Skip to main content

आजचे दिनवैशिष्ट्य

१५ सप्टेंबर 

जन्मदिवस : गणितज्ञ अल बेरुनी (९७३), फिरस्ता मार्को पोलो (१२५४), नीतिकथालेखक रोशफूको (१६१३), आधुनिक भारताच्या औद्योगिक युगाचे शिल्पकार डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६०), साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय (१८७६), लेखिका अगाथा ख्रिस्ती (१८९०), सिनेदिग्दर्शक जाँ रन्वार (१८९४), सिनेदिग्दर्शक शोहेई इमामुरा (१९२६), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ मरे गेल-मान (१९२९), सिनेदिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन (१९४६), अभिनेता व सिनेदिग्दर्शक टॉमी ली जोन्स (१९४६)

मृत्युदिवस : तत्त्ववेत्ता रूडॉल्फ आईक्रेन (१९२६) 

राष्ट्रीय अभियंता दिन (विश्वेश्वरय्या स्मृती)
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
शिक्षणस्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन : ग्वातेमाला, एल साल्व्हादोर, होंडुरास, निकाराग्वा, कोस्तारिका (१८२१)

१६१६ : फक्त उमरावांपुरती मर्यादित नसणारी पहिली युरोपीय शाळा इटलीत सुरू झाली.
१८३५ : चार्ल्स डार्विन एच. एम. एस. बीगल या जहाजातून गॅलापगोस द्वीपांत पोचला. तिथे त्याला उत्क्रांतीसंबंधी पहिले पुरावे मिळाले.
१९१६ : पहिले महायुद्ध – रणगाड्यांचा प्रथम वापर सॉमच्या लढाईत केला गेला.
१९३५ : हिटलरने न्यूरेम्बर्ग कायदे अमलात आणले. त्यामुळे जर्मनांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आले आणि ज्यूविद्वेषाला अधिकृतता लाभली.
१९३५ : भारतातल्या डून स्कूलची स्थापना.
१९४८ : निजामाविरुद्ध कारवाईत औरंगाबाद भारतीय सैन्याने जिंकले.
१९५९ : भारतीय दूरचित्रवाणी 'दूरदर्शन'च्या प्रसारणाची दिल्लीमध्ये सुरुवात.
१९५९ : निकिता ख्रुश्चेव अमेरिकेला भेट देणारा सोव्हिएत संघाचा पहिला नेता झाला.
१९९७ : 'गूगल.कॉम' डोमेन रजिस्टर झाले.
२००८ : लेहमन ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले.
२०१३ : नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.