ही बातमी समजली का?

रोज आपण अनेक बातम्या वाचत असतो. ऐकत असतो. त्यापैकी अनेक बातम्यांमध्ये आपल्याला फारसा रस नसतो, तर त्याउलट अनेक बातम्यांबद्द्ल आपण स्वतःला संलग्न करू शकतो किंवा काही बातम्या आपल्याशी निगडीत नसल्या तरी त्या विषयांट / घडामोडींत आपल्याला रस/रुची/उत्सूकता/आवड असते.

या दुसर्‍या प्रकारच्या बातम्यांबद्दल अनेकदा आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरंतर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असे तिथे स्पष्ट म्हटलेलेली आहे. पण, त्याबद्दल विस्ताराने लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारेच / यापैकी अनेक गोष्टिंमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बर्‍याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचेही जीवावर येते.

तेव्हा अश्या बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अश्या बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्य बातमीवर विस्ताराने चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या बातमी या धाग्यात रुपांतर केले जाईल.

चला तर, सांगा अश्या बातम्या ज्या वाचून तुम्हाला विचारावंस वाटेल "ही बातमी समजली का?"

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

असे विविध डायनॅमिक विभाग सुरू केल्याने अधिक मजा येईल. हबिणंदण या कल्पनेबद्दल!!!

तूर्त एक जरा जुनी बातमी टाकतो. भन्नाट मजेशीर वाटली. सौदीत एक कल्चरल फेष्टिव्हलसाठी आलेल्या तिघा संयुक्त अरब अमिरातीच्या कलाकारांना प्रमाणाबाहेर देखणे असल्याने सौदीतल्या स्त्रिया त्यांच्यावर भाळतील या भीतीने मुतव्व्यांनी सौदीतून हाकलले. सौदीचा मूर्खपणा जगजाहीर आहे, पण ही तर हद्दच झाली.

त्यांपैकी एकजण ओमल अली गाला याच्या फटूची लिंक.

हसा अन मजा करा WinkROFL

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

फटूवाला मनुष्यप्राणी देखणा आहे खरा! जरा बाकीचे दोन कोण होते ते पण शोध पाहु Blum 3

===
Amazing Amy (◣_◢)

हा हा हा ते शोधून आम्हाला काय फायदा म्हणा Wink तुम्हीच शोधा Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तिघांपैकी एक 'देखणा' असल्याबद्दलचे एक मत 'अस्मिता' ह्यांच्याकडून आले, अन्यथा, सौदी 'सनातनी' मॉरल पोलिसांमधे बायका नसण्याची शक्यता अधिक असल्यास, पुरुष 'देखणा' असुन त्यावर इतर बाया भाळतील असे भाकीत पुर्षाणे करणे म्हणजे वेगळाचा पुरुष तो!!! आणि हो ते सौदी, मुत्तवे, संयुक्त अरब वगैरे वाचून हे एकदम 'हसन मजाकर' असं वाचलं गेलं.

सौदीत राहावे लागणार नाही हे एक आणि दुसरे म्हणजे प्रमाणाबाहेर देखणे असल्याचे जाहीर सर्टिफिकेट हे दुसरे Smile

देखणा आहे पण वेल ... इतकाही नाही बरं का!!! अगदी मदनाचा पुतळा नाहीये. अन लाडावलेला, सेल्फ्-अ‍ॅबसॉर्बड, गर्विष्ठच वाटतो. म्हणजे उद्या बायकोची लोशन्स, क्रीम्स ढापून तिला स्पर्धा करणारा असा वाटला Wink

म्हणजे उद्या बायकोची लोशन्स, क्रीम्स ढापून तिला स्पर्धा करणारा असा वाटला

कितव्या बायकोची?

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

जळजळ स्पष्ट दिसत्येय हो Wink पारंपरिक विचारसरणी म्हंटात ती हीच Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

लहानांनी काही मोठं काम केलं तर त्याची बातमी ह्होते.( "गावच्या शाळेतलं पोर परिस्थितीशी संघर्ष करून IAS झालं" वगैरे वगैरे.)
किंवा मोठ्यांनी लहान गोष्टी केल्या तरी त्याची बातमी होते.
(मला आटह्वणार्‍या लोकमतच्या पहिल्या पानावर आलेल्या बातम्या "अमिताभला सर्दी-पडसे झाले", "पंतप्रधान वाजपेयींनी (शस्त्र्क्रियेनंतर) आज इस्पितळात भेटायला आलेल्या मुलांशी चार घटका गप्पा मारल्या आणि चालून दाखवले." )
.
असो.
तर बातमी ऐकली का?
परवा मनोबा south indies मध्ये गेले होते. भयंकर महाग पण अत्यंत रुचकर, आणि आपल्याकडे फार कमी ठिकाणी मिळणार्‍या छापाचं असं अन्न मिळालं.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धाग्याचा उद्देश /. प्रमाणे आहे का? का एकाच धाग्यात अनेक बातम्या चर्चिल्या जाऊ शकतात?.

एकाच धाग्यात अनेक / विविध बातम्या चर्चिल्या जाऊ शकतात.
बातमी गमतीदार / विशिष्ट विषयासंबंधीतच वगैरे हवी असे नाही (असल्यासही काही प्रॉब्लेम नाही Smile )
अगदी राजकीय, सामाजिक, क्रिडा, अर्थकारण वगैरेपासून एखादा लेख, एंटरटेन्टमेन्ट, विज्ञान, तंत्रज्ञान किंवा वर वाल्गुदमानवाने दिली आहे तशी मौज/मजेदार लिंकही चालेल.

स्लॅश डॉट जरा वेगळे आहे असे वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमेरिकेत एकीकडे बंदुकांच्या परवान्यांवर अधिक बंधनं आणावीत का अशा प्रकारची चर्चा सुरू असताना हे दिसलं. बंदूक विकत घेता येत नसेल तर घरच्याघरीच छापा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्याच्या काँग्रेस सरकारातील काही मोजकेच मंत्री असे आहेत ज्यांनी केलेल्या कामाला लोकांनी/मिडीयाने उचलून धरले आहे/होते. जयराम रमेश हे त्यातलेच एक. ते जेव्हा पर्यावरण मंत्री होते तेव्हा त्यांनी श्री माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटाचा अभ्यास करून त्याच्या संवर्धनाबद्दल शिफारसी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने अतिशय मेहनतीने अभ्यासकरून एक अत्यंत प्रभावी रीपोर्ट सरकारला सादर केला होता.

दुर्दैवाने त्यानंतर खातेपालट होऊन (का रमेश यांना हटवून?) श्रीमती जयंती नटराजन यांना पर्यावरणमंत्री बनवले गेले. त्यांनी बहुतांश व्यावसायिकांना, बिल्डरांना डोईजड ठरू शकेल असा गाडगीळ समितीचा रीपोर्ट थेट नामंजूर केला आणि आणखी या रिपोर्टवर मत देण्यासाठी कस्तुरीरंगन समिती नेमली.

गेल्या महिन्यात या समितीने आपला रीपोर्ट दिला आहे. या रिपोर्टबद्द्ल दोन टोकाची मते वाचायला मिळतात. उदा. लोकसत्तामधीलच या बातमीत हा अहवाल कोकणासाठी/पर्यावरणासाठी उपयुक्त आहे व त्यात गडगीळ यांच्या अहवालाला उचलून धरले आहे असे म्हटले आहे. तर याच वृत्तपत्रातील या बातमीत स्वतः गाडगीळ म्हणतात की नव्या अहवाल "संरक्षण नाहिच, लोकसहभागाचाही दिखावा" केला आहे.

अर्थात सत्य दोघांच्या मधे असू शकेल. या बाबत काय वाटत? काही अधिकची माहिती? काही मत?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आय टेल यू ऋ, यु आर रियली व्हेरी हार्ड वर्किंग गाय, प्लिज टेक इट इझी. यु सी पिपल डु नॉट कम हिअर टू रिड सच टाइप ऑफ न्युज. Smile टुमॉरो, ओन्ली दीस क्राउड विल बाय/ ऑर एन्जोय रिसोर्ट स्टाईल फॅसिलिटीज इन दॅट रिजन. नाउ हू इज गोइंग टू मेक इट हॅपन? बिल्डर्स एन्ड पॉलिटीशियन्स ओन्ली नो? नाउ दे आर वर्किंग हार्ड फॉर अस एन्ड फॉर अवर अम्युझमेंट एन्ड यु वॉन्ट द इन्कन्व्हीनियंट ट्रुथ? बरोबर आहे का रे हे ऋ? उद्या आपल्याला धागा हवाय ना, कोकणातली चांगली रिसोर्ट्स सांगा, सुचवा. मग रे हे काय. असेही आंजावर डॉ माधव गाडगीळ कमी व माधवी गाडगीळ जास्त एक्टीव्ह!

