सध्या काय ऐकलंत / ऐकताय- २

...

field_vote: 
0
No votes yet

तुमची सौदिंडियन्गानप्प्रीती पाहून आमच्याकडूनही काही भर -
पुढील बहुतेक गाणी पाहण्यापेक्षाही ऐकण्यास अधिक बरी आहेत.

१. ही आमची अमला. आमचा हिच्यावर भारी जीव. Wink
कमलहासनसोबत 'सत्या' (१९८८) नावाच्या चित्रपटातील हे 'वळयोसै कलकल' (बांगड्यांची किणकिण) गाणे. संगीत इलैयाराजा.
'सत्या' हा हिंदीतील सनी देओल अभिनित 'अर्जुन' (१९८५) वर बेतलेला. (तोच तो मालवणकरांचा अर्जुन..)
अनेक बाबतींत तो 'सत्या'पेक्षा उजवा होता. अश्या चित्रपटांमुळे खरे तर वेगवेगळ्या भागातल्या / प्रांतातल्या प्रेक्षकांबद्दल काही कळत जाते. उदा. मूळ चित्रपटातले हे हिंदी गाणे आणि त्याचे तमिळ रूप. शैलींतला फरक स्पष्ट आहे.

पण 'वळयोसै कलकल' गाण्याची सर अर्जुनमधल्या इतर गाण्यांना आली नाही. (अमला ती अमलाच. Lol
----
२. ही आमची रेवती. आमचा हिच्यावर भारी जीव. Wink
'मौनरागम्' या मणिरत्नमच्या गाजलेल्या चित्रपटातील हे 'चिन्न-चिन्न' गाणे. संगीत इलैयाराजा. कडव्यांच्यामधले संगीत आणि वरवर विसंगत वाटणार्‍या वेगवेगळ्या वाद्यांच्या एकत्रित वापरानंतर आलेला एकसंध परिणाम विशेष उल्लेखनीय. दुसरे 'मंड्रं वंद' हे गाणेदेखील मला अतिशय प्रिय आहे. त्याची चाल पुन्हा 'चीनी कम हैं, चीनी कम हैं' गाण्यात वापरली आहे. (डॉक्टर केसींचा हा छप्परतोड अविष्कारदेखील लगे क्लिक् पाहून टाका.)
----
३. 'वरुमयिन् निरम् सिवप्पू' (म्हणजे शब्दशः - 'गरिबीचा रंग लाल') ह्या के. बालचंदर दिग्दर्शित चित्रपटातले माझे आवडते 'सिप्पी इरक्कद' गाणे. संगीत एम्.एस्. विश्वनाथन्.
कमल हा एक खिशाने अत्यंत फाटका, नोकरीसाठी वणवण करणारा पदवीधर. कवीमनाचा, भावूक आणि मानी. श्रीदेवीशी ओळख झाल्यावर दोघांत आकर्षण निर्माण होते पण प्रेम बराच काळ अव्यक्त राहते. तर ह्या गाण्याच्या सुरूवातीस, श्रीदेवी त्याला आव्हान देते, की ती एक धून गाईल आणि कमलने त्यावर लगोलग काव्य रचावे. कमल 'जय भारती' म्हणत ते आव्हान स्वीकारतो आणि मग गाणे सुरू होते. जुगलबंदीच्या एका टप्प्यानंतर कमल अलगद त्याचे प्रेम काव्यात उलगडतो आणि मग श्रीदेवीही त्याला प्रतिसाद देते, असे हे गुणी गाणे. ( इंग्रजीत शब्दानुवाद असल्याने समजायला सोपे. दुर्दैवाने गाण्यापूर्वीचा आणि थोडा नंतरचा प्रसंग मिळून असे एकत्रित गाणे सापडले नाही.) चित्रपटातील अनेक प्रसंग (आता भडक वाटतात पण) हेलावून टाकणारे आहेत/होते.

ह्या चित्रपटावरून हिंदीत 'जरासी जिंदगी' नावाचा चित्रपट निघाला. अनिता राज आणि कमल अशी जोडी होती. त्यातही हे 'तनदीम तेरेना' गाणे जुळवले होते पण 'सिप्पी..' इतके नीट जमले नाही.
'निळू फुलें'नी अनिता राजच्या वडिलांचे काम जबरा केले होते.
----
राजीव मेनन् दिग्दर्शित 'मे मादम्'(1994) चित्रपटातले 'मागळी पूवे' हे रहमानचे एक अप्रतिम गाणे. गाण्याच्या सुरुवातीस 'व्यंकटेश सुप्रभातम्'चे आधुनिक तालातले बासरीचा नाद फार मधुर आहे.
----
'थिरडा-थिरडा' (चोर चोर) या मणिरत्नमच्या चित्रपटातील 'पुथ्थम् पुदु भूमी' आणि चंद्रलेखा गाणे. पाश्चिमात्य स्वरमेळ अतिशय सुरस आहे. संगीत - रहमान.

----

मी शाळेत जायच्या काळात (८०च्या दशकात) दूरदर्शनवर दर रविवारी दुपारी १ वाजता प्रांतीय चित्रपट दाखवित असत. ते पाहताना, दाक्षिणात्य चित्रपटांतले एक अक्षरही कळत नसले आणि इंग्रजी शब्दानुवादही समजत नसले तरी त्या चित्रचौकटींत, पार्श्वसंगीतात, गाण्यांत असे काही होते, जे मला खिळावून ठेवी. काही प्रसंग, काही स्वरताल हे काहीही समजत नसतानाही कायमचे छाप सोडून गेले.
दोन वर्षांपूर्वी अचानक काही कारणाने असेच एक गाणे डोळ्यासमोर आले; एक आई आपल्या बाळाला पाळण्यात अंगाई म्हणते आहे असे दृश्य होते. त्याची चाल ऐकू येऊ लागली, शब्द थोडे थोडे आठवू लागले.. 'वटपत्र सावित्री...लाली लाली' असे काहीसे आठवत होते. मग यूट्यूबवर ते शब्द टाकले आणि थोड्या प्रयत्नानंतर ते गाणे चक्क सापडले !
'वटपत्र साईकी वरहाल लाली, राजीव नेत्रुनिकी रतनाल लाली' हे ते गाणे. आपल्याकडे जसे 'जो-जो' असे झोपविण्यासाठी वापरतात, तसे दक्षिणेत 'लाली लाली'.
----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्रलेखा या गाण्यातली पाश्चिमात्य सुरावट आवडली. पण मुख्य फीचर अंमळ "कसाक"गिरी हेच वाट्टेय Wink

पुत्तं पुदु बूमी मधील सुरावट खूप जास्त आवडली. सेम अबौट मार्गळी (ऴ हवा खरे तर) पूवे म्हञ्जेच मार्गशीर्षातले फूल. ही दोन्ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखी आहेत.

