सध्या काय ऐकताय/ ऐकलत?

वाचणे आणि पाहणे या दृक माध्यमांबद्दल धागे आहेत.तर श्राव्यमाध्यमाबद्दल पण असे काही असावे असे वाटले म्हणून धागा काढतोय.
तर माझा प्रश्न आहे सध्या काय ऐकताय?/किंवा ऐकलत?
एखादे गाणे आपण ऐकले तरी दोन दोन दिवस गुणगुणत राहतो असे होते.ती चाल मनात घर करून राहते. तसे माझ्या डोक्यात सध्या रेहमानने गायलेले आज जाने कि जिद ना करो बसलंय.(कार्यक्रम- MTV unplugged).हे ऐकल्यावर आशा भोसले आणि फरीदा खानुम यांनी गायलेले पण शोधून काढून ऐकले.सगळेच व्हर्जन अप्रतिम आहेत.
या खेरीस रशीद खानची राग बरवा (barwa)मधली प्रेम बाजे मोरी पायलिया हि बंदिश खास आवडली आहे.
बऱ्याचदा पुरेशी प्रसिद्धी नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे चांगली गाणी आपल्या पर्यंत पोहोचत नाहीत असे काही विशेष आवडलेले संगीत असल्यास त्या बद्दल सांगा.

4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

हे एकेकाळी खूप आवडायचे.

This comment has been moved here.

https://www.youtube.com/watch

https://www.youtube.com/watch?v=vyNQg7zaIfQ

एक होती मधुबाला व एक होता गोरिला.

---

https://www.youtube.com/watch?v=QpwfIAGbqFE

काय बाईच्या गळ्यात रसायन भरलंय ...

Jorge dexler हा उराग्वेयन

Jorge dexler हा उराग्वेयन गायकाचा frontera हा अल्बम एकतोय.या माणसाला मोटरसायकिल डायरीज मधल्या al otro lado del rio या गाण्यासाठी आँस्कर भेटल आहे(मिळालय).

स्पँनिश भाषेचा ओ कि ठो कळत नाही पण गुगल भाषांतरकाराच्या मदतीने अर्थ कळतो. सुरेख चाल ,सुरेख बोल.
आत्मिक समाधान देणारी गाणी आहेत.

बाकि ब्युएना विस्टा सोशल क्लबची गाणी खूपच सुंदर आहेत.

रात्री एखादा carlsberg च्या नवीन फ्रूट फ्लेवरड चा तुम्ब्या(बाटली) लावून समुद्राच्या लाटा पाहत,आडव्या झोपाळ्यावर झोपून ही गाणी एकल्यास गाणी आणि बीअर दोन्ही चढतात.

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

लता सोलो

https://www.youtube.com/watch?v=VSERYQGm6fE (बैय्या ना धरो. याच्या सुरुवातीस असलेला - रोशन आरा बेगम - यांच्या गायकीचा पीस मस्त आहे.)

https://www.youtube.com/watch?v=OwkrFxFNpX8 (आते जाते पहलू मे आया कोई. या गाण्याची ट्रॅजेडी अशी की "ये मेरा दीवानापन है" व "दिल मे प्यार का तूफान" सारख्या तुफान लोकप्रिय गाण्यांच्या समोर हे टिकाव धरू शकलं नाही. got clouded by ...)

https://www.youtube.com/watch?v=sQPif5jnpCA (वो जो मिलते थे कभी.)

https://www.youtube.com/watch?v=3c2pg7lyXSA (असली नकली मधलं "तेरा मेरा प्यार अमर". साधनामामी.)

http://www.youtube.com/watch?v=E0ESddpvBWU (बेकस पे करम कीजीये. सोलेम अपील.)

खास तुमच्यासाठी...

(म्हणजे, सध्या ऐकतबियकत नव्हतो, पण, "सध्या काय ऐकताय" म्हटल्यावर, खास या धाग्यावर डकविता यावे, म्हणून मुद्दाम ऐकू लागलो. एन्जॉय!)

"अपनी कुव्वत, अपनी जान
अपनी कुव्वत, अपनी जान
लाऽ इलाहा इल्लल्ला, मुहम्मदुर्रसूलल्ला
हर पल, हर साथ, हर आन
जाग रहा है पाकिस्तान
जाऽऽऽग रहा है पाकिस्ताऽऽऽन
पाकिस्तान!"

(शब्द: इथे. घ्या, मजा करा.)

====================================================================================================

(आमच्या कॉलेजच्या दिवसांत आमच्या वसतिगृहावरून रेडियो पाकिस्तानची वाट्टेल तेवढी केंद्रे पकडता येत असत. झिया उल-हक यांच्या ऐन उमेदीचे दिवस ते; रेडियो पाकिस्तानवरून असली काही ठराविक 'देशभक्तिपर (सरकारी) गीते' वारंवार लागत. हे त्यातले - नक्की खात्री नाही, पण - बहुधा टॉप हिट असावे. आता खास आमच्याकरिता वाजवताहेत, म्हटल्यावर आम्ही आवडीने ऐकत असू.

त्याच काळात वाजणारे आणखीही एक गाणे होते, काहीतरी "वतन को हम अझीम से - अझीम से अझीमतर - अझीमतर बनाएंगे" म्हणून. भयंकर क्याची ट्यून होती! गाणे यूट्यूबवर सापडत नाहीये; सापडले, की इथे नक्की डकवीन. तूर्तास केवळ शब्द, इथे. दिले नाहीत, म्हणून नंतर तक्रार चालणार नाही. आखिर तुम भी क्या याद रक्खोगे!

आपल्याकडेसुद्धा - बोले तो भारतात - आणीबाणीच्या दिवसांत काही ठराविक गाणी आकाशवाणीवरून वारंवार वाजण्याचा हंगाम होता. त्यातली "ज़िन्न्न्दगी को बन्न्न्दगी समझकर्रर्रर्र... तू काम कर्रर्रर्र... तू काम कर्रर्रर्र!" आणि "मिल के चलो" ही दोन हिंदी, आणि "अनुशासन पर्वच हे आज जाहले, क्रांतीहुन शांतिकडे राष्ट्र चालले!" हे एक मराठी, अशी तीन चांगलीच लक्षात आहेत. उच्छाद नुसता!

असो.)

====================================================================================================

हे आम्ही हमखास "ज़िन्दगी को गन्दगी समझकर" म्हणून ऐकायचो. त्याने व्हेरिसिमिलिट्यूड यायची.

तेच ते, "चलो भाई मिल के चलो" आणि "येऽऽऽएऽऽऽएऽऽऽएऽऽऽ वक़्त की आवाज़ है, मिल के चलो" वाले.

की शांतीहुन क्रांतिकडे? आमचा नेहमी गोंधळ होतो! पण शेवटी तेच ते. कुठूनतरी कुठेतरी चालल्याशी मतलब!

छ्या:! नसती आठवण आली - आता यूट्यूब शोधणे आले!

प्रकाटाआ

प्रकाटाआ

किशोरी अमोणकर

https://www.youtube.com/watch?v=oeU9rCfoAJU

ज्ञानेश्वरांची रचना, किशोरीताईंच्या आवाजात. द्वैत हे फोल आहे असे प्रतिपादन करणारे गीत.

(डिस्क्लेमर - मी फक्त सुश्राव्य आहे म्हणून ऐकतो. द्वैत व अद्वैत हे अयोग्य्/सुयोग्य आहेत की नाही याबद्द्ल मला कोणतेही मत नाही.)

---

https://www.youtube.com/watch?v=EcjGOz75ioA

किशोरी अमोणकर !!!
संत जनाबाईंचं गीत.

(डिस्क्लेमर - मला शात्रोक्त/उपशास्त्रीय मधलं काहीही कळत नाही.)

.

.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दि रोज हे Bette Midler

दि रोज हे Bette Midler चे.
आणि जापनिज Only Yesterday या फिल्ममधले.

..

.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जर काही ऐकले नसले तर किमान

जर काही ऐकले नसले तर किमान घंटेचे चित्र तरी टाकायचेस (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अश्लील अश्लील

अश्लील अश्लील

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सध्या जुनी तमिऴ गाणी

This comment has been moved here.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पर्फोर्मांस पोएट्री ऐकली. अतिशय आवडली.