असो आता जास्त अवांतर नको करायला मूळ धाग्यासंबधी बोलूया , एक डॅनिश टिव्हीचॅनेलवर एक शो बद्दल बातमी वाचली, आता तूच सांग असा मराठी कार्यक्रम कसा वाटेल, "गर्व से कहो हम लै भारी लैंगीक है!!" आय मिन लैंगीकता सेलेब्रेट करणार्‍या बाया आपणहून समोर येतात व दोन गुर्जी त्यांना सांगोपांग बघून त्यांची रापचिकत्वमापकावर चर्चा करतात. हिट होईल ना?

यासंबंधीच्या बातम्यांची दुसरी बाजु दाखवण्या चा प्रयत्न करणारी चर्चा उपक्रमावर इथे वाचनात आली. सत्य दोन्हीच्या मधे कुठेतरी असेल हे पुन्हा एकदा पटते.. पण या विषयीची अधिक माहिती वाचायला आवडेलच

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यासंबंधी अजून एक वेगळ्या अंगाने माहिती देणारा लेख डीएनए मध्ये वाचला.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गाडगीळांचा मुलाखतवजा लेख १८ मेच्या टाईम्समधे आहे. हा दुवा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.indianexpress.com/news/saradha-group-donated-heavily-to-trinamool-govt-bought-mamatas-art/1107851/0
बंगालच्या भूमीने दिलेल्या महान कलाकारांच्या रांगेत ममता बॅनर्जी आहेत हे नुकतेच कळले.
सुदिप्ता सेन नामक 'उद्योग'पतीने त्याच्या उद्योगांतून मिळवलेली संपत्ती त्याने मोठ्या उदारहस्ते कलेच्या प्रगतीसाठी वेचलेली दिसते. चित्रांसाठी पैसे मोजले असले तरी फायदा कुम्भिलकलेचा झालेला दिसतो.

Hope is NOT a plan!

या बातमीतले उभयपक्षाकडचे लोक मूर्खच म्हटले पाहिजेत. प्रेग्नन्सीकडे काणाडोळा करून लग्न तसेच रेमटवण्याबद्दल वधूपक्ष विधिनिषेधशून्य अन हरामी ठरतो, तर इतकी घाईवर आलेली प्रेग्नन्सीही जोखू न शकणारे वरपक्षाकडचे लोक हे अंमळ बावळटच ठरतात. पण दोष वधूपक्षाकडेच जातो या ठिकाणी.

टीपः मिसॉजिनीचा अस्थानी आरोप होण्याअगोदर हे स्पष्ट करतो, की बातमीच्या टोनवरून तरी वर-वधूंचे लग्नाआधी संबंध असल्याचे दिसत नाही. तस्मात दोषारोप वधूपक्षावरच राहील.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

'दोष' हा शब्दप्रयोग (शिवाय "हरामी" आहेच Wink ) लग्नाआधी प्रेग्नंट होण्यासाठी नसून त्याची कल्पना वरपक्षाला न दिल्याबद्दल आहे असे समजतो. तसे नसल्यास असहमती नोंदवतो

बाकी वरपक्षाच्या बावळटपणाबद्दल +१

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लग्नाआधी प्रेग्नंट होण्यासाठी नसून त्याची कल्पना वरपक्षाला न दिल्याबद्दल आहे असे समजतो

अर्थातच. वरपक्षापासून सत्य लपवणे हाच दोष अन हाच तो हरामीपणा. Wink

अवांतरः आता तरी सहमती आहे की अजून विवेचन बाकी आहे? Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आहे आहे सहमती आहे Smile
चला अवांतरातून का होईना माझी सहमती विचारल्याबद्दल मंडळ आभारी आहे.. विचारतो कोण माझ्या सहमतीला!? असे खिन्नतादर्शक वैग्रे वैग्रे म्हणायची सोय राहिली नाही आता Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपली अस्मादिकांशी चक्क सहमती पाहून अंमळ सहमल्या गेले आहे Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

रोचक! बेळगाव प्रश्नाच्या स्टेटस को/क्वो मध्ये काही/कसा फरक पडेल की काय हे पाहणे रोचक ठरावे.

बाकी कर्नाटकने त्या भागात केलेली डिव्हेलपमेंट इ. पाहता तो प्रदेश तिकडेच राहूदे असे म्हणावे वाट्टेय. असो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

नुकताच बेळगावला जाऊन आलो. तेथील परिस्थिती ही 'डिव्हेलपमेंट'असेल तर ती होण्याआधी तेथे कशी परिस्थिती असावी या विचाराने धडकी भरली.
बाकी उर्वरीत उत्तर कर्नाटकातून बेळगावमध्ये पोचेपर्यंत "सापत्न" वागणूक म्हणजे काय हे न सांगता कळत होते.
असो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म..बेळगाव शहराबद्दल मी म्हणत नाहीये. मिरजेहून विजापूरला जाताना जो काही भाग लागतो तो ट्रॅडिशनली खतरनाक दुष्काळी म्हणूनच प्रसिद्ध आहे. पाण्याच्या दुर्भिक्षाने कॅरॅक्टरविलेला. पण काही महिन्यांपूर्वी तिकडे गेलो असता पाणीपुरवठ्याच्या चांगल्या सोयी तिकडे असाव्यात असे वाटण्याइतपत सुधारणा दिसली, म्हणून म्हणतो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

भारतातल्या जेलमधे मारहाण झालेला पाकिस्तानी कैदीसुद्धा मरण पावला. याला काय टिट फॉर टॅट म्हणायचे का? दुर्दैवीच वाटलं हे.. Sad

http://www.hindustantimes.com/Punjab/Chandigarh/Pak-prisoner-Sanaullah-d...

खरंय.. वाईट वाटले.
यावर आधीच इथे मत दिले असल्याने पुनरुक्ती करत नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांनी असं केलं मग आम्हीही करणारच अशी स्पर्धा मूर्खपणाच्याच बाबतीत का असते?

अलिकडेच काही लोकांनी फेसबुकावर शेअर केलेला फोटो पाहिला होता. पाकिस्तानच्या झेंड्यावर कोणी तरूण पाय देऊन उभा आहे. आणि काय म्हणे तर शंकराच्या पिंडीवर कोणी मुस्लिम तरूण उभा होता त्याचा बदला घेतला. एकाने कोणी बिनडोकपणा केला की आपणही तोच करण्याची लागलेली चढाओढ आणि वर पुन्हा ते फेसबुकावर प्रसारित करण्याची अहमहिका पाहून फार वैताग येतो.

असाच बिनडोकपणा सरकारने करावा हे मात्र लाजिरवाणं आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारून निदान स्वतःची पत तरी राखली आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"गूगल ग्लास" या भावी उपकरणाला "प्रायव्हसी इश्यूज"च्या भीतीने आधीपासूनच विरोध उत्पन्न झाल्याची बातमी वाचली. इंट्रेस्टिंग.

यामागच्या एथिक्सविषयी इतरांचं मत जाणायला आवडेल. या उपकरणावर कायदेशीर बंदी घालण्याची काही ऑथॉरिटीजची मागणी पॅरेनॉईड वाटते का??

ड्रायव्हिंग करताना हे ग्लासेस वापरु नयेत इथपर्यंत ठीक, पण गूगलने जर असं म्हटलं असेल की या उपकरणाला स्पर्श केल्याशिवाय किंवा कमांड उच्चारल्याशिवाय समोरच्या व्यक्तीचं / दृष्याचं रेकॉर्डिंग सुरु होऊ शकणार नाही. तस्मात अगदीच गुप्तपणे काही शूट करता येणार नाही. तर मग या प्रायव्हसी नष्ट होण्याच्या भीतीच्या बेसिस वर हे हाय टेक उपकरण वापरण्यास बंदी यावी असं वाटतं का?

