ख्रि.पू. १३०० मधील "देऊळ"!

गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी इथे ख्रिस्तपूर्व १३०० इतक्या जुन्या काळातील खेड्याचे अन एका विटांनी बांधलेल्या "देवळाचे" अवशेष सापडलेले आहेत.

हा अतिशय क्रांतिकारक शोध ठरेल यात संशय नाही. कारण सध्या तरी गुप्तपूर्व काळातील कुठलेही फ्री-स्टँडिंग हिंदू देऊळ माहिती नाहीये अन जैन-बौद्ध लेणीही जास्तीत जास्त अशोकाच्या काळापर्यंत (३०० ख्रि.पू.) सापडतात. त्यामुळे हे चक्क लेटर वैदिक काळातले "देऊळ" पाहताच कळायचं बंद झालेलं आहे. १३०० ख्रि.पू. म्हंजे बौद्ध तर शक्यच नाही, जैन सुद्धा नाहीच. तस्मात हिंदू हीच शक्यता बह्वंशी विचारात घ्यावी लागेल. या शोधामुळे बरीच समीकरणे बदलतील असे वाटतेय.

=======
संपादकः सदर विषयाची व्याप्ती व या शोधाचे भारतीय उपखंडाच्या इतिहासातील महत्त्व व संभाव्य पडसाद(इम्पॅक्ट) लक्षात घेता या विषयाशी संबंधित अधिक सम्यक व माहितीपूर्ण चर्चा व्हावी म्हणून सदर प्रतिसाद वेगळा काढत आहोत. या निमित्ताने सदर घटनेचे महत्त्व व संभाव्य पडसाद, या शोधामुळे नवे उभे राहिलेले प्रश्न, या शोधामुळे बळकटी मिळालेले सिद्धांत, त्यामुळे होऊ शकणारा सामाजिक (प्रसंगी राजकीय?) परिणाम आदी विविध दृष्टिकोनातून चर्चा करता येईल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

मूळ लक्षवेधी दुव्याबद्दल बॅटमॅन यांचे आभार. ही बातमी सध्या सर्वात जास्त अणि व्यवस्थित माहिती देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमीच्या दुव्याबद्दल बहुत धन्यवाद! खालील दुव्यावर अजून थोडी माहिती मिळेल.

या प्रकल्पाबद्दल माहिती देणारा डरहॅम युनिव्हर्सिटीचा दुवा.

उत्खनन करणार्‍या टीमचा परिचय करून देणारा ब्लॉग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक, हे देऊळ असल्यास मोझेसने बांधलेल्या देवळाच्या आधी/जवळपास हे बांधले असावे, हा एक रोचक आलेख.

अवांतर- मोझेसला देऊळ बांधण्याबद्दल दृष्टांत झाला म्हणतात, त्याच वेळेला इकडेपण कोणालातरी दृष्टांत झाला असावा, किंवा मोझेस मुळात हिंदूच होता, व त्याने लुंबिनी येथे देऊळ बांधले अशी शंका आहे, तसेच त्याचा व बुद्धाचाही काही संबंध असावा अशीही शंका आहे. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लुंबिनीच्या इतिहासाचा काप -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर शोध क्रांतीकारक ठरावा यात शंका नाही.
उपखंडाचे लोहयुग म्हणा किंवा सिंधु खोर्‍यांपासून दूर जाण्याची सुरवात म्हणा इ.पु.११०० मध्ये झाली असे म्हटले जाते. हडप्पा संस्कृतीचा अस्तही इ.पू.१३००च्या आसपास समजला जातो असे आठवते. अर्थात हा अस्त म्हणजे या भागातील लोकांनी काही कारणांनी (बहुतांश कारण सरस्वतीचे आटणे) "अन्यत्र" स्थलांतर केले. त्यातील काहि टोळ्या थेट नेपाळपर्यंत गेल्या असाव्यात असा तर्क करता येईल का?

सदर इमारत "लोहयुगाची" नांदी दर्शवते का? असाही प्रश्न पडला. सध्या भारतीय उपखंडाचे लोहयुग इ.स्.पूर्व ११०० ते १००० च्या दरम्यान सुरू झाल्याचे समजले जाते. जर या इमारतीत तशा खुणा आढळल्या तर उपखंडात लोहयुग किमान ३०० वर्षे आधी अवतरल्याचे म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या शोधामुळे लोहयुगाच्या सुरुवातीवर काही भाष्य होईल की नाही ते माहिती नाही- अंमळ साशंक आहे त्याबाबत.

बाकी स्थलांतराबद्दल पाहू गेल्यास उत्तर भारतात इ.स.पू. १३०० च्या सुमारास सगळीकडे उत्तरसिंधू-संस्कृतीचे अवशेष सापडतात. या संस्कृतीलाच पेंटेड ग्रे वेअर असेही नाव आहे ते त्या काळात सापडणार्‍या मातीच्या भांड्यांच्या रंगावरून. तस्मात हे अवशेषही त्याच संस्कृतीतले असावेत. अन टोळ्यांनी नेपाळपर्यंत स्थलांतर नक्कीच केले होते. इंडोआर्यन भाषक टोळ्यांच्या भारतभर एक्स्पान्शनचा हा आरंभकाळ होता तस्मात तेही लॉजिकलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अन टोळ्यांनी नेपाळपर्यंत स्थलांतर नक्कीच केले होते

याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल. (अर्थात माझं वाचन अगदीच सिमीत आहे, पण) याआधी ही माहिती वाचनात आली नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पेंटेड ग्रे वेअर वाली संस्कृती कुठपासून कुठपर्यंत पसरली होती याचा मॅप.