पर्फोर्मांस पोएट्री ऐकली. अतिशय आवडली.

http://www.ted.com/talks/sarah_kay_if_i_should_have_a_daughter.html

http://www.ted.com/talks/sarah_kay_how_many_lives_can_you_live.html

हमे तो लूट लिया...

हमे तो लूट लिया... हे फेव्ह्रिट गाणं "हम्ये तो लुट्ट लिया मिल्के हुस्नवालोने" अशा उच्चारांसहित ऐकतोय.
http://www.youtube.com/watch?v=hjY2YtcP1L8

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बहोत खूब!!!!!!

बहोत खूब!!!!!!

Alison Krauss – The Lucky One

'ब्लूग्रास' संगीताची ओळख करून घ्यायची म्हणून ग्रंथालयातून आणलेल्या रँडम सीडीत अॅलिसन क्राऊसचं हे, ग्रामी पुरस्कारप्राप्त गाणं सापडलं.

इंग्लिश गाण्याचे शब्द मला समजत नाहीत; तसे इतर कोणी असल्यास हा दुवा उघडावा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेगम अख्तर.

आजचा दिवस बेगम अख्तर यांच्या नावे. सुरूवात त्यांच्या प्रसिद्ध गजलेने : http://www.youtube.com/watch?v=O0Qw5Lfr9n8

राजन खान यांच्या 'अक्षर

राजन खान यांच्या 'अक्षर मानव'नं आयोजित केलेली लेखन कार्यशाळा ऐकतेय. दोन व्याख्यानं ऐकली.
पहिलं रविमुकुल यांचं वाचन या विषयावर होतं. तद्दन भिकार होतं. रविमुकुल यांनी काही निरुपद्रवी आणि निरुपयोगी आत्मचरित्रात्मक पाल्हाळ लावलं आणि जी. ए. कुलकर्णींवर एक कीर्तन केलं. त्यांच्या भाषणाच्या वेळी झोप न लागता ऐकत राहण्यासाठी कॉलेजमधे कमावलेलं सगळं कौशल्य लई दिसांनी पणाला लागलं. नंतर वैतागलेल्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना र.मु. गडबडले. 'वाचकानं वपु आणि तत्सम लोकांचं भक्त असू नये' असं ठासून सांगणार्‍या र.मु.ला एका श्रोत्यानं विचारलं, 'तुम्ही जीएंचे भक्त आहात का?', तेव्हा कहर मजा आली. प्रश्नोत्तरांचं सेशन अजून चाललं असतं, तर र.मु. पार गंडले असते. पण त्यांच्या मदतीला राजन खान आल्यामुळे कार्यक्रम जरा तरी सावरला.
या व्याख्यानाच्या अनुभवानंतर मी जरा जास्तच अगाऊ आविर्भावात (ह्यॅ: माहितीय!) दुसरं व्याख्यान ऐकायला गेले होते, ते समीक्षक महेंद्र कदम यांचं होतं. त्यांनी माझ्यासारख्या उद्धट वाचकांची पार हवा काढली. समीक्षा म्हणजे काय, समीक्षक कसा सर्वश्रुत असायला हवा, त्यानं तटस्थता आणि स्वतःची भूमिका हे दोन्ही तालेवारपणे कसं सांभाळावं, भाषा शास्त्रीय तर हवी - पण बोजड नको हे पथ्य त्यानं पाळणं किती महत्त्वाचं, आपण ज्या समाजात समीक्षा करतो, त्या समाजाशी त्याची सांस्कृतिक नाळ जोडलेली असणं किती नि का महत्त्वाचं.... अशी त्यांची आटोपशीर नि पद्धतशीर मांडणी ऐकताना बेहद्द मजा आली. श्रोत्यांच्या पसरट नि दाखवेगिरी करणार्‍या प्रश्नांवर त्यांनी दिलेली उत्तरं मात्र नेमकी होती. आपल्याच फसलेल्या कादंबरीचं उदाहरण देणारा हा एक दुर्मीळ प्राणी मी पाहिला. या गृहस्थाचं लिखाण वाचावं लागेल.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धुसर

खिडकीतून धुक्यात तरंगलेली नागडी झाडे पाहत असतांना अचानक अनेक वर्षांपुर्वी आवडलेले एक गाणे आठवले. खरेतर या संग्रहातील (हुस्न-ए-जाना) सर्वच गाणी मला आवडतात. पण हे गाणे विशेष आवडते. दुर्मिळ आणि नितळ. गायिकेचे नाव बहुधा रोली सारन असे काहीसे आहे.

अ‍ॅन मुरे चं - "I'm just

अ‍ॅन मुरे चं - "I'm just another woman in love" फार गोड आहे. चाल गोड आहे. पण शब्दही सुंदर.

I'm strong, I'm sure,I'm in control
A lady with a plan
Believing that life
Is a neat little package
I hold in my hand
I've got it together
They call me the girl
Who knows just what to say and do
Still, I fumble and fall
Run into the wall
'Cause when it comes to you

I'm just another woman in love
A kid out of school
A fire out of control
Just another fool
You touch me and I'm weak
I'm a feather in the wind
And I can't wait to feel you touching me again
With you, I'm just another woman
Just another woman in love

आज न्यू एज संगीत शोधताना २

आज न्यू एज संगीत शोधताना २ आल्बम सापडले - अबीदा परवीन चा इश्क़ आणि कहेना (http://www.amazon.com/La-Kahena-DJ-Cheb-Sabbah/dp/B00080Z75K).

यातील गाण्यांची samples ऐकली. आवडली. कोni हे album ऐकले आहेत का?

I bought the same & am waiting now.

मोदींची महारैली

नरेंद्र मोदींचे (घरी बसून टीव्हीवर) भाषण ऐकले. सिद्धूचे भाषण ऐकले. दोन परस्परविरोधी भावना मनात आल्या-
१. राज्यकर्त्यांकडून अपेक्षा करण्याची भारतीय जनतेची सुटलेली सवय पुन्हा जडणार असे वाटले.
२. देशाचा विकास होण्यासाठी, भले होण्यासाठी पंतप्रधान स्वतः** खरोखरीच विद्वान (as demarcated from being a person of distinguished leadership and character) असायला हवा असे असल्यास, मोदींचा अण्णा* होणार यात तिळमात्र शंका उरली नाही.

* अण्णा होणे म्हणजे काय हे कळण्यासाठी ओम् पुरीचे अण्णा हजारेंबद्दलचे उपोषणापूर्वीचे आणि नंतरचे मत वाचावे.
** बहुधा असे नसावे, पण माहित नाही. जगात इतक्या मूर्खांच्या हाती इतकी संपत्ती आणि शक्ती असते तरी सगळे बिनबोभाट चालते म्हणून मला नेहमीच कुठे असण्यासाठी कुठली पात्रता लागते कि नाही असा प्रश्न नेहमी पडतो.

जाता जाता -
आज आपण नवाज शरिफ यांना भेटाल तेव्हा आपण त्यांना पीओके कधी परत मिळेल त्याची तारीख आपण विचाराल का असे मोदी भाषणात मनमोहन सिंगांना म्हणाले.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

चौधरी- कोक स्टुडिओ

सद्ध्या कोक स्टुडिओतली काही गाणी ऐकण्यात आली... खास राजस्थानी हे गाणे त्यातले संगीत मस्त वाटले...गाण्याचे बोलही एकदम गोड आहेत...
http://www.youtube.com/watch?v=1gukvtH_a3I

manaamanasi.wordpress.com

अमर भूपाळी आणि लोकशाहीर

अमर भूपाळी आणि लोकशाहीर रामजोशी या दोन्ही पिच्चरांमधली अजरामर गाणी पुन्हा पुन्हा ऐकतोय. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, तुझीमाझी प्रीत, फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात, सुंदरा मनामधि भरली, छेकापन्हुति, सवालजबाब, इ.इ.इ. असंख्य रत्ने आहेत. कळायचं बंद ऐकून!!!