सिप्पी इरक्कद तितके भावले नाही, पण मेबी पिच्चर पाहिल्यावर अजून भावेल. बायदवे त्यात ३:४० ला गुरुमुखी लिपीतला शिलालेख काय करतोय ROFL द्रविडभूमीत हे चाललेच कसे Wink

चिन्न चिन्न- नॉट द्याट मच. पण मंड्रं वंदं आवडले. काही जेनेरिक नव्वदीतल्या बॉलीवुडी सुरावटींशी नाते सांगणारे संगीत आहे.

वळयोसे कलकल उत्तम.

अन अमलाबै कुणी अमला दातार/गोखले इ.इ. असाव्यात अशा वाटताहेत Wink

बाकी दाक्षिणात्य अङ्गाईच्या बोलांबद्दलही नव्याने माहिती कळाली, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तामिळ गाण्यांची सुरुवात आधीच झाली आहे तर अजून दोन ऐकून पहा
Madharasapattinam या शिनेमातील Pookal Pookum हे गाणे, आणि kangal irandal हे एक. दोन्ही लै आवडीची आहेत.

परवा शुजात हुसेन खानच्या एका कार्यक्रमाला गेलेलो. त्याच्या गझलांनी प्रॉप्पर वेड लावलंय. मेहेंदी हसनच्या एका रेकॉर्डिंगमध्ये गझलबद्दल बोलतांना निवेदक म्हणतो की गझल कुठल्याही स्वरुपात संपूर्ण आहे. वाचून पाहा, गुणगुणून बघा. साथ संगती बरोबर किंवा तशीच. संवाद जास्त महत्वाचा. इसे सुननेवाला चाहिये. शुजातसाहेबांची पद्धत प्रचंड वेगळी आहे. एकीकडे हातात सतार असते आणि त्याच बरोबर ते गात असतात. वातावरण फार सुंदर बनवतात.
त्यांच्याच गझला तू नळी वर शोधून शोधून ऐकतोय. आज दिवस भर डोक्यात राहिलेली ही एक

http://www.youtube.com/watch?v=uH0TlI90iXo

बाजीचा-ए-अत्फ़ाल है दुनियाँ मेरे आगे
होता है शबो-रोज़ तमाशा मेरे आगे..

दुनिया माझ्या समोर, अन् हा पोरखेळ चालला आहे.
दिवस अन् रात्र माझ्या समोर हा तमाशाच चालला आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दक्षिणेहून उत्तरेकडे येतो.

प्रेमाच्या आळवणीसोबतच अक्षरओळख करून देणारे अजरामर गाणे ऐकतोय.

http://www.youtube.com/watch?v=c67nOWSHM4k

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मन्मथ या शब्दाचा अर्थ काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मदन ऊर्फ कामदेवाचे अजून एक नाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जशी मन्मथ रती धाकटी
सिंहसम कटी
उभी एकटी
गळ्यामधी हार


वरील रचना होनाजी-बाळा यांची की राम जोशी यांची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामजोशीबावांचीच!!!

'सुंदरा मनामधि भरली' या लावणीतली ही ओळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रेमाची देवता, अनंग, मदन.
मन्मथनाथ असाही शब्द ऐकला आहे त्यामुळे मन्मथ = काम अश्या अर्थीही तो वापरला जात असावा.
('मन्मथा नाही क्षिती' अशी कुठलीतरी कवितेची ओळ आठवली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती; मन्मना नाही क्षिती

अशी ती ओळ असावी. मूळ कविता विसरलो पण बटाट्याच्या चाळीत काही वासर्‍या या प्रकरणात कुणाच्या तरी वासरीत ही काव्यपंक्ती आलेली आहे. मुद्दामहून
"मन्मनाना-ही क्षिती" अशी ओळ लिहिल्याचेही आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरोब्बर. धन्यवाद.
मन्मना = मत् मना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्सार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एखादा संगीतकार झपाटून टाकतो. मग दिवसनदिवस तोच. दुसरे भूत चढेपर्यंत याच भुताकडून घोळवले जाणे. सध्या खय्याम 'आप यूं' ची नशा तर उतरायलाच तयार नाही. एक गो न बेखुदी मुझे दिनरात चाहिये अशी अवस्था. रात आती रही रात जाती रही. एकदम मूड बदलून 'भाई हसन, ये गूंगा नाच हमें तो पसंद नही...' ही दोस्तांची फर्माईश. 'दिखायी दिये यूं' ही तर एखादी शारीर वेदना असावी अशीच ठसठस. सध्या फक्त खय्याम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास.

अतुल ठाकुर यांची ही कॉमेंट अपेक्षित आहे. है कली कली के लब पर - हे त्यांचे ही आवडते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीट सीगरच्या मृत्यूमुळे कालची संध्याकाळ त्याच्यासोबत गेली -
http://www.youtube.com/watch?v=5iAIM02kv0g&list=RDVucczIg98Gw

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याचं हे गाणं 'हम होंगे कामयाबची' शब्दशः प्रेरणाच आहे. Smile पण बहुदा कुंदन शहाने ते जाणिवपुर्वक केलं असावं, पीट सीगरला श्रेय दिलं की नाही हे बघायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आरंभ है प्रचंड" हे गुलाल पिच्चरमधले अतिजोरदार आणि अतिजबरदस्त गाणे ऐकले. काय गाणे आहे वाह!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या मते (मला गुलाल जर धड कळला असेल तर, मला खातरी नाहीये) हे औपरोधिक सुरातले गाणे आहे ना? गाणे खतरनाकच आहे, वादच नाही. पण ते समरगीतांचा / स्फूर्तीगीतांचा पोकळ आणि हिंसक आव अधोरेखित करते असे मला वाटले होते. तसेच आहे का? की तशी आपली माझी समजूत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कल्पना नाही. हा पिच्चर अर्धवट पाहिला आहे. नीट पहावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो ते तसंच आहे, पण गुलाल चित्रपट जर "प्रॉपोगंडा मधला फोलपणा दाखवणारा" नसता तर हेच गाणं उत्तम समरगीतही ठरलं असतं (भाषिकांचे दौर्बल्य Smile दुसरं काय?!)

