा पाठपुरावा करणे, इतकेच करू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदी आणि उत्तराखंड- अजून एक बातमी. मोदी द ग्रेट असे दिसते यावरून तर Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या हिरोंची बातमी वाचा/ऐका/पहा, मोदी किस झाड की पत्ती है.

लोकांना विमानाने प्रवास घडवण्यासाठी नेत्यांना एवढे आतुर पहिल्यांदाच पाय्ले ब्वा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून. आजची ठळक बातमी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गे (आणि लेस्बियन) लोकांच्या संदर्भातील दोन निर्णय:
१. डिफेन्स ऑफ मॅरेज अ‍ॅक्ट मधल्या तरतुदी: यात लग्नानंतर मिळनार्‍या काही टॅक्स संदर्भातील फायद्यांमधून गे-मॅरेज केलेल्या लोकांना वगळले होते. त्या वगळणार्‍या तरतूदी रद्द केल्या आहे. याचा मला समजलेला अर्थ असा: ज्या राज्यांमधे (उदा: बॉस्टन?) गे लोकांनी लग्ने केलेली आहेत त्यांना इन्कम टॅक्स मधल्या ज्या सवलतींचा लाभ घेता येत नव्हता तो आता घेता येइल.
http://www.cnn.com/2013/06/26/politics/scotus-same-sex-main/index.html?h...

२. कॅलिफोर्निया च्या प्रोपोझिशन-८ बद्दलः
२००८ च्या निवडणुकीत कॅलिफोर्नियाच्या मतदारांनी गे लोकांच्या लग्नाला बंदी घातली होती. ती नंतर एका 'कोर्ट ऑफ अपील्स' ने घटनाविरोधी ठरवली. त्यावर कॅलिफोर्निया राज्याने हरकत घेतली नाही, पण कॅलिफोर्नियातील काही लोकांनी सुप्रीम कोर्टाकडे अपील केले.
http://www.cnn.com/2013/06/26/politics/scotus-prop-8/index.html

सुप्रीम कोर्टाचा हा दुसरा निर्णय प्रत्यक्ष लग्नांबद्दल काहीच म्हणत नाही. फक्त अशा (कोर्टाच्या) निर्णयाविरूद्ध लोक खाजगीरीत्या अपील करू शकत नाहीत, एवढेच सांगितले. पण त्यामुळे आधीच्या कोर्टाने फेटाळलेली बंदी कायम झाली, व कॅलिफोर्नियामधे आता गे मॅरेज कायदेशीर होईल.

निर्णय समजण्यात काही चुका असतील तर जरूर सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कॅलिफोर्नियामधे आता गे मॅरेज कायदेशीर होईल.
हे खरं आहे आणि त्याबद्दल गे कम्युनिटीचे हार्दिक अभिनंदन!!!!
पण कॅलिफोर्नियातील जनतेने मतदानानुसार अस्वीकार केलेला हा कायदा तिच्या डोक्यावर कोर्टाने जबरदस्तीने लादलेला बघून कॅलिफोर्नियातल्या मतदार जनतेची कॅलिफोर्नियातल्या गे लोकांविषयी काय भावना/वागणूक राहील?
ते संबंध सौख्याचे, सौहार्दाचे राहतील काय?
लोकशाहीत नुसता कायदा करून भागत नाही हो, मनं वळवायला लागतात.....
नाहीतर अ‍ॅन्टीरेसिस्ट कायदा आहेच की हो, पण साऊथमध्ये जाऊन बघा....
किंवा अ‍ॅन्टीकास्टिझम कायदा आहेच की हो पण ग्रामीण भारतात जाउन बघा.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकशाहीत नुसता कायदा करून भागत नाही हो, मनं वळवायला लागतात.....

कायदा पुरेसा आहे असे वाटते. या निर्णयापूर्वी मतदार जनतेची गे लोकांविषयीची भावना सौख्य व सौहार्द्राची असून या निर्णयामुळे या सौख्य व सौहार्द्राला ठेच पोहोचली आहे असे वाटत नाही. या निर्णयाचा गे कम्युनिटीला फायदाच झाला आहे. भारतातही मने वळवायची वाट बघत बसले असते तर दलितांना व स्त्रियांना शिक्षण अजूनही मिळाले नसते. कायदा करुन एका झटक्यात लाखो लोकांना सरळ करता येते. ते 'हळूहळू' मने वळवत बसले तर जन्मात होणार नाही.

असो, यावरुन चांगदेव चतुष्टय मधील नामदेवचा 'हळूहळू वाल्यांबाबतचा' डायलॉग आठवला. मात्र पुस्तक समोर नसल्याने पूर्णपणे लिहिता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीचा प्र का टा आ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीचा प्र का टा आ.