भरीस भर म्हणून एमेस सुब्बलक्ष्मींच्या आवाजातील भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ऐकतोय. भीमसेन जोशींच्या व्हर्जनपेक्षा ही व्हर्जन जास्त आवडली.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

एल्व्हिस प्रिस्ले ची सर्व

एल्व्हिस प्रिस्ले ची सर्व सर्व गॉस्पेल गाणी अतोनात आवडतात. "हु अ‍ॅम आय" हे तर फारच सुरेख आहे.

http://www.youtube.com/watch?v=geqZTPbL-Lg

पं

पं. व्यंकटेश कुमारांना लाईव्ह ऐकलं !! स्वर्गीय गातात. सगळा कार्यक्रम खास होता, दुर्गा विशेष आवडला. एका फोरमवर रेकॉर्डींग्स आलेत.

काही चिरतरुण पिच्चरचे म्यूझिक

काही चिरतरुण पिच्चरचे म्यूझिक स्कोर्स त्यातही -टायटॅनिक, ब्रेव्हहार्ट, ग्लॅडिएटर हे लै म्हंजे लैच आवडीचे. त्यात ब्रेव्हहार्टचे म्यूझिक ऐकतोय. बॅटल ऑफ बॅनॉकबर्नच्या वेळचे म्यूझिक, छोटा विलियम वॉलेस बाप मेल्यावर अंकल आर्गाइलबरोबर घर सोडून जात असतानाचे म्यूझिक किंवा वेगवेगळ्या प्रसंगी वाजणारे थीम म्यूझिक हे कैतरी वेगळंच प्रकरण आहे.

टायटॅनिकच्या स्कोरबद्दल तर काय बोलावे? कधीकाळी पूर्णवेळ तेच ऐकत असे. राहिल्या त्या आठवणी....

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ब्रेव्हहार्ट का परत?? चालु

ब्रेव्हहार्ट का परत?? चालु द्या (दात काढत)> (दात काढत)>

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

ही ही ही

(डोळा मारत) (दात काढत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

डेव्हिड गॅरटने वाजवलेला

डेव्हिड गॅरटने वाजवलेला विवाल्डीच्या 'फोर सीझन्स' या संगीतिकेतील 'समर' हा तुकडा ऐकला. मूळ फोर सीझन्स आधी ऐकले होते तेव्हा आवडले होतेच, हा तुकडाही आवडला.

हिप्स डोन्ट लाय

सन्जोप रावांच्या इतक्या मनापासून लिहिलेल्या, अभिरुचीसंपन्न प्रतिसादानंतर असला छचोर प्रतिसाद लिहिताना ओशाळल्यासारखं होतंय खरं पण मुलीबरोबर थोडी मस्ती करायचा मूड होता म्हणून शकीराचे 'हिप्स डोन्ट लाय' ऐकतेय...खरंतर पहातेय. ही बया काय अमानवीय पद्धतीने लचकते आणि तिचे अनुकरण करायचा प्रयत्न केलाच तर 'हिप्स खरेच डोन्ट लाय' हे अगदी मनोमन पटते (स्माईल) खाल्लेले लोणी, चीज, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ, तांबडा-पांढरा....काही काही म्हणून लपवता येत नाहे या हिप्सना...शिवाय आपले शरीर नक्की कोणकोणत्या कोनांतून हलत नाहीय याचाही साक्षात्कार होतो.
आता कोणी स्त्रीशरीराचं वस्तूकरण वगैरे स्त्रीवादी झेंडे घेऊन येऊ नका बरं..जरा या बयेच्या कौशल्यांना दाद द्या. (जीभ दाखवत)

फार्फार अवांतर.

फार्फार अवांतर आहे पण ल्युसील क्लिफ्टनने लिहिलेली माझी आवडती कविता इथे लिहिल्यावाचून रहावत नाहीय.

Homage to My Hips

These hips are big hips
they need space to
move around in.
They don't fit into little
petty places.
These hips are free hips.
They don't like to be held back.
These hips have never been enslaved,
they go where they want to go
they do what they want to do.
These hips are mighty hips.
These hips are magic hips.
I have known them
to put a spell on a man and
spin him like a top!

ब्लाय मी!

हिला पाहून अनेक थरांचं इन्सुलेशन असणार्‍या आमच्या बुडाला हिप्स म्हणणंही जीवावर आलंय. हिचा डॅन्स पाहून देशी, किजवानींची शीला आठवली. ती थोडी अधिक चावट आहे असंही वाटलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जादूची पेटी

नास्तिकाला तात्पुरते का होईना, आस्तिक बनवण्याचे सामर्थ्य फक्त कलेत आहे. पंचवीसेक वर्षांपूर्वी भर दुपारी कोसळत्या पावसात उभे राहून आम्ही काही मित्रांनी रवीशंकर-झाकिर हुसेन या जोडीचे वादन ऐकले होते. त्या वेळीही काही क्षण असे आले की जिथे वाटले की नाही बाबा, हे काही मानवी शक्तीचे काम नाही. इथे वाजवणारे हात काही माणसाचे असणे शक्य नाही. 'हँन्ड ऑफ गॉड' म्हणतात तो हाच असावा. बर्‍याच वर्षांनंतर 'जादूची पेटी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा अनुभव आला. आदित्य जोग आणि सत्यजीत प्रभू या दोघांनी काल रात्री पेटी आणि की बोर्डवर जे काही केले त्याला तोड नाही. चंद्रकंस रागामधल्या बंदिशीपासून ते अभंग, लावणी, मुजरे, कव्वाल्या, भक्तीगीते - अगदी 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत - असले सगळे या दोघांच्या पेट्यांतून ऐकले आणि कान तृप्त झाले. अपुरे वाद्य, मींडकाम करता न येणारे वाद्य म्हणून हिणवली जाणारी पेटी किती संपूर्ण संगीतानुभव देते हे काल पहायला-ऐकायला मिळाले. 'जादूची पेटी' हे नाव जरा दिशाभूल करणारे आहे. पण ज्याला संगीताचा थोडासाही कान आहे अशा कुणीही हा कार्यक्रम चुकवू नये. या दोघांचा हा चौथाच कार्यक्रम आणि पुण्यातला पहिलाच. या कार्यक्रमाला समर्पक निवेदन आणि सुरेल साथसंगत यांनी 'चार चांद' लावले. कार्यक्रम संपवून घरी येताना मन समाधानाने काठोकाठ भरुन गेले होते. 'हा कार्यक्रम बघाच..' असे आग्रहाने सांगणारे मित्र सर्वसाक्षी यांना उदंड आयुष्य लाभो असे म्हणत मी गाडी सुरु केली.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आदित्य जोग आणि सत्यजीत प्रभू *

दुरुस्ती: आदित्य ओक

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आभार...

सन्जोप राव , आभारी आहे.

https://www.youtube.com/watch?v=nDbBItsqGvk
https://www.youtube.com/watch?v=aks4Q_jdkCk
https://www.youtube.com/watch?v=rvQGDWAnNxo
https://www.youtube.com/watch?v=Q2R26K0IhtU

खल्लास...
आभार, आभार. (आदित्य ओक /सत्यजीत प्रभू यांचेही आभार -
आदित्य ओक आनंद उपभोगतायत - एंजॉय करतायत वाजवताना. फारच क्वचित दिसणारा गुण.)

आणि, हे तर त्याही पुढचे - http://www.22shruti.com/about_dr_oke.asp

मानवी शक्तीचे काम नाही

नास्तिकाला तात्पुरते का होईना, आस्तिक बनवण्याचे सामर्थ्य फक्त कलेत आहे. ......काही क्षण असे आले की जिथे वाटले की नाही बाबा, हे काही मानवी शक्तीचे काम नाही.
.............मागे एकदा मी चिं. त्र्यं. खानोकलरांवरच्या 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमातील एका भागाचा दुवा दिला होता. त्यात श्रीराम लागूंचे खानोलकरांविषयीचे बोलणे (९:५८ पासून ते १३:१५ पर्यंत) या संदर्भात आवर्जून अनुभवण्यासारखे आहे.

बाकी 'जादूची पेटी' कार्यक्रमाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

आयकॉना पॉप - आय लव्ह इट

http://www.youtube.com/watch?v=UxxajLWwzqY - बरेचदा हे गाणं रीपीट मोडवर ऐकते. अशी फोर्स-फुल गाणी आवडतात. त्यात अगदी वाईट शब्दांनी जोर दिलेला असतो तरीही. (डोळा मारत)

http://www.youtube.com/watch?v=DGIgXP9SvB8 - जस्टीन बिबर चं पॉवर मस्त!!!