ऑन अ सेकंड थॉट, अजेंडा नसणे हा ही एक अजेंडाच आहे* असं गृहीत धरलं, तर अजेंडालेसनेस चा प्रॉपोगंडा करणारे गाणे म्हणूनही पाहता येईल

* टीव्ही बंद असणे हा सुद्धा एक चॅनेल असतो तसं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गॅन्ग ऑफ वासेपूर मध्ये तेरी मेहेरबानीया हे एक छपरी गाणं २-३ दा आहे त्यात यशपाल शर्मा रस्त्यावरच्या स्टेजवर गाताना डोळे बंद करून बोटांवर १,२,३,४ असे मोजतो आणि मग उंच पट्टीतला सूर लावतो .
ते म्हन्जे सा … रे . . ग . . प आणि ध पारून लांब सूर लावतो … खलास!!!हसून हसून वाट लागलेली माझी ;ड Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारेगम मधील "ढ" सोडला तर कुठलाही सूर मला कळत नै. पण ते गाणं ऐकून अन गाणार्‍याचा आविर्भाव पाहून मलाही हसूनहसून कळायचं बंद झालेलं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अक्षरमानवच्या कार्यशाळेत या महिन्यात बालसाहित्य हा विषय होता, वक्ते होते भारत सासणे.

सासण्यांकडे बघण्याचा माझा चष्मा अंमळ रंगीत आहे. त्यांच्या काही कथा बेहद्द आवडतात (उंट, डफ, चिरदाह), काही झोपेच्या गोळ्या म्हणून वापरता येतात. ते थोडे 'आपलं लिखाण / आपला फॉर्म्याट / आपली भूमिका (काय ती) थोर' पंथातले असल्याचं नुकतंच कळलं, त्यामुळे माझ्यातल्या रंजनप्रेमी सवंग वाचकानं त्यांना 'लई भारी'वरून 'अंमळ चक्रम'च्या गटात हाकलून दिलं. बरं, त्यांच्या बालसाहित्यापैकी एक 'टुणटुण बेडकाचा प्रवास' मी वाचलंय. ते माझं वाचनवय चुकीचं असल्यामुळे की पुस्तक ठीकठाकच असल्यामुळे कुणास ठाऊक, पण मला दिपवून टाकू शकलेलं नाही.

या पार्श्वभूमीवर सासणे नि बालसाहित्य हे कॉम्बो ऐकून मी थोडी सावध झाले. त्यांनी सुरुवातच मुळी 'सांगा - सांगा, आहे का मराठीत बालसाहित्य? आहे?' अशी गर्जना करून केली. यावर लोकांतून भागवत - भागवत असा पुकारा होणं क्रमप्राप्त होतं. त्यावर सासणेंचं म्हणणं - भागवतांचं नाव टाळून पुढे जाणं अशक्यच आहे. पण ते सोडून? आहे का कुणी प्रौढांसाठी लिहिणारा साहित्यिक बालसाहित्यात कामगिरी करणारा? (आता ही काय आचरट मागणी आहे? साहित्यिक प्रौढांसाठी लिहित असणं ही बालसाहित्य लिहिण्याची पूर्वअट आहे की चांगलं बालसाहित्य लिहिणं ही? पण मी स्वतःला गप केलं.) त्यावर लोकांनी पुलं (वयं मोठं खोटं), चिंवि, विंदा (पुस्तकांच्या नावांची गरज आहे?), जीए (मुग्धाची रंगीत गोष्ट, बिम्मची बखर), नारायण सुर्वे (ही मलाही बातमीच होती, त्यामुळे मी 'हो?' अशी अविश्वासदर्शक भारलेली मुद्रा तेवढी केली. काय लिहिलंय यांनी बालसाहित्यात? कुणी ज्ञानात भर टाकेल काय?), वीणा गवाणकर (कार्व्हर), माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, रत्नाकर मतकरी, दिलीप प्रभावळकर (बोक्या), साने गुर्जी.... अशी नावं घेतली. त्या सगळ्याला सासण्यांचा 'अहं... नाहीच्च मुळी' छापाचा नकार. इंग्रजीत बालसाहित्य किती थोर आहेत(म्हणजे हॅन्स अ‍ॅण्डरसनच्या परीकथा, ग्रिमच्या परीकथा, लॉर्ड ऑफ दी रिंग्स, हॅरी पॉटर), त्या मानानं मराठीत काहीच कसं नाही, भाषांतरं सोडून मराठीत वर्जिनल काही नाही... अशी रडारड करण्यात अर्धअधिक व्याख्यान गेलं. (मग आपल्याला साहित्यबिहित्य वाचायची आवड लागलीच कशी मुळात, आपण काय वाचायचो जर बालसाहित्य नव्हतंच तर, असा गोड प्रश्न पडून मी काही काळ चिंतनात घालवला. मला बॉ ताम्हनकर (गोट्या, चिंगी) आवडत. भागवतांचा फास्टर फेणे, त्यांची भाषांतरित पुस्तकं तर मी अजुनी वाचते, कुणाला सांगू नका. शशी भागवतांची रत्नप्रतिमा आणि मर्मभेद तसे कुमारवाङ्मयातच तर मोडतात. झालंच तर नारळीकर होतेच. पण हे सगळं सासण्यांच्या मते फिजूल होतं. असो.)

'संस्कारवादी आणि रंजनवादी असे दोन प्रवाह बालसाहित्यात असतात. संस्कारवादी केवळ आपला निवडक विचार वा कायदा मुलांवर लादू पाहतात. रंजनवादी मात्र भोंगळ, त्यांच्याकडे काही नियमच नाही... ' हे सासण्यांनी मांडलेलं अजून एक बुचकळ्यात टाकणारं मत. अमुक एक संस्कार लादतात म्हणून तर संस्कारवादी बंदिस्त, तर तेच करत नाहीत म्हणून रंजनवादी भोंगळ हे कस्काय बुवा, या प्रश्नाला सासण्यांनी माझा प्रश्नच निराळ्या, भारदस्त उत्तरवजा शब्दांत मांडून माझी बोळवण केली. नंतर 'पण संस्कारवाद्यांनी कुठलाही विधिनिषेध न बाळगता जगभरातलं सगळं काही मराठीत आणलं, त्यामुळे त्यांना सगळे गुन्हे माफ आहेत' असं एक माफीपत्र स्वतःच देऊन टाकलं. रंजनवादी 'छान वास्तववादी चित्रं काढत नाहीत. अर्कचित्रात्मक काढतात. याला काय अर्थ आहे?' हा सासण्यांनी घेतलेला आक्षेपही मज पामरास अगम्य होता.