बातमी:

http://www.indianexpress.com/news/google-glass-picks-up-early-feedback-o...

प्रायव्हसी इश्यूज निर्माण होऊ शकतात हे खरयं, पब्लिक-स्पेसमधे काही नियम/कायदे पाळता न येण्यासारखी परिस्थिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य होऊ शकते, तसे झाल्यास त्याचा दुरुपयोग होणार.

गुगल ग्लास एपिआय उपलब्ध असल्याने व्हॉइस-कमांड ओव्हरराईड करणे शक्य आहे- हे पहा.

रोचक दुवा आहे. बादवे, फक्त पापणी उघडबंद केल्याने फोटो निघणार असेल तर किती फोटो निघतील ?!

This comment has been moved here.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही बातमी पहा.

http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5249017307129656084&Se...!

लग्नात नवरानवरीला उचलण्याच्या फ्याडमुळे नवर्‍याने नवरीला घालावयाची पुष्पमाला भटजीच्याच गळ्यात जाऊन पडली. हे उचलण्याचे फॅड म्हणजे निव्वळ मूर्खागमनीपणा आहे. असो.

(पूर्वीच्या गॉथममध्ये राहणारा) बॅटमॅन.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हा हा!
उचलण्याचे फॅड म्हणजे निव्वळ मूर्खागमनीपणा आहे. : +१

बाकी एका लग्नात पुष्पमाला नव्हे पण पुष्पमालाधारी नववधुच भटजींवर पडलेले बघितले आहे Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी एका लग्नात पुष्पमाला नव्हे पण पुष्पमालाधारी नववधुच भटजींवर पडलेले बघितले आहे (जीभ दाखवत)

अरारारारा लैच घाण तेच्यायला. ROFLROFL औघड आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

किंचित जूनी बातमी आहे पण, अमेरिकन ड्रिमच्या उलट गंगा वाहायला लागून इंडीयन ड्रिमही चालु आहे म्हणे. हे बघा

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मार्जारप्रेमामुळे घटस्फोट झाला म्हणे...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20040710.cms

बातमी तर खल्लासच आहे. पण बातमी झक मारेल इतक्या प्रतिक्रिया भारी आहेत. मुतपीठसारख्या एकदम! पहिली justine या आयडीने लिहिलेली प्रतिक्रिया मार्मिक आहे सर्वांत. ती वाचून मोकलाया दाही दिश्याची आठवण येते.bb या आयडीने लिहिलेली प्रतिक्रियाही त्याच ताकदीची आहे. हास्याचा हापटबार अन भूसनळा पेटेल इतकी सामग्री आहे बाकी प्रतिक्रियांतही.

हा राष्ट्रवादी स्लिप नाही. तोच खरा पाठ आहे असे कुठेसे वाचले होते Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सध्या २,२५० रुपयांना असणार्‍या हगवणीच्या (रोटावायरस / डायरीआ) लशीऐवजी भारताने अवघ्या ५४ रू. पडतील अशी लस तयार केली आहे. यामुळे गरीबांना तसेच आफ्रिका व आशियातील गरीब राष्ट्रांना फायदा होऊ शकेल.
TOI
DNA

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारीच!!!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

पर्सनल फायनान्स या विषयावर अत्यंत मोजके आणि अर्थपूर्ण लिहिणारे धीरेंद्र कुमार हे अत्यंत आवडते स्तंभलेखक आहेत. त्यांचा स्थावर मालमत्तेमधील गुंतवणुकीवरचा हा लेख वाचला. मुद्दे पटण्यासारखे आहेत पण तरीही आजूबाजूला अशा मालमत्तांमधील गुंतवणुकीचा फुगत असलेला बुडबुडा पाहून आश्चर्य वाटते.

http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=22909

उत्तम लेख.
असेच अधिक दुवे येथे द्यावेत ही विनंती.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धीरेंद्र कुमार यांचे अनेक लेख त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्काईव मध्ये पाहावे. खुसखुशीत पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले त्यांचे अनेक लेख गुंतवणुकीचे अतिशय उत्तम सल्ले देतात. गुंतवणुकीची तत्त्वे फारशी बदलत नसल्याने जुने लेखही आज रिलिवंट वाटतात. रिअल इस्टेट बाबत काही महिन्यांपूर्वी त्यांनी हा छोटेखानी लेख लिहिला होता तोही मस्त आहे.

http://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=21568

लेख वाचला. त्यांनी रिअल इस्टॅटची तुलना शेअर बाजराशी केली आहे. रिअल इस्टेट मध्ये अद्रवीकरणीय (illiquidable) असण्याचा धोका असतो असे ते म्हणतात. पण मग शेअर बाजारात तर आख्खी इन्वेस्ट्मेंटच मातीमोल होण्याचा धोका असतो की क्षणार्धात, शिवाय तसे होण्याचे प्रमाण अतिप्रचंड आहे.
एक तर सेन्सेक्सचे मागच्या तीसेक वर्षातले आकडे दाखवून पुढील सोनेरी स्वप्ने पाहणे हल्ली (मागच्या आठ दहा वर्षात) अधिकच वाढू लागले आहे. सेन्सेक्स ही "सर्वात यशस्वी पहिल्या तीस" कंपन्यांची सक्सेस स्टोरी आहे, हे कोण लक्षात घेतो? एखाद्याने १९७९ मध्ये १०००रुपये सेन्सेक्स मध्ये टाकले असते, तर ते आज कित्येक पट झालेच असते असे नाही.(एखादा शेयर सतत मार खात असला, पुरेसा मार्केट कॅप राखू शकला नहई, तर सरळ पहिल्या तीसातून बाहेर होतो.दुसरा यश्स्वी शेअर आत येतो. म्हणजेच, आपटी खाणारी कंपनी मोजायचीच नाही, फक्त सक्सेस मोजायचे असा हा उद्योग आहे. कुणी काही फंडामेंटल अ‍ॅनालिसिस करा किंवा "आतल्या न्यूज" जमवा, यशाचा काहिच हमखास मंत्र वगैरे तिथे नाही. अ‍ॅनालिसिस करुनही गंडलेले प्रचंड आहेत, न्यूज वाले तर गंडतातच.(तेच प्रमुख बकरे असतात.))
.
ह्याचा अर्थ रिअल इस्टेट सेफ हेवन आहे असे नव्हे. कुठल्याही मार्केट प्रमाणे बुडबुडा तिथेही होतच असनार, आणि अंती कुणी मेलाच तर तो रिटेल इन्व्हेस्टरच होणार हे सत्य आहे. मुळात फ्लॅट हा depreciating asset आहे,(वाढत्या/स्थिर लोकसंख्येत) जमीन/प्लॉट हाच असलाच तर appreciating asset आहे हे मंडळी विसरतात. फ्लॅट आणी प्लॉट दोन्हिला एकाच कलमात रिअल इस्टेटमध्ये मोजू नये असे मला वाटते.
.
बुडबुड्याबद्दल सहमत आहे.
पण तिथेही गोची आहे. बुडबुडे सर्वच मार्केट मध्ये होतात. अगदि १८५०-१८६०च्या दशकात आख्ख्या जगात, त्यातही ब्रिटिशअंकित भारतात कापसाचे भाव कित्येक वर्षे वाढतच गेले.अमेरिका हा मुख्य पुरवठादार तेव्हा यादवी युद्धाने ग्रस्त असल्याने पुरेसा कच्चा माल देउ शकत नसे. तिथले यादवी युद्ध संपताच इकडचा बुडबुडा फाटकन फुटला. बुडबुडा फुटतेवेळी ज्यांची रक्कम मार्केटमध्ये गुंतली होती, ते ठार मेले. दिवाळखोर झाले. बुडबुडा सुरु असतानाच, त्यातही फुटाण्याच्या थोडेसे आधिच ज्यांनी रक्कम काढली, ते मालामाल झाले. एखाद्या एकरेषीय टाइमलाइनवर बुडबुडा फुटण्याच्या क्षणापासून आणि त्यातही त्या क्षणापूर्वी जितके जव़ळ असताना तुम्ही नफा काढून घ्याल तितके अधिक सुदैवी/हुशार्/चतुर तुम्ही ठरता.
प्रॉपर्टीबद्दलची गोची. एक उदाहरण घेउ.
----------अपूर्ण----

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खालील दुव्यावर विविध तारखांपासून सुरुवात करुन सेन्सेक्समधील गुंतवणुकीपासून किती परतावे मिळाले आहेत याची माहिती काढता येईल

http://www.hdfcfund.com/Calculators/SensexRollingReturnsCalculator.aspx?...