मी तो वाचला होता. 'अतिमाजुरडा' अशी श्रेणी देण्या सारखा होता. काढून टाकलात हे बरे केलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समलैंगिकांच्या लग्नासंदर्भात 'द अनियन'मधली बातमी आवडली, विशेषतः शीर्षक.
Gay Marriage Opponents Warn Supreme Court Ruling Could Put Nation On Slippery Slope To Rationality

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'बाजारात तुरी अन भट भटणीला मारी' किंवा 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' या म्हणी आठवाव्यात अशा एका बातमीबद्दलचा उहापोह -
http://www.firstpost.com/business/upas-gas-price-move-isnt-reform-it-is-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दै. लोकसत्तामधे आज आलेली एक बातमी (प्रथम पानावरच):

http://www.loksatta.com/mumbai-news/step-father-raped-girl-142301/

इथे घोळ दाखवून दिल्यावर ऑनलाईन बातमीत बदल होईल अशी शक्यता नाकारता येत नसल्याने तेवढा भाग चोप्य पस्ते करुन ठेवतो इथे. प्रिंटेड पेपरचा स्कॅन मारुन अपलोड करण्यापेक्षा ऑनलाईन लिंक दिली आहे.. कारण तिथेही तोच शब्द आहे:

सावत्र बापाने आपल्या मुलीवर बलात्कार आणि मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नालासोपारा येथे घडला आहे. नालासोपारा पोलिसांनी बलात्कारित बापाला अटक केली असून त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आजच्या लोकसत्तातच दोन नंबरच्या पानावर आलेल्या अजून एका बातमीचं हेडिंगः

अमुक अमुकवर पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप

सूक्ष्म बाब अशी की अपहरण झालेली स्त्री ही अन्य व्यक्तीची (फिर्यादीची) पत्नी आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूक्ष्म बाब अशी की अपहरण झालेली स्त्री ही अन्य व्यक्तीची (फिर्यादीची) पत्नी आहे..

याला म्हणतात, "आ म्हैस, मुझे मार!!!"
Smile
(सर्व ऐअ वाल्या सन्माननीय वैग्रे पत्नींनी ह. वैग्रे घ्यावे ही विनंती!!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पर्यटनविश्वातील न्यूज वॉच / फॉलो करणार्‍यांसाठी.. केसरीतून बाहेर पडलेल्या एम.डी. वीणा पाटील यांनी घोषित केलेली वीणा वर्ल्ड ही टुरिझम कंपनी आजपासून सुरु झाली आहे.

केसरीमागचा, विशेषतः केसरीच्या प्रगतीच्या काळातला "ब्रेन" म्हणजे वीणा पाटीलच असल्याने त्यांची ही नवीन कंपनी उत्कृष्टरित्या मॅनेज केली जाईल अशी खात्री वाटते.

आज पेपरमधे पूर्णपृष्ठाकार जाहिराती वाचून लक्षात आलं. veenaworld.com अशी वेबसाईटही दिसते आहे. चांगली बनवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वीणावर्ल्डसोबत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मनात धाकधूकही आहे. बघू काय होते ते....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वेबसाईटवर माहिती आहे, पण बुक करा हे बटन आणि तत्सम बटने Disabled आहेत असं दिसलं.

म्हणजे प्रत्यक्ष हपीसात जाऊनच बुक करायला लागणारसे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या रविवारच्या कोणत्याशा पुरवणीत (बहुदा 'पुणे-सकाळ'ची) याच तैंचा लेख होता. आमी कित्ती कित्ती कष्ट करत आहोत असे त्याचे स्वरूप होते. पण फक्त नाव ठरवण्यात घालवलेले २-३ महिने आणि त्यानंतर एपॉस्टॉपी एस नको म्हणून वीणा वर्ल्ड असे घेतलेले (निर्बुद्ध) नाव यामुळे योग्यतेबद्दल फारसे चांगले मत झाले नाही.

असो. एकूणातच भुतानसारखे बॅगपॅकिंग व/किंवा स्वतंत्र टुरिस्टांना मनाई करणारे देश/विभाग सोडल्यास या पर्यटन कंपन्यांच्या नादीच लागत नसल्याने लेखाकडे व बातमीमध्ये स्वारस्य घेतले नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वीणा वर्ल्ड असे घेतलेले (निर्बुद्ध) नाव>>>

हळू बोला, निर्बुद्ध कोणाला म्हणताय? ते नाव माननीय, आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी फायनल केलेले आहे. पुन्हा वाचा, हाच तो (जाहिरातवजा) लेख - http://www.veenaworld.com/sunday-article/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या ३२ वर्षांत बांधलेल्या मार्गांपैकी निम्मे मार्ग एण्डीए सर्कारने बांधलेले आहेत असे एका याचिकेअंतर्गत कळते. यूपीए १ व २ च्या साधारण १० वर्षांत १६००० किमीचे रस्ते बांधले गेले पण १९९७-२००२ या ५ वर्षांत २३००० किमी रस्ते बांधले गेले.