बालसाहित्यात अद्भुतरस हवाच, वि़ज्ञानाची नावाखाली अद्भुतरसाची गळचेपी नको, साधनेच्या बालकुमार विशेषांकाचं काम ऐतिहासिक थोर आहे (हे मात्र खरंच आहे), चांदोबा थोर आहे (हेही खरंच आहे) मराठी बालसाहित्यात विनोद नाही, अद्भुतरस नाही, चित्रकथा नाहीत, काही काही काही नाही, तुम्ही नवीन लेखकांनी (!) अवश्य बालसाहित्य लिहिलं पाहिजे, जरूर लिहिलं पाहिजे.... या मुद्द्यांवर कहर रेंगाळत शेवटी गाडी 'हल्लीची मुलं इंग्रजी वाचतात, मराठी नाही', 'शहरी मुलं वाचत नाहीत, ग्रामीण मुलंच वाचतात', असं करत करत 'मी शेरलॉक होम्सचं केलेलं रूपांतर (समशेर कुलूपबंधे) किती बालकप्रिय, मला कित्ती पत्रं येतात' अशा जाहिरात मोडमधे घरंगळत गेली. तोवर झोप न लागता जागं राहण्यासाठी मी वहीत चक्क मेंदी काढायला घेतली होती.

मुख्य आक्षेपः

- सासण्यांनी म्हटल्यापैकी बहुतेक विधानं मान्य होण्यासारखी होती, पण कमालीचं भोंगळ - गोलगोल बोलणं.
- व्याख्यानात सांगण्यासारखं असेल ते संपून गेल्यावरही ३ तासाचं भाडं वसूल झालंच पाहिजे असा पण केल्यासारखं तेचतेच बोलत राहणं.
- आत्मपरीक्षण ठीक, पण आत्मताडन? का बुवा? मराठीत मुलांना वाचायसारखं चिकार काय काय आहे. अर्थात त्यात सुधारणा, भर कायमच हवी. पण चांगलं काही बोलायचंच नाही? आपलाच मानभंग करण्याची ही काय पद्धत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शेरलॉक होम्सचं केलेलं रूपांतर (समशेर कुलूपबंधे)

समशेर कुलूपबंधे!!!!! Lol

क्या बात! जनू बांदे छाप सरळ सरळ चोरायचं तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्वारी हां, ते कुलूपघरे आहे. गल्तीसे मिष्टेक. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जनू बांडे हे जेम्स बॉन्डचं आहे ना?
बी बी सी च्या शेरलॉक ने हाही फरक संपवला आहे म्हणा ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ... सॉरी हां, सॉरीच. हा फरक रॉबर्ट डौनी ज्युनियरच्या होम्सनी संपवलाय आधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ब्लास्फेमी बद्दल सॉरी Smile , बाँड ही खरतर टिका नाहीये, बाँन्डची अ‍ॅडव्हेंचर्स बिन्डोक वाटतात, बाँडला शेरलॉकचा मेंदू असता तर बर झालं असतं असं वाटतं कधीकधी

डाउनी, ओरिजीनल शेरलॉक पेक्षा थोडा वेगळा असला तरी बाँड सारखा वाटला नाही, कारण तो बराच गबाळा आहे शिवाय मार पण खातो बर्‍याच ठिकाणी...
कंबरबॅचचा शेरलॉक मात्र बर्‍याचदा स्टायलिश सुटाबुटात, "क्लेअर-दा-ला-लुssन" छाप दाखवलाय. व्हॅटिकन कॅमिओजी हाणामार्‍या पण आहेत, या हाणामारी नंतर वूमन त्याला ईन्जेक्षन देऊन बेशुद्ध करणार हे मी आधीच ओळखलं होतं (सो अनलाईक बॉन्ड नो Smile ). शिवाय मनीपेनी... आपलं मॉली, तीही आहेच Smile
ड्रिंक्स मागताना सुद्धा तो 'शेकन नॉट स्टर्ड' म्हणेल असं वाटलं होतं, तेवढं मात्र झालं नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रमेश मंत्र्यांचा जनू बांडे लय म्हणजे लयच आवडायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय की. मला शेरलॉक बॉण्डछाप नाही वाटत. पण तुम्ही लैच अभ्यासानं सांगताय, तर गप ऐकणं भाग आहे. Tongue
आपले चष्मे निराळे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला बॉ ताम्हनकर (गोट्या, चिंगी) आवडत. भागवतांचा फास्टर फेणे...

हो हो / अरे वा! / लाँग टाईम, इ.इ.

(त्या फेण्याने फुरसुंगीचे नाव अजरामर केले. आयटीने हिंजवडीचे केले, तस्से! बोले तो, अन्यथा [तत्कालीन] पुण्याजवळ 'फुरसुंगी', 'हिंजवडी' अशा नावांची गावे आहेत, याचा आम्हांस पत्ताही लागता ना.)

(अतिअवांतर: भागवतांवरून आठवले. बिपिन बुकलवार कोणाला आठवतोय काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन बुकलवारचा फ्यान आहे मी. "दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा", "अक्काचे अजब इच्छासत्र" वगैरे टिपिकल भा रा भागवतीय नावं असलेली पुस्तकं आठवताहेत! माझ्याकडे असलेल्या या पुस्तकांतली बिपिनची चित्रं म्हणजे बेलबॉटम घातलेल्या अमिताभला जाड फ्रेमचा चौकोनी चष्मा घातला तर जसं चित्र दिसेल तशी असायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बुकलवाराचे ८ तासात मुंबई प्रदक्षिणेचे एक पुस्तक वाचले होते. नाव आठवत नाही.. एक भुताळी जहाजदेखील त्याचेच होते बहुधा. भागवतांनी फास्टर फेणेच्या नंदू नवाथेचा स्पिन ऑफ केला होता तीदेखील चांगली होती.. पण माझे सगळ्यात लाडके म्हणजे मायानगरीतील राक्षस (नाव थोडे चुकले असेल कदाचित), ते एकदाच वाचले होते पण नंतर कधी एवढा बेक्कार हसलेलो आठवत नाही.. हल्ली बऱ्याचदा शोधले पण मिळाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुकलवाराचे ८ तासात मुंबई प्रदक्षिणेचे एक पुस्तक वाचले होते. नाव आठवत नाही

बिपिन बुकलवार - मुंबईला चक्कर

एक भुताळी जहाजदेखील त्याचेच होते बहुधा

नाही - भुताळी जहाज मध्ये बिपिन नाही. भुताळी जहाज, ब्रह्मदेशचा खजिना, वगैरे काही पुस्तकांतले नायक एकाच पुस्तकापुरते आहेत.

हल्ली बऱ्याचदा शोधले पण मिळाले नाही.

पुण्यात एक धडफळे नावाच्या बाई भा रा भागवतांच्या वाङ्मयावर पीएचडी करत आहेत. त्यांच्याकडे नक्की मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा प्रतिसाद आणि त्यावरच्या प्रतिक्रिया बालसाहित्याच्या धाग्यात हलवता येतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधनेचा उपरोल्लिखित बालकुमार विशेषांक आणि त्यातली सासण्यांची तथाकथित 'होम्स'कथा इथे पाहता येईल. वाचून टाका आणि होऊ द्या चर्चा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> इंग्रजीत बालसाहित्य किती थोर आहेत(म्हणजे हॅन्स अ‍ॅण्डरसनच्या परीकथा, ग्रिमच्या परीकथा, लॉर्ड ऑफ दी रिंग्स, हॅरी पॉटर) <<

हे वाचून खुर्चीतून पडलो. म्हणजे इंग्रजी बालसाहित्य चांगलं आहेच, पण रोअल्ड डाल किंवा 'The Curious Incident of the Dog in the Night-Time' वगैरे विसाव्या शतकातले ह्यांना वाचायला देऊन आधी ह्यांचं प्रशिक्षण करायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हॅन्स अ‍ॅण्डरसन, ग्रिम वगैरेंचे साहित्य हे तांत्रिकदृष्ट्या 'इंग्रजी' बालसाहित्य म्हणता येईल काय? भले ही आपल्याकडे त्याचा परिचय मुळात इंग्रजी भाषांतरांतूनच झालेला असला, तरी?

आणि मग इंग्रजीतील ही भाषांतरे जर चालतात, तर मग "भाषांतरं सोडून मराठीत वर्जिनल काही नाही" अशी बोंब मारण्यात नेमका काय अर्थ आहे?

बाकी, स्वतःलाच पदोपदी सकारण-किंवा-विनाकारण कडकलक्ष्मीवाल्यासारखे बदडून काढण्याची भारतीय/भारतवंशीय (आणि त्यातही विशेषकरून मराठी) माणसाची जित्याची खोड ही मेल्याशिवाय (पक्षी: शेवटचा भारतीय/भारतवंशीय/मराठी माणूस जोवर या पृथ्वीतलावर जिवंत आहे तोवर) जाण्यातली नाही. (हेही वाक्य त्यातलेच म्हणा. "कारण शेवटी आम्ही(ही)...", इ.इ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी, स्वतःलाच पदोपदी सकारण-किंवा-विनाकारण कडकलक्ष्मीवाल्यासारखे बदडून काढण्याची भारतीय/भारतवंशीय (आणि त्यातही विशेषकरून मराठी) माणसाची जित्याची खोड ही मेल्याशिवाय (पक्षी: शेवटचा भारतीय/भारतवंशीय/मराठी माणूस जोवर या पृथ्वीतलावर जिवंत आहे तोवर) जाण्यातली नाही. (हेही वाक्य त्यातलेच म्हणा. "कारण शेवटी आम्ही(ही)...", इ.इ.)

ही सांस्कृतिक मॅसोकगिरी बोकाळलेली आहे खरीच. लहान पोरांना आवडतील अशी वर्णनेच जर पाहिजे असतील तर गेलाबाजार एकनाथ, वामनपंडितादि लोकांचे ग्रंथ चाळून नव्या मराठीत लिहिले तरी लै झालं. पण जो जास्ती कोरडे ओढून घेईल तो भारी असा ट्रेंड आहे खराच. म्हणजे काहीवेळेस ते योग्य असलं तरी जुन्या वाङ्मयाचा काहीच उपयोग न करता असं बोलायचं म्हणजे टीका तर होणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काल npr वर चीनमध्ये ३०-४०च्या दशकात लोकप्रिय झालेल्या जाझ संगीताविषयी ऐकले.

याआधी बोसानोवा ऐकतांना शब्द वाद्यासारखे ऐकतांना येणारी मजा अनुभवली (ऐका (पेक्षा दोघांना गातांना (पेक्षा फक्त इलिस रेगिनाला) पहाच) हे गाणे) होती. तर १९४४ मध्ये रेकॉर्ड केलेले हे नितांत श्रवणीय गाणे (बघा कसली आठवण (भामटे कुठले) येते का?) ऐका:

अवांतरः अरे यार, शेरलॉक होम्स ऐकून ऐकून कंटाळा आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपनी आंखों में बसाकर कोइ ईकरार करुं.. एकतेय आणि पाहातेय. एकायला सुंन्दर गाण पण पहायला तुफान विनोदी!! तो आपले ईरादे उघड उघड जाहिर करतोय आणि मधल्या खोलीत बसलेली माँ फुल्ल कौतुकानी सपोर्ट करतेय...(गाण्याची फील्म मधली सिचुएशन माहिती नाही..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओपिँवर लेख लिहीलाय का कोणी मराठी आंजावर?
मी कालच काही गाणी डाउनलोड केली. घोड्याच्या टापांचा आवाजवाली Biggrin
पिया पिया मोरा जिया पुकारे, युं तो हमने लाख हंसी देखे है, जरा हौलेहौले चलो मोरे साजना वगैरे.
अजुन कोणती गाणी आहेत? मला वाटत नया दौर मधेपण होत एक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटत नया दौर मधेपण होत एक...

'मांग के साथ तुम्हारा मैं ने मांग लिया संसार'?

अत्यंत जातीयवादी गाणे. डब्बल जातीयवादी. (किंवा, डिपेंडिंग ऑन वन्स पर्स्पेक्टिव, आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करणारे.)

बरे ते जाऊदे. पण या गाण्यातल्या टापा नेमक्या कशाच्या? घोड्याच्याच की अन्य कशाच्या? (तूर्तास यूट्यूबला अ‍ॅक्सेस नाही म्हणून विचारतोय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म बरोबर हेच ते जातियवादी गाणे Smile धन्यवाद.
पण हे गाणे मी दिलेल्या ३ गाण्यांपेक्षा कमी छान वाटतेय ना? मलातरी तसेच वाटतेय.
घोड्याच्याच टापा आहेत. सगळी गाणी टांग्यातली.
यावरुन उगीच ट्रेन, बस, जीप, बाईक, सायकल असलेली गाणी कोणती असा विचार करायला लागले. त्या त्या वाहनाचा आवाज असायला हवा गाण्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घोड्याच्याच टापा आहेत. सगळी गाणी टांग्यातली.

नाही म्हणजे, पिच्चर अर्धवटच पाहिलाय, नि त्यात कोठेतरी बैलगाडीच्या शर्यती असल्यासारखे काहीतरी अंधुकसे आठवतेसे वाटते (चूभूद्याघ्या), म्हणून शंका आली, इतकेच.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गाण्याततरी घोडाच आहे कंफर्म केल मी युट्युबवर.
चित्रपटात बैलगाडीची शर्यत असल्यास ठाऊक नाही. मी कधीतरी १०- वयात पाहिलाय. आणि त्यात शेवटी ट्रक आणि घोडागाडी अशी शर्यत असल्याच आठवतय. घोडागाडीच्या बाजुने असलेले लोक 'साथी हाथ बढाना' म्हणत श्रमदानाने शॉर्टकट मार्ग बनवुन जिँकतात असे काहीसे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कधीतरी १०- वयात पाहिलाय. आणि त्यात शेवटी ट्रक आणि घोडागाडी अशी शर्यत असल्याच आठवतय. घोडागाडीच्या बाजुने असलेले लोक 'साथी हाथ बढाना' म्हणत

हम्म्म... मग कदाचित माझाच गोंधळ झाला असावा. कुठल्याशा दूरदर्शनवर-(आमच्याकाळी)-पैशाला-पासरी-छाप मराठी पिच्चरमधली बैलगाडीची शर्यत आणि इथली घोडागाडीची शर्यत यांची गफलत झाली असावी.

(जौद्या... पिच्चर हा काही आपला प्रांत नाही - कधीच नव्हता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हे गाणे मी दिलेल्या ३ गाण्यांपेक्षा कमी छान वाटतेय ना? मलातरी तसेच वाटतेय.

नाय बॉ. आपल्याला आवडते. तितकेच आवडते.

घोड्याच्या टापावाली आणखीही एकदोन गाणी आहेत, पण (१)त्यात ओपीचा काही संबंध नसू शकेल, आणि (२) तुम्हाला आवडतील याची शाश्वती देऊ शकत नाही. (म्हणजे, मलाच आवडत नाहीत. आणि त्यातले किमान एक तरी भकास वाटते.)

(१) 'आह'मधले 'छोटी सी यह ज़िंदगानी रे, चार दिन की कहानी तेरी, हाय रे हाय, ग़म की कहानी तेरी', आणि
(२) 'डॉ. कोटणीस की अमर कहानी'मधले 'ज़िंदगी, ज़िंदगी, ज़िंदगी, कोई सपना नहीं ज़िंदगी'. (यातल्या घोड्यांच्या चालीत काहीतरी गडबड असावी. ठेका कानांना चमत्कारिक वाटतो.)

(अवांतर: दोहोंपैकी पहिला पिच्चर मी पाहिलेला आहे. भिकार आहे. पण वर उल्लेख केलेले तेवढे एक गाणे सोडून बाकीची गाणी बरी आहेत. दुसरा पिच्चर मी पाहिलेला नाही.)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुद्द मुकेश चक्क गाडी हाकतो आहे की काय ? चेहर्‍यावरून तरी तोच वाटतो आहे.
खूप वर्षांनी उजळणी झाली या गाण्याची. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The song "Chhoti Si Yeh Zindagani" sung by Mukesh was also picturised on him.

(विकीवरून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile पहील गाणं ऐकल्यासारख वाटतय. दुसर मात्र कैच्याकै आहे. दोन्ही फारशी आवडली नाहीत. मग उतारा म्हणुन आमच्या देवआनंदच ट्रेनमधल 'जिया ओ जिया कुछ बोल दो' आणि मोटरगाडीतल 'जीवन के सफरमे राही' ऐकल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज़िंदगी, ज़िंदगी कोई सपना नही ज़िंदगी हे बहुतेक बैलगाडीतले गाणे आहे. एकदोनदाच ऐकले. पुन्हा यू ट्यूबवर सुद्धा पहावेसे वाटले नाही. त्यातला 'सपना'चा 'सुपना' असा उच्चार मात्र लक्षात राहिला आहे.
विक्टोरिआ २०३ मध्ये सुद्धा एक घोड्याच्या टापांवरचे गाणे आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कानावर पडून पडून पाठ झालेली लेंका -- windows 8 jingle ऐकतोय.
.
.

http://www.youtube.com/watch?v=Tfy5CBfjZ8s
.
.
जिंगल असल्यामुळे त्याची पटकन तोंडावर रुळणारी चाल आवडते.
शिवाय साधी,सोपी व रोजच्या वापरातली भाषा, समजणारे उच्चार ह्यामुळे अधिक क्लिक होत असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जेथ्रो टलचं 'लोकोमोटिव्ह ब्रेथ'.

नवख्यांनी रेकॉर्डेड व्हर्जन प्रथम ऐकावे असे सुचवतो, मग लाइव्ह परफॉर्मन्सचं ऐकावं. पहिल्यांदा वाजवलेला पियानो सुंदर आहे पण आवडत नसल्यास १:१९ पर्यंत थांबावं मग एकदम धमाल गाणं चालू होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या मालिकेचे सुरूवातीचे भाग बघते आहे. सोनू निगम असतानाचे.

रंगमंचावर कमीतकमी चकचकाट, मोजका वाद्यमेळ, बोटांवर मोजता येणाइतक्या जाहिराती, हलकासाच मेकप, अनेक संघ आणि त्यांच्या गुरुंची भांडणं यांचा अभाव असलेला हा कार्यक्रम बघून-ऐकून फार समाधान वाटले. कॉर्ड राऊंड आणि नो ऑर्केस्ट्रा राऊंड ह्या माझ्या सर्वात आवडीच्या फेर्‍या. यातल्या एका या भागात रोचक गाण्याची ओळख झाली, सद्ध्या तेच ऐकते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एकेकाळी खूप आवडायचे. हेमंतदांचे एक दुर्लक्षित गाणे.

https://www.youtube.com/watch?v=lAvSrO6_66Q

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://youtu.be/0nD236dJCSs हे ऐकतेय सध्या वेड्यासारखी. गो$$$$$ड गाणं आणि गाणारिही किती गोड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्रे मीपण.
त्या साहिर धाग्यानंतर ३ ४ दिवस कंटीन्युअस फैली हुयी है सपनोँकी बाहे चालू होत. कल्पना कार्तिकसारखे हात हलवत फिरत होते =)). मग आहा रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिये. या ट्युनला राजेश खन्नासारखी मान हलवणे जास्त सुट होत ;-). मग तुम ना जाने किस जहां मे खो गये, हम प्यार मे जलनेवालोँ को चैन कहा आणि हे गाणं. सध्या ही गाणी ऐकतेय परतपरत.
पण युट्युब लिँकसाठी आभार. हे गाणं पाहिलं नव्हतं. मस्त आहे ती मुलगी. नाव काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना कार्तिकसारखे हात हलवत फिरत होते<<<<< हाहाहा...!! ते गाणं पहाताना मला सारखं वाटतं कि ती मधेच हात हलवायचं विसरते आणि झाडामागे उभं राहुन कोणितरी तिला सारखं सांगतय कि बाई हात हलवत राहा... Biggrin Biggrin Biggrin

वरच्या गाण्यात गणारी जगजीत कौर आहे आणि ती गोड मुलगी कोणी चांद उस्मानी म्हणतय तर कोणी निवेदिता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही माझी आवडती गायिका. मला तिने गायलेलं बाजारमधलं http://www.youtube.com/watch?v=hYqH2i0MC60 फार आवडतं(खय्यामचं गाणं आणि गायिका जगजीत कौर म्हणजे दुग्धशर्करा योगच.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही आणि ती जगजीत कौर एकच आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगजीत कौर. मी असंही ऐकलंय की जगजीत कौर ही खैय्याम ची पत्नी. खरंखोटं माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगजीत कौर ही खैय्याम ची पत्नी
..........खरे आहे.
मुझफ्फर अली दिग्दर्शित एका (प्रदर्शित न झालेल्या) चित्रपटात खुद्द ख़य्याम यांनी जगजित कौरसोबत गायलेले एक गाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुल्हेराजा रिलीझ झाल्यावर शाळेतले सिनियर्स तसलीच गॉगलस्टाइल वापरत छपरी ड्यान्स करीत, ते आठवले.
"लडकि कम्माल रेइ अक्कियों से गोल्लि मार्रे "
.
.
ह्यावेळी त्यांच्या ग्यांगमधील पोरेपोरेच एकमेकांस गोविंदा - रवीना समजून त्या गाण्यातील "ढिशक्यांव ढिश्यांव" असा बंदुकीचा आवाज आल्यावर गोविंदा रवीना कसे गार्डनच्या मध्यभागी पार्श्वभाग लयबद्ध पद्धतीने एकमेकांवर आडवे आपटातात, तसेच करित. फक्त ब्याक्ग्राउंडला गार्डनच्या ऐवजी नाल्याशेजारचा कुबट बसस्टॉप असे; समोर बस आणि मागे बसचे प्रवासी.
.
.
त्यातील एकाला बरोब्बर तो पार्श्वभाग आपटताना हुकमी "टर्र टर्र , फद फद फद" असा आवाज तोंडाचा वापर न
करता काढता येइ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

http://youtu.be/A8Yr1OOeOT8 हे जरा जास्त उजेडात आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशै मुगम
तमिळ भक्तिगीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द ड्युअरीस्ट्स (The Dewarists) चा पहिला सीझन आणि त्यातली झेब-हानिया-शंतनू मोईत्रा आणि स्वानंद किरकिरेचं 'बोलो क्या खयाल है’ आणि शुभा मुद्गल आणि स्वरात्मा यांनी अतिशय उत्कटपणे सादर केलेलं ’दूर किनारा’ रिपीट मोडवर ऐकतेय.

द ड्युअरीस्ट्स हे नाव तात्काळ आवडून गेलेलं पण त्याचा उच्चार कसा करतात आणि त्याचा अर्थ काय आहे हे कळायला मार्ग नव्हता ना तो एमटीव्हीने कधी उलगडून सांगीतला. बरेच जण याला 'द देवारीस्ट्स' असं म्हणतात. द ड्युअरीस्ट्स हे संगीत जगतातील एखा्द्या होऊन गेलेल्या चळवळीचं नाव असावं असं कार्यक्रमाचं स्वरूप पाहून वाटलं पण तशातलाही भाग नव्हता. शोध घेतल्यावर हे नाव थॉमस ड्युअर नावाच्या एका स्कॉटिश व्हिस्की डिस्टीलरचं निघालं. द ड्युअरीझम ही संकल्पना थॉमस ड्युअरच्या तत्वज्ञानावर आधारीत आहे. तो म्हणतो:"यशाचा पाठलाग करायचा सोडून न देताही आयुष्याचा आनंद पुरेपूर लुटता येतो" आणि ’द ड्युअरीस्ट्स’ कार्यक्रमातील इमोजेन हीप, अग्नी, परीक्रमा, मिडीव्हल पंडीत्स आदी बॅंड्स वजा सादरकर्त्यांच्या सांगितीक प्रवासाला, त्यांच्या संगीताप्रती असलेल्या उत्कटतेला पाहता ही मंडळी ते तत्वज्ञान आणि द ड्युअरीस्ट्स हा उपक्रम चालवण्यामागे असलेलं "काही गोष्टी करून पाहिलेल्या खरंच चांगल्या असतात" हे तत्वज्ञान शब्दश: जगतात असं मला वाटलं.

बाकी मधाळ आवाज कसा असतो हे झेबचा आवाज ऐकून कळावे. दुमदुमता, थोडासा खरबरीत आवाज असलेल्या पण त्याला खट्याळपणाची, थोडी मिस्कील झाक असलेल्या स्वानंद किरकिरेविषयी वेगळं सांगायची गरज नाही. स्वरात्मा आणि शुभा मुद्गल यांचा परफ़ॉर्मन्स आवर्जून ऐकण्यासारखा आहे. त्यात मध्येच वसू दिक्षित कन्नडमध्ये जे गातो त्याचा अर्थ असा आहे

दूरादा उरीना कथेया
केलिदे नंदा ह्र्द्या
ई गलियली नदियल्ली

"दूरवरच्या त्या गावातल्या गोष्टी
वा-यावर स्वार होऊन तर कधी
नदीच्या पाण्याच्या खळखळाटातून माझ्यापर्यंत पोहोचतात"

तायिया मदिलल्ली
गेलेयारा नगियल्ली
ना कंडनू कथेयन्नू

"माझ्या आईच्या मांडीत पहुडून
मी या गोष्टी ऐकलेल्या आहेत
माझ्या मित्रांच्या खळखळत्या हास्यात
मी गोष्टी पाहिल्या आहेत"

कनसोलगिना कनसालि ना कन्दे आ ऊरानू इन्दू
"माझ्या स्वप्नातल्या एका स्वप्नात मी तो दूरवरचा प्रदेश पाहिलेला आहे"

'द ड्युअरीस्ट्स'चे हे दोन्ही भाग इथे पाहता येतील-
बोलो क्या खयाल है-https://www.youtube.com/watch?v=qP6nFl7aSAk
दू किनारा-https://www.youtube.com/watch?v=1kI-g4JRPGE

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

https://www.youtube.com/watch?v=WfMECcgmHM4

मेहदी हसन यांची उच्च गझल. शायर अदीब सहारनपुरी. यात सुलतान खान यांचे सारंगीचे मस्त पिसेस आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉनी फ्रान्सीस चे "स्टुपिड क्युपिड फार गोड आहे.
तिचेच लिप्स्टिक ऑन युअर कॉलर देखील छान आहे.
सध्या सेल्फी देखील ऐकतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वदच्या दशकातली कैक गाणी.

१. मेहेंदी लगा के रखना- डीडीएलजे.
२. दीदी तेरा देवर दीवाना- हम आप के हैं कौन.
३. सुनो ससुरजी- दूल्हे राजा.
४. तू चीज़ बड़ी है मस्त मस्त- मोहरा.
५. रुकमणी रुकमणी- रोज़ा.
६. केहेना ही क्या- बाँबे.
७. आज हमारे दिल में- हम आप के हैं कौन.
८. मुक्काला मुक्काबला- हमसे है मुकाबला.
९. हम्मा हम्मा- बाँबे.
१०.तुम पास आये- कुछ कुछ होता है.
११. अरेरे अरे ये क्या हुवा- दिल तो पागल है.

इ.इ.इ.

पुनरेकवार ते दशक जगलो. लय मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कालच रहमानचं 'ओ भवरे' ऐकत होतो... आशा भोसले आणि येशुदास, क्या बात है...

'दौड'वरून आठवलेलं अवांतरः 'कॉफी विथ करण' च्या रॅपिड फायर राऊंडमधे अनुराग कश्यपला 'रामगोपाल वर्मा इज...' हे वाक्य पूर्ण करायला सांगितलं असता त्याने 'रामगोपाल वर्मा वॉज...' असे उत्तर दिले होते. खरंच रामगोपाल वर्माचं असं का झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

What about "Kya mausam aya hai...", "Pardesi Pardesi jana nahin..."?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुमार सानूचे सगळे रेकलेले आणि ओथंबलेले गाणे.
अगदि सोचेंगे तुम्हे प्यार करें के नहिं ( आणि त्यामागून वाजणारे तू नू नू) पासून ते सारे आशिकी हिट्स.
शिवाय इतर मंडळींपैकी
लड्का कम्माल रेइं अक्कियों से गोल्ली मार्रे ढिशक्यांव ढिश्यांव (इथे गोळीच्या आवाअजवर गोविंदा व रवीना पार्शभाग लयबद्ध पद्धतीने आडवे आपटतात.)

झालच तर :-
सरकाइअलो खटिया जाडा लगे
किंवा दि ग्रेट दिलेर मेहंदि (मेहंदि हसनचे हे गुरु असावेत असं वाटतं. Wink )
ओयें होयं के कुडिया चैन लिगंया
किंवा
आज्जा मियां छड्ड हो यारी छड्डी नैय्यों इश्क में मार्री
हो गै तेर्री बल्ले बल्ले हो जायेंगि बल्ले बल्ले

किंवा
सड्डेनाल रहोंगे तो ऐश करोंगे
जिंदगी दे सारे मजे कॅश करोगे

गोविंदाचे एक गाणे :-
मेरि बाते सुनकर देखो हस्ना नहि
मै सब सच केहता हू आपकी कसम
मैने पिया नहि व्हिस्की बियर या रम
मेरे दद्दू खेले कबड्डी चश्मे पे टूटे हड्डी

त्या काळातली अजय देवगण्-सुनील शेट्टी-रवीना असलेले "दिलवाले" तसेच अजय देवगण अमरिश पुरी आणि मधू असलेले "दिलजले"...
सारेच महत् श्रवणीय.

अर्थात त्या काळात संगीत क्षेत्रालाच "अजून काहीतरी हवं" असं वाटत होतं.
काळ खुणावत होता. आख्ख्या संगीत क्षेत्राला त्याच्या परमोच्च साधनेची आस लागली होती.
ती पूर्ण होण्यास मात्र अजून एक दशक जावं लागलं .
आणि मग अवघ्या सहाएक महिन्यात लागोपाठ अठ्ठावीस हिट देउन इतर सर्वच गायक - म्युझिशियनचा धंदा बसविणार्‍या महान संगीत सूर्य
पं हिमेश रेशामिया अवतरले.
हिमेश हे बॉलीवूडिय संगीताचे सुवर्ण कळस असतील तर् त्याचा भक्कम पाया दशकभरापूर्वी अन्नू मलिक, कुमार सानू , बाबा सेहगल, आलिशा चिनॉय , रेमो फर्नांडिस ह्यांना गाजवलेल्या व दिशा दाखवलेल्या १९९०च्या दशकातच असेल. हे दशक निश्चितच सुवर्ण नव्हे प्लॅटिअनम अक्षरात; खरे तर रेशामियांच्या स्वरांप्रमाणे युरेनियम अक्षरात लिहिले जाइल.

ज्योक्स अपार्ट
मोहरा मधील "टिप टिप बरसा पानि " च्या आधीची ट्यून आपल्याला लै आवडते.(कुठून ढापली माहित नै.)
चिंब भिजलेली रवीनाही भारिच. "आज्ज रप्पट जैय्यो तो हमे ना उठय्यो" मध्यल्या स्मितापेक्षाही रवीना भारि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आणि

काले काले बादल जब भी छाएंगे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

श्या एवढ्या चांगल्या गाण्याची फुलटू वाट लाउन टाकली की बे...

मेरी बाते सुनकर देखो हस्ना नही
इसे झुठ मानकर तुम फसना नही
मै सब सच केहता हू आपकी कसम
मैने पिया नही व्हिस्की बियर या रम
मेरे दद्दु पहने डायपर चश्मे पर उनके वायपर
डैडी की टुटे हड्डी जब खेले वो कबड्डी

असं आहे ते. बाकीच गुगल कर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिप टिप बरसा पानि

"आज्ज रप्पट जैय्यो तो हमे ना उठय्यो" मध्यल्या स्मितापेक्षाही रवीना भारि.

हम तो समझे के बरसात मे बरसेगी शराब
आयी बरसात तो बरसात ने भी दिल तोड के रख दिया

वो मेरे है मुझे मिल जायेंगे आ जायेंगे
ऐसे ही कुछ बेकार खयालात ने दिल तोड के रख दिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वदीमधला माझा आवडता संगीत दिग्दर्शक आहे विजू शहा... मोहरा, विश्वात्मा, गुप्त.. व्वा मजा आली त्याची गाणी आठवून !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

https://www.youtube.com/watch?v=kNQnfCagrJU

https://www.youtube.com/watch?v=znHzwH6rKfw

https://www.youtube.com/watch?v=U6zOPOhx_Zk

रफी साहेबांची गाणी ऐकून मधुमेह व्हायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर !

निर्दयी प्रितम .. खूपच छान !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

.
.
लताबाईंचा अगदी ठेवणीतला आवाज.
.
.

.
.
.

.
.
.

.
.
.

.
.
.

.
.
.

.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल(July 30) डॉ. वसंतराव देशपांडे यांचा स्मृतीदिन. आमच्या पिंपरी-चिंचवड भागात डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फौन्डेशन आहे. ते गेली ३३ वर्षे तो स्मृतीदिन साजरा करतात. तसा तो त्यांनी कालही केला. कार्यक्रमाला गेलो होतो. छान होता, जुन्या clippings पाहायला मिळाल्या. रविद्र घांगुर्डे, तसेच वंदना घांगुर्डे यांचे गायन, आठवणी कथन ऐकायला मिळाले. छान कार्यक्रम होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com