उदा. मी १ जाने. १९९८ पासून सुरुवात करुन गेल्या १५ वर्षांमधील परताव्याची सारणी खाली लावली आहे. या कालावधीत जागतिक मंदी, डॉटकॉम बर्स्ट, इराक युद्ध, अमेरिकेवरील हल्ला वगैरे अनेक राजकीय कारणांमुळे प्रचंड उलथापालथी झाल्या होत्या तरीही किमान ७ वर्षे गुंतवणूक केल्यानंतर नुकसानीची शक्यता बरीच कमी असल्याचे दिसले. हा विशिष्ट कालखंड घेतल्याने ७ वर्षे हा बराच कमी कालावधी मानला तरी इतर कोणतेही कालखंड निवडले तरी १५ ते २० वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे नुकसानीची शक्यता ० असल्याचे दिसले आहे. सेन्सेक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध म्युच्युअल फंड कंपन्यांचे इंडेक्स फंड्स उपलब्ध आहेत जे सेन्सेक्सप्रमाणेच वेटेज ठेवून गुंतवणूक करतात

दुर्दैवाने अशी कोणतीही माहिती रिअल इस्टेटबद्दल मिळत नाही. गरजेच्या प्रसंगी रिअल इस्टेट विकणे अनेकदा आतबट्ट्याचा व्यवहार होतो आहे. एजंट, ब्रोकर्स, सोसायटी, कॉर्पोरेशन, कर्जावरील व्याज वगैरे भानगडी आहेतच. शिवाय आपले सरकार अनेकदा रेट्रोस्पेक्टिव करआकारणी करते त्यामुळेही रिअल इस्टेट बाळगणे तुलनेने महाग पडते. ( माझ्या एका मित्राला स्वतःला राहण्यासाठी घेतलेल्या घरासाठी घराचा ताबा मिळाल्यानंतर २ वर्षांनी सुमारे ३ लाख रुपये व्हॅटच्या भानगडीत एकरकमी भरावे लागले. ) असो.

फुरसतीत परतण्याचा प्रयत्न करतो

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यूएन ने जागतिक उपासमारीवर रामबाण तोडगा काढलाय!
किडे खा!
याचा दुसरा अर्थ वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके कन्व्हेन्शनल अन्न निर्माण होणार नाही असे यूएनला वाटते असा घ्यावा काय?
हौ माल्थुशियन!

Hope is NOT a plan!

याचा दुसरा अर्थ वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके कन्व्हेन्शनल अन्न निर्माण होणार नाही असे यूएनला वाटते असा घ्यावा काय

बातमी परवाच DNA मधे वाचली होती.
मात्र त्यात असे म्हटले होते की आफ्रिकेतील काहि देश तसेच काहि आशियायी देशांतील मंडळींचे हे "किडे"च कन्व्हेन्शनल अन्न आहेत. ते मुंग्यांची अंडी, मुंग्या, मुंगळे, नाकतोडे, काहि टम्म प्रोटिनयुक्त अळ्या वगैरे वर्षानुवर्षे खात आले आहेत. उलट अश्या लोकांना धान्ये किंवा ब्रेड असले फॉरेन फुड देण्यापेक्षा हे पाऊल योग्य वाटते.

अंदमानातील जारवा मंडळींनाही आपले खाणे देऊ नका असे सांगितले जाते. तिखट व मीठाची त्यांच्या पोटाला सवय नसल्याने त्यांची पोटे बिघडतात असे कारण आम्हाला सांगण्यात आले होते

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आदिवासी व जंगली लोक युगानुयुगे किडे खातात आणि काही देशातले काही लोक किडे खातात हे खरे असले तरी सिव्हिलाईज्ड माणसाच्या स्टेपल डाएटमध्ये
किडे येत नाहीत. युएनचे हे आवाहन सगळ्या लोकांसाठी आहे, युएन फक्त आदिवासींसाठी काम करणारी संस्था नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किडे खाल्ल्याने उपासमार टळत असेल तर आधीच किडे खाणार्‍या लोकांना हे आवाहन लागू होत नाही. Smile
जे किडे खात नाहीत त्यांनी किडे खावेत असं आवाहन का करावं वाटलं असेल?

Hope is NOT a plan!

नव्याने किडे खाण्यात त्यांनी उल्लेख केलेला "डिसगस्ट्"चा भाग तूर्तास बाजूला ठेवला तर आणखी काही दुय्यम मुद्दे दिसतात.

१. सर्वांनीच किडे खायला सुरुवात केली तरच बाकीचे अन्न (ब्रेड, भात इ) वाचेल आणि सर्वांना अधिक समप्रमाणात मिळेल. जे सध्या वंचित आहेत त्यांनीच फक्त किडे खावेत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सध्याचा आहार (बोकड, गहू, डाळ, मासे, पनीर इ.) चालू ठेवावा असं युनोने म्हटलेलं नाही. अन्यथा पुन्हा एकदा कोणता आहार जास्त चांगला हा वाद निर्माण होईल.

२. मुद्दा क्र. १ इतका काही महत्वाचा नाही. मुख्य मुद्दा असा की बोकड, मेंढी, कोंबडी, मासे, धान्ये अशा रुढ झालेल्या अन्नपदार्थांबाबत त्यांच्या खाण्यायोग्य असण्याची खात्री (शिळे ताजे नव्हे, विषारी - बिनविषारी अर्थाने) सोपे आहे. कारण त्यात फार डायव्हर्सिटी नाही. कीटकांमधे हजारो प्रजाती आहेत. अगदी एकसारख्या दिसणार्‍या कीटकांमधलाही एक वेगळ्या जातीचा (मिमिकिंग) असू शकतो. यापैकी एक जात खाण्यायोग्य तर दुसरी जहाल असू शकते. अमुकच जातीचा किडा आपण खातोय हे समजणं कठीण आहे. (उदा. डॅनाईड एगफ्लायची मादी (बिनविषारी) आणि प्लेन टायगर (विषारी)) त्यासाठी तज्ञ व्यक्तीची आवश्यकता आहे.

३. किड्यांचा प्रजोत्पादन वेग सस्तन प्राणी आणि काही पक्ष्यांपेक्षा जास्त असू शकेल. पण त्यांचे यिल्ड किती आहे तेही पहावे लागेल. एका शेळीपासून वर्षाला समजा सहा बकरे मिळत असतील. पैकी एक बकरा कापायला तयार होण्यासाठी अनेक महिने लागत असतील पण एकदा का तो कापला की तो वीसेक लोकांची दोन दिवसांची गरज भागवत असावा. किडे कितीही फास्ट प्रजनन करत असले तरी ते किडा-साईझमधेच बनतात. त्यामुळे ते जमा करणे हा कष्टाचा भाग होऊ शकतो कारण एका माणसालाच शेकडो किडे लागतील. यासाठी तंत्र विकसित करावे लागेल.

अगदी बरोबर.
हे सगळे मुद्दे आहेतच, पण मला गंमत हे आवाहन करावे लागण्याच्या कारणांची वाटली.
आजवर तंत्रज्ञानाने हा प्रश्न सुटेल असे आपल्या अहवालात नमूद करणार्‍या युएनएफएओने हे आवाहन करण्यामागे उघड न सांगितलेली काही कारणं अशी असतील कदाचित:
१. हवामान बदलामुळे नजिकच्या भविष्यात अन्न-धान्योत्पादनावर होणारा परिणाम.
२. ऊर्जासंकटामुळे अन्नधान्याच्या वितरणात सुधारणा न होण्याची शक्यता.
३. मर्यादित जमीन, वाढती लोकसंख्या, घटते पाणी आणि घटती मृदा यांच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाने प्रश्न सुटण्याची घटती शक्यता.

काहीही असो, येत्या काही वर्षांत मत्स्यशेती, शेळीपालन वगैरेच्या धर्तीवर खाद्यकीटकपालनाचा उद्योग सुरु करायला हरकत नाही.
आणखी एक हरितक्रांती होईल असे वाटत नाही.

Hope is NOT a plan!

ही आणखी एक DNA तील बातमी.
यात अजून एक रोचक दावा आहे:

In the West we have a cultural bias, and think that because insects come from developing countries, they cannot be good," said scientist Arnold van Huis from Wageningen University in the Netherlands, one of the authors of the report.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या बातमीचं शीर्षक थोडं सनसनाटी बनवल्यासारखं वाटलं. बातमीमधे प्रथिनं, कॅल्सियम आणि लोह यांचं किड्यांमधलं प्रमाण किती हे दिलेलं आहे. या बातमीतलीच काही वाक्यः

... over 2 billion people worldwide already supplement their diet with insects.
The authors point out that insects are nutritious, with high protein, fat and mineral content.

बहुतेक धान्यातून पुरेशी प्रथिनं, कॅल्सियम आणि लोह मिळत नाही. या महत्त्वाच्या घटकांची आहारातली कमतरता हा काळजीचा विषय असावा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बातमी सनसनाटी बनवली आहे आणि युएनला पूरक आहार सुचवायचा असावा हे बरोबर वाटते आणि तसेच ते असावे अशी आशा.
किडे वापरून नवनवीन पाककृती करण्याचे शेफ्सना केलेले आवाहन फार आवडले.
तशी एखादी स्पर्धा भरवायला हवी.

Hope is NOT a plan!

असा सल्ला देणार्‍या त्या यू एन वाल्याला "तुमच्या तोंडात किडे पडोत" म्हटल्यावर तो आनंदून जात असेल काय?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

http://www.theverge.com/2013/5/14/4330122/blackberry-bringing-bbm-to-and...
’बीबीएम’ आता ऍन्ड्रोंइड आणि आयफोनवर पण उपलब्ध होणार असे ब्लॅकबेरी ने जाहीर केले आहे. Smile

रिझर्व बँक काहितरी "इन्फेशन लिंक्ड बॉन्ड्स" आणतंय. त्यावरचा हा द हिंदू मधील लेख.
यामुळे सोन्यातील गुंतवणूक कशी कमी होईल?
हा बॉन्ड आपल्याला (सामान्यांना) घेता येईल का? कसा? कोणाला माहिती आहे का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खालील दुव्यावरील विश्लेषणानुसार हे बॉँड्स सध्या तरी किरकोळ गुंतवणूकदारांना घेता येणार नाहीत असे दिसते आहे.

http://economictimes.indiatimes.com/personal-finance/inflation-indexed-b...

या विश्लेषणानुसार आणखी एक गंमत उघड होत आहे ती म्हणजे ज्या महागाईदराशी ह्या बाँड्सचा व्याजदर निगडित आहे तो सामान्य गुंतवणूकदारांसाठी अत्यंत हास्यास्पद दिसतो आहे. सुरुवातीला हे बाँड्स फक्त गुंतवणूक कंपन्यांना उपलब्ध असतील व किरकोळ गुंतवणूकदारांना नंतर उपलब्ध केले जातील.

'लोकप्रभा' च्या ताज्या अंकातील दोन रोचक बातम्या. त्यातली पहिली अस्वस्थ करणारीच आहे. दुसरी 'किडे खा' या बातमीच्या संदर्भात वाचण्यासारखी आहे. किळस बाजूला ठेवणे वगैरे ठीक आहे. 'नथिंग इज अनक्लीन टु अ सायंटिस्ट' हेही ठीक. पण म्हणून हे?

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हजारो-लाखो सफाई कामगार जर असच म्हणू लागले तर कसे वाटेल?

"पोटासाठी किळस बाजूला ठेवणे वगैरे ठीक आहे. 'नो वर्क इज इन्सिग्निफिकंट. ऑल लेबर दॅट उपलिफ्ट्स ह्युमॅनिटी हॅज डिग्निटी अ‍ॅन्ड इम्पॉर्टन्स अ‍ॅन्ड शूड बी अंडर्टेकन विथ पेन्स्टेकिंग एक्स्लेन्स' हेही ठीक. पण म्हणून हे"

दुसर्‍या बातमीत फार काही घाणेरडं वाटलं नाही. टॉयलेट बोलच्या आकाराबद्दल ब्रिटीश विरूद्ध अन्य युरोप अशी भांडणं ऐकून झालेली आहेत. (ब्रिटीशांना रोज सकाळी स्वतःच्या बुडावर पाणी उडवायला आवडतं आणि अन्य युरोपीय लोकांना विष्ठा निरखून बघायला आवडते.) स्वतःची विष्ठा पहावी, त्यातून आरोग्याबद्दल माहिती समजते वगैरे गोष्टीही ऐकून झालेल्या आहेत.

वीसेक वर्षांपूर्वी आजोळी (कर्जतच्या आजूबाजूच्या भागात) बरेच बायोगॅस प्लँट दिसायचे. आजोबांकडेही होता. तो बंद पडला. कशामुळे, का माहित नाही. सगळीकडूनच ते गायब झाले. चुलीत लाकडं जाळण्यापेक्षा ते उपयुक्तही होते. घाण येत नसे आणि त्यातून बाहेर पडणारा घनपदार्थ शेतात ओतला जात असे.

एकोणिसाव्या शतकात टॉमस क्रॅपर नावाच्या माणसाने स्वच्छताकुंडाला फ्लेिमगोच्या मानेसारखी नळी जोडली.

हे आडनावही अगदी ठरवून घेतल्यासारखं आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसरा लेख वाचताना प्रयत्नपूर्वक किळस बाजूला ठेवली आणि अशा लेखांमध्ये नेहमीच दिसणार्‍या "मॅजिकल थिंकिंग"ने नेहमीप्रमाणे मनोरंजन झाले.

त्यातला मळ सुकवून त्या गोवऱ्या मग मायक्रोवेव्ह भट्टीत भाजल्याही जातात. त्या प्रक्रियेत कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांचं मिश्रण मिळतं. ते वापरून वीज निर्माण करता येते. त्यासोबत बाहेर पडणारी उष्णता नवा मळ सुकवते. तयार झालेली वीज या यंत्रणेतली मायक्रोवेव्ह चालवते. मळाचा पुरवठा अखंडित असला तर हे शौचकूप स्वत:च्या पायांवर उभं राहायला समर्थ बनतं.

दुसऱ्या क्रमांकावरच्या लावबरा या ब्रिटिश विद्यापीठाने मलमूत्र र्निजतूक करायला ते मिश्रण एका टाकीत मोठय़ा तापमानाला, प्रचंड दाबाखाली भाजलं. मग एकाएकी त्यावरचा दाब कमी केला. त्यामुळे त्यातले वायू आणि द्रवपदार्थ वेगळे झाले. ते वायू शास्त्रज्ञांनी त्या टाकीतलं पुढलं मिश्रण तापवायला वापरलं. उरलेल्या द्रवातूनही त्या सगळ्या प्रक्रियेला पुरून उरेल इतका इंधनवायू(मीथेन) मिळाला.

कॅलिफोíनयाच्या शास्त्रज्ञांनी सौरऊर्जेचा वापर करून विष्ठेवर प्रक्रिया केली. त्यातून हायड्रोजन आणि क्लोरिन यांचं उत्पादन झालं. क्लोरिनने लघवी र्निजतूक करून मग तीच शौचालय धुवायला वापरता आली. हायड्रोजनचं इंधन झालं; त्याने रात्री आणि झाकोळलेल्या दिवशी जेव्हा सौरऊर्जा नसते तेव्हा वीज मिळाली; जेवणही शिजलं. हायड्रोजनच्या उत्पादनामुळे या पद्धतीचा खर्च भागून वर पसे हातात खुळखुळतील, स्वच्छता फुकटात पडेल अशी शास्त्रज्ञांची अटकळ आहे.

एन्ट्रॉपी नामक प्रकार नष्ट करण्यात या शास्त्रज्ञांना यश आलेले दिसतेय.
असो.
पहिला लेख वाचताना किळस बाजूला ठेवली नाही. वाघ जंगलातच जाऊन का पाहायचा असतो या लोकांना? अनेक प्राणिसंग्रहालयांमध्ये अगदी वाघाबरोबर बसून फोटो काढायची सोय असते. तिकडे जावे.
शिवाय फोटोग्राफी (विशेषतः वाईल्ड लाईफ फोटोग्राफी) हा एक नवा संसर्गजन्य लाईफस्टाईल रोग असल्याचे जाहीर केले जावे असे वाटते.

