आजचे दिनवैशिष्ट्य
जन्मदिवस : बॅबिलॉन परिसराचे उत्खननशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ शेबेर्ट कोल्ड व्हाई (१८५५), क्रिकेटपटू रणजितसिंह (१८७२), स्वातंत्र्यलढ्यातले नेते गोविंद वल्लभ पंत (१८८७), कॉम्पटन परिणाम शोधणारा नोबेलविजेता आर्थर कॉम्पटन (१८९२), सिनेदिग्दर्शक अलेक्सांद्र डॉव्हजेन्को (१८९४), कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण (१८९५), जीवशास्त्रज्ञ, भूगोलतज्ज्ञ, लेखक जॅरेड डायमंड (१९३७), उत्क्रांतिशास्त्रज्ञ, लेखक स्टीफन जे गूल्ड (१९४१), अभिनेत्री भक्ती बर्वे (१९४८), अभिनेता कॉलिन फर्थ (१९६०), सिनेदिग्दर्शक गाय रिची (१९६८), टेनिसपटू गुस्ताव्हो कर्टन (१९७६)
—
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ, लेखिका, स्त्रीवादी मेरी वॉलस्टनक्राफ्ट (१७९७), म. फुले यांचे सहकारी, शल्यचिकित्सक डॉ. विश्राम रामजी घोले (१९००), क्रांतिवादी तत्त्वज्ञ बाघ जतीन उर्फ जतिंद्रनाथ मुखोपाध्याय (१९१५), सत्यजित राय यांचे पिता, बालसाहित्यकार सुकुमार राय (१९२३), व्हायोलिनवादक पं. श्रीधर पर्सेकर (१९६४), परमवीर अब्दुल हमीद (१९६५), इलेक्ट्रॉन विकीरणासाठी नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजट थॉमसन (१९७५), गणितज्ञ, विश्वरचनाशास्त्रज्ञ हर्मन बॉन्डी (२००५), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ फीलिक्स ब्लॉक (१९८३)
—
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
१८४६ : शिवणयंत्राचे पेटंट एलियस हॉव याला मिळाले.
१९६० : रोम ऑलिंपिकमध्ये अबेबे बिकिलाने अनवाणी धावून मॅराथॉन जिंकली.
१९६६ : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
१९६७ : जिब्राल्टरमध्ये सार्वमत होऊन ब्रिटनमध्ये राहण्याचा निर्णय झाला.
१९७४ : गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९८८ : वर्षातल्या चारही मुख्य (ग्रँड स्लॅम) टेनिस स्पर्धा स्टेफी ग्राफने जिंकल्या.
२००२ : स्वित्झर्लंडचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
२००८ : लार्ज हॅड्रॉन कोलायडर कार्यरत.
- 741 views