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/b8/Indo-Iranian_origins.png

यात लुंबिनीचे लोकेशन कव्हर होतेच.

शिवाय नेपाळचा उल्लेख अथर्ववेद परिशिष्ट नामक ग्रंथात आल्याचे विकीबाबा सांगतो. तस्मात तिथपर्यंत भारतीय लोक गेले होते हे नि:संशय.

संपादकः दुवा दुरूस्त केला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्म्म.. आभार! जरा वाचन वाढवतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गौतम बुद्धाचे पार्थिव अवशेष लुंबिनी येथे पुरले गेले होते का भारतामध्ये नेपाळ सीमेच्या थोडे अलीकडे पिप्राह्वा नावाच्या गावात ह्यावरून एक विवाद १९व्या शतकाच्या अखेरीपासून चालू आहे. ह्या इतिहासाला केवळ पुरातत्त्वीय मुद्द्यांपलीकडे खोटे अवशेष बनविणे, त्यांचा व्यापार, तकालीन ब्रिटिश सरकारने ह्या वादाचा उपयोग त्यांच्या ब्रह्मदेश-सयामच्या राजकारणात करणे असे अनेक पदर आहेत. जालावर ह्याबद्दल मुबलक साहित्य उपलब्ध आहे. ह्या वादाच्या निर्णयाचे टूरिझम- संबंधी लाभ ध्यानात घेऊन भारत आणि नेपाळ दोघेहि आपापले घोडे पुढे रेटतांना दिसतात. ह्याचा थोडा अधिक अभ्यास करून एक लेख लिहावा असा इरादा आहे. तूर्तास रुमाल टाकून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडेल वाचायला. वाट पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

ह्यापुढचे २-३ आठवडे मी चीनमध्ये भ्रमंतीला जाणार असल्याने सवड होणार नाही. ही एका अर्थाने इष्टापत्तीच आहे असे म्हणता येईल. वर उल्लेखिलेल्या वादाच्या पदरांमध्ये Xuanzang चा ७व्या शतकातील भारतप्रवास आणि सर्व पवित्र बौद्ध स्थळांच्या भेटींचा त्याने लिहून ठेवलेला वृत्तान्त आणि तो आजच्या परिस्थितीशी पडताळणे हाहि एक पदर आहे.

आमच्या भ्रमंतीमध्ये Xi'an (अदमासे उच्चार शिआन) हेहि शहर आहे. Xuanzang चीनला परतल्यानंतर तत्कालीन सम्राटाने Xuanzangने आणलेली पुस्तके इत्यादि सांभाळण्यासाठी जो अनेकमजली मनोरा बांधला तो येथेच आहे. येथेच Xuanzangने उरलेले आयुष्य काढले आणि शेकडो बौद्ध ग्रंथांची चिनी भाषेत भाषान्तरे केली. आमची भ्रमंती If its Tuesday, it must be Belgium धर्तीची असल्याने तेथे जाऊनहि प्रत्यक्ष Xuanzang स्मारकाला भेट देता येईल काय ह्याची खात्री नाही, प्रयत्न निश्चित करेन. तेथून परतल्यावर अधिक डोळसपणे लेख लिहिता येईल. थोडी वाट पहावी लागेल.

(Xuanzang हे नाव असे रोमन लिपीत लिहिण्याचे कारण म्हणजे ह्याचा उच्चार कसा करायचा ह्याविषयी माझी खात्री नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेथून परतल्यावर अधिक डोळसपणे लेख लिहिता येईल. थोडी वाट पहावी लागेल.

अवश्य. वाट पाहत आहोत. उत्सुक आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिप्राह्वा

याच गावात सापडलेली, ब्राह्मी लिपीतील उत्कीर्ण लेख असलेली एक छोटीशी डबी आहे. ती आजमितीस दिल्ली येथील नॅशनल म्युझियम येथे जतन करून ठेवलेली आहे. तिच्यात रक्षावशेष आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ़्याण्टास्टीक.
त्या डबीचे छायाचित्र मिळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेटवर शोधल्यावर बर्रेच फटू मिळाले.

https://www.google.co.in/search?q=piprahwa+casket+inscription&biw=1366&b...

बाकी त्यावरचा कोरीव लेख व त्याचे वाचन इथे मिळेल.

http://www.tbcm.org.my/wp-content/uploads/2013/06/Are-These-The-Buddhas-...

ते खालीलप्रमाणे:

लेखाचे वाचन.

Sukiti-bhatinam sa-bhaginikanam sa-puta-dalanam iyam salila-nidhane Budhasa bhagavate
sakiyanam.

भाषांतर.

According to Debala Mitra [3], this is variously translated as follows:
1. “This shrine for the relics of the Buddha, the August One, is that of the Sakyas, the brethren
of the Distinguished One, in association with their sisters and with their sons and wives.”
According to this translation, the relics are those of the Buddha himself.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भन्नाट. शाक्यमुनी नाव आहे चक्क.
संस्कृत लेख दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं