मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग ४)

याआधीच्या लेखांचे दुवे : भाग १, भाग २, भाग ३

(सूचना : पुष्कळ चित्रं असल्यामुळे पान लोड व्हायला वेळ लागतो आहे म्हणून इथे लहान आकारांत चित्रं दिली आहेत. त्यामुळे अधिक तपशीलात चित्र पाहण्यासाठी चित्राचा दुवा वापरा)

गेल्या भागात पंधराव्या शतकाचा विचार केला होता. या भागाची सुरुवात मात्र एका अतिशय जुन्या शिल्पानं केली आहे. हे शिल्प ख्रिस्तपूर्व २५च्या सुमाराला रोमन संस्कृतीत घडवलं गेलं होतं. सोळाव्या शतकात ते सापडलं आणि तेव्हाच्या पाश्चात्य कलेवर त्याचा खोल परिणाम झाला. म्हणून या भागाची सुरुवात त्यानं केली आहे. 'लाओकून गट' म्हणून ओळखलं जाणारं हे शिल्प आज व्हॅटिकनमध्ये आहे.
अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Laoco%C3%B6n_and_His_Sons

बलदंड, पिळदार शरीराच्या, पण सर्पांच्या विळख्यात मरणवेदनेनं चूर झालेल्या अशा ह्या पुरुषामुळे मायकेलॅंजेलो प्रभावित झाला. याआधी, म्हणजे १५०४मध्ये मायकेलॅंजेलोनं घडवलेला डेव्हिड पाहा :

गेल्या भागात पाहिलेल्या दोनातेल्लोच्या दिलखेचक डेव्हिडपेक्षा ह्याच्या अंगावर अधिक मांस आहे. तरीही तो दिलखेचक आहे. आणि आता लाओकून सापडल्यानंतरचा लूव्रमधला हा मरणासन्न गुलाम पाहा (१५१३-१६) -

गुलाम असला तरी कंबरेच्या वळ्या पाहता हा खात्यापित्या घरचा वाटतो. आणि सिस्टिन चॅपेलमध्ये मायकेलॅंजेलोनं नंतर चितारलेला ख्रिस्त किंवा संत बार्थोलोम्यू आता पाहा म्हणजे लाओकूनचा प्रभाव नीट लक्षात येईल :

('लास्ट जजमेंट'मधल्या नग्न ख्रिस्तामुळे आणि इतर संतमंडळींच्या संपूर्ण नग्नतेमुळे तेव्हा जरा पंचाईत झाली होती. त्यांच्यावर कपडे चितारून त्यांची शरीरं नंतर इतर कुणीतरी झाकली होती हे या प्रतिमा पाहताना लक्षात ठेवा.)


ख्रिस्त आणि माता मेरी - 'लास्ट जजमेंट' (सिस्टीन चॅपेल)

पण एकट्या मायकेलॅंजेलोकडे लक्ष देऊन चालणार नाही. त्याच्या आसपास आणखी एक महान कलाकार होऊन गेला.
१४९२च्या सुमाराला लिओनार्डो दा विंचीनं काढलेला हा व्हिट्रुव्हियन मॅन म्हणजे पाश्चात्य प्रमाणबद्धतेचा कळस आहे असं अनेकांना वाटतं.

त्यानं १५१५च्या सुमाराला काढलेलं हे चित्र पाहा :

अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/St._John_the_Baptist_(Leonardo)

पुरुष की बाई हेच पटकन कळत नसणारी ही प्रतिमा आहे सेंट जॉन द बाप्तिस्त याची, म्हणजे एका पुरुषाची. तर यानंच काढलेली एक स्त्री (१४९०-९६) पाहा :

छातीचा उभार फारसा नसणं, रुंद खांदे आणि चेहरा पुन्हा एकदा पुरुषाचा की स्त्रीचा याबद्दल संभ्रमात पाडणारा. दा विन्ची समलिंगी होता म्हणून हे असं होतं असं काहींचं म्हणणं पडतं. पण मायकेलॅंजेलोदेखील समलिंगी होता. फार सरसकटीकरण करणं श्रेयस्कर नाही हेच एकुणात खरं.