काल म्हणजे रविवारी साम मराठी

काल म्हणजे रविवारी साम मराठी वाहिनीवर 'जिवनरंग' नावाचा गाण्याचा कार्यक्रम चालू होता. संजीव अभ्यंकर गात होते. खूप सुंदर गाणी होती आणि शब्द देखील. जालावार शोधल्यावर समजले 'जीवनरंग' नावानेच हा 'अल्बम' आहे. प्रविण दवणेंनी लिहीलेली गाणी/काव्य आहेत आणि केदार पंडितांचे संगीत आहे. विशेषतः "त्याला म्हणावे जीवन " आणि "या अथांग अवकाशाला" ह्या दोन गाण्यांचे शब्द आणि चाल आणि अर्थात संजीव अभ्यंकरांचा आवाज खूपच छान. संधी किंवा हा अल्बम उपलब्ध झाल्यास जरुर ऐका...

The Corrs

The Corrs या बँडचे वादन मी बर्‍याचदा ऐकतो. ऐकायला छान वाटते. बँडचा भाग असणारे चौघेही सख्खी भावंडे आहेत. त्यांची बरीच सादरीकरणे युट्युबवर उपलब्ध आहेत.

haste to the wedding

toss the feathers सोबतच त्यांचे haste to the wedding हे ही खुप प्रसिध्द आहे...
मला कायम वाटते, toss the feather हे युद्ध जिंकल्यानंतरच्या विजयी आनंदाप्रमाणे आहे तर haste to the wedding हे एखाद्या बाळाच्या निरागस हास्याइतके प्रसन्न... (स्माईल)

manaamanasi.wordpress.com

कव्वाली

काही सदाबहार कव्वाली ऐकते आहे -

देख तमाशा लकडी का - http://www.youtube.com/watch?v=VxdoL5d-54c

माटी के पुतले तुझे कितना गुमान है - http://www.youtube.com/watch?v=PuVNX6PQRjM

चढता सूरज धीरे धीरे - http://www.youtube.com/watch?v=duFDy6Rwq9Q ............ फार सुरेख कव्वाली आहे

कैसे बेशर्म आशीक है ये आजके -http://www.youtube.com/watch?v=B7ZmCJigATU ....... उपमांची रंगपंचमी आहे या गाण्यात

चढता सूरज धीरे धीरे

हे गाणे चुकूनच ऐकण्यात आले होते पण खुपच आवडले...

manaamanasi.wordpress.com

श्री. आनंद भाटे यांचा

श्री. आनंद भाटे यांचा वर्षभरापूर्वी गिरगावात एक कार्यक्रम झाला होता. त्याची mp3 हाती लागली आहे. तो कार्यक्रम गेल्या तीन दिवसांत तीनदा तरी ऐकला असेल. नाट्यसंगीत आणि भजने यांचा अजोड मिलाफ आहे. सोबत साजेसे व नेमके निवेदनही आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शोर इन द सिटी

'शोर इन द सिटी' या सिनेमाची गाणी ऐकली. बराच जुना (१ वर्षापूर्वीचा) चित्रपट असल्याचे दिसते. मात्र धिंगाणा.कॉमवर अलीकडेच ऐकता आली.
यापैकी आवडलेली गाणी
१. सायबोः श्रेया घोसाल आणि तोची रैना यांनी गायलेले हे गाणे अतिशय सुंदर वाटले. पियानो, व्हायोलिन आणि गिटारच्या तुकड्यांचा वापर सुरेख वाटला. अनेकदा ऐकण्यासारखे आहे.
http://www.youtube.com/watch?v=yZ2pzeQpdMg

२. सावरेः थोडीशी शास्त्रीय संगीताची डूब असलेले रुपकुमार राठोडच्या आवाजातील हे गाणेही सुंदर आहे. राठोडचा मोकळा आवाज आणि छान संगीत यामुळे रिफ्रेशिंग वाटते
http://www.youtube.com/watch?v=PY0R98OiT4w

३. बम लहिरीः हे गाणे पूर्ण कळलेले नाही. बहुदा कैलाश खेरच्या आवाजातील शंकराची प्रार्थना टाईप काहीतरी आहे. लोकसंगीतासारखे वाटले पण ठेका छान आहे.
http://www.youtube.com/watch?v=aVN-kZjlQ6s

४. कर्मा इज अ बिचः हिंदी रॉक गाण्यांचा मी अजिबात फ्यॅन नाही. पण या गाण्याचे शब्द आवडले.
http://www.youtube.com/watch?v=3uVgJNlCNWU

'शोर इन द सिटी' बराय चित्रपट

'शोर इन द सिटी' बराय चित्रपट आणि 'संकट सिटी', 'इमोशनल अत्याचार' नावाचे चित्रपट पण बरे आहेत.

Amazing Amy

धन्यवाद

कुठे ऑनलाईन मिळाला तर हा चित्रपट पाहतो.

चित्रपट छान आहे

चित्रपट पाहिला. नेहमीच्या बॉलीवूडी कचऱ्यापेक्षा बराच चांगला वाटला. क्रिकेटरची स्टोरी सो-सो. पण इतर दोन स्टोऱ्या मस्त. मंदूकचे काम करणारा अभिनेता भन्नाट. आणि गिरीजा ओक खल्लास दिसते राव...

नेहमीच्या बॉलीवूडी

नेहमीच्या बॉलीवूडी कचऱ्यापेक्षा बराच चांगला वाटला.
क्रिकेटरची स्टोरी सो-सो. पण इतर दोन स्टोऱ्या मस्त. मंदूकचे काम करणारा अभिनेता भन्नाट. >> +१
तो मंदूक भारीय (दात काढत) नंतर शांघाय मधे पण पाहीला त्याला.
मी सांगितलेले तिन्ही चित्रपट युट्युबवर आहेत.

Amazing Amy

भीमण्णांचे अतिफेमस इंद्रायणी

भीमण्णांचे अतिफेमस इंद्रायणी काठी ऐकले. किती खूप आवडले ते सांगणे अवघड. पण त्यातही "नाचती वैष्णव" गातानाची चाल विशेष आवडली. त्याला जागा/हरकत/तान/कानामात्रा काय म्हणतात ते माहिती नाही.

कालपासून कैकदा तेच ऐकतो आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हो, फार सुरेल आहे. मला

हो, फार सुरेल आहे. मला त्यांचे "रम्य ही स्वर्गाहूनी लंका" गाणे खूप आवडते. "या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का" ही तान तर अप्रतिमच.

हेही ऐकतो, माहितीकरिता

हेही ऐकतो, माहितीकरिता धन्यवाद (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पुढील ३ गाणी सांगायची

पुढील ३ गाणी सांगायची राहीली-
ल्युसील - http://www.youtube.com/watch?v=4SDVkdcO8ts
डेव्हील वेन्ट टू जॉर्जिआ - http://www.youtube.com/watch?v=K6RUg-NkjY4
एडलव्हाइस- http://www.youtube.com/watch?v=zuQkZD3F2EQ ..................... अतिशय मेलो संगीत असलेले हे गाणे तासन तास ऐकता येते.

आमेली - यान् तिएरसेन्

'आमेली' चे पार्श्वसंगीत ऐकतो आहे. तासाभराचे हे संगीत काय ताकदीचे आहे. आमेलीचा एक एक प्रसंग आणि त्याचे संगीत विभक्त करताच येत नाही. किती तर्‍हतर्‍हेच्या भावछटा उचंबळून आणणारे संगीत.. 'यान तिएरसेन्' ला सलाम !
(घरात केरवारे, आवराआवर, जेवण तयार करणे, इ. गोष्टी हे ऐकत केले की गोष्टी आपसुख हातावेगळ्या होत जातात (स्माईल) .)

बर्‍याच वेळा हे ऐकलं. पुन्हा

बर्‍याच वेळा हे ऐकलं. पुन्हा एकदा अमेली बघावा लागणार.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१००

फार म्हणजे फार सुंदर संगीत आहे. गेले कित्येक दिवस सतत ऐकतोय. माझ्याकडे याच्या तुकड्यातुकड्यातील फाईल्स आहेत, त्यातील Comtine D'un Autre Ete L'apres Midi, J'y Suis Jamais Alle, Les Jours Tristes (instrumental), La Valse D'Amelie (orchestra version) नावाचे तुकडे विशेष आवडले. (सध्या इथून यूट्युब उघडू शकत नसल्याने दुवे देऊ शकत नाही.)

फिर मुझे दीद-ए-तर याद आया

तलत महमूद या गुणी गायकाची आज पुण्यतिथी. विविध भारतीवर तलतची एकाहून एक सुरेख गाणी ऐकतो आहे. त्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी मी लिहिलेला हा लेख आणि त्या लेखावरील प्रतिसादांत जाणकारांनी दिलेली अनेक मधुर गाणीही आठवली.
http://www.manogat.com/node/5834

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आवडीच्या गाण्यांची यादी

This girl is on fire - Alicia Keys - http://www.youtube.com/watch?v=J91ti_MpdHA

Too close to loving you - Alex Clara - http://www.youtube.com/watch?v=zYXjLbMZFmo

I beg your pardon - http://www.youtube.com/watch?v=2-eclUz-RYI

Jolene - Dolly Patron - http://www.youtube.com/watch?v=qGEubdH8m0s

The Mother= A Homage - http://www.youtube.com/watch?v=72XLWDp4xBU

The way you look tonight - Michael Buble - http://www.youtube.com/watch?v=h2yqxy7DS-s

The first time I ever saw your face - Johny Cash - http://www.youtube.com/watch?v=EdSIlVZhsDw

Cry me a river - Michael Buble - http://www.youtube.com/watch?v=yopNkcDzQQw

Save the last dance for me - Michael Buble - Save the last dance for me - Michael Buble

If you don't know me - Simply Red - http://www.youtube.com/watch?v=zTcu7MCtuTs

Put a little love in your heart - http://www.youtube.com/watch?v=44a8FUjwTH8

i'd really like to see you tonight - Edmun Dan & Celey - http://www.youtube.com/watch?v=BNYUyzclOlw

Somebody done somebody wrong - http://www.youtube.com/watch?v=ym_mJokfTQg

How deep is your love - Bee Gees - http://www.youtube.com/watch?v=BBMriOspUvA

The most beautiful girl in the world - Charlie Rich - http://www.youtube.com/watch?v=ew9f-Pq3Wsk

Can't take my eyes off you - Vikki Carr - http://www.youtube.com/watch?v=pVgJGK2iNok

Sometimes when we touch - Olivia Ong - http://www.youtube.com/watch?v=yMMQxz9TlTE

Look it up - Ashton Shepherd - Look it up - Ashton Shepherd

Fly me to the moon - Tony bennet - http://www.youtube.com/watch?v=kIrcxGdyUdk

de mala ge chandrike - http://www.youtube.com/watch?v=Na0zHr6fdPU

Bruno Mars - Just the way you are - http://www.youtube.com/watch?v=LjhCEhWiKXk

Jani jaay paniyasi, mage dhave Hrishikeshi - http://www.youtube.com/watch?v=EcjGOz75ioA

Gard sabhoti raan sajani - http://www.youtube.com/watch?v=OQ45I_85t-I

barase bundiya sawan ki - http://www.youtube.com/watch?v=q8Sb7eRG4bw

You go to my head - July London - http://www.youtube.com/watch?v=YmV5oThSwK4

Ring of fire - http://www.youtube.com/watch?v=mIBTg7q9oNc

Promiscuous girl - http://www.youtube.com/watch?v=0J3vgcE5i2o

Nights in white satin - Moody Blues - http://www.youtube.com/watch?v=4lazdg-eqmQ

बॅटमॅन आणि अमुक यांना धन्यवाद

सुरेख लिंका दिल्या आहेत

ट्राउट् क्विण्टेट् आणि इतर

(हा प्रतिसाद बॅटमॅन याञ्च्या या प्रतिसादास उद्देशून आहे.)

सम्पूर्ण क्विण्टेट् सलग (३९ मिनिटे) आणि अधिक चाङ्गले वादन इथे ऐकायला मिळेल. इझ्झाक् पेरलमान् (वायलिन्) आणि पिञ्चास् झुकरमान् (वायोला) ही प्रसिद्ध जोडगोळी यात आहे. तुम्ही ऐकलात तो फक्त पहिला तुकडा होता. पाचही तुकडे - आलेग्रो विवाचे, अन्दान्ते, स्केर्त्सो, अन्दान्तिनो आणि आलेग्रो ज्यूस्तो हे एका पाठोपाठ एक सलग ऐकायला मजा येते. (श्यूबर्टने केवळ वयाच्या २२व्या वर्षी केलेले हे सङ्गीत आहे.)

तुम्हांला या प्रकारचे ऐकायला आवडत असेल तर काही माझ्या अतीव आवडीचे तुकडे जमेल तसे, आठवेल तसे सुचवित जाईन.
१. बीथोवेन - वायलिन् कॉञ्चेर्तो मूव्हमेण्ट ३ - या १० मिनिटाञ्च्या तुकड्यामुळे खरे तर मी पाश्च्यात्य अभिजात आणि रोमॅण्टिक् साङ्गितिक कालाकडे आकर्षित झालो. विशेषतः ६:४३ ते ८:४१ पर्यन्त पेरलमान एकटाच वायलिन् वाजवितो (शेवटी शेवटी इतर वाद्ये तोण्डी लावायला मिसळतात) ते फारच खिळवून ठेवणारे आहे. भारतीय शास्त्रीय सङ्गितात ज्याप्रमाणे गायक मूळ रागाची बैठक प्रथम जमवून मग अनेक आलाप, ताना घेत मुळापासून दूरच्या प्रदेशातून श्रोत्यान्ना फिरवून आणून अलगद पुन्हा बैठकीवर येऊन स्थिरावतो तसे या सोलो वादनाचे स्थान आहे. सम्पूर्ण ४८ मि. चा कॉन्चेर्तो इथे ऐकायला मिळेल.
२. 'बाख़'चे ब्रान्देनबुर्ग् कॉञ्चेर्तो प्रसिद्ध आहेत. त्यातला कॉञ्चेर्तो २, मूव्हमेण्ट-३ हा अवघ्या ३ मि.चा तुकडा नेहमीच भान हरपायला लावतो. किती वेळा ऐकला तरी प्रत्येक वेळी ऐकताना नवीन काहीतरी गवसते.
३. 'रावेल'चे बोलेरो : १९ मि. : हा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा प्रयोग. एकसुरी वाटणार्‍या आणि पुनरावृत्त होणार्‍या धुनेतून एक प्रकारची नशा चढत जाते. उत्तरोत्तर अधिक जोरकस होत जाणारे हे एक काम.
३. 'माह्लर'ची 'टायटन् सिम्फनी' - अतिशय तरल स्वरमेळातून सुरु होऊन शेवटी गाठलेला कळस केवळ दृष्ट लागण्याजोगा. एका जागी बसून ऐकायचे काम.
४. 'पाकेल्बेल'चे 'कॅनन् इन् डी मेजर्' हे नितान्तसुन्दर काम. मला नेहमीच पूर्ण नि:शब्द करून टाकते. हा 'बारोक्'(Baroque)कालीन सङ्गिताचा तुकडा. त्यावेळी पियानो नव्हता. ऑर्गन आणि हार्प्शिकॉर्ड ही वाद्ये रुळलेली होती. ह्या तुकड्याच्या सुरुवातीस हार्प्शिकॉर्ड ऐकू येईल. पियानो आल्यावर हार्प्शिकॉर्ड वापरणे मागे पडले आणि ऑर्गन चर्चपुरता मर्यादित राहिला.

इतर तुकडे नन्तर..

इतर तुकडे नन्तर..

>>> इतर तुकडे नन्तर..
--- प्रतीक्षेत... (स्माईल)

आणखी काही पाश्चात्य संगीताचे तुकडे

१.
बीथोवन् ची ९वी सिंफनी (१ ता. ५ मि.) ही अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्या मृत्यूच्या ३ वर्षे आधी (१८२३) हे काम त्याने पूर्ण केले. त्यावेळी तो पूर्ण बहिरा झालेला होता. ही पाश्चात्य संगितातील बहुधा सर्वांत गाजलेली सिंफनी. त्यातली शेवटची सुरावट (last movement) 'ओड् टू जॉय' ही 'युरोपीअन् युनिअन्' आणि 'कौन्सिल् ऑफ् यूरोप' यांचे मानवंदना गीत (anthem) म्हणून वाजवली जाते. अतिशय प्रेरणादायी, स्फुरण चढविणारी अशी ही सुरावट.
मात्र मला अधिक प्रिय आहे ती 'स्केर्त्सो : मोल्तो विवाचे' लयीत असलेली दुसरी सुरावट (Second movement, Scertso : molto vivace) (१३:३० मि.). थोड्याश्या वाद्यांनी सुरुवात करून एका मागोमाग एक अधिकाधिक वाद्ये येऊन मिसळतात. अनेक लहान लहान झरे एकत्र येत एक प्रपात तयार व्हावा तसे ही अनेक वाद्ये एकत्र येत येत एका क्षणानंतर धबधबाच कोसळत राहतो.. मग काही काळ शांत होत जाते मग पुन्हा सुरावटी वेग पकडून कोसळत राहतात. बीथोवनच्या सांगितिक आक्रमकतेला या तुकड्यातून एक वाट मिळून गेली आहे.
इथे आणखी एक वादन ऐकायला मिळेल. (दोन वेगवेगळे वाद्यवृंद आणि संचालक असले की त्याच सुरावटींच्या भावभावनेत कसा फरक पडतो हेही समजते.)
--------
२.
'सिबेलिअस्'(Sibelius)चा वायलीन् कोंचेर्तो (१९०४) - Violin concerto in D minor (३० मि.)
सुरुवातीस करूण, आर्त, पिळवटून टाकणारी धून. मग जलदगतीने एका वेगळ्याच प्रदेशात. मग काही काळ काय चालले आहे ते कळत नाही. मग एक अतिशय आकर्षक धून, मग त्याच्याशी फारकत, मग जिथून सुरुवात झाली त्या धुनेची पुन्हा आठवण,... अश्या अनेक उतार चढावांतून, आडव्या-तिडव्या वाटा तुडवत जाणारे हे काम. ३ सुरावटींचे बनलेले हे काम सलग वाजविले जाते. तिसरी / शेवटची सुरावट (third movement)(२२:०३ मि. पासून) ही भल्या भल्या वायलीन् वादकांचा अंत पाहणारी आहे. तांत्रिक दृष्ट्या अतिशय क्लिष्ट पण थक्क करून टाकणारी. हे काम आवाक्यात यायला बर्‍याच वेळा ऐकावे लागते. मात्र आवाका समजला, की गोडी लागते.
--------
३.
'एरिक् साती' (Eric Satie) हा पाश्च्यात्य संगिताच्या आधुनिक काळातला फ्रेंच संगीतकार आणि पियानोवादक. त्याने न्नॉस्सिएन् (Gnossiennes) आणि जीम्नोपेदी (Gymnopédies) हे दोन प्रकार निर्माण करून लोकप्रिय केले. तांत्रिक बाबतींत या नव्या (१८८७) प्रकाराने अभिजात शैलीपासून फारकत घेतली.
न्नॉस्सिएन् १ (३:३०मि. ) हा माझ्या विशेष आवडीचा.
काहीतरी गूढ, स्मरणकळांची डूब असलेला हा तुकडा. मूळ संगीत पियानोकरिता असले तरी अकोस्टिक् गिटारवर वाजविलेले (, , ) अधिक परिणामकारक आहे असे वाटते. दोन दोन स्वरांच्या दुडक्या चालीने चालणार्‍या या तुकड्याचा कॅनव्हास् छोटाच; पण जे चित्र उमटवून जातो, ते खिळवून ठेवणारे आहे.
--------
४.
Igor Stravinsky - The rite of Spring (५४ मि.)
इगोर स्त्राविन्स्की हा २० व्या शतकातला महत्त्वाचा मानला गेलेला संगीतकार. पाश्चात्य आधुनिक संगीतात त्याचे आवां-गार्द प्रयोग प्रसिद्धीस आले. १९१३ साली रचलेला 'राईट ऑफ स्प्रिंग' हा बॅले जेंव्हा मंचावर प्रथम सादर झाला, त्यावेळी त्या तिरपागड्या वाटणार्‍या संगीत आणि नृत्याने प्रेक्षकांत जवळपास दंगल झाली. यातल्या अनेक सुरावटी एखाद्या भयपटात धडकी भरविणार्‍या प्रसंगांना पार्श्वसंगीत म्हणून वापरता येण्याजोग्या आहेत. या कामाचे वाद्यवृंद संचालन करणे, हे एक तणावपूर्ण काम आहे. नेहमीचे आवडीचे तुकडे ऐकून कंटाळा आला की थोडा चवीत बदल म्हणून हे काम ऐकावे. मजा येते.
--------
५.
बीज़्ज़े (Bizet) या फ्रेंच संगीतकाराने 'कार्मेन' (Carmen) या ऑपराला (१८७५ साली) दिलेल्या संगीतात suite no 1 (१३ मि.) प्रसिद्ध आहे . त्यातले Aragonaise (01:16 मि.), Seguidille (06:24 मि.) व Les Toréadors (09:50 मि.) हे माझ्या विशेष आवडीचे.

हे सर्व सुचविल्याबद्दल अतिशय

हे सर्व सुचविल्याबद्दल अतिशय धन्यवाद!!!! हे जमेल तितके नीट ऐकतो आणि मग प्रतिक्रिया देतो. (स्माईल)

अवांतर: बाखचा ३ मिनिटांचा कॉन्सर्टो अंमळ हँडेलच्या क्वीन ऑफ शेबा या पीसची आठवण करून देणारा आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

रेमंड-द कंप्लीट मॅन च्या

रेमंड-द कंप्लीट मॅन च्या जाहिरातीत वाजणारे म्युझिक खूप आवडते. ते ऐकत असताना यूट्यूबवर एकाने त्या ट्यूनचे मूळ नाव सांगितले- ट्रॉमेरेइ/ट्रॉमेरि. ते ऐकतोय.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

'रेमण्ड' आणि 'जॉन्सन् अ‍ॅण्ड जॉन्सन्'

शोधल्याबद्दल अतिशय धन्यवाद वाल्गुदमानवा ! माझेही ते आवडते सङ्गीत होते / आहे.
यावरून आठवले - 'जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन'च्या 'बेबी ऑईल'ची एक जाहिरात २०-२२ वर्षाम्पूर्वी येत असे. नेहमीप्रमाणे गोण्डस बाळाञ्चे सौम्य पाण्ढर्‍या प्रकाशातले चित्रण होते. त्या जाहिरातीला जे पार्श्वसङ्गीत होते ते इतके अप्रतिम होते की बस्स.. त्यानन्तर अनेक वर्षान्नी पाश्चात्य अभिजात सङ्गीतात रुची निर्माण झाल्यावर अनेकविध तुकडे ऐकताना एके दिवशी 'फ्राञ्झ् श्युबर्ट्' या सङ्गीतकाराचा 'ट्राऊट् क्विण्टेट्' हा अप्रतिम तुकडा ऐकत होतो आणि एका क्षणी तीच दिव्य धून अचानक सामोरी आली (ऐका 2:54 ते 3:20) ! त्यावेळी ती धून सापडल्याचा काय आनन्द झाला होता म्हणून साङ्गू महाराजा... !! आणि त्याचवेळी ती जाहिरात तयार करणार्‍या मण्डळीञ्चे, त्या सङ्गीतातला तेवढाच तुकडा काढून साजेसे चिकटविण्याचे कौतुकही वाटले.