बातमी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक बालसुलभ शंका :सरकारी यंत्रणेने आर्टीए खाली दिलेली माहिती / कोर्टात सादर केलेली अ‍ॅफिडेविट यांमध्ये थापा मारलेल्या चालत नाहीत काय? मारल्या तर त्या कशा उघडकीला येणार? कोण उघडकीला आणू शकते? :tired:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म तेही आहेच म्हणा. पण ही माहिती थाप असावी असे वाटण्यास काही विशेष कारण आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणती माहिती थाप आहे असे वाटते. ९७-२००२ वाली की यूपीए १-२ वाली? Wink

एक गोष्ट खरी की हायवे निर्मितीत प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपची कल्पना याच काळात (एन डी ए) रुजली. त्यापूर्वीसुद्धा हायवे हे खाजगी ठेकेदारांकडूनच बांधून घेतले जात. पण त्याचे फंडिंग पूर्ण सरकारी असे. नव्या व्यवस्थेत फंडिंग खाजगी आणि तो खर्च वापरकर्त्यांकडून टोलस्वरूपात वसूल करणे ही कल्पना सरसकट उचलली गेली. फंडिंग खाजगी झाल्यामुळे सरकारी खात्यांतर्गत सँक्शन वगैरे बाबींचा जाच उरला नाही. त्यामुळे हायवे निर्मितीचा वेग वाढला हे खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माहितीकरिता धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सरकारी यंत्रणेने आर्टीए खाली दिलेली माहिती / कोर्टात सादर केलेली अ‍ॅफिडेविट यांमध्ये थापा मारलेल्या चालत नाहीत काय?

हा कायद्याने गुन्हा आहे. पण समाजात असे गुन्हे अनेकदा घडतातच नै का? Wink

मारल्या तर त्या कशा उघडकीला येणार? कोण उघडकीला आणू शकते?

आता सीबीआयने आधी आपल्या अ‍ॅफिडेविटमध्ये थाप मारली की हे अ‍ॅफिडेविट कोणालाही दाखवलेले नाही. मिडीयाने बिंग फोडल्यावर कोर्टाने अजून एक अ‍ॅफिडेविट करायला सांगितले ज्यात शपथेवर खरे काय ते सांगावे. तेव्हा सीबीआय फिरले व सांगितले की अश्विनीकुमार आणि अ‍ॅटर्नी जनरल वगैरेंना हे दाखवले Blum 3

तेव्हा थापा मारलेल्या चालत नसल्या तरी त्या मारल्या जाताताच. काही उघड होतात काही चालुन जातात. (हाफिसांत नै का काहि खरेच आजारी असतात काही आजारपणे प्लान करतात. त्यातले काही पकडले जातात काही नाही Wink )

आणि तसे तर काय मनमोहनसिंग आसामचे रहिवासी आहेत ही एक कायदेशीररित्या सिद्ध करता येणारी गोष्ट असली तरी पण प्रत्यक्षात एक थापच आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे वाक्य पाहून शाळेतल्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतील संहत सल्फ्युरिक अ‍ॅसिड भरगच्च घातलेल्या ट्यबची आठवण तरळून गेली. खालच्या लिखाणाला फ्लो नाही, पण आशय गोड मानून घ्यावा.
१. एनडीएचे सहा आणि काँग्रेसचे ९ (त्यातही डाटा ७-८ वर्षांचार असणार) म्हणजे १५ वर्षे झाली. आता उरलेली १७ कशामुळे अभ्यासली आहेत?
२. दोन सरकारांचा रोड सेक्टर चा performance तुलना करण्याचा बातमीचा हेतू असावा.
३. १९९७-२००२ पर्यंत भाजप सरकारने जांभई पण नीट दिली नव्हती. ऑफिसात जाऊन बसण्याचा चान्स फार कमी.
४. महामार्ग वाढणे म्हणजे काय? खाली दिलेल्या लिंकवर पान ९ वर महामार्ग किती वाढले हे लिहिले आहे. असे
http://morth.nic.in/showfile.asp?lid=839 या लिंकवर १९५१ ते २०११ पर्यंत कोणत्या प्रकारचे रोड कितीने वाढले ते लिहिले आहे. तर मंडळी १९९१ ते २००१ पर्यंत ते ७२% ने वाढले आहेत आणि २००१ ते २०१२ पर्यंत ते २३% नी वाढलेले आहेत. वायपेयी सरकारचं एकही रोड बांधकाम २००१ मार्च ला पूर्ण झालं नव्हतं. चू भू दे घे. तर महामार्ग वाढणे म्हणजे राज्य मार्गाचे नाव बद्लून राष्ट्रीय महामार्ग ठेवणे. राज्यसरकारला हे रोड सांभाळणे (म्हणजे आर्थिक दृष्ट्या, तसे केंद्राचे महामार्ग ही तेच 'सांभाळत' असतात) म्हणजे खजिन्याला कटकट वाटते. ते ही बला केंद्र सरकारच्या गळी लोटायला बसलेलेच असतात. म्.प. सरकारचे काही कि मी राष्ट्रीय महामार्ग denotify झाले म्हणजे त्याला असले रोड सांभाळायची हौस आहे.
५. बांधणे म्हणजे काय? आणि काय बांधले म्हणजे किती बांधले म्हणायचे? आपल्याकडे पृष्ठभाग (काळा?) नसलेले एकपदरी नॅ हायवे आहेत. तिथे 'सरफेस' देणे पासून ते बायपास बांधणे ते ओव्हरब्रिज बांधणे, ते २- च्या ४च्या ६ च्या आठ लेना करणे याला ही बांधणे म्हणता येऊ शकते.
६. तत्वतः प्रकल्पला मंजूरी देणे, प्रकल्प मंजूर करणे, डीपीआर बनणे, त्याला अनुदाने मिळणे,इ ला बांधणे हा शब्द तितकासा साजत नाही. प्रकल्प पीपीपी किंवा इतर कंत्राटदाराला अवार्ड होऊन करारावर सही होणे हीही एक मोजायची पद्धत आहे. मग दिलेल्या वेळी तो बांधून पूर्ण होणे...सरकार बांधणे शब्दाचा बराच कंफ्युजिंग असा वापर करते.
७. अशा प्रश्नांसाठी सरकार वेगळी मोजणी करत नाही. http://morth.nic.in/showfile.asp?lid=369 या लि़ंकवर आपल्याला लक्षात येईल की बातमीदाराने ९००० कि मी २००२-२००७ चा अख्खा एक प्लॅन पिरियड गायब केला आहे.