त्याच काळी होऊन गेलेला आणखी एक महत्त्वाचा कलाकार राफाएल यानं काढलेला ख्रिस्त (१५०७) पाहा :

हा काहीसा आत्मचित्रात्मक आहे असं मानलं जातं. 'सिक्स पॅक'च्या आसपासचा हा ख्रिस्त आजही मॉडेल म्हणून खपून जावा.

राफाएलच्या आयुष्यात अनेक स्त्रिया होत्या असं म्हणतात. त्याच्या 'थ्री ग्रेसेस'शिवाय (१५०४-०६) आपली मालिका पुढे जाऊच शकत नाही.

अगदी झीरो फिगर नसल्या तरी या तशा भरदारही नाहीत.
(जाताजाता : 'थ्री ग्रेसेस' हा पाश्चात्य कलाकारांचा हा एक आवडीचा विषय होता. गेल्या भागातल्या बोतिचेल्लीच्या 'वसंत' चित्रातही ह्या होत्या. तुलनेसाठी त्यांची इतर काही रुपं इथे पाहता येतील.)

याकोपो पोंतोर्मो ह्या आणखी एका इटालियन चित्रकाराची थोडी नंतरची (१५३२-३४) व्हीनस पाहा :

किंवा त्याचा संत जेरोम (१५२७-२८) पाहा :

जेरोम वृद्ध दाखवण्याची पध्दत रुढ होती. आकर्षक किंवा आदर्श शरीर दाखवण्यापेक्षा भावदर्शनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं इथे दिसतं.

व्हीनस म्हटल्यावर या आसपासची एक 'आयकॉनिक' मानली जाणारी प्रतिमा दाखवायला हवीच.
टिशियन या व्हेनिसच्या सुप्रसिध्द चित्रकाराची ही व्हीनस (१५३८) आज फ्लॉरेन्सच्या उफिझी गॅलरीत पाहता येते.

आपल्या आकर्षकतेबद्दल गर्व असणारी आणि समोरच्या दर्शकाच्या नजरेला नजर भिडवणारी अशी ही उन्मादक स्त्री-प्रतिमा म्हणजे पुरुषांची चावट स्वप्नं साकारणारी वाटते. ही व्हीनस पौराणिक कथेतली नसून ती एक तत्कालीन सुखासीन स्त्री दिसते. म्हणून ती कदाचित तेव्हा आणखी आकर्षक वाटली असावी.

पण टिशियन इथे अडकून राहिला नाही. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात (१५७०-७६) त्यानं रंगवलेला हा प्रसंग पाहा -

हुबेहूब, रेखीव आणि आकर्षक चित्र काढण्याइतपत रंगरेषांवर ताकद असणारा टिशियन इथे काहीतरी वेगळं करू पाहात होता असं दिसतं. रसनिष्पत्तीसाठी हुबेहूबपणाचा आग्रह सोडून देण्याची त्याची ही शैली आधुनिकतेकडे जाते आणि म्हणून आजही लोकांना अचंबित करते.

आकर्षक स्त्री दाखवण्यासाठी जशी व्हीनस सोयीची जायची, तसा आकर्षक कोवळा तरुण दाखवण्यासाठी संत सेबॅस्तियन वापरला जायचा. आपल्या आवडींपायी 'द सोडोम' याच नावानं ओळखल्या जाणाऱ्या चित्रकारानं १५२५मध्ये चितारलेला हा त्याचा एक अवतार पाहा :

ख्रिस्ताला क्रूसावर दाखवतानाच्या एका चित्रातला (१५१०-१३) तपशील नीट पाहिला तर त्यातही या पठ्ठ्यानं एका सैनिकाचा पार्श्वभाग मोठ्या आवडीनं रंगवलेला दिसतो :