अमुकराव, ट्राऊट-पंचक अप्रतिम

अमुकराव, ट्राऊट-पंचक अप्रतिम आहे!!!! बहुत धन्यवाद (स्माईल) ऐकताना अंमळ मोझार्टच्या स्ट्रिंग क्वार्टेटचा भास होत होता मध्ये मध्ये. शूबर्ट, बाख, ब्रॅम्स, इ. आता ऐकणे सुरू केले पाहिजे. मोझार्ट-चायकोव्हस्की-रोसिनी या त्रिकूटातच अजूनवर अडकून बसलोय. बीथोवनसुद्धा धडपणी ऐकला नाही. माझी यासंदर्भातली सर्वात आवडती जाहिरात म्हंजे टायटन वाली होय. ते म्यूझिक ऐकून लै भारी वाटलं होतं एकदम (स्माईल)

आणि त्याचवेळी ती जाहिरात तयार करणार्‍या मण्डळीञ्चे, त्या सङ्गीतातला तेवढाच तुकडा काढून साजेसे चिकटविण्याचे कौतुकही वाटले.

प्रचंड सहमत!!!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

चित्रगुप्त

चित्रगुप्त या संगीतकाराची गाणी लागोपाठ ऐकतो आहे.जाग दिल-ए-दीवाना, दिल का दिया, अगर सुन ले...
http://www.manogat.com/node/7840

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

शमशाद बेगम

शमशाद बेगम काल गेल्या. ही एक श्रद्धांजली. त्यांची गाणी यूट्यूबवर ऐकली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम ही हो हे एकच गाणे सध्या

तुम ही हो हे एकच गाणे सध्या लागोपाठ ऐकतोय. मस्त आहे.

https://www.youtube.com/watch?v=Umqb9KENgmk

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

जयतीर्थ मेवुंदी

जयतीर्थ मेवुंदी यांनी गायलेले 'तुझा गंध येता'. संगीत -अशोक पत्की , चित्रपट - आजचा दिवस माझा.
यांचा आवाज प्रथमच ऐकला. गाण्यातले काही कळत नसले तरी आवाज आणि गाणे आवडले. (शब्द - बहुतेक दासू वैद्य)

लिन्क देता द्येवा?

लिन्क देता द्येवा???
जयतीर्थ मेवुंडी तगडा आवाज आहे.किराणा घराणे, उत्तर कर्नाटकातल्या या गायकाने भरपूर ठिकाणी कला दाखवली आहे. खर्जातल्या षड्जापर्यन्त अशक्य सहज विस्तार करतात...

लिन्क माहीत नाही मित्रा.

घरी नेट नाही आहे. मी नोकिया म्युझिक वरुन डाऊनलोड केलं गाणं.
खर्जातल्या षड्जापर्यन्त अशक्य सहज विस्तार करतात >>दुर्दैवानं तंत्र कळत नाही, पण गाणं ऐकायला थोर आहे.

गाण्यांचा विचित्र क्रम

नुकताच एका अल्प-परिचीत कुटुंबाबरोबर प्रवास करण्याचा योग आला. प्रवास सुरु होताच कुटूंबप्रमुखाने स्वतः काळजीपूर्वक निवडलेल्या गाण्यांची सीडी लावली. आतापर्यंत ऐकलेल्या गाण्यांच्या क्रमामधे इतका विचित्र क्रम कधी ऐकला नव्हता. लागोपाठच्या दोन गाण्यांमधे काहिही समान धागा नव्हता. उदाहरणच द्यायचे झाल्यास, 'चिकनी चमेली' च्या पाठोपाठ 'आपकी नजरोंने समझा' च्या पाठोपाठ 'ढिंकचीका ढिंकचीका' च्या पाठोपाठ 'हमे तुम मिल गये हमदम' वगैरे. काहीवेळाने लक्षात आले, की 'राफी' हा कुटूंबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण कन्यकेला गाणी ऐकत झोपायचे होते, तेव्हा तिची झोप आणि आपले मनोरंजन होईल या हेतूने रफीची गाणी लावण्यात आली. त्यातही सर्व गाणी 'बार बार दिन ये आये' व 'अप्पूखुदाs' याच धर्तीची होती.
अजूनही असा विचीत्र क्रम लावण्यामागे कुटूंबप्रमुखाच्या नक्की कुठल्या संवेदनांची पूर्ती होत असेल हा विचार पाठ सोडत नाहीये.
असो. आता पुढचे गाणे कुठले असेल, या उत्कंठेत माझा प्रवासातला वेळ बरा गेला. स्टीअरींग व्हीलवर ठेका मात्र ठीक धरण्यात आला होता. तो ऑफबीट असता, तर मात्र मनोरंजनात बाधा आली असती.

भारी

आपकी नजरोंने समझा' च्या पाठोपाठ 'ढिंकचीका ढिंकचीका'

हे निव्वळ गाडी चालवताना झोप येऊ नये म्हणून केले असेल तर ठीक आहे.
मला वाटतं, त्यांच्या किशोर च्या सीडीमधे 'कोई हमदम न रहा' नंतर नक्की 'अरे रफ्ता रफ्ता' हे गाणे असेल.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

गाण्यांचा विचित्र क्रम

गाणी अशी चमत्कारिक क्रमाने ऐकण्यात मजा असते. याने लांब कंटाळवाण्या प्रवासात ड्रायव्हिंग सुसह्य होते. सकाळी चालायला जातानाही अशी गाणी ऐकत जाण्यात मजा असते.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

रोचक.

मला स्वतःला अशा विचित्र क्रमात गाणी ऐकायला आवडत नाही. एखादे आवडते वा भावलेले गाणे असेल, तर ते ऐकल्यावर बराचसा वेळ त्या गाण्यात रेंगाळण्यात जातो. सहसा माझी पुढची निवड ही त्या रागातले(आहे असे वाटणारे, रागदारीतले फारसे मला कळत नाही) गाणे किंवा त्या मूडचे दुसरे गाणे ही असते. त्या गृहस्थाप्रमाणे, डोक्यावर एक थंड आणि पाठोपाठ एक गरम पाण्याचा घडा ओतणे मला कठीण वाटते. म्हणूनच मला त्या क्रमाचे वैचित्र्य अधिक जाणवले.
पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, कंटाळवाणा प्रवास मनोरंजक करणे हा मुख्य हेतू असावा. कारण वाहने अत्यंत घीम्या गतीने चालत होती आणि ती वेळ त्या गृहस्थांच्या दुपारच्या झोपेची होती (स्माईल).
माझ्या एका मैत्रिणीने विचारले, "गाणी रँडम मोडवर लावली होती क?" तर तसे नव्हते याची मी खात्री करून घेतली होती.

कौवाली

नुसरत फतेह अली खान कौवाली पार्टीच्या युट्युबवर उपल्ब्ध असणार्या कौवाल्या ऐकल्या. परत परत ऐकाव्या वाटत आहेत.
'ये जो हल्का हल्का सुरूर है', 'उन के दर पे' आणि 'वो हटा रहे है पर्दा' या विशेष आवडल्या.

'पेलिस्की'तील 'चेरेश्ने'

'पेलिस्की' या अतिशय सुन्दर स्लोवाक् चित्रपटात 'हाना हेगेरोवा' या गायिकेने गायलेले 'चेरेश्ने' (चेरीची फळे) हे गाणे ऐकतो आहे. मुलीचे वयात येणे आणि त्यासोबत मुलाम्बरोबरची तिची बदलती नाती असे वर्णन करणारे हे मूळ गाणे आहे. चित्रपटात हे गाणे अतिशय सूचकतेने वापरले आहे. मुलीची प्रेमळ आई अकाली गेल्याने अतिशय कठोर स्वभावाचे वडील एकाकी होतात. त्यान्ना भासणारी तिची उणीव मुलीला जाणवते आणि ती एकदम 'मोठी' होते आणि कठोर वडीलाञ्ची काळजी घेऊ लागते असा तो सुन्दर प्रसङ्ग (८:२५ मि. पासून) .

हा चित्रपट कसा मिळवला?