कोण किती रस्ते बांधले हे महत्त्वाचं नाही, रस्ते बांधले म्हणजे

नक्की

काय केलं हे महत्त्वाचं. वायपेयी सरकारने (कुदळी फावडे वापरुन ??)बरेच रस्ते बांधले म्हणून 'राजेकीय विचारधारेचा संबंध' न ठेवता त्या माणसाठी १-२ टाळ्या वाजवल्या पाहिजेत. या क्षेत्रातल्या या सरकारच्या सर्व उपलब्धी वाखाणण्यासारख्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे वाक्य पाहून शाळेतल्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतील संहत सल्फ्युरिक अ‍ॅसिड भरगच्च घातलेल्या ट्यबची आठवण तरळून गेली.

हे काय समजलं नाही. बाकी प्रतिसाद माहितीपूर्ण आहे, धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सामान्य वाचक समजेल कि इतक्या कि मी लांबीचे रस्ते सरकारांनी 'नव्याने अस्तित्वात आणले' आहेत. नक्की काय केलं आहे हे सांगण्याकरता बातमीदाराने पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही. ते द्यायला जायचं तर या एका ओळीसाठी एक रिपोर्ट बनवावा लागेल, इ म्हणायचं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओक्के.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचे आज अंधेरी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. मधुमेह आणि पायाच्या गँगरीनमुळे त्रस्त असलेल्या तारे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, या आजारातून ते सावरले नाहीत. अखेर आज दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाईट वाटलं ही बातमी कळल्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी वाचून वाईट वाटलं आणि इथे टाकायला आलो...
सतीश तारे म्हणजे काही अशोक सराफ नव्हे किंवा गेलाबाजार लक्ष्या.. की ज्यांना खूप मोठी कामं मिळाली किंवा खूप लोकप्रियता मिळाली.
पण त्यांची कामं युनिक होती..
जितक्या वेळा वळूची आठवण येते तितक्या वेळा तो "त्या कोंबड्या असतात ना कोंबड्या अशा डाललेल्या. त्या डुरक्यानं कशा उडवल्या याचा मी येकमेव आयइटनेश हाय!" हा झकास सीन आठवतो.
बरेचसे छोटे रोल जे थोडे वेगळे होते. त्यांनी त्यांच्या शैलीत केले.
मधुमेह, गँगरीन, लिव्हर या गोष्टी नको त्या सोर्सकडे बोट दाखवतात .. आणि वाईट याचं वाटतं की चंदू पारखी, सतीश तारे अशी गुणी माणसं थोडेफार चमकून या वाटेनं का जातात. त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच नैसर्गिक क्षमतेला न्याय दिला नाही असं वाटतं.. किंवा बरेचदा संधीही मिळाली नाही.
असो..
श्रद्धांजली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी वरचा धागा जसाच्या तसा उचललाय,
आवरा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सकाळ द निर्लज्ज!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एखाद्या वृत्तपत्राने 'ऐसी अक्षरे' वरचा धागा जसाच्या तसा उचलणे हा ऐसी अक्षरे' चा बहुमान आहे. 'सकाळ' ने तो उचलणे हा ऐसी अक्षरे' चा अपमान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

इशरत जहाँ फेक एन्काउंटर केसविषयी जे बातम्यांमधे वाचलं तेवढ्या मजकुरावरुन निम्ननिर्दिष्ट समजुती झाल्या. अधिक माहिती कुठे उपलब्ध झाली असल्यास/ चर्चा झाल्यास जास्त प्रकाश पडेल.