Hope is NOT a plan!

एन्ट्रॉपी नामक प्रकार नष्ट करण्यात या शास्त्रज्ञांना यश आलेले दिसतेय.

एंट्रॉपीचा विचार करायचा असेल तर फक्त बायोमास आणि त्यावरची प्रक्रिया एवढंच पहाता येणार नाही. प्राण्यांचं (किंवा मनुष्यप्राण्यांचं) अन्न बनलं, त्यांनी ते खाल्लं, त्याचं उत्सर्जन केलं आणि पुढे त्यावर केलेली प्रक्रिया असं संपूर्ण चक्र लक्षात घ्यावं लागेल. मॅजिकल थिंकींगशी सहमत. प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं तंत्रज्ञान सामान्य माणसांच्या घरात गेल्यानंतर काय अडचणी येतात, येऊ शकतात याचा विचार अशा ठिकाणी केला जात नाही असं बायोगॅस प्लँटच्या फियास्कोवरून वाटलं.

शिवाय फोटोग्राफी (विशेषतः वाईल्ड लाईफ फोटोग्राफी) हा एक नवा संसर्गजन्य लाईफस्टाईल रोग असल्याचे जाहीर केले जावे असे वाटते.

पक्ष्यांच्या बाबतीतही हेच.
अशा प्रकारच्या सुविधा भारतात अत्यंत स्वस्तात उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यटक-छायाचित्रकारांकडून पुरेसे पैसे घेतल्यास वन्य-जीव, जंगल रक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध होईल. हे अगदी ऐतिहासिक वास्तू, ताजमहाल, अजंठा-वेरूळ वगैरे बाबतीतही वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शुल्क वाढवून हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही (जरी ते चालू अर्थशास्त्रीयदृष्ट्या बरोबर वाटत असले तरी).
कारण,
१. कोणत्याही कारणासाठी पैसा कमवण्याचे ध्येय ठेवले की लवकरच ते कारण मागे पडून पैसा कमवणे हे मुख्य ध्येय होते आणि काही प्रमाणात तेच होत आहे.
२. वाढीव शुल्कामुळे जंगलात जाऊन धिंगाणा करायला वाढीव प्रतिष्ठा मिळणार. शिवाय एवढे पैसे मोजलेत तर आता वाघ दाखवच आणि आम्ही म्हणू ते करू दे अशी प्रवृत्ती वाढणार.

Hope is NOT a plan!

सुट्टी असल्याने माझा ज्योतिषविषयक आवडीचा ब्लॉग चाळत होते. ८ वे घर = पुनर्जन्माचे घर, फिनीक्स पक्ष्याचे घर. अतिशय भयंकर प्रसंगातून भरारी घेण्याचे घर. या घराबद्दल वाचत असताना त्या लेखातील पुढील बातमीने लक्ष वेधून घेतले.

http://www.odditycentral.com/news/patients-lie-in-coffins-to-die-as-part...

अर्थात "आत्महत्येची इच्छा" अथवा तत्सम गंभीर मानसिक समस्या असलेल्या लोकांना "सायकोथेरपी" म्हणून "पुनर्जन्माचा" अनुभव देणार्‍या चीनमधील या क्लिनिकची ही बातमी. मृत्यूसंबंधीत वातावरणनिर्मीती करुन रुग्णाला कृत्रिम थडग्यात ५ मिनीटे झोपवले जाते. तत्पूर्वी रुग्णाला शेवटची इच्छा लिहावयस सांगतात. ५ मिनीटांनी बाळाच्या रडण्याचे संगीत वाजवून रुग्णाचे जगात स्वागत केले जाते.

जवळजवळ १००० लोकांनी ही थेरपी अनुभवली असून ही थेरपी सर्वांसाठी नाही. रुग्णाची निवड काही कसोट्यांवर / कटाक्षाने केली जाते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व उर्मटशिरोमणी मस्तवालसम्राट अजितदादा पवार यांनी आपल्या हाताखालच्या अधिकार्‍यांना दम देताना (मग तो भले शेतकर्‍यांकडून धरणातील गाळ आपल्या शेतात खत म्हणून वापरल्याबद्दलचा खर्च वसूल केल्याबद्दल का असेना) 'काय, विदर्भात जायचंय का?' असे मौलिक शब्द वापरल्याची बातमी आहे. म्हणजे एखाद्याला शिक्षा करायची असेल तर त्याला विदर्भात पाठवायचे हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत धोरण दिसते. हे करण्याआधी त्यांनी पत्रकारांना 'अरे, तो कॅमेरा बंद कर आधी..' असेही सुनावल्याचे कळते. राष्ट्रवादीचे आणखी एक सुपुत्र उदयनराजे भोसले यांनी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांची निवडणुकींच्या तोंडावर 'सदिच्छा भेट' घेतल्याचीही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक बिनीचे शिलेदार छगनदादा भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात चाललेला भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी कंत्राटे वगैरे बाबींशी आपला काही संबंध नसल्याचे त्यांच्या नेहमीच्या शैलीत गुरकावून सांगितले आहे अशीही बातमी आहे. २०१४ मधील निवडणुकीत विरोधी पक्ष या सगळ्यांचे किती आणि कसे भांडवल करतात (किरीट सोमय्या तर त्या तयारीला लागलेलेही दिसतात) हे बघणे रंजक ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या पुंडगिरीला पर्याय म्हणून मतदारराजा दुसर्‍या कोणत्या पक्षाची पुंडगिरी स्वीकारतो हेही बघणे उत्कंठावर्धक असणार आहे....

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आपली कारकिर्द गाजवणारे आणि CAG ऑफिसचे महत्त्व जनतेसमोर आणणारे विनोद राय येत्या २२ तारखेला निवृत्त होत आहेत.
त्यांनी या निमित्ताने TOI ला मुलाखत दिली आहे. नक्कीच वाचनीय आहे.

त्यात मला त्यांचे एका प्रश्नावरचे हे उत्तर अतिशय आवडले:

When huge sums of money are involved what do we do? I'm talking about government revenue. Whether in 2008 or in 2010, we clearly said that we are not talking about policy as such. Did we say that in 2008 (on 2G), you should not have gone for first-cum-first serve policy? We did not. You have laid down the policy. We didn't ask why you changed your policy in 2010 and go in for auction. We started auditing only in 2010 by then both policies had been implemented. The audit regulation says we don't formulate policy, but sub-optimality of the policy has to be pointed out.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राय यांची मुलाखत वाचली होती.

त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर नक्कीच पाऊल टाकले. आज मुलाखतीत ते म्हणतात की आम्ही लिलावच करायला हवा होता असं म्हटलं नाही. पण नंतरच्या (वेगळ्या स्पेक्ट्रमच्या) लिलावाच्या आधारे २जी स्पेक्ट्रमचा लिलाव केला नाही म्हणून अमुक इतके नुकसान झाले असा अनावश्यक निष्कर्ष काढला. त्यातही नुकसानीची रक्कम वाढवून दाखवली.

ज्या अर्थी सरकारने ३जी साठी लिलाव केला त्या अर्थी फर्स्ट कम पॉलिसी इनएफिशियंट आहे हे सरकारने जाणले/मानलेच होते. त्यामुळे जुन्या पॉलिसीमुळे झालेला काल्पनिक लॉस काढणे अनावश्यक होते. (नव्या पॉलिसीपेक्षा जुनीच पॉलिसी चांगली/एफिशियंट असती तर असा लॉस काढला असता तर चालले असते).

The 2G scam is about favouritism in allocating licences, not about loss to the exchequer.

समजा मला दिसते आहे की एका पॉलिसीमुळे नुकसान होते आहे. पण तरी मी आता ती बदलणारच नाही कारण जरी मीच पुढाकार घेऊन ती बदलली तरी उद्या नव्या पॉलिसीच्या आधारे कोणीतरी माझ्यावर दोषारोप करू शकेल.

अवांतर: बोफोर्स तोफा वाईट होत्या असा अहवाल देणारे कॅग टी एन चतुर्वेदी यांना पुढे राज्यसभेचे खासदारपद मिळाले.

[कॅगने नोशनल लॉसची फिगर काढली. भ्रष्टाचार झाला असे म्हटले नाही हे खरे आहे. १.७६ लाख कोटी रु खाल्ले हा निष्कर्ष मीडिया आणि विरोधी पक्षाने (मोटा माल) काढला. पण कॅगने हा खुलासा करण्याची तसदी घेतली नाही].

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आयगेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी फणीश मूर्ती यांना संचालक मंडळाने हाकलले. उच्चविद्याविभूषित आणि उच्चपदस्थ अशा या व्यक्तीला लैंगिक छळ वा तत्सम गुन्ह्यासाठी दोन वेळा पकडावे हे रोचक आहे. काहीतरी गडबड वाटते का? मूर्ती यांचे म्हणणे असे की, यापूर्वीची इन्फोसिसमधील त्यांच्याविरोधातील खटला हाताळणाऱ्या वकीलाचा यात काहीतरी डाव आहे.

लैंगिक छळाचा आरोप एका आय-गेट मधील स्त्री-कर्मचार्‍याने केला आहे व त्याचा तपास चालु आहे. मात्र, सध्या चालु असलेल्या तपासामध्ये लैंगिक छळ केल्याचे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. त्यांची हाकालपट्टी लैंगिक छळासाठी झाली नसून आय-गेटला त्यांनी आपल्या दुसर्‍या कर्मचार्‍याशी असणार्‍या नात्याची माहिती दिली नसल्याने झाली आहे असे त्या कंपनीच्या पत्रकात म्हटले आहे.

श्री मूर्ती म्हणतात की जर ही -लैंगिक छ्ळवणूकीची - केस कोर्टात आली तर ते ती लढणार आहेत कारण त्यांनी त्या आरोपांचे सपशेल खंडन केले आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मूर्ती यांचे म्हणणे खालील दुव्यावर वाचले.
http://businesstoday.intoday.in/story/sacked-by-igate-phaneesh-murthy-sp...

यात त्यांनी कंपनीला या नात्याची माहिती दिली असल्याचे सांगितले आहे. मात्र ज्या अर्थी इतक्या तडकाफडकी मूर्ती यांची हकालपट्टी झाली आहे त्या अर्थी हा केवळ 'नातेसंबंध लपवण्याचा' प्रकार निश्चितच नसावा असे वाटते.

बाय द वे, या प्रश्नोत्तरांमधील मूर्ती यांचे खालील उत्तर आवडले. Wink

Q. Why did the IR employee suddenly hurl charges against you?
A. When you figure out women let me know and I will take the lesson from you.

उच्चविद्याविभूषित आणि उच्चपदस्थ अशा या व्यक्तीला लैंगिक छळ वा तत्सम गुन्ह्यासाठी दोन वेळा पकडावे हे रोचक आहे. काहीतरी गडबड वाटते का? >> गडबड वाटत नाहीय. निष्काळजीपणा वाटतोय किँवा पॉवर प्ले, थ्रिल.
मूर्ती यांचे म्हणणे असे की, यापूर्वीची इन्फोसिसमधील त्यांच्याविरोधातील खटला हाताळणाऱ्या वकीलाचा यात काहीतरी डाव आहे. >> वकीलाचा डाव वगैरे सारवासारव वाटतेय.
यात त्यांनी कंपनीला या नात्याची माहिती दिली असल्याचे सांगितले आहे. >> नातं संपल्यावर माहीती दिलीय.

===
Amazing Amy (◣_◢)

सज्ञान स्त्रीशी तिच्या सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नाही असा महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे. 'लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक' या प्रकारांना याने आळा बसेल असे वाटते. 'इच्छा असूनही काही कारणाने पुरुषाला अशा स्त्रीशी लग्न करता येत नसेल तर त्यात त्या पुरुषाचा फसवणुकीचा उद्देश आहे असे समजू नये' असे या निर्णयात म्हटले आहे. ही काही कारणे काय असावीत हा विचार रोचक आहे. त्या पुरुषाचे आधीच लग्न झालेले असणे हे कारण कोर्टाला रास्त वाटेल काय?

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

संबंधित बातमीचा दुवा द्यावा.

यासंबंधात 'द प्रॉमिस ऑफ अ प्रॉमिस' हा लेख वाचा.

आशादायक बातमी. लेखही आवडला.

लक्ष्मण मानेंच्या खटल्यासंदर्भात या निकालाने फरक पडेल असं वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लक्ष्मण मानेंच्या खटल्यासंदर्भात या निकालाने फरक पडेल असं वाटतं.

याबाबत खात्री नाही. कामाच्या थिकाणी अधिकार्‍यांनी धाक दाखवून, भीती घालून केलेले शरीरसंबंध हे बलात्कारच समजण्यात येतात. (विवाहित सज्ञान स्त्रीबरोबर तिच्या नवर्‍याने तिच्या संमतीशिवाय केलेला संभोग हाही बलात्कारच) मानेंवरील आरोप या सदरात येतात असे वाटते. चू.भू.दे.घे.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

विवाहित सज्ञान स्त्रीबरोबर तिच्या नवर्‍याने तिच्या संमतीशिवाय केलेला संभोग हाही बलात्कारच

हा निर्णय कधी झाला?
सद्य कायदा तरी यास बलात्कार मानत नाही आणि तो तसा मानावा अशी अनेक संघटनांची मागणी होती असा माझा समज आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१. मजह्याकडील माहितीही अशीच आहे.
अवांतरः-
सज्ञान्,विवाहित स्त्रीबरोबर पतीशिवाय इतर कुणी संबंध ठेवले तर पती त्या पुरुषाविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करु शकतो. व त्याला शिक्षाही होउ शकते.
त्या विवाहित स्त्रीला काहीही शिक्षा होत नाही. असाही कायदा आहे म्हणे. (ऐकिव माहिती)

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१ ला +१
आणि एक शंका यात फक्त योनीसंबंध हे बायकोचं कर्तव्य मानलं आहे की इतर प्रकारचे संबंधदेखील 'कर्तव्य' मधेच येतात?
अवांतरः- सज्ञान्,विवाहित स्त्रीबरोबर पतीशिवाय इतर कुणी संबंध ठेवले तर पती त्या पुरुषाविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करु शकतो. व त्याला शिक्षाही होउ शकते. त्या विवाहित स्त्रीला काहीही शिक्षा होत नाही. >> हे मी TOI मधे वाचलेलं. 'आपले कायदे आपल्या समाजापेक्षा स्त्रियांसाठी फार पुरोगामी आहेत' असा मथळा होता.

===
Amazing Amy (◣_◢)

बातमीचा दुवा?
आशादायक नाही म्हणणार पण रोचक बातमी आहे.
ऋता ने दिलेला लेखही रोचक आहे आणि त्याचा सारांश मान्य असला तरीही 'एकांगी' वाटला Smile
"If the woman is indeed wanting to protect her reputation and virginity... If she is unwilling to get pregnant... If she is an adult... If she is not to be treated as an adult..." वगैरे वगैरे... टु मच...
कायदा सध्या स्त्रियांच्या बाजुने आहे ना? मग शहरी, सुशिक्षीत पुरुषांनीच (ज्यांना यात अडकायचं नाहीय) घ्यावी की जास्त काळजी Smile
असो ऑन अ न्युट्रल ग्राउंड, मला वाटतं थोडाफार मिसयुज होत असेल, पण तरीही कायद्याने स्त्रियांना जास्त सुरक्षीतता द्यायची गरज आहे.

===
Amazing Amy (◣_◢)

>>असो ऑन अ न्युट्रल ग्राउंड, मला वाटतं थोडाफार मिसयुज होत असेल, पण तरीही कायद्याने स्त्रियांना जास्त सुरक्षीतता द्यायची गरज आहे.

सहमत आहे.