हा चित्रपट कसा मिळवला?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आन्तरजाल

एका स्लोवाक् मैत्रिणीला 'चाङ्गले स्लोवाक्/चेक् चित्रपट सुचव' अशी विचारणा केल्यावर तिने 'पेलिस्की' आणि 'कोल्या', 'वेस्निको मा स्त्रेदिस्कावा' असे काही चित्रपट सुचविले. मग आञ्जावरून मिळविले. 'पेलिस्की' हा यू-ट्युबवर अनेक भागान्त आहे पण त्यात संवादानुवाद नाहीत. (कृपया व्य.नि. पाहा)

वो जब याद आये

'हमराही' प्रस्तुत संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या गाण्यांचा 'वो जब याद आये' हा कार्यक्रम काल रात्री पाहिला. उच्च दर्जाचे वादक आणि गायक, नेटके सादरीकरण आणि गाण्यांची सुरेख निवड याने कान तृप्त झाले. 'हुई शाम उनका खयाल आ गया', 'अगर दिलबर की रुसवाई हमें मंजूर हो जाये', 'सुनो सजना' अशी अनेक गाणी अजून मनात रेंगाळताहेत. कार्यक्रम हाऊसफुल्ल होता. पटेल आडनावांच्या कुणीतरी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता, त्यामुळे कार्यक्रमाला गुजराथी वाटणार्‍या (फुकट पासात आलेल्या?) लोकांचा भरणा होता. त्यातले काही लोक गोंगाट करत उशीरा आले. प्रेक्षागारात खाद्यपदार्थ न्यायला परवानगी नसताना मध्यंतरात त्यांनी वडे, कोका कोले आत आणले आणि 'आ जाने जा' हे गाणे मधुरा दातार केवळ अफलातून सादर करत असताना कलकलाट करत हे लोक निघून गेले. बाहेर चार चाकी गाड्या लावायला जागा शिल्लक नव्हती. अगदी जग्वारपासून सगळी मॉडेल्स होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची बाल्कनी गलिच्छ आहे. खुर्च्या फक्त खिळखिळ्याच नव्हे तर काहीकाही चक्क निखळलेल्या होत्या. यातले काही म्हणजे काही कडू मनात शिल्लक राहिले नाही. विभावरी जोशी आणि मधुरा दातार यांनी सादर केलेले 'ह्सता हुवा नूरानी चेहरा' आणि त्यातले अफलातून ऑर्केस्ट्रेशन आठवते आहे. हृषीकेश रानडेने मोकळ्या आवाजात म्हटलेले 'मेरे मेहबूब कयामत होगी' मनात गुंजते आहे. साडेतीन तास अतीव सुखाचे गेले.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आय् वुड् वॉक् फाईव्ह् ह्ण्ड्रेड् माईल्स्

'प्रोक्लेमर्स' या स्कॉटिश् जुळ्या भावाञ्च्या बॅण्डचे 'आय् वुड् वॉक् फाईव्ह् ह्ण्ड्रेड् माईल्स्' हे सध्या जमेल तेंव्हा ऐकतो आहे. 'बेनी अ‍ॅण्ड जून' हा चित्रपट याच गाण्याने सुरू होतो.
गाणे एका गिटाराच्या बसक्या तालात सुरू होऊन 'गोनबी-गोनबी' ची पुनरावृत्ती होत असताना अचानक 'इफ् आय् गेड्रंक्' ला ड्रम थडथडतात आणि गाणे पकड घेते.
मग, 'बडाय् वुड् वॉक् फाईव्ह ह्ण्ड्रेड् माईल्स्' सुरू होते ते सिम्बल्स् च्या तालात, रङ्ग चढत जातो आणि मग 'टाडा टडा..' जलद गतीत सुरू होऊन कळस गाठला जातो... मस्त !

देवा प्रेमल...

देवा प्रेमल हिचं "ओम नमो भगवते वासुदेवाय" दिवस बह्र ऐकत बसलेला असतो अस्मिता सारखाच रिपीट मोडवर.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

देव प्रेमलचे सर्वच चँट्स

देव प्रेमलचे सर्वच चँट्स स्वर्गीय आहेत. कालच तिच्या ३ सी डी विकत घेतल्या.- दक्षिणा, हीलींग चँट्स आणि एसेन्स.

इथे ऐका, गोरख कल्याणमधली "ए

इथे ऐका, गोरख कल्याणमधली "ए री माई आज पिया नाही आए" ही पारंपारिक बंदिश फ्युजन स्वरुपात.अद्वैता या बँडने सुरेख फ्युजन केलं आहे. नियमित ऐकणार्यांनी आधी ऐकलेला असेलच. हा रंग पण आवडलाय,
मूळ कलाकृती नेट वर सापडत नाहीये, कोणाला मिळाल्यास दुवा द्यावा/घ्यावा.

देस्फादो आणि गूड ओल्ड लेनॉर्ड

रोचनाच्या पोस्टमधून फादोबद्दल ऐकल्यावर लहान मुलाला मिळालेल्या नवीन खेळण्यासारखी अमेलियाची गाणी दिवसरात्र ऐकली आणि तिची अगदी पंखा होऊन गेले पण आधुनिक फादोची तेवढी मजा येत नव्हती. पण परवा कामावरून परतताना माझ्या गाडीत फ्रेंच भाषेतलं एक रेडीओ स्टेशन नेहेमी वाजत असतं; त्यावर एक पोर्तूगिज वाटणारे गाणे सुरू झाले. आवाज, भाव, ठेका सारेच आवडले आणि थोडे परिचयाचे वाटले आणि कोठेतरी फादो शब्दही कानावर पडल्यासारखेही वाटले. गाणे संपल्यावर कोणी गायलेय वगैरे सांगतात का म्हणून कान टवकारून बसले होते पण भाषा समजत नसल्याने फारसे काही कळले नाही. घरी परतल्यावर रेडीओ स्टेशनच्या वेबसाईटवर पाहिले तर अ‍ॅना मोरा या पोर्तुगीज गायिकेचे 'देस्फादो' हे गाणे असल्याचे समजले. गाण्याचा भाव इतर फादोहून थोडा अधिक आनंदी आहे, तालही जलद आहे पण उच्चार वगैरेचे सौंदर्यही तेच आहे.

लेनॉर्ड कोएनचा मोठा पंखा बरोबर रहात असल्याने आमच्या घरात वीट येईपर्यंत कोएन कानावर पडत रहातो. बर्याच धारदार शब्द असलेल्या रचना अनेकदा कानावर पडल्याने गुळगुळीत वाटायला लागतात पण तरीही एखाद्या रात्रीच्या गडद अंधारात त्याचे 'हालेलुया' ऐकले की त्याच्या खर्ज आवाजातले भाव आणि त्याच्या शब्दांतील ताकद भारावून टाकते. काही महिन्यांपूर्वी ब्यांशी वर्षांच्या कोएनला प्रत्यक्ष स्टेजवर पहायचे, ऐकायचे भाग्य लाभले होते. वय झालेले असल्याने त्याच्याकडून खरंतर फार अपेक्षा नव्हत्या पण आजोबांनी दोन तासांचा कॉन्सर्ट साडेतीन तासांपर्यंत वाढवून आम्हाला भरभरून दिले आणि काही प्रतिभा वयोमानाने क्षीण न होता अधिक फुलतात हे पटवून दिले. त्याने सादर केलेली त्याची बरीच गाणी त्याने अलिकडच्या काळात लिहिलेली आहेत हेही वैशिष्ट्यपूर्ण वाटले. 'गोईंग होम' ऐकताना मात्र उदास व्हायला होते...त्याच्या अतिशय खाजगी, व्यक्तिगत भावनांत त्याच्या परवानगीशिवाय डोकावल्यासारखे वाटते...अर्थात त्याच्या बहुतांश कवितांतून हाच अनुभव येतो..

बॉन जोव्ही ने देखील हालेलुया

बॉन जोव्ही ने देखील हालेलुया गाणे फार छान गायले आहे. कोहेन चे "इन माय सिक्रेट लाइफ" गाणे आवडते.

सध्या हे गाणं ऐकतेय रिपीट

सध्या हे गाणं ऐकतेय रिपीट मोडवर. याचं सुरुवातीच संगीत आवडतं.
www.youtube.com/watch?hl=en-GB&gl=GB&client=mv-google&v=f9MRAgYBaSw

Amazing Amy

अफाट गोड गाणे. "आय लव्ह यु"

अफाट गोड गाणे. "आय लव्ह यु" सीनला प्रत्येक-प्रत्येक-प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी आले आहे. इतकं ते म्युझिक हेलावून टाकतं.