येथे कुठला मराठी शब्दप्रयोग चपखल बसेल? - २

'अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ' हा धागा लांबल्यामुळे दुसरा धागा काढला आहे.

hostile ला मराठीत नेमकं काय म्हणतात ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

होस्टिलिटी = वैरभाव. म्हणून होस्टाइल = वैरभावाने वागणारा.
तत्कालिक परिस्थितीनुसार 'अरेला कारे म्हणणारा', 'उरफाट्या स्वभावाचा', 'दात धरून असणारा' वगैरे वापरता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा!! सगळे पर्याय खूप आवडले. आरेला कारे म्हणणारा खासकरून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे ला कारे म्हणणारा हा अर्थ तात्कालिक परिस्थितीतही वापरता येईल याबद्दल अंमळ शंका आहे, कारण मराठीत असलेली प्रतिकाराची छटा इंग्रजी शब्दात नाही. बाकी पर्याय चपखल आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

hostile शब्दात प्रतिकाराचाच अर्थ अभिप्रेत आहे. One is always hostile to something.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्य बाबींसाठी प्रतिकूल चालून जावे (उदा. hostile environment)

अवांतर - ३०० प्रतिसादांबद्दल अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉस्टाइल एन्विरॉनमेंट / प्रतिकूल वातावरणातही "प्रति" चा "रिअ‍ॅक्शनरी" अर्थच अभिप्रेत आहे ना?

या नंतर "येथे कुठला मराठी शब्दप्रयोग चपखल बसेल" असा #२ धागा काढून याची देखील मालिकाच झाली तर फारच अनुकूल होईल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलीकडे हॉस्टाइल टेक-ओवर,हॉस्टाइल मर्जर असे शब्द अर्थविषयक वार्तापत्रांतून पुष्कळदा वाचायला मिळतात. मराठीतही त्यांचे छानसे प्रतिशब्द रूढ झाले आहेत. पण गेले दोन दिवस ते काही केल्या आठवत नाहीयत. लोकसत्तेतली अर्थवार्तापत्रे वाचणारे कुणी इथे असतील तर त्यांना हा शब्द आठवावा. खुशीचे/मैत्रीपूर्ण अधिग्रहण, नाखुशीचे अधिग्रहण असे काहीतरी असावे का? ('अधिग्रहण' साठी अ‍ॅक्विज़िशन हा शब्द असतो. मला वेगळा शब्द आठवला नाही. मर्जर म्हणजे अर्थात विलीनीकरण.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म..मग मला अंमळ वेगळे म्हणायचे होते. मराठीत प्रतिकार करणे हे बह्वंशी कुठल्याश्या वाईट इ. गोष्टीसंदर्भात असते, तसे होस्टाईलमध्ये नाही असे वाटते. तिथे आहे ती फक्त प्रतिकूल प्रतिक्रिया. मग ज्याविरुद्ध प्रतिक्रिया आहे ती गोष्ट वाईट असो वा नसो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होस्टाईल ला "अरे ला कारे करणारा" हा प्रतिशब्द बरोबर वाटत नाही. अरे ला कारे करण्यासाठी आधी कोणीतरी "अरे" करणे गरजेचे आहे. होस्टाईल मधे रीयाक्शन अभिप्रेत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विरोधक' / 'विरोधी पक्षातील' / वैरी हा शब्द होस्टाईलला का चालु नये? यात नक्की वेगळी छटा कोणती? का मलाच होस्टाईलचा नेमका अर्थ कळालेला नाहिये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> 'उरफाट्या स्वभावाचा', 'दात धरून असणारा' वगैरे वापरता येतील. <<<

"उरफाट्या" = माझ्या माहितीप्रमाणे चुकीचा शब्द.
"उफराट्या स्वभावाचा"/"उफराटा स्वभाव" असलेला = योग्य शब्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"उरफाट्या" = माझ्या माहितीप्रमाणे चुकीचा शब्द.

सदर प्रतिक्रिया शनिवारी आली असल्याने, हनमानधपक्याने चालून जावी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दक्षिण महाराष्ट्रातल्या बोलीभाषेत उरफाट्या हाच शब्द ऐकला आहे. उफराटा इ.इ. लेखीतच वाचलंय फक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन्ही चालून जावे - दोन्ही उच्चार अनेकदा ऐकले आहेत.
हा बादली/बालदी सारखा भेद झाला. योग्यायोग्य असे काही नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बादली/बालदी

याचा कोल्हापुरी उच्चार 'बारडी' असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चिकटवणे/चिटकवणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरेरे आधी त्या धाग्याचा नवा रेकॉर्ड होऊ द्यायचा होता की! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नया धागा, नया लव्ज़: rigorous

कठोर तुरुंगवास च्या अर्थाने नाही. शास्त्रीय, पद्धतशीर, कसून केलेले संशोधन - rigorous scholarship, rigorously argued point of view - या अर्थाने.
चांगले पर्याय आहेत का?

ता.क: तर्कशुद्ध चालेल, नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा शब्द आता प्रचारात नाहीये, पण अर्थ तसा फिट बसावासे वाटते.

साक्षेपी (p. 852) [ sākṣēpī ] a (साक्षेप) Close and constant in the study, pursuit, or performance of; of determined and unremitting application; of an inhering or insisting quality of mind. (मोल्सवर्थ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'साक्षेपी' हा शब्द तूर्तास प्रचारात नसल्याबद्दल साशंक आहे.

रादर, वापरात आहे. (बोले तो, वापरला गेलेला पाहिलेला आहे.) फक्त, त्याचा अर्थ कोणालाच कळत नसावा. अगदी वापरणारालासुद्धा. फक्त, चांगला दिसतो म्हणून वापरायचा असतो, इतकेच. 'विहंगम'सारखा. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रादर, वापरात आहे. (बोले तो, वापरला गेलेला पाहिलेला आहे.) फक्त, त्याचा अर्थ कोणालाच कळत नसावा. अगदी वापरणारालासुद्धा. फक्त, चांगला दिसतो म्हणून वापरायचा असतो, इतकेच. 'विहंगम'सारखा. असो.

हाहा, अगदी अगदी.

पण वापरात तितकासा पाहिला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साक्षेपी हा शब्द शिवरायांना जसा फिट बसतो तसा मलादेखिल बसतो असे वाटते. ROFL
म्हणजे गरज असेल किंवा नसेल तरी नको तिथे आक्षेप घेत सुटण्याचे काम माझ्याशिवाय दुसरा कोण करतो? ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

rigorous scholarship, rigorously argued point of view -
.......काही पर्याय -

. कसोशीने मांडलेला मुद्दा
. तावून-सुलाखून निघालेले संशोधन, बिनतोड सिद्धता/मुद्दा
. काटेकोर दृष्टिकोन (परंतु काटेकोर हा 'मेटिक्युलस'ला समानार्थी आहे)
. शास्त्रकाट्याच्या कसोटीवर खरा ठरणारा मुद्दा, इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

कसोशीने ठीक वाटतो.
तसाच निगुतीने सुद्धा चालेल. [दोन्ही शब्द रिगरस ऐवजी मेटिक्युलस चा अर्थ सांगतात असे वातते].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सगळे पर्याय चांगले आहेत - सर्वांचे आभार!
"कसोशीने" खूपच आवडला, वापरला आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+ कसोशीने नेमका आहे
मला साक्षेपीसुद्धा आवडला. योग्य त्या संदर्भाने या दोन्हीपैकी एक हमखास वापरता यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रिगरस मंजे सश्रम. आपण नेहमी सश्रम कारावास असेच ऐकलेले असते. पण तसंच असावं असं कै नै. रिगर शब्दात फिजिकल, मेंटल जबरदस्त कष्ट अपेक्षित आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग रिगर मॉर्टिस म्हणजे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाकुड होणे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझे विचार माझ्याबरोबर शेअर कर - इन जनरल, शेअर कर ला काय म्हणाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

वाट. पत्ते वाटल्यासारखे.

(स्वगतः माझी अशीच प्रगती होत राहिली तर एक दिवस मटाचा संपादक होईन आणि फावल्या वेळात लक्स साबणाचे फ्लेक्स डिजाईन करीन. आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आकांक्षांपुढति जिथे साबण ठेंगणे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सोपा पर्याय : तुझे विचार मला सांग.
कमी सोपा : तुझ्या विचारप्रक्रियेत मला सहभागी कर.
(सांगणे आणि सहभाग या दोहोंत अर्थछटेचा बारीक फरक आहे. बहुतेक प्रसंगी निःसंदर्भ असावा. तेव्हा सोपा पर्याय वरचढ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> सोपा पर्याय : तुझे विचार मला सांग. <<<

किंवा

तुझं म्हणणं काय आहे ते सांग.
तुला काय म्हणायचंय ते सांग.
तुझ्या मनातलं मला सांग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझे विचार माझ्याबरोबर शेअर कर - इन जनरल, शेअर कर ला काय म्हणाल?

इंग्लिशमध्ये 'अ पेनी फॉर युअर थॉट्स' असा छान शब्दप्रयोग आहे. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरही मी माझ्या बायकोला खरोखर एक पेनी द्यायचो ते आठवलं. विचार मांडण्याच्या प्रक्रियेत 'हिअर इझ माय टुप्पेन्स' हाही शब्दप्रयोग प्रचलित आहे.

प्रत्यक्ष मराठीत बोलताना 'शे्अर कर'च्या भाषांतरापेक्षा 'सांग ना' किंवा 'बोल...' किंवा 'काय म्हणायचंय तुला?' असे साधे प्रश्नच उपयुक्त ठरतात. बऱ्याच वेळा संभाषणात भाषा हे दुय्यम अंग असतं. स्वरामधून, देहबोलीतून बराच संवाद साधता येतो. दुर्दैवाने भाषांतरांमध्ये देहबोलीचं भाषांतर होत नाही. भाषिक दौर्बल्य, दुसरं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बऱ्याच वेळा संभाषणात भाषा हे दुय्यम अंग असतं. स्वरामधून, देहबोलीतून बराच संवाद साधता येतो. दुर्दैवाने भाषांतरांमध्ये देहबोलीचं भाषांतर होत नाही. भाषिक दौर्बल्य, दुसरं काय?

__/\__ अगदी हेच्च!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

चपखल बसणे म्हणजे नक्की कसा बसणे? खल इथे खळी, खड्डा या अर्थाने आल्यासारखा वाटतो. खड्डा बुजून चप्पट होईल असा म्हणजे चपखल का?
समर्पक आणि चपखलमध्ये नेमका फरक काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समर्पक आणि चपखलमध्ये नेमका फरक काय?

उपमा समर्पक असतात अन विशेषणं चपखल असतात असं मला वाटतं. चूभूदेघे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

समर्पक हे विशेषण आणि चपखल हे (बव्हंशी) क्रियाविशेषण असल्याने हा उपमा/विशेषण निकष योग्य वाटतो. अर्थात, प्रत्यक्ष वापरात नियमापेक्षा सवयीचा भाग अधिक असावा.

बाकी चपखलचे मूळ बहुतेक अरेबिक व्हाया फारसी असावे, असे वाटते. (बखल = stinginess, stricture, tightness --> चबखल --> चपखल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>बाकी चपखलचे मूळ बहुतेक अरेबिक व्हाया फारसी असावे,

अय्यो रामा...

म्हणजे आता चपखल शब्द वापरता नै येणार.
नितिन सावरकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हीसुद्धा पर'की' हो Smile

'की' घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गूगलबाबा كي याचा अर्थ सो दॅट असा सांगतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आयला हे रोचक आहे!!!!

मग बखले हे आडनाव काय बरे दर्शवते? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यायला, मी चपलख म्हणायचो.

http://www.aisiakshare.com/node/2739?page=1#comment-53684 पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'रिगरस' साठी मराठीत कधीकधी 'सक्त' हा शब्द सुद्धा वापरला जातो.उदा. सक्त मेहनत.
हा शब्द हिंदी/उर्द्/फारसी 'स़ख्त'वरून आला असावा. सख्त म्हणजे कडक, कठिण. 'संगे मरमर की तरह सख्त बदन में तेरे, आ गयी है मेरे छू लेने से नरमी कितनी..'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगमरवर हा संगेमर्मर अर्थात संग-ए-मर्मर चा अपभ्रंश आहे. फारसीत संग = दगड. मर्मर चा अर्थ काय असावा? मार्मारा प्रदेश?

http://en.wikipedia.org/wiki/Marmara_Region

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संग ए मरवर (मारवार- मारवाड). मारवाड प्रांतात मिळणारा दगड. मराठीत संग-मरवरच म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मारवाड प्रांतात संगमरवर मिळतो हे खरंच, पण मूळ शब्दात 'मर्मर' आहे, मर्वर/मारवार नाही. म्हणून ते कनेक्शन माझ्या मते नसावे.

शिवाय, मराठीत संगमरवर म्हणताना शब्द संगम्-रवर असाच उच्चारलेला ऐकला आहे. संग-मर्वर असा ऐकला नाही. उच्चारसाधर्म्यामुळे अंमळ घोळ असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उच्चारी संगम रवर असला तरी संग (दगड) हा शब्दाचा पहिला भाग असणे आणि मारवाडात तो दगड मिळत असणे म्हणजे योगायोगापेक्षा जास्त आहे असे वाटते.

मर्मर हाच मरवरचा अपभ्रंश असण्याची शक्यता बरीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यामुळे मी आत्ताच इंग्लिश टु फारसी गूगल ट्रान्सलेट चेकवलं. marble असा शब्द देताच औटपुट आला سنگ مرمر.

https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=marble+in+persian+translation

उच्चार आहे संग-ए-मर्मर. मूळ फारसीतच हा शब्द असल्याने मारवाडवरून त्याचे कनेक्शन असणे योग्य वाटत नाही - शिवाय तुर्कीतही मार्मरा प्रदेशात हा दगड मिळतोच. आणि पर्सेपोलिसमध्ये दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीही संगमरवरी शिल्पे सापडलेली असल्याने इराण्यांना इंड्यन संपर्काअगोदरही तो दगड ज्ञात होता हे सिद्ध होते.

इराणातही संगमरवर मिळतो हे खालील बातमीवरून दिसून येते.

http://www.wsj.com/articles/SB10001424052748703678404575635981796965438

तस्मात मारवाडशी संबंध नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मारवाड प्रदेशाला हे नाव दगडावरून पडले असेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही वाटत. 'मरु' वरून आले असण्याची शक्यता आहे. -वाड हा प्रत्यय प्रदेशवाचक तर आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संग-ए-मर्मर म्हणजे शब्दशः मर्मरचा दगड. इस्तन्बूलपासून डार्डानेल्सच्या सामुद्रधुनीपर्यंतच्या समुद्राला Sea of Marmara असे नाव आहे. त्यामध्ये अनेक लहानमोठी बेटे आहेत आणि त्यामधील सर्वात मोठया बेटाला 'मार्मारा' असे नाव आहे. प्राचीन काळापासून 'हेलेस्पाँट' ह्या नावाने प्राचीन जगात ओळखल्या जाणार्‍या ह्या भागात ग्रीक लोकांचे येणेजाणे आणि वसाहती होत्या. (ट्रॉय शहराची उत्खननामध्ये सापडलेली जागा डार्डानेल्सच्या सामुद्रधुनीपर्यंतच्या पूर्व किनार्‍यावर गॅलीपलीच्या समोर आहे. ग्रीक कथांमधील ऑलिंपस पर्वत ट्रॉयपासून फार दूर नाही. पहिल्या महायुद्धातील एक गाजलेली लढाई गॅलीपलीच्या - टर्किशमध्ये गेलिबोलू - आसपास लढली गेली.)

मार्मारा बेट त्यावरील पांढर्‍या दगडासाठी प्रसिद्ध आहे. कोरीव कामाला अतिशय उपयुक्त असा हा दगड ग्रीकांना तेथे प्रथम मिळाला. त्याचे ग्रीक नाव μάρμαρον मार्मारोन. असा दगड मिळण्याची जागा ह्यावरून बेटाला 'मार्मारा' हे नाव मिळाले आणि समुद्रालाहि तेच नाव मिळाले. नंतर जगात अनेक जागी हा दगड आहे असे कळले पण मूळचे ग्रीक नाव त्याला कायमचे चिकटले. आता जगातील बहुतेक भाषांमधील ह्या दगडाचे नाव मूळ ग्रीकपासून आलेले आहे असे जाणवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान माहिती.

संग-ए-मर्मर ह्या शब्दाचे मराठीकरण करताना, मर्मर चे मरवर झाले हे ठीक.

पण उच्चारी ते संग-मरवर असे झाले नाही. ते संगम-रवर असे करून, संगमरवराला संगमेश्वराच्या जांभ्या दगडाची कळा आणली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्लिशमधील मार्बलची व्युत्पत्तीही ग्रीक मार्मारोस वरूनच आलेली आहे असे दिसते.

https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=marble+etymology

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Reach ला - पहुंच या अर्थाने - काय म्हणता येईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किंवा काही संदर्भांत (वशिला इ.) लागेबंधे/ओळख/संबंध असेही चालून जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कुठेही 'पहुंच'पारंब्या नसणार्‍या व्यक्तीस सध्याच्या जमान्यात अनवटच म्हणावे लागेल नै? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपर्क?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपर्क! हं...ठीक

हे सगळे शब्द इतर अनेक वेळी वापरता येतील.
मी एका वेगळ्या छटेने तो शब्द वापरु इच्छितो

पारंपारिक माध्यमांच्या तुलनेत इंटरनेचा प्रभाव व 'रीच' मानवी आयुष्यावर अधिक असेल का?

या वाक्यात इंटरनेटचा पल्ला , वट वगैरे नै बसत.
इंटरनेचा 'संपर्क' हा त्यातल्या त्यात योग्य वाटतो आहे. पण अजून काही पर्याय/सुचवणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला इथे 'प्रभाव'च सगळ्यांत जास्त योग्य वाटतो आहे. 'परिणाम' / 'दूरगामी परिणाम' यांतलंही काही चालू शकेल. पण ते संदर्भ तुला ठाऊक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रभाव व प्रभावक्षेत्र म्हणता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रभावक्षेत्र चालेल. (पण अगदी शब्दास प्रतिशब्द हवा असेल तरच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवाका चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवाका म्हणजे एक्स्टेंट. 'रीच' साठी तो योग्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्याप्ती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स व्याप्ती! लैच आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डिक्शनरीत दिलय - पोहोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

एक अर्थ - लग्गा. दुसरा - पसारा, व्याप्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ambivalence?
शब्दशः अर्थ "दुतर्फा" होईल असं वाटतं. पण मानसिक द्विधा परिस्थिती, अनिश्चितता, हे दर्शवणारा शब्दप्रयोग आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुतर्फाऐवजी द्विधा अधिक योग्य वाटतो.
मुळात अ‍ॅम्बिवॅलन्समध्ये शब्दशः 'दोन्ही' अवस्था अभिप्रेत असल्या, तरी भाषांतरात चलबिचल/संभ्रम/दोलायमान असे अनिश्चिततादर्शक शब्द अधिक नेमके ठरावेत.

अवांतर - 'ambi', 'amphi' आणि 'अभि-'चे मूळ एकच असल्याचे पाहून गंमत वाटली

word-forming element meaning "both, on both sides," from Latin ambi- "around, round about," from PIE *ambhi "around" (cognates: Greek amphi "round about;" Sanskrit abhitah "on both sides," abhi "toward, to;

(दुवा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्विधा योग्य आहे.
---
मेघना बरेचदा वापरते तो 'दुग्धा'. उदा - मी दुग्ध्यात आहे.
दाते-कर्वे:
दुग्धा—स्त्रीपु. १ अनिश्चितता; शंका; भ्रांति. (क्रि॰ असणें; दिसणें; वाटणें). 'हे जिवंत असतां त्यांचे राज्यांतील माणसांस दुग्धा पडेल.' -मराचिसं २५. २ कासकूस; धरसोड; कांकू; द्विवि- धता. 'त्यांची जाण्याची अद्यापि दुग्धा दिसते.' -क्रिवि. (सामा) अनिश्चितपणें; संदिग्धपणें; मोघम; अळमटळम. [सं. द्विधा]