>>कायदा सध्या स्त्रियांच्या बाजुने आहे ना? मग शहरी, सुशिक्षीत पुरुषांनीच (ज्यांना यात अडकायचं नाहीय) घ्यावी की जास्त काळजी

येथे उलट संदर्भातला एक अलिकडचाच वाद आठवला.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

कोणता वाद?
माझ्यामते त्यात पैसे खर्च वगैरे मुद्दा होता Smile
आणि ऋता ने दिलेला लेख (मतितार्थ योग्य असला तरीही) ओव्हर द टॉप वाटला. म्हणुन मी ते लाल अक्षरातले शब्द वापरले

===
Amazing Amy (◣_◢)

त्या वादाशी तुमचा संबंध नाही हो. लाल अक्षरातले शब्द विरुद्ध लिंगी होते त्यावरून झालेला वाद आठवला.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ओह अच्छा अच्छा मला वाटलं शालजोडीतले आहेत की काय ROFL

===
Amazing Amy (◣_◢)

ज्या स्त्रियांना न्यायालयीन संरक्षणाची आवश्यकता आहेत त्या लग्नाआधी मित्राबरोबर झोपण्याचा निर्णय घेतात असं वाटत नाही. परंपरा झुगारून देण्याचं स्वातंत्र्य हवं पण त्यासोबत येणारी जबाबदारी नको हा दुटप्पीपणा न्यायालय संपवतं आहे हे मला आशादायक वाटलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लग्नाच्या अमिषाने बलात्कार हे मलादेखील पटत नाही.
पण यासगळ्या नात्यांमधे बरेच अझंप्शन्स, एक्स्पेक्टेशन्स, डेड्रिमीँग वगैरे असतं... कितीजणी खरेच परंपरा झुगारायची म्हणुन लग्नाआधी सेक्स करतात आणि कितीजणी आम्ही कमिटेडच आहोत लग्न काय उद्या परवा करुच अशा विचारेने सेक्स करतात हा प्रश्न आहे. परत तरुण वयातले उसळणारे हार्मोन्स, उशिरा लग्न, नोकरी, करीअर वगैरे वगैरे..
झोपेतून जाग आल्यावर बरेचजण दिनचर्येला लागतात, काही केस दाखल करतात, काहीजण सुपारी देतात (मधुर भांडारकर केस), काही आत्महत्या करतात... समाज नावाची गुंतागुंत Smile

===
Amazing Amy (◣_◢)

चला परंपरा झुगारून देऊ या म्हणून कोणी काही करत असेलसं वाटत नाही. लोकं आपल्याला पटेल, रुचेल, झेपेल, आवडेल अशा गोष्टी करत रहातात. त्यातून कधी परंपरा मोडतात कधी तशाच सुरू रहातात. सज्ञान मुलींनी आपखुशीने घेतलेल्या, स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी न घेता उलट बलात्कारासारखा गंभीर आरोप मित्रावर करणं अन्यायकारक आहे. ज्या स्त्रियांना कोणाशी, कधी संभोग करायचा याचा निर्णय घेण्याची सोय न रहाता त्यांच्यावर बलात्कार होतो त्यांच्यावरही काही प्रमाणात हा अन्यायच आहे. खोटं बोलणं किंवा मतपरिवर्तन होणं आणि जबरदस्ती शरीरसंबंध हे एकाच तागडीत कसं आणि का तोलायचं?

आधुनिक आयुष्यात, जगात मिळणारं शिक्षण, स्वातंत्र्य हे सगळं उपभोगायचं पण मग त्याची जी काही किंमत (पुरुषांना) चुकवावी लागते त्यात मात्र अजिबात वाटा नाही, असं का?

पुन्हा यात लग्न हे प्रकरण फार ओव्हररेटेड आहे आणि बिनसलं एखाद्या/एखादीबरोबर असणारं अफेअर तर ते काहीतरी भलं थोरलं प्रकरण झाल्याची भावना हे ही पटण्यासारखं नाही हे सोडूनच देऊ.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मान्य आहे.

===
Amazing Amy (◣_◢)

चेटकीण असल्याचे आरोप करून बायकांचा अघोरी छळ करण्याचे प्रकार पापुआ न्यू गिनी इथे सर्रास चालू आहेत. चेटूक करण्याचे आरोप करून चाकू-सुर्‍यांनी जखमा करणे, हात कापणे, बोटे कापणे, आणि इतरही अनन्वित छळाची सुन्न करणारी कहाणी आहे. न रहावल्याने शेअर केले. असो.

http://www.theglobalmail.org/feature/its-2013-and-theyre-burning-witches...

डिस्क्लेमरः छायाचित्रे अतिशय सुन्न करणारी आहेत.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

डाकीण काढणे, चेटकीण जाहीर करणे असे प्रकार आपल्या देशातही आहेत. मोठ्या प्रमाणात. विशेषतः आदिवासी समुदायांमध्ये. त्यामागे श्रद्धा-अंधश्रद्धा जशा आहेत, त्याचप्रमाणे त्याच्याही मागे सामाजिक, राजकीय कारणे (सत्तासंघर्ष) दडलेली आहेत. तसे काही अभ्यासही झालेले आहेत.

तशा काही अभ्यासांची लिंक उपलब्ध असल्यास कृपया द्यावी ही विनंती.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

संसदेच्या मान्सून सत्रात Ban on witchcraft Bill, 2010 या प्रायवेट मेम्बर बिलावर चर्चा झाल्याचे आठवते आहे. त्याचे अति-संक्षिप्त वार्तांकन इथे वाचता येईल. संपूर्ण चर्चा ९ ऑगस्टच्या कामकाजात वाचता येईल. (वाचायची असल्यास इथे दुवा शोधून देतो)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुव्याबद्दल धन्यवाद. वार्तांकन वाचतो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

गुगलवर डाकीण प्रथा हे शब्द टाका. बातम्यांचे, आणि इतर लेखनाचे काही दुवे उपलब्ध होतात. त्यातच एका पुस्तकाचाही उल्लेख येतोय. त्यापलीकडे मी केलेल्या वाचनाचे दुवे अधिक आत जाऊन आत्ताच तपासणे शक्य नाही. मात्र बातम्यांमध्ये उल्लेख असलेल्या संस्था, संघटना यांच्याकडे तसे अभ्यास असण्याची शक्यता आहे. असे अभ्यास महाराष्ट्राच्याही बाहेर झालेले आहेत.

धन्यवाद. गुगलून पाहतो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मजेशीर आहे.

पुन्हा यात लग्न हे प्रकरण फार ओव्हररेटेड आहे
सेक्स सुद्धा ओव्हररेटेडच आहे. (असे 'बॉम्बे टॉकीज' मधली राणी मुखर्जी(ही) म्हणते!)

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लग्न हे प्रकरण ओव्हररेटेड आहे याच्याशी सहमत

मलयाळमला अभिजात भाषा म्हणून मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे वाचले. ह्या पार्श्वभूमीवर अरविंद कोल्हटकरांचा अभिजात भाषेच्या राजकारणाबद्दलचा लेख आठवला.
तरीही मलयाळम अभिजात वाचून जरा जास्तच विचित्र वाटले. ह्याआधी मलयाळम ही बरीच अर्वाचीन असल्याचे वाचले होते.

मलयाळम मधला पहिला माहिती असलेला शिलालेख इ.स. ८०० नंतरचाच आहे. हे दक्षिणेकडचे लोक सर्कारमागे भुंगा लावून लावून मागण्या मान्य करून घेतात आणि आपण करत नाही इतकाच काय तो फरक आहे. बरं उद्या मराठीला हा दर्जा मिळाला तर हे लोक नक्की "क्या उखाड लेंगे" काय माहिती.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हा तो कोल्हटकरांचा लेख. या लेखातलंच एक वाक्यः
ही वा ती भाषा ’अभिजात’ आहे असे ठरविण्याचा कोणताच अधिकार केन्द्र सरकारकडे घटनेनुसार वा कायद्यानुसार नाही आणि कोणत्याहि सरकारी घोषणेमध्ये अशा अधिकाराचा स्पष्ट उल्लेख नाही

बातमीत एक वाक्य आहे:
As classical language, major benefits would accrue to Malayalam. This includes announcement of two major annual international awards for scholars of eminence in classical Indian languages.

हे पुरस्कार नक्की कोण देणार? आणि कोणत्या सरकारने अशी घोषणा केल्यास जागतिक स्तरावर, अभिजन, अभ्यासकांकडून, त्याला कितपत मान्यता मिळते?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

www.timesofindia.com/india/Women-using-rape-laws-for-vengeance-Delhi-hig...
ही बातमी, वर अदितीशी झालेली चर्चा आणि फनिश मुर्ती यांचा विचार करताना एक शंका आली.
जगात इतरत्र यासंदर्भात काही कायदा आहे का?
जर फनिश आणि अर्सेली एकाच कंपनीत नसते आणि अर्सेली गरोदर नसती तर तिला फनिशविरुद्ध कोर्टात जाता आलं असतं का?

===
Amazing Amy (◣_◢)

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me