१. गुजरात पोलीस आणि स्थानिक इंटेलिजन्स ब्युरो यांनी इशरत हिला अन्य तीन जणांसोबत पकडून काहीकाळ वेगवेगळे ठेवून मग त्यांची हत्या केली.
२. याला एन्काउंटरचे रुप दिले.
३. सीबीआयने या प्रकरणी दिलेल्या चौकशीनंतरच्या रिपोर्टात ही माहिती आहे.
४. कालपर्यंत फक्त "एन्काउंटर फेक" आहे पण त्या चारजणांच्या अतिरेकी असण्यानसण्याबद्दल सीबीआयने प्रकटीकरण करावे अशी न्यायालयाची सक्ती नाही असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे सीबीआयने केवळ एन्काउंटर प्री-प्लॅन्ड होता इतकीच माहिती + आरोप केला.
५. आज केवळ इशरत अतिरेकी नव्हती असं सीबीआयने म्हटलं आहे असं छापून आलं आहे. बाकीच्या तिघांच्या अतिरेकी असण्या-नसण्यावर कन्फर्मेशन किंवा टिपणी नाही.
६. इशरत ही त्यातील एकाची एम्प्लॉयी होती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती त्याच्यासोबत होती. (एम्प्लॉयी असल्याकारणाने १९ वर्षाची मुलगी आपल्या एम्प्लॉयरसोबत गावोगाव दौर्‍यावर जाण्याची आवश्यकता असणे अशा स्वरुपाचा कोणता व्यवसाय होता हे स्पष्ट नाही)

कोर्टाच्या दॄष्टीने : ते चौघे किंवा तिघे अतिरेकी असले किंवा नसले तरीही त्यांना पोलीसांनी प्लॅन करुन संपवणे हे बेकायदेशीर आहे, अतएव ते अतिरेकी होते किंवा नाही या वास्तवाने काही फरक पडणार नाही.

जनतेच्या दृष्टीने (कदाचित) :

शक्यता १. ते सर्व अतिरेकी नसून साधेसुधे सामान्य नागरिक होते.

जनमतः पोलीसांनी चार निरपराध लोकांना केवळ बळीचा बकरा किंवा कोणालातरी सजा दिली असा भास देण्यासाठी मारले. केवळ नावे मुस्लिम असल्याने. हे निर्घृण तर आहेच पण खर्‍या अतिरेक्यांना न पकडता निरपराधांना मारुन केवळ कारवाईचा भास उत्पन्न केल्यामुळे अत्यंत भीतीदायक आणि असुरक्षित आहे.

शक्यता २. ते सर्व अतिरेकी होते.

जनमतः पोलीसांनी एन्काउंटर केला हे खरं. पण कायद्याच्या हाती त्यांना देऊन किती वर्षे कालापव्यय झाला असता. ठरवून एन्काउंटर करणे हे क्रूरपणाचंच आहे पण तरीही ते अतिरेकी होते याची पोलीसांना खात्री पटली होती असं असेल तर एन्काउंटर केला हे तितकंही चुकीचं नाही.

शक्यता ३. इशरत वगळून बाकीचे अतिरेकी होते.

जनमतः अरेरे.. सुक्याबरोबर ओलंही जळतं. अतिरेक्यांशी संगत करावी लागली आणि हकनाक बळी गेली बिचारी.

आणखी एक जनमत असंही असू शकतं की भले कायदेशीर कारवाईला वेळ लागेल, पण जे काही व्हावं ते कायदेशीर.

आणि कोणी म्हणेल की मोदींना अडचणीत आणण्यासाठी हे सर्व होत आहे.

आणखीही असंख्य व्हर्शन्स असतील. त्या सर्व आपापल्या परीने योग्य वाटू शकतील.

प्रश्न असा की ते लोक अतिरेकी होते किंवा नाही (पोलीसांना तशी भक्कम माहिती आणि पुरावा मिळाला होता की नाही) या माहितीला काहीच महत्व नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हीच म्हटल्याप्रमाणे, लोकमताच्या आवृत्त्या अनेक. माझी नोंदते -

महत्त्व आहे. पण पोलिसांना केवळ अशा माहितीवरून, न्यायव्यवस्था बाजूला सारून एखाद्या माणसाचा जीव घेण्याचे सर्वाधिकार मिळणार असतील, तर माझं आयुष्य अशा व्यवस्थेत किती अधिकृतपणे असुरक्षित आहे, या माहितीला माझ्याकरता त्याहून अधिक महत्त्व आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एक नोंदवण्यासारखी रोचक गोष्ट अशी की वर्षानुवर्षे कायदा हातात घेऊनच दुर्जनांचा नायनाट करता येतो असा संदेश देणारे चित्रपट मेजॉरिटीत होते. बहिणीच्या चितेवर कोणत्यातरी नाग, बिल्ला, ठकराल वगैरेंना चुन चुन के मारण्याची शपथ घेणार्‍या सरळसोट बटबटीत कथांपासून ते अब तक छप्पन, शूटआउट अ‍ॅट ..,अशा अनेक छटांच्या कथा, शेवटी जेव्हा पोलीस नामक कोणालाच नको असलेल्या घटकाला शर्यतीत गाठून नायक थेट वार करुन खलनायकाला संपवतो तेव्हा प्रेक्षकांना एक समाधानाचा विस्फोट प्राप्त होतो. (क्लायमॅक्स).. "कसा चिरडला त्या नराधमाला" असा आनंद मिळतो. आणि गंमत म्हणजे शेवटी आलेले पोलीस सौजन्यपूर्ण चेहर्‍याने नायकाला बेड्या घालतात.. तेव्हा प्रेक्षक सुटकेचा निश्वास टाकतो.. (खलनायकाची गोळी खाण्याऐवजी नायक सुखरुप पोलीसांच्या हाती लागला. आता तो कायद्याच्या हाती आहे. म्हणजे सुटलाच..!! खलनायक मात्र बरोब्बर मेला..)

त्याचवेळी माध्यमांतून काय दिसतं?:

-कायद्याच्या दारी किती वर्षे कोण फाशीच्या रांगेत जिवंत आहे.

-अनेकांना चिरडून मारलेल्या कोणा सुपरहिरोची साताठ वर्षांनी उभी राहिलेली नवसाची सुनावणी त्या दिवशी आलेल्या पावसामुळे थेट पुढच्या महिन्यात कशी ढकलली गेली.

-पोटच्या पोरीला मारल्याचा आरोप असलेल्या कोणा आईबापांची केस दोन वेगळ्या कोर्टात आणि एकाहून अधिक बाबतीत आणि दहापेक्षा अधिक कलमांत अशी काही गुरफटली आहे की त्यापेक्षा च्युईंगगममधे बरबटलेले केस सोडवणं जास्त सोपं दिसावं..

-चौदा आरोपांपैकी तीन आरोप यंदा मागे घेतले, उरलेल्यातले चार पुढच्या वर्षी खारिज झाले.. बाकीच्यांसाठी त्याच्या तिसर्‍या वर्षी आरोपनिश्चिती झाली.. त्याच्या पुढच्या वर्षी खालच्या कोर्टाने उरलेल्या चारही आरोपांसाठी प्रत्येकी चारचार वर्षे अशी सोळा वर्षांची सजा दिली पण ती एकत्र भोगायची असल्याने कालावधी चारच वर्षे झाला. त्यावरही वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी इतक्या महिन्यांची मुदत दिली आहे. दोन वर्षांनी वरच्या कोर्टाने सजा कायम केली पण सरकारला ती पूर्ण सजा माफ किंवा कमी करण्याचा हक्क आहे. त्यामुळे त्या गुन्हेगारासमोर अद्यापही अनेक पर्याय आहेत. त्याचे वकील सर्व पर्याय तपासून पाहात आहेत.. अशी मंदपणे चाललेली कहाणी

आपण क्रिएटिव्हिटीला बांध घालू शकत नाही. पण अगदी शंभरातल्या नव्व्याण्णव म्हणाव्या इतक्या सामान्य जनमानसाला कायद्याचा फायदा कळावा तरी कसा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यवस्था (पक्षी: कायदा) राबवण्यात अनेक कारणांनी अपयश येत असतं. ती कारणं दूर करण्यासाठी बोंबाबोंब करणं आणि त्या अपयशाच्या भीषणपणाकडे बोट दाखवून हे अन्याय मुदलात ही व्यवस्था असल्यामुळेच होतात अशी ओरड करणं यांत एक मूलभूत फरक आहे.
व्यवस्था राबवण्यात कितीही अडथळे असले, व्यक्तीनं दिलेल्या हिरॉइक न्यायाहून ती कितीही प्रभावहीन भासत असली, व्यक्तीच्या झटपट न्यायाहून कितीही मंदगतीनं चालत असली... तरीही दुर्बळ - निर्धन - सत्ताहीन माणसालाही न्याय मिळवून देण्याचं व्यक्तिनिरपेक्ष आश्वासन व्यवस्था देते, म्हणून मला ती मोलाची वाटते.

दोन्ही दृष्टिकोनांचे आपापले फायदे-तोटे आहेत आणि बाजू निवडण्याचं स्वातंत्र्यही. बाकी ठीकच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नुसतं मार्मिक श्रेणी देऊन समाधान न झाल्याने +११११११ साठी हा प्रतिसाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या अपयशाच्या भीषणपणाकडे बोट दाखवून हे अन्याय मुदलात ही व्यवस्था असल्यामुळेच होतात अशी ओरड करणं

मुदलात ही व्यवस्था असल्यामुळे अन्याय होतात अशी भावना जनमानसात आहे असं वाटत नाही. अन्याय मुळात झाला आहे, होतो आहे हे समजतंय. तो अन्याय होण्याचं कारण कायदा/ कोर्ट /पोलीस आहे असं तितक्या थेटपणे आणि तीव्रतेनं कोणालाही वाटत नसावं.

प्रश्न आहे तो अन्याय झालाच आहे अशी वेळ आल्यावर प्रस्थापित न्यायव्यवस्थेकडे न जाता, व्यक्तिगत सूड घेऊन किंवा स्वतःमधे तितकं बळ नसेल तर मसीहा टाईपच्या थर्डपार्टी प्रायव्हेट जस्टिस सिस्टीमने (झटपट आणि [अन्यायग्रस्ताच्या कोनातून{च}]थेट) अशी शिक्षा ही जनसामान्यांना एक हवीहवीशी फँटसी वाटावी यात नवल नाही. अशा वेळी तुमचा मुद्दा बिनतोड असला (दुर्बळ - निर्धन - सत्ताहीन माणसालाही न्याय मिळवून देण्याचं व्यक्तिनिरपेक्ष आश्वासन व्यवस्था देते, म्हणून मला ती मोलाची वाटते.) तरी नक्षलवाद, दहशतवाद इत्यादि विचारसरणी उद्या "पॅरेलल जस्टिस सिस्टीम" म्हणून उभ्या राहून सामान्य जनतेला मोहवून टाकू नयेत यासाठी सध्याची कायदेपद्धती कोणताच आशादायक बदल दाखवत नाही हा काळजीचा मुद्दा नाही का?

सध्याची कायदेव्यवस्थाच योग्य आहे आणि फक्त तीच अस्तित्वात असायला हवी याबद्दल अर्थातच दुमत होण्याची शक्यता नाही.. पण जनमत तसं बनण्यासाठी काही होईल असं वाटतं का खरंच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्याची कायदेपद्धती कोणताच आशादायक बदल दाखवत नाही हा काळजीचा मुद्दा नाही का?

असहमती नोंदवतो.
बदल होत आहेत. मात्र ते प्रसंगी पुरेसे नाहित इतपत सहमती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाही, व्यवस्थेमुळे अन्याय होतात, असं तुम्ही दर्शवलेलं नाही. पण 'ही तुमची लोकशाही? जाळायचीय?' असं कुत्सित स्वरात विचारणार्‍या पृच्छेमागे तीच धारणा असते.

काळजीचा मुद्दा आहेच. पण जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा तो मिळवण्याकरता व्यवस्थेतल्या त्रुटींशी झगडून व्यवस्था सरकवून-सुधारून घ्यावी आणि झटपट-वरपांगी-र्‍हस्वकालीन न्याय देणार्‍या पर्यायांच्या वाटेला जाऊ नये - यासाठी लोकशिक्षण हाच एक मार्ग दिसतो. तसंच - होणारे बदल पुरेसे नसले, तरीही काहीच बदल होत नाहीत, असं मलाही वाटत नाही.

अर्थात - हे पुस्तकी विश्लेषण झालं. प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर भावना अधिक प्रक्षुब्ध आणि दीर्घकालीन न्यायाचं स्वप्न अधिक दूरस्थ होत असणार, यात काहीच दुमत नाही. पण त-री-ही पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला संपवावं, या गोष्टीचं ते समर्थन असू शकत नाही. कदापि.

म्हटलं तर अवांतरः तुम्ही 'गंगाजल' नावाचा सिनेमा पाहिला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जन्मदात्यानेच गरोदर मुलीचा घोटला गळा http://www.ibnlokmat.tv/?p=91456 >>>

जातीयवादामुळे दोन जिवांचा झालेला निर्घृण खून - तोही स्वतः बापाने केलेला. पण -

प्रमिलाचे मारेकरी कोण?

या विश्लेषणावरून -

"आतापर्यंत जातीच्या प्रतिष्ठेचा फाजील मुद्दा उच्च जातींमध्ये भिनलेला दिसत होता. हरियाणातील जाट समाज असो, राजस्थानातील रजपूत वा महाराष्ट्रातील मराठा. पण प्रमिलाची केस याबाबतही वेगळी आहे. प्रमिलाचे वडील भटक्या विमुक्त समाजातील आहेत हा या घटनेतील महत्त्वाचा सामाजिक संदर्भ आहे.जातीच्या बेगडी प्रतिष्ठेचा डंक आता भटक्या विमुक्त समाजासारख्या वंचित उपेक्षित घटकापर्यंत पोहोचला असेल तर या सामाजिक अवनतीला जबाबदार कोण? उद्या आदिवासी समाजातून हुंडाबळीची घटना घडली तर याचं समाजशास्त्रीय विश्लेषण आपण कसं करणार? सामाजिक विघातक रूढी समूळ नष्ट करणं दूर, त्याचा वाढता संसर्ग कसा रोखणार?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'फार्मव्हिल'सारख्या ऑनलाईन गेम्समुळे प्रसिद्ध झालेल्या झिंगा कंपनीनं चुकून एका भलत्याच माणसाला कस्टमर सपोर्टच्या इमेल्स पाठवायला सुरुवात केली. ह्या माणसानं आधी झिंगाचं लक्ष ह्या चुकीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला, पण कंपनी काही दाद देत नाही हे पाहून अखेर झिंगाच्या ग्राहकांच्या तक्रारींना विनोदी उत्तरं देणं चालू केलं. त्याची झलक इथे वाचता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सविता हलप्पनवार या भारतीय वंशाच्या गर्भवती महिलेच्या जिवास धोका असूनही गर्भपात करण्यास आयरिश डॉक्टरांनी कायद्याने नकार दिला होता. तिच्या मृत्यूनंतर झालेल्या टीका-चर्चेनंतर आयर्लंडमध्ये सीमित परिस्थितीत गर्भपातास मान्यता मिळाल्याची बातमी डब्लिन् न्यूज़्, न्यू यॉर्क टाईम्स् आणि सकाळ येथे वाचली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उलट्या दिशेने प्रवास सुरू आहे.

हे वाक्य सर्वात अधिक महत्त्वाचं -
The bill is opposed by many doctors, including leaders of the American Congress of Obstetricians and Gynecologists and the Texas Medical Association; the gynecologists’ group has run advertisements locally that question the scientific underpinnings of the legislation and tell legislators to “Get out of our exam rooms.”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोडदौड!!!

आणि इतरत्र मोटारसायकलदौड सुरू आहे, असे कळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय, हा प्रवास अनादि अनंत आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे निधन झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काल पासून गाणं डोक्यात आहे -

"गर खुदा मुझ से कहे
कुछ मांग ऐ बन्दे मेरे
मैं ये मांगू, महफिलों के दौर यूँ चलते रहे
हम प्याला, हम निवाला, हमसफ़र, हमराज हो
ता क़यामत जो चिरागों की तरह जलते रहे
यारी हैं ईमान मेरा, यार मेरी जि़न्दगी...."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(वरचा प्रतिसाद आत्ता सर्वप्रथम पाहिल्याकारणाने आज इतक्या वर्षांनंतर हा उपप्रतिसाद नोंदवीत आहे. केवळ राहवले नाही म्हणून.)

वरच्या प्रतिसादाकरिता 'प्राण गेला' असे शीर्षक अधिक सुटसुटीत, सार्थ तथा समर्पक झाले असते काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोफोर्स प्रकरणातील संशयित कात्रोची याचे निधन झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्याच दिवशी डॉ.बोस देखील गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल शर्मिला रेगे या थोर समाज शास्त्रज्ञ आणि जातविरोधी चळवळीत आग्रहाने भाग घेणार्‍या लेखिकेचे कँसर मुळे अकाली निधन झाले. त्यांचे वय ४८ होते.
डॉ. रेगे पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात अध्यापक, आणि सावित्रीबाई फुले विमेन्स स्टडीज सेंटर च्या अध्यक्ष होत्या. दलित स्त्रियांची आत्मचरितत्रे, स्त्रीवादी समाजशास्त्र, फुले-अंबेडकरवाद आणि स्त्रीवाद, या विषयांवर भरपूर, विचारप्रवर्तक लेखन केले. ब्राह्मणी पुरुषसत्तेविरुद्ध अंबेडकरांच्या लेखांचा संच त्यांनी अलिकडेच संपादित केला होता: "अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू" (नवयान प्रेस, २०१३)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे के रोलिंगने टोपणनावाने 'द कुकू'ज् कॉलिंग' नावाची, गुन्हेगारी-पोलिस तपास या विषयाशी संबंधित कादंबरी लिहिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यानिमित्ताने एक प्रश्न पडलाय. कोणी बेस्ट सेलर लेखक टोपणनावाने देखील बेस्ट सेलर झालाय का? (खरे नाव डिस्क्लोज न करता)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> यानिमित्ताने एक प्रश्न पडलाय. कोणी बेस्ट सेलर लेखक टोपणनावाने देखील बेस्ट सेलर झालाय का? (खरे नाव डिस्क्लोज न करता) <<

जयवंत दळवी - ठणठणपाळ, चिं. त्र्यं. खानोलकर - आरती प्रभू अशा आपल्याकडच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. टोपणनाव कुणाचं ते सुरुवातीला जगजाहीर नसलं तरी साहित्यिक/प्रकाशक वर्तुळात ते माहीत असावं.

फ्रान्समध्ये एकदा एक गमतीशीर प्रकरण झालं होतं. गोंकूर हा फ्रान्समधला सर्वात प्रतिष्ठेचा साहित्यिक पुरस्कार कुणाही लेखकाला फक्त एकदाच दिला जातो. रोमँ गारी ह्या लेखकाला १९५६ साली 'द रूट्स ऑफ हेवन' ह्या कादंबरीसाठी तो मिळाला होता. १९७५ साली त्यानं एमिल आजार ह्या टोपणनावाखाली लिहिलेल्या 'द लाइफ बीफोर अस' ह्या कादंबरीलादेखील गोंकूर पुरस्कार मिळाला. एमिल आजार म्हणजेच रोमँ गारी हे रहस्य गारीच्या मृत्यूनंतरच सार्वजनिक झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/madhavi-desai-passed-away/...

आमची शाळा त्रैभाषिक. एकाच वास्तूत मराठी, इंग्रजी आणि गुजराथी माध्यमांचे वर्ग.

मराठी शाळेतील माध्यमिक वर्गांत (५ वी ते ७ वी) काटकर बाई इतिहास शिकवीत तर इंग्रजी शाळांत निम्न-स्तरीय मराठी.दोन्ही माध्यमांतील मुलांत अत्यंत लोकप्रिय.

पुढे रणजित देसाईंशी विवाहबद्ध झाल्यावर त्यांनी शाळा सोडली.

आता ही बातमी वाचून मन पुन्हा सहावी-सातवीच्या काळात गेले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0