मोल्सवर्थः
दुग्धा [ dugdhā ] f m (द्विधा) Doubt or uncertainty. v अस, दिस, वाट. 2 Hesitation, fluctuation, suspense. 3 Gen. used as ad and without inflection, signifying Dubiously, undecidedly, vaguely, indeterminately.
-----------

जवळपास जाणारा वाक्प्रचार हवा असल्यास -
१. मन सारखं तळ्यात-मळ्यात होत होतं.
२. त्याची सारखी धर-सोड चालू होती.
-----------------------------
अवांतर :
द्विधा (हिंदी : दुविधा) = दु + विधा, आंतरजालीय मराठीत विधा = genre

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदन आणि अमुक, तुमचे प्रतिसाद आत्ताच पाहिले! मी द्विधाच शब्द वापरला.
"दुग्धा" पहिल्यांदाच ऐकला. पण कायकी तसा वापरल्याने क्लियोपॅट्रा सारखं वाटतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

porn या शब्दाला मराठीत अचूक प्रतिशब्द आहे का? नाम म्हणून आणि विशेषण म्हणूनही. विशेषण म्हणून बटबटीत / भडक / अश्लील (जरी याला vulgar सापडतो) असे प्रतिशब्द आठवतात. पण नाम म्हणून तर मराठीत काही नाहीच. शृंगारसूचक असा एक शब्द सुचला. पण तो eroticaच्या जवळ जाणारा आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डिक्शनअर्‍या चाळल्या.
पॉर्न आणि पॉर्नोग्राफी हे दोन वेगळे शब्द आहेत. पॉर्नोग्राफी हे लैंगिक क्रियांचे भडक/प्रत्यक्षाहून अधिक उत्कट आभास देणारे चित्रण असे म्हणावे लागेल. तर पॉर्न हे "to cater to an excessive, irresistible desire for or interest in something" असे ढोबळ मनाने म्हणता येईल.

तेव्हा पॉर्नोग्राफीसाठी एक आणि जनरल 'पॉर्न'साठी एक असे दोन वेगळे मराठी शब्द / शब्दसमुच्चय शोधावेत असे सुचवतो
---

मला दोन्हीसाठी नेमके शब्द सुचत नाहीयेत हे ही खरं!
ऐसीकरांनो शब्द सुचवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>जनरल 'पॉर्न'साठी एक असे दोन वेगळे मराठी शब्द / शब्दसमुच्चय शोधावेत असे सुचवतो

याला चपखल मराठी शब्द पॉर्न असा आहे. [जसे जंगल, मूला (moolah) हे इंग्रजी शब्द आहेत]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या बाबतीत हिंदी मला उजवी वाटते. टेक्निकचं तकनीक करून त्याला हिंदी शब्द बनवून टाकलं. स्लँग बंगालीमध्येही पॉर्नला पानू असे म्हणतात. तसं मराठी करताना दिसत नाही. एक तर तत्सम नैतर सरळ प्रतिशब्द असाच खाक्या दिसतोय. एकोणिसाव्या शतकात तद्भव तयार केले असतीलही, पण अलीकडे तरी तद्भवांचं वावडंच दिसतंय. हे कै बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छे छे....
अहो गिलास आणि तकनीक या हिंदी शब्दांवरून ग्लास आणि टेकनिक हे इंग्रजी शब्द बनले आहेत.

पु. ना. थत्ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुठे आहे वावडं? इंटरनेट आणि संगणकाशी संबंधित शब्द स्वीकारले की. जाल (आणि विदा) हा फक्त जालावरचे लोकच वापरतात. बाकी लोक इंटरनेटच वापरतात. झालंच तर फाईल. फोल्डर. पोष्टर. डष्टर. हापीस. इस्पितळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तद्भवांबद्दल मुद्दा होता. हिंदीच्या तुलनेत मराठीत इंग्लिश-तद्भव शब्द कमी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि तद्भव म्हणायचे तर
शोल्डर(सोल्डर), शिमिट,मुन्सिपाल्टी,शॅम्पल्,टेष्टिंग वगैरे. इलेक्ट्रिशियन, वायरमन यांचा शब्दसंग्रह फार भारी असतो. पिन तर मराठीच बनून गेलाय. पिना मारणे वगैरे. इंच,(च पूर्ण) फुट, मैल हे सुद्धा.गनी- गोणी,बिगुल, काडतूस,गर्नळ,(गुर्नळ) पाटलोण, ग्यास,माचिस,बक्कल्,पाद्री,पाइप्(पायपातून)बटण, मटण, गरादी,बंगला,अकादमी, मास्तर, दिपोटी,कंदिल (कँडल? शंकास्पद),खाट, बीडिंग्-बिडिंग्(फॉल्-बिडिंग),गटार,(संडास शब्द कुठून आला असेल?)वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बरोबर. उच्चभ्रू मराठी समाजाला तद्भवांचे वावडे दिसून येते. कामगारांची भाषा रूढ होत नाही, रूढ होते ती हुच्चभ्रूंची भाषा. त्या वर्गाबद्दल बोलतोय.

बाकी कामगारवर्गाच्या शब्दसंग्रहाबद्दल काय बोलावे? शॉकाप्सर, शॉक अब्सर, शाकाप्सर, हे शब्द खास मराठीच अशी माझी कोणे एके काळी समजूत होती.

बाकी संडासाच्या व्युत्पत्तीबद्दल मलाही कुतूहल आहे. व्युत्पत्तिकोश पाहिला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

Shock absorber, puncture आणि cold drink हे मराठीने सर्वात जास्त खेळवलेले शब्द आहेत.

बादवे - एक मेक्यानिक पंचर काढायला "टामी" नावाचं अवजार वापरायचा. हे काय असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय की. कसं असतं दिसायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टॉमी बार असावा. पन्चर काढायला नसेल चाक काढायला असेल.

बॉक्स पान्हा (स्पॅनर- पान्हा हाही एक खास मराठी शब्द) फिरवण्यासाठी वापरायची लिव्हर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रैट्ट. हेच असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पान्हा? की पाना?
पान्हा नव्या आईला फुटतो असे ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तर पान्हाच म्हणतो. पण तुम्ही म्हणता तसं पाना असू शकेल.

आणि ते हिंदीतही म्हणतात. [उत्पल दत्त + शत्रुघ्न सिन्हा - चित्रपट - नरम गरम ]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पंचर काढायला

'पंचर' नव्हे, 'पम्चर' किंवा 'पंप्चर' Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित सडा-सं मार्जन वरून आला असावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीही ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो, कारण त्यात सडाही आहे आणि मार्जनही!
(आणि तुम्ही जाह्नवी कधीपासून झालात? कॉपीराइटभंग होईल की!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाह्नवी कोण आणि तिचा इथे संबंध काय ते कळाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रीपत्नी जाह्नवीदेवी ०.५x स्पीड फेम

हल्ली "काहीही" हा शब्द ऐकला की "हं श्री" हे आपोआप डोक्यात वाजतं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बॅट्याचा आय्डी हॅक करुन कोणीतरी दुसरा/दुसरीच दिसतीय. आधी आळेकर माहीती नव्हते आता जाह्नवी कोण माहीती नाही?

तू ठीक आहेस ना बॅट्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उच्चभ्रू मराठी समाजाला तद्भवांचे वावडे दिसून येते.

सहमत.

कारण तद्भव शब्द वापरणे म्हणजे गांवढळपणा हा गैरसमज. पण म्हणून तत्सम वापरावेत तर, मराठी भाषेचे काय होणार ही भिती!

सावरकरपूर्व काळातील मराठी उच्चभूंना हा त्रास नसावा. नंतर मात्र तसा व्हायला लागला तसे, संस्कृतला वेठीला धरून शब्द 'पाडले' गेले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला चपखल मराठी शब्द पॉर्न असा आहे.

+११११११११

या पर्यायी शब्द शोधण्यामुळे आणि अस्तीत्वात नसले तर जबरदस्तीने तयार करण्याच्या फॅडा ( ह्या शब्दाला पण अचुक मराठी शब्द काय ? ) मुळे मराठीची दीनवाणी अवस्था होत चालली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हंते. हा आणि आधीचा धागा वाचतानापण "हुं? कोण वापरणारे असले शब्द? आणि कोण वाचणारे असले शब्द वापरून केलेलं भाषांतर?" असे वाटत होते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म.टा. का खपतो याचा अंदाज होताच, आता पुष्टी झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म.टा. का खपतो याचा अंदाज होताच, आता पुष्टी झाली

मटाच्या यशाची पोचपावती म्हणावी काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL होय पोचपावतीच म्हणायला हवी! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओह उच्चभ्रुंनी उच्चभ्रुंसाठी काढलेला धागा आहे का हा. 'क्षमस्व' बरं का. आम्ही गावकुसाबाहेरच ठीक आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याचे/जिचे गैरसमज त्याला/तिला लखलाभ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतका कडवटपणा कशासाठी काही कळेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अनु रावला एक धन श्रेणी दिली आणि सहमतीचा प्रतिसाद दिला तर कंपुबाजांनी ऋण श्रेण्यांची आतषबाजी चालू केली. आणि वर परत मलाच प्रश्न विचारताय काय झालं म्हणून. असो चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पातळ की घट्ट?

धुतली का?

बारसे केलेत की नाही अजून? (अरे हो, 'पुष्टी' नाव ठेवले, नाही का? हे म्हणजे, "तुम्हारा नाम क्या है, बसन्ती?" म्हणून विचारण्यासारखे झाले. हौ ष्टूपिड ऑफ मी!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुष्टी "मिळाली" म्हणतात ना सहसा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे वाटते.

("झाली" नाही म्हणत, एवढे निश्चित.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पर्यायी शब्द शोधण्यामुळे आणि अस्तीत्वात नसले तर जबरदस्तीने तयार करण्याच्या फॅडा ( ह्या शब्दाला पण अचुक मराठी शब्द काय ? ) मुळे मराठीची दीनवाणी अवस्था होत चालली आहे.

फॅड = वेडाचार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चोक्कस!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टूम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूळ हा शब्द अधिक चपखल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खुळ हे वैयक्तीक वाटते. फॅड हे बर्‍यापैकी सामाजिक लेव्हल वर पसरलेले खूळ म्हणु शकता कदाचित.
आणि खुळ शब्दात नकारत्मकता दिसते, फॅड हे इन्-थिंग दर्शवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.
टूम अधिक चपखल वाटतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो तो ऑप्शन आहेच हो.
या धाग्यावर विचारण्याचे प्रयोजन म्हणजे एखाद्याला नसेल सुचत तर इतरांना विचारणे हे आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> porn या शब्दाला मराठीत अचूक प्रतिशब्द आहे का? नाम म्हणून आणि विशेषण म्हणूनही. विशेषण म्हणून बटबटीत / भडक / अश्लील (जरी याला vulgar सापडतो) असे प्रतिशब्द आठवतात. पण नाम म्हणून तर मराठीत काही नाहीच. शृंगारसूचक असा एक शब्द सुचला. पण तो eroticaच्या जवळ जाणारा आहे.. <<

लैंगिक उद्दीपक किंवा कामोद्दीपक (साहित्य, चित्रपट, वगैरे)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे पॉर्न्रोग्राफीला चालावे बहुदा.
पण फूड पॉर्न वगैरे शब्दांमधील पॉर्न यात येत नाही.

म्हणून म्हटलं, संदर्भानुसार दोन/अधिक वेगळे शब्द योजावे लागतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> पण फूड पॉर्न वगैरे शब्दांमधील पॉर्न यात येत नाही. <<

कामोत्तेजक किंवा कामोद्दीपक हा शब्द पॉर्नसाठी विशेषण म्हणून चालावा. मग त्या धर्तीवर मांजरींचे / अन्नाचे 'उद्दीपक फोटो' वगैरे शब्द वापरता यावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ते titillating चं भाषांतर नाही का झालं? त्याहून कामोत्तेजक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> ते titillating चं भाषांतर नाही का झालं? त्याहून कामोत्तेजक? <<

titillatingसाठी 'चाळवणारं' अधिक योग्य वाटतं. 'उत्तेजक' आणि 'उद्दीपक'मध्ये पॉर्नसाठी मी 'उद्दीपक'च निवडेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हं. चाळवणारं. परफेक्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.