संपूर्ण चित्र -

उघड उन्मादक प्रतिमा रंगवण्यासाठी चित्रकारांना धनिकांनी पैसे देणं हे आता नवीन राहिलं नव्हतं. गेल्या भागात आपण पाहिलं त्यानुसार छपाईचं तंत्र एव्हाना चांगलं विकसित झालेलं होतं. या दोन घटकांचा परिपाक म्हणजे उघडउघड संभोगक्रिया दर्शवणारी पुस्तकं. १५२४मध्ये प्रकाशित झालेलं 'इ मोदी' (The Ways, a. k. a. The Sixteen Pleasures) हे १६ 'आसनां'चं पुस्तक त्याच्या चित्रकाराला चांगलंच तापदायक ठरलं. पुस्तक प्रकाशित होताच पोपनं त्याला तुरुंगात टाकलं. पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त झाल्या. काही खटपटी-लटपटींनंतर तो सुटला. १५२७मध्ये काही चमचमीत सुनीतांसह चित्रं पुन्हा प्रकाशित झाली. पण मग पुन्हा त्यांवर जप्ती आली. या चित्रांच्या प्रती आणि प्रतींच्या प्रती वगैरे मात्र शतकानुशतकं होत राहिल्या. कामुक मजकूर आणि कामुक प्रतिमा यांचा पाश्चात्य संस्कृतीतला हा पहिला मिलाफ समजला जातो. अठराव्या शतकातली 'इ मोदी'ची एक प्रत आज पाहता येते. त्यावरून त्या प्रतिमा कशा असतील याचा अंदाज करता येतो. त्या इथे पाहा - http://en.wikipedia.org/wiki/I_Modi

आतापर्यंत दाखवलेल्या प्रतिमांतून इटलीतलंच चित्र दिसलं. इटालियन ही तेव्हाची सर्वात प्रभावी चित्रपरंपरा ठरली. त्याच दरम्यान इतरत्र दाखवलं जाणारं मानवी शरीर मात्र कधीकधी याहून निराळं होतं आणि म्हणून त्याची दखल घ्यायला हवी. उदाहरणार्थ लुकास क्रानाक (थोरला) हा जर्मन चित्रकार. त्यानं चितारलेले अॅडम-इव्ह (१५२६) इटालियन चित्रांतल्या मानवी शरीरांपेक्षा कमी मांसल आहेत.

त्याच्या 'थ्री ग्रेसेस'सुद्धा (१५३१) तशा सडसडीत आहेत.

त्याच्या मुलानं (धाकला लुकास क्रानाक) काढलेले व्हीनस आणि क्युपिड (१५४०) तर जरा कृशच आणि म्हणून झीरो फिगरकडे झुकलेले वाटतात :

आणि तसाच त्याचा हा नाजुक, मेट्रोसेक्शुअल म्हणता येईल असा ख्रिस्त (१५५७) :

एव्हाना व्यक्तिचित्रांमध्ये पुरेसं वास्तवदर्शी चित्रण होऊ लागलं होतं आणि त्यायोगे शरीरांचे अनेक प्रकारही दिसू लागले होते. जर्मनीतल्याच हान्स होलबेनचे हे गब्रू राजदूत (१५३३) आपल्या गलेलठ्ठपणातून आपलं वैभव कसं मिरवताहेत पाहा :

इतरत्रदेखील मोठ्या ताकदीचं काम होत होतं. अनाकर्षक म्हणता येईल असं पण खिळवून ठेवण्याची ताकद असलेलं काम करणारे दोन फ्लेमिश चित्रकार यात फार महत्त्वाचे आहेत.

उदाहरणार्थ, हिएरोनिमस बॉशनं काढलेल्या 'गार्डन ऑफ अर्थली डिलाइट्स' (१४८०-१५०५) या गुंतागुंतीच्या चित्रातली उजवीकडची नरकाची प्रतिमा पाहा. चित्रातली शरीरं पाहता ते ज्यू छळछावणीचं चित्र म्हणूनही खपून जाऊ शकेल :

किंवा क्रूस ओढून नेतानाच्या ख्रिस्ताच्या चित्रातले (१५१५-१६) हे भेसूर चेहरे पाहा :

सौंदर्याच्या तेव्हाच्या किंवा आताच्याही कल्पनांत ते बसणार नाहीत. कारण त्यांचं प्रयोजनच भिन्न आहे. अशा भावनिष्पत्तीसाठी अशा मानवाकृती काढणं हे तेव्हा किती अनोखं आणि कलाविश्व हादरून टाकणारं असेल याची कल्पना आधीची चित्रं पाहून यावी. उदाहरणार्थ, 'द सोडोम'च्या चित्राशी याची तुलना कशी कराल?

पीटर ब्रुगेल (थोरला) याच्या 'ट्रायम्फ ऑफ डेथ'मधले (१५६२) तपशील पाहा :

एक प्रकारे काळाच्या पुढे असलेली म्हणता येतील अशी ही शरीरं होती. त्यांचा प्रभाव स्पेनमध्ये स्थायिक झालेल्या एका ग्रीक माणसावर पडला. एल ग्रेको (द ग्रीक) म्हणून तो ओळखला जातो :

The Opening of the Fifth Seal किंवा The Vision of St John (१६०८-१४)

लाओकूननं या भागाची सुरुवात केली होती. म्हणून एल ग्रेकोचा लाओकून (१६०४-१४) शेवटी देण्याचा मोह आवरत नाही :

हा मरणासन्न लाओकून खिन्न करतो. ही ख्रिस्ती धर्माच्या हिंस्र स्वरूपाची चाहूल होती, पण कलेत युगप्रवर्तन घडवून आणण्याची ताकददेखील त्यात होती.

रनेसाँस म्हणून प्रसिध्द पावलेला कालखंड आपण या आणि मागच्या लेखात पाहिला. त्याबद्दल अधिक माहिती इथे पाहता येईल.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

हा भागही रोचक आहे! मनुष्याचे आकार केवळ व्यक्ती/ शैलीनुरूपच नाही तर प्रसंग, प्रदेशानुरूपही बदललेले आढळतात. या दरम्यान भारतात मनुष्याकृतींमध्ये काय प्रयोग चालु होते हेही पाहणे रोचक ठरावे

शेवटी क्रमशः नाही हा टंकनदोष आहे का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कंटाळवाणा भाग. एक दीर्घ जांभई. आपल्या या धाग्यास ह्याहून समर्पक प्रतिसाद देण्यास मी असमर्थ आहे. मी एक अतिशय ड्यांबिस इसम आहे, हे कदाचित त्यामागचे कारण असेल. तद्वत दिलगिरी. आपण आपल्या उदार मनाने माझा हा अपराध पोटात घालाल अशी दुर्दम्य आशा बाळगतो. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

छ्या! काय मुक्ताताई!
यावर तुम्ही विडंबन लिहुन उधळणार नाही? घोर निराशा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गाई गाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

शैलीमधे झालेला हा बदल व्यक्तीकेंद्रीत मूल्य, व्यक्तीवादाची सुरूवात मानला जातो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>शैलीमधे झालेला हा बदल व्यक्तीकेंद्रीत मूल्य, व्यक्तीवादाची सुरूवात मानला जातो का?<<
हो. मुळात १५व्या शतकापर्यंत पुष्कळदा चित्रकारांची नावं ही फारशी महत्त्वाची मानली जात नसत, कारण विशिष्ट शैलीत काम करणारे एवढीच त्यांची ओळख असे. पण आता मात्र चित्रकार आपापली म्हणजे व्यक्तिविशिष्ट शैली बनवू लागले आणि चित्रांवर सह्यादेखील करू लागले. बोतिचेल्ली, दा विंची किंवा मायकेलँजेलोसारख्या चित्रकारांचा एक कल्ट झाला असंसुध्दा म्हणता येईल. म्हणजे त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या शैलीत काही चित्रं काढली, किंवा इतरजण त्यांची नक्कल करू लागले वगैरे.

व्यक्तिवादाकडचं दुसरं पाऊल हे धनिकवर्गाकडून उचललं गेलं. चित्रकाराला पैसे देऊन त्याच्याकडून चित्र काढून घेणं हे पूर्वी मुख्यतः धर्मसंस्था करत असत. आता जो मोठा धनिक-वणिक वर्ग युरोपात निर्माण झाला होता तो हे करू शकत होता. त्यामुळे व्यक्तिचित्रं हा एक मोठा प्रकार अस्तित्वात आला. म्हणजे अर्थात धनिकाचं स्वतःचं चित्र किंवा त्याच्या आप्तस्वकीयांचं चित्र असे. किंवा त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या खाजगी करमणुकीसाठी चित्रं काढली जाऊ लागली. हा प्रकार पूर्वी अगदीच नव्हता असं नाही - उदाहरणार्थ पॉम्पेमध्ये काही घरांमध्ये अशी सजावटीसाठी काढलेली चित्रं दिसतात. आता मात्र ती मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||